
सारणः
अर्धा वाटी गूळ किसलेला नाहीतर चुरा गूळ,
चार चमचे बारीक बेसन,
१ चमचा दूध,
२ चमचे शुद्ध तूप,
२ चमचे सफेद तीळ,
२ चमचे सुखे पांढरे खोबरे(काळी पाठ नसलेले) नाहीतर चुरा,
२ चमचे खसखस्(एच्छिक आहे. सर्वच जण टाकत नाहीत)
वेलची,
केसर,
तव्याला चुना
पारी:
१ वाटी कणीक,
२ चमचा बारीक रवा,
४ चमचे बारीक बेसन
४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन,
पाणी लागेल तसे,
मिठ चवीला.
पारी कृती:
१. सगळी पिठ व रवा एक करून मध्ये खड्डा करून मिठ घालून मध्ये मोहन घालायचे व मस्त क्रम्स करायचे.
२. मग पाणी लागेल तसे घालून घट्ट भिजवून झाकून अर्धा एक तास तरी ठेवावे. रवा भिजतो.
३. एक तासाने हाताला जरासेच तेल घेवून एकदम मळायचे मस्त. तेल ओतायचे नाही पुन्हा. रवा एक्जीवे झाला पाहिजे. पुन्हा झाकून ठेवायचे.
सारणः
१. तीळ, सुखे खोबरे कीस, खसखस कोरडे असे वेगवेगळे मंद आचेवर जरासेच भाजून घ्यायचे,रंग बदलला नाही पाहिजे. बेसन ही तूपात खरपूस भाजावे वास येइपर्यन्त. मग जरासाच दूधाचा हबका मारावा.
२. मग सर्व(बेसन व गूळ सोडून) बर्यापैकी थंड करायचे व वाटायचे वेगवेगळे. ह्याचसाठी वेगळे वाटायचे की तेल सुटून मिक्सी खराब होवू शकतो. मध्ये मध्ये थांबून चमचा फिरवून अंदाज घेत वाटायचे नाहीतर तेल निघून पातं अडकते व मिक्सी खराब होइल. हि पूड तयार ठेवणे.
३. आता आधी गूळ व बेसन हातानेच वेगळा मिक्स करून घेवून मळणे व वरील पूड टाकणे. फूड प्रोसेसर असेल तर मस्त. पण खूप फिरवू नये गूळ उष्णतेने वितळेल. व मिश्रण खूप कोरडे करू नये थोडेसे ओलसर असेल तर गोळे करायला बरे पडते. असे गोळे करून झाकून ठेवावे. कोरडे करू नये.
४. वेलची पूड्,केसर कुस्करून टाकावे.
लाटणे:
एकतर उंडा करून मध्ये भरून लाटणे.
पण ह्याच्यापेक्षा दोन पातळ चपाती करून सारण सर्व बाजूने पसरवायचे पण कडे पर्यन्त मिश्रण भरू नये. गूळ वितळून बाहेर येतो. मग आधी कडेकडेने लाटावे.( साधनाच्या मांडे कृती मध्ये दाखवलेय ना तसेच).
१.कडेने पातळ असा उंडा करायचा. त्याने कडा पातळ रहातात.
२.मोदकासारखा उंडा करून जितके ज्यास्त सारण भरता येइल तितके भरायचे,
३. हातानेच मग मोदकासारखा जवळ आणून तोंड बंद करून हातानेच जरा चपटा करायचा कडेने पातळ ठेवत.
४.मग हलक्या हाताने लाटायचा, मी पातळच लाटते. गूळ जर मस्त मिक्स असेल तर नाही येत बाहेर.
५. पोळी एका बाजूने भाजली की पलटायची.
६. मस्त फुगते.
७. खुसखुशीत पोळी मध्ये तोडून बरी पडते..
१.तवा हा खूप गरम नाही पण योग्य गरम पाहिजे. नाहितर चिकटते. दिनेश ह्यांनी मला गेल्यावेळेला चुना लावायला सांगितला तव्याला. मी चुना लावूनही केल्या व चुना न लावता. फक्त गॅस नीट ठेवायचा व तव्याचे तापमान नीट सांभाळायचे. एक बाजू भाजली की दुसरी पलटून भाजायची. ज्यास्त वेळा उलट पलट करु नये. गूळ बाहेर आल्याने चिकटतो व उलटत नाही गॅस खूपच गरम झाला तर व पोळी कच्ची रहाते.
एकदा सवय झाली दोन तीन पोळी झाली की होते मग नीट.
२. गूळ कडक असेल तर स्टील डब्यात घालून कूकरमध्ये शिटी शिवाय १० मिनीटे घालायचा व मग लगेच बाहेर काढून फोडायचा.
३. तीळाचे प्रमाण व खोबरे आपल्या आवडीप्रमाणे कमी ज्यास्त करु शकतो.
४.जर तीळ्,खसखस ,खोबरे भाजले ना की आपोआप तेल सुटते वाटताना मग गूळ अॅड केला की लगेच ते तेलच बाईंडिंग सारखे काम करते. मी बघ असे लाडू वळून ठेवलेत. मस्त तेलकट व आपोआप वळतात. मग पोळीत लाटले की पसरतात देखील मस्त जराशा दाबाने.
सायो, बदामी बेसन म्हणजे बदाम
सायो, बदामी बेसन म्हणजे बदाम भाजून त्याचं पीठ.
पूनम, जियो! गुळपोळीचं जाऊ दे,
पूनम, जियो! गुळपोळीचं जाऊ दे, पण तुझी समीक्षा कायम लक्षात राहील!
पूनम
पूनम
पुनम ,रैना too much. मला ते
मला ते गुलाबी रंग,बदामी रंग जमत नाही. काळा रंग मात्र जमतो कधी कधी.
पूनम, धन्यवाद. बरीच क्रांती
पूनम, धन्यवाद. बरीच क्रांती झाली एका रात्रीत गूळपोळीवर. अरे पण ह्यात तीळ नाहीत का?
मग सक्रांतीला का करतात अशी?
सिंड्रेला, धन्यवाद.
पूनम खसले. अगदी त्या अवस्थेत
पूनम खसले. अगदी त्या अवस्थेत मी स्वत:ला बघितले.
too good.
पूनमची समिक्षा वाचली. खतरनाक!
पूनमची समिक्षा वाचली. खतरनाक!
पूनम लै म्हणजे लै हसले. दोन
पूनम लै म्हणजे लै हसले.
दोन उंड्यात मध्ये गूळ ठेवून लाटणे जमणार नाही.
गूळ्पोळीच्या सारणात मम्मी कधी
गूळ्पोळीच्या सारणात मम्मी कधी तूप घालायची नाही बेसन भाजताना कारण थंडीत थिजते म्हणून. त्याईअवजी रिफाईंड तेलात भाजायची. मी बदाम तेलात भाजते.
मनू, रेसिपी चांगली आहे.
सारणात नखभर (म्हणजे किती
) चुना घालतात म्हणे.
पूनम - झक्कास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!
तो चुना इकडचा आणलेला असा खाणे
तो चुना इकडचा आणलेला असा खाणे चांगला काय?

त्या चुन्यावर लिहिलेय external use only..
मी गेल्यावेळेला केली पोळी तेव्हा भित भित तव्यावर चुना लावलेला. मग २ केल्यावर घाबरून दुसरा तवा घेतला.
धन्यवाद मिनोती.
आम्ही चुना देशातून आणतो
आम्ही चुना देशातून आणतो पानासाठी त्यातलाच वापरते. देशात सुद्धा सासरे खात्रीशीर दुकानातून आणवुन देतात.
टीपी केला, पण आजीबाई ग्रेट
टीपी केला, पण आजीबाई ग्रेट आहेत हं खरंच (परत एकदा). आपल्या आवडत्या व्यक्तीची गम्मत करायची लहर येते, तसं होतं हे
असो. तर सायो, कणकेचे दोन गोळे घ्यायचे गं, मध्ये गूळ. पराठ्यात आपण एकाच मोठ्या उंड्यात मोदकात भरतो तसं सारण भरतो आणि लाटतो. इथे कणकेच्या सँडविचमध्ये गूळ भरायचा. आणि डाळीचे पीठ आधी 'खमंग', 'गुलाबी रंगावर', 'बदामी' इत्यादी भाजून घ्यायचे
आणि मगच किसलेल्या गूळात मिसळायचे.
रैना, उलट सारण भरून करण्यापेक्षा अगदी सोपंय गं. कडेपर्यंत गूळ नाहीच गेला, तर कातायचा, हाकानाका
मनू, ह्यात तीळ का नसतात ठाऊक नाही.. पण पारंपारिक पद्धतीत, आई, साबाई- करताना पाहिलेले, बाजारात विकत- कुठेच मी तरी गूळपोळीत तीळ नाही पाहिलेले. खसखस, वेलदोडेच असतात.
आमच्याकडे (आई, सासूबाई) करतात
आमच्याकडे (आई, सासूबाई) करतात त्यात अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी तीळ आणि साधारण १ टेबलस्पून खोबरं बारिक करून घालतात.
आई करते त्यातही साधारण अर्धी
आई करते त्यातही साधारण अर्धी वाटी तीळ भाजून त्याचा कूट करुन घालते.
केलं का एडिट
केलं का एडिट
(No subject)
आई घालते तीळ गुळपोळीत. आणि हो
आई घालते तीळ गुळपोळीत. आणि हो आई पण तेलातच भाजते बेसन, तुपात नाही. तेच कारण तुप थिजते. मी कधि कधि खसखस नाही घालत, नसली घरात तर आणायचा कंटाळा म्हणुन.
आमच्याकडे हिच वरची रेसीपी
आमच्याकडे हिच वरची रेसीपी तीळ, खोबरे व खसखस.
तूपात भाजून नाही थिजत.. लगेच दूधाचा हबका मारला गरम बेसन वर तर बेसन फुलले की तूप पुर्ण अॅबसॉर्ब होवून दाणा हलका होतो,.... मग गूळात लगेच मळले की सरसरीतच रहाते बेसन. तूप खूप कमी टाकायचे.
रैना,पुनम् (समिक्षा) भन्नाट!
रैना,पुनम् (समिक्षा) भन्नाट!
माझी थोडी वेगळी कॄती.. तीळ
माझी थोडी वेगळी कॄती..
तीळ भाजुन बारीक वाटणे, शेंगदाण्याचा कुट, थोडे भाजलेले बेसन, किसलेला गुळ आणि हवेतर वेलदोड्याची पुड एकत्र करायची. सारण तयार! आयत्यावेळी दुधाचा हात लावुन गोळे करायचे, आणि पुरणपोळीप्रमाणे लाटयच्या..
माझ्यासारक्या beginers साठी हमखास कॄती!
काल एका दुकानात गुळपोळी
काल एका दुकानात गुळपोळी पाहिली. दिसत होती नेहमीसारखीच पण तिच्या कडा आपण करंजी कातरतो त्या कातरणीने कातरल्या होत्या. गोल पोळीच्या कडेकडेने ते बारकेबारके त्रिकोण खुप क्युट दिसत होते. मी करेन तेव्हा नक्कीच अशा कातरुन करेन असे लगेच ठरवले. (तशीही मला कडा कातरायची गरज पडेलच म्हणा.....
)
माझी एकदम साधी आहे. तिळ
माझी एकदम साधी आहे. तिळ भाजुन, अंदाजे फोडलेला गुळ मिक्सरमधुन काढते आणि त्यात वेलदोडा पुड. पेढ्याएवढे गोळे करायचे, होत नसतिल तर जस्ट दुधाच्या हाताने मळायचं आणि गोळे करायचे. कणिक मोहन घालुन भिजवायची. दोन छोट्या लाट्यांमधे तो पेढा ठेऊन लाटायचं. कणकेची आणि पेढ्याची कन्सिस्टंसी सारखी पाहिजे म्हणजे मिश्रण सगळीकडे पसरतं. दोन्ही बाजु एक एकदा भाजुन घ्यावी आणि तव्यावरुन काढताना तुप लावायचं.
मनू आणि बाकि सुगरणींनो
मनू आणि बाकि सुगरणींनो धन्यवाद!
ह्या माझ्या गुळपोळ्या

पण छान ब्राउन दिसतात ना गुळपोळ्या? माझ्या पुपो सारख्या दिसतायत. सुरवातीला लाटल्या पुपो सारख्याच पातळ आणि गॅसवर भसाभस गुळ वितळुन बाहेर पडु लागला तेव्हा पुन्हा आठवण झाली आपण पुपो नाही गुपो करतोय म्हणुन.. असो ३ फुटल्या, ३ बर्या झाल्या..
हो ह्या अश्याच दिसतात. तू रवा
हो ह्या अश्याच दिसतात. तू रवा घातलास का पिठात?
अग नाही घातला. तु म्हणालेलीस
अग नाही घातला. तु म्हणालेलीस ना मळुन हात दुखतात म्हणुन नाही घातला
गुळ पोळ्यांचे सारण आधी करुन
गुळ पोळ्यांचे सारण आधी करुन फ्रीज मधे राहातं का?
हो रहात, करताना दुधाच्या
हो रहात, करताना दुधाच्या हाताने मळुन गोळे करायचे.
बाहेरसुद्धा राहतं. सगळं
बाहेरसुद्धा राहतं. सगळं कोरडंच मिश्रण असतं ते. मळण्यासाठी दूध अगदी आयत्या वेळी वापरायचं की झालं.
स्वाती तर काही दाद देत नाही
स्वाती तर काही दाद देत नाही माझ्या रिक्वेस्ट ला, अमृता तू तरी दे गं एखादी पोळी पाठवून ..
कसल्या मस्त दिसतायत! अगदी क्षणभर बाकी सगळं बाजुला ठेवून 'परतोनी' जावसं वाटलं .. आईच्या हातच्या गुळाच्या पोळ्या खायला!
अमृता खुप छान दिसत आहेत हं
अमृता खुप छान दिसत आहेत हं पोळ्या. या विकेंड्ला करायचा मोह होतोय. पण ते बिघड्ण्याची भिती वाटते.
Pages