गूळपोळी

Submitted by मनःस्विनी on 7 January, 2010 - 02:40
gulpoli
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सारणः
अर्धा वाटी गूळ किसलेला नाहीतर चुरा गूळ,
चार चमचे बारीक बेसन,
१ चमचा दूध,
२ चमचे शुद्ध तूप,
२ चमचे सफेद तीळ,
२ चमचे सुखे पांढरे खोबरे(काळी पाठ नसलेले) नाहीतर चुरा,
२ चमचे खसखस्(एच्छिक आहे. सर्वच जण टाकत नाहीत)
वेलची,
केसर,
तव्याला चुना

पारी:
१ वाटी कणीक,
२ चमचा बारीक रवा,
४ चमचे बारीक बेसन
४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन,
पाणी लागेल तसे,
मिठ चवीला.

क्रमवार पाककृती: 

पारी कृती:
१. सगळी पिठ व रवा एक करून मध्ये खड्डा करून मिठ घालून मध्ये मोहन घालायचे व मस्त क्रम्स करायचे.
२. मग पाणी लागेल तसे घालून घट्ट भिजवून झाकून अर्धा एक तास तरी ठेवावे. रवा भिजतो.
३. एक तासाने हाताला जरासेच तेल घेवून एकदम मळायचे मस्त. तेल ओतायचे नाही पुन्हा. रवा एक्जीवे झाला पाहिजे. पुन्हा झाकून ठेवायचे.

सारणः
१. तीळ, सुखे खोबरे कीस, खसखस कोरडे असे वेगवेगळे मंद आचेवर जरासेच भाजून घ्यायचे,रंग बदलला नाही पाहिजे. बेसन ही तूपात खरपूस भाजावे वास येइपर्यन्त. मग जरासाच दूधाचा हबका मारावा.
२. मग सर्व(बेसन व गूळ सोडून) बर्‍यापैकी थंड करायचे व वाटायचे वेगवेगळे. ह्याचसाठी वेगळे वाटायचे की तेल सुटून मिक्सी खराब होवू शकतो. मध्ये मध्ये थांबून चमचा फिरवून अंदाज घेत वाटायचे नाहीतर तेल निघून पातं अडकते व मिक्सी खराब होइल. हि पूड तयार ठेवणे.
३. आता आधी गूळ व बेसन हातानेच वेगळा मिक्स करून घेवून मळणे व वरील पूड टाकणे. फूड प्रोसेसर असेल तर मस्त. पण खूप फिरवू नये गूळ उष्णतेने वितळेल. व मिश्रण खूप कोरडे करू नये थोडेसे ओलसर असेल तर गोळे करायला बरे पडते. असे गोळे करून झाकून ठेवावे. कोरडे करू नये.
४. वेलची पूड्,केसर कुस्करून टाकावे.

लाटणे:
एकतर उंडा करून मध्ये भरून लाटणे.
पण ह्याच्यापेक्षा दोन पातळ चपाती करून सारण सर्व बाजूने पसरवायचे पण कडे पर्यन्त मिश्रण भरू नये. गूळ वितळून बाहेर येतो. मग आधी कडेकडेने लाटावे.( साधनाच्या मांडे कृती मध्ये दाखवलेय ना तसेच).
१.कडेने पातळ असा उंडा करायचा. त्याने कडा पातळ रहातात.
gupo1.jpg
२.मोदकासारखा उंडा करून जितके ज्यास्त सारण भरता येइल तितके भरायचे,
gulpoli.jpggupo2.jpg
३. हातानेच मग मोदकासारखा जवळ आणून तोंड बंद करून हातानेच जरा चपटा करायचा कडेने पातळ ठेवत.
gupo3.jpg
४.मग हलक्या हाताने लाटायचा, मी पातळच लाटते. गूळ जर मस्त मिक्स असेल तर नाही येत बाहेर.
gupo4.jpg
५. पोळी एका बाजूने भाजली की पलटायची.
gupo5.jpg
६. मस्त फुगते.
gupo6.jpg
७. खुसखुशीत पोळी मध्ये तोडून बरी पडते..
gupo9_0.jpggupo8.jpg

अधिक टिपा: 

१.तवा हा खूप गरम नाही पण योग्य गरम पाहिजे. नाहितर चिकटते. दिनेश ह्यांनी मला गेल्यावेळेला चुना लावायला सांगितला तव्याला. मी चुना लावूनही केल्या व चुना न लावता. फक्त गॅस नीट ठेवायचा व तव्याचे तापमान नीट सांभाळायचे. एक बाजू भाजली की दुसरी पलटून भाजायची. ज्यास्त वेळा उलट पलट करु नये. गूळ बाहेर आल्याने चिकटतो व उलटत नाही गॅस खूपच गरम झाला तर व पोळी कच्ची रहाते.
एकदा सवय झाली दोन तीन पोळी झाली की होते मग नीट.
२. गूळ कडक असेल तर स्टील डब्यात घालून कूकरमध्ये शिटी शिवाय १० मिनीटे घालायचा व मग लगेच बाहेर काढून फोडायचा.
३. तीळाचे प्रमाण व खोबरे आपल्या आवडीप्रमाणे कमी ज्यास्त करु शकतो.
४.जर तीळ्,खसखस ,खोबरे भाजले ना की आपोआप तेल सुटते वाटताना मग गूळ अ‍ॅड केला की लगेच ते तेलच बाईंडिंग सारखे काम करते. मी बघ असे लाडू वळून ठेवलेत. मस्त तेलकट व आपोआप वळतात. मग पोळीत लाटले की पसरतात देखील मस्त जराशा दाबाने.

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुळपोळीचा सिजन परत आलाय. काल सिजनची पहिली गुळपोळी करुन झाली. माझ्या लेकीने ओट्याशी उभ्या उभ्या तिन पोळ्या खाल्ल्या Happy

गुळपोळी कसली असते तेही मला माहित नव्हते. लेकीला तिच्या शाळेमुळे ओळख झाली आणि त्यामुळे मला करायची बुद्धी झाली. मायबोली नसती तर मात्र मला ही गुळपोळी अजिबात जमली नसती.

काल रात्री अगदी सराईतपणे, एकही पोळी अजिबात चिकटु न देता पोळ्या करत होते तेव्हा मायबोलीची आठवण अग्दी प्रकर्षाने आली.

अश्विनी तुझी तर खुपच आठवण आली. Happy

मन:स्विनी गेले दोन तिन वर्षे गायबलीय. Sad

HI..
Me tar ruchirachi shishya ahe...
purn jevan ruchira varunch shikale...
so many thanks to ogale kaku...
padarth chan hotat always...
fakt apala dok nahi chalvayach jast...

akshata

माझं पण अजून तरी काही चुकलं नाहीये. पण मनःस्विनीचे कृती वर आली की गुळाच्या पोळ्या करायची खाज डोकं वर काढते Uhoh

तर गेल्या वर्षी गु पो करताना गूळ पोळीतून बाहेर येऊन तव्यावर नचत होता.
मा का चु ?

केल्या केल्या ह्या रेसिपीने गुळाच्या पोळ्या केल्या काल!

गूळ (काही लोकांच्या रेकमेंडेशनवरून) स्वाद ब्रँडचा आणला होता पण मला पसंत नाही पडला तो गूळ.
मला हलक्या पिवळट रंगाचा गूळ आवडत नाही. मला लालसर डार्क रंगाचा गूळ आवडतो.
गुळामुळे सारण ठिसूळ झालं. छान तेलकट बॉलस नाही झाले. त्याचा परिणाम म्हणून उंडा भरून पोळ्या नाही करता आल्या. २ लाट्या घेउन मध्ये सारण भरून साइड्सने चेपून लाटल्या. पण गेल्या वर्षीसारखा गुळाने बाहेर येऊन तव्यावर डान्स नाही केला Happy

हे घ्या सँपल. काही लोकं म्हनतील की ती छोटी पोळी जरा जस्तच करपूस झाली आहे तर ते तुमची दृष्ट लागू नये म्हणून मुद्दामच जास्ती भाजली आहे हे लक्षात घ्या.

Gul Polya.jpg

अगं हो सीमा, कोल्हापुरी गूळ इज बेस्टेस्ट!
पण आमच्या लोकल ग्रोसरी स्टोर मध्ये लिमिटेड ऑपशन्स होते.

पोळ्या जरा जास्तच खरपूस झाल्यात खरं पण जौदे Happy चव चांगली आहे.
गूळ कडेपर्यंत नाही गेलाय खरं पण जौदे Happy चव चांगली आहे.

सीमा ये घरी. ३ पोळ्या उरल्यात. मी १ खाइन तुला २ देइन(पोळ्या) Wink

मी काल परत केल्या. या हंगामात ज़रा जास्तच घाणे काढले गुळपोळि चे Happy :. इथल्या टीपा वाचु
न वाचुन जरया बा-यापैकी जमायला लागल्या.

माझेही सारण खुप कोरडे झालेले ह्या वेळी. गेल्या दोन तिन वेळी तसेच कोरडे सारण लाटलेल्या पोळि वर पसरून पोळि लाटलेली. पण यावेळी कोरड्या सारणावर थोड़े थोड़े दूध शिम्पडून त्याचा मऊ सर गोळा केला आणि मग त्याचीही लहान पोळि लाटून ती मध्ये ठेउन गुळपोळि लाट ली. असे केल्याने छान मोठी पातळ पोळि लाटता येते आणि ती फाटतही नाही. शेकतानाही अजिबात फाटत नाही.

करतानाच सारण थोड़े जास्त केलेले. लेकीला सारणाचे लाडू हवे होते. उरलेल्या सारणाचे वळुन लाडू केले. छान लागतात तेही.

रच्याकने, सारण ठिसुळ झाले तर सारण कडे पर्यन्त पोचत नाही. अशावेळि कातन्याने जास्तिच्या मोकळ्या कडा कातरुन टाकाव्या. सारण कड़ेपर्यंत पोचल्यासारखे तर दिसतेच शिवाय मस्त डिजाइन सुद्धा उमटते.

रावी, हायला मस्त दिसताहेतपोळ्ञापोळ्या. इतक्या पांढर्‍या कश्या भाजल्या?

इतर वरच्या फोटोतल्या ज्यास्त भाजल्या आहेत.

( मी मेली रोज विचारच करतेय पण धाडस नाहिये) Sad

झंपी > तांदुळाच्या पिठीवर लाटली म्हणून असेल बहुधा.
रोज विचारच करतेय पण धाडस नाहिये > मी ही धाडसच केलं. सहाच केल्या . Happy

धाडशी व्हा बायान्नो, मीही आधी अशीच घाबरुन होते पण एकदा करायला लागल्यावर हे काम पुरणपोळीपेक्षा खुपच सोप्पे आहे हे लक्षात आले. फक्त सारण नीट ओलसर तयार करायचे, कोरडे राहिले तर थोडा त्रास होतो. बाकी सारण नीट असले तर भराभरा पोळी लाटली जाते आणि शेकताना चांगली टम्म फुटबॉलसारखी फुगते. Happy

रावी, फोटो खुपच भारी आहे. खाविशी वाटतेय. आज परत करते घरी गेल्यावर Happy

हा धागा वाचून ,सारणाचे लाडू करून गूळपोळी केली.एक तव्याला चिकटली.दुसरी पोळी ऑम्लेटसारखी झाली.म्हणजे सारण सरकलेच नाही.शेवटी सारणाचे लाडू मोडून भुसभुशीत केले आणि भरले.मग गूळपोळ्या पटापट झाल्या.
रावी, मस्त फोटो. मैद्याच्या केल्या का?

मैद्याच्या नाही, कणिक + रवा + बेसन. मनःस्विनी च्या कृतीप्रमाणेच. तव्यावर बाहेर आलेला गूळ पुसायला आधीच ओला पंचा तयार ठेवला होता !!

मस्त! सगळ्यान्चे फोटु बेस्ट. साधना, सारण कोरडे असले तरी मी व सासुबाई ते एकदाच मिक्सरमध्ये फिरवुन घेऊन तेलाचा हात लावुन त्याचे लाडु करुन पोळ्या करतो. जास्तीच्या तेलाने सुद्धा पोळ्या तेलकट होत नाहीत.

मनःस्विनी धन्यवाद डिटेल कृतीबद्दल.

मनःस्विनीच्या कृतीने गुपो केल्यावर स्वतः सुगरण झाल्याचा फील आला होता. कालच्या बिघडलेल्या खव्याच्या पोळ्यांनी गर्वहरण केलेले आहे. मनु, प्लीज अस्शीच डिटेलवार कृती टाक ना ख. पो. ची. गेलेल्या कॉन्फिडन्स चे पुनर्वसन करायला हवेय गं.

वर काढण्यासाठी.
पण काही म्हणा माबोवर रेस्प्या आणि त्यावरचे प्रतिसाद वाचुन पदार्थ करावासा वाटतो.

तीळ आणून ठेवलेत पण करेनच अशी खात्री नाही कारण आई बनवून पाठवणार आताच कळले.

तीळाची चिक्कीच करेन असेच सारण बनवून गुळाचा पाक करून... ( ह्या विचारात).

Pages