खाऊगल्ली - आजचा मेनू - (७)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.

तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Urmilas

You make it sound so easy !

In real, एक्सपर्ट लेव्हलचे काम असणार.

ज्वारीचे पदार्थ हमखास फसतात असा अनुभव आहे म्हणून कुणी तयार दिल्या तरच खाणार या ज्वारीच्या चकल्या 🙂

दहीभात मस्त.. मला ते सभोवताली खोचलेले वेफर्स आधी गाजर वाटले Happy

दिवाळी नंतर हा आमचा Children's Day Menu Happy
केक कपकेक ब्राऊनी वगैरे...
वगैरे फोटोत नाहीत

IMG-20261114-WA0016.jpg

Enjoy !

हा महीनाच केकचा. दर आठवड्यात तीन वाढदिवस आणि तीन anniversaries असतात. केक आणि पेस्ट्रीज् ची चंगळ !

मनीमोहोर, पाकातल्या पुऱ्या मस्तच. रेसिपी द्याल का ?
सगळ्यांचे फराळ मस्त खुसखुशीत दिसत आहेत. पटकन उचलून तोंडात टाकावेसे वाटतं आहेत

पाकातल्या पुऱ्यांची रेसिपी..
दोन वाट्या साखरेत एक वाटी पाणी घालून त्याचा साधारण चिकट ( एकतारी पेक्षा थोडा कमी करावा. ) पाक करावा. लिंबू नक्की पिळावे. त्यामुळे चव तर वाढतेच पण पाकाची साखर ही पुन्हा होत नाही लिंबामुळे. असल्यास केशर ही घालावे. केशरी रंग चालत असेल तर तो ही घालू शकता.

दोन वाट्या बारीक रव्याला दोन टी स्पून कडकडीत मोहन नीट चोळून घ्यावे. थोडं मीठ ही घालावे. नंतर दोन मोठे चमचे दही आणि लागेल तसं पाणी घालून रवा मध्यम घट्ट मळून अर्था पाऊण तास ते पीठ मुरवत ठेवावे. नंतर त्याची एक मोठी पोळी लाटून ( साध्या पोळी इतपतच जाड) वाटीने सारख्या आकाराच्या पुऱ्या कराव्यात किंवा एकेक ही लाटू शकता. मध्यम गरम तेलात पुऱ्या चागल्या तळून काढाव्यात आणि सारखेच्या एकतारी कोमट पाकात उलट सुलट करून ( एखाद मिनिट भर ) मग कलत्या ताटात निथळत ठेवाव्यात. म्हणजे जास्तीचा पाक पुर्यांमध्ये राहणार नाही. वरून ड्राय फूट चुरा वगैरे घालू शकता सजावटीसाठी.

कोणी कोणी टोचे मारून न फुगलेल्या पुऱ्या ही करतात पण आम्ही तश्या करत नाही कधी.

सगळे पदार्थ एक से बढकर एक आहेत...!
ममोताई, रेसिपी साठी धन्यवाद...
कधी तरी नक्की प्रयत्न करणार पाकातल्या पुरींसाठी....!

….. कोणी कोणी टोचे मारून न फुगलेल्या पुऱ्या ही करतात…

होय. बडोदेकर मराठी घरांमधे न फुगलेल्या पाकातल्या पुऱ्या हीच पारंपरिक पद्धत आहे. तश्या पुऱ्या दुसऱ्या दिवशी कडक झाल्यावर खायला जास्त चांगल्या लागतात - कुडुम कुडुम.

जुन्या विस्मृतीत गेलेल्या पाककृतीची सोपी-सुटसुटीत रेसिपी लिहिल्याबद्दल आभार @ मनीमोहोर.

इथे हरवून जाईल म्हणून वेगळा धागा काढून शब्दखुणांसह ही रेसिपी दिल्यास फार बेस्ट होईल. वेळ-मूड होईल तेव्हां जरूर करा असा आग्रह.

इथे हरवून जाईल म्हणून वेगळा धागा काढून शब्दखुणांसह ही रेसिपी दिल्यास फार बेस्ट होईल. वेळ-मूड होईल तेव्हां जरूर करा असा आग्रह.>>>> हो कारण नंतर इथे शोधणं अवघडच आहे
खुप आवडीचा पदार्थ
पण शेवटचा खाल्ल्याला य वर्ष तरी झालीत
अजूनही त्याची आंबटगोड चव आठवते
ममो मैदा नाही घालायचा का
आई मैद्याच्या करायची असं अंधुकसं आठवतंय

फराळ मस्तच दिसतोय...
मी चकली, शेव घेतो.
तो फुलपात्रातील चहा मस्त दिसतोय.
अजून शेव, चकली, चिवडा, शंकरपाळे आहेत म्हणजे कमाल आहे.
आमचा कधीच संपला. काहीतरी गोडाचे बाकी असेल.

घरगुती फराळ बनवायचे छोटे मोठे राऊंड होत राहतात, काही बाहेरचे उशीरा देतात, जसे त्या दिवशी मुंबईवरून वडील आले ते त्यांचा काही घेऊन आले. एका मावसबहिणीने दिलेला तो ही घेऊन आले. दादरची सौराष्ट्रची तिखट शेव मला आवडते ती घेऊन आले. वरच्या फोटोमध्ये नाहीये ती.. त्यामुळे फराळ चालूच राहतो. वर दिसणारी करंजी मात्र शेवटची होती.

बरोबर ऋन्मेष. दिवाळीचा फराळ चालतच राहतो दहा-पंधरा दिवस. देवदिवाळी पर्यंत तरी.

मला चकली आणि तुमच्या बदललेल्या नव्या प्लेट जास्त आवडल्या.

ऋ,
मी चकली, शेव, चिवडा, फाफडा, गाठिया अश्या क्रामाने घेवुन आल्याचा चहा घेइन.
मग आरामात लोडवर टेकुन करंजी व शंपा खाईन थोड्याश्या पुस्तक वाचत वाचत.

मला ते तिखट शेव, चकली, पोह्यांचा चिवडा आणि गोड फ्लेवरसाठी किंचित शंकरपाळी हे चार पदार्थ उलट सुलट क्रमाने थोडे थोडे एकत्र तोंडात टाकून त्यांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनने बनणारे टेस्ट आणि सोबत घोट घोट चहा फार आवडते. बरेचदा हेच करत दोन कप चहा पितो.

किती ते वर्णन Sad
माझा फराळ कधीच संपला Sad आणि मीठ साखर तेल ह्यांचं सूख चेहर्यावर दिसत आहे Lol

>> किती ते वर्णन Sad
>>>

अजून एक मोठा प्याराग्राफ होता. पण तो प्रकाशित न करता ड्राफ्ट मध्येच सेव्ह करून ठेवला. कारण त्यात मला धागा मटेरियल दिसले Proud

माझगाव, मुंबई स्पेशल विकेंड मेनू…
नाश्ता - दहीवडे आणि पांढरा ढोकळा
लंच - prawns Kepsa
डिनर - चिकन केप्सा

IMG-20261031-WA0005.jpg
.
IMG-20261101-WA0020.jpg
.
IMG-20261101-WA0024.jpg

हा हा.. रव्याचे वडे
स्टेटसला बघून काही जणांनी विचारले तेव्हा मलाच बायकोला मेसेज टाकून कन्फर्म करावे लागले की काय होते हे Proud

वाह मस्त
पाकृ please
Shape एकदम डोनट चा
लेकरं आवडीने खातील

हा हा.. प्राजक्ता धन्यवाद Happy

किल्ली विचारतो तिला, म्हणजे कुठली व्हिडिओ लिंक असल्यास..

Pages