१९८० पासून राम मंदिर प्रश्न आपल्या सर्वांच्याच कानावर सतत पडत असतो. राम मंदिर विषय निघाल्यावर संबंधित घटनाक्रम ( १९८६ कुलूप उघडणे, रथयात्रा, दंगली, ढाचा पाडणे, अनेक दंगली, रक्तपांत, मंदिराचे निर्माण कार्य, भूमीपूजन, जोशांत उद्घाटन) माझ्या डोळ्यासमोर येतो. मंदिर निर्माण होण्याच्या अगोदरच्या काळांत, अनेक दशके, देणग्या गोळा करण्याचे काम सातत्याने सुरु होते, आणि पुढेही ते सुरुच रहाणार आहे.
आज वर्षाला ५ कोटी ते २० कोटी लोक भेटी देत आहेत. प्रत्येक भक्त आपल्या आर्थिक कुवती नुसार मंदिराच्या दानपेटीत भक्तीभावाने, श्रद्धेने आणि मुख्य म्हणजे विश्वासाने पैसे दान करत असतो. या पैशांचा विनीयोग मंदिराशी संबंधीत कामासाठीच होत असतो अशी श्रद्धा असते, भरवसा असतो. रामाच्या नावाने गोळा होत असलेल्या दानपेटी वर व्यक्त झालेला हा फार मोठा विश्वास आहे.
राममंदिर दानपेटी मधे होत असलेल्या गैर व्यावहारा संबंधीच्या बातम्यांनी माझे लक्ष वेधले गेले. या आधी सोने आणि चांदीच्या विटांबद्दल बातमी आली होती. दानपेटीमधे जमा होत असलेल्या पैशांपैकी ( रोख पैसा, सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर, माणिक, मोती) काही भाग मंदिर कर्मचार्यांच्या खासगी खिशांत जात असेल तर हा कोट्यावधी राम भक्तांचा फार मोठा विश्वासघांत आहे.
या संबंधांत आठ लोकांवर FIR दाखल करण्यांत आला आहे. सुरवातीला ट्रस्टच्या लोकांनी आर्थिक गैरव्यावहार झाल्याचे नकारले होते. पण अखिलेश यादव यांच्या ट्विट ने लक्ष देण्यास भाग पाडले.
https://x.com/yadavakhilesh/status/2063567792733831463
FIR मधे नावे असणारे आरोपी - अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, रामशंकर मिश्रा, रमाशंकर यादव, मनीष यादव, सुभाषचंद्र श्रीवास्तव आणि करुणेश पांडे. पैकी सहा आरोपी मंदिरातील कर्मचारी असून ते रोख रक्कम मोजण्याचे काम करायचे.
पैसे अपहाराचे फुटेज CCTV मधे कैद झाले आहे. या प्रकरणाची माहिती असलेली अनेक लोक भितीपोटी बोलत नाही. कधी पासून हे अपहार प्रकरण सुरु होते ? एकंदर किती कोटी रुपये हडप झाले ? हा पैसा कुठे गेला ? या प्रश्नांची उत्तरे यथावकाश मिळतील आणि खर्या दोषींना कायद्यानुसार कडक शिक्षा मिळेल अशी अपेक्षा. पण दानपेट्या भक्त लोकांचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करतील का ?
गेले काही आठवडे अपहार संबंधित बातम्यांनी मला अस्वस्थ केले आहे. या विषयावर आपली मते जाणून घ्यायला आवडेल.
हिंदु धर्म सुधारणा मान्य करतो
हिंदु धर्म सुधारणा मान्य करतो हे खरं पण त्यासाठी अनेक सुधारकांना आयुष्य खर्ची घालायला लावतो. आणि मग त्या सुधारणांचं श्रेय मात्र धर्मवादी, रूढीवादी, सनातन्यांच्या पुढच्या पिड्या घेतात आणि म्हणतात, "बघा, बघा आमचा धर्म किती सुधारणावादी"! अरे लेको, तुम्हीच त्या सुधारक लोकांचं जिणं हराम करता ना?
ज्ञानेश्वर, तुकाराम, साई, कबीर असो की आगरकर, रानडे, फुले, आंबेडकर असो की दाभोलकर, कलबुर्गी असो की आता जातीवाद, सामंतवादसे आझादी मागणारे तरूणतरूणी असो.. सनातनी लोकांनी कधी कोणाला सपोर्ट केला? शक्यतो जीवेच मारायचा प्रयत्न केला.
इथे एकातरी सनातनी, आमचा धर्म किती गोडगोड टाइप भाजपीय आयडीने if, but न करता बिनशर्त मान्य करावे की दाभोलकर बरोबर होते. आहे का कोणी?
मी अनुभवलेला एक उन्माद (त्या
मी अनुभवलेला एक उन्माद (त्या प्रसंगाला हे नाव योग्य होईल की नाही माहित नाही).
मी शाळेतल्या नोकरीत असतानाचा प्रसंग.
शाळेमधल्या वार्षिक परीक्षा पार पडल्या होत्या आणि पेपर चेकिंग... रिझल्ट ची तयारी अशी कामं चालू होती.
रामनवमी जवळ यायला लागली तशी आमची आपापसात त्या दिवशी सुट्टी मिळेल की नाही ह्याची चर्चा सुरू झाली. (मुलं शाळेत असताना वर्षभराचं कॅलेंडर ठरलेलं असतं. पण आता त्यांच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या)
मग आमच्यातल्या काहीजणांनी हेडमिस्ट्रेस ला विनंती केली की तुम्ही मॅनेजमेंट ला सांगून सुट्टी मिळवा.
काहीजण जुन्या नाशिक मधून यायचे म्हणून आणि एक दोन टीचर्स काळाराम परिसरातच रहायचे म्हणून, त्यांना त्या दिवशी तेथून येणं जाण करणं अवघड होतं.त्यांना तर तशीही रजा टाकायला लागणार होती. काही लोकांना घरचा रामजन्म अटेंड करायचा होता. तर माझ्यासारखे काहीजण सुट्टी असली तर ठीकच तेवढंच एक दिवस उशिरा उठता येईल ह्या कॅॅटेगरी त असणारे. ( टीचर्स na पेपर चेकिंग तर घरी बसूनही करावच लागणार होतं)
हेड मिस्ट्रेस ने टोलवाटोलवी केली. आदल्या दिवशी परत लोकं तिच्याकडे गेले. तर ती वासकन ओरडलीच "ये क्या राम राम लगा के रख्खा हैं.... कोई छूट्टी बुट्टी नहीं..."
सगळ्यांच टाळक सटकल...
दुसऱ्या दिवशी झाडून सारे आले.
चार सहा जणांनी गुपचूप लायब्ररीत तयारी केली. साडे अकरा वाजता बाकीच्यांना निरोप दिले. आणि दणक्यात रामजन्म साजरा केला तिथे. रामाचा पाळणा लावला... अगदी टाळ... घंटा पण आणल्या होत्या. आणि सुंठवडा पण होता प्रसादाला.
लोकांचं टाळकं सरकण्याचं कारण -
हेडमिस्ट्रेस लग्नाआधीची हिंदू होती. मुस्लिम माणसाशी लग्न केल्यानंतर अगदी कडक रोजे पाळणारी झाली होती. तिने सुट्टी बद्दल केलेल्या विधानाचा लोकांना राग आला होता...
ह्याला उन्माद म्हणता येणार
ह्याला उन्माद म्हणता येणार नाही माझ्यामते. हे जशास तसे उत्तर आहे. कोणीही इतरांच्या धार्मिक प्रसंगाला मुद्दाम तुच्छतापुर्वक वागणूक दिल्यास हे होणारच आणि व्हावंही. नीट बोलली असती तर रिऐक्शन आली नसती.
स्वाध्याय परिवाराच्या
स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्यांचं दानवीकरण झालं. हिंसाचारात वापर झाला आणि नंतर यांना गावात पुन्हा जातीयवादाला तोंड द्यावे लागले होते.
Submitted by राज अज्ञानी on 8 August, 2026 - 02:29
स्वाध्याय परिवार म्हणजे पांडुरंगशास्त्री आठवले प्रणीतच का? मग या वर विस्ताराने वाचायला आवडेल , कारण स्वाध्याय परिवाराबद्दल अश्या घटना फारश्या कधी कानावर आल्या नाहीत म्हणून.
राजकारण, ब्रम्हज्ञान आणि
राजकारण, ब्रम्हज्ञान आणि भूताटकी या विषयावर काहीही बोलले तरी खपते. - पु. ल.
वाचनाची आवड असेल तर उत्तम.
वाचनाची आवड असेल तर उत्तम. त्या काळातले लोकप्रभा, चित्रलेखा, इंडिया टुडेचे अंक मिळवून वाचा.
एआय च्या सौजन्याने काही उल्लेख उपलब्ध आहेत.
https://www.newsclick.in/sects-and-riots-have-led-hindutvas-rise-gujarat...'s,noted%20activist%2C%20journalist%20and%20teacher%20Achyut%20Yagnik. '
द इंडियन एक्सप्रेस (The Indian Express): २००२ नंतर पूर्व गुजरातमधील पंचमहाल, दाहोद आणि छोटा उदेपूर या आदिवासी पट्ट्यात झालेल्या हिंसेचा मागोवा घेणारे अनेक अहवाल प्रसिद्ध झाले. त्यांमध्ये संघ परिवार तसेच विविध सांस्कृतिक-धार्मिक संघटनांनी आदिवासी भागात केलेल्या 'संस्कृतीकरण' (Sanskritisation) प्रक्रियेचा कसा प्रभाव पडला, याचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले होते.
फ्रंटलाईन (Frontline / The Hindu Group): 'Frontline' नियतकालिकात गुजरात दंगलीदरम्यान आदिवासी भागांतील सहभागावर आणि सामाजिक बदलांवर सविस्तर शोधनिबंध व ग्राऊंड रिपोर्ट प्रसिद्ध झाले होते. यामध्ये स्वाध्याय परिवार आणि इतर धार्मिक-सामाजिक चळवळींनी आदिवासी समुदायात निर्माण केलेल्या धार्मिक ओळखीच्या परिणामांची चर्चा केली गेली होती.
चित्रलेखा व ज्ञानेश महाराव यांचे लेख: मराठी नियतकालिक 'चित्रलेखा'मध्ये पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी स्वाध्याय परिवाराचे कार्य, त्याचे सामाजिक-राजकीय पैलू आणि दंगलीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी भागांत झालेले ध्रुवीकरण यावर वेळोवेळी समीक्षात्मक लेखमालिका लिहिली होती.
यामध्ये स्वाध्याय परिवार आणि
यामध्ये स्वाध्याय परिवार आणि इतर धार्मिक-सामाजिक चळवळींनी आदिवासी समुदायात निर्माण केलेल्या धार्मिक ओळखीच्या परिणामांची चर्चा केली गेली होती.
मार्क्सवादी कम्युनिस्टांनी पांडुरंग शास्त्रींना बदनाम करण्यासाठी खोटा प्रचार केला होता. उलट पांडुरंग शास्त्रींनी स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून आगरी,वाघरी, डोंगरी आणि कोळी समाजाच्या व्यवसायाला मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले. मत्स्यगंधा ,योगेश्वर शेती ई. उदाहरणे आहेत.
त्यांनी कधीच कोणत्या माध्यमात आपल्या कामाची जाहिरात केली नाही किंवा पूजेचे साहित्य, साबण, उटणे विकणे असे प्रकार केले नाहीत. त्यांच्या परिवाराच्या कार्यक्रमाला पोलिसांची मदत मागितली नाही. लाखो लोकं असताना कधी गोंधळ उडाला नाही, चेंगराचेंगरी झाली नाही. त्यांचे कार्यकर्ते खूप शिस्तीचे आहेत.
जेमिनी ए आय सांगतं :
गुजरात २००२ पोस्टर्बॉइज
https://www.youtube.com/watch?v=TZybwcTq1DM
जेमिनी ए आय सांगतं :
अच्युत याज्ञिक आणि सुचित्रा शेठ यांच्या 'The Shaping of Modern Gujarat: Democracy, Development and Social Transformation' (पेन्ग्विन इंडिया, २००५) या पुस्तकात गुजरातमधील सामाजिक-धार्मिक बदलांचे सविस्तर विश्लेषण आढळते.
या पुस्तकात आणि त्यांच्या इतर विश्लेषणांमध्ये खालील मुख्य मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले आहे:
मध्यमवर्ग, ओबीसी आणि आदिवासींचे 'संस्कृतीकरण':
अच्युत याज्ञिक यांनी स्पष्ट केले आहे की, २० व्या शतकाच्या उत्तरार्धात गुजरातमधील स्वाध्याय परिवार, स्वामिनारायण संप्रदाय, गायत्री परिवार आणि आसाराम बापू यांसारख्या विविध धार्मिक-सामाजिक चळवळींचा प्रसार वेगाने झाला. या संप्रदायांनी आपल्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांद्वारे (उदा. स्वाध्याय परिवाराची 'भक्तिफेरी') मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासी समुदायांमध्ये व्यापक प्रसार केला.
धार्मिक ओळख आणि सामाजिक ध्रुवीकरण:
या धार्मिक चळवळींनी व्यसनमुक्ती, शिक्षण आणि सामाजिक सुधारणांचे काम केले तरीही त्यांनी अद्वैत किंवा समरसतेच्या भावनेतून एक 'व्यापक हिंदू ओळख' निर्माण केली. या प्रक्रियेमुळे पारंपरिक किंवा स्थानिक संस्कृतीचा भाग असणारे आदिवासी समुदाय मुख्य प्रवाहातील हिंदू धार्मिक चौकटीशी जोडले गेले.
सामाजिक आणि राजकीय परिणाम:
पुस्तकातील विश्लेषणानुसार, या सूक्ष्म सांस्कृतिक-धार्मिक बदलांमुळे निर्माण झालेल्या धार्मिक ओळखीचा वापर पुढे सामाजिक ध्रुवीकरणासाठी सुलभ ठरला. गोध्रा घटनेनंतर उद्भवलेल्या तणावाच्या काळात पूर्व गुजरातमधील आदिवासी भागांत (पंचमहाल, दाहोद इ.) हिंसाचार पसरण्यामागे या सामाजिक-धार्मिक संघटनेची पार्श्वभूमी कारणीभूत ठरल्याचे अनेक अभ्यासांत नोंदवले गेले आहे.ङ्जे
अच्युत याज्ञिक आणि सुचित्रा शेठ यांच्या 'The Shaping of Modern Gujarat: Democracy, Development and Social Transformation' (पेन्ग्विन इंडिया, २००५) या पुस्तकात गुजरातमधील सामाजिक-धार्मिक बदलांचे सविस्तर विश्लेषण आढळते.
या पुस्तकात आणि त्यांच्या इतर विश्लेषणांमध्ये खालील मुख्य मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले आहे:
मध्यमवर्ग, ओबीसी आणि आदिवासींचे 'संस्कृतीकरण':
अच्युत याज्ञिक यांनी स्पष्ट केले आहे की, २० व्या शतकाच्या उत्तरार्धात गुजरातमधील स्वाध्याय परिवार, स्वामिनारायण संप्रदाय, गायत्री परिवार आणि आसाराम बापू यांसारख्या विविध धार्मिक-सामाजिक चळवळींचा प्रसार वेगाने झाला. या संप्रदायांनी आपल्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांद्वारे (उदा. स्वाध्याय परिवाराची 'भक्तिफेरी') मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासी समुदायांमध्ये व्यापक प्रसार केला.
धार्मिक ओळख आणि सामाजिक ध्रुवीकरण:
या धार्मिक चळवळींनी व्यसनमुक्ती, शिक्षण आणि सामाजिक सुधारणांचे काम केले तरीही त्यांनी अद्वैत किंवा समरसतेच्या भावनेतून एक 'व्यापक हिंदू ओळख' निर्माण केली. या प्रक्रियेमुळे पारंपरिक किंवा स्थानिक संस्कृतीचा भाग असणारे आदिवासी समुदाय मुख्य प्रवाहातील हिंदू धार्मिक चौकटीशी जोडले गेले.
सामाजिक आणि राजकीय परिणाम:
पुस्तकातील विश्लेषणानुसार, या सूक्ष्म सांस्कृतिक-धार्मिक बदलांमुळे निर्माण झालेल्या धार्मिक ओळखीचा वापर पुढे सामाजिक ध्रुवीकरणासाठी सुलभ ठरला. गोध्रा घटनेनंतर उद्भवलेल्या तणावाच्या काळात पूर्व गुजरातमधील आदिवासी भागांत (पंचमहाल, दाहोद इ.) हिंसाचार पसरण्यामागे या सामाजिक-धार्मिक संघटनेची पार्श्वभूमी कारणीभूत ठरल्याचे अनेक अभ्यासांत नोंदवले गेले आहे.
'सब सत्ता के सौदागर', Gujarat
'सब सत्ता के सौदागर', Gujarat Riots की वायरल तस्वीर वाले अशोक ने ऐसा क्यों कहा?
https://www.youtube.com/watch?v=JU1U1yi157k
सर्वांना डावे ठरवल्याने
सर्वांना डावे ठरवल्याने त्यातल्या विविध आयडेंटिटींशी उघड संघर्ष टाळण्याचा प्रयत्न आता सर्वांच्या ध्यानात आलेला आहे. एहढ्या संख्येने डावे असते तर गुजरातेत ते प्रमुख विरोधी पक्ष म्हणून दिसले असते. लेबलिंगचे उद्योग थांबवा. दलित, मुस्लीम आणि आदिवासींना त्या त्या नावाने झोडपा. वेगळे लेबल लावून नको.
स्वाध्याय मूव्हमेंट - रीसर्च गुरू
https://www.researchguru.net/volume/Volume%2011/Issue%201/RG11VP1-08.pdf....
हिंदुइझम टुडे https://www.hinduismtoday.com/hpi/2000/12/29/2000-12-29-swadhyaya-pariva...'s%20philosophy,relations%20with%20people%20from%20the%20lower%20classes.
स्वाध्याय परिवाराचे कार्य व संस्कृतीकरण: पांडुरंगशास्त्री आठवले (ज्यांना 'दादा' म्हटले जाते) यांनी सुरू केलेल्या स्वाध्याय समाजाने गुजरातच्या किनारपट्टीवर आणि आदिवासी भागांमध्ये 'भक्तिफेरी', 'वृक्ष मंदिर', 'घर मंदिर' यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून वेदांचे तत्त्वज्ञान, भगवद्गीता आणि हिंदू जीवनमूल्ये पोहोचवली. या प्रक्रियेमुळे आदिवासी व उपेक्षित समुदायांना एक सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यापक हिंदू संस्कृतीची चौकट मिळाली, असे समाजशास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे.
100 years of Pandurang Shastri Athavale Ji नॅशनल हिंदू स्टुडंटस फेडरेशन युके
https://www.nhsf.org.uk/?p=11720#:~:text=He%20had%20a%20vision%20of%20re...'Bhakti%20(devotion)%20is%20a%20social%20force'.
दंगलीच्या संदर्भातील राजकीय व सामाजिक विश्लेषण: २००२ च्या गुजरात दंगलीनंतर 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली' (EPW), 'फ्रंटलाईन' आणि 'द हिंदू' सारख्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या लेखांमध्ये, ज्या भागात आदिवासी समुदायांचे मोठ्या प्रमाणावर धार्मिक-सांस्कृतिक संघटन झाले होते, त्याच पूर्व गुजरातमधील काही भागांत (उदा. पंचमहाल, दाहोद) हिंसाचाराच्या घटना कशा घडल्या, याचे विश्लेषणात्मक लेख प्रसिद्ध झाले होते.
Pandurang Shastri Athavale यांच्या स्वाध्याय परिवार उपक्रमात जगभरातून लोकं सहभागी होतात। BolBhidu ( युट्यूब)
चित्रलेखा आणि इतर नियतकालिके: मराठीतील 'चित्रलेखा' किंवा अन्य साप्ताहिकांमध्येही या सामाजिक बदलांचे पडसाद उमटले होते, जिथे या संप्रदायांच्या माध्यमातून झालेल्या धार्मिक परिवर्तनाचे सामाजिक व राजकीय परिणाम काय झाले, यावर पत्रकारांनी वेळोवेळी लेखन केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=WRD_oBOAh2E#:~:text=%E0%A4%B9%E0%A5%87%2....
या मूव्हमेंटमधून दलित, आदिवासींना हिंदू ओळख देण्यात आली, त्यांचे हिंदूकरण झाले.
नंतर संघपरिवाराने त्यांचा उपयोग केला.
चित्रलेखामधे नारायण आठवले सुद्धा लिहीत. ते कोण हे सांगण्याची गरज नाही. ते पण डावे असतील तर माहिती नाही. लोकप्रभा सहीत अशी लोकप्रिय साप्ताहिके आता एखाद्या सरकारी किंवा अर्काईव्ह मधे असतील. ती शोधून वाचू शकता.
'नेमेची येतो मग पावसाळा' या
'नेमेची येतो मग पावसाळा' या उक्तीप्रमाणे उत्तरेत श्रावण आला की कावड यात्रांची धूमधाम सुरू होते. २०१४ च्या आधीची घुसमट आता नसल्याने शाळाना सुटी, हायवे बंद, हेलिकॉप्टर्स मधून पुष्पवृष्टी , कानफाडू डीजे ई ई असते. यावर्षी नवा प्रकार पाहिला तो म्हणजे कावडियांच्या श्रमपरिहारार्थ ठिकठिकाणी आयटेम साँग्स वर नाचणार्या महिला !
असो, यावर्षीच्या हायलाईट्स
१ चिकन बिर्यानी विकणार्या टपरी वर बुलडोझर व एफ आय आर.
२ पोलिसांनाच जीप मधून ओढून तुडवले.
३ टेम्पो वाल्याचे मॉब लिंचिंग.
४ टू व्हीलर वाल्याला कपडे काढून कणीक तिंबली.
मज्जा !
एका ड्रायव्हरचा मारहाणीमध्ये
एका ड्रायव्हरचा मारहाणीमध्ये मृत्यू, ते ड्रायव्हर मुस्लिम होता हे वेगळे सांगायची गरज नाही
लिंचिंग होत असताना तिथे पोलिस
वरिल घटनेत , लिंचिंग होत असताना तिथे पोलिस हजरही होता, बघ्याच्या भुमिकेत. एक निरपराधी माणूस मारला गेला.
विद्वेषाची आग आपल्या घरापर्यंत येणारच नाही? नव्हे आलेली आहे. भवरलाल जैन सारखे निरपराधी मारल्या गेले. आता एका रस्ते अपघाता मधे गाय मधे आली, लोकांनी गाडी चालकाला ( डॉक्टर होता) बदडले.
https://indianexpress.com/article/cities/lucknow/badaun-doctor-assault-s...
गाय रस्त्यावर भरकटणार नाही याची जबाबदारी कुणाची? अपघात झाल्यास , चालकास रस्त्यावरच मारायचा परवाना कुणी दिला?
गायीबद्दलची बातमी वाचली.
गायीबद्दलची बातमी वाचली. बातम्या आपल्यापर्यंत जशा पोहोचतात त्या प्रकारे आपण व्यक्त होतो.
मध्यंतरी मराठी भाषिक विरूद्ध उत्तर भारतीय अशी प्रकरणे जोरात असताना मी हिंदी आणि मराठी दोन्ही रिपोर्टिंग बघत होतो. मराठी वार्तांकनामधे जे सांगितलेले असे त्याच्या बरोबर विरोधात हिंदीत असे. म्हणजे मराठी लोकांना उन्माद चढला आहे आणि ते निमित्तच शोधत आहे असे वाटेल.
आताची बातमी संक्षिप्त आहे. धडक जोरात होती. गायीचा मृत्यू झाला आहे. अशा कायदा हातात घेण्याच्या विरोधातच आहे. पण या बातमीवरून ठोस काही कळत नाही. बाजारातून जाताना डॉक्टरचा वेग जास्त होता याचा राग आला का हे कळत नाही. तसे नसेल तर गायीला धडक बसल्यावर ती कशाने मेली हे ही स्पष्ट नाही.
डॉक्टरचा वेग व्यवस्थित म्हणजे नियंत्रणात होता, धडक झाली आणि गाय मेली असे समजूयात. या केस मधे मारहाण झाली हे संतापजनक आहे. गायीचा मृत्यू झाला हे पण निषिद्धच. त्यासाठी डॉक्टरला मारहाण करणे त्यापेक्षा चूक.
यात चिंताजनक गोष्ट जी आहे ती म्हणजे मारहाण करणारे २५ ते ३० वयाचे होते. ते मोलमजुरी करून पोट भरत होते. म्हणजे गरीब होते. असे लोक घटना घडवतात आणि मग आयुष्यभर जेलवारी किंवा कोर्टवारी करतात. आयुष्य बरबाद होते. त्यांना भडकवणारे नामानिराळे राहतात. हे जे लोक आहेत त्यांचा बंदोबस्त झाला तर आपल्याला अशा हजारो घटनांवर व्यक्त होण्याची वेळ येणार नाही. पण दुर्दैवाने तसे होत नाही. या लोकांचे व्होट घेऊन जे सरकार येते ते असे करत नाही. का नाही करत त्यांचे त्यांना ठाऊक.
राम मंदिर दान पेटी मधे आलेला
राम मंदिर दान पेटी मधे आलेला कोट्यावधी रु नित्यनियमाने चोरीला जात होता हे उघडकीला आल्यावरही ED चे हात का बांधलेले आहेत?
मैंने ईडी को माफ कर दिया!
मैंने ईडी को माफ कर दिया!
राममंदिर दान पेटीमधला पैसा
राममंदिर दान पेटीमधला पैसा चोरी संदर्भात अनेक घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने SIT ( #२) ला तपास कार्याच्या प्रगती बाबत " submit status report, take probe to logical end ' अशा अर्थाचे आदेश मागच्या आठवड्यात दिले होते.
SIT ने अर्ध्याहून अधिक तपास पूर्ण केला असून, सप्टेबर अखेर पर्यंत कार्यवाही पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणजे अहवाल "बंद" लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयाला दिला जाईल.
https://www.hindustantimes.com/cities/lucknow-news/ram-temple-donation-t...
SIT (#२) लिहीले आहे कारण आधीची SIT राज्य सरकारची होती. तिच्या अहवालानुसार FIR दाखल करावा लागला होता.
उ प्र मधे एक पत्रकार अभिषेक
उ प्र मधे एक पत्रकार अभिषेक उपाध्याय - यांनी राम मंदिरासाठीच्या देणग्यांशी संबंधित अनियमितता आणि उ प्र सरकारमधील भ्रष्टाचारा च्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. यांच्यावर FIR दाखल करण्यात आला आहे आणि त्यांच्या अर्जाची सर्वोच्च न्यायालयांत आज सुनावणी आहे.
"Multiple FIRs have been filed against him and now an FIR under the stringent provisions of the SC/ST Act has also been filed. "
सूड भावनेने एखाद्या बनावट केस मधे अडकविले जाणार नाही अशी अपेक्षा.
https://www.newindianexpress.com/india/2026/Aug/24/sc-to-hear-plea-chall...
उपाध्याय यांना, सर्वोच्च
उपाध्याय यांना, सर्वोच्च न्यायालयाकडून, तात्पुरता दिलासा मिळला आहे.
https://www.thehindu.com/news/national/supreme-court-journalist-abhishek...
Pages