१९८० पासून राम मंदिर प्रश्न आपल्या सर्वांच्याच कानावर सतत पडत असतो. राम मंदिर विषय निघाल्यावर संबंधित घटनाक्रम ( १९८६ कुलूप उघडणे, रथयात्रा, दंगली, ढाचा पाडणे, अनेक दंगली, रक्तपांत, मंदिराचे निर्माण कार्य, भूमीपूजन, जोशांत उद्घाटन) माझ्या डोळ्यासमोर येतो. मंदिर निर्माण होण्याच्या अगोदरच्या काळांत, अनेक दशके, देणग्या गोळा करण्याचे काम सातत्याने सुरु होते, आणि पुढेही ते सुरुच रहाणार आहे.
आज वर्षाला ५ कोटी ते २० कोटी लोक भेटी देत आहेत. प्रत्येक भक्त आपल्या आर्थिक कुवती नुसार मंदिराच्या दानपेटीत भक्तीभावाने, श्रद्धेने आणि मुख्य म्हणजे विश्वासाने पैसे दान करत असतो. या पैशांचा विनीयोग मंदिराशी संबंधीत कामासाठीच होत असतो अशी श्रद्धा असते, भरवसा असतो. रामाच्या नावाने गोळा होत असलेल्या दानपेटी वर व्यक्त झालेला हा फार मोठा विश्वास आहे.
राममंदिर दानपेटी मधे होत असलेल्या गैर व्यावहारा संबंधीच्या बातम्यांनी माझे लक्ष वेधले गेले. या आधी सोने आणि चांदीच्या विटांबद्दल बातमी आली होती. दानपेटीमधे जमा होत असलेल्या पैशांपैकी ( रोख पैसा, सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर, माणिक, मोती) काही भाग मंदिर कर्मचार्यांच्या खासगी खिशांत जात असेल तर हा कोट्यावधी राम भक्तांचा फार मोठा विश्वासघांत आहे.
या संबंधांत आठ लोकांवर FIR दाखल करण्यांत आला आहे. सुरवातीला ट्रस्टच्या लोकांनी आर्थिक गैरव्यावहार झाल्याचे नकारले होते. पण अखिलेश यादव यांच्या ट्विट ने लक्ष देण्यास भाग पाडले.
https://x.com/yadavakhilesh/status/2063567792733831463
FIR मधे नावे असणारे आरोपी - अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, रामशंकर मिश्रा, रमाशंकर यादव, मनीष यादव, सुभाषचंद्र श्रीवास्तव आणि करुणेश पांडे. पैकी सहा आरोपी मंदिरातील कर्मचारी असून ते रोख रक्कम मोजण्याचे काम करायचे.
पैसे अपहाराचे फुटेज CCTV मधे कैद झाले आहे. या प्रकरणाची माहिती असलेली अनेक लोक भितीपोटी बोलत नाही. कधी पासून हे अपहार प्रकरण सुरु होते ? एकंदर किती कोटी रुपये हडप झाले ? हा पैसा कुठे गेला ? या प्रश्नांची उत्तरे यथावकाश मिळतील आणि खर्या दोषींना कायद्यानुसार कडक शिक्षा मिळेल अशी अपेक्षा. पण दानपेट्या भक्त लोकांचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करतील का ?
गेले काही आठवडे अपहार संबंधित बातम्यांनी मला अस्वस्थ केले आहे. या विषयावर आपली मते जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद नरेन सर.
धन्यवाद नरेन सर.
अनिरुद्ध महाराज यांनी सुरू केली यात्रा असं काल वाचलं होतं. आज सापडली नाही बातमी म्हणून चौकशी केली.
अनिरुद्ध महाराज यांनी सुरू
अनिरुद्ध महाराज यांनी सुरू केली यात्रा असं काल वाचलं होतं. आज सापडली नाही बातमी म्हणून चौकशी केली.>> नक्की कोणी माहित नाही पण महाराष्ट्रात पण अशा यात्रा सुरु करायचा प्रयत्न झाला. पण बहुतेक तितके यश नाही आले किंवा तितका प्रतिसाद मिळाला नसावा, कारण आधीच आपल्या इथे वारी प्रसिद्ध आहे.
दानपेटी अपहार किंवा त्या आधी
दानपेटी अपहार किंवा त्या आधी मंदिर परिसरातील जमिनीच्या व्यवहारात झालेल्या गंमतीजमती याबद्दल माझे काही मत नाही.
पण पेटीएमने पैसे दिल्यावर जय श्रीराम ऐकू येते का? आले तर काय याबद्दल माझे स्पष्ट मत आहे.
>>> दानपेटी अपहार किंवा त्या
>>> दानपेटी अपहार किंवा त्या आधी मंदिर परिसरातील जमिनीच्या व्यवहारात झालेल्या गंमतीजमती याबद्दल माझे काही मत नाही.
आहे ना! मुळात मशिदीची नासधूस, धार्मिक दंगली, मंदिराच्या उभारणीची आवश्यकता, उद्घाटनातली घाई, त्या संदर्भातले सगळे गैरव्यवहार आणि त्यावरची अनेकांकडून ऐकलेली 'थोडंफार चालायचंच' अशा प्रकारची प्रतिक्रिया - सगळ्याबद्दल प्रश्न आणि मतं आहेत!
मला मुंबईसारख्या मेट्रो शहरात वेळीअवेळी आणि अस्थानी 'जय श्रीराम' कानांवर आदळणं मजेशीर नाही, धोकादायक वाटतं. तो त्या मंदिरबांधणीसंदर्भातल्या उन्मादाचाच एक भाग वाटतो. 'त्याचं काय इतकं' असं म्हणणार्यांना पेटीएममधून 'अल्ला हु अकबर' ऐकू आलेलं चालेल/आवडेल का?
मुंबईतच ऊबरने कुठेतरी जात होते, गाडीत अगदी बारीक आवाजात म्यूझिक सुरू होतं. राहत फतेह अली खानचा आवाज वाटला, म्हणून ड्रायव्हरला म्यूझिकबद्दल विचारलं. त्याने एकदम घाबरून 'बंद कर दूँ?' असं विचारलं. मग 'नाही नाही, आम्हाला आवडलं - आवाज मोठा करा प्लीज' वगैरे सांगूनही त्याला कन्व्हिन्स व्हायला थोडा वेळ लागला. मग त्याने हा क़सीदा आहे असं सांगत आवाज थोडासा वाढवला.
त्याची पहिली प्रतिक्रिया घाबरण्याची का होती?
असो.
ते पेटीएमचं इथे अस्थानी होतं हे खरंच. बहुधा या पोस्टमधले मुद्देही इथे अस्थानी आहेत. तेव्हा क्षमस्व.
शिवाय ब्लेटन्ट भ्रष्टाचाराच्या बाबतीतही तुमचं आमचं सेम आहेच!
अहो, ते तुम्हा OCI
अहो, ते तुम्हा OCI मंडळींसाठी नव्हतं.
आमचं काय , रोज मरे त्याला कोण रडे ? किंवा रोज रडे त्याला कोण पुसे ?असं आहे.
--
बाकी महाराष्ट्रात सुद्धा युपीसारख्या कावड यात्रा हव्यातच बुवा. मुंबईत उत्तर भारतीयांच्या प्रायोजित कावड यात्रा होतात, पण त्यात मराठी साहित्यात वर्णिलेल्या चाळीतल्या सार्वजनिक नळावरून पाणी भरण्याइतकी सुद्धा मजा नाही.
आपला श्रावण पुढल्या आठवड्यात सुरू होईल (किती तो गोंधळ? एक देश एक निवड णूक एक पक्ष सारखं एक कॅलेंडर सुद्धा हवं आता) तेव्हा काहीतरी इंटरेस्टिंग आणि रोमहर्षक पाहायला मिळेल अशी आशा आहे.
(No subject)
ते एक आहेच आणि थोडंसं अवांतर
ते एक आहेच आणि थोडंसं अवांतर म्हणजे- दिवसभर तेच ऐकून कंटाळा येणार नाही का? जय श्रीराम असो, देवीयो सज्जनों असो की अला हो अकबर असो, शेकडो वेळा ऐकून मी अनॉईंग मोडमध्ये जाणारच.
हायला तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलं गेलं आहे. दगड किंवा यंत्र म्हणून नाही; या जन्मात शक्य असलेल्या सगळ्या नको, कमीत कमी होता होईल तितक्या जास्तीत जास्त शक्यता तरी एक्स्प्लोअर करता येतात की नाही. डोक्याचा, बुद्धीचा, आजुबाजूच्या अँबियन्सचा, आणि ते ओळखण्याच्या, वापरण्याच्या ताकदीचा वापर करायला पाहिजे ना. नाहीतर तुमच्यात आणि जनावरांत काय फरक? या पृथ्वीवरच्या सगळ्या राजधान्यांची नावं पाठ करणं आणि सतत जय श्रीराम (एक लाख आठ हजार वेळा वगैरे) लिहिणं, वाचणं, ऐकणं - यात काय फरक आहे? पाठांतरात धन्यता मानतात तशी यातही धन्यता मानतात! याहीपुढचं म्हणजे पाठांतरात 'पुण्य' वगैरेची भावना नसते, यात तीही मानून धन्य होतात.
महाराष्ट्रात कावड यात्रा नसली तरी समर्थ पादूका, साई पादूका वगैरे टेंपोतून घेऊन देणग्या-पैसे-प्रसाद गोळा करणे अनेक वर्षांपासून चालू आहे, आणि वाढतंय सगळीकडे. अजून दादागिरी नाही, पण न्युसंस आहे. दादागिरी लवकरच चालू होईलसं दिसतं.
---
function at() { [native code] }इअवांतर-
पेटीएमवरनं आठवलं- लेकीने एकदा घरी येऊन विचारलं, बाबा जयाआजींनी बच्चन आजोबांना किराणा करायला पाठवलं तर ते पेमेंट कसं करतील?
मी गोंधळलो, तर म्हणे- किराणा पिशवीत भरतील, मग म्हणतील, अमुक अमुक पेमेंट पेटीएम पे प्राप्त हुआ है, देवीयो और सज्जनो, धन्यवाद. आणि मग सरळ घरचा रस्ता धरतील. जयाआज्जींकडून शाबासकी मिळवतील.
असो.
साजिरा, हा संदेश ज्या
साजिरा, हा संदेश ज्या ऑडियन्ससाठी लिहिला आहेस त्यांनी डोक्याचा आणि बुद्धीचा वापर करणे ही तुझी अजुनही अपेक्षा आहे का? सारकॅस्टिकली नाही खरंच विचारतो आहे. जे कधीच न्हवते त्याची वाट का पहावी!!?
त्यांना समजेल अशा भाषेत, त्या पातळीवर संवाद साधला गेला, विचार न करता फॉरवर्ड करता येईल असं काही पाठवता आलं आणि स्लो पॉयझन अशाच दुसर्या स्लो अँटी व्हेनमने उतरलं तर ठीक. नाहीतर हे लोक मेले आणि जेनझींची टक्केवारी वाढले वगैरे दिवास्वप्नं बघतं जेनझी हेच जगाते उद्धारी म्हणत आपण त्यांना मखरात बसवू!
ते कळलंच ना. मग शेवटी न
ते कळलंच ना. मग शेवटी न राहवून जोक टाकला
(No subject)
महाराष्ट्रात कावड चालू आहेत.
महाराष्ट्रात कावड चालू आहेत. मराठवाड्यातून कोकणातून भीमाशंकर त्र्यंबकेश्वर येथे जाताना दिसतात. फिटनेस नसल्याने कावडीऐवजी दोरीला २ २५० मिलीच्या बिस्लेरी बाटल्या बांधून. बाकी फंडिंग आमदार देत आहे.
अरेरे
अरेरे
स्वामी समर्थ उत्सवावरून
स्वामी समर्थ उत्सवावरून दादागिरी झाली ना ? पोलिस स्टेशन - फेसबुक पोस्ट एडिट करायला लागणे. त्या बाई मायबोलीवर होत्या बहुतेक.
मुंबई के सिद्धिविनायक मंदिर
मुंबई के सिद्धिविनायक मंदिर में 18 करोड़ की दान चोरी! सरकार ने मंदिर ट्रस्ट से मांगा हिसाब | The Lallantop https://share.google/y2z5s7IjYoak40UMD
उत्तर प्रदेशात राममंदीरात
उत्तर प्रदेशात राममंदीरात झालेल्या चोरीसंबंधी सोशल मीडीयावर विचार लिहील्याने एकाला अटक झाली आहे.
अरे बापरे..
अरे बापरे..
Admin pls धागा उडवा...
अरे जेनझीची भिती बाळग! काय
अरे जेनझीची भिती बाळग! काय म्हणतील जेनझी असं केलंस तर!
मीच आहे तो जेन झी.. आय मीन ती
मीच आहे तो जेन झी.. आय मीन ती वृत्ती
अर्थात गमतीनेच लिहिली होती ती वरची पोस्ट
मला मुंबईसारख्या मेट्रो शहरात
मला मुंबईसारख्या मेट्रो शहरात वेळीअवेळी आणि अस्थानी 'जय श्रीराम' कानांवर आदळणं मजेशीर नाही, धोकादायक वाटतं. तो त्या मंदिरबांधणीसंदर्भातल्या उन्मादाचाच एक भाग वाटतो. 'त्याचं काय इतकं' असं म्हणणार्यांना पेटीएममधून 'अल्ला हु अकबर' ऐकू आलेलं चालेल/आवडेल का?>>>>>
दर दिवशी पाच वेळा अल्ला हो अकबर ऐकु येतेच की घरबसल्या, पेटीएम करायचीही गरज नाही. घरबसल्या
ऐकु यावे म्हणुन खास स्पिकरवरुन ऐकवले जाते. पेटिएमवरुनही ऐकु आले तर काय बिघडणार आहे?
‘जय श्रीराम’ ला राम मंदिर बांधल्यावर वेगळा अर्थ प्राप्त झाला. त्याआधी या देशात हे शब्द कोणी उच्चारत नव्हते का??
मंदिर बांधले म्हणुन रामनाम लोक घेऊ लागले असे अजुन काही वर्षांनी लोक समजु लागतील.
ज्यांना दर दिवशी पाच वेळा सर्व जनतेला लाउडस्पिकरवरुन ऐकवण्यात येणारे अल्लाहु अकबर अजिबात खटकत नाही पण केवळ पेटीएमच्या रेंजमध्ये ऐकु येणारे जय श्रीराम धार्मिक उन्माद वाटुन खटकते त्यांनी सर्वधर्मसमभावाची लस अजुन टोचुन घेतलेली नाही इतकेच म्हणावेसे वाटते. टोचुन घ्या म्हणजे जय श्रीरामही खटकणार नाही.
३५ % वाल्यांना आरक्षणात जागा
३५ % वाल्यांना आरक्षणात जागा मिळते आणि ९५ % वाल्या ओपन कॅटेगरीला मिळत नाही हे आठवलं.
पाण्यात पोहणारा मासा कधी पाणी
पाण्यात पोहणारा मासा कधी पाणी पितो हे जसे ओळखता येत नाही, तसेच सरकारी अधिकारी जनतेच्या पैशातून स्वतःसाठी कधी आणि किती भ्रष्टाचार करतात हे शोधणे अत्यंत कठीण असते. हे चाणक्याचे म्हणणे आहे. राममंदिराच्या दानपेटीतील भष्टाचार असाच आहे. अनेक दानपेटीत असे व्यवहार होत असतात.
ज्यांना दर दिवशी पाच वेळा
ज्यांना दर दिवशी पाच वेळा सर्व जनतेला लाउडस्पिकरवरुन ऐकवण्यात येणारे अल्लाहु अकबर अजिबात खटकत नाही
>>>
कुणी सांगितलं साधना तुला? खटकतो की.
फ२० ने राणा भीमदेवी थाटात काही महिन्यांपुर्वी सांगितलेलं- पोलिसांना सुचना दिल्या आहेत. २४ तासांत सारं बंद होईल. पुढे काय झालं?
माझं ऑफिस पर्वतीदर्शनला आहे. शेजारी पोलिस चौकी आहे, आणि तिला लागून प्राचीन जुनी वगैरे मशिद. ते 'पाचवेळा' वगैरे सुरू झालं की महत्वाचे क्लायंट कॉल्सही बंद करावे लागतात. काय झालं रामराज्याचं?
आपले म्हादूतात्या जसे २४ बाय ७ प्रचारमंत्री आहेत, तसे आपले फ२० महाशयसुद्धा सत्तेत असूनही सतत विरोधी पक्षात आहेत. तोच तो तारस्वर. तेच ते फालतु युक्तीवाद. तोच तो हलकट कावेबाजपणा.
खरी गोष्ट वेगळीच आहे.
माझ्या टेरेसवर अनेक वर्षं, म्हणजे जवळहवळ दीडदोन दशकं शांतता नांदत होती. मी योग्य ठिकाणी घर घेतलं- याचं समाधान होतं. आता गेल्या काही महिन्यांपासून मुल्लांपेक्षाही भसाड्या आवाजात माईकवर जय श्रीराम, जय जय श्रीराम- हे ऐकू येतंय.
ही खरी गोष्ट आहे. त्यांच्यावर बंदी घातली की इथं हैदोस घालता येणार नाही- हा खरा प्रॉब्लेम आहे. तुम्ही इथं या, (त्यानिमित्ताने गेटटुगेदर करू) मी तुम्हाला 'हेरिटेज टूर' घडवतो. २-४ दिवसा आड इथं कसला तरी उत्सव असतो, पोलिसांच्या परवानगीशिवाय रस्ते बंद केले जातात. डीजे लावले जातात. लोकांच्या तक्रारी फाट्यावर मारल्या जातात. या सार्या उन्मादाची तुलना तुम्ही दीड मिनिट गुणिले दिवसात पाच वेळा याशी करता? ते बंद झालं पाहिजे ही तर पहिली मागणी आहे. ते का होत नाही?
फ२० हा इतिहासातला सर्वात भयानक मुख्यमंत्री हे सिद्ध होईल, पण त्याला वेळ लागेल. तोवर या अशा पद्धतीने पोश्टी पोश्टी खेळुन घेऊ आपण, सध्या वेळ आहे तर. कुणी सांगावं नंतर वेळ नसेल, किंवा आप्ण नसू. नो प्रॉब्लेम.
मुसलमान कडवे आहेत कारण
मुसलमान कडवे आहेत कारण अशिक्षित आहेत. सधन मुस्लीम राष्ट्रातही आधुनिक शिक्षण नाही. म्हणून बुरसटलेल्या प्रथा चालू आहेत. त्याचे समर्थन बिल्कुल नाही (हा डिसक्लेमर आजच्या ट्रोलिंगच्या जमान्यात द्यावाच लागतो.).
दुर्दैव काय आहे? त्यांचं अनुकरण करून त्यांच्यासारखीच बांग द्यायची आणि आता कसं वाटतंय या अविर्भावात बागडायचं. ही गोष्ट हे दर्शवते कि शिकून सुद्धा काहीच फायदा नाही. मेंदूचं प्राचीन बुरसटलेपण आधुनिक शिक्षणाच्या गंगोत्रीनेही धुवून निघत नाही, याची लाज न वाटता आपण हिरीरीने वकिली करतो हे शरमिंदा करणारं आहे. कशाचा अभिमान बाळगावा हे कळेनासं झालं कि सुशिक्षित पांढरपेशे असे तर मग किमान कडवी परवडले, समजावून सांगितलं तर ऐकतील किंवा गप्प बसतील. कारण आपल्या द्दुष्कृत्यांना डिफेन्ड करणे त्यांच्या बुद्धीला झेपणारे नाही.
माझ्या लहानपणापासून सगळ्या
माझ्या लहानपणापासून सगळ्या धर्माच्या विद्यार्थी असलेल्या आमच्या शाळेत 'सरस्वतीपूजन' होत होतं, जवळजवळ तेव्हापासूनच सर्वधर्मसमभावाची लस टोचली गेली गेली होती.
बोलायच्या आधी विचार तरी करत जा यार. ख्रिस्ती शाळांत (समजा) तुमची पोरं पाठवली, तर तिथं काय असावं अशी तुमची अपेक्षा आहे?
>>मुसलमान कडवे आहेत कारण
>>मुसलमान कडवे आहेत कारण अशिक्षित आहेत. सधन मुस्लीम राष्ट्रातही आधुनिक शिक्षण नाही. म्हणून बुरसटलेल्या प्रथा चालू आहेत. >>
मुस्लिम राष्ट्र नाही, पण कॅनडात खोर्याने मुस्लिम आहेत, उत्तम आधुनिक शिक्षण उपलब्ध आहे, मुस्लिम आधुनिक शिक्षण घेतात. तरीही मिडलईस्ट मुस्लिम बायका बुरख्यात दिसतात, तरुण मुली ही दिसतात, आणि शुक्रवारी मशीदीच्या आजुबाजूला सैरावैरा पार्किंग करुन तिकडे प्रचंड गर्दी होते. शिक्षणाने अजुन तरी फरक पडलेला दिसलेला नाही. फर्स्ट जनरेशन असेल असं म्हणू, बघू सेकंड जनरेशन जरा हुषार निपजली तर. यंग अॅडल्ट्स बरेच बुरसटलेले बघितले आहेत.
कधी कधी लहान मूलाकडे 'अ
कधी कधी लहान मूलाकडे 'लर्नेड/अॅक्वायर्ड/वेपनाइझ्ड इनकॉम्पिटन्स' असतो. मग आई त्याला बाबा-पुता करते. तो ही सगळे लाड करुन घेतो व गूळाचा गणपती बनतो. मग काय अशक्त / दुबळा म्हणुन आईबाबा सगळी इस्टेट त्यालाच देउन टाकतात. मोठ्याने धडपडून तो वर गेलेला असतो तो त्याच्या हक्काच्या संपत्तीच्या भागाला मुकतो.
अश्या केसेस दिसतातच. १००%.
>>> मुस्लिम आधुनिक शिक्षण
>>> मुस्लिम आधुनिक शिक्षण घेतात. तरीही मिडलईस्ट मुस्लिम बायका बुरख्यात दिसतात, तरुण मुली ही दिसतात, आणि शुक्रवारी मशीदीच्या आजुबाजूला सैरावैरा पार्किंग करुन तिकडे प्रचंड गर्दी होते.
हिंदू आधुनिक शिक्षण घेतात. तरीही हिंदू बायका जमेल तेव्हा साड्या नेसून रिळं करताना दिसतात, तरुण मुली ही दिसतात, आणि सणावारी देवळांच्या आजुबाजूला सैरावैरा पार्किंग करुन तिकडे प्रचंड गर्दी करतात. पार्किंग लॉट्समध्ये ढोलताशे वाजवतात. रस्त्यावर थुंकतात.
कधी कधी रांगोळी काढली कि
कधी कधी रांगोळी काढली कि रांगोळी कशापासून बनते इथपासून सांगावं कि काय असा विचार मनात येऊन हसावं कि रडावं हा प्रश्न पडतो.
कुठलाही समाज पुंजक्यात प्रगत होत नाही. उदाहरणं खूप असतात. प्रगत मुस्लीम दाखवून सगळे प्रगत आहेत असं म्हणता येत नाही आणि कॅनडात एखाद्याला दिसलेलं दृश्य प्रातिनिधिक आहे म्हणून ते सर्वव्यापी आहे हे पण म्हणता येत नाही. मुस्लिमांचं कडवेपण हे संघटीतपणे बुरसटलेल्या शिक्षणात आहे. समाज म्हणून विचारसरणी डेव्हलप होत असते, ती एकट्यादुकट्याला बदलवता येत नाही.
हमीद दलवाई, राजन खान, आमीर खान अशा थोडक्यांची उदाहरणं देऊन मूळ गाभा सोडुन किती भरकटायचं?
मूळ प्रतिसाद व्हॉट अबाऊटरीचा होता. ते बुरसटलेले आहेत त्यांना बोलत नाहीत तर आम्हाला का?
ते बांग देतात तर आम्ही जय श्रीराम करणार. म्हणजे प्रगत झालेल्या समाजाने मागे येण्याचा अभिमान बाळगायचा का?
हा त्या प्रतिसादाचा अर्थ होता.
हा, ते ढोलताशे वगैरे.
हा, ते ढोलताशे वगैरे.
दरवर्षी काही महिने प्रॅक्टिस करूनही ऐनवेळी नीट तालात वाजवता येत नाही. मग गदारोळ करून ते झाकून टाकण्यात येतं. हे जवळजवळ प्रत्येक ढोलपथकात. पण तोवर अनेक महिने आजुबाजूच्यांना आवाज करून बेजार केलेलं असतं.
प्रत्येक ढोलपथ्गकात 'होतकरू' तरुण तरुणींची संख्या प्रचंड आहे. आता आजच्या काळात असंख्य जागा आणि संधी आहेत. पण हे सोपं आहे. पालकांची संस्कृतीसंवर्धनाला परवानगी आहे.
तरीही प्रश्न पडतोच. कारण या मुलांना लाखो मार्ग आहेत, आणि आपल्यासारखा, भिकारी पद्धतीचा 'संस्कृतीसंवर्धना'चा हे लोक इतका गांभिर्याने विचार करत असतील, हे अजिबातच संभवत नाही. कर्तव्य म्हणून, एक टाकणं टाकून पुण्य मिळवायचं म्हणून राममंदिराला देणगी देऊन टाकली, असंही इथं नाही. मग काय ऑप्शन उरतो?
'आवाजाचं अगम्य आकर्षण' असं एक उत्तर सुचतं. हॉर्न्स, डीजे, माईक्स, समारंभ, उत्सव, आपल्या आत बघता न येणं किंवा बघायची इच्छा न होणं (कारण त्यातुन न जाणो काहीतरी भयानक हाती लागेल), आणि अशासारख्या गोष्टी. हे सारं करताना ते रस्ते अडवतात, बेशिस्तीने वागतात, लोकांना ट्रोल करतात, रस्त्यावर थुंकून कचरा करून गोंधळ घालतात- हे आहेच.
स्वाती +१.
स्वाती +१.
शिक्षणाने काहीही होत नाही इतकंच सांगायचं होतं.
Pages