राम मंदिर दानपेटी अपहार प्रकरण

Submitted by उदय on 2 August, 2026 - 03:57

१९८० पासून राम मंदिर प्रश्न आपल्या सर्वांच्याच कानावर सतत पडत असतो. राम मंदिर विषय निघाल्यावर संबंधित घटनाक्रम ( १९८६ कुलूप उघडणे, रथयात्रा, दंगली, ढाचा पाडणे, अनेक दंगली, रक्तपांत, मंदिराचे निर्माण कार्य, भूमीपूजन, जोशांत उद्घाटन) माझ्या डोळ्यासमोर येतो. मंदिर निर्माण होण्याच्या अगोदरच्या काळांत, अनेक दशके, देणग्या गोळा करण्याचे काम सातत्याने सुरु होते, आणि पुढेही ते सुरुच रहाणार आहे.

आज वर्षाला ५ कोटी ते २० कोटी लोक भेटी देत आहेत. प्रत्येक भक्त आपल्या आर्थिक कुवती नुसार मंदिराच्या दानपेटीत भक्तीभावाने, श्रद्धेने आणि मुख्य म्हणजे विश्वासाने पैसे दान करत असतो. या पैशांचा विनीयोग मंदिराशी संबंधीत कामासाठीच होत असतो अशी श्रद्धा असते, भरवसा असतो. रामाच्या नावाने गोळा होत असलेल्या दानपेटी वर व्यक्त झालेला हा फार मोठा विश्वास आहे.

राममंदिर दानपेटी मधे होत असलेल्या गैर व्यावहारा संबंधीच्या बातम्यांनी माझे लक्ष वेधले गेले. या आधी सोने आणि चांदीच्या विटांबद्दल बातमी आली होती. दानपेटीमधे जमा होत असलेल्या पैशांपैकी ( रोख पैसा, सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर, माणिक, मोती) काही भाग मंदिर कर्मचार्‍यांच्या खासगी खिशांत जात असेल तर हा कोट्यावधी राम भक्तांचा फार मोठा विश्वासघांत आहे.

या संबंधांत आठ लोकांवर FIR दाखल करण्यांत आला आहे. सुरवातीला ट्रस्टच्या लोकांनी आर्थिक गैरव्यावहार झाल्याचे नकारले होते. पण अखिलेश यादव यांच्या ट्विट ने लक्ष देण्यास भाग पाडले.
https://x.com/yadavakhilesh/status/2063567792733831463

FIR मधे नावे असणारे आरोपी - अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, रामशंकर मिश्रा, रमाशंकर यादव, मनीष यादव, सुभाषचंद्र श्रीवास्तव आणि करुणेश पांडे. पैकी सहा आरोपी मंदिरातील कर्मचारी असून ते रोख रक्कम मोजण्याचे काम करायचे.
पैसे अपहाराचे फुटेज CCTV मधे कैद झाले आहे. या प्रकरणाची माहिती असलेली अनेक लोक भितीपोटी बोलत नाही. कधी पासून हे अपहार प्रकरण सुरु होते ? एकंदर किती कोटी रुपये हडप झाले ? हा पैसा कुठे गेला ? या प्रश्नांची उत्तरे यथावकाश मिळतील आणि खर्‍या दोषींना कायद्यानुसार कडक शिक्षा मिळेल अशी अपेक्षा. पण दानपेट्या भक्त लोकांचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करतील का ?

गेले काही आठवडे अपहार संबंधित बातम्यांनी मला अस्वस्थ केले आहे. या विषयावर आपली मते जाणून घ्यायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवळातूनही लाऊड स्पीकरवर आरत्या ऐकू येतात रोज. इकडे साईबाबाभक्त खूप आहेत. मी १९९५ ला इथे आलो तेव्हा एकी कडुन मशिदीतून अदान मग दुसरी कडुन साईबाबांच्या मराठी दोन तीन आरत्या ऐकू येत. (इथल्या लोकांना मराठी येत नसले तरी देवळात तेव्हा मराठी आरत्याच ऐकू येत.) तिसरी कडुन गायत्री मंत्र आणि सुब्बालक्ष्मी सुप्रभातम्.

आता रहातो तिथे एवढ्या तेव्हढ्या जवळून काही ऐकू येत नाही. Walking trail एका देवळाजवळून जातो तिथे संध्याकाळी तासभर लाऊड स्पीकरवर स्तोत्र, आरत्या लागतात. अजून पुढे मशीदीजवळून जातो तिथे वेळ असली अजान की जे काय त्यावेळी असते ते. साईबाबा देवळातले एका वारी एका सजवलेल्या गाडीवर लाऊडस्पीकरवर हिंदी सिनेमा चालींवर आरत्या लावून चंदा मागायला येतात. वासुदेव नादस्वरम वाजवत येतो. सण उत्सव वेगळेच.

हे सगळं हल्ली स्टॅटिस्टिकली जास्त प्रमाणात आणि तुलनेने जास्त सुक्षितित आणि तसेच अशिक्षित, सगळ्याच समाजात होतं आहे.

शिक्षणाने काय फरक पडला? अक्कल आलीच नाही. परदेशात आलो तरी काय फरक पडला? जो पडला तो नियम आणि अंमलबजावणी असल्यानेच काय तो पडला. चांगल्या सिस्टिम्स, काटेकोर अंमलबजावणी, काटेकोर पुलिस, न्याय आणि नियम पाळणारे लोक हवेत. जे शिक्षणाने नाही तर सुखसोयी, आनंदी वातावरण, बेसिक गोष्टींसाठी शर्यत लावायला न लागणे, आणि सामाजिक बांधिलकीने फक्त येते. आधुनिक शिक्षणाने सामाजिक बांधिलकी येतेच असे नाही.

अस्थानी आहे, पण आता विषयाला (चांगले) वळण लागलेच आहे तर उगाच नव्या धाग्याची वाट बघत विसरायला नको.

(आधुनिक) शिक्षणाने काही होत नाही हे खरे नाही. शाळेत विविध जातीधर्माची मुलं एकत्र शिकतात. त्यांच्यात हे आधुनिक शिक्षण काम करतंच. मुस्लीम ( खरे तर सगळेच) हे आज बुरसटलेपणाचे प्रतिनिधी म्हणून प्रोजेक्ट झाले आहेत तर त्यांचीही मुलं शाळेतले आधुनिक विचार आत्मसात करतात. सर्वांचीच मुलं करतात. मूठभर उदाहरणांनी एखादा समाज प्रगत आहे किंवा बुरसटलेला आहे हे ठरवता येत नाही. तसेच आधुनिक शिक्षणाने विशिष्ट समाज सुधारत नाही हे पण. मुस्लीम समाजात तुरळक व्यक्ती प्रगत आहेत तर पर्सनल आयुष्यात ते प्रगत विचारांचे आहेत.

माणूस दोन पातळ्यांवर जगतो. एक त्याची पर्सनल स्पेस असते आणि दुसरा सामाजिक प्राणी म्हणून. वैयक्तिक आयुष्यात त्याचे मित्र असतात, सर्व प्रकारचे लोक असतात, नोकरी, व्यवसायाचे संबंध असतात. इथे त्याचे आधुनिक विचार काम करतात. इथे त्याच्यावर तुलनेने कमी बंधने असतात. जी काही बंधने असतात ती शिस्त , नियम स्वरूपात. पण जेव्हां तो समाजात जातो तेव्हां समाजाच्या नियमांनुसार त्याला वागणे भाग पडत असते. त्यामुळं आयुष्यभर त्याचं द्वंद्व चालू असतं.

ज्या समाजाने समाज म्हणून आधुनिक जीवनशैली स्विकारली ते प्रगत झाले. ज्यांनी आपल्या स्मूहातल्या मूलतत्ववाद्यांना एकटे पाडले त्यांना आधुनिक जीवनशैली जास्त आत्मसात करता आली.

ज्यांना नाही जमले त्यांच्यात एखाद दुसरा असामान्य विद्वान निपजला तरी त्याच्या विचारानुसार समाज चालणार नसेल तर उपयोग होत नाही. किमान त्यांनी पुरोगामी म्हणून स्वतःला डिक्लेअर केलेले असेल तर लाजेकाजेस्तव त्यांना पुरोगामी विचारांची कास धरावी लागते. लाजेकाजेस्तव आपल्या बुरसटलेल्या विचारांचा टेंभा मिरवता येत नाही. म्हणजे त्यांच्यात सुधारणेला वाव असतो.

पण जर हे डबल लाईफ प्रोफेशनल झाले तर मग पुरोगामी सर्वात गंडलेली जमात बनून जाते. फेसबुकवर लोक स्त्रीस्वातंत्र्याच्या मोठमोठ्या गप्पा मारतात. स्त्रियांच्या पोस्टवर जाऊन त्यांच्या पुढच्या स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पना बोलतात. पण गावी वाड्यात पाहुणे आले तर घरच्या स्त्रीला एका कटाक्षाने आत जायला भाग पाडत असतात. हे प्रोफेशनल लोक राजकारण म्हणून पुरोगामी बनलेले असतात.

सनातनी विचारांचा अंश प्रगत समाजात सुद्धा शिल्लक राहतो. तो बहुमतात आला किंवा सत्तेत आला कि मग प्रगत म्हणवले जाणारेही काही काळ भरकटतात. जर्मनी, इटलीत नाझीवाद, फॅसिजमच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात "तसे" झाले. नंतर भानावर आले कारण झालेले नुकसान. आता पुन्हा तिथे नाझीजम डोकं वर काढतोय. जगात सर्वत्रच काढतोय. पण काही काळच. प्रगत झालेल्या समूहाला पुन्हा मागे आणून धार्मिक जोखडात अडकवणे सोपे नसते.

बुरसटलेपणा हा अभिमानाने मिरवणार्‍यांबद्दल चिंता यासाठीच आहे कि जर त्याची लाजच वाटणार नसेल तर मग सुधारणेचे रस्तेच खुटले का?

अति अवांतर : माणूस धार्मिक किंवा अधार्मिक, नास्तिक कि आस्तिक यापेक्षा तो सेन्सिबल आहे कि नाही हे महत्वाचे असायला पाहीजे. धार्मिक माणसं सेन्सिबल नसतातच आणि नास्तिक सर्व सेन्सिबल असाही थंब रुल नाही.

Bullseye.

माझ्या साडूंच्या बंगल्यात बेडरूम एवढे मोठे देवघर आहे, त्यात दिवसभर " श्री स्वामी समर्थ " रिपीट मोडवर यंत्रातून जप चालू असतो. रात्री त्याचे नातू त्या आवाजामुळे देवघरात जायला घाबरतात. ते यंत्र बंदही पडत नाही. सगळी स्वामींची कृपा. कदाचित त्याचे नातू मोठे झाल्यावर ते फेकून देतील.

लग्न हळद भजन सत्यनारायण यात लाउडस्पिकर लावायची प्रथा कधी चालू झाली? कोणी आहे का प्राचीन ज्याने त्यापूर्वीचे जग पाहिले आहे?

आरोग्याचे कारण पुढे करत भैय्याजी जोशी यांनी श्री रामजन्मभूमि मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट च्या पालक पदाचा राजिनामा दिला आहे.
https://m.thewire.in/article/religion/senior-rss-leader-bhaiyyaji-joshi-...

या अगोदर " नैतिकते च्या " कारणास्तव ट्रस्टचे महासचिव पदावर असणारे चंपत राय आणि ट्रस्ट सदस्य अनिल मिश्रा यांनी राजिनामे दिले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/ram-mandir-fund-theft-row-temp...

भैय्याजी, राय, मिश्रा तिन्ही नावे संघाशी संबंधीत आहे याची नोंद घ्यायला हवी. सभासदांचे कुठलेही अधिकृत रेकॉर्ड ते ठेवत नसतात.

मंदिराच्या दानपेटी मधले पैसे लंपास करतानाचे CCTV फुटेज नसते तर नैतिकता जागी झाली असती का? कोट्यावधी रुपये जमा होणार्‍या दानपेट्यांमधले पैसे मोजायला बसविलेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी तपासली गेली नव्हती ? एक नाही, दोन नाही... आठ
? कशाच्या आधारावर गैरप्रकार झाला नसल्याचे राय यांनी अगोदर जाहिर केले होते?

देवाण घेवाणी च्या टक्केवारीत काही फसवा फसवी ( अंतर्गत लाथाळ्या ) झाली म्हणून हे प्रकरण बाहेर आले आहे का?

साजिरा, तुम्ही माझी कमेंट वाचली व मला उद्देशुन लिहिले म्हणुन त्या संदर्भात माझे विचार लिहिण्याचे धाडस करतेय.

१. मशिदीतली बांग २०१४ च्या कित्येक दशके आधीपासुन सुरु आहे. ही अल्पसंख्यांकासाठी होती पण बहुसंख्य निमुटपणे ती ऐकत राहिला. कितीही त्रास होत असला तरी ती बंद होणार नाही हे त्याने स्विकारले व गप्प राहिला.

त्याने कधी तोंड उघडलेच तर त्याला तो वर आलेला ’ते वेडे अडाणी बाळ आहे, ते तसेच वागणार. तु शहाणा आहेस ना, तु गप राहा, तु त्याच्यासारखे वेडेचार करु नकोस‘ हा सल्ला दिला गेला. विसाव्या शतकाच्या मध्यापासुन ते आता एकविसाव्या शतकातली २५ वर्षे गेली तरी तो एक समाज आजही अशिक्षित, अडाणी आहे. तो वेडेचार का करतोय हे सुशिक्षिताला समजवायचे पण त्या वेडेचार करणार्‍या बाळाला सुशिक्षित, समजदार करायचे प्रयत्न करायचे नाहीत हे बहुसंख्य निमुटपणे पाहात राहिला.

२. बहुसंख्यांची ही घुसमट ओळखणारे, त्यावर तोडगा द्यायची आशा दाखवणारे आज ना उद्या उदयाला येणार होतेच. ते आले, तोडगे दाखवले आणि सत्तेत आले.

३. ते सत्तेत आल्यावर आता आपले दिवस आले या आनंदात उन्माद सुरु झाला असेल आणि तो दिवसेदिवस वाढत गेला असेल. मी ‘असेल’ म्हणतेय कारण मेट्रोत, तालुक्यात, गावात मी ज्या भागांमध्ये राहिलेय तिथे मला तो रोजच्या आयुष्याचा भाग झालेला दिसला नाही. सगळीकडे असेच असेल असे नाही याची मला कल्पना आहे, तुम्ही म्हणताय, तुम्हाला दिसतोय तर उन्माद आहे याबद्दल मला शंका नाही.

३. आजच्या सरकारने हा उन्माद वाढायला हातभार लावला असेल तर सोबत चांगली कामेही केलेली आहेत. पण टिका करणारे कामांकडे दुर्लक्ष करुन फक्त उन्मादावर टिका करतात. त्यामुळे सरकारच्या प्रेमात असलेले टिकाकारांकडे दुर्लक्ष करतात व उन्माद सुरुच ठेवतात. सार्वजनिक आयुष्यात उन्माद नको हे कोणापर्यंत पोचतच नाहीय. त्या वेड्या बाळापर्यंत हे पोचणे तर शक्यच नाहीय.

२. आणि मुस्लिम अशिक्षित आहेत हा गैरसमज बाळगला की त्यांच्या उन्मादाकडे दुर्लक्ष करता येते. त्या समाजात बाहेरच्या शासकिय शिक्षणासोबत बालपणापासुन धर्मशिक्षण घ्यायचीही सक्ती आहे. त्याच्या धर्मात जसे लिहिलेय तसेच तो समाज वागतो . एकरेषीय धार्मिक बाळकडु अगदी लहानपणापासुन मिळाल्यामुळे कितीही शिक्षण घेतले तरी धर्मविषयक विचार बदलत नाहीत.

याच्याविरुद्ध हिंदुचे आहे. तो जेवढा शिकतो तेवढा धर्मविषयक विचार कचर्‍यात टाकावा की कसे या गोंधळात अडकतो.

३. नक्की काय करावे ह्या गोंधळात बहुसंख्य अडकलेले आहेत. फार थोडे या गोंधळातुन वर येऊन धर्म काय हे समजु शकतात, गरज वाटत नसेल तर त्याचा त्याग करु शकतात. बाकीच्यांनी त्यातल्या त्यात सोपा म्हणजे कर्मकांडाचा मार्ग म्हणजे धर्मपालन असा अर्थ लावुन घेतलाय..

एक कर्मकांड हे आहे की देवाचे नाव सतत कानावर पडायला हवे. ते का कानावर पडायला हवे यामागे जर काही विचार असलाच तर त्याकडे पुर्ण दुर्लक्ष करुन नाव कानावर हवेच ह्या कोणाच्यातरी अट्टाहासामुळे भसाड्या आवाजात तुमच्या कानावर ते नाव दिवसभर आदळतेय. Happy ते बंद करा असे तुम्ही म्हटलेत तर तुम्हाला आजुबाजुच्या दहा हिंदु घरातुन विरोध होईल हे नक्की. त्यांनाही त्रास होत असला तरी उघड असे बोलणे म्हणजे आपण पुरेसे धार्मिक नाही याची कबुली देणे असे वाटते. पिअर प्रेशर. Happy

४. याच्यापेक्षा मोठा त्रास म्हणजे त्यांच्यात धर्मशिक्षण देतात म्हणुन आपणही सुरु करणे. पण त्यांच्यात एकच पुस्तक, त्याचा एकच अर्थ, त्याच्याबाहेर जायची परवानगी नाही. त्यामुळे एकरेषीय धर्मशिक्षण सोपे. आपल्यात हजार पुस्तके आणि त्याचे आपल्याला हवा तो अर्थ लावणारे हजार लोक.

त्यातल्या त्यात कर्मकांड हा धर्माचा ठळक दिसणारा अर्थ. आज तोच धर्म झालेला आहे. पालक मुलांना तोच धर्म शिकवताहेत,
तीच संस्कृती. ती शिकवणारे क्लासेस सुरु झालेत असे ऐकुन आहे. ही संस्कृती घेऊन मुले देशात परदेशात जाताहेत, ही कर्मकांडे पाळुन धर्मपालन केल्याचे समाधान मिळवताहेत.

कित्येक उच्चशिक्षित लोकही आपापल्या घरात कर्मकांडे करतात. ते म्हणतील आम्ही आमच्या आनंदासाठी, आमच्या घरात शांततेत कर्मकांड करतोय, कोणाला त्रास देत नाही. पण उच्च शिक्षित, लोकांच्या नजरेत सक्सेसफुल लोक जेव्हा कर्मकांडे करतात तेव्हा ते बरोबर आहे, आपणही करायला हवे ही प्रेरणा घेऊन स्वतःला योग्य वाटेल त्या रुपात ती करणारे निर्माण होतात. टिळकांनी ज्या गरजेमुळे सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला ती गरज १९४७ साली संपली पण उत्सव संपला नाही, आज तो अक्राळविक्राळ रुप घेऊन सुरु आहे, त्यामुळे पुर्ण सामाजिक व्यवस्थेवर ताण येतोय पण कोण हा विचार करतोय?

५. हे थांबवायचे कसे? काही म्हणतील सामाजिक विचारवंतानी प्रबोधन करायला हवे. पण एकतर बहुसंख्य विचारवंत फक्त एकाच गटाचे प्रबोधन करतात. दुसर्‍या गटाच्या बाबतीत प्रबोधन न करण्यामागे ‘ते अशिक्षित आहेत म्हणुन…’ पासुन ‘आधी आपले घर साफ करायला हवे‘ पर्यण्तचे वेगवेगळे दृष्टिकोन दिसतात. सामान्य लोक ज्यामध्ये उन्मादी लोकही येतात ते हे विचार सातत्याने इतकी वर्षे ऐकुन ऐकुन कंटाळले आहेत. आणि दुसरे म्हणजे विचारवंत नेहमी कठोर शब्दात विचार मांडतात. लोकानुनय त्यांना जमत नाही. त्यामुळेही लोक ऐकत नाहीत. लोकानुनय करत विचार मांडणे राजकारणी नेत्यांना फार चांगला जमते. पण समाजप्रबोधन करणे त्यांना परवडायचे नाही. लोक सर्वसमावेशक विचार करु लागले तर त्यांची चालती गाडी बंद पडायची Happy हे फक्त ठराविक नेत्यांबद्दल नाही तर सगळेच असे आहेत. आजचे सगळे राजकारणी एकसारखेच एकाच माळेचे मणी आहेत हे त्यांनी स्वतःच वेळोवेळी दाखवुन दिलेले आहे.

म्हणुन मी म्हटले की आता जय श्रीराम सहन करा. पुर्ण समाज प्रबोधन फार फार आधीपासुन सुरु व्हायला हवे होते. पण ते झाले नाही. सामाजिक नेते म्हणवणारे नवनवे नेते स्वतःच नैतिकतेच्या एकेक पायर्‍या उतरत गेले. जशी जनता तसे नेते म्हणावे की असे नेते म्हणुन जनता तशी म्हणावे हे कळत नाही अशी स्थिती आज आहे. सार्वजनिक आयुष्यात इतका कोलाहल वाढलाय की आपला आवाजही ऐकु येत नाहीय.

हे सद्यस्थितीबद्दलचे माझे आकलन आहे. ते बरोबर नसेलही, मी पुर्णपणे चुक असेनही. पण तुम्ही संवाद साधलात म्हणुन बोलावेसे वाटले.

धन्यवाद.

>>लोक दानपेटीत पैसे आणि सोनं टाकणं बंद करतील तशी ताबडतोब चोरी थांबेल.
तसं झालं तर येत्या ४-५ वर्षात सगळी मंदीरं १००० वर्षापूर्वी उध्वस्त झालेल्या मंदीरांसारखी दिसतील Happy

लोक देवाला पैसे वहाणे बंद करणार नाही.
मी न्यु यॉर्क च्या गणपतीला न चुकता पैसे वहाते. कारण मला मनःशांती मिळते आणी ती तशीच फॅसिलिटेट होत रहावी या विचारातून व कृतज्ञतेतून ते पैसे आलेले असतात.
माझ्यासारखा विचार अनेक लोक करत असतील.

सामो, अगदी बरोबर लोक हाच विचार करतात. मी श्रद्धेने दानपेटीत पैसे टाकलेत ना? त्याच्यामुळे मला मन:शांती मिळतिये ना? मग झाले. आता दानपेटीच्या पैशाचा दुरुपयोग होत असला तर तो माझ्या नियंत्रणात नाही. दुरुपयोग करणारे त्या कुकर्माची फळे भोगतील. या जन्मात नाही तर पुढचा जन्म आहेच. इथे आंधळा दळतो व कुत्रे पीठ खाते अशी परिस्थिती असली तरी अपराध्याला शासन करण्याची क्षमता माझ्यात नाही. सर्वशक्तीमान परमेश्वरच ते बघून घेईल या भूमिकेतून श्रद्धेला प्रश्न विचारण्याच्य किड्याची वळवळ थांबते. शिवाय श्रद्धेला प्रश्न विचारले कि श्रद्धा ही श्रद्धा रहात नाही हा युक्तिवाद आहेच.

नाही प्रघा. न्यु यॉर्कच्या महवल्लभ गणपती देवस्थानासंदर्भात काही वावगी बातमी ऐकलेली नाही.
तसे काही ऐकू आले तर मी अपात्री दान नाही करणार.
तिथे सुरेख कँटिन आहे. तिथे टिप मात्र नक्की देइन.

या सगळ्या गोष्टींचा अर्थ कसा लावायचा आणि याला जबाबदार कोण?

१. जून २०१९. झारखंड. तबरेज अन्सारी. वय २४. जमावाने चोरीच्या संशयावरून त्याला खांबाला बांधून ठेवलं, सलग काही तास मारहाण केली, जय श्रीराम आणि जय हनुमान या घोषणा द्यायला लावल्या. तो मेला. याचे व्हिडियो आहेत. जमावातल्या काहींना पुढे शिक्षा झाली. पण हे प्रकरण झालं तेव्हा एक तर ते फेक आहे किंवा चांगल्या लोकांबाबत चांगलं होतं (म्हणजे वाईट लोकांबाबत असं वाईट होतं) अशी मल्लिनाथी मायबोलीवरच झाली होती.
२. ऑक्टोबर २०२३. अहमदाबाद. नरेंद्र मोदी स्टेडियम - क्रिकेट वर्ल्ड कप. भारत - पाकिस्तान सामना. एक पाकिस्तानी फलंदाज बाद होऊन परतत असताना प्रेक्षकांतल्या एका वर्गाने त्याला उद्देशून जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. - व्हिडियो आहे
३. मे २०१९. पुण्याचे डॉक्टर अरुण गद्रे काही कामाने दिल्ली मुक्कामी होते. भल्या सकाळी ते फिरायला बाहेर पडले असता कनॉट प्लेस भागात एका टोळक्याने त्यांना अडवून त्यांचा धर्म विचारला आणि जय श्रीराम म्हणायला लावलं.
४. मे २०२६ महुआ मोइत्रा यांची एका विमान प्रवासात काही प्रवाशांनी जय श्रीरामच्या घोषणा देत हुर्यो उडवली. व्हिडियो आहे.
५. गेली काही वर्षे रामनवमी, हनुमान जयंती, महाशिवरात्री अशा प्रसंगी निघणा र्‍या मिरवणुका मशिदी आणि दर्ग्यांस मोर थांबतात आणि तिथे अश्लील घोषणा दिल्या जातात , अंगविक्षेप केले जातात आणि गाणी वाजवली जातात.
६. फेब्रुवारी २०२३ - कोल्हापूर - महाशिवरात्र - एका दर्ग्यावर रॉकेट सोडलं गेलं आणि जय श्रीराम अशा घोषणा दिल्या गेल्या .
हे लोण मुंबईतही पोचलं आहे. मुंबईत अशा कथित धार्मिक मिरवणुकांत - जब मुल्ले काटे जाएंगे, राम राम चिल्लाएंगे अशा घोषणा दिल्या गेल्या.
हिंदुत्व पॉप म्युझिक मधल्या काही गाण्यांत धार्मिक द्वेष ओसंडून वाहत असतो.

या काहीच घटना झाल्या. प्रत्यक्षात याच्या शेकडो पट होतात.
या प्रकरणांमध्ये जय श्रीराम हा धार्मिक , भक्तिभावाने केलेला घोष आहे की एकमेकांनी हॅलो - गुड मॉर्निंग सारखं ग्रीट केलं आहे?

A new discussion has emerged on social media regarding the installation of speakers in some Indian cities to play Hanuman Chalisa early in the morning. Reports and viral posts claim that the practice has started from Pratapgarh and may expand to other locations in the future. The idea has attracted attention because it connects religion, public spaces, cultural traditions, and community practices.

साधना, आपली ओळख आहे, भेटलो आहोत, म्हणून सहज अरे जारे करू शकतो असं वाटलं, सॉरी.

तुम्ही इतक्या मोठ्या प्रतिसादाऐवजी 'जय श्रीराम सहन करा' एवढंच एक वाक्य लिहिलं असतं तरी चाललं असतं. तुमच्या लिहिण्यात उन्माद दिसत नसला तरी तुमच्या या वाक्याचं फॉर्वर्ड इंटेग्रेशन हे उन्मादाकडेच बोट दाखवतं.

तुम्हाला दिसत नसला तरी तुमच्यासारखा विचार न करणार्‍या, न करु शकणार्‍यांना एक पॅटर्न दिसतो.

वर भरतनी लिहिलेली अख्खी पोस्ट कोट करतो. कर्मकांड नि धर्मपालन घरात नि शांततेत करणार्‍यांना कोण आक्षेप घेणार? रस्त्यावर जाहीररीत्या कुणाला तरी नमवण्यासाठी आणि उन्मादाची, आऊटरेजची भूक भागवण्यासाठी 'जय श्रीराम' वापरलं जातं, ते निखळ आनंदासाठी आहे की विश्वशांतीसाठी? 'जय श्रीराम'चे आयाम आणि अर्थ बदलले असं तुम्ही लिहिलं, पण ते तुमच्या सोयीसाठी, आणि वेगळ्या अर्थाने. खरंतर 'जय श्रीराम' हे एकेकाळी ऐकायला गोड वाटणारं, भक्तीमार्गात तल्लीन होऊन शांत झालेल्याचं लक्षण होतं. आता ते सार्वजनिकरीत्या 'जय श्रीराम' हे निव्वळ क्रौर्य, दमन, दहशत आणि केऑस करण्याची भूक भागवण्याचं साधन झालं आहे.

समाजप्रबोधन फार आधीपासून व्हायला हवं होतं म्हणजे काय? २०१४ पासून अचानक सुरू झालं की काय? या जय श्रीरामवाल्या गुंडांचं रस्त्यावरचं रूप तुम्ही पाहिलं आहे कधी स्वतः? त्यांचं प्रबोधन कसं करणार?

सरकारने चांगलीही कामं केली- (रियली? आता यावर अनेक बाफ आहेत, पुन्हा तेच इथं नको) म्हणजे काय? त्यासाठीच सरकार असतं ना? मी तर म्हणेन- मी त्यांनी चांगलं काम केल्याची स्तुती आणि आरत्या ओवाळण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यांनी थोडी जरी चूक केली तरी त्याकडे बोट दाखवण्यात मी संपूर्ण वेळ घालवावा. राक्षसी बहुमतातलं सरकार- ही भयानक गोष्ट असते, मग ते कुणाचंही असो- हे आताच नाही, यापुर्वीही आपण अनुभवलं आहे. अशा पॉवरला क्रिटिसाईझ करायला नको? त्यांच्यावर चेक ठेवायला नको? त्यांनी हजार चांगली कामं केली, आणि फक्त धार्मिक उन्माद वाढवला, तरी फक्त या एकाच मुद्द्यावर मला नको असं सरकार. बाकी कामांकडे सपशेल दुर्लक्ष करून एवढ्या एकाच मुद्द्यावरून मी त्या सरकारला क्रिटिसाईझ करणार. याचं दुसरं एक कारण असंही आहे, की अशा सरकारांचे भाट नि स्तुतीपाठक (लाभार्थी होण्याच्या आशेने- हे एकेकाळी होतं. आता तेही बदललं. पेट्रोल १००० रुपये झालं तरी चालेल, पण..) प्रचंड संख्येने असतात. क्रिटिसाईझ करणारे फार कमी.

विचारवंत काही करू शकणार नाहीत, राजकारण्यांकडून अपेक्षा करू नका- हे कशातून आलं हे कळत नाहीत. राजकारण्यांकडून फक्त त्यांना आणि आपल्याला सोयीस्कर ठरणार्‍या पोलॅरायझेशन आणि धार्मिक राजकारणाचीच अपेक्षा करा- हा मला जाणवलेला छुपा अर्थ. आता तर आजुबाजूला तेच दिसतंय. राजकारण्यांकडून काही अपेक्षा करू नका, हे समजा सरकार बदललं तर इथं लिहिणार का? या सरकारबद्दल तुमच्या सगळ्याच पोस्ट्समध्ये स्तुती, सहमती, कौतुक, बाजू घेऊन प्रतिवाद करणे हे दिसतं. काहीच अपेक्षा नाहीत, पूर्ण झाल्या नाहीत म्हणून तुम्ही हे करता का??

अजून एक महत्वाचा मुद्दा. (हा या बाफाशी फारसा संबंधित नाही, पण तरी-) 'सप्लाईंग ओपिनियन्स' ही गोष्ट हे सरकार फार स्मार्टली करतं आहे. याबद्दल तरी कौतुक केलंच पाहिजे. हजारो कोटी खर्चून, जाहिराती करून, इमेजेस बनवून, रेटून खोटं बोलून, आभासी चित्रं दाखवून; अभ्यास आणि विचार करून मत बनवण्याची फारशी ऊर्जा, वेळ, ऐपत नसलेल्या सामान्य जनतेला रेडीमेड ओपिनियन्स बनवून देण्याचा हलकटपणा या सरकारने गेली १२ वर्षं अव्याहत चालवला आहे. माझ्या आयुष्यात इतकं भयानक ब्रँडिंग आणि जाहिरातबाजी मी पाहिली नव्हती. युपी, उत्तराखंड, आसाम सरकारच्या पानभरून जाहिराती, त्याही एक दिवसाआड, इथं महाराष्ट्रात काय करत आहेत? हे आजवर पाहिलं नव्हतं. हे कुठचं राक्षसी ब्रँडिंग? दक्षिणेकडच्या एखाद्या राज्याची अशी भव्य जाहिरात कधी बघायला मिळेल मला?
--
कुठचाही मुद्दा तुम्ही लोक चटकन 'त्यांचं' नि 'आपलं' यावर आणून ठेवता. अडाणीपणा, उन्माद, गुंडगिरी या गोष्टी कुणाच्याही खाजगी मालमत्ता नसतात. एकाने शेण खाल्लं म्हणून दुसरा खातो- हे समजायला अवघड आहे का? याचं समर्थन करणार्‍यांची कीव येणं हे खरं तर नैसर्गिक असलं पाहिजे. फार बेसिक अपेक्षा नाहीत का या?
--
राजकारण्यांनी आणि सिनेम्यांनी गेल्या काही वर्षांत केलेलं रामाचं रौद्र रूप हे माझ्यासाठी नवीन आहे. त्याची भलावण करणारे माझ्या आजुबाजूला बहुसंख्येने का आहेत- हे कोडं मला उलगडत नाही. रामाच्या आडून हा कसला स्वार्थ चाललेला आहे? माझं अख्खं बाळपण समृद्ध करून टाकणार्‍या, रामाची हसरी साजरी मुर्ती असलेल्या, सुंदर लाकडी सभामंडप असलेल्या वाड्यासारखी रचना असलेल्या आणि डोक्यावर वाचनालय असलेल्या प्रसन्न सुवासिक मंदिरात वावरण्याच्या, त्यासमोरचा पिंपळ आणि दगडी ओट्यावर खेळण्याच्या आठवणी या आयुष्यातल्या सर्वात ठळक, महत्वाच्या आणि उजळ आठवणी होऊन बसल्या आहेत.

साजिरा फॉर्म मध्ये आहेत सध्या..

गेल्या काही काळात सेक्युलर हा शब्द एखाद्या शिवीसारखा का वापरला जातो समजत नाही.

माझे इंग्लिश कच्चे असल्याने मी गुगल करता सुद्धा मला त्याचा अर्थ not concerned with religion
धर्म से संबंधित नहीं लौकिक धर्मनिरपेक्ष - असाच सापडला.
चांगलाच आहे. असेच असायला हवे.
मग हा शब्द एखाद्याला हिणवल्यासारखा का वापरला जातो?

याला जबाबदार आपल्या फायद्यासाठी सिलेक्टीव सेक्युलरिझम दाखवणारे राजकीय पक्ष असावेत का? असतीलही..
पण सामान्य माणसांनी सेक्युलर असल्याचा अभिमान बाळगायला हवा.

माझं अख्खं बाळपण समृद्ध करून टाकणार्‍या, रामाची हसरी साजरी मुर्ती असलेल्या, सुंदर लाकडी सभामंडप असलेल्या वाड्यासारखी रचना असलेल्या आणि डोक्यावर वाचनालय असलेल्या प्रसन्न सुवासिक मंदिरात वावरण्याच्या, त्यासमोरचा पिंपळ आणि दगडी ओट्यावर खेळण्याच्या आठवणी या आयुष्यातल्या सर्वात ठळक, महत्वाच्या आणि उजळ आठवणी होऊन बसल्या आहेत. >>>>

मलाही गिरगांवातल्या काळाराम मंदिरातील रामनवमी अजून जशीच्या तशी आठवते. आईबरोबर कठड्याच्या अलीकडे बसून सगळं वातावरण literally absorb करणं, तो पाळणा खाली घेणं, ते रामजन्माचं कीर्तन, तिखट तिखट सुंठवडा खाता येत नाही म्हणून इतकुसाच खाणं.

माझ्यासाठी राम अजून तसाच आहे. तो रावणवधासाठी मनुष्यगुण सांभाळूनच वावरला तरी माझ्यासाठी (आणि अनेकांसाठी) तो परमात्माच आहे. त्याचा कुठलाही जप किंवा गजर मी कुणाविरुद्ध म्हणून वापरणार नाही. त्याचे अवतारकार्य योध्याचेच होते. पण म्हणून त्याचे योद्धापण मी भलत्या ठिकाणी वापरणार नाही. तो माझ्यासाठी शस्त्र नसून पाठीराखा आहे. मी कोण त्याचे नाव शस्त्र म्हणून वापरणार? मी जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम किंवा नुसतं 'राम' जप हा रामाचाच म्हणून करेन. त्यात कुणाच्याही विरुद्ध असा भाव कधीच नसेल. आणि शुद्ध भावाने रामाचे नाव कुठल्याही प्रकारे घेण्यास मला कोण रोखू शकेल?

माझ्यासाठी माणसाची खरी किंमत माणूस म्हणूनच आहे. तुम्ही कुठला धर्म follow करता, तुम्ही किती धार्मिक आहात ह्याचा माणूस असण्याशी संबंध नाही. तुम्ही निधर्मी असा किंवा कुठल्याही धर्माचे, माणूस म्हणून कसे आहात हे जास्त महत्वाचे. मी जो धर्म पाळते ती माझी वैयक्तिक बाब आहे. माझा धर्म कुणाला धर्मावरून कमी लेखत नाही. माझ्या धर्मात कुणाला स्वर्गप्राप्ती करण्यासाठी धर्माचे आमंत्रण दिले जात नाही कारण हेच ठाम माहित आहे की हे सगळे कुणा एका धर्माची मक्तेदारी नसून तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ह्यावर तुमची आध्यात्मिक प्रगती ठरेल. धर्म आणि अध्यात्म ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. खरंतर आध्यात्मिक प्रगतीपेक्षा मी अधिकाधिक चांगलं बनायचा प्रयास करणं ही step देखिल खुद्द रामाला आनंद देणारी असेल.

पण.... गेली अनेक वर्षे (२०१४ च्याही बरेच आधीपासून) काहीतरी बदलतंय.... साधना म्हणाली तशी एक घुसमट वातावरणात जाणवू लागली होती. ती प्रत्यक्ष धर्मापेक्षाही धर्माच्या social impact मुळे हे ही समजत होते. व्यक्तिशः मी स्वतःची अशी घुसमट होवू दिली नाही कारण मी त्या पलीकडे बघत होते. माझा माणूसपणावर ठाम विश्वास होता. Thanks to my aajoba and my parents. कुठल्याही धर्माच्या radical form ची मला नैसर्गिक रित्या चीड आहे.

आज आमच्या घरात आमची मुस्लिम सून (पुतण्याची बायको) अत्यंत सुखात नांदतेय. दोन्ही घरं एकमेकांचे नातेवाईक म्हणून प्रेमाने, आदराने वागतात. आणि हे पूर्ण मनापासून. आमचे ते व्याही 'माणूस' ह्या त्यांच्या ओळखीमुळेच आमच्यात मिसळले गेलेत. त्यांच्या किंवा आमच्या धर्माची कुठेच कुणाला अडचण होत नाही.... ना कुणी एकमेकांच्या धर्माचा उल्लेख करुन तो angle देतंय. ह्या बाबतीत नशीबवान ठरलो. Actually त्या गोड मुलीच्या धर्माचा इथे उल्लेखही मला नको वाटतोय कारण ती identity कुठेच जाणवत नाहीये. ना आमची तिला ना तिची आम्हाला. It's two way.

आम्ही कुठलाही 'secular पणा' 'दाखवायला' गेलो नाही की कुठलाही selective secularism चा अडोसा घेतला नाही. कुठलाही मुस्लिम security forces वाला एखाद्या encounter मध्ये मारला गेला तर मला तितकंच दुःख होतं जितकं एखादा हिंदू security forces वाला मारला जातो. माझ्या तितकंच डोळ्यात पाणी येतं कारण तो माझ्या देशासाठी स्वतःचे कुटुंब मागे सोडून गेलेला असतो.

खरा सनातन धर्म कायम राहणार. त्याच्यात reforms allowed आहेत. चुकांना दुरुस्त करणं allowed आहे. एखाद्या मुळच्या सुंदर पाषाणावर विविध बाह्य गोष्टींमुळे पुटे चढतात आणि तो खराब आहे असे वाटू लागते. पण त्याच पाषाणाचे मूळ रूप (किंवा अधिक सुंदर रूप) कधी दिसते? तर जेव्हा पाषाणावरचा अनावश्यक भाग, खराब भाग छिन्नी हातोडा वापरून दूर केला जातो तेव्हा. हे काम बऱ्याच सुधारकांनी केलं आहे. त्यांनी तो पाषाण scrap नाही केला.

नुसते त्या अख्ख्या पाषाणाला टाकावू ठरवून काय होणार? त्याच्या मूळ रुपालाच दुषणे देवून काय होणार?

I am sorry.... सारखे Typo दुरुस्त करतेय. बऱ्याच बऱ्याच काळाने मोठी पोस्ट लिहितेय आणि ती ही मोबाईलवरून. सवय राहिली नाही Happy

साजिरा, पोस्ट्स आवडल्या.

>>गेल्या काही काळात सेक्युलर हा शब्द एखाद्या शिवीसारखा का वापरला जातो समजत नाही.>>
त्या पुढली गंमत परदेशात चालते. देशी लोकांमधे सेक्युलर हा शब्द शिवी सारखा वापरायचा, आपली शाहू महाराज, फुले-आंबेडकरांची परंपरा म्हटले की भुवया उंचावायच्या, वर इथल्या स्थानिकांमध्ये हिंदू धर्म कसा सहिष्णू म्हणून मिरवायचे, त्यांनी कास्ट सिस्टिम बद्दल विचारले की ब्रिटिशांवर सगळा दोष टाकत हात झटकायचे.

नुसते त्या अख्ख्या पाषाणाला टाकावू ठरवून काय होणार? >>> हा तर सरळसरळ मुर्खपणा आहे केश्वे. असं कोण करतंय इथं?

त्याच्यात reforms allowed आहेत. >>> allowed 'पाहिजेत' हे बरोबर आहे. आजुबाजुच्या वातावरणात तर एक्झॅक्टली विरुद्ध दिसतं आहे!

२०१४ च्याही आधीपासून तुम्हा लोकांना नक्की कसली घुसमट जाणवत होती ते जरा नीट लिही. असं मोघम नको. ते तू लिहिल्यानंतर आपण चर्चा करुया, की त्या सो-कॉल्ड घुसमटीवर उन्माद आणि गुंडगिरी हे उत्तर आहे का- त्याची.

गेल्या काही काळात सेक्युलर हा शब्द एखाद्या शिवीसारखा का वापरला जातो समजत नाही.>> स्वातीताई, तसाच हल्ली सनातनी (म्हणजेच हिंदू) हा शब्दही शिवीसारखाच वापरला जातो. दोन्ही शब्द शिवीसारखे का वापरावेत? सगळ्यांच्या मागे गुण doshanni युक्त माणूसच असतो ना? का दोन्ही बाजू स्वतःला परिपूर्ण मानतात व तारणहार असल्याच्या आवेशात असतात?

अश्विनीके, तुमच्या घरात वेगळ्या धर्माची सून आनंदात नांदत आहे हे छानच.
आमच्या दुरच्या नात्यातील मंडळींना मुलीचे परधर्मात लग्न- त्या मुलीशी संबंध तोडायला तयार नाहीत म्हणून ते शहरच सोडायला लागले होते. त्या शहरातल्या सर्वांशी सुरक्षिततेसाठी संपर्क तोडून, आर्थिक झळ सोसून पुन्हा नव्याने दुसरीकडे सुरुवात करावी लागली.

> हल्ली सनातनी (म्हणजेच हिंदू) हा शब्दही शिवीसारखाच वापरला जातो
हे खोटे आहे.
कुणाला कशामुळे घुसमट वाटते हेही पहाणे उद्बोधक आहे, रामासारखा दिलदार देव जो निषादाशी व शबरीशीही प्रेमाने वागतो, त्याचा वापर आज 'उसकी माँ का भोसडा' सारखी गाणी गाणे, दाढीवाल्याला पकडून 'जय श्रीराम' बोलायला लावणे, 'भारत का बच्चा बच्चा , जय श्री राम कहेगा' सारखी गाणी अगदी परदेशातही गाणे, रामनवमीला मशीदीसमोर मुजरा करणे अशा विकृत कामासाठी वापरला जातो हे पाहून माझी घुसमट होते.

'हनुमान जयंती' म्हणजे चाळीत वर्गणी, गव्हाची खीर, टरबुज, 'अंजनीच्या सूता' सारखी गाणी अशा सुखद आठवणी असताना आज angry हनुमानाचा झेंडा बाईकवर लावून छपरीगिरी करणे हे पहून माझी घुसमट होते.

Pages