१९८० पासून राम मंदिर प्रश्न आपल्या सर्वांच्याच कानावर सतत पडत असतो. राम मंदिर विषय निघाल्यावर संबंधित घटनाक्रम ( १९८६ कुलूप उघडणे, रथयात्रा, दंगली, ढाचा पाडणे, अनेक दंगली, रक्तपांत, मंदिराचे निर्माण कार्य, भूमीपूजन, जोशांत उद्घाटन) माझ्या डोळ्यासमोर येतो. मंदिर निर्माण होण्याच्या अगोदरच्या काळांत, अनेक दशके, देणग्या गोळा करण्याचे काम सातत्याने सुरु होते, आणि पुढेही ते सुरुच रहाणार आहे.
आज वर्षाला ५ कोटी ते २० कोटी लोक भेटी देत आहेत. प्रत्येक भक्त आपल्या आर्थिक कुवती नुसार मंदिराच्या दानपेटीत भक्तीभावाने, श्रद्धेने आणि मुख्य म्हणजे विश्वासाने पैसे दान करत असतो. या पैशांचा विनीयोग मंदिराशी संबंधीत कामासाठीच होत असतो अशी श्रद्धा असते, भरवसा असतो. रामाच्या नावाने गोळा होत असलेल्या दानपेटी वर व्यक्त झालेला हा फार मोठा विश्वास आहे.
राममंदिर दानपेटी मधे होत असलेल्या गैर व्यावहारा संबंधीच्या बातम्यांनी माझे लक्ष वेधले गेले. या आधी सोने आणि चांदीच्या विटांबद्दल बातमी आली होती. दानपेटीमधे जमा होत असलेल्या पैशांपैकी ( रोख पैसा, सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर, माणिक, मोती) काही भाग मंदिर कर्मचार्यांच्या खासगी खिशांत जात असेल तर हा कोट्यावधी राम भक्तांचा फार मोठा विश्वासघांत आहे.
या संबंधांत आठ लोकांवर FIR दाखल करण्यांत आला आहे. सुरवातीला ट्रस्टच्या लोकांनी आर्थिक गैरव्यावहार झाल्याचे नकारले होते. पण अखिलेश यादव यांच्या ट्विट ने लक्ष देण्यास भाग पाडले.
https://x.com/yadavakhilesh/status/2063567792733831463
FIR मधे नावे असणारे आरोपी - अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, रामशंकर मिश्रा, रमाशंकर यादव, मनीष यादव, सुभाषचंद्र श्रीवास्तव आणि करुणेश पांडे. पैकी सहा आरोपी मंदिरातील कर्मचारी असून ते रोख रक्कम मोजण्याचे काम करायचे.
पैसे अपहाराचे फुटेज CCTV मधे कैद झाले आहे. या प्रकरणाची माहिती असलेली अनेक लोक भितीपोटी बोलत नाही. कधी पासून हे अपहार प्रकरण सुरु होते ? एकंदर किती कोटी रुपये हडप झाले ? हा पैसा कुठे गेला ? या प्रश्नांची उत्तरे यथावकाश मिळतील आणि खर्या दोषींना कायद्यानुसार कडक शिक्षा मिळेल अशी अपेक्षा. पण दानपेट्या भक्त लोकांचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करतील का ?
गेले काही आठवडे अपहार संबंधित बातम्यांनी मला अस्वस्थ केले आहे. या विषयावर आपली मते जाणून घ्यायला आवडेल.
आजच नेहा बोराच्या डोक्यावर
आजच नेहा बोराच्या डोक्यावर शाई ओतली. शाई ओतताना त्या इसमाने जय श्रीराम अशी घोषणा दिली.
आता यावर whataboutry म्हणून stsj येईल.
आता विषयांतर झाले आहे म्हणून
आता विषयांतर झाले आहे म्हणून प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.. २००९ मध्ये केद्रांत क्रॉंग्रेस पुन्हा येईल हे त्यांनासुद्धा वाटले नव्हते पण आले कारण विरोधी पक्षाकडे तसा मुद्दा/ संकल्प नव्हतात, मी स्वतः कॉंग्रेसला २००४ आणि २००९ मध्ये मतदान केले होते.. गेल्या केंद्रिय निवडणूकीत तेच दिसून आले आहे, माझ्यासारखे खूप लोक असतील ज्यांना सद्य सरकारामध्ये काही दोष दिसून येत असतील पण त्यांना चांगला विरोधी पक्ष मिळत नाही.. विरोधांकडे थोड़ी नाहीतर तब्बल १२ वर्षे होती पण त्यांनी थोडीपण धोरणात्मक सर्वपातळीवर प्रगती केली नाही.. सगळीकडे दुटप्पीपणा, घराणेशाही हि तर त्यांची कारणे नाहीत का? भाजपापण आता ढासळत आहे पण कॉंग्रेस वरचढ झाली तरच सत्ता मिळेल नाहीतर विरोधी पदपण धोक्यात आहे..
एकदा जावेद अख्तरनी मुलाखतीत अटलजीना विचारले कि भाजपची सत्ता आलीतर भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहिल का? कारण जीनांना पाकिस्तान धर्मनिरपेक्ष पाहिजे होता पण तो झाला नाही. अटलजी बोलले, भारत हा कोणत्याही राजकीय पक्षामुळे, घटनेमुळे किंवा त्यांचामुळे धर्मनिरपेक्ष नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, कारण या देशातील बहुसंख्य जनता ही हिंदू आहे.
केंद्र आणि भाजप शासित राज्यकर्तेनी नेहमीच सगळ्यांसाठी सरकारी योजनांची अमंळबजावणी केली आहे.
आता काही ठिकाणी काही लोकांकडून अतिरेक होत असेल पण त्यात लोकांची चूक आहे, सरकारची नाही. काही असतात बिनडोकाचे. नेहमी तुम्ही सरकारला जबाबदार ठरवू शकत नाही.
के आया मौसम गोल गोल पोस्ट
के आया मौसम गोल गोल पोस्ट लिखने का
---
साजिरा, मुजरा स्वीकारावा.
मशीदीवर चढून तिथे असलेला
मशीदीवर चढून तिथे असलेला हिरवा झेंडा काढायचा, नारे द्यायचे आणि भगवा लावायचा असे पण प्रकार बघायला मिळतात. आजकाल अशा घटना वाढत आहेत. या विखारी मनोवृत्तीला जेव्हा स्टेट प्रोटेक्शन मिळते तेव्हा अराजकतेला आमंत्रण देत आहोत असे वाटते.
राम नवमी साजरी करायची ही नवीन पद्धत आहे. यांना धार्मिक म्हणायचे का?
https://www.indiatoday.in/india/story/men-saffron-flags-waved-hoisted-da...
एक्झॅक्टली विकु, हेच लिहिणार
एक्झॅक्टली विकु, हेच लिहिणार होतो.
केश्वे, आधीच्या घुसमटीवर उत्तर, सोल्युशन इलाज काय मिळाला तुला, हे प्लीज लिही. तुझ्या पोश्टीवरून मला कळलं ते हे की तुला आणि मला आता एकच राम आठवतो आहे. तर आता रामाचा 'शस्त्र' म्हणून उपयोग केल्या जाण्याच्या सध्याच्या काळात तुझी घुसमट होते आहे, हे वाक्य त्या पोस्टमध्ये राहिलं. ते लिहिलंस की मी सुडोमि.
असं कोण करतंय इथं? >>> जवळजवळ
असं कोण करतंय इथं? >>> जवळजवळ अख्ख्या सोमि वर दिसेल तुला सनातनला घाऊकपणे टाकाऊ ठरवताना. कदाचित कुठल्यातरी ओघात करत असतील.
आजुबाजुच्या वातावरणात तर एक्झॅक्टली विरुद्ध दिसतं आहे! >>; कुठलाही समाज १००% चूक किंवा बरोबर नसतो ना? व्यक्ती तितक्या प्रकृती हे सगळ्या बाबतीत लागू होते. ४ चुकीच्या (अगदी २० धर) असतील तर त्या पकडून १०० /१०० समाज तसाच आहे असं होत नाही ना? Maximum समाज तसा नाही म्हणून भारत हा भारत आहे.
सांगायला वाईट वाटतंय.... एका उच्चशिक्षित व्यक्तीने मला तोंडावर सांगितलं होतं की थोड्याच काळात अख्ख्या भारताला Monotheism accept करावाच लागेल. मला अर्थच कळला नव्हता. मी म्हटलं की आम्हाला Monotheism via polytheism हा route माहित आहेच की! शेवटी 'तो' एकच आहे हे आम्हाला आधीपासून माहित आहेच की. आम्हाला एवढंही माहित आहे की तुमचा अल्लाह आणि आमचा परमेश्वर एकच आहे. तुमचं आमचं सगळं नामस्मरण शेवटी एकाच ठिकाणी जातं. त्यावर हाताशपणे उत्तर मिळालं की "I failed to convince you". मी विचारलं.... कशाबद्दल? उत्तर होतं... About Islam, the truth.
- ह्यातलं एक अक्षरही खोटं नाही. मी आवाक झाले होते.
आता साजिऱ्या मला सांग.... मी हे बऱ्याच शांतपणे घेतलं. माझ्या 'सबका मालिक एक' ह्या ठाम विश्वासामुळे मी ते घेवू शकले. पण हे सगळेच शांतपणे घेतील असं नाही ना? व्यक्ती तितक्या प्रकृती असतातच. प्रत्येकाची सहनशक्ती वेगळी असणारच. आणि त्या व्यक्तीने असं म्हटलं म्हणून मी 'योगायोगाने' तो धर्म असलेल्या पण 'माणूस' ही मुख्य identity असलेल्या मुस्लिमांना कधीच दोष देणार नाही. तसेच, गोमांसावरून कुणाची हत्या करणाऱ्यामुळे मी असंख्य चांगल्या माणसांना त्याच पारड्यात तोलणार नाही.
कुठल्याही धर्माचे असा रे.... ह्या जगात आपल्याला पाठवणाऱ्याने कुठलाही stamp मारून पाठवले नाही. माणूस म्हणून तर नक्की पाठवले आहे. नका कुणाला धर्माच्या जोरावर (silently or openly) dominate करायला जाऊ. रस्त्यावर बसून नियमित नमाज पढणे हा आमचा हक्क आहे असे म्हणणारे आहेत तसेच ५ वेळा आजान मुळे आजूबाजूच्या हॉस्पिटल्सना, एकूणच public ला त्रास होतो ह्याचे वाईट वाटणारेही मुस्लिम बघितले आहेत.
एक चांगलं आहे की आपल्याकडे उत्सवानिमित्त अती करण्या विरुद्ध बोलणारेही खूप आहेत. मी त्यातच आहे.
कुठलाही धर्म हा मार्गदर्शक ठरू दे..... अफूची गोळी नको.
कुणाला कशामुळे घुसमट वाटते
कुणाला कशामुळे घुसमट वाटते हेही पहाणे उद्बोधक आहे, रामासारखा दिलदार देव जो निषादाशी व शबरीशीही प्रेमाने वागतो, त्याचा वापर आज 'उसकी माँ का भोसडा' सारखी गाणी गाणे, दाढीवाल्याला पकडून 'जय श्रीराम' बोलायला लावणे, 'भारत का बच्चा बच्चा , जय श्री राम कहेगा' सारखी गाणी अगदी परदेशातही गाणे, रामनवमीला मशीदीसमोर मुजरा करणे अशा विकृत कामासाठी वापरला जातो हे पाहून माझी घुसमट होते.
'हनुमान जयंती' म्हणजे चाळीत वर्गणी, गव्हाची खीर, टरबुज, 'अंजनीच्या सूता' सारखी गाणी अशा सुखद आठवणी असताना आज angry हनुमानाचा झेंडा बाईकवर लावून छपरीगिरी करणे हे पहून माझी घुसमट होते. >>>> माझी पण होते. नाही आवडत हे उत्सवांचे बदललेले रूप. Rather हा उत्सव नाहीच.
<< भारत हा धर्मनिरपेक्ष देश
<< भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, कारण या देशातील बहुसंख्य जनता ही हिंदू आहे. >>
------- भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि याचे सर्व श्रेय शांतताप्रेमी हिंदूंना द्यायला हवे.
हिंदूत्ववाद्यांना नाही. शांतताप्रेमी हिंदू आणि हिंतूत्ववादी हे दोन टोकाचे भिन्न विचार आहेत.
हिंदूत्ववादी हे मुस्लीम ( ख्रिश्वन, दलित... ) द्वेषी आहेत. मशीदीवर जबरदस्तीने झेंडा फडकावणारे हिंदू नाहीत.
साजिरा उत्तम पोस्ट्स्.
साजिरा उत्तम पोस्ट्स्.
रिफॉर्म्स अलाऊड आहे असे आपण म्हणतो पण जेव्हा जेव्हा होत गेले त्याला कडाडून विरोध झाला. इंग्रज आले तेव्हा सुरवातीला काहींना ती सामाजिक / धार्मिक सुधारणेची पर्वणी वाटली आणि सुधारणा सुरू झाल्या आणि त्यांना विरोध झाला. (अवल यांनी याबद्दल एक लेखमाला सुरू केली होती अशा सुधारकांविषयी.) पण बऱ्याच लोकांनी त्याला दाद दिली आणि हळुहळु सुधारणा होत गेल्या. काही कट्टर धार्मिक मंडळींना मात्र ते रुचले नाही. पण लोंढ्यामुळे तेही पुढे आले, यावे लागले.
मुस्लिम समाजात असे सुधारक झाले नाहीत. आपल्यातल्या सुधारणा आपल्याच लोकांनी केल्या, दुसऱ्या धर्मातील लोकांनी येऊन करण्याचा प्रयत्न केला असता तर नसत्या झाल्या. तेव्हा आपल्या धर्मात सुधारणा करणाऱ्या आपल्या लोकांना त्यांच्यात तुम्ही सुधारणा करा म्हणणे चुकीचे आहे. हा मुद्दा मायबोलीवर आधीच काहींनी मांडला आहे काही वेळा. ज्यांना आपल्या सुधारणा रुचल्या नाहीत त्यांना फक्त आपण सुधारयचं का त्यांनी का नाही असे म्हणण्यास संधी मिळाली आणि त्यांनी आपल्यावर अन्याय होतो आहे अशी भावना तेव्हा पासून रुजवत ठेवली आणि पुढे येणाऱ्या सुधारणांना विरोध सुरू ठेवला. त्याचा हा परिणाम आहे की खूप लोकांमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना रुजली आहे.
बरोबर. हिंदू विवाह कायद्याचं
बरोबर. हिंदू विवाह कायद्याचं स्वत:ला सनातनी म्हणवणाऱ्या सगळ्यांनी उत्स्फूर्त स्वागतच केलं होतं.
फक्त काहींना वाटत होतं की हा कायदा हिंदू पुरुषांसाठी अन्यायकारक आहे.
अश्विनी,
अश्विनी,
आमचा 'सनातन हिंदू धर्म' हे इतक्या गुर्मीत ऐकवले जाते, जशी काही मी हिंदू नाहीच आहे. मी अमेरीकेत दोन पिढ्या संस्कारांच्या आणि फिअर माँगरिंगच्या नावाखाली अंधभक्त होताना बघितल्या. आम्हाला लेकासाठी सर्व प्रकारे संपर्क केला गेला. यात तुमच्या मुलाचे नेतृत्व गुण पासून ते तो उद्या कॅथलिक झाला तर वगैरे बरेच काही होते. आमच्या मुलावर काय संस्कार करायचे ते आम्ही करु, विठूराया आहे ना संभाळायला म्हटले की नाराज होत. आता आईबाप लेकरावर संस्कार करतील न करतील वाटणे समजू शकते पण आस्तिक आहात म्हणताना विठूरायावरही भरवसा नाही म्हणजे ..... अगदी तो युनिवर्सिटीत गेल्यावरही आमचे युनिट सुरु कर टीमसाठी आमच्या कंपनीत आर्थिक मदतीसाठी शब्द टाकेन वगैरेही झाले.
साजिऱ्या, माझ्या वरच्या
साजिऱ्या, माझ्या वरच्या पोस्ट्स वाच आणि सुडोमि.
I am sure.... खरा सनातनी असाच असावा.
खरा सनातन कधीच कुणी नष्ट करू शकणार नाही. खूप प्रयत्न झाले आजवर.
धर्माच्या नावावर केले जाणारे वेडे चाळे मात्र पाषाणावरच्या मळाप्रमाणे छिन्नीचे आवश्यकतेनुसार हलके किंवा जोरदार घाव घालून जरूर बंद करावेत. आताच्या काळात 'कायदा' ही effective छिन्नी असावी.
मानव +१. सुधारणा करणार्या
मानव +१. सुधारणा करणार्या प्रत्येकाला त्रास झालेला आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, आंबेडकर, फुले, कर्वे, इंग्रज, रॉय, सानेगुरुजी... सनातन धर्माने कुणाचे स्वागत केलेले नाही. कालांतराने बहुसंख्य लोकांनी पाठिंबा दिल्याने सनातन्यांचे न चालल्याने सुधारणा कराव्या लागल्या.
सनातन शब्दाचा अर्थ बुसरटलेला ऑर्थोडॉक्स असाच आहे ना? त्याहुन वेळा काही अर्थ आहे का? सनातन हिंदू धर्म म्हणजे कर्मकांडांत बुडालेला हिंदू धर्म शिवाय काय अर्थ आहे?
रिफॉर्म्स अलाऊड आहे असे आपण
रिफॉर्म्स अलाऊड आहे असे आपण म्हणतो पण जेव्हा जेव्हा होत गेले त्याला कडाडून विरोध झाला. >>> मानवदादा, प्रत्येक reform मध्ये घुसळण तर होणारच. There will be always a resistance to change. कुठले reforms swiftly झालेत? पण हे allowed आहे. कुणी त्यामुळे सनातन धर्मातून हाकलत नाही. धार्मिक असलेच पाहिजे अशीही काही अट नाही.
बैजवार लिही, असं नको. आताची
बैजवार लिही, असं नको. आताची आणि (२०१४ च्याही) आधीपासून होणारी घुसमट एकच आहे का वेगळी?
सनातन शब्दाचा अर्थ बुसरटलेला
सनातन शब्दाचा अर्थ बुसरटलेला ऑर्थोडॉक्स असाच आहे ना? त्याहुन वेळा काही अर्थ आहे का? सनातन हिंदू धर्म म्हणजे कर्मकांडांत बुडालेला हिंदू धर्म शिवाय काय अर्थ आहे? >>> साजिऱ्या, हे बघ इथेच उदाहरण
धर्मातुन हाकलत नाहीत? हाकलतात
धर्मातुन हाकलत नाहीत? हाकलतात की! + धर्मात ठेवून जिणे मुश्किल करतात की वेगळा धर्म स्वीकारण्याची वेळ यावी. हो ना?
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि याचे सर्व श्रेय शांतताप्रेमी आणि "पुरोगामी" हिंदूंना द्यायला हवे.
हिंदूत्ववाद्यांना नाही. शांतताप्रेमी हिंदू आणि हिंतूत्ववादी हे दोन टोकाचे भिन्न विचार आहेत.>>> +1 00
हिंदुत्ववादी मुस्लिमांना आदर्श मानून त्यांचासारखंच बनायचा प्रयत्न करत असतात. ते अमकं करतात मग आम्हीपण करणार.. जणु त्यांनी मुस्लिमांची सुपिरिऑरिटी नकळतपण मान्यच केली आहे.
उलट पुरोगामी हिंदुना हिंदु धर्भावर, त्याच्या शक्तीवर जास्त ठाम विश्वास आहे, त्यामुळे ते हिंदु धर्माचया मुस्लिमीकरणाविरोधात आवाज उठवत असतात
बैजवार लिही, असं नको. आताची
बैजवार लिही, असं नको. आताची आणि (२०१४ च्याही) आधीपासून होणारी घुसमट एकच आहे का वेगळी? >>> अरे इतकं लिहिलं हे खूप झालं की! आता लिहिण्याची सवय राहिली नाही. मायबोलीवर वेगळी मतं असल्यावर शेलकी वाक्यं लिहून पाणउतारा केला जात असल्याचे सुरू झाल्यापासून मतं लिहिणेही बंद केले आहे. तो एक वेगळाच उन्माद
असो.... इथे मला जेवढं लिहावंसं वाटलं तेवढं लिहिलं
केश्वे, मी फारच परवडलो. तो
केश्वे, मी फारच परवडलो. तो अमित डेंजर आहे.
तू भयंकर आयडियालिस्टिक सिच्युएशन्सबद्दल नेहेमी बोलतेस. इथं 'लिहून' काय ठेवलं आहे, याबद्दल चर्चा सुरू नाही. काय होतंय, आणि आजुबाजूला दिसतंय याबद्दल चालु आहे. सनातनचा अर्थ काहीही असो, हा शब्द भयंकर बदनाम झालाय हे नक्की.
धर्मात ठेऊन जिणं मुश्किल करतात- या फॅक्टवर आपली अख्खी राज्यघटना आधारलेली आहे, आणि तू इथं रिफॉर्म्सची आयडियॉलॉजी मांडते आहेस?
धर्मात ठेवून जिणे मुश्किल
धर्मात ठेवून जिणे मुश्किल करतात की वेगळा धर्म स्वीकारण्याची वेळ यावी. हो ना? >>> अमित, तो आपल्या एकूणच समाजाचा काळा कालखंड होता. त्यांना वेगळा धर्म स्वीकारायची वेळ यावी ह्याची खरोखर लाज वाटते. आपण तेव्हा जन्मालाही आलो नव्हतो तरीही. तो देखील 'धर्माच्या नावाखाली अत्याचार' ह्याच category मध्ये. बरं झालं कित्येक सुधारकांनी आपल्या पाषाणावरची घाण साफ करायला घेतली. अजूनही बाकी आहे.
रामराज्य आलं तरी अजून बाकीच
रामराज्य आलं तरी अजून बाकीच आहे??
चला आता थांबते. खूप दिवसांनी
चला आता थांबते. खूप दिवसांनी मत मांडलं
सर्व श्रेय शांतताप्रेमी आणि
सर्व श्रेय शांतताप्रेमी आणि "पुरोगामी" हिंदूंना द्यायला हवे. >>भारतात, पाकिस्तानचे उदाहरण असताना, मुस्लिमांपेक्षा हिंदू नक्कीच परवडले हे ही खरंच आहे. पण त्याचं कारण हिंदू हे कडवे/ अतीधर्मिक एक पोथीनिष्ठ नसतात. अर्थात हल्ली टफ कॉंपिटिशन आहेच
माझं सध्याचं धोरणः सगळे धर्म वाईटच. आपापल्या घरात काय ते धर्म पाळा, बाहेर वावरताना, नियम बनवताना आणि मुख्यत्त्वे नियम बनवणारे लोक धार्मिक असले की सगळंच बोंबलतं.
मध्यंतरी अमेरिकेत मेल्टिंग पॉट आणि इनक्ल्युझिवनेस मध्ये स्थानिक गाव पातळीवर एका ठिकाणी मुस्लिमबहुल लोक निवडून आले चांगली गोष्ट आहे, आणि त्यांनी बॉर्डरलाईन रिग्रेसिव्ह निर्णय घेतले. ख्रिश्चन आले की ख्रिश्चन म्हणून ते असे टोकाचे निर्णय अमेरिकेत कायमच घेत असतात. थोडक्यात सगळे धर्म वाईटच!
घटना पाळा बास.
अमितव सनातन शब्दाचा अर्थ
अमितव सनातन शब्दाचा अर्थ शाश्वत.
सनातन हे धर्माचे नाव नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे धर्म म्हणजे कर्तव्य नियम या अर्थाने अमुक धर्म शाश्वत आहेत असे वेदात म्हटलेय.
सनातन धर्म महासभा ही ऑर्थोडॉक्स हिंदूंची संस्था मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केली. लहानपणापासून सनातनी म्हणजे याच्याशी निगडित असेच ऐकले आहे. आता हिंदु हे आपले नाव नव्हेच, आपला धर्म मूळ सनातन धर्म असे सुरू झालेय. सरसकट हिंदु धर्माला सनातन धर्म असे माझ्या तरी ऐकण्यात नव्हते आधी.
स्वातीताई, sorry! तुमची Post
स्वातीताई, sorry! तुमची Post miss झाली पोस्ट लिहिण्याच्या नादात. कुठलेच radicalization नको शांतपणे जगण्यासाठी आणि जगू देण्यासाठी.... इतकेच म्हणेन.
Submitted by ऋन्मेऽऽष on 7
Submitted by साजिरा on 7 August, 2026 - 10:07
हा पहिलाच बाफ असेल ज्याचं विषयांतर झाल्याने जास्त आनंद झाला. सुरूवातीच्या काही पोस्टस सोडल्या तर मूळ विषयावर जास्त चर्चा करण्यासारखे काही शिल्लक आहे असे वाटत नाही. म्हणजे चोरीवर. वाईट हे वाटतं कि यासाठी देशाने काय किंमत मोजली आहे, त्यात फक्त देणगीदारच नाहीत. तो डोक्याला पट्टी बांधून हातात तलवार घेतलेला पोस्टरबॉय आजही लक्षात आहे. आज तो कुठेतरी लोकांच्या चपला शिवत असतो. स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्यांचं दानवीकरण झालं. हिंसाचारात वापर झाला आणि नंतर यांना गावात पुन्हा जातीयवादाला तोंड द्यावे लागले होते. मुस्लिमांविरोधात ज्या सैन्याचा वापर झाला त्यांना त्याचं रिवार्ड अशा पद्धतीने मिळालं.
फक्त देणगी देणारेच स्टेकहोल्डर्स आहेत असं म्हणणारे स्वतः हिंसाचारात सामील नव्हते. ते घरात बसून उन्माद चेतवत होते. सुरक्षित अंतरावरून परस्पर टाळकी फोडण्यात शौर्य गाजवत होते. अटलबिहारी वाजपेयी स्वतः हातात कुदळ फावडं न घेता "धरती समतल करनी होगी" म्हणत होते. हे असले कवी हृदयाचे बदमाष लोक आदर्श म्हणून रंगवले गेले.
सनातन शब्दाच्या इतिहासाबद्दल काळ वेळ आणि उत्साह पाहून पुन्हा कधीतरी. मूळ शब्द उधार उसनवारी आहे इतकंच. रामायण, महाभारत आणि इलियड, इलिअस , ओडेसी यांच्यातल्या अनेक साम्यांबद्दल नव्वदच्या दशकात एक पुस्तक वाचलेलं. ते आता नेटवर पण उपलब्ध नाही. पण त्यात वाचलेल्या माहितीशी जुळणारी माहिती उपलब्ध आहे. त्यावर पण नंतर. या धाग्यावर बरं वाटत नाही.
काल कावडियांनी आर्मीच्या जवानाची पिटाई केली असं हेडींग वाचलं. तपशील वाचला नाही.
कावडियांचा उन्माद याची देही
कावडियांचा उन्माद याची देही याची डोळा बघतेय.
आठ वर्षांपूर्वी दिल्लीत होते तेव्हा सकाळी रस्त्याच्या एका बाजूने शांतपणे चालत जाणारे कावडिया बघितले आहेत. अर्धा रस्ता त्यांच्यासाठी रस्सी बांधून मार्क केलेला असायचा, पण त्याचा कधी त्रास झाला नाही.
पण आता मुंगीच्या गतीने रस्त्याच्या मधोमध चालणारे, दणादण ओरडणारे मोठ्ठाले स्पीकर्स वाहून नेणारे ट्रक, त्यासमोर नाचणारे, ट्रकमध्ये मागे बसलेले (आणि बऱ्याचदा झिंगलेले) कावडिया दिसतात. मागे ट्रॅफिक तुंबलेलं असतं... पण पर्वा कोणाला आहे?
काल तुफान पाऊस झाला दिल्लीत. रस्त्यावर हे पाणी साचलं... पण कावडियांचा उत्साह काही ओसरला नव्हता. लोकांना त्रास होतोय तर होऊ देत. श्रावणात कावड यात्रा असते माहिती आहे ना? मग घराबाहेर पडावंच कशाला श्रावणात?
<<मानवदादा, प्रत्येक reform
<<मानवदादा, प्रत्येक reform मध्ये घुसळण तर होणारच. There will be always a resistance to change. >> त्या त्या काळच्या धर्मपंडितांनी आणि धर्मरक्षकांनी विरोध केला. सुधारणा इतर सुधारकांनी केल्या. त्या स्वीकाराव्या लागल्या जनतेचा कल बघता. मग पुढच्या सुधारणेला विरोध. आता उलट दिशेने जाण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तेव्हा धर्मात रिफॉर्म्स अलाउड आहेत ऐवजी या सुधारकांनी केलेल्या कार्याचा अभिमान हवा. धर्माची एक बॉडी होती ती सुधारणांचे प्रस्ताव स्वीकारत होती, त्यांच्यासमोर प्रस्ताव आले आणि त्यावर विचार करून त्यांनी मान्य केले पण काही लोकांनी त्याला विरोध केला, त्या बॉडीने शेवटी त्यांना समजावले असे नाही ते.
सर विल्यम वेडरबर्न यांच्या
सर विल्यम वेडरबर्न यांच्या प्रयत्नांतून १८८९ मध्ये इंडियन पार्लमेंटरी कमिटी स्थापन झाली होती. ते इंडिया नावाचं एक नियतकालिक चालवत. आधी मासिक होतं मग त्याचं साप्ताहिक झालं. भारतातल्या लोकांच्या तक्रारी थेट ब्रिटिश संसदेत आणि जनमतात पोहोचवण्याची यंत्रणाच उभी राहिली.
दादाभाई नौरोजी (नवरोसजी) स्वतः १८९२ मध्ये ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले होते. भारतीय मागणी आणि ब्रिटिश देशांतर्गत राजकारण यांच्यातला दुवा अशा तुरळक प्रकरणात प्रत्यक्षात दिसतो.
ब्रिटनमधे एक मत एक मूल्य ही संकल्पना १८०० च्या दरम्यान जोर धरत होती. १८८० च्या दरम्यान कधीतरी त्याचा कायदा बनला. आता हे आठवणीनुसार लिहीत आहे. नेमके तपशील शोधावे लागतील. तसेच महिलांना मताचा अधिकार आणि अन्य सुधारणाविषयक कायदे बनत होते. याचे पडसाद भारतात उमटत होते. ब्रिटनमधे जे काही होत होते ते भारतात पोहोचत होते. तसेच भारतात घडणार्या सुधारणाविषयक गोष्टी देशात पोहोचत होत्या. भारतात काही संघटना होत्या. तसेच प्रभावी व्यक्ती होत्या ज्या ब्रिटीश, युरोपीय सुधारणांना पाथिंबा असणार्या होत्या. मध्यंतरी काही लोकांनी शंका उपस्थित केल्या होत्या कि फुलेंनी तर पुण्यात चळवळ केली तर मग भारतात सुधारणा का घडल्या? हा प्रश्न तर्क्दुष्टतेचं उत्तम उदाहरण आहे. भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकणारा होता. पण ब्रिटनमधे घडणार्या सुधारणांचे प्रतिबिंब इथे उमटत असताना इथल्या घडामोडींचं प्रतिबिंब का नाही उमटणार? दक्षिण आणि उत्तर यातल्या भाषिक अडचंणींमुळे उशीर लागत असेल पण ते नक्कीच उमटत होते.
(हाकामारीच्या घटनांबद्दल मध्यंतरी मोठी चर्चा होती. दक्षिणेत घटना घडल्या आणि नंतर उत्तरेत हाकामारीचं लोण पसरलं. हे ब्रिटीश काळात सुद्धा घडलं होतं. ) संपूर्ण भारतात व्यापार उदीम चालत होता. बातम्या कर्णोपकर्णी पोहोचत होत्या. ज्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला डाचत होत्या त्या विरोधात उठवलेला आवाज आपोआपच सर्वदूर पोहोचत होता. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं. (सध्या हे नोंदवत आहे. याचे संदर्भ हाताशी नाहीत, कदाचित इंटरनेटवर आता उपलब्ध असतीलच असेही नाही, त्यामुळे जेव्हां सापडतील तेव्हां देईनच.)
रॉय, विधासागर यांच्यासारख्या व्यक्ती सुधारणा म्हणाजे वेद, उपनिषदाकडे परत जाणे असे मानत होत्या. ब्राह्मो समाज, आर्य समाज अशा संघटनाही मरुआदित सुधारणा स्विकारत होत्या. पण मूळ ब्रिटीश भूमीत भारतातल्या व्रिटीश सरकारवर होणारी टीका आणि भारतातून फुले आंबेडकर पेरीयार यांचा संघर्ष यात सरकार अडकले होते. स्वातंत्र्याची चळवळही चालू होती.
यामुळे ब्रिटीश सरकारने सुधारणाव्याद्यांशी चर्चा चालू केल्या. स्वातंत्र्याच्या लढ्यात एकजिनसीपण हवं यासाठी काँग्रेसमधेही द्वंद्व सुरू झालं (टिळक आगरकर). यातून सामाजिक सुधारणा स्विकारण्याची गरज निर्माण झाली.
Pages