चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरदार का ग्रँडसन मी पाहिला आहे.
आचरट जॉनर चित्रपट होता. मी सुद्धा आचरट प्रेमी असल्याने पूर्ण बघितला ती गोष्ट वेगळी.
मे वापस आऊगा पाहिला नाही पण रिव्ह्यू वाचून कसा असावा ते लक्षात येते.
अश्या दोन्ही चित्रपटांची थीम एकच आहे हे इंटरेस्टिंग वाटले.

आशु Proud
हमार परीक्षणवा प्रामाणिकवा! कुणाला आवडेल तर ते त्यांचे प्रामाणिकवा. Happy
भोजपुरी मीम पाहून आले त्यात टायटॅनिकचे नाव - "नैय्या डुबल पानीमें, सैंया मरल जवानीमें" वाचले.

धनि व भरतना आवडला तर मजाच आहे. मजा येण्याशी मतलब!

असं नाही! असं नाही! यांना असलेच पिक्चर आवडतात अशी योग्य ठिकाणी नोंद करुन त्याचा योग्य वेळी वापर कर. मग खरी मजा! Proud

Lol पिक्चरचा हेतूच मनोरंजन असतो. हाकानाका. शिवाय माझी स्वतःची अभिरुची सतत बदलते, मी कुणावर कसं हसू? सध्या तर गाडीत बेबी को बेस पसंद है, चिट्टिया कलाईयां वे, आणि आया दिल्ली वाली गर्लफ्रेंड छोडछाडके ऐकतेय. माझ्या आठ वर्षांच्या भाचीचे मला "भूतबंगला" पाहा म्हंटले होते, मी पाहिला. आता तिने "धमाल पाहा आत्या" म्हंटले आहे. दुसऱ्या भाचीने त्यातलेच "गुलाबी साडी आणि लाली लाल लाल" इतक्या वेळा दाखवलं की पाठ होते की काय वाटले, मागच्या वेळी आली तेव्हा "लेहंगा दे दे महेंगा" पाठ झाले होते. Lol माझी छोटी भाची नंतर माझी तोंडी परीक्षा घेते म्हणून मी बंडल पिक्चर सुद्धा मन लावून पाहाते. नापास व्हायला नको. रोज जाऊन "धमाल" आला का चेक करत आहे, आणि मला माहित आहे तो बंडलच निघणार, पर मैं तो बघुंगीच!

चिकवावर "NYPD anything you say will be used against you " करू म्हणतोस? Proud

नको!
जरा कुठे मनोरंजनाची सोय करू बघतोय तर तू फिलॉसॉफिकल झाली! Proud
बाकी धमाल कोपच्यात आला आहे. वीकेंडला लावला होता, तुकड्या तुकड्यात बघितला. बंडल चालला असता, हा गरीब आहे. बघितलेल्या भागात एकदाही हसू आलं नाही इतकं सांगून माझे दोन शब्द संपवतो. Proud

वध २ पाहिला.
शीर्षक तेच, कलाकार तेच पण पात्रं निराळी हे वेगळेपण आहे. यांच्या स्टोरीटेलिंगमधे एक गोष्ट आवडण्यासारखी आहे ती म्हणजे गोष्ट घडते ती खूप सनसनाटी नाही. गावात. कॉलनीत कुठेही "अरे तो अमका तमका नाही का, त्याचा खून झाला, आणि कुणी केला माहीत्ये का? लुंगीवाल्या काकांनी"
अशा टाईपची गोष्ट असते.

बाकीचा सगळा कथानकाचा डोलारा वध १ च्याच फॉर्म्युल्याने जातो आणि शेवटची फिल्मी तडजोड पण तीच. म्हणजे हरवले सापडले सारखा हा नवा फॉर्म्युला आता वध ३ मधे पण वापरणार बहुतेक. व्व

function at() { [native code] }अर्क्य वाटलेल्या गोष्टी

स्पॉयलर अ‍ॅलर्ट

कैदी फरार झाला आहे आणि गार्ड सांगतो कि मी कुलूप लावलं, तर त्याला चौकशीसाठी संशयित म्हणूनच ताब्यात घ्यायला हवं होतं. साध्या हवालदाराने पण हेच केलं असतं.

त्या महिला जेल मधल्या त्या खोलीत झटापट चालू असताना कुणीही गार्ड नसतो किंवा आवाज ऐकून येत नाहीत.

पोलीस अधिकारी परस्पर जेलरला जुन्या गुन्ह्याची शिक्षा भोग म्हणून काव्यात्मक न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि जेलर पण शुंभासारखा वकील न देता शिक्षा स्विकारतो. अंगठी सापडणे हा बिनतोड पुरावा कसा होईल?

यांना असलेच पिक्चर आवडतात >> हमार चोईस बहुत अलग अलग है बाबुवा. कभी हमका ये पसंद आवत है कभी हमका वो पसंद आवत है. वैसन हमे विद्या बालन कहत रही वो डायलॉग पता है - सिनेमा देखा तो बस एकही चीज जरूरी है entertainment, entertainment, entertainment!! Lol Lol

नॉर्मल - मिनसोटा मधलं एक स्मॉल टाइम, फिक्शनल गांव. बाब ओडनकर्क टेंपररी शेरीफ म्हणुन येतो, आणि त्या गावाची रहस्य उलगडत जातात. इथे जास्त लिहुन सिनेमाची मजा घालवणार नाहि. नक्कि बघा, एचबिओवर आहे..

ओडनकर्कने अफलातून काम केलं आहे. त्याच्या आजवरच्या कामावरुन (ब्रेबॅ, बेकॉसॉ, नोबडी, नोबडी २, आणि आता नॉर्मल) तो टाइपकास्ट होतोय का, अशी शंका येते, बट हि इज स्टिल फन टु वॉच. क्रिस्प, फनी, वेळप्रसंगी चिमटे काढणार्‍या डायलॉग्ज मुळे सिनेमा जागेवरुन हलु देत नाहि. उदाहरणा दाखल एका प्रसंगात जॅपनीज माफिया बॉस इंग्लीश ट्रांसलेटरची मदत न घेता १-२ वाक्य इंग्लीश मधे बोलतो. लगेच ओडनकर्क त्याला विचारतो- यु स्पीक इंग्लीश? त्यावर बॉसचं उत्तर - आय वॉच फ्रेंड्स ऑन टीवी... Wink

काल "एक थी डायन" सिनेमा बघितला. मजा आली. अमानवीय विषय चांगल्या प्रकारे हाताळला आहे. तुमची आवड जर माझ्या सारखीच असेल तर अवश्य पहा. यू ट्यूब वर आहे.
https://www.youtube.com/watch?v=jCS1Txul9ug

प्रायमेट बघितला. थ्रिलर म्हणून बघायला ठीक आहे पण कन्सेप्ट काही कळली नाही.
चिंपला रेबीज झाला तर तो खुनशी होऊन दगडं बिगडं डोक्यात घालून, तोंड उचकटून खून का पाडतोय?
त्या वडील मुलींमधलेही संवाद कळले नाहीत.
ते हवाईमधलं घर आहे मात्र मस्त...

बॉडीज बॉडीज बॉडीज पण भारी आहे. ह्यात पिसाळलेले माकड नसले तरी paranoid टीन्स, वादळ, पार्टी, बंगला अशी पार्श्वभूमी आहे.

गव्हरनर बघितला. सिनेमॅटीक लिबर्टी जरा जास्त झाली आहे..स्वतः गव्हरनर ने छत्री घेऊन अडलेला टेंपो सोडवणे वगैरे गमती जमती आहेत.. मधू ला खूप दिवसांनी पाहिले..अगदी रया गेली आहे.
मनोज वा. नेहमी प्रमाणे कॅरॅक्टर मधे घुसून काम करतो. छान आहे १ दा बघायला.

ऑडिसी पाहिला आणि प्रचंड आवडला. काही बाबतीत नोलानचा टेक पारंपरिक कथेपेक्षा थोडा वेगळा आहे आणि तो मला भावला.

ट्रॉयच्या घोड्याचा सगळाच भाग अगदी जमून आला आहे. माझ्या डोक्यात चाकं लावलेला मोठा घोडा होता - सगळीकडे तसाच दाखवतात. पण इथे जो काही प्रकार दाखवलाय, तो वाकडा तिकडा आणतात, त्याच्या आतल्या सैनिकांचे हाल, पाणी शिरणे वगैरे - जबरीच! वरती याबद्दल अमितच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत.

सुरुवातीला झेंड्या (झेंडाया की कायशी ती.. कसा उच्चार आहे?) अथीनाच्या भूमिकेत बघून मी डोक्याला हात लावला होता. रावसाहेबांनी धैर्यधराला बघून काय शिव्या दिल्या असतील त्यांची आठवण झाली. पण शेवटी तिचा उलगडा झाला आणि तो उच्च आहे! याबद्दल कुणी काही लिहिलं आहे का माहीत नाही. थोडं सविस्तर लिहितो.

अथीना ही चातुर्य आणि युद्धकौशल्याची देवता. ती ऑडिसियसवर प्रसन्न असते अशी पारंपरिक समजूत आहे. सिनेमात ऑडिसियस स्वतः अर्थात चतुर आणि युद्धकलानिपुण दाखवला आहे आणि अनेक बर्‍यावाईट प्रसंगी त्याला अथीना डोळ्यांसमोर दिसते आणि तो तिच्याशी संवाद साधतो हे दाखवलं आहे. पण नंतर ट्रॉय युद्धाच्या प्रसंगात जेव्हा त्याची उद्विग्न मनस्थिती दाखवली आहे, जेव्हा त्याचे स्वतःचे सैनिक ट्रॉयचा पाडाव करताना भीषण विध्वंस करत असतात, बायकामुलांना मारत असतात, तोडफोड जाळपोळ करत असतात, तेव्हा हे युद्ध आपण कुठे घेऊन आलो आहोत, हे करून काय मिळवलं की फक्त गमावलंच, कशासाठी एवढा सगळा अट्टहास केला अश्या सर्व भावभावनांनी दिग्मूढ होऊन तो अचंबित आणि नैराश्यपूर्ण डोळ्यांनी सगळा संहार पाहत असतो. त्याच्या डोक्यात चालणार्‍या ह्या विचारचक्राला त्याने हेलनच्या बापाला दिलेलं वचन, हेलनचं स्वयंवर, ऑडिसियसने त्यात सुचवलेली अट (ती ज्याला वरेल त्याला सोडून इतर उपवधूंनी तिचा विचार सोडून द्याय्चा आणि तिच्या नवर्‍यावर कुठलंही संकट आलं तरी पुढे सर्वांनी एकत्र येऊन त्याला मदत करायची), पुढे त्या सोनेरी सफरचंदाची गोष्ट, पॅरीसने हेलनला पळवून ट्रॉयमध्ये नेणे आणि आता पूर्वीच्या अटीमुळे इच्छा असो वा नसो, मेनलेयसला (हेलनचा नवरा - ज्याला मी पूर्वी मेनलॉज म्हणत असे, त्याचा उच्चार सिनेमात कळला) मदत करायला सर्व ग्रीक राजांनी उभे राहणे हे आलं, ऑडिसियचा चांगला चाललेला संसार आणि राज्य (इथाका) आणि ते सोडून ह्या फंदात न पडण्याची मनोभूमिका, पण स्वतःच सुचवलेल्या अटीमुळे स्वतःला नाही म्हणता न येणं, आणि त्यातून उद्भवलेला सर्व विनाश, ही सर्व पार्श्वभूमी आहे. ती पार्श्वभूमी ह्या सिनेमात दाखवलेली नाही.

तर नोलानची गंमत अशी की त्या ट्रॉय युद्धात त्याने दोन असे प्रसंग एकावेळी घडताना आणि ऑडिसियस ते दोन्ही त्या दिग्मूढ अवस्थेत पाहताना दाखवला आहे. प्रसंग १ - कत्तल केल्या गेलेल्या प्रजेपैकी ट्रॉयमधली एक कोवळ्या वयाची तरुणी सैनिकांकडून मारली जात आहे. तिला पकडून एकाने तिचं शीर धडावेगळं करण्यासाठी तलवार उगारली आहे. प्रसंग २ - ट्रॉयमधील ऐश्वर्याचं प्रतिक असलेली सर्व ठिकाणं फोडली जात आहेत. त्यात एक मोठा अथीना देवीचा पुतळा फोडला जात आहे. एकाने विजयोन्मादाच्या भरात त्या देवीच्या पुतळ्याचं शीर धडावेगळं करायला तलवार उपसली आहे. दोन्ही प्रसंग एकदम घडतात आणि दोन्ही शिरं एकाच वेळी धडावेगळी होतात. हे दृश्य ऑडिसियसच्या मनावर कायम कोरलं जातं आणि अनेकदा त्याला आठवत राहतं. त्यातली ती मारली गेलेली तरुणी (झेंडाया) त्याला अथीनाच्या स्वरूपात दिसू लागते. मग आपल्याला अचानक उलगडा होतो की त्याला वेगवेगळ्या प्रसंगी दिसणारी अथीना ही खरी नसून त्याच्या मनातली अथीना आहे. ती खरंतर त्याची सदसद्विवेकबुद्धी आहे आणि पुढे अनेक पेचप्रसंगात ती त्याला मार्ग दाखवते, कधी प्रश्न विचारते, विचार करायला लावते. माझ्या मनात इथेच नोलान दिग्दर्शक म्हणून जिंकला आहे.

नोलानने चमत्कारांपेक्षा मानवी भावनांवर जास्त भर दिला आहे. अर्थात भारतीय मनाला त्यात ओलावा कमी वाटू शकेल कारण भावनिक असण्याच्या बाबतीत आपण सरस आहोत आणि आपण आपल्या दृष्टिकोनातून बघितल्यास त्या कमीच वाटतील.

खटकलेल्या गोष्टी - कपडेपट आणि भाषा. अर्थात ह्या गोष्टी कालसुसंगत नसणे हा ठरवून केलेला निर्णय आहे हे माहीत आहे. तरी आजच्या लोकांना रिलेट व्हावं म्हणून ऑडिसियसच्या मुलाने 'डॅड' म्हणून हाक मारणं किंवा इतर अनेक प्रसंगात त्यातल्या व्यक्तींनी फ-शिवी देणं हे काही पटलं नाही. जुन्या शिव्या पण वेगळ्या असतील की नाही? उद्या लंका युद्धात कुंभकर्णाला कुणी छोटासा बाण मारल्यावर, 'ओये तेरी तो!' किंवा 'च्या मारी, कोन रे तो!' असं कुंभकर्ण म्हणाला तर कसं विचित्र वाटेल! असो.

नक्की बघावाच असा चित्रपट आहे.

ओडिसी ज्यांनी रिअल IMAX Digital किंवा Dolby Cinema वर किंवा अन्य फॉरमॅट मधे पाहिला आहे त्यांनी अनुभव कसा होता कळवा प्लीज. आमच्या इथे रिअल IMAX Digital नाही.

हर्पा >> मस्त लिहिलं आहेस रे. अथेना बद्दल भारी लिहिलं आहेस. तो धक्का चांगला जमला आहे नोलनला. त्यामुळे एक इमोशनल डेफ्थ मिळते सगळ्याच प्रवासाला आणि त्याचा आणि अथेनाच्या बोलण्याला.

राज >> मी मागेच लिहिले होते IMAX मध्ये मिळाला तर पहा. डिजिटल IMAX मध्ये पण एकदम भव्य वाटला. जो extra अवकाश आहे तो पूर्ण IMAX मध्ये नीट दिसतो.

IMAX फिल्म बघायचा होता पण सगळे शो ३-४ महिने आधीच फुल झाले असे कळले.

हर्पा छान पोस्ट. अथेनाचे ते दृश्य तसेच समजले आणि तसेच अंगावर आले. त्या प्रसंगात वाटले की तो सैनिकांना शिरच्छेद करण्यापासून थांबवेल. पण तो तसे करत नाही.. तो प्रसंग खरेच highlight वाटतो. मागे चालू असलेले घनघोर युद्ध आणि त्या एवढ्या कोलाहलात त्याच्या मनात चालू असलेले युद्ध, छान घेतले आहे आणि ते चेहऱ्यावर उतरवले पण भारी आहे मॅटने.. महाभारताची फार आठवण येते शेवटच्या प्रसंगात. काय मिळवले हा प्रश्न समान आहे दोन्हीकडे.

मला वाटतं मूळ ऑडिसीत त्याला युद्धात उतरायची इच्छा नसते. पण त्याचं एक्स्टेन्शन काय मिळवलं ते नोलनचे / आजच्या मूल्यांचे प्रतिबिंब आहे

Netflix वर कर्तव्य बघितला. सैफ अली खान, रसिका दुग्गल, झाकिर हुसेन, संजय मिश्रा आहेत. Fast paced आहे आणि खिळवून ठेवतो. सगळ्यांचीच कामे चांगली आहेत. सैफचे काम खूप आवडले. सर्व खान कलाकार लोकांमधे तो सर्वात versatile आहे (अगदी आमीरपेक्षाही) या माझ्या आधीच्या मताला पुष्टी मिळाली.

सर्व खान कलाकार लोकांमधे तो सर्वात versatile आहे (अगदी आमीरपेक्षाही) या माझ्या आधीच्या मताला पुष्टी मिळाली.>> सैफुचा ओमकारा मधला लन्गडा आणी आमिरचा दन्गल मधला रेसलेर पप्पा दोन्ही सारखेच व्हर्सेटाइल माइलस्टोन वाटतात..याच्या जवळपासही शाखा जाउ शकत नाही..अतीशय लिमिटेड अ‍ॅक्टीन्ग आहे त्याची.

शाहरुखचा विषय निघाला म्हणून मला बोलणे भाग आहे.
शाहरुख असाच सुपरस्टार आहे.
त्यामुळे त्याला त्याच्या पीकमध्ये फार काही वेगळे आऊट ऑफ द बॉक्स करायची गरज नव्हती. आणि त्याने ते न करून योग्यच केले.
पण त्याच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात कठीण असते ते एकच जॉनरच्या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने करणे.
शाहरुखने रोमान्सचे आपल्याला इतके रुपे इतके पैलू दाखवले आहेत की दरवेळी मला प्रश्न पडायचा की अजून काय आणि तो काहीतरी नवीन घेऊन यायचा Happy

बाकी सैफ आणि आमिर दोघे गुणी कलाकार आणि ताकदीचे अभिनेते आहेत यात बिलकुल वाद नाही.

Apex - Netflix

कोणीतरी लिहीले होते ना इथे त्याबद्दल? मला एंगेजिंग वाटला. उत्तरार्धात आपली उत्सुकता वाढत जाते व नाट्य आपल्याला पूर्ण खिळवून ठेवते. पाहा. चांगला आहे.

शाहरुखने रोमान्सचे आपल्याला इतके रुपे इतके पैलू दाखवले आहेत???
>>>> इतक्या वर्षात कधी दिसले नाहीत ते. सुरुवातीच्या पिक्चरमध्ये ( कभी हां कभी ना वगैरे) त्याची एनर्जी तुफान होती पण नंतर तो प्रचंड स्टीरीओटाईप कामं करू लागला (अपवाद स्वदेस)
आमिर सुरुवातीपासून १९४७- अर्थ वगैरे भुमिका करतोय.
त्यामुळे दोघांची तुलनाच होऊ शकत नाही.

अलिकडचा पिकलेला शाहरूख खान आवडतो. पण त्याने गुटखा कंपनीच्या बोगस प्रॉडक्टची जाहीरात करून त्या कंपनीला प्रसिद्धी दिली आहे. शाहरूख खान आणि व्यसनमुक्ती याचा ठेका आपल्याकडेच आहे असा आव आणणार्‍या व्यक्तींनी यातल्या विरोधाभासावर पण स्पष्टीकरण दिले पाहिजे. जर शाहरूखखानचे तुम्ही प्रवक्ते, अंधभक्त असाल तर तुम्ही व्यसनमुक्तीचे काम टिंगल म्हणून करता किंवा व्यसनमुक्तीबाबत गंभीर असाल तर शाहरूखहानची तुम्ही मस्करी करता असा संदेश यातून जातो.

Pages