Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टायगर , पठाण आणि कबिर (वॉर )
टायगर , पठाण आणि कबिर (वॉर ) हे तिघेही YRF स्पाय universe मधले इन्स्टॉलमेंट्स असल्याने ह्रितिकने अल्फामध्ये cameo केला आहे. पठाण मध्ये नाही का सलमानने केला होता तसा.
रानभुली, छान लिहिले आहेस.
रानभुली, छान लिहिले आहेस.
तुला भरभरून लिहावसं वाटत होतं ती ऊर्मी वाचताना माझ्यापर्यंत पोचत होती.
एस, मनापासून आभार तुझे.
एस, मनापासून आभार तुझे.
कुणाला तरी आवडतंय हा अनुभव दिल्याबद्दल. खूप बरं वाटलं.
भरभरून लिहिताना देखील आपोआप हातचं राखूनच लिहिले गेले. नाहीतर कुणी पाहणार असेल तर त्याला तो अनुभव मिळणार नाही.
भ्रमयुगम नोट केलाय. बंदर सुद्धा नोट केला. नावामुळे इच्छा होत नव्हती बघायची. महिन्यात आता एक किंवा दोनच पिक्चर बघून होतात.
वरचा हपा आणि अस्मिता यांचा
वरचा हपा आणि अस्मिता यांचा Odyssey वरील प्रतिसाद आवडला.
काही दिवसांपुर्वी मी Odyssey पाहिला. जबरदस्त आवडला. इतके महाग तिकीट आहे पण पुरेपूर पैसा वसूल झाला.
Troy हा माझ्या काही आवडत्या चित्रपटापैकी एक आहे. त्यामुळे Greek Mythology विषयी वाचले होते. ते सर्व बऱ्यापैकी माहिती असल्याने चित्रपट समजायला अवघड गेला नाही. माझ्या बाजूला बसलेले तीन तरूण थोडे बोअर झाले होते कारण त्यांना Greek Mythology माहीत नव्हती. पण चित्रपट संपल्यावर बऱ्याच जणांनी टाळ्या वाजवल्या.
सर्व मेन कलाकारांनी छान काम केले आहे. अर्थात ते चांगले काम करतात म्हणून या चित्रपटात आहेत. सर्वात आवडले म्हणजे Greek fearless king Agamemnon चे presentation. पुर्वीच्या Troy मध्ये या राजाला व्हीलन म्हणून दाखवले आहे. पण या चित्रपटात त्याची जरी बाजू नाही मांडली तरी या राजाचा Aura मात्र मस्त create केला आहे. संपूर्ण चित्रपटात त्याचे मोजकेच म्हणजे तीन किंवा चार छोटे सिन आहेत व एकदाही या राजाचा चेहरा दाखवलेला नाही. पण impact चांगला create केला आहे. ट्रॉय शहराचे दरवाजे युद्धाच्या वेळी उघडतात त्यावेळी king Agamemnon ज्या ग्रेसने शहरात प्रवेश करतो त्या सिनला थेटरमध्ये लोकांनी वॉव असा अभिप्राय दिला होता. शेवटी हा राजा मेन हिरोला जो सल्ला देतो तोच महत्वाचा ठरतो. या राजाची बायको म्हणजे हेलनची जुळी बहीण असते व तिच त्याला मारते (कारण याने युद्धाला जाण्यापुर्वी आपल्या कोवळ्या मुलीचा बळी दिला असतो).
परत एकदा हा चित्रपट पाहिन म्हणतो..( घरून परवानगी मिळाली तर ..)
रानभुली हा सिनेमा कुठे दिसेल?
रानभुली हा सिनेमा कुठे दिसेल? आवडेल बघायला.
बंदर बघितला. अॅज ऑल्वेज अंगावर आला. काही ठिकाणी बोर झाला. किळसवाणे तुरूंग, संडासांचे क्लोजप्स, कैद्यांचे आत सुरू असलेले द्वंद्वयुद्ध, तिथेले राजकारण या सगळ्ञात बळी पडलेला बॉबी देओल जो खोट्या रेपकेस आरोपाखाली तिथे आणला जातो. तुरुंगात आल्यावरचं त्याचं बदललेलं आयुष्य - थोडक्यात सगळीकडे माकडासारखं नाचवलं जाणं असा अर्थ मला लागलाय.
अंजली, हॉटस्टार वर आहे.
अंजली, हॉटस्टार वर आहे.
>>>>>शिवी दिल्याचे समाधान
>>>>>शिवी दिल्याचे समाधान
नाही नाही. एकदा एका कार्यक्रमात तिने नाक ओढले होते (सर्दी झाली कसे ओढतात तसे) हाहाहा .... त्यामुळे तेव्हापासून मला तेच आठवते तिला पाहीले की
आलियाला शून्य ग्लॅमर आहे आणि
आलियाला शून्य ग्लॅमर आहे आणि शबाना, स्मिता सारखा प्रेझेन्स ही नाही. सो बी इट. काहींना आवडते. आम्हाला आवडत नाही.
काही वर्षापूर्वी आलेले पण
काही वर्षापूर्वी आलेले पण पाहायचे राहिलेले चित्रपट सध्या पाहायचे ठरवलेयं..
सलग तीन तास चित्रपट आता थेटरमध्येच पाहता येतो... स्वयंपाक बनवताना घरी तुकड्या- तुकड्यात मोबाईलवर बघतेयं सध्या..
दिल चाहता है, तुम बीन हे चित्रपट बऱ्याच काळापासून पहायचे होते ते ह्या वर्षी पाहण्याचा योग जुळून आला. दोन्ही चित्रपटातली गाणी त्याकाळी सुपरहिट होती. आजही मला ऐकायला आवडतात.
दिल चाहता है मधला सैफ अली खानची भूमिका जास्त आवडली मला.
गोड, हसऱ्या चेहऱ्याची आलिया भट मलाही आवडते.. राझी, हायवे, गल्ली बॉय , गंगूबाई मधलं तिचं काम आवडलेलं..
रानभुली, तू लिहिलंयस त्या
रानभुली, तू लिहिलंयस त्या टाइप स्टोरी असलेला आणखी कुठलातरी सिनेमा पाहिल्यासारखा वाटतोय. पण आत्ता नाव, अॅक्टर्स वगैरे बाकी काही आठवत नाहीये. पण खूपच ओळखीचा प्लॉट वाटतोय.
मी बंदर पहिला.आणि मला अशी
मी बंदर पहिला.आणि मला अशी कोणती तरी सर्जरी हवीय ज्याने मला तो पाहिल्याचे सर्व रेकॉर्ड डोक्यातून पुसता येतील.
जेल ची दाहकता दाखवायला इतक्या वाईट प्रमाणात,इतक्या वेळा आणि झूम इन करून टॉयलेट्स दाखवण्याची अजिबात आवश्यकता नाही.असे सीन्स ब्लर केले जातात(किमान के ड्रामा मध्ये तरी.
प्राईमवर बबिता सिंग
प्राईमवर बबिता सिंग रिपोर्टींग बघितला. मस्त आहे आवडला.
ती मेन अॅकट्रेस बहुतेक द ग्रेट इंडियन किचन मधे होती. इथे पण एकदम नो मेकप रॉ लुक आहे, स्टोरीबरोबर छान जमलाय. जबरी काम आहे तिचं.
ती अनुकंपा तत्वावर पोलिसात भरती झालेली असते, लग्नानंतर पहिल्यांदाच सासरी जायचं असतं नणंदेच्या डोहाळजेवणाला म्हणून सुट्टी मागत असते, तर काही कारणाने मिळत नाही. मग सिनिअर पोलिस म्हणतो माझ्या चुकीचा आळ तुझ्यावर घे २ आठवडे सस्पेंन्शन मिळेल मग फिल्ड ड्युटीवर जॉईन हो. शेवटी सासर, नवरा, संसार या सगळ्या दबावामुळे त्याला हो म्हणते, पण नवर्याला सांगत नाही सस्पेंन्शन मिळालंय म्हणते केली सुट्टी मॅनेज कशीतरी, चल गावी, आपण खर्च उचलू नणंदेच्या डोहाळजेवणाचा.
तिकडे गेल्यावर वेगळंच काहीतरी नाट्य सुरू होतं. नवरा बायकोचं गाव बहुतेक एकच असावं. तिथे पोचल्यावर हिचा शाळेतला मित्र भेटतो, म्हणतो तुला काही सांगायचंय आज रात्री भेट, ती सासरच्या जबाबदार्यांमुळे भेटायचं टाळते, नेमका त्याच रात्री त्याचा खुन होतो. मग हिच्यातला पोलिसी खाक्या जागा होतो त्याचा खुन कसा झाला, कोण कोण जबाबदार आहे याची सगळी पाळंमुळं शोधायला लागते, त्यामुळे सासरच्यांची , नवर्याची बोलणी पण खाते, हळूहळू कळत जातं नवरा वर वर सपोर्टीव्ह वाटतोय पण आतून गॅसलायटींग करतोय. कधी बॉडी शेमिंग होतंय, कधी सासरचं टॉक्सिक वातावरण झेलावं लागतंय पण या सगळ्यात ती शेवटी मित्राचा मृत्यू कसा झाला शोधण्यात यशस्वी होते आणि सस्पेंशन रिवोक होऊन परत ड्युटी जॉईन करते.
पण खूपच ओळखीचा प्लॉट वाटतोय.
पण खूपच ओळखीचा प्लॉट वाटतोय. >> मी पाहिल्यांपैकी "मिस्टर अँड मिसेस अय्यर"
न पाहिलेल्यातले याच दिग्दर्शिकेचा "९६"
आणि "बिफोर सनराईज" या सर्वांची जातकुळी ट्रॅव्हल ड्रामा आहे.
प्राईमवर बबिता सिंग
प्राईमवर बबिता सिंग रिपोर्टींग बघितला. मस्त आहे आवडला.>>> अर्रे हो मागच्या आठवड्यात पाहिला हा. आवडला. काम सर्वांचेच नॅचरल वाटले. तिच्या पर्स्नॅलीटीतला फरक छान दिसतो, आधी जरा कामात ढिसाळ , जस्ट रील बनवणारी, बुजणारी, सेफ वाट निवडणारी ती मित्राचा खून तपास करताना आपसूकच बिंधास्त होत जाते, सरळ नशेड्यांच्या अड्ड्यावर जाते, मैत्रिणीच्या डेंजर नवर्याला भिडते, नातेवाईकातल्या मातब्बर व्यक्ती ला सरळ प्रश्न विचारते काय वाह काय ट्रांझिशन दाखवलेय. बाकी कथे बद्दल अंजली ने लिहिलेयच.
मला शेवटाला चुकल्या चुकल्या सारखे वाटत राहिले..पण खूनी कोण ह्या पेक्षा तिचं व्यक्तिमत्व पालट हा मेन पोईंट होता हे कळालं.
त्या कोणत्या गावात, पोलिस म्हणजे एवढा काही खास जॉब तू करत नाहीस हे का बिंबवलं जातं तिच्या वर कळत नाही, नंणंद डोहाळेजेवण साड्या, मिठाई, रीटर्न गिफ्ट्स सर्व तीच खरेदी करताना दाखवली, नवरा घरच्यांना हातात देताना असं दाखवतो त्याने आणलय सर्व.
बारीक गोष्टी मस्त दाखवल्यात.
जेल ची दाहकता दाखवायला इतक्या
जेल ची दाहकता दाखवायला इतक्या वाईट प्रमाणात,इतक्या वेळा आणि झूम इन करून टॉयलेट्स दाखवण्याची अजिबात आवश्यकता नाही.असे सीन्स ब्लर केले जातात(किमान के ड्रामा मध्ये तरी. >> एक कुठलीतरी वेबसिरीज पाहिली होती, नाव आठवत नाही. त्यात असे सीन्स दाखवल्याचं आठवतंय.
क्लीन विथ पॅशन(किम यू जंग)
क्लीन विथ पॅशन(किम यू जंग) मध्ये असा एक सिन होता.पण ब्लर केला होता.
संजयदत्त च्या सिनेमात पण असा
संजयदत्त च्या सिनेमात पण असा एक सीन होता.
बंदर सिनेमा आवडला (त्यातील असे सीन वगळून)
जेल ची दाहकता दाखवायला इतक्या
जेल ची दाहकता दाखवायला इतक्या वाईट प्रमाणात,इतक्या वेळा आणि झूम इन करून टॉयलेट्स दाखवण्याची अजिबात आवश्यकता नाही.असे सीन्स ब्लर केले जातात(किमान के ड्रामा मध्ये तरी. >> आधी इथे वाचून बघावा वाटत होता पण आता नाही बघणार. हा माझ्यासाठी नाही थँक्स अनु
>> स्वयंपाक बनवताना घरी
>> स्वयंपाक बनवताना घरी तुकड्या- तुकड्यात मोबाईलवर बघतेयं सध्या.. <<
एकतर स्वयपाकाला गडी ठेवा नाहीतर चित्रपट पाहायला तरी!
काल ग्रोगू हा स्टारवॉर्स पट
काल ग्रोगू हा स्टारवॉर्स पट पाहत होतो, पहिल्या दहा मिनिटातच झोप यायला लागली.
तुं मं ठीक ठाक.
तुं मं ठीक ठाक.
पहिला अर्धा भाग मस्त.
खूनी कोण ह्या पेक्षा तिचं
खूनी कोण ह्या पेक्षा तिचं व्यक्तिमत्व पालट हा मेन पोईंट होता हे कळालं. >>>>> हो मस्त दाखवलंय तिचं ट्रान्झिशन!
अजून एक पण आवडलं ती तिथल्या तिथे नवर्याला उत्तर देते जेव्हा तो तिच्या वजनावरून टोमणे मारतो फंक्शनमधे!
आज ओडिसी दुसर्यांदा बघियाला.
आज ओडिसी दुसर्यांदा बघियाला. त्यामुळे आता तिसर्यांदा बघायची इच्छा झाली आहे.
चित्रपट पाहण्याचा इंटरेस्ट
चित्रपट पाहण्याचा इंटरेस्ट हळूहळू कमी होत चाललायं...पण इथले review वाचून चित्रपट पाहण्याची इच्छा जागृत होतें...
एकतर स्वयपाकाला गडी ठेवा नाहीतर चित्रपट पाहायला तरी >>
ह्यावर विचार करत राहिले आणि आज चित्रपटाचा तुकडा पाहायचा राहिला.
मैत्रिणीकडे स्वयंपाकाला येणाऱ्या मदतनीस बाईने घाई-घाईत स्वयंपाक बनवताना खलबत्त्यात लसूण ठेचताना सोबतीला खडे ठेचून लसणासोबत खड्यांचीही फोडणी दिली.
खास चित्रपट पाहण्यासाठी जर मी घरच्यांना जेवणात असे खडे खायला घातले तर मात्र माझ्या नावाने खडे फोडतील सगळे...!
मायबोली गणेशोत्सव २०२६ मधली
मायबोली गणेशोत्सव २०२६ मधली पहिली पाककृती स्पर्धा जाहीर झाली आहे. जिन्नस एक , पदार्थ अनेक.
लागा तयारीला.
जुना बच्चनचा अदालत पाहिला.
जुना बच्चनचा अदालत पाहिला. आधी पाहून बरीच वर्षे झाली होती आणि फारसा लक्षात नव्हता. यातला बच्चन वेगळाच आहे. याचे बरेचसे शूटिंग बहुधा शोलेच्या आधी झाले असावे. दीवार आणि शोले याच्या आधी आले असले तरी यात अमिताभची ती स्टाइल नाही. पण तो जुना आनंद मधल्यासारखाही दिसत नाही. दोन्हीच्या मधलाच एक लुक आहे. मोठ्या अमिताभला गावरान दाखवले आहे, त्याची भाषाही हिंदीची एक बोली आहे. दुसरा तरूण अमिताभ चांगला दिसतो. पण तोपर्यंत लोकप्रिय होऊ लागलेली त्याची स्टाइल, मॅनरिजम यात नाही. डबल रोल असला तरी अमिताभने प्रत्यक्षात तीन भूमिका केल्या आहेत. सुरूवातीचा बडबड्या, नंतर अन्याय झाल्यावरचा रागीट आणि घुमा, आणि दुसर्या रोल मधला मॉडर्न तरूण.
न्यूटन्स थर्ड लॉ पाहिला.
न्यूटन्स थर्ड लॉ पाहिला. बिफोर सनराईज किंवा ९६ बघायचा होता. बिफोर सनराईज सुरूही केला पण लगेच लक्षात आलं पुढे काय असेल. हा नंतर वेगळ्या मूडमधे बघण्यासाठी ठेवून दिला. ९६ साठी पैसे मोजावे लागत होते. मग हा दिसला.
मारधाडीचे पिक्चर्स बघण्यात इंटरेस्ट नसतो. फिरून फिरून तेच दाखवणार, धक्के तरी किती देणार?
त्यातून हा नोआर मूव्ही. पण बेगडी का असेना, एक तत्वज्ञान आहे आणि नोआर मधे एण्डलेस हिंसाचार असतो, तसा इथे नाही. स्लो बर्न आहे. पण सेकंड हाफ इंगेजिंग आहे. रेको अजिबात नाही. आपल्या जबाबदारीवर पहायचा तर पहा,
फ्लॅशबॅकचा अकल्पनीय वापर आणि शेवटी नीट जोडलेल्या सर्व लिंक्स. स्क्रिप्ट किती कॉम्प्लेक्स असू शकते या उत्सुकतेने शेवटपर्यंत पाहिला.
नोआर मधे एण्डलेस हिंसाचार
नोआर मधे एण्डलेस हिंसाचार असतो.>>>???
असच काही नाही.
Film noir is a stylized genre of film marked by pessimism, fatalism, and cynicism.
नुआर फिल्मचा कल्ट मूवी असलेला "Detour" नावाचा हा मूवी पहा.
https://www.youtube.com/watch?v=2dQSU1_tuUQ
नुआर कि नोआर? अर्थ काय आहे या
नुआर कि नोआर? अर्थ काय आहे या शब्दाचा?
मी न्वार असेही वाचले आहे.
मी न्वार असेही वाचले आहे. ब्लॅक शब्दाचे फ्रेंच रूप असावे.
Pages