२१ वर्षात २५ ट्रान्सफर!
महाराष्ट्राचे सिंघम!
ते अजून आपल्यात आहेत हीच एक अचिव्हमेंट.
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये थोडीफार वरवरची साफसफाई आणि खोलात शिरताच बदली.
पुन्हा काही काळात जैसे थे!
जसे इलास्टिक थोडे ताणले आणि सोडले की पुन्हा पूर्ववत होते.
पण यावेळी ते इलास्टिक लिमिटच्या पुढे ताणायचे आहे. आणि यासाठी आपल्या सर्वांना जबाबदारी उचलून त्यांना सपोर्ट करायचा आहे. यंदा तुकाराम मुंढे सरांची बदली होऊ द्यायची नाहीये. गरज पडल्यास यंदा "जेन मिलेनियल" आंदोलन करा. कारण हा आपल्याच मुलांच्या आरोग्याचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे. जो पर्यंत भ्रष्ट आणि भेसळयुक्त फूड इंडस्ट्री वरपासून खालपर्यंत पूर्णपणे बदलत नाही तोपर्यंत आता हा लढा आपल्या सर्वांचा आहे.
त्यांच्या एकेका लेटेस्ट कारनाम्याची या धाग्यावर अपडेट देत राहूया. एकमेकांना सतर्क करूया. आणि तुकाराम मुंढे सरांना सपोर्ट करूया!
जय हिंद !!
थोडी सध्याची कामगिरी मी
थोडी सध्याची कामगिरी मी गुगलून देतो.
मे २०२६ मध्ये त्यांची महाराष्ट्र FDA अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी पदभार स्वीकारताच अन्न भेसळ करणाऱ्यांविरुद्ध राज्याचा इतिहासिक सर्वात मोठा धडक मोर्चा उघडला.
अवघ्या २ महिन्यांत त्यांनी राज्यभरातील हॉटेल्स, दुग्धशाळा आणि गोदामांवर १,१०० हून अधिक धाडी टाकल्या.
कोट्यवधी रुपयांचे बनावट दूध (सुमारे १.६ लाख लीटर), कृत्रिम पनीर आणि घातक औषध साठे जप्त केले.
२३५ हून अधिक एफआयआर (FIR) नोंदवले गेले, २७४ पेक्षा जास्त दुकाने/युनिट्स सील करण्यात आली आणि ३५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली.
जेव्हा हायकोर्टाने त्यांना विचारले की "तुम्ही फक्त खाजगी कँटीनवरच कारवाई का करत आहात?", तेव्हा मुंढे यांनी दुसऱ्याच दिवशी थेट बॉम्बे हायकोर्टाच्या स्वतःच्या कँटीनवर छापा टाकून तिथल्या त्रुटी समोर आणल्या
छान. वाचतोय!
छान. वाचतोय!
लोक सतत विचारत असतात की मोदी नाही तर कोण? विरोधी पक्षात कोण आहे. विरोधी कोणी नाही म्हणून मग मोदी.
तर आता एक चांगला माणूस मिळाला आहे तर सध्याच्याच सरकार मध्ये त्याला पाठिंबा देणे तरी सहज शक्य असावे. त्यासाठी काही कॉंग्रेसला मत देण्याची जरुरी नाही. तुकाराम मुंढे, छान चालू आहे!
दूधावर कारवाई झाली अजित पवार
दूधावर कारवाई झाली राष्ट्रवादी दादा गटाच्या डेअर्यांवर, विकेट गेली काका गटाची,
आजच ताईचं स्टेटमेण्ट आलंय "डीलिमितेशन बिलाला विरोधाचं कारणच नाही"
एप्स्टीन फाईल्स, अदानी प्रकरण सगळं झाकोळलं कि.
२१ वर्षात २५ बदल्या...
२१ वर्षात २५ बदल्या... आधीच्या सरकारांनी पण बदल्या केलेल्या आहेत, म्हणजे मुंढे साहेब चांगलेच काम करत आहेत.
तुकाराम मुंढे मी तर ह्यांच्या
तुकाराम मुंढे मी तर ह्यांच्या कामाची फॅन झालेय. मस्त सोलवटत आहेत भेसळ वाल्यांना. डायरेक्ट रीलायन्स स्टोर वर धाड टाकली म्हण्जे काय गट्स आहे माणसात
पण मला त्यांच्या सुरक्षेची फार काळजी वाटते, खूप शत्रू करून ठेवलेत साहेबांनी.
रुन्मेष तू सही जा रेला है अब
रुन्मेष तू सही जा रेला है अब
जरा जपून. कोणताही अधिकारी हा
जरा जपून. कोणताही अधिकारी हा जनतेचा नोकर असतो, त्यामुळे कोणाचाही नको तेवढा उदोउदो करण्याचे अजिबात कारण नाही.
खालच्या व्हिडिओत मुंबई तकच्या ओंकार वाबळे यांनी मुंढे यांच्या ७० लाखाच्या फर्निचर्बद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सर्व डॉक्युमेंटस दाखवली आहेत.
https://www.youtube.com/watch?v=F0lK7d-Zfo8
IAS तुकाराम मुंढेंनी एका रात्रीत बांधकाम विभागाकडून पावत्या क्लिअर कशा केल्या?Exclusive ‘मुंबई तक’वर
मलबार हिल च्या अवंती या शासकीय निवासस्थानात दिव्यांग खात्याचे अधिकारी असताना त्यांनी ६५ ते ७० लाखांचे इंटिरियर डिझाईनचे बील केले असे वाबळे हे कागदपत्रानुसार दाखवून देत आहेत. तेही म्हणे चार वर्षांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने या शासकीय निवासस्थानांसाठी ८-९ कोटींची बीले काढली असताना! एका शॉवरची किंमत ७०,००० रुपये! किचनमध्ये जे बदल करण्यात आले त्याचा खर्च १२ ते १५ लाख रुपये आहे. आणि ही सर्व बीले साबांवि कडून एका रात्रीत क्लिअर झाली. आधीचे फर्निचर असताना, फक्त माझ्या आवडीचे फर्निचर नाही म्हणून पुन्हा हा शासकीय खर्च तुमच्या आमच्या कराच्या पैशातून करणे हे कितपत योग्य आहे? नियमात बसवले गेले असेल कदाचित पण नैतिक तर नक्कीच नाही. महाराष्ट्राची आर्थिक घडी प्रचंड विस्कटलेली आहे, कर्जाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे, शेतक र्यांना द्यायला पैसे नाहीत, पण हे अधिकारी त्याच वेळी केवळ हातात अधिकार आहेत म्हणून असे खर्च करत आहेत.
लोकसत्ताचा मुंढे मार्गाच्या मर्यादा हा अग्रलेख मुंढे यांच्या कार्यपध्दतीबद्दल काही भाष्य करतो. असे 'हिरो' अधिकारी जाईल तिथे आपला दबदबा जरूर निर्माण करतात पण ते व्यवस्था सुधारतात का? समाजाल केवळ नायक मिळवून देणे एवढेच करायचे असेल तर अवघड आहे. आपला समाजही अशांना डोक्यावर घेऊन नाचतो. खरे तर सरकारी अधिकारी हे आपले नोकर आहेत आणि जनतेचा त्यांच्यावर वचक असला पाहिजे, त्यांचा जनतेवर नको!
बदली होऊ नये म्हणून आंदोलन
बदली होऊ नये म्हणून आंदोलन करणार असाल तर माझा सहभाग नोंदवून घ्या.
या धाग्यावरच नाव नोंदणी व्हावी.
माहितीसाठी प्रश्न - बदली कधीपासून झालीये?
आंदोलन हिंसक असणार कि शांततामय?
जनतेचा त्यांच्यावर वचक असला
जनतेचा त्यांच्यावर वचक असला पाहिजे, त्यांचा जनतेवर नको!
>>>>>>>
म्हणजे नक्की काय?
म्हणजे त्यांना कर्तव्यदक्ष
म्हणजे त्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी नको जे हिरो बनतील.
त्यांना भ्रष्ट अधिकारी हवे आहेत ज्यांना आपण शिव्या घालू शकतो.
मतलब ये अलग लेव्हल का लॉजिक है
जोक्स द अपार्ट,
एखादा अधिकारी आपले कर्तव्य बजावतो आणि हिरो बनतो याचा अर्थ आपली सिस्टीम किती भ्रष्ट झाली आहे बघा जिथे हे इतके दुर्मिळ झाले आहे.
कठीण परिस्थिती आहे एकंदरीत.
कठीण परिस्थिती आहे एकंदरीत.
नेमलेल्या/ किंवा in his credit एक खडतर परीक्षेचा टप्पा पार करून आलेल्या एका नोकरशहा/ ब्युरोक्रॅटने आपले नेमून दिलेले काम केले म्हणून सिंघम ?
सिनेमा विश्वातून काही काही बाबींत बाहेर आलेले बरे पडेल थोडे.
********
यंदा तुकाराम मुंढे सरांची बदली होऊ द्यायची नाहीये. गरज पडल्यास यंदा "जेन मिलेनियल" आंदोलन करा.
*******
बदली होऊ द्यायची नाही म्हणजे काय ? अन् असे आमचे लाडके एसपी साहेब/ कलेक्टर साहेब/कमिश्नर साहेब जाऊ देऊ नका म्हणून असली भरपूर आंदोलने/ स्टंट जनता/ हितसंबंध गुंतलेले खादी पेहेरणारे सगळे करतात. IAS IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र सरकार, राज्याचे मुख्य सचिव, गृहमंत्री आणि संबंधित खात्याचे कॅबिनेट मंत्री मिळून ठरवतात, त्याला स्पेसिफिक रुल्स आहेत (सी.सी.एस. १९६४) त्याला काय करणार ?
तूर्तास इतकेच
<<<< बदली होऊ द्यायची नाही
<<<< बदली होऊ द्यायची नाही म्हणजे काय?
>>>
शब्दशः घेतले का
<<<<< नेमलेल्या/ किंवा in his credit एक खडतर परीक्षेचा टप्पा पार करून आलेल्या एका नोकरशहा/ ब्युरोक्रॅटने आपले नेमून दिलेले काम केले म्हणून सिंघम ?
>>>>
छे हो..
आधीचे सुद्धा सगळे... in his credit एक खडतर परीक्षेचा टप्पा पार करून आलेले एक नोकरशहा/ ब्युरोक्रॅट... वगैरे वगैरे असूनही त्यांनी कधी हे काम केले नाही जे यांनी केले म्हणून सिंघम
बाकी सिंघम नाव मी दिले नाही. लोकांनी प्रेमाने दिलेले आहे. जसे गॉड ऑफ क्रिकेट, किंग ऑफ बॉलीवूड, Hit-Man वगैरे... सर्वांनी वापरलेच पाहिजे असे गरजेचे नाही. तसे म्हणतात म्हणून जस्ट फॉर इन्फॉर्मेशन लिहिले आहे. उद्या तुम्ही म्हणाल आमच्यासाठी सचिन गॉड ऑफ क्रिकेट नाही तर इतरांनी सुद्धा हे मायबोलीवर कुठे लिहायचे नाही का
२१ वर्षात २५ ट्रान्सफर!
२१ वर्षात २५ ट्रान्सफर!
महाराष्ट्राचे सिंघम!
ते अजून आपल्यात आहेत हीच एक अचिव्हमेंट.
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये थोडीफार वरवरची साफसफाई आणि खोलात शिरताच बदली.
पुन्हा काही काळात जैसे थे!
जसे इलास्टिक थोडे ताणले आणि सोडले की पुन्हा पूर्ववत होते.
पण यावेळी ते इलास्टिक लिमिटच्या पुढे ताणायचे आहे. आणि यासाठी आपल्या सर्वांना जबाबदारी उचलून त्यांना सपोर्ट करायचा आहे. यंदा तुकाराम मुंढे सरांची बदली होऊ द्यायची नाहीये. गरज पडल्यास यंदा "जेन मिलेनियल" आंदोलन करा. कारण हा आपल्याच मुलांच्या आरोग्याचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे. जो पर्यंत भ्रष्ट आणि भेसळयुक्त फूड इंडस्ट्री वरपासून खालपर्यंत पूर्णपणे बदलत नाही तोपर्यंत आता हा लढा आपल्या सर्वांचा आहे.
त्यांच्या एकेका लेटेस्ट कारनाम्याची या धाग्यावर अपडेट देत राहूया. एकमेकांना सतर्क करूया. आणि तुकाराम मुंढे सरांना सपोर्ट करूया!
जय हिंद !! >>>
काय काय शब्दशः घ्यायचे आहे आणि नाही?
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbswmMexo5c/?igsh=MWpweGtramsxM3V4Mg==
हायकोर्ट कॅन्टीन बंद केले याचे कारण मला वाटलेले तेथील खराब दर्जा असेल. पण आता कारण बघितले तर चक्रावून गेलो. लायसन नव्हते त्यांच्याकडे. कमाल आहे. दिव्याखाली अंधार
छे हो..
छे हो..
आधीचे सुद्धा सगळे... in his credit एक खडतर परीक्षेचा टप्पा पार करून आलेले एक नोकरशहा/ ब्युरोक्रॅट... वगैरे वगैरे असूनही त्यांनी कधी हे काम केले नाही जे यांनी केले म्हणून सिंघम Happy
कोणी कधीच काहीच केले नसते तर इथपर्यंत पोचलो नसतो आपण, असो ! पण तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, लोकप्रमखातर सिंघम नाव ठेवले म्हणता मग चालू दे, थांबवा ट्रान्स्फर आम्ही आहोत सोबत.
राज अज्ञानी ह्यांच्या प्रश्नाला +१ करतो
मलाही आधीच्या अधिकाऱ्यांनी
मलाही आधीच्या अधिकाऱ्यांनी नक्की काय काम केले हाच प्रश्न पडतो.
कारण त्यांनी जितके काम केले असते तितके यांच्यासाठी कमी शिल्लक राहिले असते.
आता वरच बघा ना लायसनशिवाय खुद्द हायकोर्टातील कॅन्टीन चालू होते आणि त्यांनाच पत्ता नाही
असो, तुमचे नाव ठेवणे चालू द्या.
मी उद्या काही महत्वाच्या घडामोडी शेअर करतो....
शुभरात्री !
कशेडी घाटात चकवा लागला कि एका
कशेडी घाटात चकवा लागला कि एका ढाब्यावर फिरून फिरून येतं माणूस.
त्या ढाब्यावर रेड हाणा मुंडेसाहेब.
असो, तुमचे नाव ठेवणे चालू
असो, तुमचे नाव ठेवणे चालू द्या.
मी कुठे नाव ठेवतोय ? उगाच गिल्ट ट्रिपिंग देऊ नये लोकांना अर्थात आता तुमचा धागा त्यामुळे तुमचेच बरोबर. चालू देत.
धाग्याचा हेतू अन्नाविषयक चालू
धाग्याचा हेतू अन्नाविषयक चालू घडामोडी संदर्भात जागरूकता पसरवणे होता तिथे तुमचे यांना सिंघम म्हणू नका, यांचे इतके कौतुक करू नका, हिरो बनवू नका, आधीच्यांनी सुद्धा अमके धमके केले आहे, यांचे हे कामच आहे वगैरे चालू झाले.. जणू देशात कर्तव्यदक्ष अधिकारी दर दुसऱ्या घरात जन्माला येतात..
असो, त्यांना ग्रेट म्हणा किंवा नका म्हणू...
माझ्यापुरता इथून पुढे हा विषय कट.
जे सामान्य जनतेला उपयुक्त ठरणारे आणि अवेअरनेस वाढणारे असेल ते मी शेअर करतो. आणि सर्वांनी असेच करावे अशी अपेक्षा ठेवतो.
धाग्याचा हेतू अन्नाविषयक चालू
धाग्याचा हेतू अन्नाविषयक चालू घडामोडी संदर्भात जागरूकता पसरवणे होता >>
यंदा तुकाराम मुंढे सरांची बदली होऊ द्यायची नाहीये याचा अर्थ असा आहे हे आधी माहीत नव्हतं.
>> त्याला स्पेसिफिक रुल्स
>> त्याला स्पेसिफिक रुल्स आहेत (सी.सी.एस. १९६४) त्याला काय करणार >> बदली करणाचा रुल समजा सांगत असेल सहा महिने बदली होऊ शकत नाही आणि सरकारने सहा महिने १ दिवसाने बदली केली तर ती नियमात झाली. पण ती तशी होऊ नये म्हणून सामान्य आणि जागृक नागरिक काही करत असतील, दबावगट निर्माण करत असतील तर ते करणे ही नियमातच बसते. उद्या आपली मते जाणार हे सरकारला समजले तर ते बदली करणार नाहीत, हे ट्रॅन्झॅश्ननल आहे आणि असणारच आहे. तुम्ही नागरिकांच्या मनोधर्यावर थंड पाणी ओतत आहात, हे जाणुनबुजुन करताय का विरोधासाठी विरोध यात कल्पना आणि स्वारस्य नाही.
दरवेळी नियमच आहे सांगण्यात गंमत नसते. नियम आपल्यासाठी आहेत. आपण केवळ नियम पाळायला जन्मलेलो नाही.
धाग्याचा हेतू अन्नाविषयक चालू
धाग्याचा हेतू अन्नाविषयक चालू घडामोडी संदर्भात जागरूकता पसरवणे होता तिथे तुमचे यांना सिंघम
सलामीलाच अन्न भेसळ इत्यादी बद्दल इतके accurate विवेचन वाचून confuse झालो होतो इतकेच बाकी काही नाही. तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, चालू देत.
*******
@अमितव
पण ती तशी होऊ नये म्हणून सामान्य आणि जागृक नागरिक काही करत असतील, दबावगट निर्माण करत असतील तर ते करणे ही नियमातच बसते.
अलबत, बसतेच. But it has a futility factor. Whether you like it or not. कारण सरकार भयानक कोडगे असते ह्या बाबतीत.
उद्या आपली मते जाणार हे सरकारला समजले तर ते बदली करणार नाहीत, हे ट्रॅन्झॅश्ननल आहे आणि असणारच आहे. तुम्ही नागरिकांच्या मनोधर्यावर थंड पाणी ओतत आहात, हे जाणुनबुजुन करताय का विरोधासाठी विरोध यात कल्पना आणि स्वारस्य नाही.
कागदोपत्रीआपण तत्वतः म्हणू, बरोबरच असेल पण प्रॅक्टिकली भारतात अशा प्रेसिडेन्सची वानवा आहे, मते जाण्याची भीती ही अन्न भेसळ / आरोग्य इतकी क्षुल्लक नसते दुर्दैवाने भारतात तर मंदिर/मशीद/गोमांस/शरिया इत्यादी इत्यादी उदात्त असते. Just a small reality check a bad idea sir. No cold water splash intended. मी हे जाणून करतोय का विरोधाला विरोध हा प्रश्न उरता, मला काही विरोधाचा खास लाभ नाही, सहज वाटले बोलावे तर बोललो. तसे पाहता मी नागरिक मनोधैर्य इत्यादींवर प्रभाव टाकण्यालायक महत्वाचा असेन हे मला तुम्ही सांगेपर्यंत वाटले नव्हते हां.बाकी, मी विरोध करतोय ही सोयीस्कर मांडणी करून नंतर स्वारस्य नाही पण म्हणताय अन् कल्पना नाही पण म्हणताय, हे म्हणजे घोडा चतुर झाले, स्वारस्य नसते तर कल्पना नसल्याचे तरी कशाला नमूद करावे! जेम्या तू असलाच आहेस म्हणून मोकळे व्हावे. तसे पाहता जागरूक नागरिक इत्यादी इत्यादी मुळे का फक्त तुमच्या मर्जीतल्या कोणाच्या तरी धाग्यावर रिॲलिटी चेक दिल्यामुळे तुम्ही बोलता आहात का हे जाणण्यात मला स्वारस्य आहे, पण त्याची कल्पना खचित जास्त नाही किंवा मी तुम्हाला तसे stereotype पण केले नाहीये हा.
दरवेळी नियमच आहे सांगण्यात गंमत नसते. नियम आपल्यासाठी आहेत.
सहमत, फक्त मी लिहिले म्हणून मी समर्थन करतोय किंवा sadist मेंटलिटी ने लिहितोय असा सोयीस्कर समज करून मला ब्युरोक्रेटिक एथिक्सचे फुकट डोस पाजण्यात हशील नसेल. सरकार रुक्ष असते अन् ते अशा पळवाटा कायम काढते हे सांगणे सुद्धा रुक्ष असू शकते हे मला पूर्ण समजते. पण त्यामुळे तुमच्या लाडक्या सभासदाच्या लेखनावर मी पाणी ओततोय असा होत नाही तर कदाचित वैषम्य, अनुभवातून आलेला थकवा, अन् सरकार नामक लतकोडग्या व्यवस्थेत पुरेपूर डोके आपटून आलेल्या अनुभवामुळे आलेला एक उद्वेग असू शकतो इतकी शक्यता माझ्या खात्याला तुम्ही उदारमानाने जमा केली तर आज तुमचे उपकार मानून इंटरनेट वरील मनाला लावून घेण्यालायक वाद मागे टाकून दोन घास जेवून घेईन म्हणतो.
आपण केवळ नियम पाळायला जन्मलेलो नाही.
आता एक प्रयोग करा, जीवावर बेतनार नाही असेच (strictly) काही नियम तोडा, म्हणजे बघा नो पार्किंग मधे उभे राहणे, किंवा सिटी कौन्सिल सोबत मनमर्जी अडणे असे काहीसे आणि त्याचे प्रेमपत्र आले की वरील वाक्य रिप्लाय म्हणून द्या पाठवून ! तुमचेही जरा ऑन जॉब ट्रेनिंग होऊन जाईल !. Catchy लाइन्स कितीही मांडल्या तरी आपण नियम पाळून कर भरण्यापुरतेच आहोत हे अभागी सत्य कधीच दुर्दैवाने ही खोटे नसेल. पिरियड.
ओके. हेडर पोस्ट चुकली. मी
ओके. हेडर पोस्ट चुकली. मी सिंघम उल्लेख नव्हता करायला पाहिजे. त्यांना सिंघम का म्हणतात यापेक्षा इतर बरेच मुद्दे या संदर्भाने महत्त्वाचे आहे आपण त्याकडे वळूया..
--------------
खालील नियमाची अंमलबजावणी आमच्या मुलांच्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये झाली आहे
बालपणातील लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी आणि निरोगी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खाजगी शाळांच्या कॅन्टीनमध्ये आणि शाळांच्या परिसराच्या ५० मीटरच्या त्रिज्येमध्ये एचएफएसएस (उच्च चरबी, साखर आणि मीठ) जंक फूडच्या विक्री, वितरण आणि जाहिरातीवर बंदी घातली आहे.
प्रतिबंधित खाद्यपदार्थ -
तळलेले पदार्थ: वडा पावसमोसे, बर्गर आणि फ्रेंचफ्राईज.
पॅक केलेले खाद्यपदार्थ: चिप्स, प्रक्रिया केलेले कुरकुरे, चॉकलेट, कँडी आणि पेस्ट्री.
पेये: शीतपेये, कार्बोनेटेड पेये आणि साखरयुक्त एनर्जी ड्रिंक्स.
मिठाई: आइस्क्रीम आणि जास्त साखर असलेले गोड पदार्थ.
अंमलबजावणी आणि नियम
५०-मीटर क्षेत्र: स्थानिक विक्रेते आणि जवळपासची दुकाने शाळेच्या गेटजवळ या वस्तू विकू किंवा त्यांची जाहिरात करू शकत नाहीत.
शाळेचे उत्तरदायित्व: शाळेच्या आवारात नियमांचे पालन करून घेण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांवर आहे.
पर्यायी प्रोत्साहन: संस्थांना ताजी फळे, दूध, ताक आणि संपूर्ण धान्य यांसारखे आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चांगले केलेय.
चांगले केलेय.
परत सुरू केले हळुहळु तर
पालकांनी (पालकांचा भरोसा नाही, वडापाव, समोसा, आईसक्रीम, स्वीट्स वगैरे अनेकांचा जीव की प्राण
-हलके घ्या, आणि आपापली दैवते सत्तेत असली की ते बोलतील की नाही सांगता येत नाही -हलके घेऊ नका) जेन अल्फानेच त्याविरुद्ध आवाज उठवायला हवा.काय अंक!!
काय अंक!!
तुम्हाला आलेला उद्वेग तुमच्यापाशी ठेवाल का? प्लीज अंकल? सतत किरकिऱ्या म्हाताऱ्यासारखं बोलणं नक्क्को ना अंकल!
तुकाराम मुंढे चांगलं काम करत
तुकाराम मुंढे चांगलं काम करत आहेत. त्यांना शुभेच्छा.
तुकाराम मुंढे यांची बदली नाही
तुकाराम मुंढे यांची बदली नाही झाली पाहिजे. बऱ्याच दुकानातून पनीर गायब झालंय. खावा विकणारी मंडळी खावा रस्त्यावर टाकून पसार झालीत. बऱ्याच हॉटेल्स वर धाडी पडल्या आहेत.
मनोज जरांगे यांनी अधीच सरकारला बदलीबाबत इशारा दिलाच आहे, आपल्या सारख्या नागरिकांनीही जर त्यांचे काम आवडत असेल तर सरकार वर कोणत्याही प्रकारे दबाव टाकला पाहिजे.
मुंढे चांगले कामं करत आहेत.
तुकाराम मुंढे यांनी चायनीज,
तुकाराम मुंढे यांनी चायनीज, लॉलीपॉप, शेजवान, केपसा अशा पदार्थांमधील लाल कलर गायब केला.
https://www.instagram.com/reel/Db7yp6dT_sF/?igsh=Zm9yNjFiZmxsNTVo
हा आमच्या माझगाव नाक्यावरचा व्हिडिओ. यातून समजले की आमच्या येथील फेमस केपसा बिर्याणी मधून सुद्धा रंग गेला
बिर्याणीचा रंग गेला म्हणजे
बिर्याणीचा रंग गेला म्हणजे नक्कीच काही तरी चुकीचं वापरत असणार. आज पर्यंत किती तरी लोकांनी असले पदार्थ आवडीने खाल्ले असतील.
काय अंक!!
काय अंक!!
तुम्हाला आलेला उद्वेग तुमच्यापाशी ठेवाल का? प्लीज अंकल? सतत किरकिऱ्या म्हाताऱ्यासारखं बोलणं नक्क्को ना अंकल!
बरोबर, बोलायला मुद्दे उरले नाहीत का असले काहीसे चाबरे बोलून अहंगंड सुखावून घ्यायचा अन् एखाद्याला टार्गेट मार्क केल्यासारखे ऑनलाईन बुली करण्याचा प्रयत्न करायचा. दुसरे काय करणार आपण.
माझ्या अगोदर पण बरेच सभासद सेम लाईन वर ह्याच धाग्यात बोलून आहेत पण ठीक आहे.
@ ऋन्मेऽऽष,
तुझ्या हेतूवर शंका नव्हती मित्रा, कधीच. पण तुकाराम मुंढे म्हण का अजून कोणी उदात्तीकरण पटले नाही इतकेच. तू मुलांच्या शाळेभोवती घातलेली जी बंधने सांगितलीस ती तर आवडलीच आवडली. एकंदरीत आता पालकांचा पण भाग मोठा असेल, सरकारने तर कायदा दाखवून फटक्यात शाळेभोवती समोसे वडापाव स्टींग अँड रेडबुल बंद केले, पण पोरांना जी सवय अन् चव ह्या खाण्याची लागली आहे त्यापासून त्यांना (त्यांच्या बालसुलभ हट्टाला अगदीच न दाबता) बाहेर काढणे एक टास्क असणार आहे इतके नक्की.
(तुझ्याकडून विषयावर बोलण्याच्या ग्वाहीमुळे माझ्याकडून सुद्धा तशीच ग्वाही, खुदागवाह) वांड खान पठाण !
Pages