२१ वर्षात २५ ट्रान्सफर!
महाराष्ट्राचे सिंघम!
ते अजून आपल्यात आहेत हीच एक अचिव्हमेंट.
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये थोडीफार वरवरची साफसफाई आणि खोलात शिरताच बदली.
पुन्हा काही काळात जैसे थे!
जसे इलास्टिक थोडे ताणले आणि सोडले की पुन्हा पूर्ववत होते.
पण यावेळी ते इलास्टिक लिमिटच्या पुढे ताणायचे आहे. आणि यासाठी आपल्या सर्वांना जबाबदारी उचलून त्यांना सपोर्ट करायचा आहे. यंदा तुकाराम मुंढे सरांची बदली होऊ द्यायची नाहीये. गरज पडल्यास यंदा "जेन मिलेनियल" आंदोलन करा. कारण हा आपल्याच मुलांच्या आरोग्याचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे. जो पर्यंत भ्रष्ट आणि भेसळयुक्त फूड इंडस्ट्री वरपासून खालपर्यंत पूर्णपणे बदलत नाही तोपर्यंत आता हा लढा आपल्या सर्वांचा आहे.
त्यांच्या एकेका लेटेस्ट कारनाम्याची या धाग्यावर अपडेट देत राहूया. एकमेकांना सतर्क करूया. आणि तुकाराम मुंढे सरांना सपोर्ट करूया!
जय हिंद !!
उदात्तीकरण मला तरी अगदीच खटकत
उदात्तीकरण मला तरी अगदीच खटकत नाहीये. कुठे तरी लाखांत १ प्रामाणिक माणुस आपलं कर्तव्य बजावतोय, कुठल्याही राजकिय दबावा ला भिक न घालता, ही कौतुकास्पद गोष्ट आहे & आम्ही जनता त्याचा उदो उदो करणारच. कोणाला आवडो वा न आवडो.
माहीत आहे ते त्यांचे काम करत आहेत, पण ज्या दबावा खाली, लाच, धमक्या, कलुषित सीस्टम मधे ते काम करत आहेत, ते सोपं असतं ना, तर कित्त्येक आयएएस अधिकार्यांचा उदो उदो आज वर झाला असता ना?
ऑनलाईन बुली कि कबुली.
ऑनलाईन बुली कि कबुली.
काही आयडी अधिकृतपणे बुली करू शकतात. असा नियम आहे का हे माहीत नाही पण हे असं आहे. त्यांच्या बद्दल कुणाचीच तक्रार नसते. यातला एक आयडी व्हिक्टिम कार्ड खेळणाऱ्या भोकाडपटूचा असण्याची शक्यता जास्त आहे. ते उडत नाहीत यावरून काय ते समजून घ्या.
गेली 12 वर्षे (मायनस ठाकरे सरकार 2 वर्षे) फडणवीस सत्तेत सहभागी आहेत. पैकी अडीच वर्षे ते उपमुख्यमंत्री आणि इतर काळ मुख्यमंत्री आहेत. शिंदे जरी मख्खमंत्री होते तरी पाळण्याची दोरी फ20 यांच्या कडेच होती.
या संपूर्ण कारकिर्दीत अन्न व औषधे विभागाचा कारभार सुधारावा असे फ20 यांना का वाटले नाही?
तुकाराम मुंढे हे उत्कृष्ट अधिकारी आहेत. त्यांच्या कामाची शैली अन्न व औषधे विभागासाठी उपयुक्त आहे. कारण इथे हेच काम अपेक्षित आहे. त्यांना 2014 पासून हा विभाग का दिला नाही?
आता त्यांची रॅंक प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या समकक्ष आहे. त्यांना खालच्या पदावर म्हणजे आयुक्त पदावर आणले. एव्हढी इमर्जन्सी काय होती?
मुंढेंबद्दल शंका नाही. पण ते सैनिक आहेत. त्यांना फायर म्हटले कि ते इमाने ऐतबार फायर करतात. त्या वेळी ते कुणाचेही ऐकत नाहीत. पण त्यांची पोस्टींग कधी कुठे करायची हे ठरवणारे जे आहेत त्यांचा प्राधान्यक्रम समजत नसेल तर लोकसत्ताने म्हटले तसेच होणार.
उदात्तीकरण व्हावे कि नाही है हा निराळा प्रश्न आहे. सगळे एकत्र आणून खिचडी पकवण्याचा हा प्रकार आहे. धागा उथळपंथी असल्याने असेच होणार. सिरीयस चर्चा हवी असती तर दोन शब्द स्वतःकडून भरीचे घालावेत. अन्नभेसळीबद्दल जागृती अनेक जणांनी केली आहे. वरातीमागून घोडं निघालंय तर लोक मजा घेणारच.
एखाद्या इमानदार आणि धडाडीच्या अधिकाऱ्याचा योग्य वेळी कसा वापर करावा हे राजकारणी लोकांना समजतं. फ20 आपली प्रतिमा उजळून घेत आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दूध डेअऱ्या, दूधसंघ, भेसळखोर कुणाचे आहेत? परिसीमन बिलाला पाठिंबा द्यायला कोण तयार झाले हे बघायचं कि नाही?
खूप झाले ईडी / सीबीआय. या वेळी जरा वेगळा अधिकारी.
डिलिमिटेशन बिल पास झाल्यावर पण कारवाई चालू ठेवणार असतील तर फ20 यांची खणा नारळाने ओटी भरावी लागेल.
यातला एक आयडी व्हिक्टिम कार्ड
यातला एक आयडी व्हिक्टिम कार्ड खेळणाऱ्या भोकाडपटूचा असण्याची शक्यता जास्त आहे. ते उडत नाहीत यावरून काय ते समजून घ्या.
ओके, ह्या हेड्स अप साठी आपले आभार. आता एकंदरीत सौजन्य सप्ताह संपवून आपली मते आपल्या बाह्यांवर मिरवणे सुरू करावे लागेल. माबोवर आलो, थोडे ललित लिहिले, ग्रामीण बाजाच्या कथा लिहिल्या, नंतर लिंक/तार तुटली ती अजून गवसली नाही. हरकत नाही. राजकीय धुरळे तर राजकीय !
@ऋन्मेष,
@ऋन्मेष,
>> म्हणजे त्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी नको जे हिरो बनतील.
त्यांना भ्रष्ट अधिकारी हवे आहेत ज्यांना आपण शिव्या घालू शकतो.
मतलब ये अलग लेव्हल का लॉजिक है Happy
मी एका व्हिडिओची लिंक दिली होती. त्यात मुंडे यांनी सदनिकेसाठी जो अवाढव्य शासकीय खर्च आपल्यासारख्या करदात्यांच्या पैशातून केला होता, त्याचे सविस्तर रिपोर्टिंग होते. त्यांना जी जनतेची काळजी वाटते, ती तेंव्हाही वाटू शकली असती. याचा अर्थ आता जे काम करत आहेत, ते चुकीचे आहे असा नव्हता. किंवा त्याचा अर्थ तुंम्ही अद्भुत तर्कशास्त्र लावून 'त्यांना भ्रष्ट अधिकारी हवे आहेत' असा काढला आहे असाही नव्हता. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाची कार्यपध्दती कुठे व कशी बदलली आहे? नागरिकांच्या तक्रारीवर कसे काम करावे याबाबत काही प्रशासकीय सुधारणा केल्या आहेत का? का फक्त दहशत बसवून व्यक्तीगत प्रतिमा तयार केली जात आहे? तुंम्ही तर डायरेक्ट सिंघम इ. म्हणत आहात! साहेबांच्या भीतीने (?) पनीरवाले पसार असे कोणीतरी म्हणत आहे. याचा नागरिकांना तात्कालीन फायदा होईलही पण यांची बदली झाल्यावर पुन्हा येरे माझ्या मागल्या. हे ज्या विभागात आधी होते, तिथून हे गेल्यावर कार्यपध्दतीत काही टिकाऊ, मूलभूत सुधारणा झाल्याचे माहिती आहे का? हे न बघता उदोउदो करण्याने फारसे काही साध्य होईल असे वाटत नाही, इतकेच म्हणायचे होते.
जनताच जेव्हा शहाणी होईल तेंव्हा कोणताही अधिकारी सरळ काम करेल. पण उदोउदो करणारी जनता असेल तर जनतेची अधिकार्याला जरब वाटणारच नाही. हम करे सो कायदा असे कोणत्याच अधिकार्याने वागता कामा नये. असे अनेक प्रामाणिक अधिकारी आहेत पण ते मुलाखती देणे वगैरे टाळून प्रत्यक्ष टिकाऊ पायाभूत सुधारणा करत असतीलही.
इथल्या पोस्टींमुळे आणि
इथल्या पोस्टींमुळे आणि सोमिवरच्या बातम्यांमुळे एक दोन मुलाखती पाहिल्या यांच्या. एक राजदीप सरदेसाईने घेतलेली आणि इतर एक दोन. सेन्सिबल माणूस वाटतो. चीप टीआरपीखेचक टायटल्स देऊन सोमिवर जशी इमेज तयार करतात तसा नाही.
अंमलबजावणीही सेन्सिबल आहे. जेथे फूड सेफ्टीचा धोका नाही तेथे रेस्टॉ वगैरे चालू ठेवू देतात पण नोटिशीवर अॅक्शन घ्यायला लावतात. जेथे लोकांच्या आरोग्याला धोका आहे तेथे तात्पुरती बंदी आणून बदल केल्यावर पुन्हा इन्स्पेक्शन आणि पास झाले तर पुन्हा सुरू.
यात विक्रेत्यांनी ठरवून केलेली भेसळ (पनीरचे उदाहरण) आणि आपल्याकडचा जनरल निष्काळजीपणा व त्यामुळे निर्माण होणारा धोका यात फरक करावा काय (आरोग्याचा धोका सारखाच असेल), काही काही बाबतीत एफडीए चे नियम पाळायचे तर पदार्थांच्या किमती वाढतील - हातावर पोट असलेल्यांना ते परवडणार नाही वगैरे प्रश्न येतातच. सर्वांचे आरोग्य सारख्याच महत्त्वाचे आहेच पण हे सगळे पाळूनही लोकांना परवडणार्या किमतीत अन्न कसे उपलब्ध करायचे हा प्रश्न उरतोच.
अर्थात हे प्रश्न पॉलिसी व नियम ठरवणार्यांनी सोडवायचे आहेत, त्या नियमांची अंमलबजावणी करणार्यांनी नाही.
गुटखा पान मसाला सारखा व्यसनी
गुटखा पान मसाला सारखा व्यसनी पदार्थांची जाहिरात करणारे खेळाडू कलाकार सुद्धा आता रडार वर येणार...
https://www.instagram.com/reel/Dbp_q4vsF_3/?igsh=MXVvMWsybHZhamsw
Amul शुगर फ्री इज actually not शुगर फ्री..
अश्या फसव्या प्रॉडक्टवर सुद्धा ban येणार..
https://www.instagram.com/reel/Db9OMCgTZsV/?igsh=MXJ2dHhsNzgwMXAwZA==
शाहरूख खान, अजय देवगण आणि
शाहरूख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना मुंडेंनी नोटीसा काढल्या आहेत.
नागांचा सुद्धा सपोर्ट आहे. ते
नागांचा सुद्धा सपोर्ट आहे. ते सुद्धा खुश आहेत
नागांचा एक वेगळा जोक तयार
नागांचा एक वेगळा जोक तयार झाला त्याबद्दल ही तुमुंचे आभार.

झाली बदली.
झाली बदली.
(No subject)
बदली बाबत सरकारी नियम असा
बदली बाबत सरकारी नियम असा आहे कि प्रशासनिक तातडी/ आवश्यकता नसेल ( ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अर्जन्सी/ नेसेसिटी ) सहा महिने झाल्याशिवाय एका शहरातून दुसऱ्या शहरात बदली करू नये. कारण प्रत्येक शहराबाहेरील बदलीसाठी त्या अधिकाऱ्याला एक महिन्याच्या पगाराएवढे शुल्क बदली मूल्य (TRANFER GRANT) म्हणून द्यावे लागते याशिवाय त्यांच्या सामानाच्या वाहतुकी साठी येणार खर्च द्यावा लागतो.
हे एकंदर काही लाखापर्यंत जाते. यामुळे सहा महिन्यांच्या आत शहराबाहेर बदली झाली तर वित्त खात्याकडून त्यावर हरकत घेतली जाते.
पण
त्याच शहरात दुसऱ्या खात्यात बदली किती वेळेस करावी यावर कोणतेही नियंत्रण नाही.
यामुळेच अनेक अधिकारी अनेक बदल्या होऊन सुद्धा आपल्या आवडत्या शहरात कित्येक वर्षे कायम कसे राहतात हे पाहणे रोचक ठरेल.
एक म्हणजे मुंढे साहेबांची २१ वेळा बदली २१ वेगवेगळ्या शहरात झाली कि दोन चार शहरात पण वेगवेगळ्या खात्यात बदली झाली का? हे पाहायला लागेल.
बाकी ते करत असलेले काम हे प्रशंसनीय आहे यात शंकाच नाही. मुंढे साहेबानी नाशिक महापालिकेचे आयुक्त किंवा नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना असेच बरेच दणके दिले होते. तेंव्हा बदली होऊ नये म्हणून आंदोलन केले होते असे आठवते
बऱ्याच वेळेस एखाद्या खात्यात फार घाण साचली असेल तर अशा अधिकार्यांना आणले जाते आणि घाण साफ झाली किंवा अधीकारी डोईजड होऊ लागला कि त्याला दुसऱ्या खात्यात हलवले जाते.
पण हि स्थिती का आली हे पाहणे रोचक ठरेल.
सामान्य माणसाचा "चलता है" हा दृष्टिकोन जोवर बदलत नाही तोवर एकटे श्री मुंढे सारखे अधिकारी आमूलाग्र बदल करू शकतील असे वाटत नाही.
टी एन शेषन, अरुण भाटिया, गो रा खैरनार, असे काही कर्तव्यदक्ष अधिकारी आठवतात.
सामान्य माणसाला स्वतःच्या अंगाला तोशीस न लागता त्यांच्यासाठी लढणारा माणूस हवा असतो
पण स्वतःवर वेळ आली तर माणसे सोपा मार्ग निवडतात असे १०० पैकी ९० वेळेस तरी दिसते.
उदा मॅकडोनाल्ड च्या चटणीत उंदीर निघाला तर त्या आस्थापना वर सामान्य माणसे बहिष्कार टाकतात का? अजिबात नाही. दुसऱ्या दिवशीपासून तेथे तशीच गर्दी होऊ लागते.
रस्त्यावर मिळणारे पदार्थ काय दर्जाचे असतात? हे सर्वाना माहिती असते पण स्वस्त मिळतात म्हणून तेथे गर्दी करणे हे सहजपणे दिसते. मुंबईत कोपऱ्याकोपऱ्या वर दिसणारी उडुपी हॉटेल्स बंद का झाली? याचे हे एक फार महत्त्वाचे कारण आहे.
रस्त्यावर तेच इडली डोसा अर्ध्या किमतीत मिळतात. मग स्वच्छता खड्ड्यात गेली हा आपला दृष्टिकोन आहे.
तेथे हे पदार्थ स्वस्त का मिळतात या ची अनेक कारणे आहेत. एक तर लायसन्स मिळवण्यापासून जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन, कच्च्या मालाचा दर्जा, स्वच्छतेबद्दल उदासीनता इ सर्व बाबतीत एकंदर स्थिती गंभीर असते.
एक उदाहरण- मुंबईत कोंबड्या घेऊन येणारे खुराडी असणारे छोटे ट्रक/ टेम्पो रोज येतात. त्यात एक दोन कोंबड्या मेलेल्ल्या असतात. कोणताही कोंबडीवाला त्या विकत घेत नाही. या कोंबड्या धारावीला नेल्या जातात त्यांचा खिमा केला जातो आणि हा खिमा २५-३० रुपये किलोने हे गाडी वाले विकत घेतात. म्हणूनच त्यांचा ४० रुपयात तुम्हाला चिकन मांचुरियन देणे परवडते.
दुसरे उदाहरण -- मी आमच्या नेहमीच्या आंबेवाल्याकडून हापूस आंबे घेतो. ओट सांगेल तो भाव पण सर्वात उत्तम आंबे घेतो आणि एक आंबा खराब निघाला तरी तो बदलून देतो. काही वर्षांपूर्वी मी त्याच्याकडे आंबे आणण्यासाठी गेलो असता एक चांगल्या घरातील पन्नाशीचं आसपास वयाचे एक जोडपे आले. आंबे वाल्याने मला पाच मिनिटे थांबायला सांगितले. त्या जोडप्याने तीन चार डझन देठाशी काळे झालेले/ खराब झालेले आंबे १२० रुपयेडझन भावाने विकत घेतले आणि ते गेले. तेंव्हा चांगल्या आंब्यांचा भाव ६००-७०० रुपये डझन होता. मी त्याला विचारले कि हे चांगल्या घरातील लोक असे आंबे का घेऊन गेले?
त्यावर त्याने मला विचारले तुम्हाला माहिती नाही का? यांचा पलीकडे फ्रुट ज्यूस चा स्टॊल आहे. त्याच्यासाठी हे असले आंबे घेऊन जातात.
मी अवाक झालो.
आज एक चांगला लेख वाचला.https:
आज एक चांगला लेख वाचला.
https://www.indiatoday.in/sunday-special/story/indian-bureaucracy-corrup...
सुबोध खरे यांच्या वरील
सुबोध खरे यांच्या वरील प्रतिक्रियेशी १००% सहमत आहे. "चलता है" आणि "जुगाड" हा दृष्टिकोन भारतात ठासून भरला आहे. स्वस्त मिळते तिथेच धावण्याची वृत्ती जात नाही, तोपर्यंत मुंढे यांच्यासारखे १०० अधिकारी आले तरी काही उपयोग होणार नाही.
स्वच्छता पाळून आहे त्या दरात
स्वच्छता पाळून आहे त्या दरात देणं अवघड नसावं.
हॉटेलचं जागेचं भाडं, वीज, कामगारांचे पगार इ ओव्हरहेडस असतात. पण ठेलेवाल्यांना मनपा, पोलीस यांचे हफ्ते देऊन फुकट पार्सल्स देऊन हिशेबात जास्त फरक पडत नसावा. कामगारांचे पगार हा फरक जास्त असेल. हॉटेलनधे घुसण्याआधी पार्किंगचा मोठा प्रश्न असतो. ठेलेवाल्याकडे पाच मिनिटात पार्सल घेऊन जाता येतं हा अॅडव्हांटेज आहे.
बाहेर नॉन व्हेज खाऊच नये. खूप इछा झाली तर अंड्याचे पदार्थ घ्यावेत. फ्रूट ज्यूस, मिल्क शेकस हे बाहेर कधीही घेऊ नयेत. मी बाहेर फळं घेतो. खूप भूक लागली आणि नाईलाज असेल तर केळ घेतो. दिल्लीत जे काही बघितलंय ते इथे देऊ शकत नाही. इथे सांगितलं तरी लोक बाहेर काहीही खाण्याची हिंमत करणार नाहीत. दिल्लीच कशाला, पूर्ण उत्तर भारतातली गर्दीची शहरे, तीर्थस्थळं डेंजर आहेत. दृष्टीआड सृष्टी.
खरे आजोबा, बदली झाल्या झाल्या
खरे आजोबा, बदली झाल्या झाल्या तुम्ही कसे उगवलात अचानक धुमकेतुसारखे? किती भंपक असावं यार एखाद्याने!
बदल्यांविषयी इतकी आतल्या गोटातली माहिती आहे तर आधीपासून ज्ञानदान सुरू करायला हवं होतं. असं आयत्या वेळी सोयीस्कर उगवलं की लोक हलकट म्हणतात. तुमच्या चांगल्यासाठी सांगतो.
व्हिक्टिम ब्लेमिंगचा उत्कृष्ट
व्हिक्टिम ब्लेमिंगचा उत्कृष्ट नमुना आहे वरची पोस्ट.
तुमचे मोदी एक नंबर खोटारडे आहेत तुम्ही ही मान्य कराल. का बहिष्कार टाकला नाही ते मनाला विचारा. तेच उत्तर आता लोक का बहिष्कार टाकत नाहीत ला तंतोतंत लागू आहे.
फूड - अन्न हा अथ पासून इति पर्यंंत हायली रेग्युलेटेड बिझनेस आहे. मग ते रस्त्यावरील अन्न असेल का मॅक्डोनाल्डचे किचन का उड्डुपी हाटेल. असं असताना लोक रस्त्यावर खातात वगैरे मल्लिनाथी अगम्य आहे.
बहिष्कार का टाकत नाही!
जगातील प्रत्येक देशात थोडा खराब झालेला माल विकायला परवानगी आहे. ते बंद केलं तर किती भयंकर फूड वेस्ट होईल कल्पना करू शकणार नाही. अमेरिका कॅनडात थोडे दबलेले टमेटो, संत्री, थोडा एका साईडहुन रंग बदललेली लिंबे, इ. इ. अनेक गोष्टी सर्रास लीगली विक्रीला असतात. ग्राहकांचे थोडे पैसे वाचताना, विक्रेत्यांचा थोडा तोटा कमी होतो आणि महाप्रचंड फूड वेस्ट वाचते. अशा गोष्टी शिजवून/ प्रक्रिया करुन वापरल्याने आरोग्याला धोका पोहोचत नाही. किंवा तो राजिखुषी घेतलेला निर्णय असतो.
उच्चासनी पोस्ट ही लिहिताना ती कशावर उभी आहे भान ठेवा!!!
ते लोक १५० रु चे आंबे विकत घेत आहेत म्हणून तुम्हाला ७०० ला आंबा मिळतोय. १५० चे सगळे आंबे कचर्यात गेले असते तर तुमचा आंबा २००० झाला असता.
सुबोध खरे यांच्या वरील
सुबोध खरे यांच्या वरील प्रतिक्रियेशी १००% सहमत आहे.
जगातील प्रत्येक देशात थोडा
जगातील प्रत्येक देशात थोडा खराब झालेला माल विकायला परवानगी आहे. >>
Excuse me. म्हणजे थोडीशी बुरशी आलेले चीज, खराब भाग काढून अमेरिका कॅनडात विकता येते का? खराब म्हणजे spoilt की expired?
फूड - अन्न हा अथ पासून इति पर्यंंत हायली रेग्युलेटेड बिझनेस आहे. >> तुकाराम मुंढे हे त्याच रेग्युलेशनची अंमलबजावणी करत आहेत. बाकी अन्न भेसळीच्या विषयात अचानक मोदी आणायचे प्रयोजन काय, ते कळले नाही.
बुरशी आलेले चीज हा एक जोकच
बुरशी आलेले चीज हा एक जोकच झाला, पण ते असो.

तुम्हाला स्टॉ मॅन करुन रँडम गोष्टींना धोपटायचे असेल तर खुषाल तसं करा. मला रस नाही.
असुरक्षित दृष्ट्या खराब झालेला माल अर्थात विकायला परवानगी नाही. मीट/ दूध-दुग्धजन्य यातही पोटभेद आहेत. पण बेस्ट बिफोर तारिख उलटून गेलेला माल विकता येतो. वर आंब्यांचे उदाहरण होते. तर देठाशी खराब आंबे विकता येतात. त्याचा तो भाग काढून टाकला की ते वापरता येतात ही माहिती तुम्हाला नवी असेल तरी ते तसं नाही.
आणि हो! चीज सुद्धा बेस्ट बिफोर डेट उलटून गेली तरी विकता येते. मोल्डी अर्थात नाही किंवा मोल्डी असेल तर अनेकदा चौपट किमतीत ही विकतात.
बदली झाली? बातमी दिसत नाही
बदली झाली? बातमी दिसत नाही सर्च केल्यावरही.
सुबोध खरे - लोकांवरही बरेच अवलंबून आहे हे खरे आहे पण सगळ्या गोष्टी लोकांना समजत नाहीत. जेथे चटणीत उंदीर निघतो तेथे किंवा मोठ्या ब्रॅण्डच्या पदार्थात बुरशी निघते तेथे लोकांनी निष्काळजीपणा दाखवू नये यात काही वाद नाही. डायरेक्ट कन्फ्रंटेशन/पंगा घेणे नको असेल तरी स्वतः तेथे न जाणे इतके तरी करू शकतात.
पण त्याबाहेर बरेच काही आहे जे एफडीए सारख्या संस्थाच करू शकतात. पनीर मधे खरे खोटे ही रेस्टॉ मधल्या लोकांनाही खात्रीशीररीत्या कळत नाही हे मुंबईच्या एका रेस्टॉ मालकाच्या मुलाखतीतच ऐकले. किचन मधे आत काय चालते हे सर्वसामान्य लोकांना कळू शकत नाही. तेथे आत जाऊ शकले, तरी लोकांना ढोबळ गोष्टी कळतील, सगळ्याच नाही.
आणि रेस्टॉरंटमधे खाणे हे केवळ स्वस्त मिळण्याबद्दल नाही. तेथे निकृष्ट अन्न वापरले जाते याची जनरल कल्पना लोकांना पहिल्यापासूनच आहे. भाजीवाल्यांच्या विकल्या न गेलेल्या व थोड्या खराब झालेल्या भाज्या हॉटेलात जातात हे लहानपणापासून ऐकले आहे. पण इतरही बरीच कारणे असतात
- हे आपले आवडते रेस्टॉरंट चांगल्या दर्जाचे आहे असा एक विश्वास, तो अनेकदा डिल्यूजनलही असेल
- कायम घरात स्वयंपाक करण्यापासून ते नंतर आवरण्यापर्यंत सगळे करावे लागणार्यांना एक ब्रेक. विशेषतः स्त्रियांना जेथे घरात सगळे करावे लागते अशा केसेस मधे
- आंबलेले, कुजलेले, वास येणारे खातानाही समजते. खाताना तसे वाटले नाही तर त्यापेक्षा जास्त विचार करायचा नाही अशी समजूत.
- गाडीवरचे अस्वच्छ असले तरी चवदार असते म्हणून तेथे खायची वर्षानुवर्षांची सवय - हे आपोआप इव्हॉल्व झाले आहे, ती सवय मोडायला आवर्जून काहीतरी करावे लागेल.
Best before date बद्दल
Best before date बद्दल विचारले नाही. Expiration date/Use-by बद्दल म्हटले होते. आणि आंब्याला काय किंवा कुठल्याही फळांना Best before date नसते नी Expiration date ही नसते.
बरं चीज जाऊ दे, expiration date/Use-by date झालेला बेबी फॉर्म्युला अमेरिका कॅनडात विकता येतो का?
मी ना चीज चे उदाहरण दिलं आहे
मी ना चीज चे उदाहरण दिलं आहे ना बेबी फॉर्म्युलाचे. खरे फळांबद्दल बोलत आहेत मी त्याबद्दल लिहिलं आहे.
तेव्हा तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हीच द्या. उगा वडाचे साल पिंपळाला लावायचे तर लावत बसा.
केवळ डॉ. खरे यांच्यावर टीका
केवळ डॉ. खरे यांच्यावर टीका करता यावी, म्हणून अन्न भेसळीच्या मुद्द्याला बगल देण्याचा तुमचा दुटप्पीपणा दाखवून द्यायचा होता. (डॉ. खरे माझे मित्र/सल्लागार नाहीत, त्यांची सर्वच मते मला पटतात असेही नाही, पण त्यांचा वरील प्रतिसाद मला पटला म्हणून हा प्रपंच). तुकाराम मुंढे/अन्न भेसळ याबद्दल बोलणे सयुक्तिक ठरेल. तूर्तास इतकेच.
मोठमोठे ब्रँड आणि रेस्टॉरंट
मोठमोठे ब्रँड आणि रेस्टॉरंट सुद्धा अन्नभेसळ करत आहेत आणि पकडले जात आहेत ना.. म्हणजे रस्त्यावर खाणारेच मुर्ख ठरत आहेत अशातला भाग नाही.
इथे कोणी आहे का ज्याला खात्री आहे की त्याने योग्य ती काळजी घेतल्याने त्याच्या पोटात आजवर कधी भेसळ असलेले किंवा निकृष्ट दर्जाचे अन्न गेलेच नाही.
अर्थात! खर्यांच्या पोस्टला
अर्थात! खर्यांच्या पोस्टला उत्तर दिलं आहे तर त्यातलेच फ्लॉ दाखवणार ना!
कठिणच आहात. अन्नभेसळ थांबवायला पूर्ण पाठिंबा आहेच. खर्यांच्या तर्कटामधली फॅलसी दाखवायलाच पोस्ट लिहिली आहे. आणि दुटप्पी म्हणजे? एक बाबा वाक्य लिहिलं की ते यच्चयावत गोष्टींना लावायचा तुमच्या सारखा पोरकट खेळ मी पण खेळावा अशी अपेक्षा आहे की काय!
म्हणे बेबी फॉर्म्युला विकतात का!
अरे पण बदलीचे काय? "तुकाराम
अरे पण बदलीचे काय? "तुकाराम मुंढे ट्रान्स्फर" असे शोधूनही बदली झाल्याची बातमी का दिसत नाही? वरती लोकांनी बदली झाली असे लिहीले आहे, त्याबद्दल.
काशिनाथ नाडकर्णी आठवला... अरे
काशिनाथ नाडकर्णी आठवला... अरे पण गच्चीचे काय!
लोकांना स्वस्त हवे, काही लोक
लोकांना स्वस्त हवे, काही लोक हायजीन बाबत अजिबात सजग नाहीत हे वेगळे मुद्दे आहेत. त्याचा FDA कारवाईशी/अंमलबजावणीशी संबंध नाही.
वर फारेएण्ड यांच्या प्रतिसादात हा मुद्दाही ध्वनित आहे असे वाटते.
लोक सुपर मार्केटमधुन पनीर, तोफु आणतात घरी भाजी बनवतात. असे बरेच पॅकेज्ड फूड असेल ज्यात भेसळ, प्रतिबंधित असलेले घटक वापरत असतील. फार्मा भेसळयुक्त, योग्य ती दक्षता न घेतलेले औषध विकते.
लोकांनी रस्त्यावरील गाड्यांवर खाऊ नये, जागरूक रहावे वगैरे ठीक. ती सजगता वाढवणे FDAच्या अंमलबजावणीला पूरक आहे.
आणि एक मोठा वर्ग आहे तो ऐपत असुन स्वस्त मिळते म्हणुन छोट्या मोठ्या टपरी/गाड्यांवर खात नाही तर पर्याय नाही म्हणुन खातो. त्याला स्वस्तातील अन्न हवे म्हणजे बंदी असलेले भेसळयुक्त दिले तरी चालेल असे नाही.
बदली नियमांबद्दल: बदली केव्हा करता येऊ शकते, महिन्यात की दुसऱ्याच दिवशी असा काय नियम, अधिकार असेल पण ती तेव्हा केलीच पाहिजे असा तर नियम नाही ना. तेव्हा बदली नियमात/कायद्यात बसते हा मुद्दा इथे गैर लागु आहे असे मला वाटते.
एवढ्यात बदली करू नका असे आवाहन करणे बेकायदेशीर आहे का?
आवाहन केले म्हणजे सरकारने ऐकलेच पाहिजे असे नाही. त्याला किती लोक समर्थन देताहेत वगैरे चाचपून वगैरे तिकडे लक्ष द्यायचे की नाही वगैरे ठरवेल. अशी काही मोहीम निघाली तर आवाहनाला समर्थन द्यावे किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.
एक निरीक्षण -
एक निरीक्षण -
आजकाल नाक्यावरचा वडापाववाला पण पार्सल मागता बटर पेपर मधे गुंडाळून देतोय वडापाव. आधी जसे वर्तमानपत्रात गुंडाळून देत असे ते बंद केले आहे टोटल. आणि त्यासंदर्भाने वडापावची किंमत पण वाढलेली दिसत नाही, जिथे १८ चा होता तिथे तितकंच आहे जिथे २० चा होता तिथे पण तितकाच आहे. म्हणजे एकंदरीत सडकेवर मार्जिन मजबूत म्हणावे लागेल ! कारण डिमांड तितकी आहे !
Pages