यंदा तुकाराम मुंढे सरांची बदली होऊ द्यायची नाहीये!

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 August, 2026 - 15:46

२१ वर्षात २५ ट्रान्सफर!
महाराष्ट्राचे सिंघम!
ते अजून आपल्यात आहेत हीच एक अचिव्हमेंट.
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये थोडीफार वरवरची साफसफाई आणि खोलात शिरताच बदली.
पुन्हा काही काळात जैसे थे!
जसे इलास्टिक थोडे ताणले आणि सोडले की पुन्हा पूर्ववत होते.

पण यावेळी ते इलास्टिक लिमिटच्या पुढे ताणायचे आहे. आणि यासाठी आपल्या सर्वांना जबाबदारी उचलून त्यांना सपोर्ट करायचा आहे. यंदा तुकाराम मुंढे सरांची बदली होऊ द्यायची नाहीये. गरज पडल्यास यंदा "जेन मिलेनियल" आंदोलन करा. कारण हा आपल्याच मुलांच्या आरोग्याचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे. जो पर्यंत भ्रष्ट आणि भेसळयुक्त फूड इंडस्ट्री वरपासून खालपर्यंत पूर्णपणे बदलत नाही तोपर्यंत आता हा लढा आपल्या सर्वांचा आहे.

त्यांच्या एकेका लेटेस्ट कारनाम्याची या धाग्यावर अपडेट देत राहूया. एकमेकांना सतर्क करूया. आणि तुकाराम मुंढे सरांना सपोर्ट करूया!

जय हिंद !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्शुरन्स पॉलिसी, अनुइटी इत्यादीचे सेकंडरी मार्केट फक्त अमेरिकेत नाही, इतर ठिकाणी सुद्धा आहे. पण कुठल्याही बाजारात भाग घ्यायलाच हवा, अशी सक्ती नाही.

"You Think You Are A Lord?" Bombay High Court Slams FDA Officer Over Suspension Of Eateries Of Mumbai Cricket Association |

'Don't use a sword to kill a mosquito', the High Court told the FDA.

हे मार्केट अत्यंत उपयोगी आहे. >> सहमत. पण हे मान्य केले तर मग अमेरिकेवर टीका करायची संधी जाईल ना? Light 1

उनो.
जिथे टीका करायची तिथे टीका करायची . जिथे आरती ओवाळायची तिथे आरती ओवाळायची.
जर कुणाला काही असाध्य व्याधी झाली आणि त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीयेत त्यांच्यासाठी हे मार्केट उपयोगी ठरेल. एव्हढेच.

लोकसत्ता २९ ऑगस्ट पहिल्या पानावरची मुख्य बातमी सिप्ला फार्माचा परवाना रद्द - एफ डी ए ची कारवाई

३० ऑगस्ट पहिल्या पानावरची बातमी सिप्ला फार्माचा परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची एफडीएवर नामुष्की, ‘अतिउत्साही’ वागणुकीबद्दल उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निर्णय

‘रेक्टिन प्लस’ या औषधाच्या वेष्टनावर परवानगी नसलेला मजकूर प्रसिद्ध करणे, तसेच औषधांच्या साठवणुकीसह खरेदी-विक्रीच्या नोंदींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील वडकी येथील औषध विक्री परवान्यांवर कारवाई केली होती. तसेच, कंपनीचे वाहतूक व वितरण केंद्रासाठीचे औषध विक्री परवाने २७ ऑगस्टपासून तात्काळ प्रभावाने रद्द केले होते. याविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचप्रमाणे, एफडीएच्या आदेशात उत्पादनांची सुरक्षितता, गुणवत्ता किंवा परिणामकारकता याबाबत कोणतीही शंका उपस्थित केलेली नाही किंवा त्यात रुग्णांच्या सुरक्षिततेचा कोणताही मुद्दा समाविष्ट नाही किंवा तसा संकेतही नाही, असे कंपनीच्या वतीने वरिष्ठ वकील आबाद पोंडा यांनी सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगितले.

एफडीएने कंपनीला इ-मेल पाठवून २६ ऑगस्ट रोजी म्हणजेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुनावणीसाठी विभागासमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्या दिवशी कंपनीचा कोणताही प्रतिनिधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती कंपनीने एफडीएला केली होती. तरीही, एफडीएने सुनावणी न घेताच त्याच दिवशी आदेश पारित केला, असेही पोंडा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर, कायद्यानुसार कंपनीला सुनावणीचा अधिकार नसल्याचा दावा एफडीएची बाजू मांडताना अतिरिक्त सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी केला. त्यावर, विशेषतः राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुट्टीच्या दिवशी सुनावणीसाठी प्रतिनिधी पाठवण्यास सांगणारा इ-मेल विभागाने औषध कंपनीला का पाठवला, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. “तुम्ही प्रशंसनीय आणि कौतुकास्पद काम करत आहात, पण आता तुम्ही अतिउत्साही होऊन मर्यादेबाहेर वागत आहात. असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तुमच्याकडून चूक झाली आहे आणि आता तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल, असे उच्च न्यायालयाने एफडीएला सुनावले. तसेच, एफडीएने मनमानी वर्तन केले, चुकीच्या प्रक्रियेचे पालन केले आणि परवाना रद्द केला. हा आदेश नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे, असे ताशेरे न्यायालयाने कंपनीला दिलासा देताना नोंदवले.

कंपनीला इ-मेल पाठवून त्याच दिवशी सुनावणीसाठी प्रतिनिधी पाठवण्याचे आदेश देणे, ही एफडीएची कृती योग्य आणि पारदर्शक होती का ? न्यायालयाने अशीच कृती केली, तर ते योग्य ठरेल का ? सुट्टीच्या दिवशी काम करता येत नाही असे सांगून सरकार अनेकदा काम करण्यास नकार देते किंवा स्थगिती मागते. मग सरकारच्या एका विभागाने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असा आदेश कसा काढला ? असा प्रश्न खंडपीठाने एफडीएला केला. न्यायालयाने फटकारल्यानंतर एफडीएने कंपनीचा परवाना रद्द करण्याचा आदेश मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले.

ही एक थोडी जुनी बातमी
Going Overboard': Rs 5 Lakh Fine On Maharashtra Food Body For Not Restoring Pune Shop's License
https://www.ndtv.com/india-news/bombay-high-court-slaps-rs-5-lakh-fine-o...

आपले मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार हे एफ डी एचे आदर्श आहेत कॉय?

मागच्या पानावर २७ ऑगस्टचा माझा प्रतिसाद आहे. अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांत रक्तदात्यांना टायटनची घड्याळे वाटल्याचे प्रकरण. शिबिराचे आयोजक कोणी यंगस्टार मित्र मंडळ आहे.

आज त्याबद्दल बातमी आली आहे की या प्रकरणी एफ डी ए ने इंडियन रेड क्रॉस , जे जे रुग्णालय आणि नायर रुग्णालय यांच्या रक्तपेढ्यांचे परवाने अनुक्रमे ५ , ३ आणि ३ दिवसांसाठी रद्द केले आहेत.

त्या यंगस्टार मित्रमंडळावर कारवाई करायची पावर काही एफ डी ए कडे नसणार. पावर म्हणजे अधिकार हो. दुसरी कुठली नाय.

Pages