२१ वर्षात २५ ट्रान्सफर!
महाराष्ट्राचे सिंघम!
ते अजून आपल्यात आहेत हीच एक अचिव्हमेंट.
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये थोडीफार वरवरची साफसफाई आणि खोलात शिरताच बदली.
पुन्हा काही काळात जैसे थे!
जसे इलास्टिक थोडे ताणले आणि सोडले की पुन्हा पूर्ववत होते.
पण यावेळी ते इलास्टिक लिमिटच्या पुढे ताणायचे आहे. आणि यासाठी आपल्या सर्वांना जबाबदारी उचलून त्यांना सपोर्ट करायचा आहे. यंदा तुकाराम मुंढे सरांची बदली होऊ द्यायची नाहीये. गरज पडल्यास यंदा "जेन मिलेनियल" आंदोलन करा. कारण हा आपल्याच मुलांच्या आरोग्याचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे. जो पर्यंत भ्रष्ट आणि भेसळयुक्त फूड इंडस्ट्री वरपासून खालपर्यंत पूर्णपणे बदलत नाही तोपर्यंत आता हा लढा आपल्या सर्वांचा आहे.
त्यांच्या एकेका लेटेस्ट कारनाम्याची या धाग्यावर अपडेट देत राहूया. एकमेकांना सतर्क करूया. आणि तुकाराम मुंढे सरांना सपोर्ट करूया!
जय हिंद !!
बदली ची न्युज दिसत नाहीये,
बदली ची न्युज दिसत नाहीये, बोकलत ने नुसती काडी टाकलेली दिसतेय. तोंडात घाण असेल तर गप्प तरी बसावे.
बोकलत सज्जन गृहस्थ आहे. ते
बोकलत सज्जन गृहस्थ आहे. ते दिल देके देखो मधल्या शम्मीकपूर सारखे दिसतात.
त्यांच्या तोंडात खडीसाखर आणि बडीशेप असते.
त्यांना फिल्म इंडस्ट्रीतून आलेल्या नायकाच्या ऑफर्स नम्रपणे नाकारून ते मायबोलीच्या नि:शुक्ल सेवेत रुजू झाले आहेत.
बाहेर खाण्याचा प्रसंग बऱ्याच
बाहेर खाण्याचा प्रसंग बऱ्याच लोकांना येतो. माझ्या कडे विद्यार्थी नोकरदार माणसं रुग्ण म्हणून येतात.
पोलीस सुद्धा येतात त्यांच्या कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात रात्री अपरात्री चांगली रेस्टोरंट उघडी नसतात तेवढा वेळ नसतो. यामुळे व्यायामाला वेळ नाही पोट सुटलेलं. अशा लोकांना मी नेहमी सल्ला देतो.
भूक लागली तर वडापाव पेक्षा केळं खा कारण एक तर वडापाव साठी तेल कोणतं वापरलेलं आहे ते सांगता येत नाही.
परत परत गरम करून थंड केलेल्या तेलातील जीवनसत्त्वं जळून गेलेली असतात. त्यातून कोणताही रस्त्यावरचा विक्रेता केवळ पामतेलच वापरणार कारण ते स्वस्त आहे. वारंवार तेल गरम आणि थंड केल्याने त्यातील मेदाम्लांचे विघटन होऊन त्यातून फ्री रॅडिकल्स, अल्डीहाइड्स आणि ट्रान्स फॅट तयार होते ज्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.
केळं किंवा सफरचंद खाणं हे स्वस्तात मिळणारं सर्वात सुरक्षित अन्न आहे.
विद्यार्थ्यांना सांगतो कि जेथे अन्नाच्या दर्जाबद्दल शंका असते तेथे चहा/ कॉफी आणि बिस्किटे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.
मुंढे साहेबानी सुरु केलेली धडक मोहीम अत्यंत स्पृहणीय आहे. परंतु एकंदर इतिहास पाहता हि किती दिवस चालेल याची शंका वाटते. नव्या मुंबईत सर्व नगरसेवकानी त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली आणि त्यातून त्यांची बदली झाली.
एफ डी ए म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन यात गेली कित्येक वर्षे औषध विभागापेक्षा अन्न या विभागाकडे दुर्लक्ष झालेलं होतं. त्याकडे त्यांनी सामान्य जनतेचं लक्ष वेधून घेतलं हि एक अत्यंत चांगली गोष्ट आहे.
पण जनतेच्या सक्रिय सहभागाशिवाय हि मोहीम कायमची चालू राहणार नाही.
केळं किंवा सफरचंद खाणं हे
केळं किंवा सफरचंद खाणं हे स्वस्तात मिळणारं सर्वात सुरक्षित अन्न आहे.
विद्यार्थ्यांना सांगतो कि जेथे अन्नाच्या दर्जाबद्दल शंका असते तेथे चहा/ कॉफी आणि बिस्किटे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.>>> अगदी बरोबर
च्यायला काय सुरू काय आहे !
च्यायला काय सुरू काय आहे ! अर्थात हॅण्डल पाहून बचकभर मिठासोबत घेतलेली बरी ही बातमी !
https://www.thehindu.com/news/national/maharashtra/you-are-going-overboa...
कोर्टाला मिरच्या झोंबल्यात.
कोर्टाला मिरच्या झोंबल्यात. पैसे उकळून बसलेत जज लोक पण. अरेरे काय हालत आहे.
१ रील पाहण्यात आला सीसीटीवी वरचा, मंत्री एम एल ए लोकांच्या गाड्या १ अॅम्ब्युलन्स रस्त्यावर रोखून ठेवून जाऊ देत आहेत असा. शरम वाटली.
कोर्टाला मिरच्या झोंबल्यात.
कोर्टाला मिरच्या झोंबल्यात. कसल्या?
पैसे उकळून बसलेत जज लोक पण. ही तुमची previlged माहिती का ?
१ रील पाहण्यात आला सीसीटीवी वरचा, मंत्री एम एल ए लोकांच्या गाड्या १ अॅम्ब्युलन्स रस्त्यावर रोखून ठेवून जाऊ देत आहेत असा.
सहमत आहे निर्लज्ज लोक आहेत vip culture बंदच व्हायला हवे.
झाली बदली.
झाली बदली.
३० पैकी २९ गोष्टी पुर्ण
३० पैकी २९ गोष्टी पुर्ण केल्या आहेत. ९८% compliance आहे कुठली गोष्ट पुर्ण केली नाही ह्याचा कुठे उल्लेख नाही. कुणाला ह्या बद्दल काही महित आहे का?
किती % compliance असेल तर परवाना परत चालु करावा बद्दल कोर्टाने काही सांगितले नाही. पुढच्या वेळी जर ९५% compliance असेल तर मुंडे साहेबाने काय करावे.
धाग्याच्या शीर्षकामुळे धागा
धाग्याच्या शीर्षकामुळे धागा वाचला नाही. पण तुकाराम मुंढेंच्या खात्याशी संबंधित बातमी महत्त्वाची वाटली म्हणून इथे देतो.
https://www.ndtvprofit.com/india/rs-5-lakh-fine-for-torturing-citizens-b...
परफेक्ट! दोन्ही कडून वचक
परफेक्ट! दोन्ही कडून वचक राहिला पाहिजे. कोणीच डोईजड होता कामा नये!
तुकाराम मुंढेनी धाडी
तुकाराम मुंढेनी धाडी टाकल्यावर तुम्हाला जाग आली. याआधी तुम्हाला काय वाटायचं तुम्हाला पौष्टिक अन्न मिळतय? कमाल झाली बुवा. मी आधीच हे ओळखलं होतं त्यामुळे मी पुढील उपाययोजना केल्या. मी एक म्हैस विकत घेतली आणि दुधाचा प्रश्न सुटला. रोज सकाळी दोन तीन लिटर दूध काढतो. पिऊन पण एक दीड लिटर शिल्लक राहतं. घरी फळभाज्यांची बाग केले. नैसर्गिकरित्या त्यात भाजीपाला पिकतो. बाजूलाच शेती आहे त्यात तांदूळ गहू पिकवतो. गोड खात पीत नाही त्यामुळे साखर गूळाचा प्रश्नच नाही. फळांची बाग बाजूलाच आहे तिथे केळी, स्ट्रॉबेरी, आंबा पिकवतो. नो भेसळ.
फूड सेफ्टी मुळे लायसन्स
फूड सेफ्टी मुळे लायसन्स सस्पेण्ड करण्याइतकी अवस्था असताना नंतर एकाच दिवसात सगळे क्लिअर झाले हे ही संशयास्पद वाटते.मानव यांच्या पोस्टनंतर खोडले. एक महिन्याने केले आहे. ते रिझनेबल आहे.
एका महिन्यानंतर रि
एका महिन्यानंतर रि-इन्स्पेक्शन झालंय असं दि हिंदुच्या बातमीत म्हटलंय.
ओह माझे वाचताना चुकले. १२ जून
ओह माझे वाचताना चुकले. १२ जून आणि १३ जुलै आहे. मानव - बरोबर.
यंदा तुकाराम मुंढे सरांची
यंदा तुकाराम मुंढे सरांची बदली होऊ द्यायची नाहीये! >> या शीर्षकाचा धागा मायबोलीवर काढण्याचे कारण अजून समजलेले नाही. मायबोलीकरांनी आंदोलन उभे करायचेय का? धागालेखकाने कार्ल मार्क्स प्रमाणे विचार पेरला आणि माबोकरांनी स्वतःहून या धाग्यापासून प्रेरित होऊन आंदोलन उभारले असे काही तरी अपेक्षित आहे असे वाटतेय.
उदास काफीतळ मिळेल का वाचायला?
@जेम्स वांड आमच्या इथे वाढला
@जेम्स वांड आमच्या इथे वाढला बरे भाव वडापाव चा २५rs रविवारी पार्सल आणले होते
खाद्यपदार्थांची किंमत का आणि
खाद्यपदार्थांची किंमत का आणि कोणाला वाढवावी लागेल असा विचार करतोय.
जे निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरात होते किंवा तशीच सेवा पुरवत होते त्यांना आता या सुधारणेनंतर आपली एवढ्या दिवसांची प्रॉफिट मार्जिन सेम ठेवायला भाव वाढवावा लागला असेल का?
या उलट जे असे काही करत नसतील, त्यांना काही विशेष बदल घडवावे लागले नसतील आणि भाव वाढवायची गरज सुद्धा भासली नसेल.
थोडक्यात ज्यांनी भाव वाढवला त्यांनी कुठेतरी अप्रत्यक्षपणे कबूलच केले की आम्ही गैरप्रकार करत होतो.
काहीही. हे व्हॉट्सॲप अंकल
काहीही. हे व्हॉट्सॲप अंकल लॉजिक झालं.
कोर्टाला मिरच्या झोंबल्यात.
कोर्टाला मिरच्या झोंबल्यात. कसल्या?>>>> हाय कोर्टा च्या कँटीन च्या फूड अवस्थेचा ही आरसा दाखवला ना.
भाव वाढवला म्हणजे निदान
भाव वाढवला म्हणजे निदान प्रीकॉशन घ्यायला लागले असावे.. त्यांचा ९५-९९% काँप्लायंस असावा आणि १०० करण्याचा यत्न असू शकतो.. (भाबडा मोड ऑन)
हाय कोर्टा च्या कँटीन च्या
हाय कोर्टा च्या कँटीन च्या फूड अवस्थेचा ही आरसा दाखवला ना.
त्याहून जास्त खुनशी लोकांचे खाद्यालय पक्षी मंत्रालय कॅन्टीन पण इन्स्पेक्ट केले होते की ! बोकलत सोडून कोणाच्या डोळ्यापुढे संबंधित अधिकाऱ्यांची बदली/ उचलबांगडी झालेली दिसली नाही !
न्यायपालिका, सरकार, ह्यासंबंधी बऱ्याचवेळी आपले काही अनुभवजन्य, वैयक्तिक कारणाने ठराविक निरीक्षण असू शकते, ते सोडता सिस्टीम अशी बारक्या पोरासारखी आमचे कॅन्टीन चेक केलेस मग आता तुला पाच लाख फाईन पद्धतीने वागणार नाही शक्यतो.
ही.मा.शे.पो.
ऑ!!! सुकोच्या जज कडुन
ऑ!!! सुकोच्या जज कडुन कायद्याची पदवी घेणार नाही सांगितल्यावर बार काऊंन्सिलने त्या पोरांचे बार मध्ये रजिस्ट्रेशनच होऊ देणार नाही धमकी दिलेली!
ती खरी ही झाली असती, पण सध्या कोकरोच पार्टीमुळे जरा चाप बसलेला आहे त्यामुळे मुलामा दिला गेला.
कुठल्या भारतात रहाताय? नया इंडिया है ये!
ही.मा.शे.पो. >>
हे फार दिवसांनी दिसलं! 
शाहरूखखानने अंमली पदार्थांची
शाहरूखखानने अंमली पदार्थांची जाहीरात केली. त्याला मुंडेसाहेबांनी कायद्याने बदडला.
किमान सॉरी तरी म्हणायचं तर म्हणाला आमच्या कमाईच्या आड का येता?
आता साहेबांची बदली होऊ देऊ नका.
आज स्थिती अशी आहे जे लोक शाहरूखखानच्या बोटीत आहेत ते तुकाराम मुढेंच्या बोटीत असू शकत नाहीत आणि उलटं.
जे शाखाचे फॅन्स आहेत ते गुटख्याचे समर्थक आहेत, जे गुटख्याचे विरोधक आहेत ते शाखाचे फॅन्स असू शकत नाहीत.
यंदा बदली होऊ द्यायची नाही,
यंदा बदली होऊ द्यायची नाही, म्हणजे पुढल्या वर्षी झाली तर चालेल का?
समजा त्यांची बढती झाली आणि ते गृहसचिव किंवा मुख्य सचिव झाले तरी त्यांना जाऊ द्यायचं नाही का?
त्यांची बदली झाली तर असं काही करायचं का? त्यासाठी सराव करावा लागेल ना? त्यांच्या अंगचटीला जायचं, जमिनीवर बसायचं आणि रडून दाखवायचं. हे सोपं नाही.
Official court order/ bar
Official court order/ bar council order ह्यात किती अन् काय फरक असतो हे आता उलगडत बसण्यात काही पॉईंट नाही, एक डायरेक्ट घुसते, दुसरी पडद्याआडून मारलेल्या डोळ्यासारखी असते, मला काही ह्या सरकारविषयी खास ममत्व नाही पण ते तुम्हाला समजवून सांगायला तुम्ही पण कोणी फार मोठे लॉर्ड फॉकलन्ड लागून गेलेले नाही. तुम्ही माझ्याविषयी तुमच्याकडे असलेल्या रिकामटेकडा वेळ लावून चित्रविचित्र ग्रह करून घेतले आहेत अन् मला टार्गेट करत सुटला आहात, ते एक असो !
ही मा शे पो , तुमच्यासाठी नसेल. सावरा स्वतःला.
'यंदा' हे 'आज रोख उद्या उधार'
'यंदा' हे 'आज रोख उद्या उधार' स्टाईल आहे. यंदा कर्तव्य नाही.
हे सगळे प्रकार राजापेक्षा
हे सगळे प्रकार राजापेक्षा राजनिष्ठ लोकांमुळे होतात. बार काउन्सिलला खुद्द त्या सूर्यकांत यांनीच चाप लावला याबद्दल. To be fair
हो. एकदा झुरळ म्हणून पस्तावले
हो. एकदा झुरळ म्हणून पस्तावले ते.
सूर्यकांतना, कॉक्रोच या
डपो
Pages