Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उजवे आणि डावे आणि त्यांचे साधारण जगमान्य गुण-दोष ही आता पार वावटळीत हवेत उडाले आहेत. ते ही री calibrate करायची वेळ, .. नाही ती ही आता निघून गेली आहे. कोणाला काय वाटतं, हु केअरस!!
समजून घ्या! नाहीतर नका घेऊ!

गंमत शेअर करू का, माबो पुरती ठेवा
आमच्या सौ या कट्टर मोदी समर्थक आहेत पण आम्ही खूप मागेच घरी राजकीय विषय बोलायचे नाहीत असा ठराव पास केल्याने शांतता असते

आगरकरी बाणा ! हा हा हा . कमाल अन् सॅल्युट

माय फेवरिट टीचर > विद्वान आहे, वाचन चांगलं आहे, पण आरेसेस बॅकग्राऊंडचा आहे. आपल्याकडे धर्माधिकारी नावाचा एक टाळ्याखाऊ विद्वान आहे, त्याचंच हे थोडंसं सॉफिस्टेकेटेड मॉडर्न व्हर्जन.

मला असं अजिबात कधी वाटलं नाही. या माणसाने मला फिलाॅसाॅफीच्या आणि इतर अनेक गोष्टींच्या दिशा दाखवल्या. जवळजवळ सगळी लेक्चर्स ऐकली आहेत. वैयक्तिक आयुष्यात कसा आहे त्याशी फार देणंघेणं नाही. पण कसा असेल त्याचा अंदाज येतोच.

धर्माधिकरी फारच मूर्ख आणि विषारी माणूस आहे. तुम्हाला दिव्यकिर्ती बघून तो आठवला याचं वाई ट वाटलं.

होय मीही आवडीने बघतो यांचे व्हिडिओ
दार्शनिक आणि इन जनरल संस्कृती, कसं होतं काय होतं आणि वाचून सांगतात का कसे माहिती नाही पण घडाघडा इतकी नावे कोण कुठं कसं इतकं जबरदस्त ओघवत्या भाषेत

अर्थात पण नंतर ओव्हरडोस केला तर गुंगी येते
इतकं हेवी झेपत नाही काही काळाने

मलाही विकास दिव्यकीर्ति आर एस एस चे आहेत असं कधीही वाटलं नाही. असलेच तर त्यांनी सोडलं असेल. कारण आरएसएस ही संघटना सोडून द्या, जो कुणी कट्टर धार्मिक मनुष्य आहे तो नास्तिकवाद कधीही इतक्या सुंदर रितीने सांगणार नाही. यांच्यामुळे चार्वाकाची सहजासहजी न मिळणारी दुर्मिळ माहिती समजली आणि केशकंबलीची देखील. केशकंबली आणि त्याच्या गुरूंची व शिष्यांची जी थिअरी होती तीच आता पुन्हा नव्या वेष्टनात आली आहे ज्यावर एका धाग्यावर अनेकांनी पाट्या टाकल्या होत्या.

ओशोंनंतर इतक्या सहजपणे विविध तत्वज्ञानातला सहज वावर मी याच व्यक्तीचा पाहिला. जर ही आर एस एस बॅकग्राउंडची असेल तर ते इग्नोर करून त्यांचं निरूपण ऐकायला अडचण नाही. ज्याप्रमाणे अमरीश पुरी आणि दमा मिरासदार हे आर एस एस चे शिक्षक आहेत हे समजल्यावरही त्यांचं योगदान झिडकारता येत नाही.

मला हेच म्हणायचं होतं, थँक्स राज अज्ञानी. आरेसेसच्या विचारधारेच्या कुठच्याही व्यक्तीने इतकं शांतपणे सम्यक दृष्टीकोनातून एखादा विषय समजावून सांगणे सोडा, पण समजावून घेणंही शक्य नाही. त्यासाठी त्यांना अंगात भिनलेलं द्वेषाचं आणि भिन्नतेचं विष मनुस्मृतीतून कुठचा बुवा बोलावून उfunction at() { [native code] }अरवून घ्यावं लागेल.

साजिरा, आशू+१.
मलाही त्यांची लेक्चर्स, डिमिनर फार आवडतो.

ते एक मूर्ख शिरोमणी फेक प्रोफाईल होते, ते अनाथ झाले का?
करमत नाही आता त्याने येऊन शिवीगाळ केली नाही तर.

अरेरे. CJI सूर्यकांत साहेबाने ह्यांची शिकवणी लावली नाही.
IAS एक निर्ढावलेली जमात आहे. त्याना शिक्षण द्यायचे काम हे लोक करत आहेत.
साजिरा तुम्ही "हिच हायकर्स गाईड टू द गलक्सी" हे पुस्तक वाचले असणारच! त्यात Vogon चे व्यक्तिमत्व वाचा. आपल्या IAS चे सख्खे भाऊ.
अधिकाऱ्याने कसे नेहमी पोलिटिकली करेक्ट असावे.
माझे काही चुकले असेल तर क्षमा करावी.

धर्माधिकरी फारच मूर्ख आणि विषारी माणूस आहे. तुम्हाला दिव्यकिर्ती बघून तो आठवला याचं वाईट वाटलं.>
धर्माधिकारीनं सुरूवातीला गुडीगुडी शब्दांचं गारूड करून फॅन फॉलोविंग खेचून घेतलं. २०१४ नंतर मग सगळा मेकअप धुवून खऱ्याखुऱ्या रूपात प्रकट झाला. तेव्हापासून युपीएससी एमपीएससी करणाऱ्या माझ्या काही जुन्या मित्रांना धक्का बसला. 'सर फारच बदलले रे.' असलं काय काय बोलतात. आता तर पार वायाच गेला आहे तो. तर तुम्हालाही नंतर कधीतरी असा धक्का बसू नये म्हणून धर्माधिकारीचं उदाहरण दिलं.

स्पर्धा परीक्षा देणारी पोरं पोरी हे यांचं टारगेट ऑडियन्स आहे. पुढे सर्व्हिसमध्ये जाऊन एका अनरजिस्टर्ड ऑर्गनायझेशनला सोयीची भूमिका घेतील, पगार सरकारचा घेतील आणि काम दुसऱ्याच कुणासाठीतरी करतील, असे ब्रेनवॉश्ड अधिकारी सिस्टीम मध्ये घुसवण्याचा प्रोजेक्ट.
खरं आता तेही एवढं सोपं राहिलेलं नाही. काळ पुढे सरकलाय. आजची स्पर्धा परीक्षा देणारी मुलंही आधीएवढी भाबडी राहिलेली नाहीत. तर मग शिकवताना आधीसारखा, धर्माधिकारीच्या काळातल्यासारखा थेट प्रोपगंडा करून उपयोगाचं नाही. हळूहळू अंदाज घेऊन शांतपणे पेरावं लागतं. कसब आहे ते. Happy

तुम्ही वरती शेअर केलेला व्हिडिओ आणखी एकदा नीट बघितला तर हे कसं पेरलं जातं, स्पिन कसा हळूच टाकला जातो, ते लक्षात येईल.

नाही वाचलंय केकु. शोधुन वाचतो.

तो वॉन्नाबी आयएएसनाच लेक्चर देतोय. मी फक्त सिच्युएशन कशी समजून घ्यायला हवी, ते उदाहरण देण्यासाठी तो व्हिडिओ टाकला. बाकीचा भाग (जो त्यांच्या प्रोफेशनचा भाग आहे) दुर्लक्ष करायला हरकत नाही. खरं त्यांच्या प्रोफेशनच्या भागातुनच मी असंख्य गोष्टी शिकलोय, उमजलोय. हे कोण शिकवणारे, असं आपल्याला नेहेमीच वाटतं. अशा वाटण्याला प्रॉटेस्तंटंसने आज नीट उत्तर दिलं आहे. कुणापासून शिकावं हे आपलं आपण ठरवावं.

सीजेआय ने अर्थातच हे किंवा अशा अर्थाचं काहीच ऐकलेलं नसणार, हे उघड दिसतंय. याच नाही, तर देशभरातल्या अनेक प्रसंगांतून.

अविनाश धर्माधिकारींचं अस्वस्थ दशकाची डायरी हे पुस्तक मी ९० साली वाचलं होतं. त्यात त्यांनी संघ स्वयंसेवक असल्याचा उल्लेख केला होता. सुरेश कलमाडींना बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला तेव्हां ते त्यांच्या विरोधात उभे राहिले होते. मला भारतीय जनता पक्षाचं तिकीट हवं होतं पण शिवसेनेला पुणे सोडल्याने त्यांचा नाईलाज आहे, मला राष्ट्रीय स्वयंसेवक मदत करणार आहे असे त्यांनी सांगितलेले होते.

https://m.rediff.com/news/1998/jan/29pune.htm

a product of the Gyan Prabodhini, an educational institution with an RSS-like ideology."
https://m.rediff.com/news/1998/feb/25pune.htm

मी जेव्हा १५ वर्षांचा होतो तेव्हा IAS चे भारी आकर्षण होते. माझा मंगेश नावाचा सहाध्यायी होता. टो म्हणजे गणितातला जिनिअस होता. त्याचे वडील पुण्यात जज होते. एकदा मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी सहज मला विचारले.
"तुम्ही मुलांनी पुढे काय करिअर करायचे ह्याबद्दल विचार केला आहे का?"
मी झटकन उत्तर दिले "IAS,"
त्यांनी हसून मला सांगितले, " तुला सी डी देशमुख माहित आहेतना? त्याना देखील मेघदूताचे भाषांतर करण्याचा मोह सुटला नाही."
सी डी देशमुख म्हणजे त्यावेळचे मोठे प्रस्थ होते.
नंतर केव्हातरी मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला. तेव्हा बराच उशीर झाला होता.
मंगेशनर TIFR मधून MATHS मध्ये पी एच डी केली. आणि गोहाटी विद्यापीठात प्रोफेसर होता.

Vogons who are responsible for the destruction of the Earth, in order to facilitate an intergalactic highway construction project for a hyperspace express route. Vogons are slug-like but vaguely humanoid, are bulkier than humans, and have green skin. Vogons are described as "one of the most unpleasant races in the galaxy—not actually evil, but bad-tempered, bureaucratic, officious and callous", and having "as much sex appeal as a road accident" as well as being the authors of "the third-worst poetry in the universe". They are employed as the galactic government's bureaucrats. According to Marvin the Paranoid Android, they are also the worst marksmen in the galaxy. They follow orders as they are told, and do not allow exceptions.

>>धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. पुढे काय?<<
या प्रश्नाची चिंता कोणालाहि नाहि. जेनझी तर इम्मॅच्युर आहेत, परंतु त्यांचे नेते (सिजेपी) सुद्दा दिशाहिन आहेत असं नाईलाजाने म्हणावं लागतंय. आंदोलन नीटच्या पेपरफुटीमुळे सुरु झालं. या संधीचा उपयोग एजुकेशन रिफॉर्म करण्याकरता केला जाइल अशी भाबडी आशा होती. पुढे आंदोलनाची दिशा बदलली आणि या मागण्या पुढे आल्या:
१. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
२. आत्महत्या केलेल्यांना प्रत्येकि १ करोड
३. आंदोलनात अटक/एफआयआर झालेल्यांची निर्दोष सुटका

इथे एक बाब स्पष्ट होते कि, या मागण्यांमुळे भविष्यातले पेपरफुटिचे प्रकार कसे थांबतील हा विचार करण्याची बौधिक क्षमता सिजेपीच्या नेत्रुत्वात नाहि. ती अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडुन करणे म्हणजे वेळेचा अपव्यय. या धाग्यातच त्याचा प्रत्यय आलेला आहे. दिपके कडे जर विजन असतं तर त्याने गेल्या दोन महिन्यात सगळे रिसोर्सेस वापरुन एखादा जाणकार शिक्षणतज्ञ किंवा शिक्षणतज्ञांचं पॅनल एस्टॅब्लिश करुन सरकारला एजुकेशन रिफॉर्मचा रोडमॅप अथवा हायलेवल प्लॅन दिला असता. पण हिडन अजेंडा असला कि चांगली काम पटलावर येत नाहित. पेपरफुटीची समस्या हे हिमनगाचं टोक आहे. अ‍ॅडमिशन्स, कॅपिटेशन फी, शिक्षक भरती/तुटवडा, क्वालिटि ऑफ एजुकेशन असे अनेक प्रश्न आहेत. विध्यार्थि संघटना आणि सरकार हे प्रश्न जॉइंटली कसे सोडवु शकतील हा या आंदोलनाचा आउटकम अँड रिगेनिंग स्टुडंट्स ट्रस्ट इन द एजुकेशन सिस्टम शुड हॅव बीन दि एंडगेम..

अन्फॉर्चुनेटली, दॅट बोट हॅज सेल्ड...

शिक्षणतज्ञ किंवा शिक्षणतज्ञांचं पॅनल एस्टॅब्लिश करुन सरकारला एजुकेशन रिफॉर्मचा रोडमॅप अथवा हायलेवल प्लॅन दिला असता. >>>

स्वतःहून एखादे पॅनल या तज्ञांनी बनवले आणि रोडमप दिला तर फौल होईल का? हे कोणी एलियन आहेत का तुमचं तुम्ही बघा म्हणणार
सगळं त्यांनीच करायचे मग बाकीचे काय तंबाखू मळत बसणार?
घ्या पुढाकार तुम्ही राज आणि करा आवाहन आणि बनवायला लावा, इथं इतका वेळ घालवण्यापेक्षा
हा देश तुमचाही आहे
आम्ही तुम्हाला साथ देऊ

मला दीव्यकिर्ती यांचे बॅकग्राउंड वगैरे माहित नाही, पुढे पोलिटिकल बाजु घेतील का वगैरे अंदाज नाही. सुरवातीला त्यांचे व्हिडीओ आवडले पण नंतर संप्रति म्हणतात तसं मला काही व्हिडिओत जरा खटकु लागले.

>>धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. पुढे काय?

राज तुम्ही असा म्हणताय का नवीन शिक्षण मंत्री हा शिक्षण खाते सांभाळण्यासाठी लायक नाही ? बडेंद्र मोदी याना कोणाला कुठले खाते द्यावे याची समज नाही?

तुम्ही सीजेपी ला नवीन मंत्र्याचा आणि पंतप्रधानांचा राजीनामा घेण्यासाठी आवाहन करत आहात का ? लवकर सांगा.

एस अनिथा(ता) या तमिळनाडूतल्या सतरा वर्षांच्या मुलीने नीट परीक्षा पद्धतीविरूद्ध एकटीने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. तिला सीबीएसई परीक्षेत १२०० पैकी ११७६ गुण मिळाले. तिचे आई वडील मोलमजुरी करतात. तिने कष्ट करून हे यश मिळवले. पण हे गुण तिला मेडीकलला प्रवेश देण्यासाठी पुरेसे नव्हते. नीट परीक्षेत तिला ७२० पैकी ८६ गुण मिळाले. तिला मेडीकलला प्रवेश मिळाला नाही. तमिळनाडूमधे मेडीकल कॉलेजेस आहेत. बारावीला सीबीएसईला तिला मिळालेल्या गुणांवर यापूर्वी सहज प्रवेश मिळत होता.

पण उत्तर भारतातल्या काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात केलेल्या याचिकेवर तत्कालीन सरकारने पुरेशा गांभीर्याने बाजूच मांडली नाही. त्यामुळे न्यायालयाने या विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला. २०१६ साली नीट संपूर्ण देशात लागू झाली. या परीक्षेसाठी जे क्लासेस आहेत त्यांची फीस दोन लाखांच्या घरात आहे. एव्हढे पैसे नसल्याने अनिताला नीट चा क्लास लावता आला नाही. रेग्युलर कॉलेजेस मधे नीटची तयारी करून घेतली जात नाही.

तिने दिलेल्या लढ्याला मीडीया, सरकर, विरोधी पक्ष आणि देश यापैकी कुणाचाही सपोर्ट मिळाला नाही. तिने १ सप्टेंबर २०१७ ला आत्महत्या केली.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने मूळ समस्या सुटत असेल तर चांगले आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने मूळ समस्या सुटत असेल तर चांगले आहे.

>>>>>
सर चूक झाली. धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहायला पाहिजे होते किंवा टैग करून ट्विट करायला पाहिजे होते. शिक्षण व्यवस्था सुधारायचे त्यांना ऑनबोर्डिंग च्या वेळेस सांगितले नसणार किंवा एम्प्लॉई हैंडबुक मध्ये क्लैरिटी नसेल.

राज, राज अज्ञानी हे राहुल गांधी यांचे धुरंधर आहेत असा वाटायला लागलय. हेच भाजप ची हंडी फोडणार.

चूक झाली छान झाले चि__ कूल! आता अनिता हिचा जीव परत येईल. अशा अनेक गरीबांचा, ज्यांना नीट देता येत नाही प्रश्न सुटेल. धन्यवाद तुमच्या संवेदनशीलतेबद्दल.

कुणीही वेगळे काही बोलले कि चिडकू हे अद्वातद्वा सुरू होतात. तुम्ही अनिता यांच्या लढ्याला जो पाठिंबा दिला होता त्याबद्दल त्यांच्या कुटुंबाकडून आभार मानतो.

राहुल गांधी आणि केजरीवाल व अन्य नेते यांच्यात जर आंदोलनातल्या श्रेयवादावरून वाद चालू असतील आणि त्याने नीट रद्द होऊन प्रत्येक राज्यात तिथल्या मेडीअल कॉलेजेस मधे स्थानिकांना प्राधान्य मिळत असेल तर मी चिडकू यांचे जाहीर पाय धरण्यास तयार आहे. त्यांच्या व्हिजनरी पोस्टींंमुळे हा प्रश्न सुटला आहे.

आपले नवे शिक्षण मंत्री हे RSS चे कार्यकर्ते आहेत. त्यांनी ईदगाह वर झेंडा रोवण्याचे महत्वाचे काम केले आहे. झेंडा भगवा का तिरंगा हे आजून मला माहित नाही.
त्यांच्या कडून भरीव काही होईल अशी अपेक्षा करुया.
डार्विनने थडग्यात कूस बदलली आहे.

आपले नवे शिक्षण मंत्री हे RSS चे कार्यकर्ते आहेत. त्यांनी ईदगाह वर झेंडा रोवण्याचे महत्वाचे काम केले आहे. झेंडा भगवा का तिरंगा हे आजून मला माहित नाही.
त्यांच्या कडून भरीव काही होईल अशी अपेक्षा करुया. >> भाजपाची हंडी फोडणारी पोस्ट सर.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने मूळ समस्या सुटत असेल तर चांगले आहे.
>>>>>

राज तुम्ही लॉजिकल काहीतरी विचार मांडा. तुम्ही तुमची भूमिका अजून स्पष्ट करा. राजीनामा घेऊन काही होणार नाही हा सूर लावला तर मग उडवली जायची तयारी ठेवा.

विजयापासून परिवर्तनाकडे

शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि इतर काही मागण्यांची पूर्तता हा या आंदोलनाचा महत्त्वाचा विजय आहे. शांततापूर्ण मार्गाने एकत्र आलेल्या तरुणांनी सत्तेला प्रतिसाद द्यायला भाग पाडले, याचा आनंद आणि अभिमान असायलाच हवा. पण प्रत्येक विजयात एक धोका दडलेला असतो—ध्येय गाठल्याचा आनंद ओसरल्यानंतर आंदोलनही विरून जाण्याचा.

या आंदोलनाला व्यापक परिवर्तनाची सुरुवात बनवायची असेल, तर आता केवळ पुढची मागणी शोधून पुन्हा रस्त्यावर उतरणे पुरेसे नाही. उत्साहाचे रूपांतर टिकाऊ लोकशाही संस्कृतीत करावे लागेल.

१. मिळालेला विजय जपणे

राजीनामा ही सहज दिसणारी घटना आहे. पण पेपरफुटी रोखण्यासाठी काय बदल होणार, विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार, पोलिसी हिंसाचाराची चौकशी कशी होणार आणि दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरतात की नाही, यावर सातत्याने लक्ष ठेवावे लागेल.

सरकारने कोणती आश्वासने दिली, त्यांच्या पूर्ततेची मुदत काय आणि प्रगती किती झाली, याची सार्वजनिक नोंद ठेवली पाहिजे. आंदोलनाची आठवण केवळ घोषणा आणि छायाचित्रांमध्ये न राहता जबाबदारीच्या व्यवस्थेत उतरली पाहिजे.

२. व्यक्तिपूजेऐवजी लोकशाही नेतृत्व

आंदोलनाला एक नायक देणे सोपे असते; लोकशाही रचना उभी करणे कठीण असते. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी कसे निवडले जातील, निर्णय कसे घेतले जातील, हिशेब आणि बैठकींचे वृत्त सार्वजनिक कसे राहील, याचे स्पष्ट नियम हवेत.

नेतृत्व फिरते असावे. स्त्रिया, वंचित समाजघटक आणि विविध प्रदेशांतील तरुणांना त्यात स्थान असावे. प्रसिद्ध कार्यकर्ते मार्गदर्शन करू शकतात; राजकीय पक्ष पाठिंबा देऊ शकतात. पण आंदोलनाचा ताबा कुणा व्यक्तीचा, पक्षाचा किंवा विचारधारेच्या मठाचा होता कामा नये.

लोकशाहीची मागणी करणाऱ्या आंदोलनाने स्वतःच्या अंतर्गत व्यवहारातही लोकशाही पाळली पाहिजे.

३. Gen-Zची ऊर्जा जपणे

या आंदोलनाची एक विशेष ताकद म्हणजे त्यातील Gen-Zचा सहभाग. ही पिढी पारंपरिक राजकीय भाषेत बोलत नाही. ती भाषणे कमी ऐकते, प्रश्न पटकन विचारते, विसंगती लगेच पकडते आणि मीम्स, व्हिडिओ, उपरोध व विनोदातून सत्तेचा फुगा फोडते.

“कॉकरोच”सारखी प्रतिमा स्वीकारून तिने अपमानाचेच प्रतीक प्रतिकाराच्या चिन्हात बदलले. ज्यांना चिरडून टाकता येईल असे समजले गेले, त्यांनीच टिकून राहण्याची आणि पुन्हा उभे राहण्याची ताकद दाखवली.

मीम्स ही या पिढीची केवळ करमणूक नाही; ती राजकीय लघुभाषा आहे. मोठमोठ्या भाषणांना काही सेकंदांत उत्तर देण्याची, दांभिकता उघडी पाडण्याची आणि भीतीऐवजी सामूहिक हास्य निर्माण करण्याची तिची क्षमता विलक्षण आहे. सत्तेला उपहास सहसा फार अस्वस्थ करतो, कारण तो तिचे गांभीर्य आणि दिमाख दोन्ही हिरावून घेतो.

पण वेग, विनोद आणि व्हायरल होण्याची क्षमता हीच या पिढीची मर्यादाही ठरू शकते. कालचा संताप आजची मीम आणि उद्याची विस्मृती होऊ शकतो. ऑनलाइन उत्साहाचे रूपांतर दीर्घकाळ टिकणाऱ्या संघटनेत, अभ्यासात आणि प्रत्यक्ष कामात झाले नाही, तर आंदोलन ट्रेंडसारखे वर येईल आणि तितक्याच वेगाने खाली जाईल.

म्हणून Gen-Zची भाषा बदलण्याची गरज नाही; तिच्या भाषेला लोकशाहीचा आशय देण्याची गरज आहे. मीम्समधून प्रश्न उभे राहावेत, पण पुढे त्यामागे पुरावेही यावेत. व्हिडिओंनी अन्याय दाखवावा, पण त्यानंतर कायदेशीर कारवाई आणि सार्वजनिक नोंदही व्हावी. ऑनलाइन जाळ्यांनी लोक एकत्र यावेत, पण त्यातून स्थानिक गट, खुल्या सभा आणि पारदर्शक निर्णयप्रक्रिया उभी राहावी.

या पिढीची खरी क्रांतिकारक ताकद तिच्या रागात नाही, तर ती जुन्या सत्तेला घाबरत नाही यात आहे. ती नेत्यांना देव मानत नाही, पदांमुळे प्रभावित होत नाही आणि अधिकृत भाषेपेक्षा प्रत्यक्ष पुराव्यावर विश्वास ठेवते. या वृत्तीला धर्मनिरपेक्षता, समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि घटनात्मक लोकशाहीची जोड मिळाली, तर हे आंदोलन एका मागणीपुरते मर्यादित राहणार नाही.

मात्र Gen-Zनेही एक गोष्ट शिकली पाहिजे: प्रत्येक गोष्ट मीममध्ये मावते, पण प्रत्येक लढाई मीमने जिंकता येत नाही. विनोद सत्तेचा मुखवटा उतरवू शकतो; नवी व्यवस्था उभी करण्यासाठी संघटना, संयम आणि सातत्य लागते.

४. धर्मनिरपेक्षता आणि समानतेचा स्पष्ट पाया

या आंदोलनाचा केंद्रबिंदू केवळ परीक्षा किंवा रोजगार राहू नये. त्यामागील व्यापक तत्त्व असे असावे की राज्य प्रत्येक नागरिकाशी समानतेने वागेल, कोणत्याही धर्माला राजकीय विशेषाधिकार मिळणार नाही आणि जात, धर्म, लिंग, भाषा किंवा प्रदेश यांवरून कुणाचा हक्क कमी मानला जाणार नाही.

आज अन्याय आपल्यावर झाला म्हणून आपण रस्त्यावर उतरलो. उद्या तो दलित, मुस्लीम, आदिवासी, स्त्रिया, कामगार किंवा दुसऱ्या कोणत्याही समूहावर झाला, तर त्यांच्याबरोबर उभे राहण्याची तयारी हवी. तेव्हाच स्वतःसाठी मागितलेला न्याय सार्वत्रिक तत्त्व बनतो.

धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मद्वेष नव्हे. ती राज्याने सर्व नागरिकांकडे समान दृष्टीने पाहण्याची हमी आहे. समानता म्हणजे प्रत्येकजण सारखा आहे असे मानणे नव्हे; दीर्घकाळ वंचित राहिलेल्यांना न्याय्य संधी मिळवून देणे आहे.

आंदोलनाला खऱ्या अर्थाने व्यापक व्हायचे असेल, तर ते फक्त आपल्यासारख्यांसाठी न्याय मागणारे राहून चालणार नाही. आपल्या विरोधात असलेल्या माणसालाही समान हक्क मिळावेत, हे मान्य करण्याइतकी त्याची लोकशाही मोठी असली पाहिजे.

५. जमावापासून नागरिकांच्या चळवळीकडे

मोठी गर्दी एका घटनेने जमू शकते. चळवळ मात्र सातत्याने केलेल्या कामातून उभी राहते. स्थानिक विद्यार्थी गट, कायदेशीर मदत, मानसिक आरोग्याविषयी सहाय्य, माहितीच्या अधिकाराचा वापर, पेपरफुटी आणि भरतीतील गैरव्यवहारांची नोंद, तसेच संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावरील सार्वजनिक चर्चा यांचे जाळे उभे करावे लागेल.

आंदोलनाने लोकांना कोणती विचारधारा स्वीकारायची हे शिकवण्यापेक्षा प्रश्न कसे विचारायचे, पुरावे कसे तपासायचे, मतभेदांत संवाद कसा राखायचा आणि सत्तेला जबाबदार कसे धरायचे, हे शिकवले पाहिजे.

त्यातून नियमित सार्वजनिक बैठकांची, खुल्या चर्चांची आणि नागरिकांच्या प्रश्नांची संस्कृती निर्माण झाली पाहिजे. फक्त संकटकाळातच लोक एकत्र येत असतील, तर प्रत्येक लढ्याची सुरुवात पुन्हा शून्यापासून होते. चळवळीला स्मृती, रचना आणि सातत्य लागते.

क्रांती म्हणजे केवळ सत्ताधारी बदलणे नव्हे. सत्ता कोणाचीही असो, तिला प्रश्न विचारणारे, भेदभाव नाकारणारे आणि इतरांच्या स्वातंत्र्यासाठीही उभे राहणारे नागरिक निर्माण होणे—ही खरी क्रांती आहे.

मंत्र्यांचा राजीनामा हा एका लढाईचा विजय आहे. तो शेवट ठरू शकतो; किंवा लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समानतेवर उभ्या राहणाऱ्या नव्या नागरिक चळवळीचा आरंभही ठरू शकतो.

आता आंदोलनाने पुढचा शत्रू शोधण्याची घाई करू नये.
त्याऐवजी पुढची पिढी घडवण्याचे काम सुरू करावे.

राज तुम्ही लॉजिकल काहीतरी विचार मांडा. तुम्ही तुमची भूमिका अजून स्पष्ट करा. राजीनामा घेऊन काही होणार नाही हा सूर लावला तर मग उडवली जायची तयारी ठेवा. > उडवा की, टीसीएस धाग्याचर सुरूवातीला जे उजव्यांच्या बाजूने होते ते नंतर उघडे पडले. मला इथून उडवल्याने नंतर अण्णा आंदोलनाने जनलोकपाल बिल आलं नाही ती वस्तुस्थिती बदलली नाही.

एम के स्टॅलीन यांनी अनिता यांना कोर्टातल्या लढ्यात सपोर्ट केला. प्रधान यांनी राजीनामा दिला. नीट परीक्षा रद्द झाली नाही तर दोन लाख रूपये भरायला नसणारे असेच मेडीकलच्या प्रवेश स्पर्धेतून बाहेर फेकले जाणार आहेत. अशा धमक्या देणारे ज्या वेबसाईटवर फेक प्रोफाईल्स आहेत ते अ‍ॅडमिनच्या आशिर्वादानेच देत असतील. त्यांना अशा मुलांशी काहीही घेणं देणं नाही.

नीट / जेईई रद्द होणे हा समस्येवरचा उपाय आहे. काँग्रेसने न्यायालयात बाजूच मांडली नाही म्हणून नीट / जेईई आली. यांचे कोचिंग कॉलेजेस मधे नाही. ते खासगी आहे ही समस्या आहे, तिची फीस सरकार ठरवत नाही. त्यामुळे बारावीच्या परीक्षा अर्थहीन झाल्या आहेत ही समस्या आहे.

अनिताने दिलेल्या लढ्याला कुणीही सपोर्ट केला नाही. स्टॅलिन वगळता. हे लिहून घेतले.
आता बिनधास्त उडवा आयडी. फेक प्रोफाईल ऐवजी नेहमीच्या (खर्‍या नाही) प्रोफाईलने धमक्या द्या. मी अरे ला कारे करताना शहीद होईन.

चिडकू
तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे.
तमिळनाडू ची पहिल्यापासून हीच भूमिका राहिली आहे. रक राष्ट्र, एक नेता, एक भाषा, एक निवडणूक,
ह्या आग्रहात विनाशाची बीजे आहेत, जर रुंमेशने किंवा तुम्ही "शिक्षण क्षेत्रातील सुधारणा" असा धागा काढला तर तेथे व्यक्त होईन.

Pages