Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्याला या आंंदोलनाबाबत विश्वास आहे, एखाद्याला नाही. वेगळं मत असलं तर एकमेकांचा गळा धरायचा का?
आता तर अनेक लोक हळूहळू सोनम वांगचुक, दीपके यांची माहिती सांगू लागलेत. खरं खोटं जे काही असेल ते असेल.
पण मत बनवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. अण्णांच्या बेळीही होता. त्या वेळीही असे लोक अल्पसंख्यांक होते (किंवा तसे भासत होते).

नक्कीच आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे

फक्त खोटे बोलून बदनामी करण्याला विरोध आहे, किती प्रमाणात खोटे नारेटिव्ह पसरवले गेले या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी
किती वेळा हे खोटे उघडकीस आले
अगदी परदेशी फंडिंग पासून ते दगडांच्या ट्रक पर्यंत
वांगचुकचा व्हिडिओ कट करून वेगळ्या पद्धतीने दाखवले गेले
मोठी यादी होईल

तरीही मत मांडण्याचा अधिकार आहेच
आजच एका व्हिडिओ खाली कॉमेंट देऊन अलॉय

कुणीतरी टाकलाय डीएसपी सुमित झा यांनी राजीनामा दिला का तर त्यांना खोटे बोलायला सांगितले आंदोलनाबद्दल
म्हणलं तुम्हीही भाजप आयटी सेल च्या लेव्हलला जाऊ नका
खोटे व्हिडिओ व्हायरल करू नका

ज्याचं मत वेगळं आहे तो खोटं बोलतो असे म्हणणे ही संघाची खासियत आहे,
अण्णांच्या वेळी हा अनुभव घेतला आहे. स्पष्टच सांगायचं तर इथे जे बहुमत आहे ते वेगळ्या प्लॅटफॉर्मवर अल्पमत आहे.
केजरीवाल यांच्याबदल सुद्धा ठराविक वेबसाईटसच्या पलिकडे चांगलं मत नाही.

ते मी इथे लिहीत नाही. माझा कन्सर्न जेन झी ने पालकांचं ऐकूच नये याबाबत आहे. हे पटलं नाही.

वेगळ्या???
इथं जे काही आहे त्याला बहुमत म्हणताय??

अक्खा सोशल मीडिया भरलाय आंदोलन विरोधी लोकांनी
शेवटी एकेक करत अनेकांना कंटाळून नारळ दिला कारण त्यांना दुसरी बाजू ऐकून घ्यायचीच नाहीये

कुठल्याही न्यूज चॅनेल वृत्तपत्र किंवा एजन्सी किंवा काहीही असू दे सोशल मीडियावर अक्षरशः शिव्या शाप आणि खोटे व्हाट्सएपी मेसेज चा खच आहे, पाशवी बहुमत काय आहे ते फेसबुकवर किंवा इंस्टावर बघा
कसे तुटून पडतात तेही बघा

आंदोलन विरोधी म्हणजे काय?
मतांचा वेगळेपणा मान्य करत तुम्ही आता वाद घालताय.

एक आर एस एस एक केजरीवाल. दोन्हीही संघी.
हे लुटुपुटीचं भांडण आहे. दोन्ही आपापला प़ क्ष गाजवत आहेत हे जनरल पर्सेप्शन आहे. ते इथे अल्पमतात आहे.
एव्हढंच लिहून मी बास करतो. नाहीतर केजरीवालने वेळोवेळी भाजपला कसे वाचवले याची यादी देता येईल.
अगदी तृप्तॉ घोटाळ्याच्या वेळी इतर कुणी सुरूवात करण्याआधी केजरीवालने ती जागा भरून काढली. नंतर गडकरींच ते प्रकरण शांत झालं.
त्या प्रकरणातली हवा काढून घेतली.

असे अनेकदा झाले आहे. पण बास.

वाद?? फॅक्टस सांगितल्या हा वाद आहे??

असो, तुमचं चालू द्या मग
कोण संघी आणि कोण काय मला माहिती नाही

मी विद्यार्थ्यांच्या संदर्भात बोलत होतो आणि त्याच संदर्भात बोलणार आहे त्यामुळे
तुमचा जो काही राजकीय अजेंडा नारेटिव्ह असेल तो तुमच्याकडे राहू द्या मला त्यावर काही बोलायचं नाही

मी जे सांगेन त्या फॅक्टस म्हणून स्विकारणार का?
तुम्ही जे सांगताय त्या फॅक्ट म्हणून मी का स्विकारायच्या?

एकदा एका आंदोलनाने काय झालं बघितलं. तेव्हां प्रत्येक आंदोलनाकडे कसं बघायचं हे ज्याने त्याने ठरवावं आणि त्याला मान द्यावा.
तुमचं मत चुकीचं आहे म्हणून वादविवाद करणे याला काय म्हणतात?

राजू परूळेक, निरंजन टकले, मेहमूद पाचा हे फॅक्टस सांगत नाहीत का? कशाला फॅक्टस म्हणावं याच्या काय कसोट्या आहेत?
तुम्ही माझं मत बर्‍या बोलाने पटवून घेणार आहात का? या प्रश्नाचं उत्तर काय आहे?
तेच माझंही आहे. म्हणून बस म्हणालो.
मी माझं चालू देतोय कि कसं हे पुन्हा वाचून पहा. आता थांबतो.

मी जे सांगेन त्या फॅक्टस म्हणून स्विकारणार का?>>>

अगदी स्वीकारणार 100 टक्के
फॅक्टस असतील ओपिनियन नसेल तर अगदीच स्वीकारणार

सांगा पाहू एकतरी बघू मलाही अशी काय फॅक्ट आहे ते

https://x.com/ibmindia20/status/2081203545039405077/video/1

माझ्या एका मित्राने वरची पोस्ट ग्रूपवर टाकली आणि मला टॅग करत विचारले,
just saw this.. is it true? Coroches behaved this way?

...

मी त्याला तेव्हा उत्तर देणे टाळले.
पण दुसऱ्या दिवशी मला खालील रीळ सापडली तेव्हा त्याला ती शेअर करून उत्तर दिले.

https://www.instagram.com/reel/DbI7CPlp9Y5/?igsh=MWRrbHI3aWQzczF2cQ==

हे बघ मित्रा, आताच ही रीळ बघण्यात आली आणि तू काल मला टॅग करत शेअर केलेली पोस्ट आणि मला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडले.

यात राडा होण्याच्या आधीच ती निष्पक्ष पत्रकार सांगत आहे की इथे बाहेरचे गुंडे आले आहेत. जे आयोजक आणि स्टूडेंट कोणाचेच ऐकत नाहीयेत. आणि ते आता मुद्दाम पोलिसांना उकसवून राडा सुरू करत आहेत. आणि पुढे जाऊन गोदी मीडिया हे फुटेज दाखवून विद्यार्थ्यांना बदनाम करायचा प्रयत्न करणार.

आता ही तीच घटना आहे की वेगळी याची कल्पना नाही. पण यात त्याचे उत्तर नक्की लपलेले आहे! आंदोलन बदनाम करायला गुंड घुसवणे काही नवीन नाही. वरती रंगे हात पकडले गेले आहेत.

खरे तर तु जी पोस्ट शेअर केलेली त्यात सोबत जे लिहिले होते तिथेच पोस्टकर्त्याच्या मानसिकतेचा अंदाज आला होता.

"_ब्राह्मणों को भगाने की सोचते हैं कुछ लोग. अंबेडकरवादियों ने दिन-रात एक करके भारत का शिक्षा मंत्री एक मनुवादी, प्रह्लाद जोशी को बना दिया ,स्वागत करो...एक ब्राह्मण शिक्षा मंत्री बना है...जोशी जी ...In RSS , since 34 years_"

तर या असल्या जातीयवादी मानसिकतेच्या लोकांना मी काय समजावणार?

तिकडे जेन झी सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मता दाखवत आहेत.
तर दुसरीकडे आपली "सो कॉलड प्रगल्भ आणि संस्कारी जनरेशन" आजही जातीवादात धर्मभेदात अडकून आहे.
आणि म्हणे आपल्या जनरेशनला संस्कारांचा अभिमान आहे Happy
(आदल्या दिवशी जेन झी ना संस्कार नाहीत म्हणून ग्रुप वर चर्चा झाली होती)

प्लीज आता अजून असे काही शोधून आणत बसू नकोस. हे आज सहज दिसले म्हणून शेअर करत तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले.

पण यापुढे अश्या जातीयवादी समाजकंटक लोकांच्या पोस्टना खरे खोटे ठरवायला मुद्दाम शोधाशोध करून मेहनत घ्यायची बिलकुल इच्छा नाही.

त्यापेक्षा प्रत्येकाने आपली अक्कल वापरा आणि खरे खोटे करा.

पण जिथे न्याय नैतिकता सत्य समता बंधुभाव आहे तिथे मी बाय डिफॉल्ट असेलच याची खात्री बाळगा.

अहो शुक शुक तुम्ही फॅक्टस देणार होतात ना? त्याच काय झालं बराच वेळ वाट पाहिली मी तुंमच्या फॅक्टसची

का पाहिली? मी थांबतो म्हणालो तरी वाटच पाहिली?
सर्वात पहिल्यांदा मी फॅ़क्त देतो हे म्हणल्याचे दाखवा. दुसर्‍यांदा तुम्ही काय फॅ़क्ट दिल्या हे सांगा.

उगीच लाडू आणि पेढ्याच्या लढाईतल्या मारामाराइच्या लुटुपुटीच्या गोष्टी फॅ़टस म्हणून सांगू नका.
तुम्ही असं करा माझ्या त्या पोस्टचा स्क्रीनशॉट इथे डकवा. तुम्हाला मराठी येत असेल तर माझे पुढचे कष्ट वाचतील.
तुम्ही इरेला पेटल्यासारखे करता आहात तर त्याचे कारण काय हा प्रश्न मला पडत आहे. त्याचे उत्तर दिले आणि तुम्ही तुमच्या मित्रांना लुटुपुटीचे रागवता तो टोन लावणार असाल तर तसे सांगा.

कोथरूडच्या पोलीस स्टेशनमधे त्या मुलींना पोलिसांना त्रास दिला, सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांनी मर्डर केला त्याबद्दल जे कुणी सायलेण्ट होते त्यांची सक्रीयता आता आहे आणि अण्णांच्या आंदोलनात सुद्धा होती.
राजू परूळेकर आणि निरंजन टकले यांचा हा व्हिडीओ मी आंदोलनापूर्वी पाहिला होता. तो आता अन्य चॅनेलने वर आणला. इथे दिला.
यातला एकही व्हिडीओ न पाहता वदविवाद करायचाय तर करत रहा. चालू द्या.

मी जे सांगेन त्या फॅक्टस म्हणून स्विकारणार का?>>>

हे तुमचेच वाक्य आहे ना? का वेगळा आयडी आहे?

काय झालंय तुम्हाला आशुचँप?
स्क्रीनशॉटच डकवा संपूर्ण पोस्टचा. त्या पोस्टचा अर्थ समजत नाही कि संघोट्यांसारखं करताय?

समजावून सांगतो.
तुम्ही जे सांगता त्याच फॅक्टस कशा? मी पण काहीही सांगेन ते तुम्ही (डोळे झाकून) फॅक्टस म्हणून स्विकाराल का?
हा त्याचा अर्थ आहे. तुम्ही ज्या काही घटना सांगताय त्या सर्व मुख्य इव्हेन्टसच्या बाजूच्या सब स्क्रीप्टस आहेत. त्यातल्या फॅक्टस मधे मी इंटरेस्टेड नाही. म्हणुन मी यात मला ओढू नका हे बोललो आहे.
तुम्ही जो टोन लावाल तो लावायला मी समर्थ आहे. बुळ्या नाही.

व्हिडीऑ दिलेत बघायचे तर बघा नाहीतर बरळत बसा. या आधीच्या पेजेस वर पण दिलेत.
ते बघा. मग शुक शुक करा. जिथे कुठे सवय लागली असेल तिथून.

तसले उद्योग नसतो करत मी, तुम्हालाही कळतंय नक्की मी काय म्हणतोय
मी विचारलं तुमचे फॅक्टस कुठं आहेत नसतील। तर नाहीयेत फॅक्टस म्हणून सांगा, एवढा आकांडतांडव का। करताय?
शांतपणे सभ्यपणे विचारतोय त्यात इतके। चिडताय कशाला

मी काय म्हणतोय त्याचा तुम्ही विपर्यास करत आहात आकांडतांडव मी करत नाही.
तुम्ही इरेला पेटला आहात. तुम्हाला जाणिव करून देत आहे. पुढच्या टोनला त्याच टोन मधे मी उत्तर देईन.

मी तुम्हाला सांगितले कि थांबूयात. मला यात इंटरेस्ट नाही. माझा कन्सर्न मुलांपुरता आहे. तुम्ही मला शिकवायला लागलात कि अपघात होतात. सगळी आंदोलने तशीच नसतात.
आंदोलनात आम्ही लहानाचे मोठे होत असतो. आम्हाला शिकवता? चांगले आहे.
सोमनाथ सूर्यवंशी, कोथरूड पोलीस स्टेशन च्या पोस्टस दाखवा तुमच्या.

आणि अपघातांचा काय संबंध होता हो?
मुलांची काळजी आणि अपघात ही कसली तुलना?
मी हे आडवं लावलं नाही कारण मला त्यात इंटरेस्ट नव्हता, तुमची पोस्ट आता घेऊ का पोस्टमार्टेमला?

भीती वाटणे स्वाभाविक आहे पण प्रत्येक आंदोलन त्याच चष्म्यातून पाहिले तर कसे होईल
रस्त्यावर अपघात होतात किंवा झालाय
माझाच झालाय, सायकलवरून जाताना बेदरकारपणे कार वाला उडवून गेला
कित्येक महिने बेड रिडन होतो
आता मग मी माझ्या मुलाला सायकलवरून जाण्याची परवानगी द्यावी का नाही, कारण बेदरकारपणे वाहन चालवणारे आजही आहे वाढतच चाललेत
मग आता अशा वेळी मुलाच्या प्रोटेक्शन साठी त्याला घरी बसवावे का जे होईल ते होईल म्हणत जाऊ द्यावं, काय योग्य राहील? >>>

ही तुमची पोस्ट. अपघात होणं हातात नसतं.
त्याबद्दल काहीही करता येत नाही.
पण मुलांचा गैरवापर होऊ नये, त्यांना धोके ओलखता यावेत. अपघात होऊ नये यासाठी वाहन कसं चालवावं याच्या सूचना पालक करू शकतात. अंकल्सना अक्कलच नाही असा सूर सर्वत्र होता. जेन झीने आता कुणालाही विचारायची गरज नाही.
याला उद्देशून असलेल्या पोस्टची आणि अपघाताची तुलना कशाला?

जरा वेगळं मत दिसलं कि तुटून पडता का?

माझं मत अस्सं आहे कि अण्णांचं आंदोलन हे संघाने चालवलं होतं. त्यात लोक फसले.
आताचं आंदोलन हे सुद्धा संघप्रणित असण्याची शक्यता आहे. असंतोषाची वाफ काढण्याचं आंदोलन आहे असे मला वाटते.
का वाटते? माझ्यासारखे वाटणारे पत्रकार पण आहेत. त्यांचे व्हिडीओज दिले आहेत.
ती मतं खोडून काढा. तर मतपरिवर्तन होईल.

अहो काका माझी मुळात पोस्ट मुग्धमानसी यांच्या पोस्ट ला उत्तर होती
त्यात तुंम्ही लिहिलं मला वाटलं सेन्सिबल। असाल म्हणून उत्तर। दिलं
असले आकांडतांडव आणि आचरटपणा करणार माहिती असतं। तर कष्ट नसते घेतले
तुम्हाला जो टोन येतो जी भाषा येते त्यात उत्तर द्या

तुम्ही कित्तीही उक्सवलं तरी मी शांतपणे आणि सभ्यपणे लिहिणार
आणि लिहीत रहाणार

तुमचे फॅक्त कधीही जमतील तेव्हा द्यायला विसरू नका

दिल्ली पोलिसांनी एआय (Face Scan) तंत्रज्ञानाच्या आधारे जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या गर्दीत ओळखलेल्या २,८७३ लोकांवर पूर्वीपासून नोंदवलेले गुन्हे अतिशय गंभीर स्वरूपाचे होते. यातील ९८९ लोकांवर तर देशातील सर्वात भयंकर आणि हिंसक गुन्ह्यांची नोंद आहे.

ही फॅक्ट आहे

१,८८४ लोकांवर दंगल घडवणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि तोडफोड करणे यांसारखे गुन्हे पूर्वी नोंदवले गेले होते.

आता प्रश्न येतो की हे लोकं गुन्हेगार आंदोलनात घुसण्यात फायदा कोणाचा आहे?
विद्यार्थ्यांनी काही आशा गुंडांना ओळखून त्यांना मारत बाहेर काढल्याचे व्हिडिओ आहेत
पण इतक्या गर्दीत कोणाला काय कळणार?

आंदोलन पेटवून देण्यासाठी दिपके आणि आयोजक गुंडांना हाताशी धरून असले कृत्य करतील का अन्य कोणी ज्यांना हे आंदोलन पेटायला हवे होते?

Pages