Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अन्यत्र वाचलेलं आणि पटलेलं मत
अन्यत्र वाचलेलं आणि पटलेलं मत -
आंदोलनाला घाबरून राजीनामा दिला नाही.
मोदीशहांसाठी परिसीमन विधेयक पास होणं गरजेचं आहे. त्यासाठीच आप, तृणमूल, ठाकरे सेना यांचे आमदार फोडलेत. त्यासाठी संसदेत कामकाज व्हायला हवं, म्हणून राजीनामा.
तरीही एकजुटीची शक्ती कळली. भीती पळवली.
जंतरमंतरवरच्या आंदोलनात सगळ्या वर्गातली, सगळ्या जातीधर्माची मुलं - मुली होती. समता , बंधुता , एकता , स्वातंत्र्य, न्याय या घटनेत अंतर्भूत असलेल्या तत्त्वांचं जिवंत उदाहरण पोरांनी घालून दिलं.
मुलींना इतक्या गर्दीतही आम्हांला कायम सुरक्षित वाटलं असं म्हटलं. तेही दिल्लीत.
अजिबात वाटले नव्हते असे काही
अजिबात वाटले नव्हते असे काही होईल.. पण शेवटी नवीन रक्ताच्या रेट्यापुढे वाकावे लागलेच. भक्तांना आज एकादशी की अमावस्या आहे असे वाटत असेल. सूर्यवंशी, भावड्या तोरसेकर इ चाटूकार झोपणार नाहीत दोन दिवस. काहीतरी भंपक कारण मीमांसा (गिरे तो भी) शोधायला काही रात्री न झोपता काढाव्या लागतील. नवीन पिढीचे अभिनंदन.
... शेवटी, एकादश अवतारा मी म्हणेन तीच पूर्व दिशा असे काही नाही बघ.
जेनझी ने आपल्या आणि
जेनझी ने आपल्या आणि सगळ्यांच्याच मनातील भिती काढली आहे. फेसबुक स्टेटस ठेवलं तरी झुंडशाहीला घाबरून आपण व्यक्त होत न्हवतो, यांनी सगळं गुंडाळून निर्भीडपणा काय ते दाखवून दिले. हे ते लोकशाहीतील अगदी साधं तत्व होतं, माझ्या जन्मापासून कधी भीती आहे म्हणून काही करायचं नाही हा विचार आला न्हवता, ती या मोदीशाहीची देन आहे. आणीबाणी बदल सांगू नका, ती मी कधी पाहिलेली नाही.... ती भीती काहींची तरी संपली असेल.
त्यावर भाजपा, वर कंसराज म्हणत आहेत तसं, व्हिंडिक्टीव होऊन केसेस करणे, त्रास देणे प्रकार करेलच. त्याला आपण विरोध करून जेन झी ला पाठिंबा देत राहायला हवं.
मिठाचा खडा नाही, तेच सत्य आहे. जागरूक रहायलाच हवे.
आपल्या भावना काहीही असो.
आपल्या भावना काहीही असो. काहींना हा लढा क्रांतीकारक वाटतोय तर काहींना मुलांचा बालिश आणि अनाठायी हट्ट वाटतोय. ते काहीही असो किंवा दोन्हीतला सुवर्णमध्य असो. पण अमित नेहमी म्हणता तसे - आहे ते असे आहे.

या पोरांनी अन्य पर्यायच ठेवला नाहीये.
अमित , तुझ्या भाचीचं आणि
अमित , तुझ्या भाचीचं आणि तिच्या मैत्रिणीचं विशेष कौतुक.
--
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामापत्रात काहीही चुकल्याचा भाव नाही. उलट देशविरोधी तत्त्व वगैरे नेहमीचे शब्द आहेत.
आणि आजच्या पेपरात बातमी आहे NTA sacks 47 officials. legal and criminal action to follow.
मोदी सरकारने पेपर फुटीवर क्विक अॅक्शन घेतली होती ना? मग आज हे का ?
दुसर्या बातमीत using discarded wrappers, cops trace outlets sending food to Jantar Mantar.
२०२४ पेपर फुटीनंतर आपले कायदे
२०२४ पेपर फुटीनंतर आपले कायदे अशा घटना टाळण्यासाठी मजबूत आहेत असं तेव्हा का म्हणाले मग?
आता कचरा वखरत बसाल तर जनता तुम्हाला गाडून टाकेल
सोनम वांगचुक यांच्या पत्नी
सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी त्यांच्या ताज्या ट्वीटमध्ये म्हटलंय की पोरांनी सनातन धर्माचं पालन केलं. पुढे हिंदुइझम, नॅशनलिझम हे भाजपायींचे आवडते शब्दही आहेत.
'इस सरकारमें इस्तीफे नही होते
'इस सरकारमें इस्तीफे नही होते'
कुठच्या गुर्मीतून आलं होतं हे??
---
वेल डन जेनझी! अभिनंदन!!
राजीनामा न मागण्याच्या / घेण्याच्या / देण्याच्या विरोधात function at() { [native code] }इशय निर्लज्जपणे समर्थन करणार्यांना काही गोष्टी लक्षात आल्या असतील. अर्थात यांचे मेंदू पाषाणयुगातले मेंदू निरमा पावडरने स्वच्छ धुतलेले असल्याने आशा कमी आहे, पण आशेला थोडी जागा आहे, असं म्हणायला हरकत नाही.
--- राज्यकर्ते नेहेमीच घाबरट असतात, हे सिद्ध झालं. कारण जेनझीसारखं 'नथिंग टू लूज' अशी यांच्याकडे परिस्थिती नाही. यांच्याकडे पॉवर आहे, ती अनेक राडे करून मिळवलेली आहे आणि ती टिकवायची आहे. नाही टिकली तर बर्याच गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे. थोडक्यात आयुष्याचा प्रश्न आहे. 'इस सरकारमें इस्तीफे नही होते' हे सुद्धा भीतीपोटीच आलेलं होतं. ७५+ वयोवृद्ध भिडुच्या चेहेर्यावर काल भिती स्पष्ट दिसत होती. हे ५६ इंचांची भाषा करणारे सारेच मुळात डरपोक असतात, आहेत- हे अनेकदा सिद्ध झालं होतं, ते पुन्हा एकदा झालं इतकंच.
--- तुमच्या भविष्यातल्या मतदारांना थिल्लरच्या गणतीत काढताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एक महिन्याच्या वर ती पोरं बोंबलताहेत. तुम्हाला आता जाग आली. त्यांचे पृष्ठभाग लाठ्यांनी फोडून काढून नंतर 'फ्रेंड्स' बोलताना लाज वाटत नाही? का ही वेळ आली? घाणेरड्या आवाजात घाणेरडा चेहेरा करून फ्रेंड्स बोलण्यापेक्षा 'तुम्ही आम्हाला हरवलंत' असं निर्मळपणे म्हणता आलं असतं की नाही?
--- तुम्हाला सगळं सोपं वाटत होतं. शेतकरी आंदोलन एक वर्षाच्या वर चालूनही तुम्ही दाद दिली नाहीत. ठिकठिकाणची आंदोलनं अशीच चिरडलीत. जगातल्या सगळ्या सत्ताधीशांना येतो तसा माज तुम्हाला आला. पण ते मध्यमवयीन आणि वृद्ध शेतकरी होते. ही त्यांची पोरं आहेत. यांची भाषा आणि स्टाईल वेगळी आहे. काठ्या खाण्याची शक्ती आहे यांना, ऊर्जा आहे, आणि वाईट परिस्थितीतही सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी, सेन्स ऑफ ह्युमर टिकवून ठेऊ शकतात ते सहज. त्यांच्या क्रिएटिव्हिटी आणि ऊर्जेने देशातल्या सार्या शहरांत आग लावली. आणि function at() { [native code] }यंत कुटिल राजकारणी असल्याने, आता पुढे काय होईल याची चाहूल तुम्हाला लागली. एरवी 'You fucked with the wrong Generation' सारख्या पाट्या इतक्या व्हायरल होतील याची तुम्हाला सुतराम कल्पना आणि शक्यता वाटत नव्हती.
--- राजीनाम्याने काय होईल, आणि तो देऊच नये- हा विचार साक्षात बुद्धाने मांडल्यागत मांडणार्या निर्लज्ज विचारसरणीच्या लोकांसाठी:-
मी आधीही लिहिलं होतें- ज्या पदावर तुम्ही बसता, तिथून जे काम नीट होणं अपेक्षित आहे, ते होत नसेल, तर तुम्ही बाजूला व्हा. तुम्हाला कामाची जबाबदारी पेलवत नसेल, तर आता लगेच बाजूला होणं ही तुमची जबाबदारी आहे. नंतर येणारा कोण असेल ते नंतर पाहू, पण आता नंतर येणार्यासाठी एक्झांपल सेट करणं ही तुमची जबाबदारी आहे. जबाबदारी पार पाडली नाही तर काय होऊ शकतं हे कळायलाच हवं. नाहीतर 'इस्तीफे नही होते' असा दांडगा आत्मविश्वास येतो, शिवाय तो आता हजार तरी वर्षं टिकेलच असाही आत्मविश्वास येतो. (जो या पोरांनी पाण्यात नाचून गटारात वाहवून टाकला). महादू नाहीतर तर मग कोण- हाही असाच एक निर्लज्ज प्रश्न. कोण म्हणजे काय? कुणीही चालेल. संसदेसमोर शेंगदाणे विकणाराही चालेल. चहा विकणारा चालतो ना? शेंगदाणे जास्त महाग आहेत मग.
--- अनेकांना ही सो-कॉल्ड सीजेपी पार्टी, तिची आंदोलनं आणि तिला भविष्य नाही, अर्थ नाही- असं वाटतं. मलाही जवळजवळ तसं वाटत होतं. मात्र गेल्या काही दिवसांच्या घडामोडी बघता काहीही होऊ शकतं असं वाटू लागलं. अंदाज आला नव्हता, कारण मी जेनझी अर्थातच नाही. ही मुलं काय पद्धतीने रिअॅक्ट होतात, क्रिएटिव्ह होतात, विनोदी होतात, बंड करण्याच्या आणि प्रतिवाद करण्याच्या पद्धती अवलंबतात ते बघणं- हे थक्क करणारं आहे, थकवणारं आहे. त्यांना आता कॉन्फिडंस आला आहे. भारतासारखा महानद एका जादूच्या कांडीने, किंवा एखाद्या मसीहाने वळत, फिरत किंवा बदलत नाही- हे स्पष्टच आहे. (२०१४ नंतर अनेकांना तसं वाटतंय. हे सारे मुळातच हास्यास्पद लोक आहेत). पण कुणीतरी 'चेक' ठेऊ शकतो, ती इलिजिबिलीटी त्याच्यात आहे- हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. हे विसरायचे दिवस जवळजवळ आलेच होते. लेकिन सुबह हमेशा होतीही है मामू.
--- आपण स्वतःला कितीही पावरबाज समजत असलो, तरी आपलं सहज माकड होऊ शकतं, आणि तेही वरकरणी थिल्लर वाटणारी पण भयंकर आत्मविश्वास असलेली ही पोरं करू शकतात हा मुकादमासकट सार्या कामगारांना गेला आहे. नसेल गेला तर मुर्खांच्या नंदनवनात आहात तुम्ही!
--- अख्खा मेडिया, देशातले सगळ्यात मोठे उद्योजक, पोलिस सीबीअय इडी न्यायालय निवडणुक आयोग सारख्या सरकारी संस्थांना गुलाम करून टाकल्यानंतरही अशी परिस्थिती येऊ शकते. म्हणजे असं समजू की जे झालं ते क्षुल्लक आहे. पण काय जॉमेट्रिक स्पीडने उद्रेक वाढला हे सगळ्यांनी बघितलं. ही पोरं करतात ते अराजक, आणि तुम्ही अख्खी यंत्रणा राबवून घटनेविरुद्ध्च असो, पण माणुसकीविरुद्ध वागून जो नालायकपणा करता ते अराजक नाही? तुमच्यात कुणी जरा शहाणे असतील, तर ते या सो कॉल्ड 'क्षुल्लक' घटनेवरून योग्य तो धडा घेतीलच. तुमच्या खासदारे- आमदार-पक्ष तोडफोडीचा हलकटपणा अशा वेळी काहीही कामी येणार नाही- हेही कळेल.
--- पोट साफ न झालेल्या व्हाटसप अंकलची कंटाळवाणी, इरिटेटिंग सद्दी संपण्याची चिन्हे जरा समोर दिसताहेत. ते इतक्या लवकर होणार नाही, पण जेनझीच्या वागण्याचं आकलन करण्याचं, झालंच असल्याचं दाखवणारे, आणि त्यांना (व्हॉट्सप आणि फेसबुकवर) वठणीवर आणण्याचं पवित्र काम हाती घेतलेले हे सारे टॉक्सिक काका-काकु आता काही दिवस बावचळलेल्या स्थितीत असतील. (आंदोलन अख्खं इन्स्टावर झालं हे यांना फार उशिरा कळलं!!) हे टॉक्सिक व्हॉट्सपवीर काकाकाकु याच धाग्यावर अनेक दिसताहेत. काळजी घ्या. टोपी संभालो, हवा बहुत तेज उडता है!
--- आणखी काही मुद्दे लिहायचेत. वेळ मिळेल तसं लिहून ठेवतो..
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. पुढे काय?
दिपकेला आमदार/खासदारकि..
वांगचुक लडाखचा मुख्यमंत्री..
धर्मेद्र प्रधान दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर..
जय हो...
५० ग्राम पावडरवाल्या
५० ग्राम पावडरवाल्या हर्षवर्धन कदमची मुलाखत. इथे तो पढवलेलं बोलतोय का?
https://www.youtube.com/watch?v=RSnazhAKvQ0
In September 2024, Dylan Estibeiro, a 30-year-old Kalina resident narrowly escaped a similar frame-up orchestrated by the Khar police when the incident was captured on CCTV and went viral, leading to the suspension of a police sub-inspector and three constables.
In August 2024, Oshiwara police allegedly tried to plant drugs on a Jogeshwari garment dealer with the alleged intent of extorting Rs 10 lakh from him. Fortunately, he saw them behaving suspicious around his scooter and asked his girlfriend to start recording them, thus gathering precious evidence against the cops.
राज, अजूनही नंदनवनात आहेत
राज, अजूनही बबलच्या नंदनवनात आहेत
तुमच्या देशाच्या बीबीवर दातखिळी बसल्याने इथे आले तर इथेही तीच गत होणार आहे. पायगुण चांगला आहे अंकल तुमचा! असेच हिणवत पिंक टाकत रहा. हेल्पिंग अस!
साजिरा, पोस्ट शेअर करू का नाव ठेवून? पोटतिडकीने आणि सडेतोड लिहिली आहेस.
ही इज नथिंग लेस than
ही इज नथिंग लेस than व्हॉट्सअप अंकल्स. ओन्ली डिफरंस इज़ ही टाईप्स इंग्लिश इन देवनागरी टू हाइड द हिप्पोक्रेसी
पोस्ट आवडली आणि पटली साजिरा.
पोस्ट आवडली आणि पटली साजिरा.
<<<< साजिरा, पोस्ट शेअर करू
<<<< साजिरा, पोस्ट शेअर करू का नाव ठेवून? पोटतिडकीने आणि सडेतोड लिहिली आहेस
>>>>
+७८६ कडक लिहिले आहे
मी तर करणार शेअर..
या कोकरोच पार्टीच्या आधीपासूनच मी या जनरेशनचा फॅन आहे. इतर काही चर्चा धाग्यांवर कौतुक केले होते मागे पण तेव्हा कोणी सिरियसली घेतले नसेल ती गोष्ट वेगळी
https://www.facebook.com/reel
https://www.facebook.com/reel/4372487442969000/?app=fbl
हिंदू वीर सेनेचा शूरवीर अध्यक्ष
राज जीवाचा बरं वाईट करून
राज जीवाचा बरं वाईट करून घेणार असाल तर निर्णय घेऊन टाका कोणी मिस करणार नाही!
ही इज नथिंग लेस than
ही इज नथिंग लेस than व्हॉट्सअप अंकल्स. ओन्ली डिफरंस इज़ ही टाईप्स इंग्लिश इन देवनागरी टू हाइड द हिप्पोक्रेसी >>>> +१
शेअर करण्यासारखी वाटत असेल तर
शेअर करण्यासारखी वाटत असेल तर कृपया शेअर करा. नावही लिहिण्याची गरज नाही. लिहिलंय तशा भावना अनेकांच्या आहेत, हे दिसतंय आजुबाजूला.
पोस्ट आवडली आणि पटली साजिरा.
पोस्ट आवडली आणि पटली साजिरा. असेच नाकर्तेपण त्या एका बाईंच्या मध्ये पण आहे. त्यांची खुर्ची जाऊन त्या जागी एखादी बरी व्यक्ती येईल तो सुदिन. त्या तिथे का आहेत हे बहुदा त्यांना पण माहित नाही. केस पिकले त्यांचे तिथे बसून बसून, पण काही अर्थ लागत नाहीये त्यांना कशाचाच.
>>>>>राज जीवाचा बरं वाईट करून
>>>>>राज जीवाचा बरं वाईट करून घेणार असाल तर निर्णय घेऊन टाका कोणी मिस करणार नाही!
आपण काय बोलतोय - जरा तरी विचार करा.
डोंट वरी सामो, असलं काहीही
डोंट वरी सामो, असलं काहीही होणार नाही. कुणी राजीनामा द्या म्हणलं म्हणून लग्गेच कुणी देतो का? थोडा वेळ लागतोच.
जरा गंंमत आहे, आणि जेनझी स्टाईल कॉमेंट आहे ती. या धाग्यावर आणि आजच्या सिच्युएशनवर बरोबर आहे.
पोरे तगडी फाईट देऊन जबरदस्त
पोरे तगडी फाईट देऊन जबरदस्त खुंट मारून बसलीत, आनंद साजरा करा, पण तो साजरा करताना कोणाच्या मरणाची कामना तरी करू नका राव ! "पाकिस्तानात जा" अन् आपल्यात काही तरी तर फरक ठेवा आपण तर थेट "मसनात जा" म्हणतोय इथे, हे असेच बोलायचे असेल तर काय अर्थ उरत नाही.
स्पष्ट पण प्रांजळ मत.
फारच प्रांजळ मत आहे तुमचं.
फारच प्रांजळ मत आहे तुमचं. 'लाठ्या कसल्या घालता, गोळ्या घाला यांना' अशा प्रकारच्या विश्वशांतीची प्रार्थना करणारे, आणि त्यांच्या पुनर्जन्माची प्रतीक्षा करणारे तुमच्या आजुबाजूला आणि सोशल मेडियावर तुम्हाला दिसले की नाही?
लंपन तुम कही सीए या सीएस तो
लंपन तुम कही सीए या सीएस तो नही?
फारच प्रांजळ मत आहे तुमचं.
फारच प्रांजळ मत आहे तुमचं. 'लाठ्या कसल्या घालता, गोळ्या घाला यांना' अशा प्रकारच्या विश्वशांतीची प्रार्थना करणारे, आणि त्यांच्या पुनर्जन्माची प्रतीक्षा करणारे तुमच्या आजुबाजूला आणि सोशल मेडियावर तुम्हाला दिसले की नाही?>> मला खूप दिसले. लेक तिथे गेला आणि स्टोर्या लावल्या म्हणून लेकाच्या नर्सरी पासूनच्या वर्गमित्राने फोन करून मला भरपूर घाणेरड्या शिव्या ( आंटी वहां होगी तो उन्हे भी सुनाओ म्हणत) देवून झाल्यात. लेक तिथे गेला आहे हे माहित असलेल्या ओळखीच्या लोकांकडून यांना गोळ्या घालायला हव्यात असंही ऐकलं आहे.
पण असो, आपण त्या लेव्हलवर नाहीच जावू शकत.
आपण त्या लेव्हलवर नाहीच जावू
आपण त्या लेव्हलवर नाहीच जावू शकत.
अल्पना - thanks ! स्वतः झेलून बसलेल्या व्यक्तीने माफीची ताकद आणि तत्वांची लेव्हल दाखवली.
साजिरा - प्रांजळ मत तर हे होतं की त्यांनी चिमूटभर गु खाल्ला म्हणून आम्ही वाटीभर का खाऊ नये हा प्रश्नच अप्रस्तुत असावा ! त्यांच्यात अन् आपल्यात मुक्त असण्याचा अन् बंदिस्त असण्याचा फरक आहे, पण आता कोणाला कसली स्पर्धा करायची त्यावर आमचा कसला जोर चालणार ? त्यामुळे जो जे वांछील तो ते लाहो
ते विधान अतिशय अत्यंतिक आणि द्वेषमूलक होतं जे उजव्या विचारसरणीचे द्योतक आहे, सुशिक्षित उदारमतवादी विचार नाहीच, त्यामुळे माझा त्याला विरोध असणारच, कोणाला प्रांजळपणे फरक पडो अथवा नाही
<<< लेक तिथे गेला आणि स्टोर्
<<< लेक तिथे गेला आणि स्टोर्या लावल्या म्हणून लेकाच्या नर्सरी पासूनच्या वर्गमित्राने फोन करून मला भरपूर घाणेरड्या शिव्या ( आंटी वहां होगी तो उन्हे भी सुनाओ म्हणत) देवून झाल्यात. लेक तिथे गेला आहे हे माहित असलेल्या ओळखीच्या लोकांकडून यांना गोळ्या घालायला हव्यात असंही ऐकलं आहे.
>>>
हायला अल्पना हे हॉरिबल आहे
तुमच्या आसपास अशा विचारांची लोक असून सुद्धा तुमचा लेक तिथे गेला आणि तुम्ही त्याला जाऊ दिले याबद्दलचा रिस्पेक्ट आता आणखी वाढला __/\__
द्वेषमुलक (आणि / म्हणजे
द्वेषमुलक (आणि / म्हणजे अर्थातच उजव्या) विचारसरणीबद्दल तुमचे काय विचार आहेत ते इथं आणि इतरत्र वाचले आहेत. त्याबद्दल सावकाश बोलू. तुम्ही सध्या जेनझीला काही प्रतिसादांत 'बकप' केलं आहे, ते पुरेसं आहे. आय अॅम हॅपी.
तुम्ही काय वाचलं अन् काय
तुम्ही काय वाचलं अन् काय तुम्हाला खुपलं हे तुमचं तुमच्यापाशी. तुम्हाला खुश करायला तर नक्कीच लिहित नाही बा मी. जेन झी ने काम केले उत्तम तर बक अप म्हणतोच, तुम्ही हॅपी होताय का नाही त्याने मला फरक पडत नाही.
तुमच्या आसपास अशा विचारांची
तुमच्या आसपास अशा विचारांची लोक असून सुद्धा तुमचा लेक तिथे गेला आणि तुम्ही त्याला जाऊ दिले>>>
गंमत शेअर करू का, माबो पुरती ठेवा
आमच्या सौ या कट्टर मोदी समर्थक आहेत पण आम्ही खूप मागेच घरी राजकीय विषय बोलायचे नाहीत असा ठराव पास केल्याने शांतता असते
तर हा मोर्चा ला जाऊन आल्याचे कोणाला माहिती नाहींये घरी
त्याला म्हणलं इंस्टा वर स्टोरी टाकू नकोस गप रहा
ती माबोवर नाहीये म्हणून हळूच धाडस करून सांगतोय
इस राज को राज ही रहने दो
Pages