महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांनी जरा धीर धरला तर त्यांनाच ह्यातून फायदा होईल. सगळेच सत्तेत गेले तर विरोधी मत त्यांनाच मिळतील.
Submitted by रात्रीचे चांदणे on 10 July, 2026 - 06:43

हो, पण हा धीरच धरवत नाही आहे ना कुणाला. सगळेच सत्तापिपासू , निवडून येण्याकरता खर्च केलेला पैसा दसपटीने याच टर्म मध्ये वसूल करायचा आहे सर्वाना. मग त्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या दारातील कुत्रे पण आनंदाने होत आहेत हे सगळे.
या टर्म मध्ये चांगले काम करून मतदारांचा विश्वास जिंकून पुढील टर्म मध्ये पुन्हा निवडून सत्तेत यावे असे कोणत्याच विरोधक पक्षाला वाटत नाही आहे, यच्चयावत गलिच्छ सत्ताकारणी आहेत सगळेच.
जर या SIR मध्ये मतदार यादीतून नाव गायब झाले तर बरे होईल असे वाटते, म्हणजे अशा गलिच्छ लोकांना मत द्यावे लागण्याची किंवा नोटा ला मत देऊन मत वाया घालवल्याची टोचणी तरी लागणार नाही मनाला

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणुन जगभर ढोल बडवायचे आणि आपणच लोकशाहीचा मोठा घटक असलेले विरोधक संपवायचे. दुतोंडी सांप देखिल लाजेल

२०१९ मध्ये त्यांनी जरा धीर धरला तर त्यांनाच ह्यातून फायदा झाला असता. असेही १९९५_९९ मध्ये युती असताना जोशी आणि राणे मुख्यमंत्री झाले होते. आदित्यला उपमुख्यमंत्री किंवा मुख्य खातं घेऊन सत्तेत राहता आलं असतं. मुंबई महापालिकाही हातात राहिली असती.
पण बाळासाहेबांचं धोरण असं होतं की मुख्यमंत्री दुसरा नेता ठेवायचा आणि त्यांनी मातोश्रीवरून सूत्र हलवायची. हेच उद्धव करणार होते. आदित्य किंवा दुसरा कोणी मुख्यमंत्री करून उद्धव मागून सूत्र हलवणार . लोकशाहीच्या नावाने चांगभलं. युतीत असूनही कमळाबाईला शिव्या घातल्या राउतांच्या पाठीमागून ते काही भाजप विसरली नाही.
मग सिल्वर ओकवर पायधूळ झाडली पण काकांनीही कोलदांडा घातला. दिल्लीत पायऱ्यांवर तीन दिवस बसले पण काही झालं नाही. पाठीराख्यांनी तेव्हा का सबुरीचा सल्ला दिला नाही? दिला असेल पण भाजप महापालिका हडप करणार या भीतीने बतावण्या सुरू केल्या. पवार आणि सोनियांनी वाटा घेतला तर चालणार होते. असो.

पक्षफुटीबाबत एकंदर माध्यमांवरील मते वाचली की असे वाटते की फडणवीस, शिंदे हे हातात लाठ्या घेऊन आमदारांना फटके देत देत आपापल्या पक्षात ओढून नेत असावेत.

ते स्वतःचा पक्ष सत्तेसाठी सोडतात का, निष्ठा का सोडतात, काल संध्याकाळी मूळ पक्षात स्टेजवर आणि आज सकाळी दुसऱ्या पक्षात असे का करतात, ED CBI वर रान का उठवले जाते, पक्ष सोडणारे ED, CBI ला नेमके का घाबरतात ह्यावर सगळे गप्प!

ED, CBI च्या संकटापासून भ्रष्टाचाऱ्यांना १०० % सुरक्षित ठेवणारा एकच पक्ष आहे.

न लाजता स्विकारते.

पक्ष सोडणारे ED, CBI ला नेमके का घाबरतात ह्यावर सगळे गप्प!

सत्ताधारी पक्ष ED , CBI आणि IT चा धाक का दाखवतो ? आणि पक्षांतर केले की त्यांना क्लीन चीट का दिली जाते?
ED चा success rate कधी बघितला आहे का? News click च्या संस्थापकाला ED ने कित्येक महिने तुरुंगात सडवले, news click बंद पडले. नंतर ED च्या आरोपात तथ्य नसल्याचे आढळले. सरकारला satire सहन होत नाही, विरोधी बातम्या तर अजिबात सहन होत नाही.

परम आदरणीय शरद पवार जाऊन एकनाथ शिंदेंना भेटले. आणि एकेकाळी शरद पवारांच्या भक्तीत रममाण असलेल्या संजय राऊतला मिरची झोंबली! एकेकाळी "हो मी पवारांचा माणूस आहे" असे अभिमानाने सांगणारा प्राणी पवारांना आपल्या हाडवैरीची गळाभेट घेताना पाहून राऊतांना केसाने गळा कापला गेल्यासारखे वाटले असेल!

पवार कळायला शंभर जन्म घ्यावे लागतात असे बेताल लांगूलचालन करणार्‍या रौत्याला शेवटी पवार कळलेले दिसत आहेत!
म्हणजे रौत्याची शंभरी भरली असावी!

पवारांच्या नावाने ३ पिढ्यांपासून गळे काढणारे पेठी लोक सिंहगडरोडवरील बुथावर कचाकचा घड्याळ दाबून आले होते! म्हणून राऊत बोलले पवार कळायला पेठेतल्या अजून १०० पिढ्या खपतील.

अरेच्चा !! आता पवारांची पप्पी गोड लागली का शेंडे ?!! पवार मोडूल्याचे गुरु आहेत हे कारण पुरेसं ठरलं का?

पवार हा एक अत्यंत विश्वासघातकी, नीच, ढोंगी, खोटारडा, दगलबाज जातीय नेता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला एक दीर्घकालीन कलंक आहे.
एकनाथ शिंदे जर पवाराशी फार जवळिक करू पाहतील तर त्यांच्या पक्षाचे वाटोळे होणार हे नक्की.
पण तरी संज्यासारख्या बेताल, नादान, वाचाळ, शिवराळ, हीन नेत्याचा भ्रमरनिरास सॉरी भ्रमनिरास होताना पाहून (आसुरी) आनंद होतो आहे.
पवारांचे पाय चाटणार्यालाही परिस्थिती बदलताच पवारांची लाथ खावी लागते हे पाहून खूप खूप मनोरंजन होते आहे!

<< पवार हा एक अत्यंत विश्वासघातकी, नीच, ढोंगी, खोटारडा, दगलबाज जातीय नेता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला एक दीर्घकालीन कलंक आहे. >>

-------- एव्हढा पवार द्वेष ?

प्रत्येक विशेषणाला अर्थ आहे.
पवाराची राजकीय कारकीर्द वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून झाली. त्यानंतर पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर ह्या अट्टल गुन्हेगारांना आपल्या बरोबर घेऊन राजकारणात उघड गुन्हेगार लोकांना आणण्याचा पायंडा पाडला.
मुंबईत कधी न घडलेला बाँबस्फोट घडला आहे असे खोटे सांगून आपला सेक्युलर अजेंडा धोक्यात येणार नाही याकरता आपला अधिकार वापरला.
जातीयता तर रक्तात भिनली आहे.
बामण द्वेष, हिंदू धर्माचा द्वेष हे गेल्या २०-२५ वर्षात जास्तीत जास्त ठळकपणे दिसते आहे.
आपली टिंगल करणारी कविता फोरवर्ड केली म्हणून केतकी चितळेला विनयभंग, शाईफेक आणि अनेक महिने तुरुंग सहन करावा लागला. ह्या माणसाने मध्यस्थी करून सोडून द्या वगैरे सांगितले नाही. बामण बाई असल्यामुळे तेवढाही मोठेपणा दाखवू शकले नाहीत.

खरोखरीची दुष्कृत्ये दिसत असताना पवारांचे कौतुक करायला मी पवारासारखा ढोंगी बनू शकत नाही.

काही दिवसांपूर्वी कोणीतरी मला ट्रोलर म्हंटले होते. त्यावर मी लिहिले होते की मी तर ट्रोलिंग करतच नाही पण ह्यापुढे इथे ट्रोलिंग होईल तेव्हा दाखवून देईन की ट्रोलिंग कोण कोण करत आहे. त्यानंतर मी एकदाही हे दाखवून दिले नाही की येथे नेमके ट्रोलिंग कोण करत आहे. आजही मी ते दाखवून देणार नाही.

वैयक्तिक आयुष्यातील किंवा विशिष्ट राजकीय भूमिकेशी ठाम राहिल्यामुळे आलेले नैराश्य, वर्षानुवर्षे खोचक प्रतिसाद देऊन झालेली दमछाक ह्यामुळे काही लिहिले जात असेल.

संपूर्ण संकेतस्थळाला माहीत आहे की वैयक्तिक रोख असलेले प्रतिसाद कोण देत आहे आणि तरीही उलटेच आरोप करूनही कोण येथील वावर अधिकाधिक खोचक कसा वाटेल हे बघत आहे.

येथे जी मेजॉरिटी आहे ती एकूण माध्यमांवर अक्षरशः नगण्य आहे.

(म्हणजे एकूण जनतेच्या तुलनेत)

राउतांनी नवी पुडी सोडली आहे. फडणवीस केंद्रात जाणार आणि बावनकुळे खुर्चीवर बसणार. { कधीएकदा ते महाराष्ट्रातून जाणार असं झालं आहे.}

फडणवीस नेहमीच अभ्यासूपणाचा देखावा दाखवणारे हातवारे करुन आणि शब्दांच्या कसरती करुन तथ्यात घपला असणारे अर्धसत्य बिनदिक्कत रेटून बोलतात.

https://www.facebook.com/share/v/1CsUB2auJU/

एकनाथ शिंदे जर पवाराशी फार जवळिक करू पाहतील तर त्यांच्या पक्षाचे वाटोळे होणार हे नक्की.

आता जर हे एक क्षण सत्य मानले तरी हे करायची पवारांना गरज काय ? आणि हे करत असताना पवार कन्येसह दिल्लीत सीजेपीचे धुमशान सुरू असताना जाऊ मोदींना काय म्हणून भेटले असतील ? २ + २ चे राजकीय आडाखे तुम्हाला बांधता येत असावेत अशी (थोडीशी अनिच्छेने) अपेक्षा !

बाकी मौका आणि दस्तुर पाहून एक ढळढळीत विधान करू इच्छितो.

महाराष्ट्रीय ब्राह्मण समाज स्वतः स्वतःचा दुश्मन आहे, इतका पॉलिटिकली incorrect आणि स्वमग्न दुसरा जाती समूह भारतात नसेल अगदी उत्तर प्रदेशातील कडवेपणासाठी बदनाम शुक्ला पांडे मिश्रा तिवारी लोक सुद्धा. पिरियड

हे मी इतिहासातील ते समकालीन उदाहरणे देऊन सुद्धा सिद्ध करू शकतो. काही लोकांना ब्राह्मण पंचिंग बॅग सारखे आवडतात, कारण त्यांनी बघितलेले ब्राह्मण वरील कॅटेगरी मध्ये असणारे बसतात. मधल्यामध्ये आमच्यासारखे निमशहरी ग्रामीण भागातून अजून तुरळक असणारे पण गावगाड्यातील अठरा पगड जातीत मित्र असणारे किंवा प्रॅक्टिकली राजकारण समजू शकणारे अन् अर्थातच संधींच्या कमतरतेमुळे आर्थिकदृष्ट्या आमटी भाकरी सेटल्ड ब्राह्मण मात्र सुक्यासोबत ओले जळावे तसे द्वेषाचे धनी होतो ह्या कोथरूड/शिवाजीपार्क/सदाशिवपेठ इत्यादींच्या आक्रस्ताळी वजनाखाली !

मधल्यामध्ये आमच्यासारखे निमशहरी ग्रामीण भागातून अजून तुरळक असणारे पण गावगाड्यातील अठरा पगड जातीत मित्र असणारे किंवा प्रॅक्टिकली राजकारण समजू शकणारे अन् अर्थातच संधींच्या कमतरतेमुळे आर्थिकदृष्ट्या आमटी भाकरी सेटल्ड ब्राह्मण मात्र सुक्यासोबत ओले जळावे तसे द्वेषाचे धनी होतो >>>>>
अगदी अगदी

जेम्स वांड, त्यालाच स्टिरिओटायपिंग म्हणतात ना? इतर लोक जनरलायझेशन करतात हा खरा प्रॉब्लेम आहे. गेली ७० वर्षे सत्ता उपभोगणार्‍या मराठा समाजाला कशाला हवे आहे आरक्षण हे जितके चुकीचे जनरलायझेशन आहे, तितकेच.

कोणत्याही धर्मातील, जातीतील एक प्रवृत्ती घ्यायची, त्यावरून पूर्ण समाजाचे जनरलायझेशन करायचे हेच ते प्लेबुक असते. कोणी मुस्लिमांविरूद्ध, कोणी इतरांविरूद्ध

उलट मी म्हणेन की पुण्यामुंबईचे सोमि अंकल आणि काकवा ही सगळ्यात निरूपद्रवी जमात आहे. तेथे अचाट अफाट लिहीणारे प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काहीही करत नाहीत. आणि त्यांच्या पोस्ट्सनी कोणी प्रभावित होउन प्रत्यक्षात काही करत नाहीत. सगळ्या तोंडाच्या व्हर्च्युअल वाफा आहेत. उत्तरेकडचे ब्राह्मण वेगळे. तेथे ते संख्येने जास्त आहेत, राजकीयदृष्ट्या डॉमिनण्ट आहेत आणि वेळप्रसंगी रस्त्यावरही येणारे आहेत.

याउलट गेली २५ वर्षे इतिहासाबद्दल अपमान फिशिंग करून , सरंजामी व्यवस्था ग्लोरिफाय करून स्वतःच्याच समाजातील मुलांना नादी लावणारे मराठा नेतृत्व हे त्यांच्याच समाजाच्या हिताविरूद्ध आहेत. २५ वर्षे संभाजी ब्रिगेड च्या मार्फत काय काय पसरवले, तरूण पोरांची डोकी भडकावली, दंगे घडवले. "खरा इतिहास" म्हणे. एकूण निष्पन्न काय? तर दोन पुतळे हलवले, जे मुळात जेथे होते ते बहुतांश लोकांना माहीतही नव्हते. आणि नंतर यांचे बरेचसे नेते भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले. काही उघड, काही छुपे. अजित पवारांचा मृत्यू झाला त्याच्या एक दोन दिवस आधीचे त्यांचे एक भाषण आहे. जणू काही पुढची कल्पना असल्यासारखे त्यात मधे थोडा वेळ ते निर्वाणीचे बोलल्यासारखे बोलले. कोणत्याही कार्यकर्त्याने आवर्जून ऐकावे असे ते बोलले आहेत.

२००४ च्या आधीचे पवार वेगळे आणि नंतरचे पूर्ण वेगळे. ते स्वतः जातीयवादी नसावेत (धर्माच्या आधारावर देश तोडणारे जीना तरी कोठे स्वतः धार्मिक होते) पण ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील मतदार पोलराइज केले. पूर्वी ब्राह्मण समाजातील लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर भाजपला मत देत नसत. काँग्रेसवालेही भरपूर होते - माझ्या थेट ओळखीत आणि नात्यातही खूप होते. एकतर पुण्यात कसबा वगैरे एकदोन मतदारसंघ सोडले तर भाजपच्या उमेदवाराला कोणी सिरीयसली घेत नसत. ८०ज-९०ज मधल्या ब्राह्मण नोकरवर्गामधे शरद पवारांबद्दल आदर होता (कित्येक लोक अजूनही म्हणतात की सरकारी/निमसरकारी लोकांकरता त्यांनी चांगली कामे केली). जेन्युइन असेल किंवा चतुराई असेल, पण त्यांनी कला, साहित्य वगैरे क्षेत्राशी चांगले संबंध ठेवले होते त्यामुळे त्यांची एक प्रगल्भ इमेज होती. पण २००४ नंतर सोमिवर आणि मिडियामधे ब्राह्मणद्वेष ठळकपणे वाढला, आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला.

वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त

फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना !! हे नवीन शिक्षण मंत्री ???

<< महाराष्ट्रीय ब्राह्मण समाज स्वतः स्वतःचा दुश्मन आहे, >>

—— अगदी अगदी मनातले लिहीले आहे. त्रासदायक आहे म्हणून नेहेमीचेच दिशाभूल करणारे युक्तिवाद पुढे येतात पण आत्मपरिक्षण
होत नाही.
समाज कर्मकाण्डात अडकलेला आहे, फरफटल्या जात आहे - बाहेर पडायची तयारी नाही.

Pages