Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
<< बाबरी शिवसैनिकांनी पाडली
<< बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे, असे छाई ठोकून बाळासाहेब बोलले होते ह्याउलट बाबरी पाडण्यात आमच्या हात नव्हता असे खुद्द अडवाणी ह्यांनी कोर्टात सांगितले आहे. >>
------- " most depressing day in my life " , अडवाणी यांच्या आयुष्यातला तो सर्वात काळा दिवस (blackest day) होता असे ते नंतर अनेक वेळा म्हणाले आहेत. आज पश्चातापाने रडत असतात.
ढाचा पाडणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा अभिमान आहे असे सांगण्याचे धारिष्ट्य केवळ बाळासाहेबांनीच दाखविले होते.
फडणवीस मुख्यमंत्री झाला नाही
फडणवीस मुख्यमंत्री झाला नाही ह्याची सल मनात ठेवून उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते , हा देखील वंशवाद मानावा का?
माना की खुशाल, तुम्हाला पूर्ण पाठिंबा तसे मानायला O:)
सत्यवचनी, हिंदूरक्षणकर्ता
सत्यवचनी, हिंदूरक्षणकर्ता,उद्धव ठाकरेंसारखा नेता पुन्हा होणार नाही.
पण बेमालूम खोटे बोलणारे
पण बेमालूम खोटे बोलणारे महाराष्ट्रावर हिंदी लादणारे अनेक होतील!
साडेतीन वर्षानंतर हिंदीचं
साडेतीन वर्षानंतर हिंदीचं उच्चाटन होणार.
हिंदूंचे उच्चाटन होतेय ,
हिंदूंचे उच्चाटन होतेय , त्यांच्या देवाचे उच्चाटन होतेय त्यांची काळजी करा !!
मिसिंग लिंक चा स्लॅब कोसळला
मिसिंग लिंक चा स्लॅब कोसळला म्हणे पहिल्याच पावसात, ह्यात्तही पैसा खाल्ला अर्थात ह्यांनी भगवान रामाला सोडले नाही, मिसिंग लिंक काय सोडतील? हरामखोर का बोलले ठाकरे ह्यांना आता कळले असेलच!
पैसा खा पण थोडा कमी खा.....
पैसा खा पण थोडा कमी खा.....
मी जर मुख्यमंत्री झालो तर
मी जर मुख्यमंत्री झालो तर महाराष्ट्राला नायक मधला अनिल कपूरच मिळाला समजा. दिवसरात्र मेहनत करून सगळे काळे धंदे बंद करणार. रेड अलर्ट असेल तेव्हा खाजगी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देणार. पेन्शन सुरू करणार. सगळ्यांना माझा नंबर शेअर करणार आणि वेगवेगळे आवाज काढून अधिकाऱ्यांशी बोलणार.
बारक्याची जशी अंघोळ फॅंटेसी
बारक्याची जशी अंघोळ फॅंटेसी आहे तशी दुबईच्या शेखाची पण काहीतरी जबराट फँटेसी दिसते. रस्ते बांधायच्या नावाखाली ६ महिन्यांसाठी तिकडे बोलवत होता. शेठला लगेच शेखाचा प्लान समजला. ज्याला बोलवत होता त्याला काय तो प्लान समजला नाही. शेख बोलवतोय शेख बोलवतोय करत सगळ्या गावभर सांगत फिरतंय. शेठच्या जागी मी असतो तर बोललो असतो जा घेऊन.
शिंदेच्या नगरसेवकाने
शिंदेच्या नगरसेवकाने हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण केली व एका महिलेलाही मारहाण केली. कारण कळलेले नाही.
ह्या कृत्याचा तीव्र निषेध!
त्वरित पदावरून काढून टाकून पुढील कारवाई सुरू करायला हवी आता.
कृत्याचा तीव्र निषेध!
कृत्याचा तीव्र निषेध!
त्वरित पदावरून काढून टाकून पुढील कारवाई सुरू करायला हवी आता.>>>सहमत.
आताच हा व्हिडिओ बघितला. असल्या नालायकांना वाचक बसायला हवा.
त्या नगरसेवकाला अटक झाली असे
त्या नगरसेवकाला अटक झाली असे आत्ता वाचले
धमाल चाललीय.
धमाल चाललीय.
बरेच महिन्यांनी आलोय. एक पिल्लू सोडून देतो. पण इतक्यात परत येणार नाही. आलोच तर उप्रदेशाच्या निवडूकीनंतर येईन.
महाराष्ट्रात भाजपाचे यश शरद पवारांमुळे मिळालेले आहे. त्यांच्यामुळेच ते यश वाढतही चाललेले आहे.
शरद पवार यांचं राजकारण मूल्याधारीत वगैरे काही नसतं. त्यामुळे त्यांचं लक्ष चौफेर असतं. तसंच त्यांना कोणत्याच नियमांत बांधून ठेवता येत नाही.तसेच ते शेअर बाजारातील डे ट्रेडर सारखे काम करतात. सकाळी जो निर्णय घेतलेला असतो त्याच्या बरोबर उलट निर्णय संध्याकाळी घ्यायचा असतो. काही लोकांना हा दुर्गूण वाटतो. पण तसं काही नाही आहे. दीर्घकालीन धेय्येधोरणे आखणाऱ्यांचे नियम शरद पवारांना लावून चालणार नाही. त्यामुळेच त्यांच यश कमी जास्त होत नाही. फक्त त्यांच्या जवळची माणसे सतत बदलत असतात. नवीन येत असतात व जूनी जात असतात. तसंच याच्या उलटंही होत असतं.
जे निवडून येऊ शकतात पण ज्यांना आत्मविश्वास नाही आहे, अशा लोकांना हेरणं आणि त्यांना राष्ट्रवादीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन ५०-५५ आमदार संख्या पूर्ण करणं हे ते लिलया करू शकत आलेलं आहे.
यापेक्षा मोठं काही करण्याची त्यांच्याकडून नियती अपेक्षाच करत नाही आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. पंतप्रघान पदासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता परमेश्वराने त्यांना बहाल केलेली आहे. जबरदस्त उर्जा व हुषारी असलेला माणूस आहे हा.माझ्या समजूती प्रमाणे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या कॉंग्रेसची पाळेमुळे महाराष्ट्रात खोलवर रूजलेली आहेत. अगदी आणीबाणी नंतरच्या निवडणूकीतही हे जाणवलेलं आहे. अशा ताकदवान पक्षाला संपवण्यासाठी तितक्याच ताकदीचा माणूस नियतीने निर्माण केलेला आहे असे वाटते. यशवंतराव चव्हाणांना १९८० नंतर जे जमलं नाही ते शक्य करून दाखवणे ही सोपी गोष्ट नाही. गांधी घराण्याविरूध्द लढण्याची यशवंतरावांची इच्छा ते पूर्ण करताहेत. ते यादृष्टीने पाहाता यशवंतरावांचे मानसपुत्र शोभतात.
या कॉंग्रेसला संपवणे आणि हिंदूत्ववादी पक्षांची मतदान टक्केवारी वाढवणे ह्या एकमेव कामासाठी शरद पवारांची योजना नियतीने केली आहे असे मला वाटते. १९७८ नंतरच्या त्यांच्या प्रत्येक खेळीतून हेच होताना दिसते आहे. कॉंग्रेसविरोधी राजकारणात जनसंघ व भाजपाचे जे कोणी स्पर्धक होते, त्यांना संपवण्याचे खूप मोठे कार्य त्यांच्या हातून आजपर्यंत झाले आहे. समाजवादी, प्रजा समाजवादी, कम्युनिस्ट, शेकाप, यांना संपवणे जनसंघाला किंवा भाजपाला शक्यच नव्हते. राज ठाकरेंचा त्रास भाजपाला होत होता. तोही त्यांनी संपवला व राज ठाकरे यांची किंमत कमी करून दाखवली. नंतर उध्दव ठाकरेंचीही लोकप्रियता खालावून ठेवली. लॉंगटर्मचा विचार करता शरद पवारांच्या राजकारणाचा भाजपाला फायदाच झालेला दिसून येतो. अजूनही शरद पवारांना मोदी व फडणवीस का मान देतात हे त्यामुळेच कळू शकेल. राज्यसभेसाठी केलेले प्रयत्न हे उगीचच नाही.
शेअरबाजाराला तरलता देण्याचे खूप मोठे कार्य डे ट्रेडर्स करत असतात. त्यांच्या विना शेअरबाजार हा आठवडा बाजार झाला असता. एक दिवस चालू तर ६ दिवस बंद. डे ट्रेडर्सना अत्यंत महत्व असते. पण त्यांचे महत्व कधीच लक्षात येत नाही. उलट डे ट्रेडर्सना जुगारी म्हणायचीच पध्दत आहे. महाराष्ट्रातील जनमत हिंदूहितैषी करण्याचे त्यांचे हे कार्य अगदी असेच वंगण घातल्यासारखे शांतपणे सुरक्षीतपणे व सहजगत्या होत आहे. पण प्रत्यक्षात ते हिंदूविरोधी समजले जातात. भाजपाविरोधी समजले जातात. पवारांचे बोट धरून आम्ही राजकारणात आलो हे मोदीच्या वाक्याचा अर्थ अजूनही कोणाला कळलेला नाही.
शरद पवारांसारखा हुषार माणूस अजीतदादा व सुप्रीयाताई वादात बाजूला राहीला असे मला वाटते. दोघांपैकी जो कोणी वरचढ असेल तो जिंकेल इतके साधे गणीत त्यांनी मांडलेले दिसते. कोणीही जिंको आपले संबंध टिकले पाहीजेत एवढेच ते आयुष्यभर करत आले आहेत. याही बाबतीत ते तसेच वागले असावेत असे वाटते. तो त्यांचा सहजस्वभाव आहे.
शरद पवारांना मोदी कधीही मोकळे सोडणार नाहीत. शेवटपर्य़ंत मैत्री टिकवतील. ते दोघेही खिलाडू वृत्तीने राजकारणाचा खेळ खेळतात असेच वाटत आले आहे.
थोडक्यांत
१. पवार दीर्घकालीन 'व्हिजनरी' नसून ते 'सिच्युएशनल' खेळाडू आहेत. ते प्रवाहाच्या विरुद्ध नाही, तर प्रवाहाच्या वेगाचा वापर करून दिशा बदलणारे खेळाडू आहेत. हे लक्षात ठेऊनच त्यांच्या यशापयशाची मोजदाद केली पाहिजे.
२. मोदी व पवार हे दोन्ही नेते 'गेम-चेंजर' आहेत. मोदींना हे ठाऊक आहे की, जर पवारांना पूर्णपणे संपवले, तर त्या पोकळीत कोणती शक्ती उभी राहील हे अनिश्चित आहे. त्यापेक्षा, पवारांच्या अस्तित्वाचा वापर करून भाजपाला मिळणारा फायदा अधिक सुरक्षित आहे. हे 'खिलाडू वृत्तीचे राजकारण' नसून 'राजकीय अस्तित्व टिकवण्याची अपरिहार्यता' अधिक वाटते. मात्र त्याला खिलाडूपणाची झालर मोदींनी चढवली आहे. त्या चादरीचा तोटा नसल्याने शरदरावांनीही ती पांघरून घेतली आहे.
३. अजीतदादा व सुप्रीयाताई यांच्या वादात कौटुंबिक प्रेमापेक्षा 'राजकीय व्यवस्थापना'ला अधिक महत्त्व देतात. ही एक प्रकारची तटस्थता आहे, जी त्यांना वादळातही शांत राहण्यास मदत करते. मात्र अजितदादांच्या दु:खद निधनानंतर यातील सगळेच संदर्भ बदललेले आहेत.
अवांतर
येथील चर्चेवरून एवढेच लक्षात आलेले आहे की मोदी व भाजपा विरोधक त्याच त्या जुन्या हत्याऱ्यांच्या सहाय्याने लढत आहे. हीच मानसिकता उत्तर प्रदेशातील भाजपा विरोधकांची असेल तर उत्तर प्रदेशात भाजपा मागच्या निवडणूकीपेक्षा जास्त जागा मिळवणार हे नक्की.
जाता जाता

एकूण चारवेळा स्मायली टाकली आहे.
आज काय वाढदिवस वैगरे की काय
आज काय वाढदिवस वैगरे की काय पवारान्चा??
लेख अर्धा वाचला नी ही फुसकुली
लेख अर्धा वाचला नी ही फुसकुली कुणी सोडली हे वाचायला खाली धावत आलो, अपेक्षा सत्य झालेली दिसली, भाऊ टोचरेकर खपला की भागवतांची वर्णी लागू शकते.
त्या नगरसेवकाला अटक झाली असे
त्या नगरसेवकाला अटक झाली असे आत्ता वाचले >>त्याची तब्ब्येत बिघडल्याने त्याला इस्पितळात दाखल केले आहे
महाराष्ट्राची बदनामी करु नका म्हणणारे आता मुगाचा हलवा खाउन आनंद घेत आहेत.
आता कोकणात एका भाजप
आता कोकणात एका भाजप नगरसेवकाने मारहाण केली एका अधिकाऱ्याला! त्यालाही अटक व्हावी.
रमेश म्हात्रे अटकेनंतर लगेच चार तासात आजारी पडले व ऍडमिट झाले. छान!
देवेंद्र जी
देवेंद्र जी
सस्नेह नमस्कार
विनंती विशेष
आज पुन्हा एकदा सभागृहामध्ये आपले भाषण ऐकले. आम्हाला अपेक्षित होते की महाराष्ट्रातील एकूण कायदा सुव्यवस्था पेपर फुटी , महिला सुरक्षा , आझाद मैदानावर अनेक विद्यार्थी आणि कर्मचारी आपापल्या प्रश्नांना घेऊन भर पावसात करत असलेले आंदोलन या सगळ्यांवर आपण बैजवार मांडणी कराल.
पण आपल्या चर्चेचा मुख्य विषय होता तो मिसिंग लिंक.
असायला हरकत नाही कारण एवढा मोठा गवगवा झालेला महत्त्वकांक्षी प्रकल्प जर वादाच्या भोवऱ्यात सापडत असेल तर मुख्यमंत्री म्हणून आपण ती भूमिका मांडणे अतिशय स्वाभाविक आहे.
पण ती भूमिका मांडताना आपण विरोधकांनी विचारलेले प्रश्न खेळकर वृत्तीने घेण्यापेक्षा कुत्ते , भाडे के टट्टू , एक कोटी खोटे बोलणारे लोक मेल्यानंतर अशा खोटारड्यांचा जन्म होतो वगैरे वगैरे संसदीय कामकाजाला अतिशय अशोभनीय भाषा वापरत शेरेबाजी केली. आपली शेरेबाजी अर्थातच आपल्या भक्तांना प्रचंड आवडली असेल. पण हे अतिशय नम्रपणे आपल्या लक्षात आणून दिले पाहिजे की मिसिंग लिंक वर भाष्य करत असताना त्या संपूर्ण मांडणीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अपेक्षित असणारा विवेक "मिसिंग" होता.
महाराष्ट्रभरातील अनेक पक्ष संघटना, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी विचारलेले प्रश्न याचे उत्तर आपण देणे लागतात. आणि ती उत्तर आपण जबाबदारीने देणे अपेक्षित आहे. ना की त्यांना कुत्रे आणि भाड्याचे टट्टू ही भाषा वापरणे.
आपल्याला आठवतं का, 2022 साली आपणच विरोधी पक्ष नेते म्हणून मांडणी करत असताना असे म्हणालात की, " कृपया सत्ताधाऱ्यांनी हा गैरसमज काढून टाकावा की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात..!"
देवेंद्रजी आता हाच नियम तुम्हाला लागू होत नाही का ?
की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आहात...!
तुम्हाला प्रश्न विचारणे हा महाराष्ट्राचा अपमान कसा होऊ शकतो?
ज्या मिसिंग लिंक वरून दिवसभरात लाखो लोक प्रवास करतात. त्या मिसिंग लिंक वर जर काही अघटीत घडले असते. जीवित हानी झाली असती तर त्याची जबाबदारी कुणाची होती ? आणि लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारूच नयेत असे तुम्ही कसे काय म्हणू शकता? मिसिंगचे लोकार्पण सोहळा करताना हा प्रकल्प आपण उभा केला असे म्हणत जर याचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ होत असेल तर यात काही दोष निघाले तर ते स्वीकारण्यासाठी तुम्ही मनाचा उमदेपणा का दाखवत नाहीत.
ताशी /250किमी वेगाने वारे वाहिले तरीसुद्धा या प्रकल्पाला धक्काही लागणार नाही हे विधान आपलेच होते ना ? मग एक कोटी खोटे बोलणाऱ्या लोकानंतर कुणाचा जन्म झाला? मग नेमका त्याच संदर्भाने जर प्रश्न विचारला तर बिघडले कुठे ?
कारण या मिसिंग लींक साठी जे ७१२०कोटी रुपये खर्च झाले ते पैसे कुठल्याही एका लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या खाजगी मालमत्तेतून खर्च केले नाहीत तर ते पैसे महाराष्ट्राच्या जनतेने भरलेली घरपट्टी पाणीपट्टी , रोड टॅक्स, टोल टॅक्स, मालमत्ता कर असे विविध प्रकारचे कर भरलेले आहेत.
आता लोकांच्या पैशातून लोकांसाठी उभा राहिलेला उपक्रम जर लोकांच्या जीवावर बेतेल अशा परिस्थितीत काही घडत असेल तर लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारू नयेत.. ?
लोकांनी प्रश्न विचारल्यावर तुम्ही त्यांना कुत्रे आणि भाडे के टट्टू म्हणाल..!
म्हणजे तुमच्या भोवती सतत फक्त आणि फक्त स्तुतीपाठकांचा गराडा असायला हवा... विरोधक म्हणून तुम्हाला कोणी आरसा दाखवूच नये. अन दाखवला तर तुम्ही त्यांना कुत्रे आणि भाडे की टट्टू म्हणणार ?
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राचा अपमान तर होत नाहीच नाही परंतु एका जबाबदार पदावरची व्यक्ती म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणं म्हणजे तरी तुमचा अपमान असं तुम्ही कसं गृहीत धरता.. ?
आणि जर विरोधकांनी तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही तर मग अधिवेशन आणि हे सगळे प्रश्न-उत्तर याचा फार्स तरी कशासाठी केला जातो..?
खरंतर आज तुम्ही ज्या त्वेषाने बोलत होतात हा त्वेष , हा आवेग, हा संताप व्यक्त करण्याची जागा आणि वेळ चुकली आहे हे आपल्याला कोणीतरी सांगायची गरज आहे.
महोदय, जेव्हा या राज्याचे आराध्य असणारे आणि या राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या नसानसात वाहणारा विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा पुतळा समुद्रकिनारी पडतो तेव्हा खरा महाराष्ट्राचा अपमान होतो. जेव्हा महाराष्ट्राच्या या आराध्या बद्दल राज्यपाल भगतसिंग कोशारी अपशब्द काढतात, कोरटकर अपमान करतो, तेव्हा तो संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असतो, जेव्हा राज्यामध्ये विविध परीक्षांचे पेपर फुटतात आणि त्यामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षण खाते किंवा स्पर्धा परीक्षा घेणारा विभाग यांच्या कार्यक्षमते बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतात. तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो, जेव्हा महाराष्ट्राच्या पवित्र विधिमंडळ परिसरामध्ये आमदार एकमेकांच्या अंगावर धावून जातात अर्वाच्य शिवीगाळ करतात तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो, जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी एखाद्या प्रकाशकाला आईबहिणी वरून शिवीगाळ करतो तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो, जेव्हा या महाराष्ट्राची वैचारिक आधारशिला ठेवणारे क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये गरज नसताना लोकप्रतिनिधी म्हणवणारी एखादी महिला जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वडाला प्रदक्षिणा घालते आणि ठरवून क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारेचा अवमान करण्याचा प्रयत्न करते तेव्हा महाराष्ट्राचा अवमान होतो , जेव्हा जेम्स लेन सारख्या माणसाला इतिहासाचे विद्रूपीकरण करण्यासाठी मा जिजाऊंच्या बद्दल चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न इथला एखादा विघातकी माणूस करतो तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो, जेव्हा तीन तीन चार चार वर्षांच्या निष्पाप कळ्या खुलण्याआधी कुस्करून टाकल्या जातात आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी या राज्याचे गृहखाते अपयशी ठरते तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो..!
जेव्हा महाराष्ट्रातील शेकडो महिलांचे लैंगिक शोषण होते आणि त्या संपूर्ण प्रकरणांमध्ये महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाला आपली खुर्ची गमवावी लागते तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो.
जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे अपघाती निधन होतं मात्र त्यांचीच एफ आय आर या महाराष्ट्रातलं एकही पोलीस स्टेशन नोंदवून घेत नाही तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो.
जेव्हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ड्रग्स चे साठे सापडतात मात्र त्याची पाळमुळं अजूनही खणून काढली जात नाहीत आणि महाराष्ट्राचा उल्लेख "उडता महाराष्ट्र" असा होतो तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो.
जेव्हा महाराष्ट्रातले वेदांत फॉक्सकॉन , टाटा एअर बस बल्क ड्रग पार्क, यासारखे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जातात तेव्हा महाराष्ट्राचा अवमान होतो.
जेव्हा महाराष्ट्रातच मराठी माणसाची जगण्याची कोंडी होते त्याला त्याच्याच राज्यामध्ये राहायला घर देण्यासाठी नाकारल जातं तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो...
महाराष्ट्राचा अपमान झालेले असे अनेक क्षण अशा अनेक घटना ज्यावर आपण अत्यंत त्वेषाने व्यक्त होणे अपेक्षित होते तेव्हा मात्र आपण मूग घेऊन गप्प राहिलात.
आणि आज जेव्हा आपल्याला प्रश्न विचारले जातात तेव्हा मात्र महाराष्ट्र धर्माच्या पांघरूणाआड लपण्याचा आपण प्रयत्न करत आहात हे काही खरे नव्हे...
देवेंद्रजी दिवसेंदिवस आपण नार्सिसिझम (आत्ममुग्धता)
च्या विकाराचे बळी ठरत आहात का ?
अजूनही वेळ गेलेली नाही. सभागृहात विरोधी पक्ष नेताच नको. विरोधी स्वर नको. टिका नको असे कृपया असे असेल तर हे चिंताजनक आहे. हे कुठल्याही द्वेषापोटी किंवा रागापोटी नाही तर अत्यंत सम्यक विचार करत हे मांडत आहे.
आज हे पत्र आवर्जून लिहावेसे वाटले त्याचे कारण आपण सभागृहाच्या पटलावरून ज्या तिरस्कृत , हिणकस पद्धतीने आणि अहंभावाने महाराष्ट्रातील जनतेला कुत्ते आणि भाडे के टट्टू म्हणालात यावरून आपण महाराष्ट्राचा अपमान नक्की केला आहे..
हे महाराष्ट्रासमोर किंवा आपल्या समर्थक स्तुतीपाठकांच्या समोर जरी आपण कधी मान्य केले नाही तरी जेव्हा कधी एकांतात आरशासमोर आपण उभे राहाल तेव्हा निश्चितपणे आपले अंतर्मन मान्य करेल की होय देवेंद्रजी आज आपण सभागृहात महाराष्ट्राचा अपमान केला आहे.. !!
असो. जपा स्वतःला.
@प्रा सुषमा अंधारे
जिवित हानी झाल्यास मृतांच्या
जिवित हानी झाल्यास मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले की सरकारची जबाबदारी संपते.
प्रकल्प बुडतो, ढासळतो,
प्रकल्प बुडतो, ढासळतो, मोडतो पैसे पाण्यात जाताहेत, पोपट मेला आहे हे सांगितले तर मान्य करा.
भाजप एनडीएला ३५४ हवेत
दिल्लीतल्या घरात बसून पवारसाहेब फक्त मोरांचा नाच बघणार का? काहीतरी चहापान होणार, पाहुण्यांशी गप्पा होणार.
रस्त्यांच्या दुरवस्थेची चर्चा
रस्त्यांच्या दुरवस्थेची चर्चा फक्त मिसिंग लिंक वर केंद्रित झाली आहे. पण शहरातील रस्ते, दोन गावे जोडणारे रस्ते हे तरी सुस्थितीत आहेत का?
अनेक ठिकाणी खड्डे, डांबर विरघळून फक्त वाळू शिल्लक असलेला ठिसूळ घसरडा रस्ता अशी स्थिती आहे. त्याबद्दल फार कुणी काही बोलत नाही.
कुठल्याही पक्षाचा असला तरी
कुठल्याही पक्षाचा असला तरी डोंबिवलीत आगरी लोक दादागिरी करत आले आहेत. कायदा वगैरेची फार फिकीर करत नाहीत.
मूलनिवासी असल्यामुळे अनेक लोक आपल्या जमिनीवर घरे बांधून श्रीमंत झाले आहेत. शिक्षण फारसे घेत नाहीत.
एकेकाळची रम्य डोंबिवली काँक्रीट जंगल बनवण्यात ह्यांचा सिंहाचा वाटा आहे.
त्यांची गुंडगिरी गेली चाळीस पन्नास वर्षे चालूच आहे.
रमेश म्हात्रे एकनाथ शिंदेंच्या पक्षात आहे ह्याने फार फरक पडत नाही. काँग्रेस किंवा भाजपमधे असता तरी असाच वागला असता.
इतकी प्रसिद्धी मिळाली आहे म्हणून तरी ह्याचा राजीनामा घेतला पाहिजे.
कायदेशीर कोर्ट कचेरी पुढील तीस चाळीस वर्षे चालूच राहणार!
तीन वर्षांनी जातंय बघा.
तीन वर्षांनी जातंय बघा.
आधी मुळात शिंदेंनीं
आधी मुळात शिंदेंनीं म्हात्रेबद्दल स्टेटमेंट द्यायला पाहिजे व त्याला हाकलले पाहिजे. लगेच चार तासात तब्येती कश्या बिघडतात आणि ऍडमिट होतात? अत्यंत हीन कृत्य! भाजपच्या त्या नगरसेवकालाही पहिला हाकलला पाहिजे व अटक झाली पाहिजे.
दरम्यान, राष्ट्रवादी (श.प.)
दरम्यान, राष्ट्रवादी (श.प.) महायुतीशी जोडले जाणार असे म्हंटले जात आहे. संजय राऊत प्रथमच शरद पवारांबद्दल नकारात्मक बोलले. शरद पवार ह्याही वयात गेमा टाकत आहेत. सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार असे म्हणतात. थोडक्यात काय, तर सत्ता जर मिळणारच नसेल तर ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना पाठिंबा देऊन सत्तेत जायचे. ह्या सर्व गदारोळात उद्धव ठाकरे कस्पटासारखे बाजूला पडत आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या विरोधकांचे उपद्रवमूल्य जवळपास शून्याजवळ पोचले आहे.
उपवर्गीकरण ह्या मुद्यावर आता काय काय होते ते बघत राहायचे.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की कोणताही नवा पक्ष महायुतीत येणार नाही. थोडक्यात सांगायचे तर शप गटाला सुनेत्रा पवार गटात जावे लागेल. जागावाटप होईल तेव्हा राष्ट्रवादी (सुनेत्राताई )गटाला ज्या जागा मिळतील त्यातून तिकिट मिळवावे लागेल.
जितेंद्र आव्हाड कुठे जाणार मग
जितेंद्र आव्हाड कुठे जाणार मग ?
ह्या सर्व गदारोळात उद्धव
ह्या सर्व गदारोळात उद्धव ठाकरे कस्पटासारखे बाजूला पडत आहेत>>>
त्यांनी जरा धीर धरला तर त्यांनाच ह्यातून फायदा होईल. सगळेच सत्तेत गेले तर विरोधी मत त्यांनाच मिळतील.
Pages