महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व राजकीय घटना स्वतः समक्ष पाहिल्यानंतरच येथे लिहाव्यात असा एक नियम वाढवायला सांगायला हवे प्रशासकांना! >> सुब्रमण्यम स्वामीने पण बघितले असेल का,मोदिला झोपताना ?

- उद्धव मार्केटिंग मध्ये कमी पडले खासकरून कोव्हिड मॅनेजमेंट मधे परत भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने अजूनच gaslight झाले अन् त्यावर काही करू शकले नाहीत >> महयुतीची सत्ता जाऊन किती वर्षे झाली ? एखादा आरोप सिद्ध झाला? टिपिकिल संघोटी कुजबूज !!

- outreach कमी पडली, आमच्या घराजवळच्या शाखेतली पोरे सुद्धा सांगतात, बाळासाहेब होते तेव्हा वाटेल तेव्हा मातोश्रीवर जायला मिळायचे, आता साहेब भेटतच नाहीत. >> उत्तर वर दिले आहे. आमच्या इथली संघातली पोरे पण सांगतात अतुल भातखळकर संघात होता तेव्हा भेटायचा , आता ओळख पण दाखवत नाही. हे असे सगळ्याच नेत्यांच्या बाबतीत सांगता येते. आणि आमदार खासदार फोनवर बोलू शकत नाही का? काहीच्या काही टेपा लावताय राव!

- ट्रॅडिशनल पॉलिटिक्स (फार राइट हिंदुत्व) सोडून एकदम सेक्युलरिस्ट राजकारणात येण्यासाठी राजकारणावर पकड तितकी घट्ट हवी, Aura हवा तो उद्धव साहेबांत नाही, म्हणजे बाळासाहेबांच्या इतका नाही. >> सेक्युलरिस्ट राजकारणात येण्यासाठी > म्हणजे काय ? उधवणी कधी सांगितले की आम्ही शिवसेना सेक्युलर झाली ?

- शरद पवारांच्या ओंजळीने पाणी पिणे थोडे कमी केले असते तर चालण्यासारखे होते. >> पास !! कारण ही देखील अफवाच आहे.

- मुसलमान मतदारसंघांत ऑलरेडी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी, मजलिस अन् अगदी मालेगावात नवीच तयार झालेली इस्लाम पार्टी असताना तुष्टीकरणात काहीही व्हरायटी न आणता जाणे ते पण ट्रस्ट फॅक्टर क्रिएट न करता भोवले असावे. >> मुळात उद्धवनी तुष्टीकरण कधी कुठे केले हेच कोणी सांगत नाही. अर्थात मुखतार अब्बास ते हसण मुशरीफ ह्यांची पाप्पी गोड मानून घेणे म्हणजे तुष्टीकरण नसावे नाही?

ज्या कडवट हिंदूत्वाने शिवसेनेला इतके मोठे यश दिले, दोन मुख्यमंत्री दिले, अनेक खासदार, आमदार, नगरसेवक दिले. मुंबई ठाणे इथे सीमित असणरी शिवसेना राज्यभर कशी आणि कधी पसरली? जेव्हा कडव्या हिंदूत्वाचा पुरस्कार करू लागली.
उधोबाला असे वाटले की हिंदुत्व वगैरे काही नाही. आपण ठाकरे आहोत म्हणून सगळे आपल्या मागे आहेत. मग एक दिवस त्यांनी हिंदूत्व सोडले.
एक साधी गोष्ट. बाळासाहेब "इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी आणि मातांनो" अशी भाषणाची सुरवात करत असत. अनेक वर्षे.
चिरंजीवांनी त्यातला हिंदू शब्द गाळून टाकला. हे नक्कीच ठरवून केले गेले.
परिणाम स्वच्छ दिसतो आहे.

शिवसेनेला अनेक वर्षे फॉलो केलेल्या एका पत्रकाराने लिहीलेले एक पुस्तक आहे २०२२ बद्दल. बर्‍यापैकी बॅलन्स्ड लेखन आहे, कारण शिवसेनेबद्दल असलेली आपुलकीही दिसते आणि शिंद्यांना कसे सर्कलच्या बाहेर ठेवायला सुरूवात झाली त्याचेही वर्णन आहे. सर्वच पक्षांमधे असंतुष्ट असतात, पक्ष वाढत जातात, सत्ता मिळत जाते तेव्हा ती संधी हुकलेले लोक किंवा नेतृत्वाला डोईजड होतील अशी शंका असलेले लोक. त्यांना बराच वेळ उठा व कोणीतरी दुसरेच एक सेनेतील नेते बसले होते तेव्हा बराच काळ ताटकळत ठेवण्यात आले वगैरेची माहितीही त्याच पुस्तकात आहे. आणि तेवढी एकच घटना नाही. बराच पॅटर्न होता.

त्यातून भाजपला संधी मिळाली. त्यानंतर जे झाले त्यात संघ/भाजपचे निष्णात लोक विरूद्ध आदित्य ठाकरेची युवा मित्रमंडळी (वरूण सरदेसाई वगैरे नावे वाचली होती) यांच्यातील डावपेच. त्यांना आणखी आमदार फुटू नयेत म्हणून बंदोबस्ताची जबाबदारी दिली होती. पण त्यांना याचा काही अनुभव नव्ह्ता. ते रोखू शकले नाहीत. आणि इतर पक्षांनी थोडा मुत्सद्दीपणा दाखवला असता आणि काही ठाम नसलेले लोक गेलेही नसते, पण इथे राउतांपासून सर्वांनीच भडक भाषणे करून यांचे परतीचे दोर कापले.

कट्टर भाजपवाल्यांची उठांवरची टीका वेगळी आणि शिवसेनेच्या आतल्या गोटातील माहिती असलेल्या, त्यांच्याबद्दल आपुलकी असलेल्या व्यक्तीने त्यांचे काय चुकले हे सांगणे वेगळे. फरक लगेच कळतो. हे पुस्तक त्या प्रकारचे आहे. खरे माना वा नका मानू. पण असेही घडलेले असू शकते असे नक्की वाटते.

भ्रमर,
थोडं नीट बोललात तरी चालेल की राव ! चर्चा करताय, थोडी दिलदारी पण ठेवा.

https://www.youtube.com/watch?v=Fadv5AYzABI
शिवसेना उबाठा पक्षातील तेव्हाचे निष्ठावंत पांडुरंग सकपाळ यांनी अजान प्रकाराची इतकी स्तुती गायली की शिवसेना उबाठाच्या सभेत अजान वाजेल अशी शक्यता दिसते!
त्या गोडव्याने भरलेल्या अजानवर आधारित स्पर्धा घ्यावी असे उच्च विचार सकपाळानी व्यक्त केले. उधोबा वा बारक्याने ह्याला कधी विरोध केला नाही की त्याचा निषेधही केला नाही. इथे मुस्लिमांचे लांगूलचालन नाही तर काय आहे?
दिवसातून पाच वेळा अल्लाखेरीज दुसरा कुणी देव नाही आणि महंमद हा त्याचा सर्वश्रेष्ठ आणि शेवटचा प्रेषित आहे असे ओरडून सांगणार्या अजानमधे सहिष्णुता आहे का? सर्वसमावेशकता आहे का? मला तरी आढळत नाही.
बाळासाहेबांच्या काळात सकपाळ यांची असे बोलण्याची हिंमत झाली असती का? नाही.

मातोश्रीसमोरची हनुमान चालिसा आणि आता हनुमान मंदिरातील रामरक्षा.
भेंडीबाजारातील सभा आणि हिंदुत्वाचं प्रमाणपत्र. कोणी कोणाच्या कानात सांगितलं का?
बाकी चालू द्या.

इतके दिवस जय श्रीराम म्हणणारे समस्त हरामखोर आहेत म्हणणारा उधोबा आता रामजन्मभूमी मंदिरातील भ्रष्टाचाराविरुद्ध रामरक्षा आंदोलन करणार आहे म्हणे.
मुस्लिम लांगूलचालनाचे नाणे चालले नाही आता पुन्हा हिंदुत्व आठवू लागले बहुतेक!

पत्रकार परिषद घेऊन पाणचट विनोद करण्याचा सोस मात्र संपत नाही!
माझ्या पक्षाला उबाठा म्हणणे आणि त्यांच्या घशात बाठा अडकणे अशी भयानक कोटी करून समस्तांना हसावे की रडावे ह्या द्विधा मनस्थितीत टाकले उधोबाने!
पक्षाच्या धोरणावर आत्मपरीक्षण करायचे तेव्हा करावे. पण आपल्या विनोद बुद्धीचे आत्मपरीक्षण करणे ही तातडीची गरज आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे!

ईडी नोटीसा पाठवून शिवसेनेच्या नेत्यांना गद्दार गटात यायला भाग पडले नी म्हणतात ठाकरेंनी हिंदुत्व सोडले, मिंधे नी भाजपात दम नव्हता म्हणून ठाकरेंनी घडवलेले नेते पळवले, स्वत नवीन नेते घडवायचे होते की! अनेक संघोटे शाखेत सडत आहेत, ठाकरेनि घडवलेले नेते पळवावे लागले.

उबाठा पक्षात एखादा खासदार आमदार निवडून आला तर ते सर्वस्वी उबाठाचे कर्तृत्व आहे असे मानणे चूक आहे.
पक्ष आणि नेता हे एकमेकांना घडवत असतात. कार्यकर्ता पक्ष घडवत असतो आणि पक्ष कार्यकर्ता घडवत असतो.
एकतर्फी ठाकरे सगळे घडवतात हे चित्र अगदीच एकांगी आणि बालिश आहे. आम्ही इतके सगळे कार्यकर्त्यांना दिले ह्या अहंकारामुळे ह्या पक्षाची वाट लागत आहे.
हे एक युद्ध आहे. पहिली तोफ उधोबाने डागली जेव्हा त्याने एकतर्फी युती संपवली. त्यानंतरच्या सर्व घटना युद्धात शत्रूला हरवण्यासाठी आहेत.
आमदार, खासदार पळवणे हे त्याचाच भाग आहे. आपल्या दुष्कृत्याची पुरेपूर शिक्षा उधोबाला मिळायलाच हवी.

गेल्या निवडणुकीत बीजेपी चा व्होट शेअर आहे 36.9%!. पण आपल्या महान लोकशाहीच्या तत्वा प्रमाणे त्यांचे राज्य आहे. जर का आपण PROPORTIONAL REPRESENTATION चे तत्व अंगिकारले असते तर,,,

उबाठाचा फोटो वापरून खासदार जिंकले होते, ते भाजपा नी मिंधेने पळवले. मोदीचा चेहरा वापरून खासदार निवडून आले नव्हते. राममंदिरातून पैसा चोरून तो आमदार खासदार पळवायला भाजप वापरत आहे, हे ह्यांचे हिंदुत्व!

उबाठाच्या गटात जायचा विचार करतोय मी. तिकडे भरपूर वॅकन्सी आहे असं ऐकलंय. उबाठाच्य गटात जायचं तिथे खासदार बनायचं. चार पाच करोड कमवायचे नंतर १०० करोडची ऑफर येईल शिंदे गटाकडून तिकडे जायचं. ३० कोटी इन्वेष्ट करायचे एफडी शेअर मार्किट गोल्ड. २० करोडची सिप त्यांतून महिना १० लाख मिळतील. उरलेल्या ५० कोटीतून घर गाडी घ्यायची. वेगवेगळे देश फिरायचे. मस्त एंजॉय करत लाईफ जगायची. सेट आहे प्लॅन आपला. आज सीव्ही घेऊन जाणार आहे मी तिकडे.

आम्ही इतके सगळे कार्यकर्त्यांना दिले ह्या अहंकारामुळे ह्या पक्षाची वाट लागत आहे. > शंडॅ , शिवसेनेते आता आमदार खासदर असलेले कोण होते त्याचा मागोवा घ्या. हा अहम्कार नहीये, तर खल्लेल्या ताटात हगुन गेलेल्याना त्याची जाणिव करुन देणे आहे.

बाकी तुम्ही मातोश्री वर कधी येताय ? तुमचा सत्कार करायला आवडेल

शिवसैनिकांनी जीव तोडून प्रचार केला. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पद मिळेना म्हणून शिवसैनिकांना न विचारता ,लाथाडून उद्धव गेले बारामतीला ते काय म्हणून. बाळासाहेब म्हणायचे शिवसैनिक माझ्या ह़्रदयात आहेत. कुठले हो? कुठले ताट आणि कोण....
ही आहेत रस्त्यावरची बोलणी. जनता मंचावर बोलत नाही कोपऱ्याकोपऱ्यावर बोलते.

सोडून गेलेल्या ६ खासदारांपैकी चार तरी आयात केलेले होते. म्हणजे ते मुळात शिवसैनिक नव्हतेच. उसनवारी करून आणलेले लोक एकनिष्ठ कसे असतील?
अहिर देखील राष्ट्रवादीतून आयात केलेला माणूस.
उधोबा असा आव आणतो की ह्या सगळ्यांची कारकीर्द उधोबाच्या मार्गदर्शनाने घडली. उधोबाने द्यायचे आणि ह्या नेत्यांनी नुसते घ्यायचे!
असली बिनडोक विचारसारणी असेल तर पक्ष गाळात न गेला तरच नवल.
आता रामरक्षा नामक आंदोलन करत आहेत. इतके दिवस रामाचे नाव घेणार्यांना हरामखोर म्हणणारा उधोबा आता रामरक्षा म्हणतो आहे. (अर्थात रा-म-र-क्षा ह्या चार अक्षरांपलीकडे ह्याला एकही श्लोक माहित असण्याची शक्यता नाही!)
कधी ही भगवी झूल पांघरली तर कधी ती हिरवी! असल्या नाटकांना भूलथापांना लोक बळी पडत नाहीत.

रामाचे नाव घेणार्यांना हरामखोर म्हणणारा >>>> बरोबरच बोलायचे की. राममंदिरात चोरी करून हरामखोरी सिद्ध केली.

जे कोणी रामाला मानतात त्या सर्वांनी अयोध्येच्या मंदिरातील पैशावर डल्ला मारला आहे हा शोध कसा लावला?
माझी माहिती आहे की देवळाचे ट्रस्टी ह्या भ्रष्टाचारात सहभागी आहेत. आणि ज्या पैशावर डल्ला मारला आहे तो पैसा रामाला मानणार्या भक्तांनी देवळात मोठ्या भक्तीने अर्पण केला होता.

उधोबा मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसा म्हटला म्हणून देशद्रोहाचा आरोप लावून राणा दांपत्याला तुरुंगात डांबले होते. आणि आता त्या ढोंगी माणसाला राम आठवतो आहे.

रामाचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना ठाकरे हरमाखोर बोलले होते, त्यांनीच सत्तेचा उपयोग करून राममंदिरातून पैसा चोरला आणी आपण हरामखोर आहोत हे सिद्ध केले! उद्धव ठाकरेंनी हरामखोराना आधीच ओळखले होते आता फक्त बातमी आली.

आं>>
रामाचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना ठाकरे हरमाखोर बोलले होते,
<<
गैरसमज नसावा. जय श्रीराम म्हणणार्या सगळ्यांन उधोबा हरामखोर म्हणाला होता.
ते जय श्रीराम म्हणतात मी त्यांना हरामखोर म्हणतो असे त्यांचे वाक्य आहे.
काही लोकांनी भ्रष्टाचार केला म्हणून सगळी राम मंदीर मोहिम भ्रष्ट म्हणणे म्हणजे घरात उंदीर झालेत तर सगळे घर जाळून टाका म्हणण्यासारखे आहे.
ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. पण म्हणून अ ते ज्ञ सगळे भाजप वाले हरामखोर असा व्यापक दृष्टीकोन भाजप द्वेष्ट्यांचा असला तरी जनतेचा नसेल.

Pages