Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता सुरुवात झाली आहे...
एकेका भ्रष्टाचाऱ्याला पळवून पळवून मारायचे आहे.
आणि या भ्रष्टाचाराविरोधात असलेल्या लढ्यात कुठलाही गुन्हेगार आपल्या लाडक्या राजकीय पक्षाचा किंवा जातीचा किंवा धर्माचा आहे म्हणून त्याचे समर्थन न करणे इतके तर आपण देशासाठी नक्कीच करू शकतो.
@ ऋन्मेऽऽष

हे आपल्याला खरंच वाटतंय?

are you serious?

भ्रष्टाचाऱ्याला पळवून पळवून मारायचे आहे.

म्हणजे नक्की काय करायचं आहे?

आणि

भ्रष्टाचारी कोण हे कुणी आणि कसं ठरवायचंय ?

पळवून पळवून मारायचे म्हणजे नक्की कसं करायचं?

भाबडेपणा आहे कि मुखवटा?

<<<< भ्रष्टाचाऱ्याला पळवून पळवून मारायचे आहे.
म्हणजे नक्की काय करायचं आहे?
आणि
भ्रष्टाचारी कोण हे कुणी आणि कसं ठरवायचंय ?
>>>>>>>

चोराच्या मनात चांदणे Happy
बिरबलाची युक्ती कामात आली..
भ्रष्टाचाऱ्यांना पळवून पळवून मारायचे म्हणताच त्यांचे समर्थक पुढे आले Happy

भ्रष्टाचाऱ्याला पळवून पळवून मारायचे आहे.
म्हणजे नक्की काय करायचं आहे?
>>>>>>>

पहा: कायद्यानुसार असलेल्या शिक्षेचे अपुरेपण

चोराच्या मनात चांदणे.

माझा काय संबंध?

काहीतरी बाष्कळ विधान

कुणा कुणाला पळवणार?

अरे व्वा k,खरे साहेबांच्या मते हा देश भ्रष्ट्राचार मुक्त झाल्याने कुणाला बरे पळवुन लावायचे हा प्रश्न त्यांच्या मनात आला असावा. किंवा कुणा - कुणाला बरे पळवुन लावायचे असे म्हणावे खरे साहेब ?

पळवून पळवून मारा असे लिहिणे बरोबर नाही. हे उद्विग्नतेतून आलेले विचार असतील तरीही.

भ्रष्टाचारी कोण, कुणी, कसे ठरवायचे तर न्याययंत्रणा ठरवणार. यात कायद्याची अंमलबजावणी करणारी सगळी यंत्रणा आली. त्यात कोण खंड घालतंय? भ्रष्टाचार स्पष्ट दिसत असून, निवडणुक रोख्यांची न्यायालयात सुनावणी होत असताना, कुणी कुणाला, किती दिले हे उघडकीस येऊ नये म्हणुन स्टेट बँकवर दबाव, शेवट पर्यंत राष्ट्रपती पर्यंत धाव घेऊन शेवटी ते गैर ठरवल्यावर "मै तो ट्रान्सपरी कर रहा था" असा उलटा कांगावा करणाऱ्यांना (आणि हीच एक केस नाही अनेक आहेत.) प्रतिमा स्वच्छ आहे, एक ही भ्रष्टाचाराचा डाग नाही म्हणत कोण बरं भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत पाठिंबा देतंय? न्याययंत्रणा कशी सुधारणार अशाने?

भारतात भ्रष्टाचार?
जनलोकपालने सर्वांना जेलमध्ये टाकले ना?

>>बारूद के ढेर पर बैठे हुए इंसान के दिल में, चिंगारी का खौफ हमेशा रहता है<<
सध्या बारुद म्हणुन गाजावाजा केलेल्यांची फुसकी लवंगी होणार नाहि, अशी आशा करुया..

बाय्दवे, केजरीवालचा एपिसोड ताजा असुनहि जन्ता दिखाव्याला बळी कशी पडते याचं उत्तर त्या खरात बाबाच्या प्रकरणात असेल का? दोन्हिकडे अपयशी आयुष्य, भविष्याची भिती आणि मनाचा कमकुवतपणा सारासार बुद्धीवर मात करताना दिसतोय...

saurav das.jpg

केजरीवाल यांनी काय केले नेमके?
त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात बरीच चांगली कामे केली असे ऐकले होते.
आणि त्यांच्या पक्षातील सर्वांनाच जेल मध्ये सुद्धा फसवून टाकले होते.
मी राजकारण फार फॉलो करत नसल्याने मला सगळ्या घडामोडींची कल्पना नसते.. ते सुद्धा दिल्लीतील नाहीच

त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात बरीच चांगली कामे केली असे ऐकले होते.
हेच तर दुखणे आहे ! शिक्षण मिळाले तर भक्त कसे तयार होणार ?

बाय्दवे, केजरीवालचा एपिसोड ताजा असुनहि जन्ता दिखाव्याला बळी कशी पडते >> भारतात तरी १२ वर्स झाली राव!! अम्रिकेत किती ?

सध्या बारुद म्हणुन गाजावाजा केलेल्यांची फुसकी लवंगी होणार नाहि, अशी आशा करुया>>>@ राज अगदीच तुम्ही हे कसे ? निदान असे प्रदर्शन मांडण्यापेक्षा झाकली मूठ ठेवून गप्प तरी बसायचे....बारुद हे रुपक सेबी, इडी, इसीआय, स्पर्धा परीक्षा घोटाळे, रस्ते घोटाळे, डबघाईस आलेली अर्थव्यवस्था, क्रोनी कॅपिटलीझम, डीलिमीटेशन इ. इ. गोष्टी आहेत हो...आणि आज घडीला चिंगारी कॉक्रोच पार्टी, तर उद्या आणखी काही तरी...अशी रुपकं आहेत ती.....मी पहील्यापासून नोटीस केलयं कन्सेप्ट समजण्यात तुम्ही वेळोवेळी खुप गोंधळ घालता...या आधी नाही दाखवून दीलं, यापुढे नक्की गरज असेल तिथे दुरुस्ती सुचवत जाईन. Happy

उद्या झुरळांचा म्होरक्या लेझर आय ने अमेरिकेवर दबाव आणल्याने भारताच्या हवाली करणार (फेक व्हिडिओवर समाधान मानऱ्यांसाठी ).
त्याच्या स्वागतासाठी जाणाऱ्या झुरळांकडून पोलिस फुलं स्वीकारतील का?

फुटबॉल खेळताना सगळेच अटॅकर बनून गोल मारायला गेले तर स्वतःचाच गोल होण्याची शक्यता जास्त राहते. आपण आहे तिथूनही सपोर्ट दाखवू शकतोच.

सध्या मी इथे हवा तापवत आहे. जेव्हा हे वादळ मुंबईत दाखल होईल तेव्हा मी जाईनच. आणि आशा करतो तसे होईलच. ही चळवळ देशव्यापी उभी राहायला हवी. आणि ती तशी व्हावी म्हणून पूर्ण देशभरातून सपोर्ट दिसणे गरजेचे आहे जो सध्या मी माझ्या परीने दाखवत आहे.

IMG_20260606_022016.jpg

IMG_20260606_021955.jpg

आमच्याकडे आता वडिलांनी सुद्धा युट्यूबवर मोठ्या आवाजात कोकरोच आंदोलन थेट प्रक्षेपण लाऊन ठेवले आहे आणि सोबत स्वतः कॉमेन्ट्री करत पूजा करणाऱ्या आईला अपडेट देत आहेत Happy

मी काल रात्री मुंबईला आल्याने मला आता समजले की ते सुद्धा यांच्या घडामोडी फॉलो करतात. सोशल मिडिया इंस्टाग्राम जेन झी पलीकडे या चळवळीला प्रसिद्धी मिळत आहे. गुड !!!

रात्री अण्णांचे आंदोलन चालू असताना मायबोलीवर काय स्थिती होती याचा अंदाज घेताना बरीच शोधाशोध केली.

त्या वेळी इथेही विवेकाचा आवाज शाबूत होता हे पाहून आनंद वाटला. भले त्या वेळी वेड्यात निघाले असतील, पण आता तेच बरोबर होते हे दिसतंय. बाकिच्यांच्या बाबतीत वेळ निघून गेल्यावर काय फायदा. हे लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या २०१४ साठी जबाबदार आहेत. त्यातही जे खरोखर भावनिक होते त्यांना क्षमा करता येईल. पण जे निव्वळ अशा इव्हेंटकडे स्वतःची चमकोगिरीची संधी म्हणून बघतात अशांची किळस आल्यावाचून राहत नाही.

झुरळांना जंतर मंतरवर आंदोलन करायला परवानगी दिली. मुदत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे.
सुरक्षा अधिकारी झुरळांकडुन फुलं नाकारताना दिसत आहेत.

आजचा कोकरोच पार्टी आंदोलनाचा दिवस ऐतिहासिक देखील आहे.

आजच्याच दिवशी ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. हिंदवी स्वराज्याची अधिकृत घोषणा झाली आणि शिवाजी महाराज छत्रपती म्हणून सिंहासनाधीश्वर झाले _/\_

आवरा!

रायगडावर या निमित्ताने जे ग्रूप जमले आहेत त्यात या कॉकरोच पार्टीला सपोर्ट करणारे होते त्यांच्या तोंडून हे ऐकले.
वडिलांनी त्यांच्या मोबाईलवर युट्यूब लावले आहे त्यातून हे कानावर पडले.

Pages