Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणजे त्यांच्याकडे गेलेला
म्हणजे त्यांच्याकडे गेलेला डेटा सेक्युअर नाही.
म्हणजे त्यांच्याकडे गेलेला
म्हणजे त्यांच्याकडे गेलेला डेटा सेक्युअर नाही. >> नक्कीच !
इथे urban clap / urban
इथे urban clap / urban company बाबत देखील लिहिता येईलच ना?
आपण सर्व्हिस घेतो तर.
ह्याआधी stains असलेले बाथरूम सफाईसाठी वापरली होती सर्व्हिस.
अनुभव चांगला होता.
कितपत डाग निघतील ह्याविषयी आधीच कल्पना दिलेली जो आला त्याने.
आता सोफा क्लीनिंग आणि कार्पेट क्लीनिंग साठी 2 आठवडे प्रयत्न केले होते बुकिंग साठी. मग लक्षात आलं की शनिवार अथवा रविवार साठी 2 ते 3 दिवस आधीच बुक करावे लागेल.
त्यानुसार मागच्या शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता बुकिंग केले.
बुक करताना रविवारचे फक्त 3 स्लॉट दिसत होते. त्यातला दुपारी अडीच वाजताचा बुक केला.
आता दुपारी 1 वाजता येणाऱ्या माणसाला पत्ता नीट माहीत आहे का म्हणून कॉल करू असा विचार करून app मध्ये गेलो तर तिथे माझे बुकिंग आपोआप रेशेड्युल केले गेलेले ते ही गुरुवारी, संध्याकाळी 7 वाजता.
ह्याचे एकही नोटिफिकेशन आले नाही की माझा consent घेतला नव्हता.
मी तेव्हा available असणार असे गृहीत धरले.
रविवारची इतर कामे बाजूला ठेवून मी हे लोकं येतील म्हणून आपण वेळ शिल्लक ठेवलेली त्याची काहीच किंमत नाही.
मग help वर जाऊन चाट बॉट सोबत डोकेफोड करावी लागली, मग तिथे कॉल मी वर अडून राहिलो मग त्यांच्याकडून कॉल आला.
तर म्हणे सॉरी.
तुमच्या एरिया मध्ये आमचे ते सर्व्हिस provider नाही आता म्हणून रेशेड्युल केले.
मग मी झापलेच जरा.
कॅन्सल आणि पूर्ण refund मागितलाय.
सगळं मेल मध्ये लिही म्हणल्यावर नाही म्हणाला.
Chat मध्ये लिहून देतो म्हणे.
मग मी झापले, मेल आयडी काय लोणचं घालायला घेता काय.
असो.
सावध राहा.
तुम्ही बुक केलेल्या वेळीच ते येतील असे गृहीत धरू नका.
बापरे झकासराव! सोयीचं करावं
बापरे झकासराव! सोयीचं करावं तर गैरसोयच की ही!
माझे एकदा अॅमेझॉन वरून अडीच
माझे एकदा अॅमेझॉन वरून अडीच हजार रूपये गेले. त्याला बरीच वर्षे झाली. कोविडच्या आधी.
वस्तू मी ऑर्डर केली, त्या वेळी मी कार्ट मधे टाकायचो नाही. थेट ऑर्डर दिल्यावर पॉप मेन्यू आला. त्यात पैसे द्यायला सुचवले. मी पेमेण्ट केले तरी ऑर्डर काही प्लेस होईना. मग मी अॅमेझॉनला फोन केला, तेव्हां चॅट सर्विस नव्हती. त्यांना सगळे सांगितले तर ते म्हणाले कि आम्हाला पेमेण्ट झालेला नाही. तुम्हाला रेसिडेण्ट प्रोग्रॅमने पैसे द्यायला लावले असेल. यात अॅमेझॉनचा संबंध नाही. मी वाद घातला कि तुमच्या साईटवरून झाले हे. तर ते म्हणाले आम्ही असे काहीही करत नाही. नंतर सायबर सेल वगैरेला बराच प्रयत्न केला पण फायदा झाला नाही.
त्यानंतर पुन्हा कस्टमर केअरचा फोन आला कि तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व. पण हा फ्रॉडस्टरचा खेळ आहे. इथून पुढे तुम्ही पॉप अप मेन्यूला उत्तर देऊ नये आणि कार्ट मधे प्रॉडक्ट अॅड करून पेमेंट करावे.
फ्लिपकार्ट वर तर मध्यंतरी एव्हढे फ्रॉड होत होते कि त्या काळात अनेकांनी नावच टाकले होते.
ड्युओ डॅप ही सुद्धा अशीच बाधीत झाली असेल. पण त्यांचे प्रॉडक्टस हे दर वेळी चांगलेच निघतील याची ग्यारण्टी नाही. व्हिटीला जे फूटपाथवर बसतात ते जिथून आणतात अशा होलसेलर्सची ही साईट आहे. ती चायनीज नाही. कस्टमर केअर च्या बाबतीत अजिबात प्रोफेशनल नाही. सगळे सिंधी, पंजाबी लोक आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, महागड्या वस्तू या साईटवर घ्यायच्या नाहीत.
फ्लिपकार्ट ने नंतर करेक्टिव अॅक्शन घेत आणली तसे छोट्या वेबसाईट्सना शक्य नाही.
त्यामुळे सतर्क रहिये, सजग रहिये.
अमेझॉन वरून काही खेळणी ऑर्डर
अमेझॉन वरून काही खेळणी ऑर्डर केली. सर्व खेळण्यांची क्वालिटी खराब होती. बहुदा चीनमध्ये बनवलेली असावीत. इथून पुढे अमेझॉन वरून ब्रांडेड वस्तूच घ्यायचे ठरवले आहे.
थेट ऑर्डर दिल्यावर पॉप मेन्यू
थेट ऑर्डर दिल्यावर पॉप मेन्यू आला..... पॉप मेन्यू म्हणजे काय?
माझ्या बऱ्याच वस्तू अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून मागवल्या जातात.
झकास सुदैवाने माझा अर्बन
झकास सुदैवाने माझा अर्बन कंपनीचा अनुभव फारच चांगला आहे . मी चिमणी सर्व्हिसिंग , गिझर सर्व्हिसिंग , वॉशिंग मशीन मध्ये काही इश्यू आला म्हणून वापरून पाहिले आहे . ब्युटी सर्व्हिसेस सुद्धा घेतल्या आहेत . ते लोक वेळे आधीच यायचे माझ्याकडे . इतकं छान आणि प्रोफेशनल क्लिनिंग करून देतात ते.
deo dap साईट मी आज पहिल्यांदा पाहिली . क्वालिटी बाबत मला फार शन्का आहे .
पॉप अप मेनू.
पॉप अप मेनू.
इथे लिहिता लिहिता अचानक शब्द सिलेक्ट होतो आणि पुढे टाईप करताना तो डिलिट होतो.
त्याला पॉप अप मेनूत म्हणतात का हे मला माहीत नाही. मी आपला गावठी बीई चा कोर्स केला आहे.
क्वालिटी बाबत मला फार शन्का
क्वालिटी बाबत मला फार शन्का आहे . > चायनीज वस्तु, ज्या किचन मधे किंवा घरात कामाला येतात, ज्यांची किंमत जास्त नसते अशा घेण्यासाठी ही साईट आहे.
नातू आणि नाती साठी उन्हाळी
नातू आणि नाती साठी उन्हाळी कपडे घ्यायचे आहेत.
सनकोट आणि उन्हाळ्यासाठी फुलपॅंट. दोघेही स्पोर्ट्समन आहेत.
नातीने सनकोट आणला पण तो नायलॉन चा आहे. तिला तो परत करायला सागितला. पण दुकानदाराने कॉटनचा सनकोट नाही म्हणून परत घेतला नाही.
ऑनलाईन नाही तर दुकानात किती पर्यंत मिळेल?
लिनन कि कॉटन?
पुण्यात रहात असाल तर रमेश
पुण्यात रहात असाल तर रमेश dying मध्ये चौकशी करा, तिथे सनकोट मिळतात आणि कॉटन चे मिळतात.
खूप खूप थॅंक्यू.
खूप खूप थॅंक्यू.
रमेशला आग लागली होती गेल्या वर्षी. चालू असेल तर आज संध्याकाळी घेईन.
रमेश डाईंग वरून सुजाता
शनिपारच्या रमेश डाईंग वरून सुजाता मस्तानी चौकात जाताना रत्नदीप म्हणून लहानसं दुकान आहे तिथे कॉटन सनकोट आणि इतर होजिअरी मिळते.
चांगली माहीती दिली. खूप खूप
चांगली माहीती दिली. खूप खूप धन्यवाद.
या दुकानात पण बघायला पाहीजे.
अमेझाॅन वरून ईंडक्शन मागवलाय
अमेझाॅन वरून ईंडक्शन मागवलाय काय कोणी?
इलेक्ट्रॉनिक वस्तू व्यवस्थित येतात का?
सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं
सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं माहिती नाही, पण लॅपटॉप आतापर्यंत 3 वेळा मागवले अमेझॉन वरून. नीट मिळाले. पाणी गरम करायची केटल पण मागवली होती, नीट मिळाली.
)
(लॅपटॉप आणि केटल ही दोन टोकाची उदाहरणं झाली
Amazon वरून मागवताना सेलरचे
Amazon वरून मागवताना सेलरचे रिव्ह्यू चेक करा आधी.
माझा असा अनुभव आहे की कोविडनंतर ऍमेझॉन वरील बऱ्याच प्रॉडक्ट्सची क्वालिटी खालावली आहे.बऱ्याचदा डिफेक्टिव वस्तू मिळतात.
मी घेतला मार्च महिन्यात
मी घेतला मार्च महिन्यात induction ऍमेझॉन वरून
चांगला सुरुये
Steamer कम केटल पण मस्त आहे अगरो ची
वाट्टेल ते online खरेदी पगलू आहे मी
माझे, आईचे आणि मुलाचे असे
माझे, आईचे आणि मुलाचे असे मिळून 5 मोबाईल ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून मागवले होते. 2019 साली मागवलेला शेवटचा मोबाईल अजूनही चांगला चालतोय.
नवरा ऑनलाईन वस्तूंबाबत साशंक असल्याने फ्रीझ, AC मात्र vijay सेल्स मधून घेतले.
मी टॅब घेतला दोन
मी टॅब घेतला दोन महिन्यापूर्वी ऍमेझॉनवरून, त्यावरुनच लिहितेय. बॅटरी लाईफ वगैरे चेक नाही केली, संपलं चार्जिंग की लावायचा चार्जिंगला. एकंदरीत आवडलाय.
मी ईथे विचारलं काल पण आज
मी ईथे विचारलं काल पण आज जवळच्याच एक दुकानात विचारला तर prestige चा २६५० सांगितला मग घेतला लगेच, amazon वर किंमत २९५० दाखवत होता.
वाट्टेल ते online खरेदी पगलू
वाट्टेल ते online खरेदी पगलू आहे मी >>>> किल्ले :p
माझा विरंगुळा आहे, सगळ्या app वर cart मध्ये वस्तू add केलेल्या असतात, मग अध्ये मध्ये ऑर्डर करते
Myntra, nyka आणि amazon डिलिवरी करणारे ओळखीचे झाले आहेत
Recently घर shift केलं आणि खूप दिवसांनी पार्सल आलं तर तो माणूस म्हणे मॅडम इकडे शिफ्ट झालात खूप दिवसात तुमची ऑर्डर नाही वगैरे वगैरे
नवऱ्याच्या कानावर जायच्या आत त्याला bye bye केलं
Pages