खाऊगल्ली - आजचा मेनू - (७)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.

तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वीकेंडला जवळपास दोन अडीच महिन्यांनी सार खाल्ले. कारण आईकडेच दीड दोन महिने जाणे झाले नाही.
पण चार दिवस सलग खाल्ले
आणि आता तीन दिवसांचा ब्रेक घेऊन येता विकेंड पुन्हा त्याच्यासाठीच जाणार.. खरेच व्यसन आहे च्यायला

IMG-20260407-WA0025.jpg

Screenshot_20260425-191658~2.png
शेवई उपमा
नूडल्स
काहीही म्हणा Happy
नवीन पास्ता बोल चं उदघाटन

Screenshot_20260501-200353~2.png
आमच्याकडे आज हे नैवेद्याचे ताट
पुरणपोळी
आमरस
कोहळ्याचे वडे
आंबट पातळ भाजी (मुद्दा भाजी )
गवारी ची भाजी
कैरीचा टक्कू
वाटली डाळ - मुगाची
वरण भात तूप
..
नृसिंह जयंती झाली काल
आज पारणे
..
मराठवड्यात हे कॉम्बिनेशन आहेच पुरणपोळी आणि अमरस
आमरस जरा आंबट, साखर शक्यतो नाहीच असा असतो

किल्ली, नैवेद्याचे ताट सुरेखच.

मराठवड्यात हे कॉम्बिनेशन आहेच पुरणपोळी आणि अमरस.... मातुल आजी नारळाच्या दुधाबरोबर खायची.

Screenshot_20260510-163008~2.png
mac n cheese
(असं म्हणायला फक्त, sauce मध्ये घरी बनवलेलं पनीर ब्लेंड करून टाकलंय Proud
चीझ नाहीच्चे)

मुलांचं काही नसतंय एवढं, ती आई तू भाजी पोळी कर म्हणतात
नाहीतर chocolate कर एवढंच
पास्ता पुस्ता माझेच चोचले

काल लेकीने स्वतः रेसिपी शोधून कुकीज बनवल्या. दिसायला खास नसल्या तरी वरून Crispy आणि आतून कॅरमलाईझ्ड होऊन मस्त gooey झाल्यात. Cookies.jpeg

जबर दिसत आहेत दोन्ही पदार्थ जुई

माझेमन, कुकीज दिसायला खास नाही असे का म्हणता.. चांगल्या खाऊ वाटावे अश्याच दिसत आहेत. चव त्याहून भारी असावी म्हणजे.

Wow
Cookies, pizza आणि लोणचं सगळे पदार्थ तों पा सू
पिझ्झा फारच मस्त

Screenshot_20260520-174148~2.png
चॉकोलेट केक
छोटुसा / basic
नवीन इलेक्ट्रिक kettle plus steamer घेतलाय त्यात बनवला
आयुष्य सोपं झालं
.
धन्यवाद Happy

मस्त केक
kettle plus steamer ? हे काय असते?

https://amzn.in/d/03r0YPkN
ही बघा लिंक
ह्यावर आहे product
वाफवून बिट, भोपळा, गाजर वगैरे tasty लागतो म्हणून steamer घ्यायचा होता
हा घेतला
Multi use आहे
ह्याच्या खालच्या kettle परत मध्ये स्टॅन्ड ठेवायचं, पाणी घालायचं त्यावर केक साठी एक बोल दिला आहे सोबत त्यात batter ओतून झाकण लावून २५, मिनिटे वाफवायचं
Video बघा features चा
ह्यात तेल टाकून saute नाही करता येत
बाकी पाण्यात आणि वाफेत करता येणारे असंख्य पदार्थ करू शकतो

Diet friendly दिसतंय
केक छान दिसतोय किल्ले

कोकम सरबत, घरच्या कोकमांचं
IMG_20260520_111640.jpg

वाफेवरचा केक?

बेक केलेल्या केकपेक्षा वेगळे टेक्स्चर / चव येते की सेम ? सॉरी @ भोचक चौकश्या

Texture थोडे वेगळे येते आणि चव सुद्धा किंचित वेगळी लागते.
पण फार जास्त फरक नाही
सरबत सुंदर
रंग कसला खतरनाक आलाय

Pages