'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

Submitted by संजय भावे on 11 December, 2025 - 12:49


सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!

काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.

आपल्याकडे अ‍ॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.

'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.

असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!

-----

सादरीकरण आणि पात्र परिचय :

'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.

ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...

चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'

३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.

ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.

"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल

ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.

चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'

"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."

रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.

क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.

चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'

नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.

आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!

प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.

ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.

अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.

उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.

चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'

अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.

बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!

आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.

नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.

ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!

पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.

चॅप्टर - ५ : 'द जिन्न'

ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!

खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.

चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.

पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.

असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.

संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.

सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!

_____

एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आरी आरी’चं हाय व्होल्टेज फ्युजन ऐकून धुरंधरच्या पहिल्या भागात शाश्वत सचदेवने वाढवून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण होणार असं दिसतंय.

दुसरा भागही तितकाच वेगवान आहे. ह्या भागाचं नाव रिव्हेंज
असल्यामुळे पहिल्या पाच दहा मिनिटांतच जो व्हायलंस सुरु होतो तो पिक्चर संपल्यावरच संपतो. आरी आरी हे एक नवीन गाणं सोडता बाकी नवीन गाणी नाही आहेत. तम्मा तम्मा, तिरछी टोपीवाले, वॉक लाईक अ‍ॅन इजिप्शीयन वगैरे मध्ये मध्ये पेरली आहेत. पण हा ही भाग आवडला.

धुरंदर पाहिला
पहिला आवडला असेल तर हा आवडेलच.
ऍक्शन अक्टिंग अदाकारी जुन्या गाण्यांचा वापर वगैरे वगैरे..

शेवटच्या ट्विस्टबद्दल फार ऐकून गेलेलो. त्यामुळे तो काय असेल याचा अंदाज मध्येच बांधला आणि तोच खरा निघाला. म्हणजे काही आऊट ऑफ द बॉक्स नव्हता. जसे त्या बास्टर्ड ऑफ बॉलीवूडमध्ये होता.

अक्षय खन्नाचे गाजलेले अरेबिक गाण्यातील सेम सीन दीदी गाणे घेऊन रणवीर सिंग वर चित्रीत केले पण त्यात मजा नाही आली.

बाकी बघा..
चार तास पिक्चर बघण्यात राहिलेली झोप पूर्ण करतो आधी.. म्हटले तर चार तास तसा कंटाळा आला नाही. पण चित्रपट अजून अर्धा तास कमी करता आला असता.

आणि हो चित्रपटात प्रोपगंडा तर आहे. मोदी भाजपा अगदीच नावडते असतील तर थिएटर मध्ये बघायला जाऊ नका. काही सीन वर लोकं ओरडतात तेव्हा जीवाला त्रास होईल Happy

>> आणि हो चित्रपटात प्रोपगंडा तर आहे. मोदी भाजपा अगदीच नावडते असतील तर थिएटर मध्ये बघायला जाऊ नका. काही सीन वर लोकं ओरडतात तेव्हा जीवाला त्रास होईल>> हो, मोदी २ वेळा टिव्हीच्या स्क्रिनवरही दिसले आहेत. त्यामुळे वैताग येणार असेल तर जाऊच नका.
मेजर इक्बालच्या घरचं उगाचच दाखवलं होतं. ते टाळता आलं असतं.

मोदी भाजपचे कौतुक करणे वेगळे. पण २०१४ ला विरोधी पक्ष हे आतंकवाद्यांचें पक्ष होते हे दाखवणे अयोग्य आहे असे वाटले बुवा मला तरी.

सलीम जावेदच्या सिनेमात दीवारमधे देवळात जाऊन शंकराच्या मूर्तीसमोर एखाद्या मित्राला खडसवावे तसे देवाला खडसावतो.
माझा बाप मारला जात होतास तेव्हा तू काय करत होतास असे दरडावून विचारतो.
हिंदू देवांना मी मानत नाही असे अभिमानाने सांगतो. आई देवळात जाते तेव्हा तो आवर्जून बाहेर वाट पाहतो.
मात्र हाच माणूस कुठल्याशा रहिम चाचाकडून आपल्या बिल्ल्याचा नंबर ७८६ हा मुस्लिमांसाठी पवित्र असल्याचे ऐकतो तेव्हा अचानक त्याला अल्ला कसा सर्वशक्तिमान दयाळू कृपाळू असल्याचा साक्षात्कार होतो आणि तो बिल्ला चुंबन घेऊन मोठ्या आदराने आपल्या खिशात बाळगतो.
आपल्या बापाला मारत होते तेव्हा हा परमन्याय निष्ठूर अल्लाह देखील काही न करता बघत बसला होता हे आठवत नाही. त्यानंतर तो बिल्ला त्याचा कायमचा रक्षक बनतो. शेवटी कधीतरी तो बिल्ला खाली पडतो आणि सर्वशक्तिमान अल्लाह ही कवच कुंडले उतरवलेली बघून त्याला शशी कपूरच्या गोळीचे लक्ष्य बनवतो.
ह्यात काही दुटप्पीपणा दिसत नाही का?
प्रत्येक सिनेमात पंडित ठाकूर हे लोक एक तर विनोदी किंवा कमालीचे क्रूर दाखवणे. जय काली मा, हर हर महादेव , घंटानाद, आगीच्या ज्वाळा भडकलेले निरांजन देवासमोर ओवाळून ते झाले की बलात्कार खून असा गुन्हा करणारे दाखवणे.
उलट मुस्लिम रहिम चाचा, अब्दुल भाई हे एक तर दीनवाणे, कनवाळू, स्वतःच्या जिवाचा, स्वतःच्या मुलाचा त्याग करण्यात तत्पर. नमाज पढून झाल्यावर तर साक्षात संत प्रवृत्तीचा होतो. खून बलात्कार चोरी तर त्यांच्या शब्दकोशातही नसलेले शब्द! इमानदार, त्यागी, सहिष्णू ही ह्यांची ओळख.
असे किती सिनेमे आहेत ह्याची गणती शेकडो मधे जाईल.
हे पूर्वीचे बॉलिवूड . ह्यालाच सेक्युलर, सर्वधर्मसमभाव वगैरे म्हणायची सवय डाव्या लोकांनी लावली आहे. खरे तर ह्याला हिंदू धर्माला तुच्छ समजून झोडपणे आणि मुस्लिम आणि काही वेळा बाकी धर्मांचे उदात्तीकरण, पाकिस्तान आणि भारत हे देश सारखेच असल्याचे ठसवणे. राजकारण्यांनी (आणि पूर्वी ब्रिटिश लोकांनी) वाट लावली नाहीतर पाकिस्तान आणि भारत यामधे प्रेम दुथडी भरून वाहताना दिसेल वगैरे बेगडी कल्पना लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न.
हे वस्तुस्थितीच्या किती विपरित आहे हे रोजच्या बातम्या वाचणार्या व्यक्तीला सहज लक्षात येते. आणि हळू हळू जेव्हा ह्या तथाकथित सेक्युलर विचारांशी फारकत घेणारे सिनेमे निर्माण होऊ लागले तेव्हा लोकांनी ते डोक्यावर घेतले.
असले सेक्युलर काढे पिऊन वाढलेल्या डाव्या विचारांच्या लोकांचा धुरंधर आणि तत्सम विचारांचे सिनेमे पाहून तिळपापड होतो आहे.
दुसरा भाग बघितला नाही. पण उत्सुकता आहे. पहिल्यापेक्षा थोडा फिका असेल ह्याची मानसिक तयारी केली आहे.

सायोला अनुमोदन. खूप मारधाड आहे पण वेगवान आहे.
पार्टीचा सीन मला आवडला.पुर्ण महत्व रणवीर सिंगला आहे व त्याने चांगले काम केले आहे. राजकीय सीनकडे मी तरी दुर्लक्ष केले, कारण सिनेमाचा आनंद घेणे हा हेतु होता . अतिरेक्यांना मारलेल्यांपैकी किती खरे आहे वा नाही हे वेगळे पण दाऊदचे जे दाखवले त्याचे मला आश्चर्य वाटले. त्यातले खरे/खोटे काय असेल की. राकेश बेदीला अगदी कमी सीन आहेत पण त्यातही तो कसब दाखवुन जातोच. तीच गोष्ट जुस सेंटरच्या आलमची. १-२च सीन पण छान केलंय काम. रामपालला जरा अभिनय करायला वाव मिळावा असे २-४ सीन बहाल केलेत यावेळी जे त्याने फार काही भारी नाही पण बरे केलेत. माधवन भसाभसा सिगारेट फुंकतो हे पाहुन मला फारच वाईट वाटले. प्रत्यक्षात तो तसा नसो ही आशा.

shendenaxatra
हो, दिवार सुद्धा दुटप्पी होता.
जुन्या चित्रपटात सुद्धा प्रोपगंडा असायचा. ते स्लो पॉइसन असायचे. जास्त घातक. जे त्यात काम करणाऱ्या बच्चन आणि कपूर यांनाही लक्षात यायचे नाही. की लक्षात येऊनही पैश्यासाठी किंवा अंडरवर्ल्ड भीतीने करायचे?
अश्या सर्व उदाहरणावर वेगळा धागा काढा.
जुनी नवीन सर्व प्रोपगंडा त्यात बाहेर पडायला हवीत.

दीवार मधे लालकृष्ण अडवाणी अंडरवर्ल्ड डॉन दाखवले आहेत आणि वाजपेयी हे देशाचे दुश्मन. याबद्दल खंत ना खेद.

'अष्टविनायक' सिनेमात त्या कुटुंबावर काहितरी संकट येते, मग ते अष्टविनायक यात्रा करतात, मग ते संकट दूर होते असे दाखवले आहे. आठ गणपतींबरोबर हाजी अली व माउंट मेरीलाही जातात असे दाखवले असते तर काय बिघडले असते ? एकाच धर्माचा प्रोपॅगंडा. ( हे मी उपरोधाने लिहिले आहे 'नया भारत' मध्ये हेही स्पष्ट सांगावे लागते)

अनेक हिंदी सिनेमात ' सैन्यात कॅप्टन रमेश, कॅप्टन सुरेश व कॅप्टन अब्दुल असणे, मग अब्दुल ला पाक कडून ऑफर, त्याने ती नाकारणे मत त्याने युद्धात बलिदान देणे', प्रेमळ अशी मिसेस बिगान्झा, खान चाचा अशी पात्रे हे ट्रोप असते, प्रभात चा जुना 'शेजारी' नावाचा सिनेमाही होता. त्याला प्रोपेगंडा म्हणता येणार नाही.

प्रोपॅगंडा म्हणजे काय तर एकाच पक्षाची लाल करणे, दुसर्‍या पक्षाच्या नेत्यांवर रुपयाचे ठसे विदेशात पाठवण्यासारखे गंभीर आरोप करणे, दुसर्‍या एका नेत्याचे पोलिसांकरवी झालेल्या खुनाचे आय एस आय चा बादरायण संंबंध लावून समर्थन करणे, डिमोनेटायझेशन मुळे अमक्या तमक्याला कसा हार्ट अ‍ॅटॅक आला ही भाकडकथा, एन एस ए चे उदातीकरण, त्यांनी ओलीसांना 'भारत माता की जय' म्हणायला लावले या आचरट व काल्पनिक प्रसंगाची भलावण. आपल्याकडे बहुतांश लोकांनी दविंदर सिंग व राजबिर सिंग ही नावेही ऐकलेली नसतात, त्यामुळे पार्लमेंट हल्याच्या मुळाशी जाण्याचे कुतुहलही नसते.

असो अनेक वर्षापूर्वी पाकिस्तानातही असाच एक भन्नाट प्रोपॅगंडा पट आला होता, 'इंटरनॅशनल गोरिल्ले !' त्याचा निदान क्लायमॅक्स तरी जरूर पहा.

धुरंधरचा दुसरा भाग 'फर्स्ट डे... लास्ट शो' बघायचा विचार होता, पण ते नाही जामले. शेवटी काल रात्रीचा शो बघता आला.
हा भागही आवडला! वर ऋन्मेष ह्यांनी लिहिलंय ते अगदी योग्य आहे... "ज्यांना पहिला भाग आवडला आहे, त्यांना दुसरा भाग नक्की आवडेल."
रणवीर सिंगचा भूतकाळ आणि पहिला भाग पाहिल्यावर अनेकांना जे प्रश्न पडले होते त्यांची उत्तरे मिळत कहाणी पूर्ण होते.

ह्या भागात हिंसाचार आणि शिवीगाळ भरपूर आहे (पहिल्या भागापेक्षा जास्त), ज्यांना ते बघवणार आणि ऐकवणार नसेल त्यांनी अजिबात बघू नये...

बाकी ह्या वेळी 'रुदाल्यांनी' आपल्या रडगाण्याला थोडा आवर घातल्याने थोडे चुकल्या चुकल्या सारखे वाटत आहे 😀
मागच्यावेळी एवढे अकांडतांडव करूनही पहिल्या भागाने १५०० कोटींच्या घरात व्यवसाय केला होता, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांच्या 'आकांनी' "ह्यावेळी फार रडारड करू नका" अशी तंबी दिली असावी बहुधा 😂

चित्रपटातील आवडलेले आणि लक्षात राहिलेले एकमेव गाणे,

आरी आरी आरी...
आरी आरी आरी...
वे तेरी मेरी इक जिंदडी...

बाकी पार्श्वसंगीतात पहिल्या भागाप्रमाणेच अनेक जुन्या देशी आणि विदेशी गाण्यांचा चांगला वापर केला आहे. 'शराफत अली को... शराफतने मारा' ह्या देशी आणि खालिदचे 'दीदी' आणि बोनी एमचे 'रासपुतीन' ह्या तीनही माझ्या आवडत्या गाण्यांचा वापर विशेष आवडला!

असो चित्रपट चांगला आहे. ह्या मालिकेत आणखीन चित्रपट येतील असा अंदाज होता, तो बहुतेक खरा ठरेल अशा वळणावर चित्रपट संपतो. सध्या थोडा गडबडीत आहे त्यामुळे त्याबद्दल जास्ती काही लिहीत नाही पण जमेल तसा चर्चेत सहभाग घेतो!

जय हिंद! जय महाराष्ट्र!

ह्या मालिकेत आणखीन चित्रपट येतील असा अंदाज होता, तो बहुतेक खरा ठरेल अशा वळणावर चित्रपट संपतो.
>>>>>>

हो, पुलवामा आणि पहेलगाम दहशतवादी हल्ले आणि त्याचे बदले ते आता चालू असलेले युद्ध.. याच मालिकेत अजून चित्रपट आले तर बघायला आवडतील.

हे बघून झाल्यावर टायगर पठाण मालिका कोण बघायला जाईल प्रश्न आहे.

देशभक्तीचा ऑर्गॅझम आणणं फार सोपं आहे. धुरंधर सारखा पिच्चर बघायचा. बघताना आपण ठरवलेल्या देशद्रोह्यांना शिव्या द्यायच्या आणि शेवटी जय हिंद म्हणायचं.

असाच सामूहिक ऑर्गॅझम ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपली न्युज चॅनेल्स बघताना यायचा.

एक लेखक,
पठाण सिरीजचे अवघड होईल.
शाहरुखचे नाही.

तो भारतातीलच नाही तर जगातील.. आय रिपीट.. जगातील सर्वात श्रीमंत कलाकार आहे.
आणि तो भारताचा आहे याचा अभिमान बाळगा.

Fwd post
इंटरेस्टिंग माहितीपूर्ण वाटली शेअर करतो
--------

'धुरंधर' चित्रपट मालिकेतील गाणी आणि त्यांचे मूळ स्रोत -

१. हवा हवा (हसन जहांगीर)
हे या चित्रपटातील सर्वात गाजलेले गाणे आहे. हे मूळचे पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक हसन जहांगीर यांचे ८० च्या दशकातील सुपरहिट गाणे आहे. चित्रपटात मारामारीच्या एका अतिशय महत्त्वाच्या आणि वेगवान दृश्यात हे गाणे पार्श्वभूमीला वाजते, ज्यामुळे त्या प्रसंगात एक प्रकारची 'थ्रिल' निर्माण होते.

२. आरी आरी (खान साहेब)
या चित्रपटात 'खान साहेब' या पाकिस्तानी गायकाचा आवाज वापरण्यात आला आहे. हे गाणे मूळच्या पंजाबी लोकसंगीतावर आधारित असून पाकिस्तानात ते प्रचंड लोकप्रिय आहे. चित्रपटातील संघर्षाच्या दृश्यांमध्ये या गाण्याच्या तालावर (Beats) मारामारीचे चित्रण अतिशय प्रभावीपणे केले आहे.

३. आफरीन आफरीन (नुसरत फतेह अली खान)
जागतिक स्तरावर गाजलेले हे सुफी गाणे मूळचे पाकिस्तानचे दिग्गज गायक नुसरत फतेह अली खान यांचे आहे. 'धुरंधर २' मध्ये या गाण्याच्या एका नवीन 'रिमिक्स' आवृत्तीचा वापर केला गेला आहे. मारामारीच्या दृश्यात जेव्हा हे गाणे वाजते, तेव्हा ते प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देते.

४. तेरी नी करारान (मोहम्मद सादिक)
हे एक जुने पंजाबी गाणे असून ते दोन्ही देशांत (भारत आणि पाकिस्तान) तितकेच लोकप्रिय आहे. या गाण्याच्या मूळ चालीचा आणि लयीचा वापर चित्रपटात एका विशिष्ट संदर्भात केला आहे, जो तिथल्या संस्कृतीची माहिती देतो.

५. लूट ले गया (सिमरन चौधरी)
हे गाणे 'फोक-पॉप' शैलीतील असून त्याचा संपूर्ण साचा आणि संगीत हे सरहद्दी पलीकडील पंजाबी पॉप गाण्यांशी (विशेषतः पाकिस्तानी कोकम्युझिक शैलीशी) मिळतेजुळते ठेवण्यात आले आहे.

६. फॅसला (Fa9la)
चित्रपटातील 'रहमान डकैत' या पात्राच्या एंट्रीच्या वेळी किंवा त्याच्याशी संबंधित मारामारीच्या वेळी 'फॅसला' सारखी गाणी वापरली आहेत. ही गाणी प्रामुख्याने पाकिस्तानातील हिप-हॉप आणि रॅप संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.

---------------

मारामारीच्या दृश्यांमध्ये गाणी वापरण्यामागे एक वेगळाच 'सिनेमॅटिक' विचार असतो, जो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. याचे काही मजेशीर आणि तांत्रिक पैलू खालीलप्रमाणे आहेत:

जेव्हा पडद्यावर तीव्र हाणामारी सुरू असते आणि पार्श्वभूमीला एखादे अतिशय लोकप्रिय किंवा उडत्या चालीचे गाणे लागते, तेव्हा एक प्रकारचा 'ब्लॅक ह्युमर' किंवा 'विनोदी विरोधाभास' निर्माण होतो. प्रेक्षक केवळ मारामारी न बघता त्या संगीताचाही आनंद घेऊ लागतात. यामुळे गंभीर प्रसंगातही एक प्रकारची करमणूक (Entertainment) निर्माण होते.

मारामारीच्या आवाजापेक्षा संगीताचा आवाज मोठा असल्यामुळे त्या प्रसंगातील 'हिंसा' कमी होऊन 'मनोरंजन' वाढते.

सौजन्य - श्री राहुल आपटे

ट्रम्प ने डोळे वटारताच सीझफायर केले Rofl

आरी आरी आरी बॉंबे रॉकर्सचं गाणं आहे. नवतेज सिंग नामक डॅनिश सरदारजी आणि अजून एक डेन यांचं आहे. त्याचं क्रेडीट कुठे पाकिस्तानला देता? आमच्या लहानपणीच ऐकलंय. हवा हवा, आफरीन वगैरे पाकिस्तानी आहेत हेही लहानपणापासून माहितेय. .

>>
देशभक्तीचा ऑर्गॅझम आणणं फार सोपं आहे. धुरंधर सारखा पिच्चर बघायचा. बघताना आपण ठरवलेल्या देशद्रोह्यांना शिव्या द्यायच्या आणि शेवटी जय हिंद म्हणायचं.
<<
मुस्लिम माणूस हिंदू मित्राला दिवाळी जवळ आली ह्याची आठवण करून देणार. मग हिंदू मित्र मुस्लिम मित्राला रमजान जवळ येतो आहे याची आठवण करून देणार. मुस्लिम माणूस देशभक्तीचा महापूर दाखवणार मग हिंदूला पश्चाताप होणार.
हिंदू मुस्लिम ऐक्याचा असा खोटा "सलीम जावेदी" ऑर्गॅजम आणणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. कारण धुरंधर मालिकेतील सिनेमे आणि सोशल नेटवर्क वर आलेली जागृती

जसा भारत चांगला आणि वाईट दोन्ही आहे अगदी तसाच पाकिस्तान आहे. हिंदूस्तान झिंदाबाद पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊन मिठ्या मारायच्या.
भारत पाकिस्तानच्या भाईचार्याचा असा खोटा ऑर्गॅजम अवघड होत चालले आहे.
कारण धुरंधर मालिकेतील सिनेमे आणि सोशल नेटवर्क वर आलेली जागृती

धार्मिक मुस्लिम म्हणजे कमालीचा महा त्यागी , परोपकारी, उदार आणि धार्मिक हिंदू म्हणजे हीन वृत्तीचा खलपुरुष बलात्कारी खुनी चोर असा सेक्युलरिजम चा खोटा ऑर्गॅजम आणणे अवघड होत चालले आहे.

@ माझेमन, गूगल केले हे सापडले

धुरंधर २: द रिव्हेंज(२०२६) या चित्रपटातील "आरी आरी" हे गाणे एक जोशपूर्ण ट्रॅक असून, यात सुधीर यदुवंशी, जस्मिन सँडलस, खान साब आणि बॉम्बे रॉकर्स (नवतेज सिंग रेहल)यांनी गायन केले आहे.

Khan Saab is a Pakistani pop artist known for his expressive voice and unique style

पोस्टमधील माहिती बरोबर आहे.

मला पाकिस्तानची कुठली गोष्ट आवडत असेल तर ते म्हणजे त्यांचे संगीत. पाकिस्तानी संगीतात जी जादू आहे तिचे श्रेय त्यांना द्यायला हरकत नाही. तसेच चित्रपट पाकिस्तानात घडतो तर तेथील साजेसे संगीत वापरणे हा चित्रपटाच्या दृष्टीने मास्टरस्ट्रोकच ठरला म्हणू शकतो.

धुरंधर बघून झाल्यावर प्रेक्षक मला फोन करतातच. त्यांनी सांगितले कि संजय दत्त मुळेच आम्ही धुरंधर १ आणि आता २ सुद्धा पहिला. संजय दत्त हा मुख्य आकर्षण आहे.
अभिनयाच्या बाबतीत प्रेक्षकांना सारा अर्जुनचे काम आवडले आहे. चार तासाचा दुसरा भाग साराने आपल्या अभिनयाने आपल्या खांद्यावर उचलून धरला आहे.
शेवटी प्रेक्षक काय म्हणतात तेच महत्वाचं.

इथल्या एका सदस्याचे प्रतिसाद वाचताना. मला पॅम बॉंडी ताई आठवतात. आणि पॅम बॉंडी ताईंची उत्तरे ऐकताना इथल्या त्या सदस्याची आठवण येते.

मलाही पाकिस्तानी संगीत आवडते. सध्या भारतात जे संगीत चालू आहे (मोजके अपवाद सोडल्यास) त्यापेक्षा पाकिस्तानातलं संगीत जास्त खरं किंवा जमिनसे जुडा हुआ म्हणतात तसं वाटतं. आक्षेप सगळ्या गाण्यांचं क्रेडीट पाकिस्तानी संगीताला द्यायला आहे. मी ओरिजनल गाण्याविषयी लिहीले होते. म्हणजे नवतेज सिंग आणि एखाद्या डॅनिश माणसाचं गाणं खानसाब आणि इतरांनी म्हटलं तर क्रेडीट सगळ्यांना द्या, फक्त खान साबला नको एवढंच.

स्पॉयलर स्पॉयलर.. सिनेमा न पहिलेल्यांनी वाचु नका
मला पहिल्या धुरंधर इतका हा नाही आवडला पण नॉट बॅड , वन टाइम वॉचेबल फॉर रणवीर फॅन्स !
धुरन्दर २ म्हणजे ‘द रणवीर वन मॅन शो '. कमाल कमाल कमाल ..त्याचा हॉटनेस ,स्वॅग ,ऑरा, अ‍ॅक्शन आणि फार म्हणजे फार फारच उत्कृष्ट अभिनय !
फक्तं रणवीरचा बेस्ट आजवरचा बेस्ट नाही तर बॉलिवुड मधे आजवर घडलेल्या सिनेमां मधल्या कॅरॅक्टर्स पैकी सर्वात ताकदीचे कॅरॅक्टर /ड्रिम रोल म्हणावा इतका उत्तम अभिनय आहे.
अगदी अमिताभ बच्चन वगैरे लेजन्डरी अ‍ॅक्टर्सना सुद्धा असे ताकदीचे रोल नाही मिळाले करायला.
त्याच्या इतका जीव ओतून कॅरॅक्टर मधे झोकून देणारा या ताकदीचा एकही अभिनेता निदान बॉलिवुडमधे तर एकही नाही/नव्हता , अगदी त्याच्या आसपासही नाही !
असो, तर सिनेमा बद्दल !
न आवडलेल्या गोष्टीत सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे लेन्थ, स्क्रिप्ट पण धुरन्धर १ इतकी नाही आवडली.
सिनेमाचा इन्टरव्हल आधीचा पार्ट फारसा नाही आवडला , जस्कीरतची पर्सनल रिव्हेन्ज स्टोरी अजुन इन्टेन्स एक्स्पेक्टेड होती मला.
इन्टर्व्हल नंतर अ‍ॅक्चूअल रिव्हेन्ज स्टोरी सुरु होते , त्याचा बालमित्रं पिन्दाची एन्ट्री होते आणि सिनेमा रंगत जातो., आपल्याला वाटतं फक्तं रणवीरने त्याला ओळखलं पण तोही रणवीरला ओळखतो तो सीन भारी जमलाय !
चॅप्टर ५ 'अन्नोन गनमॅन' सर्वात आवडता पार्ट, तो अजुन जास्तं वेळ दाखवून इतर बर्‍याच अ‍ॅक्शन सीन्सना कात्री लावली असते तर चाललं असतं !
नोटबन्दी नंतरचे जवेद खिनानीचंब्त्व फ्र्स्ट्रेश्॑न आणि रणवीरने केलेला त्याचा दी एन्ड , शिरानी बलोचचे किन्गडम , लियारी पेटवून उध्वस्तं होण्याचा अ‍ॅक्शन सीन, रणवीरचे इमोशनल सीन्स, याही सिनेमात येणारी जुनी गाणी हे सगळं खूप आवडलं.
btw, तो नवाझ शरीफ झालेला अ‍ॅक्टर काय हुबेहुब तस्साच दिसतो !
तरी अनेक सीन्स खूप म्हणजे खूपच स्ट्रेच केलेत.. शेवटचा अर्जुन रामपाल आणि र्॑णवीरचा फाइट सीन तर अक्षर्शः हस्यास्पद झाली आहे.. कित्ती वेळ खेचलाय, इतके वेळा एकमेकांचे गळे, पाठी, माना भोस्॑कतात, साखळीने गळे आवळतात, बॉम्ब ब्लास्ट होतात पण कोणालाही काही होत नाही, लग्गेच उठून धावायला लागतात !
दाउद इब्राहिम इतका जख्खड म्हातारा का दाखवलाय ? इतका मोठा असेल का तो वयाने ? मला वाटले सत्तर वगैरे असेल.. जो दाखवलाय तो नव्वद वर्षाचा दिसत होता !
त्याच्या काळातले बॉलिवुड हिरोज अनिल कपुर, जॉनी लिव्हर वगैरे अजुन काही इतके म्हातारे नाही झाले
शेवटचा ट्विस्टही जरा टु मच च झालाय..
व्हॉय्॑लेन्स यातही आहे , पण एक्स्पेक्टेड होता .
तरी ओव्हरॉलच ३ तासात बससेल असा अ‍ॅक्शन सिनेमा तरी चाललं आसतं !
Warning : सुरवातीला शाहरुखच्या कुठल्यातरी आगामी सिनेमाचं टिझर होतं, अक्शर्शः बघवत नाही, अग्ली, थकलेला आणि अ‍ॅक्टिंग पर्सनॅलिटी वगैरेचा तर काही संबंधच नाही !
पब्लिक लिटरली हसत होते , इतक्या पकाऊ शाहरुखला बघून Proud
धुरन्धरच्या व्हॉयलेन्स मधे डोळे मिटु नका पण या ट्रेलरला मिटु शकताच Wink

<<<< म्हणजे नवतेज सिंग आणि एखाद्या डॅनिश माणसाचं गाणं खानसाब आणि इतरांनी म्हटलं तर क्रेडीट सगळ्यांना द्या, फक्त खान साबला नको एवढंच.
>>>>>

माझेमन, ती पोस्ट पाकिस्तान विरोधात असलेल्या धुरंदर चित्रपटात पाकिस्तानी गायक आणि पाकिस्तानी संगीत वापरले आहे हा विरोधाभास दाखवायला आहे म्हणून फक्त त्यांचा उल्लेख आहे. इतरांचे श्रेय नाकारले नाही तर ते त्या पोस्टचा भाग नाही इतकेच.

बाकी पाकिस्तानी संगीत वापरले समजू शकतो.
पाकिस्तानी गायक का वापरला हे समजले नाही. त्याला भारतीय पर्याय वापरता आला असताच. की मुद्दाम यात सुद्धा काही कंट्रोवरसी होत चित्रपटाला बॉक्स ऑफिस वर फायदा होईल हे बघायचे होते.

दाउद इब्राहिम इतका जख्खड म्हातारा का दाखवलाय?
>>>>>>

कारण त्याला आपल्या एजंटने ठार न मारता स्लो पोइजन देत फक्त आजारी पाडले आणि तडफडायला सोडले असे दाखवले आहे. कारण जिंदा रख के तडफडवणे मे जादा मजा आता है असा डायलॉग दाखवला आहे.

पण हे एकूणच हास्यास्पद झाले आहे कारण त्याही स्थितीत तो मास्टर माईंड बनून भारतविरोधी कारवाया तडीस नेतो आहे असेही दाखवले आहे.

एकूणच दाऊदला मारता न आल्याच्या आपल्या अपयशाचे लंगडे समर्थन केल्यासारखे वाटले.

Pages