'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

Submitted by संजय भावे on 11 December, 2025 - 12:49


सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!

काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.

आपल्याकडे अ‍ॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.

'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.

असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!

-----

सादरीकरण आणि पात्र परिचय :

'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.

ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...

चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'

३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.

ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.

"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल

ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.

चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'

"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."

रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.

क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.

चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'

नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.

आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!

प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.

ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.

अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.

उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.

चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'

अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.

बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!

आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.

नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.

ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!

पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.

चॅप्टर - ५ : 'द जिन्न'

ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!

खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.

चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.

पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.

असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.

संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.

सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!

_____

एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

फारएण्ड, तुमच्या या प्रतिसादातून सकारात्मक लहरी जाणवतात. सोशल मीडीयात अशा प्रकारे कुणी चर्चा करू शकतं ही गोष्ट दुर्मिळ आहे. अशा वेळी १०० टक्के सहमती असो नसो, अशा व्यक्तीशी चर्चा करणे आनंददायी ठरतं. सहमतीचे मुद्दे हायलाईट करणे, त्याची नोंद घेणे आणि असहमतीच्या मुद्द्यांवर बचावात्मक न होणे किंवा आक्रमक न होता योग्य त्या भाषेत प्रतिवाद केला. माझेच बरोबर असा एकही मुद्दा आढळला नाही. हे फार फार दुर्मिळ आहे. त्यामुळे एक असा व्यक्ती असला तरी इतरांनाही गृहीत न धरण्याचा पाठ तुम्ही घालून दिलात.

तुमचे आभार.

सोशल मीडीयात अशा प्रकारे कुणी चर्चा करू शकतं ही गोष्ट दुर्मिळ आहे. >> १००++
समतोल, कुठलाही अभिनिवेश नसलेले लिखाण आणि संसदीय भाषेचा वापर यामुळे फारएंडचे लिखाण वाचनीय असतं.

>>
या पिक्चरला विरोध करणारे धृव राठी सारखे लोक पाक प्रेमी किंवा इव्हन पाक धार्जिणे आहेत असे मला अजिबात वाटत नाही.
<<
दुसर्या बाजूला पाकिस्तानबद्दल नक्कीच एक सॉफ्ट कॉर्नर आहे. अशांना पाकिस्तानला काळ्या रंगात रंगवलेले आवडत नाही. खरोखर घडलेल्या घटना पाकिस्तानची भारताबद्दल असलेल्या द्वेषाची ग्वाही देतात. हजारो जखमा करून भारताला रक्तबंबाळ करण्याचे झिया उल हकने अधिकृत रित्या केलेले धोरण आजही पुढे चालू आहे ही वस्तुस्थिती दुर्लक्ष केली जावी आणि शांतिपाठ गायले जावेत अशी ह्या गटाची अपेक्षा आहे. असे करणारेच चित्रपट ते उचलून धरतात. उदा अनुपमा चोप्रा. कदाचित बॉलिवूडवरील दाऊद प्रभृती लोकांचा प्रभाव दबाव यामागे असू शकेल.
अशा विचारांना पाकप्रेमी म्हणावे की अमन की आशा चिरंतन जागृत ठेवणारे आंधळे भक्त म्हणावे की गांधीवादी म्हणावे हा आपापला प्रश्न आहे. पण अशांना फक्त एकाच विचारांचे चित्रपट बघायला मिळावेत अशी आशा अपेक्षा असते. आणि दुसरी बाजू दाखवणारे चित्रपट आले की आपली सर्व अस्त्रे वापरून त्याला नामोहरम करण्याचे अ थक प्रयत्न केले जातात हे उघड आहे.

दुसर्या बाजूला पाकिस्तानबद्दल नक्कीच एक सॉफ्ट कॉर्नर आहे.>>>

उलट असावे. भारतातील काहींबद्दल खुप हार्ड, दगडी कॉर्नर आहे आणि त्यामुळे तुलनेत पाकबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटायला लागतो. Happy Happy

अरे किती ते कल्पनादारिद्र्य!! Lol
उत्तर नसले कि पाकिस्तानी किंवा देशाचे शत्रू किंवा देशाबद्दल प्रेम न. यापलिकडे इवलासा मेंदू विकसित होतच नाही. तरी शिबिरात पोहे उपम्या ऐवजी मेदूवडा ठेवा म्हटले तर रागाने नव्हे फणकाऱ्याने बघतात.

"आज मेंदू वडा खायला घालायला सांगता उद्या म्हणाल आम्ही 15 ऑगस्ट, तिरंगा झेंडा, जनगणमन आणि प्रजासत्ताकला विरोध केला होता ते शिकवा. आम्ही वाजपेयींच्या काळात कंदाहार ला जाऊन अतिरेकी सोडले त्यांनीच बॉंब स्फोट केले हे शिकवा. कारगिल मधे घुसखोरीची इंटेल असताना काणाडोळा केला. हे शिकवा. यांना अकलेचा वापर करायला शिकवले तर आम्ही काय हरी हरी करावे का? अहो यांच्या मेंदूला काम दिले तर पुलवामा मधे स्फोटके कशी आली हे विचारणे पाकिस्तान प्रेम असेल तर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी एक खुरटी दाढीवाला रेकीमास्टर जे बोलत होता ते कसे पाकिस्तानप्रेम नाही?

मेदूवडा नाही म्हणजे नाही. त्यांना आम्ही सूज्ञ म्हणतो त्या भ्रमात राहू द्या. तुमचे शहाणपणाचे सल्ले तुमच्या कडेच ठेवा"

जुन्या मराठी सिनेमात नवरा बायकोच्या भांडणात 'तुमचं माझ्यावर प्रेमच नाही मुळी' हे ब्रम्हास्त्र बायकोकडे असे तसे 'तुम्ही पाकिस्तान प्रेमी अहात' हे ब्रह्मास्त्र मोदीभक्तांकडे असते. पहिल्या सर्जिकल स्ट्राईक च्या ' वेळी '३०० अतिरेकी मेले' , 'त्यांचे F16 आपण पाडले' असे म्हणत लोक नाचत असताना थोडीशीही शंका व्यक्त केली की पाकिस्तान प्रेमाचा शिक्का बसत असे, आताही आपले राफेल पडले हे मान्य करणारे पाकिस्तान प्रेमी ठरतात. पुलवामा पहेल्गाम इथले intelligence failure दाखवणारे पाकप्रेमी ठरतात. कालाय तस्मै: नमः

आज पाहिला हा चित्रपट.
पहिल्या पानावर दीपांजलीने लिहीले आहे त्याला पूर्ण अनूमोदन.
चित्रपट अतिशय वेगवान आहे. नुसता वेगवानच नाही तर प्रेक्षकांवर जबरदस्त पकड ठेवतो. आणि तद्दन कमर्शिअल चित्रपट आहे. कुठलाही, कसलाही प्रोपगंडा जाणवला नाही, इस्लामफोबिया पण जाणवला नाही. एवढी काँट्राव्हर्र्सी झाली त्याचा चित्रपटाला फायदा झाला. संवाद वगैरेही अगदी तद्दन व्यावसायिक चित्रपटाचे आहेत.
रणवीर सिंगबद्दल बर्‍याच लोकांनी लिहीले आहे. बाकी स्टार कास्टही मस्त.

मात्र १९९९, २००१, २००८ या घटना पाहताना राग, दु:ख, निराशा वाटलं.
बाकी सर्व बाजूला ठेवून 'देश' प्रथम हे कधी होणार?

या धाग्यावर चिदंबरम आणि त्यांच्या मुलाचा उल्लेख आहे. त्यामुळे हा लेखही इथे अप्रस्तुत ठरू नये.dhurandhar.jpg

असेल तर अ‍ॅडमिननी उडवावा.

एखाद्याला पाकिस्तान प्रेम असणे म्हणजे काय ह्याची व्याख्या व्यक्तीसापेक्ष आहे.
पाकिस्तान का बनला आहे? भारतातील मुस्लिम सुरक्षित राहू शकत नाहीत. त्यांना इस्लामवर आधारित देश हवा आहे म्हणून. असा देश राजकीय पातळीवर भारताला एक हिंदू देश मानत आला आहे आणि कायम भारताच्या कुरापती काढत आलेला आहे.
दुसरीकडे पाकिस्तानात गेल्यावर तिथले अनेक नागरिक भारतीय लोकांचा आतिथ्य करतात. प्रेमाने वागतात. ह्यावरून अनेक लोक असे समजतात की पाकिस्तान हा खरे म्हणजे भारताचा मित्रच आहे. कुणीतरी दहशतवादी गट पाकिस्तानात लपलेले आहेत ते पाकी आणि भारतीय दोन्ही लोकांना छळत असतात. पण म्हणून पाकिस्तान वाईट नाही. म्हणून कितीही हल्ले झाले तरी आपण पाकिस्तानशी मैत्रीच केली पाहिजे वगैरे.
दुसर्या बाजूला असले स्पष्टीकरण मान्य नाही. पाकिस्तान हा कट्टर दुष्मन आहे. ह्या सापाला कितीही दूध पाजा, तो विषारी डंखच करणार.
बॉलीवूडचे अनेक चाकोरीबद्ध सिनेमे पहिली भूमिका ठासून मांडत असतात.
धुरंधरने दुसरी भूमिका काही प्रमाणात मांडली आहे.

पाकिस्तानपेक्षा अमेरिका जास्त भारतद्वेष्टा आहे. ओबामाचा अपवाद.
सध्या तर आणखीनच ठळकपणे दिसतंय.
आणि भारतातले भगवेच ट्रंपवर चिडलेत - ज्यांनी ट्रंपसाठी होमहवन केलं होतं. केम छो ट्रंप केलं होतं

>>
पाकिस्तानपेक्षा अमेरिका जास्त भारतद्वेष्टा आहे. ओबामाचा अपवाद.
<<
अमेरिकेने २६/११ सारखे भारतातील एखाद्या मोठ्या शहराला अनेक दिवस वेठीस धरणारे किती हल्ले केले ?
अमेरिकेने भारताशी किती युद्धे केली?
अमेरिकेने भारताच्या संसद, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती भवन अशा कुठल्या मानाच्या जागी अतिरेकी सोडून गोळीबार करून भारतीय नागरिक मारले?
अमेरिकेने भारताची किती विमाने अपहृत करून नेली?
अमेरिकेने भारताच्या कुठल्या पर्यटनस्थळी अतिरेकी पाठवून तिथले निरपराध पर्यटक गोळ्या घालून मारलेत?
अमेरिकेत किती भारतीय पोटापाण्यासाठी स्थलांतरित आणि नंतर स्थायिक झाले आहेत? त्यांना किती द्वेष सहन करावा लागतो आहे?
पाकिस्तानात किती भारतीय पोटापाण्यासाठी स्थलांतरित आणि नंतर स्थायिक झाले आहेत?
अमेरिकेने किती प्रमाणात बनावट भारतीय नोटा छापून भारतात तस्करी करून आणून भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी होण्यासाठी प्रयत्न केले आहेत?

भारतातले अनेक अणुशास्त्रज्ञ अचानक का मरू लागले?
१९७० मध्ये बांग्लादेशी निर्वासितांमुळे भारतावर आर्थिक ताण आला. तिथे पाकिस्तानमागे अमेरिकेचा हात होता.
१९७४ आणि ९८ च्या अणुस्फोटांनंतर घातलेल्या निर्बंधामुळे भारताची आर्थिक पीछेहाट झाली. आता टॅरिफमुळे होतेय आणि कपटी चीनला जवळ करावं लागतंय. याचा परिणाम सगळ्या भारतीयांना भोगावा लागलाय आणि लागतोय.
दहशतवाद हा फक्त जीव घेण्यापुरता नसतो. आर्थिक दहशतवादाचे परिणाम सर्वदूर , खोलवर आणि दीर्घकाळ होतात.

अमेरिका एक रोगग्रस्त मानसिकतेचा देश आहे. तिचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे एक वेडपट मनुष्य आहेत. हा माणूस गझनीच्या महंमदाचा अवतार आहे. त्याचे भक्त हे भारताचे शत्रू आहेत कारण ट्रंपने भारताला शत्रू म्हटलेले आहे. ट्रंपला कुणीही मनोरूग्णांच्या इस्पितळात घेऊन जाऊ शकत नाही कारण तो शक्तिशाली आहे. पोपट मेलाय हे त्याला कोण सांगणार ?

पन त्याच्या भक्तांना पकडून मेंटल हॉस्पिटलमधे भरती करता येऊ शकते.

भाबडे, अबोध, अजाण असतील तर ठीक आहे हो. प्रबोधन, उद्बोधन करता येईल.
पण जाणकार असूनही असा भाबडा युक्तिवाद करावा लागत असेल, तर किती शोकांतिका हो त्यांचीच.

अमेरिकेच्या पोटात आपल्याबद्दल खदखद असेल.
पण म्हणून अमेरिका आणि पाकिस्तान तुलना काही पटली नाही.
कित्येक सामान्य भारतीय अमेरिकेत जातात आणि ग्रीन कार्ड घेत तिथेच कायमचे स्थायिक होतात.
पाकिस्तानात कोणी जात नाहीत.

अमेरिकेच्या पोटात आपल्याबद्दल खदखद आहे की नाही हा भाग वेगळा. निक्सन इंदिरेबद्दल काय बोलला होता, नोबेल प्राइज मिळालेल्या हेन्री किसिंजरचे विचार काय होते हे माहीत करून घ्या.

अमेरिका हा गुंड देश आहे. शक्य तेवढा भाग आपल्या अधीन असावा असं त्याला वाटतं. आपल्या एरियात कशाला, जगात दुसरा कोणी मोठा झालेला चालत नाही. व्हिएतनामशी युद्ध करायला काय कारण होतं? झाला तो देश कम्युनिस्ट तर तुमच्या बापाचं काय जातं? तेच आता व्हेनेझुएलाबाबत. बांग्लादेश स्वातंत्र्यासाठी झगडत होता, पाकिस्तानी सैन्य तिथे जिनोसाइड करत होतं, तेव्हा तिथला अमेरिकी राजदूत कळकळीने अमेरिकन सरकारला कळवत होता, हे थांबवा असं सांगत होता. पण अमेरिकेला मानवतेपेक्षा आपले हितसंबंध महत्त्वाचे वाटले.

भारतात बांग्लादेशी इतक्या मोठ्या प्रमाणात येण्याचं कारण अमेरिकेचा पाकिस्तानला पाठिंबा.

बांग्लादेशातली आणि आता पॅलेस्टाइनमधली जिनोसाइड अमेरिकन करदात्यांच्या पैशाने होते.

त्यांनी इराक बेचिराख केला. अफगाणिस्तान केला. अनेक देशांतली डावी सरकारी उलथण्यासाठी कट कारस्थानं केली.

तो बेसिकली भांडवलशाही देश आहे. त्यांना फक्त स्वतःचा फायदा हवा असतो. दोन देशांत युद्धे लावून दोघांनाही शस्त्रे विकू शकतात. त्यासाठी लोक
अमेरिकेत जातात ते स्वतःच्या उत्कर्षासाठी. अमेरिका चांगली आहे, देवाची दुनिया आहे म्हणून नाही. तिथे अजूनही तुलनेने लोकशाही वातावरण आहे. पण तेही सरसकट नाही. त्यातल्या अनेकांना कुठून या दरिद्री देशात माझा जन्म झाला असं वाटत असतं ( असं मोदीच म्हणालेत).
याबाबतीत भारत आणि पाकिस्तान सारखेच आहेत. तर कोण भारत सोडून पाकिस्तानात कशाला जाईल. लोक अमेरिकेत जातात , पाकिस्तानात नाही हा बिनडोक मुद्दा आहे.

भारतातले अणुशास्त्रज्ञ अचानक मरू लागले, त्यात अमेरिकेचा हात नाही, हे खात्रीने सांगू शकता का?

भारत १९४७ मध्ये समाजवादी झाला तर यांच्या बापाचं काय गेलं?

अमेरिकन फार्मा इंडस्ट्रीचा इतिहास तर काळाकुट्ट आहे. यामागे भांडवलशाही आहेच. पण तिसर्‍या जगाबद्दल, आफ्रिकी काळ्या लोकांबद्दल तुच्छता आहे. हे लोक जगले काय मेले काय , त्यांना फरक पडत नाही. मेलेले हवेच असतील.

आणि ढोंगीपणा असा की हा देश इतर देशातल्या ह्युमन राइट्सबद्दल रिपोर्ट बनवतो.

ऋन्मेष, तुम्ही मागच्या गोष्टी लक्षात ठेवत नाही, ऑब्जेक्टिव्हली विचार करता असं अनेकदा म्हणता. तुमच्या फॅन क्लबलाही तसं वाटतं. पण माझा अनुभव आणि मत तसं नाही. माझे मुद्दे खोडायला तुम्ही तत्परतेने येता आणि त्यातलं गांभीर्य कमी करता - ट्रिव्हियलाइज करता. मुद्दाम डायव्हर्ट करता असं माझं दीर्घकाळचं निरीक्षण आणि ठाम मत आहे. मला त्याने फरक पडत नाही. याचसाठी तुम्हां ला होता होईतो इग्नोर करतो. पण जिथे तो कॉझ - मुद्दा मला मह त्त्वाचा वाटतो, तिथे नाइलाजाने लिहावं लागतं.

हे अवांतर आहे. पण ऑफिसात उशीरपर्यंत थांबून काम कराव्या लागणार्‍या लोकांबद्दल आणि ठरवून मूल नको म्हणणार्‍यांबद्दलची तुमची मतं तुमच्या मर्यादित वर्तुळ , अनुभव आणि विचारसरणीतून आलीत . आणि ती तुम्ही युनिव्हर्सल ट्रुथ - त्रिकालाबाधित सत्य असल्यासारखी लिहिलीत. रोहित शर्माने आपल्या सहखेळाडूंना आईबहिणीवरून लैंगिक शिव्या देण्याचं तुम्ही केलेलं समर्थन विशेषतः तुमच्या मावशी आईच्या वयाच्या फीमेल फॅन क्लबने वाचावं असं मला वाटतं.

हे बरेच दिवस लिहायचं होतं. आज लिहिलं. इथे थांबतो. तुमच्यावर घालवायला माझ्याकडे यापेक्षा जास्त वेळ नाही.

पाकिस्तान कट्टर दुश्मन होत्यात तिथल्या मिलिटरीचा स्वार्थ आणि हेतू आहे. त्यानिमित्ताने त्यांना देशावर कंट्रोल ठेवता येतो. रकाही राजकारण्यांनाही भारत द्वेष हाच सत्ता टिकवायचा मार्ग वाटतो. या दोन्हीमागे पुन्हा अमेरिका आहे. अमेरिकेने पाकिस्तानातून अंग काढून घेतले असते तर फरक पढला असता. आता चीन दुसरी अमेरिका होतो आहे.
आपलं नष्टचर्य संपत नाही.
सापाला दूध पाजणारे हे दोघे आहेत. यात पाकिस्तानी जनतेचे पण हाल आहेत.

>>
भारतातले अनेक अणुशास्त्रज्ञ अचानक का मरू लागले?
१९७० मध्ये बांग्लादेशी निर्वासितांमुळे भारतावर आर्थिक ताण आला. तिथे पाकिस्तानमागे अमेरिकेचा हात होता.
१९७४ आणि ९८ च्या अणुस्फोटांनंतर घातलेल्या निर्बंधामुळे भारताची आर्थिक पीछेहाट झाली. आता टॅरिफमुळे होतेय आणि कपटी चीनला जवळ करावं लागतंय. याचा परिणाम सगळ्या भारतीयांना भोगावा लागलाय आणि लागतोय.
दहशतवाद हा फक्त जीव घेण्यापुरता नसतो. आर्थिक दहशतवादाचे परिणाम सर्वदूर , खोलवर आणि दीर्घकाळ होतात.
<<
जेव्हा अमेरिका पाकिस्तानपेक्षा वाईट आहे असे तोंडाला येईल ते विधान ठोकून दिले जाते तेव्हा अमेरिकेच्या भारताशी संबंधित चांगल्या आणि वाईट कामांची तुलना केली जावी. तशीच तुलना पाकिस्तानने भारताशी संबंधित केलेल्या चांगल्या वाईट कामांची केली जावी आणि मगच अकलेचे तारे तोडावेत.
अमेरिकेची भारतासाठी चांगली कामे. इंटेल, अ‍ॅपल, गुगल, ओरॅकल, अ‍ॅमेझॉन, फेसबुक/मेटा, सिस्को, टेक्सस इन्स्ट्रुमेंटस, मर्क, फायजर, अशा कितीतरी कंपन्यांनी आपली ऑफिसे भारतात उघडली आहेत. त्यातून असंख्य भारतीयांना रोजगार मिळतो आहे. अब्जावधी डॉलर कमाई होते आहे. अनेक अमेरिकन कंपन्या भारतातील इन्फोसिस आदि कन्स्लटिंग कंपन्यांना असंख्य प्रोजेक्ट देतात. त्यातून अब्जावधी डॉलर कमाई होते. त्यातून भारताला प्रचंड कर मिळतो. अमेरिकन कंपन्यांचा ह्यात स्वार्थ आहे पण त्यातून भारताचाही फायदाच होत असेल तर ह्याला विन विन स्थिती म्हणतात.
अमेरिकेने अनेक भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन व्हिसा दिला आहे. त्यातील अनेक अमेरिकेत कंपन्यात उच्च पदे भूषवतात.ह्यातले अनेक जण भारतात पैसे गुंतवतात. कित्येक जण आपल्या कंपनीच्या भारतीय शाखा उघडतात. ह्यातूनही भारताचा फायदा होतो.
हे झाले अमेरिकेने भारतासाठी केलेले चांगले काम.

पाकिस्तानने भारतासाठी किती आर्थिक मदत केली? किती कंपन्या उघडल्या? किती लोकांना नोकर्या दिल्या? किती लोक पाकिस्तानात व्हिसा काढून तिथेच स्थायिक होण्याचे स्वप्न बाळगून असतात?
इतिहासात डोकावायचे झाले तर पंडित नेहरु हा माणूस अमेरिकेचा तिरस्कार करत असे. एखादी नशेचे व्यसन लागावे तसे त्या माणसाला साम्यवाद, समाजवादाचे व्यसन होते. त्यामुळे अमेरिकेने मैत्रीचा हात पुढे केलेला असताना तो झिडकारून भारत आणि अमेरिका राजकीय दृष्ट्या विरुद्ध गटात असतील ह्यावर शिक्कामोर्तब केले. आणि सोव्हियत रशियाशी जवळिक केली. पुढे कम्युनिस्ट रशियाचा बट्ट्याबोळ झाला आणि भारतातील समाजवादाच्या अतिरेकामुळे दिवाळखोरीची वेळ आली. नंतर अमेरिकेशी आर्थिक संबंध सुधारले.
त्यामुळे बांगला देश युध्द वगैरे उदाहरणे गैरलागू आहेत. भारताच्या सरकारने असा निर्णय घेतला होता की आम्ही अमेरिकेचा मित्र देश नाही.

थोडक्यात अमेरिका हा भारतासाठी पाकिस्तानपेक्षा वाईट आहे हे विधान मूर्ख, बिनडोक, बिनबुडाचे आहे.

{अशा कितीतरी कंपन्यांनी आपली ऑफिसे भारतात उघडली आहेत. त्यातून असंख्य भारतीयांना रोजगार मिळतो आहे. }
चॅरिटी, उपकार म्हणून केलं का? मल्टिनॅशनल्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेचा भाग आहे. ग्लोबलायझेशन इफेक्ट. भारत मोठी बाजारपेठ आहे. आमच्याकडे कुशल मनुष्यबळ आहे. आणि आम्ही मोठी बाजारपेठ आहोत. हे अमेरिका चीनमध्ये पण करतं ना?
व्हेनेझुएला, इराक, ग्रीनलंड, युक्रेनमधल्या natural resources वर डोळा आहे आणि होता ना?
असंख्य उदाहरणं देता येतील
उद्या म्हणाल कोलंबसने अमेरिकेत काळे गुलाम त्यांच्या उद्धारासाठी आणले.

आशिया आफ्रिकेत वसाहती करून आम्ही तिथल्या रानटी लोकांना सुसंस्कृत केलं म्हणणारे white supremasicts पाहिले आहेत

भरत
१) पाकिस्तानला वाईट म्हटले की अमेरिका त्यापेक्षा वाईट आहे याचा इथे काय संबंध?

२) <<<ऑफिसात उशीरपर्यंत थांबून काम कराव्या लागणार्‍या लोकांबद्दल आणि ठरवून मूल नको म्हणणार्‍यांबद्दलची तुमची मतं तुमच्या मर्यादित वर्तुळ , अनुभव आणि विचारसरणीतून आलीत . आणि ती तुम्ही युनिव्हर्सल ट्रुथ - त्रिकालाबाधित सत्य असल्यासारखी लिहिलीत.>>>>>

याचाही इथे काय संबंध?

3) <<<< रोहित शर्माने आपल्या सहखेळाडूंना आईबहिणीवरून लैंगिक शिव्या देण्याचं तुम्ही केलेलं समर्थन विशेषतः तुमच्या मावशी आईच्या वयाच्या फीमेल फॅन क्लबने वाचावं असं मला वाटतं.
>>>>>

याचा देखील इथे काय संबंध?
त्यातही मावशी आईच्या वयाच्या फीमेल फॅन क्लबने असा सभासदांच्या वयांवर टिप्पणी करायचा काय संबंध?

रोहित शर्मा माझ्या आवडीचा खेळाडू म्हणून जिथे तिथे त्याला नावे ठेवत फिरता. तो शिव्या देतो म्हणता. त्याच्या थुळथुलीत पोटाला चिमटे काढायला हवे म्हणत त्याची बॉडी शेमिंग करता

माझ्या इतर धाग्यावरच्या पोस्ट इथे संदर्भ नसताना लिहिता जेणेकरून वाचणाऱ्याला वाटावे अरे याने काहीतरी कांड केले आहे. एक प्रकारची बदनामी करायचा प्रकार झाला हा. मी एन्जॉय करतो ती गोष्ट वेगळी..

पण एवढे सगळे केल्यावर तुम्ही म्हणता मला तुमच्यावर घालवायचा वेळ नाही. प्रत्यक्षात नरेंद्र मोदींइतकाच तुम्ही माझाही विचार करता Happy

>>>"हा कुठला धागा आहे?">>>
तुम्हाला जो वाटेल तो....
इथे तुम्ही 'अमिबाचे पुनरुत्पादन लैंगिक की अलैंगिक?' ह्या विषयावर देखील वाद-चर्चा करू शकता 😀

अंजली - तुला आवडेल याची खात्री होती Happy

शेंडे - तुमच्या कालच्या पोस्टबद्दल
धुरंधरने दुसरी भूमिका काही प्रमाणात मांडली आहे. >>>> not exactly. धुरंधरने फक्त कराची मधले गँगवॉर व त्या लोकांचा, त्यांच्या आणि बलोच बंडखोरांच्या शस्त्रांचा भारताविरूद्ध आयएसआयने कसा वापर केला ते दाखवले आहे. पूर्ण पाकविरूद्ध त्यात काहीही नाही.

मात्र त्याबाबतीत धुरंधरने प्रचलित बॉलीवूडची समीकरणे झुगारून दिली. तो धोका पत्करला. पाकिस्तान व मिडल इस्ट मधे यावर बंदी येऊ शकते याची त्यांना कल्पना असणारच. मात्र भारत व इतर परदेशांत लोकांनी प्रचंड पसंती दिल्याने पाक-मिडल इस्ट मार्केटला न जुमानताही चित्रपट प्रचंड पैसा कमावू शकतो हे धुरंधरच्या यशातून दिसले. (आमिर खानच्या सरफरोशची भारताबाहेरची आवृत्ती बरेच कट्स असलेली, पाकचे थेट उल्लेख काटलेली होती हे यानिमित्ताने आठवले). आत्तापर्यंत त्या मार्केटला डोळ्यासमोर ठेवून पिक्चरमधे पाक बॅशिंग कमी असे. बॉर्डरसारख्या युद्धपटांचा अपवाद.

निरूपमा राव यांचे समीक्षण वाचले. त्या पूर्वी राजदूत असल्याने आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत त्यांच्या मताला वजन आहेच. पण त्या सिनेसमीक्षक नव्हेत. एका चित्रपटात काय दाखवले याच्या प्रभावावर एकच चित्रपट स्वतंत्रपणे पकडून त्यावर बोलणे चुकीचे आहे. "चित्रपटात चुकीचे दाखवले आहे" असे आरोप असंख्य पिक्चर्सबद्दल झाले आहेत. ती फुटपट्टी सगळ्या पिक्चर्सना सारखीच लावायला हवी.

अर्फा खानुम यांच्याबद्दल मला फारशी माहिती नाही. एक पत्रकार आहेत इतकेच माहीत आहे. त्यांनीही या पिक्चरमधे इस्लामोफोबिया आहे वगैरे म्हंटले आहे.

या दोघींची काळजी भारतातील सर्वसाधारण समज/परिस्थितीबद्दल असती तर ठीक होते. त्याबद्दल वाद होतील पण These are fair arguments about society in general. या पिक्चरला मात्र ते साफ गैरलागू आहेत. या पिक्चरमधे इस्लामोफोबिया नाही. घाऊक पाक बॅशिंगही नाही. भारतात झालेले अतिरेकी हल्ले, त्यातील आयएसआयचा सहभाग वगैरे जनरली माहीत असलेल्याच गोष्टी आहेत. त्यामुळे अर्फा खानुम यांचे बोलणे पटले नाही.

निरूपमा राव यांचे मुद्दे:
- यात पाकचे चित्रण ढोबळ आहे. त्यांचे अंतर्गत हेवेदावे, बंडाळी वगैरे यात दाखवलेले नाही. थोडक्यात पाकचे सर्व बाजूने चित्रण यात नाही. त्यांचे शब्द - "(Pak is shown as) unified moral space of menace - gangland, terror camp and intelligence apparatus folded into a single hostile organizationn". तेथील लोकांचे माणसे म्हणून यात चित्रण नाही. ई.ई. ->-> हा दिग्दर्शकाचा चॉईस आहे. कथानकाला आवश्यक तितके त्याने दाखवले आहे. या लॉजिकने सत्यामधल्या मुंबईबद्दलही हेच म्हणता येईल.
- पाकपेक्षा चीन हा मोठा प्रॉब्लेम आहे. पण दिग्दर्शकाने त्याबद्दल चित्रपट बनवलेला नाही. कारण त्यात करमणूक नसेल ->-> ओके, पण त्यांच्या उल्लेखातच याचे उत्तर आहे. बाकी पिक्चर बनवणार्‍याने हाच विषय का घेतला, दुसरा का घेतला नाही याला काही अर्थ नाही. उद्या चीनबद्दल बनवला तर आणखी कोणत्या देशाबद्दल का बनवला नाही असे विचारता येईल.
- असे पिक्चर युद्धाला सपोर्ट करणारे वातावरण तयार करतात. ->-> यात युद्ध दाखवलेले नाही. तसे भारताने करावे असेही सुचवलेले नाही. भारताने ऑलरेडी केलेल्या खर्‍या/काल्पनिक हेरगिरीबद्दल ही कथा आहे. जी खरोखर होत असण्याची खूप शक्यता आहे.

हा चित्रपट म्हणजे जणू भारताचे अधिकृत धोरण असल्यासारखी त्यांनी टीका केली आहे. त्यांचा एकच मुद्दा बरोबर आहे आणि ते इथेही दिसले आहे. "shrinking tolerance for dissent"अशा चित्रपटांना विरोध करणारे, आपापल्या सर्कल्स मधे एक ग्रूपथिंक तयार झालेले असते त्याबद्दल प्रश्न विचारणारे हे थेट देशद्रोही, पाक प्रेमी असल्याचे आरोप करणे. सोशल मिडियाने गेल्या काही वर्षांत केलेले धृवीकरण, आणि सत्य जाणून घेण्याकरता स्वतः शोध घेण्यापेक्षा आपल्या बबल मधे समविचारी लोकांचीच मते आत्मसात करणे हे त्याला जबाबदार आहे. पण हा पिक्चर त्याला जबाबदार नाही.

Pages