'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

Submitted by संजय भावे on 11 December, 2025 - 12:49


सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!

काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.

आपल्याकडे अ‍ॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.

'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.

असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!

-----

सादरीकरण आणि पात्र परिचय :

'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.

ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...

चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'

३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.

ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.

"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल

ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.

चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'

"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."

रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.

क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.

चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'

नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.

आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!

प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.

ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.

अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.

उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.

चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'

अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.

बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!

आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.

नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.

ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!

पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.

चॅप्टर - ५ : 'द जिन्न'

ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!

खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.

चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.

पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.

असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.

संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.

सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!

_____

एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

रॉकी राणी मस्त होता .
पिच्चरपेक्षा रणवीरच्या कौतुकाच्या इतक्या पोस्टिं पडतायत तर कुणीतरी रणवीरफॅनक्लब चा धागाच काढा ना.

>>"पिच्चरपेक्षा रणवीरच्या कौतुकाच्या इतक्या पोस्टिं पडतायत तर कुणीतरी रणवीरफॅनक्लब चा धागाच काढा ना.">>
हा हा हा 😀
धागा कोणीतरी काढाच पण त्याआधी रणवीर आवडणारे आणि रणवीर अजिबात न आवडणारे ह्यांच्यासाठी आमच्या घरातलाच एक किस्सा उद्या लिहितो... (मला रणवीर आवडतो आणि बायकोला तो अजिबात आवडत नाही ह्यावरुन तो कसा असेल ह्याची तोपर्यंत कल्पना करावी 😂)

बायकांचे मत त्याच्याबद्दल फार टोकाचे असते असा अनुभव आहे.
काहीना तो डिसेंट नाही म्हणून आवडत नाही.
तर काहींना नेमके तेच आवडते Proud

<<
एकीकडे सांगायचे की फिक्शन आहे आणि दुसरीकडे सढळपणे ओरिजिनल फुटेज आणि रेकॉर्डिंग वापरायची. दु
>>
पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांना उत्तर म्हणून एक गुप्तहेर पाकिस्तानमधे सोडणे हे ह्या धुरंधर सिनेमाचा केंद्रबिंदू. आणि ह्या हेराचे व्यक्तिमत्व, त्याची कार्यपद्धती, त्याची कामे हे सगळे काल्पनिक आहे. कारण भारत सरकार आपल्या हेराबद्दल काहीही सांगणे शक्य नाही. दिग्दर्शक आणि पटकथा लेखकाला आपली कल्पनाशक्ती वापरून हे निर्माण करावे लागणार.
ज्या कारणाने भारत सरकारला अशा प्रकारे गुप्तहेर पाठवावेसे वाटले ती कारणे काल्पनिक नाहीत. विविध अतिरेकी हल्ले ज्यात शेकडो निरपराध मारले गेले ते काहींच्या स्मरणात नसतील. कदाचित प्रेक्षकांपैकी कित्येक जण त्यावेळी जन्मलेलेही नसतील म्हणून एक आठवण म्हणून खरे फुटेज वापरले. त्यामुळे डाव्या विचारांच्या लोकांचा पोटशूळ उठला तर उठू दे.
असा नियम कुणी, कुठे आणि कधी लिहिला की काल्पनिक सिनेमात खरे फुटेज वापरू नये?
एक उदाहरण फॉरेस्ट गम्प हा तुफान गाजलेला काल्पनिक सिनेमा आहे त्यातही अनेक वेळा खरे फुटेज वापरले आहे. त्यावर कुणी आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही.

रणवीरच्या बायकोला सुद्धा तो आवडत नाही. Happy
>>>>>

त्यात काय मग विशेष!
आपलाच नवरा किंवा बायको न आवडणे हे खूप कॉमन आहे.
प्रत्येक जोडप्यात काही वर्षांनी ही स्टेज येतेच.

धुरंधरची धुंवाधार घोडदौड चालूच!
जगभरातील कमाईत १००० कोटीचा आकडा पार केला! जबरदस्त!
अनुपमा चोप्रा, मोहतरमा आर्फा खानुम शेरवानी यांचा थयथयाट पथ्यावर पडला आहे!

>>"धुरंधर आवडणार्‍यांना बॅडमिंटन च्या धुरंधर ची लेक आवडत नाही.">>
हे "व्हिस्की आवडणार्‍यांना ताडी आवडत नाही" अशा अर्थाने घ्यावे काय? 😉

>>"अनुपमा चोप्रा, मोहतरमा आर्फा खानुम शेरवानी यांचा थयथयाट पथ्यावर पडला आहे!">>
मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता हैं, वही होता है जो मंजूर ए ''प्रेक्षक" होता हैं 😀

रणवीरच्या बायकोला सुद्धा तो आवडत नाही. Happy>>>>त्याला ती केव्हडी आवडते ते बघा https://youtube.com/shorts/b70O8IQiKeo?si=MfRpi2gWilRGPbTA स्वतःच्या बायकोवरचं प्रेम दाखवायला लाजत नाही हे मला जाम आवडतं . खरंतर दिपवीर जोडीच खूप आवडते.
बाकी त्याचा इतरत्र वावर कसाही असो acting करताना तो त्याचे100℅देतो.धुरंधर च्या अभिनयावरून लक्षात आलंच असेल.

ज्यांना तो प्रतिसाद दिला आहे त्यांच्या आवडत्या युट्युबरने >> तो माझा आवडता वगैरे युट्यूबर नाही. तुम्ही उद्या काही सत्य लिहीले तर मी ते मान्य करीन म्हणून तुम्ही माझे आवडते किंवा तुम्ही असत्य लिहीले म्हणून टीका केली तर नावडते हा खाक्या मान्य नाही.

ध्रुव राठीचा तो व्हिडीओ प्रचंड मेहनत घेऊन बनवला आहे, त्यात मोलाची माहीती आहे. मग हा व्हिडीओ ध्रुव राठी बनवतो कि शेफाली वैद्य बनवते याच्याशी घेणं देणं नाही. शेफाली वैद्य यांचे असे माहीतीपूर्ण व्हिडीओ असतील तर कळवा.

त्याने धुरंधरवर जो व्हिडीओ बनवला आहे त्यातही त्याने अजेण्डा एक्स्पोज केला आहे. याचा अर्थ चित्रपट म्हणून तो भंगार आहे असे नाही. बघा पण सावध असा. ज्या झोंबींना ते समजले नाही ते त्यांच्या बैलबुद्धीप्रमाणे व्यक्त होत आहेत. टीका आणि झोंबींचे शिव्याशाप यात फरक करायला हवा.

संजय भावे, आपला राजकीय अजेण्डा आपल्या जागी ठेवावा. त्यावरून वैमनस्य येऊ द्यावे किंवा एखाद्याचा कल एखाद्या राजकीय विचारसरणीकडे आहे म्हणून छिद्रान्वेषी भूमिका घेत झोडपावे अशी माझी भूमिका नाही. जर नाही पटले तर मुलालाही झोडपावे (वैचारीक) आणि पटले तर शत्रूलाही दाद द्यावी असे रहावे. इथे एखाद्याची भूमिका समजली कि लोक त्याला प्रतिसाद देणेच बंद करतात. यातून त्यांची भूमिका समजतेच की.

पण थोड्या ठिणग्या हव्यात, नोक झोक हवी. यात दुमत नाही.

संपादन
माझा प्रतिसाद टाईप होत असताना वर ट्वीट आले. ते आता बघतोय. माझ्या पाहण्यात हे ट्वीट नाही. त्यामुळे माझा प्रतिसाद त्याला धरून नाही. माझा प्रतिसाद ध्रुव राठीने बनवलेल्या फेक ब्युटी आणि त्याचे भारतातल्या मुलींवर होणारे घातक परिणाम याला धरून आहे. यात त्याने फक्त फिमेल अ‍ॅक्टरच नाही तर मेल अ‍ॅक्टर बद्दलही बोललेले आहे. ते व्यक्तिसापेक्ष अजिबात नाही. भारतातल्या मुलीच नाहीत तर मुलं सुद्धा. ब्युटी स्टँडर्डसच्या बाजारीकरणाचे घातक परिणाम भारतातच नाही तर एशियन कंट्रीजमधेही कसे झालेत हे त्याने सांगितले आहे.

एशियन मुलं मुली (पौवार्त्य) आपले डोळे आणि नाक युरोपिअयन स्टँडर्डसप्रमाणे करून घेणार्‍या शस्त्रक्रिया करून घेत आहेत. हा वेडेपणा आहे असे तो म्हणतोय. तुम्हाला जो लुक मिळाला आहे तोच तुम्हाला युनिक बनवतो, तुम्ही जे ब्युटी स्टँडर्डस फॉलो करता ते फेक आहेत हा त्याचा विषय आहे.

यात दीपीकाला बदनाम करण्याचा उद्देश नाही.
ज्यांना ध्रुव राठीबद्दल राग आहे त्यांना द्दीपीकाबद्दलही आहे. तिने बनवलेल्या एका चांगल्या विषयाच्या पिक्चरवर बहीष्कार घातला होता. अ‍ॅसिडफेकिंत त्यांना राजकीय अजेण्डा काय दिसला हे त्यांचं त्यांना माहीती.

https://x.com/dhruv_rathee/status/2004557087972749465
Dhruv Rathee
@dhruv_rathee
This is a DOCTORED video

Deepika Padukone's photos were added over my original edit. I did not target any actress specifically in my video.

I have no idea why someone will choose to attack Deepika like this. Must be a dirty PR tactic of some competitor actress

तुम्ही याआधी ध्रुव राठीला जर्मन शेफर्ड म्हटलेत. यावरूनही तुम्ही कशा प्रकारच्या लोकांना फॉलो करता ते कळलंच आहे.

आताच्या प्रतिसादात माझ्यासाठी दीपिका महत्त्वाची नाही. तिची तुलना करायला तुम्ही ज्या व्यक्तीची निवड केलीत, त्यावरून मला काही अर्थ लागला, काही सामाजिक संदर्भ आठवले - आपण काय लिहितो त्या मागचे सामाजिक संदर्भ माहीत असलेले बरे असतात. तुम्हांलाही त्याच संदर्भाने लिहायचे असेल, असे मी म्हणत नाही. काही गोष्टी आपण नकळत उचलत असतो. या गोष्टीवरून अन्यत्रही वादंग झालेले आहेत.

>>" आपला राजकीय अजेण्डा आपल्या जागी ठेवावा. त्यावरून वैमनस्य येऊ द्यावे किंवा एखाद्याचा कल एखाद्या राजकीय विचारसरणीकडे आहे म्हणून छिद्रान्वेषी भूमिका घेत झोडपावे अशी माझी भूमिका नाही.">>
>>"पण थोड्या ठिणग्या हव्यात, नोक झोक हवी. यात दुमत नाही.">>
जेब्बात! पहिले विधान पटले आणि दुसर्‍याशी सहमत आहे 👍

प्रपोगंडा फिल्म म्हटल्याचा इतका राग का यावा? गेल्या गोवा फिल्म फेस्ट मध्ये तर एका इस्रायली दिग्दर्शकाला आपल्याकडचा एक असाच प्रचंड लोकप्रिय झालेला चित्रपट प्रपोगंडा वाटला होता.

आणखी १०-२०-३० वर्षांनी या प्रपोगंडा फिल्म्स बनू शकतील. कथुआ फाइल्स, उन्नाव फाइल्स, मणिपूर फाइल्स आणि शांतम् पापम् गुजरात फाइल्स. शाहबानो केसवर चित्रपट बनला तसा बिल्किस बानोवरही बनेल. सध्याच्याच विचारांचे सरकार असेल तर अँटिनॅशनल लोकांनी बनवलेल्या संतोष या चित्रपटाला जसे भारतात प्रदर्शित होऊ दिले नाही, तसे याही चित्रपटांना प्रदर्शित करू दिले जाणार नाही. पण विदेशात तर हे चित्रपट दिसतीलच. आपल्यातले बरेच लोक विदेशातच राहतात. आपली मुले नातवंडेही विदेशात जाऊ शकतील. कदाचित ती हा चित्रपट बघतील आणि तेव्हा तुम्ही काय करत होता, असा प्रश्न विचारू शकतील. त्याची उत्तरे द्यायला तेव्हाचे अभि आणि नियू (इथली भाषा वापरून सांगायचं तर सरकारी लॅपडॉग) येतील. हे चित्रपट कल्पित आणि वास्तव याची मिसळ करून करून अजेंडा राबवताहेत, हे सांगतील आणि आपल्या व्हिडियो वरच्या कमेंट्स बंद करतील. (आताही करतात).

कशी आहे कल्पना?

@भरत
We do not see things as they are, we see them as we are.

>>"वेमा ला विनंती करा.">>
Done! "त्या प्रतिसादात काही आक्षेपार्ह वाटल्यास तो डिलीट करावा अशी विनंती त्यांना केली आहे."

@ भरत,
>>"शाहबानो केसवर चित्रपट बनला तसा बिल्किस बानोवरही बनेल.">>
गुजरात दंगल आणि बिल्किस बानो सारख्या व्यक्तीरेखेवर ह्या वर्षीच "L2 Empuraan" एक चित्रपट बनला आहे.
प्रोपगंडा चित्रपट आहे हे माहिती असुनही केवळ मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन हे आवडते कलाकार असल्याने (आणि आधिचा भाग बरा वाटल्याने) हा तद्दन भिकार चित्रपट थेटरमध्ये जाउन पाहिला होता.
आपला वेळ वाया घालवायची तयारी असल्यास जिओ हॉटस्टारवर तो पहाता येइल 😀

>>"तुमचा तो पूर्ण प्रतिसादच फेक माहितीवर आधारित आहे. तुम्ही कोणाच्या तरी प्रपोगंडाला बळी पडलात.">>
LOL...
ह्याच्याशी बिलकुल सहमत नाही... हा व्हिडीओ/पोस्ट काल-परवाचा आहे, मला दिपिका पदुकोण तिच्या १८-१९ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत कधीच आवडली नाही (ह्याला एकमेव अपवाद म्हणजे घुमर घुमर गाणे) . आणि ह्याचे एकमेव कारण म्हणजे तीचे कृत्रीम सौंदर्य....

>"या प्रतिसादात कोणालाच काही खटकले नाही?">>
त्यात खटकण्यासारखे काय आहे?
ज्यांना तो प्रतिसाद दिला आहे त्यांच्या आवडत्या युट्युबरने आता काहीतरी नवीन व्हिडीओ बनवून त्यात म्हणे दीपिका पदुकोणच्या कृत्रिम सौंदर्यावर टिप्पण्या केल्याने सोशल मीडियावर त्याच्यावर सडकून टीका होत आहे.

हे खोटं आहे, हे अजूनही तुम्हांला कळलं नाही?

भरत
कुछ समझे क्या?
चला. ताणायचे नाही.

कचरावाल्या कुरुप असतात ह्या गृहितकला आक्षेप होता. किंबहुना घाऊक वर्गीकरणालाच. आमच्या डोंबिवलीच्या मुलींच्या चेहऱ्यावर थोडा मेकअप केला की त्या जवळजवळ दीपिका इतक्या सुंदर दिसतील हे कसं वाटतं वाचायला?

मला दीपिका आवडते. तिचा अभिनय आणि सडेतोड भूमिका घेणे दोन्ही.

या धाग्यावर विरोधातल्या ९९ % पोस्टस माझ्या आहेत.
काही काही धागे माझे नसून ते माझ्यामुळे जोरात आहेत. Lol

धागालेखकाला सुद्धा युट्यूबप्रमाणे इन्कम नाही, आणि जास्तीचे प्रतिसाद देणार्‍याला सुद्धा.

>>"हे खोटं आहे, हे अजूनही तुम्हांला कळलं नाही?">>
तो प्रतिसाद तुम्हाला खरंच कळला नाहिये की विषय भरकटवण्याचा प्रयत्न आहे?
ह्यातले जे काही असेल ते असो, मला असला काथ्या कुटण्यात रस नाही, आणि केकुशेठ्च्या जोडीने खंडीभर निरर्थक प्रतिसाद देत राहिलात तर त्याला माझी हरकतही नाही. तेवढाच धाग्याचा टीआरपी तरी वाढेल 😂

>>"धागालेखकाला सुद्धा युट्यूबप्रमाणे इन्कम नाही, आणि जास्तीचे प्रतिसाद देणार्‍याला सुद्धा.">>
सत्यवचन! 🙏

Pages