
कणकेच्या पुरणपोळ्या ...
महाराष्ट्रीयन घरांमध्ये होळी साठीचे पक्वान्न म्हणजे पुरणाची पोळी. आज वेळे अभावी पुरणाच्या पोळ्या बहुतेक घरात विकत आणल्या जातात. विकतच्या पोळ्या जरी चांगल्या असल्या तरी त्यात पारी साठी मैदाच वापरला जातो. कणीक वापरून केलेल्या पोळ्या जास्त स्वादिष्ट आणि हरवाळ होतात. अजिबात मैदा न वापरता नुसत्या कणकेच्या पातळ, मऊ, हरवाळ पोळ्या कशा करायच्या हे होळी होऊन गेली आहे तरी इथे लिहून ठेवत आहे. पुराणावर जास्त लक्ष केंदीत न करता फोकस कणकेवर आहे.
पुरण करण्यासाठी
एक वाटी चणा डाळ , एक वाटी गुळ अथवा तुम्ही नेहमी घेता तेवढा , वेलची, जायफळ , किंचित मीठ आणि एक चमचा तेल.
पारीसाठी
वस्त्रगाळ कणीक एक वाटी , थोडं तेल आणि मीठ.
लाटण्यासाठी
तांदळाची पिठी.
एक वाटी चणा डाळ त्यात चमचाभर तेल घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. त्यातील पाणी काढून टाकून नंतर त्यात गुळ घालून कालथा पुरणात उभा राही पर्यंत शिजवा. त्यात चवीपुरतं मीठ आणि स्वादासाठी वेलची जायफळ घालून आणि गरम असतानाच वाटून घ्या. पुरण पूर्ण गार झाले पाहिजे पोळ्या करताना.
कणीक
१) कणीक पातेल्याला मलमल च फडक बांधून त्यावरून वस्त्रगाळ करून घ्या. म्हणजे कोंडा सगळा वर राहिल. हे वाचायला जरी कठीण, वेळखाऊ वाटत असलं तरी खूप वेळ लागत नाही त्याला. मलमल च्या कापडातून पटकन वस्त्रगाळ करून होते कणीक.
२) कणके मध्ये चवीनुसार मीठ घालून पोळ्याना भिजवतो त्या पेक्षा किंचित घट्ट कणीक भिजवा आणि तो गोळा एक फडक्यात बांधून ती पुरचुंडी पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवा दोन तीन तास.
३) दोन तीन तासांनी कणकेचा गोळा पाण्याबाहेर काढून ती परातीत घेऊन थोडं तेल घालून चांगली मळून घ्या. वाटल्यास पाण्याचा हात ही लावा मळताना. पाण्यात भिजवल्यामुळे कणीक मऊ पटकन होते जास्त मळावी लागत नाही. कणकेची आणि पुरणाची कन्सिस्टंसी सेम असायला हवी म्हणजे लाटताना पुरण विनासायास कडे पर्यंत पसरत.
४) पोळी लाटताना वरून लावायला कणीक न वापरता नेहमी तांदळाची पिठी च वापरा. त्यामुळे पोळी मस्त फिरते पोळपाटावर.
५) कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट तरी पुरणाचा गोळा घ्या. वरील प्रकारे कणीक भिजवली असेल तर हे अजिबात कठीण नाही. कणीक वरील पद्धतीने भिजविली असेल तर पोळी सहज लाटता येते अजिबात फुटत नाही मैदा नसला तरी.
इतकी पातळ लाटली आहे की फडक्याच डिझाइन दिसत आहे.

६) पोळपाटाला मलमल किंवा सुती फडकं बांधा व त्यावर poli लाटा . त्याने पोळी पोळपाटाला चिकटत नाही अजिबात. फडकं न वापरता बटर पेपर ठेवला पोळपाटावर तरी तोच रिझल्ट मिळतो. तसेच बटर पेपर सकट उचलून तव्यावर टाकता येते पोळी हा बटर पेपरचा आणखी एक फायदा. जे सोयीचं वाटेल ते घ्या पण डायरेक्ट पोळपाटावर पोळी कधी लाटू नका.
७) लागेल तशी पिठी घेऊन हलक्या हाताने पोळी लाटा. आणि अलगद पणे तव्यावर टाकून मध्यम गॅस वर पोळी भाजून घ्या. मस्त मऊ, हरवाळ स्वादिष्ट पोळ्या तयार होतात.
बदामी रंगाच्या स्वादिष्ट पुरणपोळ्या तयार
१) वस्त्रगाळ कणीक च घ्याची आहे पण हे तुम्ही चार दिवस आधी ही करू शकता. पुरण ही दोन दिवस आधी करून फ्रीज मध्ये ठेवू शकता म्हणजे आयत्या वेळी ताण येणार नाही.
२) पाण्यात भिजवल्यामुळे कणीक एकदम मऊ होते, जास्त मळावी लागत नाही आणि तेल ही जास्त घालावे लागत नाही मैद्यात घालावे लागते तसे.
धन्यवाद ममो ताई
धन्यवाद ममो ताई
काल केली पुपो! जरा घोळ झाला.
काल केली पुपो! जरा घोळ झाला.. पाण्यात बुडवलेल्या कणकेचा मुड सांभाळणं काही जमलं नाही. प्रचंड चिकट प्रकरण झालं, तेल लावून वगैरे पाहिलं पण माझा पेशन्स संपला. सरळ नॉर्मल पोळ्यांपेक्षा थोडी सैलसर कणीक भिजवून मग केल्या.
बटर पेपर दुमडून पोळपाटाखाली घातला. छान लाटल्या गेल्या. फोटो फार काही खास नाहीये. पण अंतरंग सुंदर झाले.
अंजली, आपल्या पोळ्यांच्या
अंजली, आपल्या पोळ्यांच्या कणकेसारखीच आणि तितपपच घट्ट भिजवायची कणीक. मग पाण्यात ठेवायची. नंतर थोडं तेल लावून मळून घ्यायची. मी हे स्टँड मिक्सरवर करते. छान लुसलुशीत होते. आधीच सैल भिजवली गेली तर पाण्यात ठेवल्यावर अजून सैल होईल. सई केसकरने मागे एक लेख लिहीला होता यावर. रोजच्या पोळ्यांची कणीकदेखील या पद्धतीने भिजवून केल्यातर पोळ्यांचे टेक्चर फार मस्त आले होते.
ओके. आता पुढच्या वेळी.
ओके. आता पुढच्या वेळी.
वर अंजलीने लिहिलंय त्याला मम.
वर अंजलीने लिहिलंय त्याला मम.. पण जास्त त्याच्या मागे n लागता दुसरी भिजवून पोळ्या केल्यास हे छान केलस. आणि पोळ्या छान दिसतायत अंजली _१२.
थँक्यू
थँक्यू
मी पण पुरणपोळ्या केल्या
मी पण पुरणपोळ्या केल्या मंगळवारी. चवीला चांगल्याच होत्या पण टेक्श्चर्/कलर अजूनही मनासारखा जमलेला नाही. कधी जमणार काय माहित. पुन्हा एक दोन पोळ्यांचा प्लॅन करुन प्रॅक्टिस करावी तर ह्याचं काम फारच पडतं त्यामुळे ते ही करावंसं वाटत नाही.
सायो ! भारतातली कणीक ताजी
सायो ! भारतातली कणीक ताजी दळलेली असते आपली पॅकमधली कधिच्या काय दळलेली त्यामुळे अगदी भाकरी इतक नाही पण सुक्ष्म तरी विरी जात असेल असा माझा कयास आहे.
काही कल्पना नाही ब्वा.
काही कल्पना नाही ब्वा.
पुरणपोळी धाग्याने शंभरी गाठली
पुरणपोळी धाग्याने शंभरी गाठली. 👏
साजरी करायला काय गोडधोड ?
मला थोडी टेक्निक कळली आहे
मला थोडी टेक्निक कळली आहे बहुतेक. आत्ताच्या आत्ता मी दोन वेळा केली प्रॅक्टिस म्हणून. कालची सगळ्यात जास्त चांगली झाली होती. इथली कणीक चाळावीच लागते. तशी चाळून त्यात दोन चार चमचे मैदा घालून भिजवली. ममोंनी सांगितल्याप्रमाणे भिजवण्याच्या पाण्यात चिमूटभर हळद घातली रंगाकरता. जरा सैलसर भिजवली आणि पाणी आणि तेलाचा हात लावत तिंबत राहिले खूप वेळ. हाताने कपडे धुताना कपडा वर धरुन दगडावर आपटतात तशी आपटली बर्याचदा. त्याने मस्त इलॅस्टिसिटी आली. मग जरा जास्त तेलाचा हात लावून झाकून ठेवली.

ह्यावेळी डाळ शिजवून मग लगेच पुरणयंत्रात वाटून घेऊन मग शिजायला ठेवली. हेच काय ते जरा बदल. बाकी कृती इथे सांगितली आहे तशीच. आता पुढच्या वर्षीपर्यंत ह्या कामाच्या वाटेला काही जाणार नाही.
सायो, खूपच छान झाली आहे पू पो
सायो, खूपच छान झाली आहे पू पो. भाजली छान गेली आहे , रंग ही छान आलाय, मऊ झालीय ते कळतच आहे फोटो पाहून.

आता पुढच्या वर्षीपर्यंत काय काय केलं ते लक्षात ठेव मात्र.
ममो,नोटपॅडमध्ये लिहून ठेवलंय
ममो,नोटपॅडमध्ये लिहून ठेवलंय आणि स्मृतीभ्रंश झाल्यास ह्या बीबीवर येता येईल. फक्त इथे लिहिलंय हे कोणीतरी मला सांगावं लागेल.
सायो पुरण काठोकाठ, कडेपर्यंत
सायो पुरण काठोकाठ, कडेपर्यंत भरलयस. कळते आहे. दॅट इज लिटमस टेस्ट!
हो पुरण भरपूर भरलं होतं.
हो पुरण भरपूर भरलं होतं. पुरेसं होतंही त्यामुळे हात आखडता घ्यावा लागला नाही.
सायो ,मस्त खमन्ग दिसतेय पुपो.
सायो ,मस्त खमन्ग दिसतेय पुपो.
>>>>हो पुरण भरपूर भरलं होतं.
>>>>हो पुरण भरपूर भरलं होतं. पुरेसं होतंही त्यामुळे हात आखडता घ्यावा लागला नाही.
मग ती पुपो यशस्वी आहे. उगाच चिकीत्सा करु नकोस
लेट पोस्ट - गुढीपाडव्याला परत
लेट पोस्ट - गुढीपाडव्याला परत केल्या होत्या. सायोने टेम्प्ट केले
आता श्रावणात करेन परत असा कॉन्फिडन्स आलाय.
यावेळी जमल्या बर्यापैकी, कणीक चाळणे स्किप करून चालणार नाही असं वाटलं.
फारच सुंदर झाल्या आहेत. रंग
फारच सुंदर झाल्या आहेत. रंग छान आलाय आणि दिसतायतच मऊ मुलायम.
मनीमोहोर, तुमचे प्रतिसाद बघून
मनीमोहोर, तुमचे प्रतिसाद बघून माझ्या बालवाडीच्या बाई आठवतात. आम्ही काही वेडेवाकडे चित्र काढले तरी त्या इतक्या कौतुक करायच्या की आपण खरेच खूप भारी केले असे वाटायचे... मग पुढचे चित्र काढायला हुरूप यायचा..
मस्त ग अन्जली ! छान जमल्या
मस्त ग अन्जली ! छान जमल्या आहेत.
थँक्यू
थँक्यू
आम्ही काही वेडेवाकडे चित्र काढले तरी त्या इतक्या कौतुक करायच्या की आपण खरेच खूप भारी केले असे वाटायचे... मग पुढचे चित्र काढायला हुरूप यायचा.. >>>>>>>>>+++!११११
आम्ही काही वेडेवाकडे चित्र
आम्ही काही वेडेवाकडे चित्र काढले तरी त्या इतक्या कौतुक करायच्या की आपण खरेच खूप भारी केले असे वाटायचे... मग पुढचे चित्र काढायला हुरूप यायचा.. >> असं अजिबात नाही.
पोळी खरच खूप छान दिसतेय.
मस्त दिसतेय पुपो अंजली.
मस्त दिसतेय पुपो अंजली.

गोड उपमा धनवन्ती!
आम्ही काही वेडेवाकडे चित्र
आम्ही काही वेडेवाकडे चित्र काढले तरी त्या इतक्या कौतुक करायच्या की आपण खरेच खूप भारी केले असे वाटायचे... मग पुढचे चित्र काढायला हुरूप यायचा.. >>>> +1
आम्ही काही वेडेवाकडे चित्र
आम्ही काही वेडेवाकडे चित्र काढले तरी त्या इतक्या कौतुक करायच्या की आपण खरेच खूप भारी केले असे वाटायचे... मग पुढचे चित्र काढायला हुरूप यायचा.. >> आणि आपण एखादी गोष्ट आवडत नाही किंवा जमणार नाही म्हटलं की मग जमेल तर सोप्प आहे
आणि हो, इथे सगळ्यांच्या
आणि हो, इथे सगळ्यांच्या पोळ्या खूप छान दिसत आहेत...
त्यामुळे तर कौतुक तो बनता ही हैं..
अंजली, पुपो छान दिसते आहे.
अंजली, पुपो छान दिसते आहे.
Pages