
कणकेच्या पुरणपोळ्या ...
महाराष्ट्रीयन घरांमध्ये होळी साठीचे पक्वान्न म्हणजे पुरणाची पोळी. आज वेळे अभावी पुरणाच्या पोळ्या बहुतेक घरात विकत आणल्या जातात. विकतच्या पोळ्या जरी चांगल्या असल्या तरी त्यात पारी साठी मैदाच वापरला जातो. कणीक वापरून केलेल्या पोळ्या जास्त स्वादिष्ट आणि हरवाळ होतात. अजिबात मैदा न वापरता नुसत्या कणकेच्या पातळ, मऊ, हरवाळ पोळ्या कशा करायच्या हे होळी होऊन गेली आहे तरी इथे लिहून ठेवत आहे. पुराणावर जास्त लक्ष केंदीत न करता फोकस कणकेवर आहे.
पुरण करण्यासाठी
एक वाटी चणा डाळ , एक वाटी गुळ अथवा तुम्ही नेहमी घेता तेवढा , वेलची, जायफळ , किंचित मीठ आणि एक चमचा तेल.
पारीसाठी
वस्त्रगाळ कणीक एक वाटी , थोडं तेल आणि मीठ.
लाटण्यासाठी
तांदळाची पिठी.
एक वाटी चणा डाळ त्यात चमचाभर तेल घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. त्यातील पाणी काढून टाकून नंतर त्यात गुळ घालून कालथा पुरणात उभा राही पर्यंत शिजवा. त्यात चवीपुरतं मीठ आणि स्वादासाठी वेलची जायफळ घालून आणि गरम असतानाच वाटून घ्या. पुरण पूर्ण गार झाले पाहिजे पोळ्या करताना.
कणीक
१) कणीक पातेल्याला मलमल च फडक बांधून त्यावरून वस्त्रगाळ करून घ्या. म्हणजे कोंडा सगळा वर राहिल. हे वाचायला जरी कठीण, वेळखाऊ वाटत असलं तरी खूप वेळ लागत नाही त्याला. मलमल च्या कापडातून पटकन वस्त्रगाळ करून होते कणीक.
२) कणके मध्ये चवीनुसार मीठ घालून पोळ्याना भिजवतो त्या पेक्षा किंचित घट्ट कणीक भिजवा आणि तो गोळा एक फडक्यात बांधून ती पुरचुंडी पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवा दोन तीन तास.
३) दोन तीन तासांनी कणकेचा गोळा पाण्याबाहेर काढून ती परातीत घेऊन थोडं तेल घालून चांगली मळून घ्या. वाटल्यास पाण्याचा हात ही लावा मळताना. पाण्यात भिजवल्यामुळे कणीक मऊ पटकन होते जास्त मळावी लागत नाही. कणकेची आणि पुरणाची कन्सिस्टंसी सेम असायला हवी म्हणजे लाटताना पुरण विनासायास कडे पर्यंत पसरत.
४) पोळी लाटताना वरून लावायला कणीक न वापरता नेहमी तांदळाची पिठी च वापरा. त्यामुळे पोळी मस्त फिरते पोळपाटावर.
५) कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट तरी पुरणाचा गोळा घ्या. वरील प्रकारे कणीक भिजवली असेल तर हे अजिबात कठीण नाही. कणीक वरील पद्धतीने भिजविली असेल तर पोळी सहज लाटता येते अजिबात फुटत नाही मैदा नसला तरी.
इतकी पातळ लाटली आहे की फडक्याच डिझाइन दिसत आहे.

६) पोळपाटाला मलमल किंवा सुती फडकं बांधा व त्यावर poli लाटा . त्याने पोळी पोळपाटाला चिकटत नाही अजिबात. फडकं न वापरता बटर पेपर ठेवला पोळपाटावर तरी तोच रिझल्ट मिळतो. तसेच बटर पेपर सकट उचलून तव्यावर टाकता येते पोळी हा बटर पेपरचा आणखी एक फायदा. जे सोयीचं वाटेल ते घ्या पण डायरेक्ट पोळपाटावर पोळी कधी लाटू नका.
७) लागेल तशी पिठी घेऊन हलक्या हाताने पोळी लाटा. आणि अलगद पणे तव्यावर टाकून मध्यम गॅस वर पोळी भाजून घ्या. मस्त मऊ, हरवाळ स्वादिष्ट पोळ्या तयार होतात.
बदामी रंगाच्या स्वादिष्ट पुरणपोळ्या तयार
१) वस्त्रगाळ कणीक च घ्याची आहे पण हे तुम्ही चार दिवस आधी ही करू शकता. पुरण ही दोन दिवस आधी करून फ्रीज मध्ये ठेवू शकता म्हणजे आयत्या वेळी ताण येणार नाही.
२) पाण्यात भिजवल्यामुळे कणीक एकदम मऊ होते, जास्त मळावी लागत नाही आणि तेल ही जास्त घालावे लागत नाही मैद्यात घालावे लागते तसे.
मस्त पुरणपोळ्या!
मस्त पुरणपोळ्या!
मस्तच झाल्या आहेत. माम
मस्तच झाल्या आहेत. माम म्हणाली आहे तसं पुरण अगदी कडे पर्यंत गेलं आहे आणि आतलं पुरण दिसतय एवढ्या पातळ झाल्या आहेत.
बाकी पुपो करतात पसारा होतोच आणि पिठाच रामायण ही होतंच. त्यामुळे ठीकच आहे. माझा तर भाकरी करताना ही खूप पसारा होतो.
केवढं पुरण भरलयस एवढ्याश्या
केवढं पुरण भरलयस एवढ्याश्या लाटीत. कशी काय फुटत नाही देव जाणे.
हो ना ठासुन भरलय अगदी तरी
हो ना ठासुन भरलय अगदी तरी पोळी फुटली नाही म्हणजे कणीक अगदी छान भिजली आहे..तेवढा पसारा होतोच !!
मस्त पुरणपोळ्या!
मस्त पुरणपोळ्या!
९, अल्काराजवर पुरणपोळ्या
९, अल्काराजवर पुरणपोळ्या लाटल्यास ???? कुफेहीपा !
पण जाऊ दे त्याच्या त्या वाढलेल्या केसांमुळे आणि विचित्र जर्सीमुळे अत्यंत कळकट आणि छपरी दिसतोय तो..
आणि हो, पुपो छान दिसत आहेत..
मस्त दिसतेय पुरणपोळी प्रज्ञा.
मस्त दिसतेय पुरणपोळी प्रज्ञा.
हा असा साधा क्रॉप करून आणि स्टॅण्डर्ड फिल्टरने एडिट करून द्यायचा फोटो:

अधिक चांगल्या प्रेझेंटेशनसाठी वामनरावांचा क्लास लावावा, त्यांनी क्लास सुरू करावा.
सगळ्यांचे मनापासून आभार!
सगळ्यांचे मनापासून आभार!
पराग
मानवदादा, माझा आळशीपणासुद्धा आडवा येतो
तुम्ही एकदम परफेक्ट करून दिलात!
पण पुढच्या वेळी (आता मोदक करीन तेव्हा...) हे नक्की करीन.
काय सुंदर!!
काय सुंदर प्रज्ञा!!
अश्या पुरणपोळ्या करणाऱ्या सर्व सुगरणींना एक मोठा दंडवत.
मस्त दिसतायत पुरणपोळ्या
मस्त दिसतायत पुरणपोळ्या प्रज्ञा! पराग, अल्काराझ
माझ्याकडेपण असाच सेम तवा आहे. स्टाल (Stahl) चा ना?
ममोताई ,तुमच्या पद्धतीने
ममोताई ,तुमच्या पद्धतीने केलेली पुरणपोळी. हा श्रावणी शुक्रवारचा मेनू . दरवर्षी श्रावणात आणि होळीला तुमची आठवण येतेच. खूप खूप धन्यवाद या पाककृतीसाठी .
मस्त दिसतेय पुरण पोळी.
मस्त दिसतेय पुरण पोळी.
पुरणपोळी फारच सुंदर झालेली
पुरणपोळी फारच सुंदर झालेली दिसतेय. थाळी ही छान दिसतेय.
दरवर्षी श्रावणात आणि होळीला तुमची आठवण येतेच. >> हे भारी आवडल आहे. त्यासाठी खूप धन्यवाद.
पुरणपोळी अगदी आई किंवा
पुरणपोळी अगदी आई किंवा आज्जीने केल्यासारखी मस्त दिसते आहे.
सुबक पुरणपोळी प्रज्ञा! जितका
सुबक पुरणपोळी प्रज्ञा! जितका पसारा जास्त, तितकी पदार्थात चव उतरते
असं आपलं लॉजिक बनवावं..
छान रेसिपी !! पोळ्या खूपच
छान रेसिपी !! पोळ्या खूपच सुंदर दिसताहेत आता ताटात घेऊन त्यावर दूध ओतून खायला घ्यावी असे वाटत आहे.
मीही जवळपास असंच करते मात्र वस्त्रगाळ नाही करून घेत माझ्याकडे नाहीये असं मलमलचं छान कापड. आणि पोळपाटावर कागद / कापड पण नाही ठेवत पण ते करता येईल नेक्स्ट time तसे करून बघते..
कणिक पाण्यात टाकायची यावर माझा खूप वर्ष विश्वास नव्हता एक दिवस मनाचा हिय्या केला आणि आयुष्य सोपे झाले.
मागे एकदा vb नावाच्या ID ने असे share केलेले अनेक वर्षांपूर्वी ते वाचून मला कसेसेच झालेले..
खूप सुरेख दिसतेय पुरणपोळी!
खूप सुरेख दिसतेय पुरणपोळी! आणि ते ताटही किती सुरेख सजवलंय!
(मी वस्त्रगाळ नाही करत कणीक, सपीटीच्या चाळणीने चाळुन घेते आणि पाण्यात बुडवून मुरल्यावर चांगली तिंबून तार सुटली की पोळपाटाला रुमाल बांधते लाटायला सोपं जावं म्हणून. रुमाल नेहमीच बांधत होते, पण मैदा घालत होते तो आता पूर्ण बंद झाला. या पद्धतीमुळे जरा कॉन्फिडन्स आलाय.)
ह्या आधी कुठे लिहिलं होतं का
ह्या आधी कुठे लिहिलं होतं का हे ते लक्षात नाही.
पुरणपोळी भाजताना तव्यावर टाकली की जास्त वेळा उलट पालट तर करायची नाहीच. एका बाजूने पूर्ण भाजली गेली की उलटवून दुसऱ्या बाजूने भाजायची .
पण तव्यावर टाकली , थोडी फर्म झाली की तिथल्या तिथेच तिला जरा हलवत राहायची सगळीकडून. असे केल्यामुळे सगळीकडून सारखी भाजली जाते. हलवली नाही तर गॅस ची आच मध्ये जास्त असते त्यामुळे मध्ये ती भाजली जाते आणि बाजूला नीट भाजली जात नाही.
तसेच गॅस अगदी मंद नाही आणि अगदी गरम नाही असा मध्यम ठेवायचा.
खूप सुरेख दिसतेय पुरणपोळी!
खूप सुरेख दिसतेय पुरणपोळी!
अरे ओ सांभा! कितने सुग्रण आय
अरे ओ सांभा! कितने सुग्रण आय डी है माबो पे?
पचासो सरकार!
वोह पचासो और हम दस, मिल बांट्के पुपो खाएंगे |. हाहाहा
त्या दस मधे मी पण एक.
त्या दस मधे मी पण एक.
तशी मी गुणाची पण चाळणं गाळणं फडकी/ कपडा वापरण ह्या गुणांना लागणाऱ्या patience ची कमतरता.
Pages