
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है 
पिछले दोनूं जुम्मे के क़िस्से
पिछले दोनूं जुम्मे के क़िस्से पसंद किएवास्ते थँक्यू है दोस्त लोगां.
कुणी वाचले की नाही हे समजायला दुसरा मार्ग नाही मायबोलीवर. पण नेहेमीच्या हक्काच्या स्मायली/ कॉमेंटस नाही आल्या तर चुकल्या-चुकल्यासारखे वाटते.
आज का किस्सा थोडे वखत बाद लिखतुं
आज का खुदलिखा हैदराबादी
आज का खुदलिखा हैदराबादी किस्सा :
छोटे फजलू को घर में खाला-खालू आयेवे पसंद नै. लेकिन एक मर्तबा खाला-खालू आईच गए.
अम्मी बोले: फजलू, मेहमान आए, उनके वास्ते क्यातोबी आर्डर कर दे
अपना फजलू बोला: हौ अम्मी
थोडे टाइम बाद अम्मी पुच्छे : क्या मँगाया रे तू फजलू ?
फजलू बोल रा : ओला !
# Gen Z Series फजलू की बातां
(No subject)
का रे बाबा आत्याला परत
का रे बाबा आत्याला परत पाठवतोस? माहेरपणाला आलीये ना ती! नॉटी फझलू. रट्टे लावायला पाहीजेत!
बाय द वे फुफा- फुफी आणि खाला-खालू मध्ये काहीतरी फरक आहे. मोठी बहीण, लहान बहीण का अन्य काहीतरी.
आयडिया चांगलीये
आयडिया चांगलीये
ओला कोरडा जे मिळेल ते मागवा आणि पाठवा ते पार्सल
कुणी वाचले की नाही हे समजायला
कुणी वाचले की नाही हे समजायला दुसरा मार्ग नाही मायबोलीवर. पण नेहेमीच्या हक्काच्या स्मायली/ कॉमेंटस नाही आल्या तर चुकल्या-चुकल्यासारखे वाटते.>> सगळे किस्से नेहमीच वाचते आणि आवडतात पण.
मस्त चालली अनिंद्य # Gen Z
मस्त चालली अनिंद्य # Gen Z Series
खाला म्हणजे मावशी आणि फुफी
खाला म्हणजे मावशी आणि फुफी म्हणजे आत्या.
बाकी फजलू एकदम स्ट्रेट फॉरवर्ड!
ओह ओके देवकी. धन्यवाद.
ओह ओके देवकी. धन्यवाद.
ओला
ओला
GenZ मालिका भारीये. हैदराबादी लहेजा आणि GenZ attitude दोन्ही मस्त पकडता तुम्ही, अनिंद्य.
खाला के लिये ओला जबरी
खाला के लिये ओला

जबरी
(No subject)
मध्यंतरी काही दिवस मायबोलीवर
मध्यंतरी काही दिवस मायबोलीवर आले नाही. त्यामुळे बरंच काही वाचायचं शिल्लक होतं. आज आल्यावर सगळे किस्से वाचले. माझी आठवण काढून 'जेन झी' किस्से लिहिल्याबद्दल अनिंद्य ह्यांना धन्यवाद.
असेच गमतीदार. खट्याळ किस्से येऊ द्या!!
हाँ. आता कसं भरलेलं घर वाटतयं
हाँ. आता कसं भरलेलं घर वाटतयं इथे. ऐसी हा-हा-ही-ही मेंच मजा रैता ना. सब कू भौत थँक्यू है !
Gen Z खरेच फार practical आहेत. नो नॉनसेन्स, उगाच पसारा नाही त्यांच्यात. “Our vibes don’t match” हे कारण पुरेसे असते समोरच्याचे तोंड बघायचे नसेल तर 😀
अनया, तुमच्या प्रतिसादाची मला विशेष प्रतीक्षा होती. या नवीन Gen Z सिरीज़ ची सुचवणी तुमचीच. तुम्हाला डबल थँक्यू.
ईद के खुशनुमा मौके पे कुछ
ईद के खुशनुमा मौके पे ये लतिफा पढो दोस्त लोग...
.
.
.
आफरीन : क्या करते तुम?
अहमद: बडे भाई को बिजनेस मे साथ देताऊं...
आफरीन : वॉव! और बडे भाई क्या बिजनेस करते तुम्हारे?
अहमद: वो ऑटो चलाते होर में पुकारता हुं, ' पंजागुट्टा, आमीर पेट, बेगमपेट........ दस दस रुपिया ....!'...
(No subject)
हाहाहा
हाहाहा
ए आय ने जॉब जायची भिती नाही, अहमदला
पंजागुट्टा, आमीर पेट, बेगमपेट
पंजागुट्टा, आमीर पेट, बेगमपेट........ दस दस रुपिया ....!'.. >>
है शाब्बास !
है शाब्बास !
अहमद तो बिज़नेस एम्पायर का Joint MD बन गया 😀
(No subject)
(No subject)
छान!!
छान!!
भारीच
भारीच
मला नाही वाटत आफरीन ला काही
मला नाही वाटत आफरीन ला काही प्रॉब्लेम येईल.
श्रमप्रतिष्ठा अन ताटात अन्न आणायची क्षमता, हा मूळ मुद्दा आहे.
बडे भाई पाकीटमारी करते और मै लोगो का ध्यान बटाता हूं वगैरे बेकायदेशीर उद्योग तर करीत नाहिये ना?
ऑल्सो, १००% मार्क्स टु द स्वॅग! बिझनेस मे हाथ बटाता..
येस अलीबाबा.
येस अलीबाबा.
मलाही हा जोक लिहिल्यावर सेम असेच वाटले होते...!
थ्री चिअर्स फॉर अहमद !
शौकत मियां कु बिजली का बिल २०
शौकत मियां कु बिजली का बिल २०,००० रुपये का आया.
गुस्से में वो बिजली की दफ्तर में पहुंच गये होर वहा के अफसर से पूछा,' क्या रे बाबा, पुरे जहन्नुम की आग मेरे मीटर से जलारे क्या?
हफसर: नहीं चचा, ये जो तुम घर को जन्नत समज के दिन रात एसी चला रे न, उसका बिल है!
दोघंही हैद्राबादी त्यामुळे
दोघंही हैद्राबादी त्यामुळे कोणी कोणाचा शब्द पडू देण्याची शक्यताच नाही.
सगळे किस्से धमाल
सगळे किस्से धमाल
Submitted by स्वानंदी१ on 27
Submitted by स्वानंदी१ on 27 March, 2026 - 15:01
आज जुम्मा है तो मेरी जानिब से
आज जुम्मा है तो मेरी जानिब से ये खुदलिखा नया हैदराबादी क़िस्सा पेश करतुं :
अपने फेवरेट कपल की बातां हो रई.
- शब्बो, जब हमारा झगड़ा होता तब तुम कुछ ना बोलते, ज्यादा गाली भी नै, झाड़ू-चप्पलां भी नै.. फिर तुम तुम्हारा ग़ुस्सा हौर frustration कैसे निकालते ?
- घर के गुसलखाने- टॉयलेटां साफ़ करकू निकालती मैं गुस्सा. चमका देतुं पूरे टॉयलेटां 😇
- वल्लाह, टॉयलेटां साफ़ करकू गुस्सा चला जाता बोलरै ?
- हौ
- वो कैसे ?
- नामुराद, तेरे टूथब्रश से घिसतूं मै पूरा टॉयलेट… 🤮
Pages