Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केरळचे नाव म्हणे केरळम
केरळचे नाव म्हणे केरळम करणारेत
केरला फाईल्स २ वरुन तर लई मज्जा येतेय
कोर्टाने दारू घोटाळ्यातून
कोर्टाने दारू घोटाळ्यातून केजरीवाल आणि सिसोदियांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांना विनाकारण जेल मध्ये जावं तर लागलंच पण दिल्लीची सत्ता पण गमवावी लागली.
नुसतेच निर्दोष नव्हे तर
नुसतेच निर्दोष नव्हे तर पेटिशन डिस्चार्ज केले आहे.
याचा अर्थ मुळात तो खटला चलवावा इतकाही पुरावा नव्हता!
सीबीआय ला ही तपास अधिकार्याचीच चौकशी करायला सांगितले आहे.
ट्रायल कोर्ट च्या जज ना दीर्घायुष्य लाभो !
इतके तोंड काळे झाल्यावर थोडेसे आत्मपरिक्षण करतील ही अपेक्षा व्यर्थ आहे.
हायकोर्टात अपील करायची तयारी सुरू आहे 'आपले' जजही निवडले आहेत अपील करायला !
केजरीवाल यांच्यावर इतर काही विषयावर टीका होऊ शकेल पण त्यांनी कारभार चांगला केला होता हे खरे आहे.
कधी नव्हे ते लोक खाजगी शाळॅतून सरकारी शाळेत घालत होते मुलांना.
विद्यमान मुख्यमंत्र्यांचा कारभार पतिदेवच हाकतात !
विकु, आप , केजरीवाल आणि
विकु, आप , केजरीवाल आणि मंडळी कालपासून काँग्रेसवर जोरात टीका करू लागलेत. अगदी पोरकट.
निवडणुका आल्या की तो गुरमीत राम रहीम बाहेर येतो, त्यातलाच प्रकार नसेल कशावरून?
भरत,
भरत,
हे, हीही शक्यता आहेच. केजरीवाल यांचे वर्तन अनेकदा बीजेपी टीम बी सारखे असते !
इराण भारताचा मित्र देश.
इराण भारताचा मित्र देश. महत्त्वाचा व्यापारी भागीदार. त्याच्यावर हल्ला झाला, त्याच्या प्रमुखाला ठार केलं याबद्दल भारत सरकारने ब्र काढलेला नाही.
तेच यु ए ई मधल्या अमेरिकी की ब्रिटिश तळावर इराणने हल्ला केला तर त्याबद्दल निषेध केला आहे.
ऐसे कैसे विश्वगुरू बनेगा रे तू?
अमेरिकेने भारताला रशियाकडून
अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल आयात करण्यासाठी ३० दिवसांची सूट दिली आहे. केव्हढे ते औंदार्य.
काही दिवसां पूर्वी अमेरिकेने " भारत रशियाकडून तेल घेणार नाही, व्हेनेझ्युएला कडून घेणार... " असे जाहिर केले होते.
भारताने तेल आयात कुणाकडून करावी हे मोदी ठरवत नाही तर अमेरिका/ ट्रम्प ठरवतो असे हास्यास्पद चित्र दिसत आहे. १४५ कोटी लोकांचा देश पण तेल आयातीचे निर्णय ट्रम्प घेतो.
अब की बार ट्रंप सरकारचा अर्थ
अब की बार ट्रंप सरकारचा अर्थ आता कळतोय
भारताने रशियन तेल आयात
भारताने रशियन तेल आयात थांबवली कुठं होती? ट्रम्प आणि त्याचे मंत्री नेहमी सारखं मुर्खा सारखी स्टेटमेंट देत असतेत.
जी गोष्ट थांबवलीच नव्हती ती परत चालू कशी करायची.
As of March 2026, India is
As of March 2026, India is recalibrating its massive Russian crude imports following intense US pressure, reducing reliance from 33% in May 2025 to ~19% in early 2026
Following 25% penal tariffs by the Trump administration in August 2025 (later lifted), India committed to curbing Russian oil, lowering January 2026 imports to 44-month lows.
मूर्खासारखं म्हणजे जयशंकर well the us is n the america fame की mathematics gravity fame पियुष गोयलसारखं?
भारताने रशियन तेल आयात
भारताने रशियन तेल आयात थांबवली कुठं होती? ट्रम्प आणि त्याचे मंत्री नेहमी सारखं मुर्खा सारखी स्टेटमेंट देत असतेत.
जी गोष्ट थांबवलीच नव्हती ती परत चालू कशी करायची.>>>
खरच की. मोदीजी ना सगळेच सगळ्यांच्या आधीच माहिती असत. युद्ध सुरू होणार मग ट्रम्प oil खरेदी साठी परवानगी देणार हे त्यांना माहीत होतच. म्हणून त्यांनी खरेदी थांबवली नव्हतीच.
नवीन ऑईल ऑर्डर्स प्रीमियम देऊन घ्यावी लागणार आहे, आधी जो डिस्काउंट मिळत होता तो मिळणार नाही. अर्थात पुतिन ला आधीच सगळ माहित नसतं म्हणून महाग ऑईल घ्यावं लागणार.
फेब्रुवारी मध्ये आपली रशियन
फेब्रुवारी मध्ये आपली रशियन तेल आयात वाढून ३०% पर्यंत झाली होती. जानेवारीत १९% पर्यंत खाली झालेली.
पण ट्रम्पने तर २ फेब्रुवारीलाच भारत अमेरिका डील जाहीर केलेली. पण प्रत्यक्षात भारत अमेरिका डील अजून झालीच नाही.
म्हणजे न झालेल्या डील नंतरही आपण रशियन तेल विकत घेणं थांबवले नाहीच तर उलट वाढवले आहे. अजून एक दोन महिने थांबावे लागेल कदाचित जुन्या ऑर्डर्स अजून येत असतील.
अमेरिकन कोर्टाचे आभार माना.
अमेरिकन कोर्टाचे आभार माना.
आणिज्ञडील झाली नव्हती, तर मोदींचा सत्कार कशासाठी केला?
ट्रम्प आणि त्याचे मंत्री
ट्रम्प आणि त्याचे मंत्री नेहमी सारखं मुर्खा सारखी स्टेटमेंट देत असतेत.>>>> ओहो हो हो....असं असेल तर आपले छप्पन इंची विश्वगुरु आणि लेजर आय परराष्ट्र मंत्री पुढे येऊन खडसावत का नाहीत तात्याला एकदाचं?? जसं कॅनडाने ट्ंपच्या आणि त्याच्या नेत्यांच्या बडबडीवर केलं.... डेन्मार्कने केलं..... अगदी गेला बाजार जसं देशांतर्गत प्रत्येक हगल्या-मुतल्याला ट्विट करतात तसं या बाबीवर निदान ट्विटस करुन प्रत्यूत्तर दिलं असतं तरी तमाम भारतियांना नाही, पण सोमीवरच्या उरल्या सुरल्या भक्तुल्ल्यांना किमान काडीचा आधार मिळाला असता अशा रोजच्या गटांगळ्या खाताना.
असं असेल तर आपले छप्पन इंची
असं असेल तर आपले छप्पन इंची विश्वगुरु आणि लेजर आय परराष्ट्र मंत्री पुढे येऊन खडसावत का नाहीत तात्याला एकदाचं??
प्रतिउत्तर ट्रम्पचा इगो न दुखावण्याच आपलं धोरण आहे. पण त्याच वेळी ट्रम्पच्या मागण्या मान्यही करायच्या नाहीत. ट्रम्प गेली वर्षभर रशियन तेला साठी आपल्याला धमक्या देत आहे, पण आपण थेट उत्तर न देता रशियन तेल घेतच आहोत. भारत अमेरिका डील झाल्याची घोषणा केल्यानंतर रशियन तेलाची आवक कमी न होता वाढलेली आहे.
रात्रीचे चांदणे यांच्या
रात्रीचे चांदणे यांच्या सगळ्या पोस्ट्स तर आवडतातच, पण हा आयडी कसा सुचला असेल अशी एक उत्सुकता आहे. कदाचित रात्र आणि चांदणं यांच्या अद्वैताबद्दल काहीतरी म्हणायचं असेल. मायबोलीच्या परंपरेनुसार त्यांना चिडवण्यासाठी एखाद्या खोडसाळाने 'दिवसाचे चांदणे' असा आयडी अजून कसा घेतला नाही, असा प्रश्न पडला आहे.
<< प्रतिउत्तर ट्रम्पचा इगो न
<< प्रतिउत्तर ट्रम्पचा इगो न दुखावण्याच आपलं धोरण आहे. पण त्याच वेळी ट्रम्पच्या मागण्या मान्यही करायच्या नाहीत. ट्रम्प गेली वर्षभर रशियन तेला साठी आपल्याला धमक्या देत आहे, पण आपण थेट उत्तर न देता रशियन तेल घेतच आहोत. >>
------ सपशेल लोटांगण घालणे हे धोरण आहे.
ट्रम्प शपथविधी साठी मोदींना आमंत्रण मिळावे म्हणून जयशंकर चार दिवस वॉशिंग्टन मधे उंबरढे झिजवत होते. काही उपयोग झाला नाही. आमंत्रण मिळाले नाही. भक्ताडे म्हणाले " दोन नेत्यांअधे नंतर मोठी शिखर परिषद होणार आहे , शपथविधी सोहळा महत्वाचा नाही.... " .
चीनला आमंत्रण मिळाले होते, पाठिचा कणा दाखवत त्यांनी ते आमंत्रण नाकारले.
शिखर परिषद राहिली लांब... पत्रकार परिषदेत मोदी शेजारी असतांना ट्रम्प भारताचा अपमान करतो, आणि मोदी तोंडही उघडत नाही - न दुखावणे हे धोरण असेल.
भारत - पाक युद्ध विरामाची घोषणा सर्वात आधी ट्रम्पने केली. युद्धविरामाचा निर्णय ट्रम्पने घेतला आणि ५० वेळा तसे जाहिरपणे सांगितले. भारताच्या पंतप्रधानांनी एक वेळा तरी यावर भाष्य करायला हवे होते. हत्याकांड करणारे मोकळेच होते, युद्धाचा उद्देश साध्य झालेला नव्हता पण ट्रम्पला न दुखावणे हे धोरण असेल म्हणून युद्ध थांबविले.
अमेरिकेत अवैध मार्गाने प्रवेश केलेल्या शेकडो भारतीयांना हातापायात साखळदंड घालून आणि अत्यंत अपमानास्पद रितीने लष्करी विमानाने
अहमदाबादअमृतसर येथे सोडले. गुजराथ ( तसेच पंजाबचे) राज्याचे लोक भरमसाठ असतांनाही विमान अहमदाबादला न नेता अमृतसरला नेले. मग तिथून अहमदाबादला.इतर देशांनी लष्करी विमाना उतरविण्यास नकार दिला होता. न दुखावणे हे धोरण असल्याने मोदींनी चकार शब्द काढला नाही.
"The future of India is for
"The future of India is for us to decide and we will find out in India. I don't think it's anybody else's business." माजी पंतप्रधान म्हणाल्या होत्या.
https://youtube.com/shorts/MUJ-Gf2EnGQ?si=QxlD5GXn53YSFwtZ
साजिरा, आठ वर्षांपूर्वी मिसळ
साजिरा, आठ वर्षांपूर्वी मिसळ पाव वरती खात उघडताना "रात्रीचे चांदणे" हा आयडी घेतला होता. एवढा विचार नव्हता केलेला. तिथ स्वतःचे नाव नसलेलेच जास्त आयडी होते. म्हणून काहीतरी पाहिजे म्हणून घेतला.
Success of PM's strategic oil
Success of PM's strategic oil diplomacy', BJP hails 30-day waiver to purchase Russian oil
NEW DELHI: (Mar 6) After the US announced that it is issuing a temporary 30-day waiver to allow Indian refiners to purchase Russian oil, the BJP on Friday termed the development a success of the “strategic oil diplomacy" under Prime Minister Narendra Modi, and said it's a “big egg on the face of anti-India Rahul Gandhi and the Congress”.
https://www.ptinews.com/story/national/success-of-pms-strategic-oil-dipl...
सपशेल लोटांगण घालणे हे धोरण
सपशेल लोटांगण घालणे हे धोरण आहे.
सपशेल लोटांगण नाही म्हणता येणार.
जर आपण रशियन तेल विकत घेणं थांबवलं असत तर हे म्हणता आलं असतं. डीलच्या घोषणे नंतर तेल आयात कमी न होता वाढलेलीच आहे.
ट्रम्पने आपल्याला F35 ची ओफर दिलेली. त्याचा तर आपण विचार सुद्धा केला नाही. मोदी कानडा मध्ये गेल्यानंतर ट्रम्पने अमेरिका भेटीच निमंत्रण दिले होत तेही मोदी नी तात्काळ नाकारलं.
एवढंच नाही तर op सिंदूर असो किंवा रशियन तेल असो, प्रत्येक वेळी आपण ट्रम्पला उत्तर दिलंय. पण ते पंतप्रधान, परराष्टमंत्री किंवा संरक्षण मंत्री यांनी न देता तुलनेणं कमी महत्वाच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे.
याच कारण म्हणजे ट्रम्प हा प्रचंड इगो असलेला माणूस आहे आणि दुसरं म्हणजे तो कसाही असला तरी आहे एका महासत्तेचा प्रमुख.
त्यामुळे त्याला त्याला दुखवायचंही नाही पण त्याच वेळी त्याच्या मागण्याही मान्य करायच्या नाहीत हेच आपलं धोरण आहे.
आणखी महत्वाचं म्हणजे रशिया आपला कितीही चांगला मित्र असेल पण आपल्या अर्थशास्त्रामध्ये तो काही अमेरिकेची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे रशियन तेला साठी आपल्याला आज ना उदया लवचिक भूमिका घ्यावी लागणार आहे.
{ट्रम्पने अमेरिका भेटीच
{ट्रम्पने अमेरिका भेटीच निमंत्रण दिले होत तेही मोदी नी तात्काळ नाकारलं.}
झेलेन्स्की, द आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना कसं वागवलं ते बघितल्यावर जायची हिंमत कशी होईल?
या दोघांनी खणखणीत उत्तरं दिलं
आमचे विश्वगुरू हात बांधून उभे राहिले असते.
ट्रम्पने तर २ फेब्रुवारीलाच
{ट्रम्पने तर २ फेब्रुवारीलाच भारत अमेरिका डील जाहीर केलेली. पण प्रत्यक्षात भारत अमेरिका डील अजून झालीच नाही.
म्हणजे न झालेल्या डील नंतरही>>>}
३ फेब्रुवारीची बातमी
Prime Minister Narendra Modi today said that India’s landmark trade agreement with the United States is the result of sustained patience. He said this while addressing NDA MPs at the Parliamentary party meeting today. NDA MPs felicitated Prime Minister Narendra Modi for the landmark India-US trade deal during the NDA Parliamentary party meeting at the Parliament House complex
रात्रीचे चांदणे ह्यांचे
रात्रीचे चांदणे ह्यांचे प्रतिसाद म्हणजे एकंदरीत सोशल मिडियावरील भक्तुल्यांच्या विचारसरणीचा लसावी आहे
भ्रमर ह्यांचे प्रतिसाद म्हणजे
भ्रमर ह्यांचे प्रतिसाद म्हणजे एकंदरीत सोशल मिडियावरील गुलामांच्या विचारसरणीचा लसावी आहे.
अरेच्चा, नेत्या बोले तात्या
अरेच्चा, नेत्या बोले तात्या लागे झालं की काय?
<< एवढंच नाही तर op सिंदूर
<< एवढंच नाही तर op सिंदूर असो किंवा रशियन तेल असो, प्रत्येक वेळी आपण ट्रम्पला उत्तर दिलंय. पण ते पंतप्रधान, परराष्टमंत्री किंवा संरक्षण मंत्री यांनी न देता तुलनेणं कमी महत्वाच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. >>
-------- अमेरिकन राष्ट्रध्याक्षाने ५० वेळा सांगितले त्याच्या आदेशानुसार / पुढाकारामुळे भारत- पाक युद्धविराम झाला. एरवी घसा फोडून, हातवारे करुन ओरडणारे मोदीं ट्रम्प समोर मौन व्रत धारण करतात हे खटकते.
जिथे पंतप्रधानांनीच बोलायला हवे तिथे ते घाबरुन काहीच बोलत नाही मग एखाद्या अंडर सेक्रेटरी / सचिवाने उत्तर देणे याने हवा तो परिणाम साध्य होत नाही. पंतप्रधान काय गाड्यांना हिरवी झेंडी द्यायला आणि उद्घाटनाच्या रिबीन कापायला ठेवला आहे का?
लोटांगण घालण्याचे प्रकार या आधी पण केले आहेत. " ना कोई आया था, न ही किसीने हमारी सिमा के अंदर... " असे चीनला क्लीन चिट देणे किंवा अगदी मोक्याच्या क्षणी निर्णय घेण्यास अनेक तासाचा विलंब लावल्यावर लष्कर प्रमुखाला " जो उचित लगे समझो, वो करो... " असा सल्ला द्यायचा आणि वार्यावर सोडायचे.
एरवी घसा फोडून, हातवारे करुन
एरवी घसा फोडून, हातवारे करुन ओरडणारे मोदीं ट्रम्प समोर मौन व्रत धारण करतात हे खटकते.
तुमच्या सहित बहुतेक जणांना खटकत जरी असलं तरी भारत सरकारला हाच मार्ग योग्य वाटतोय. कारण सध्यातरी अमेरिका मूर्ख माणसाच्या ताब्यात आहे. भारत अमेरिका व्यापारात आपण surplus मध्ये आहोत. आपल्या एकूण निर्यातीपैकी जवळ जवळ वीस टक्के निर्यात अमेरिकेला होते. त्यात remittance इत्यादी चे आकडे जोडले तर होणारा आकडा फार मोठा आहे. ना आपल्याकडे चीन सारखं rare earth magnets आहेत जी चीन स्वतःच्या bargaining साठी वापरतोय.
त्यामुळेच सद्यातरी ट्रम्पला न दुखावता आपल्याला जे योग्य आहे तेच आपण करत आहोत.
बरं. पण अमेरिकेशी
बरं. पण अमेरिकेशी लँडमार्क ट्रेड डील झाली म्हणून मोदींनी स्वतःच सांगितलं , रालोआ खास दारांनी त्यांचा सत्कार केला, मोदींच्या स्ट्रॅटेजिक ऑइल डिप्लोमसी मुळेच ३० दिवसांची सवलत मिळाली असं भाजपने सांगितलं ते सुद्धा ट्रंपला उल्लू बनवायला का?
अमेरिका मूर्ख माणसाच्या
अमेरिका मूर्ख माणसाच्या ताब्यात आहे
>>>
आणि भारत कोणत्या माणसाच्या ताब्यात आहे?
हायला तुम्हा लोकांची ही गंमत काय कळत नाही. काहीही झालं तरी माईक घेऊन बोंबलत जाहिरात करण्याची अपरिहार्यता कशातून येते? सोशल मेडिया, किंवा जरा आजुबाजूला फिरून लोक काय म्हणतात, ते तरी बघता की नाही तुम्ही लोक? तो ट्रंप गेला खड्ड्यात. स्वतःच्या देशात प्रदेशात कधी बघणार? आपलं हित कळलं तर थेट ट्रंपलाही खड्ड्यातून सुद्धा काढू बाहेर. पण त्याआधी असाईनमेंट तरी करायला पाहिजे. हे असले उन्माद नि फुकटच्या अस्मिता तुम्हाला हव्या आहेत तोवर या देशाचं काहीही होणार नाही. दुर्दैवाने आम्हीही याच देशात आहोत.
आणि पाकिस्तानात जाणार नाही. आमच्या बापाचा देश आहे हा.
Pages