नरेंद्र मोदींच्या चमत्कारानी भारावलेल्या नवभक्तांचा नवा पंथ

Submitted by भरत. on 15 May, 2019 - 08:35

आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ली वृत्तवाहिन्यांना मुलाखती देऊ लागलेत. (नाही, हा चमत्कार नाही)
एका मुलाखतीत त्यांनी बाला कोट हवाई हल्ल्याच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णंन केले. त्या रात्री ढगाळ वातावरण असल्याने हल्ल्याचा बेत पुढे ढकलावा का?, असा विचार चालला होता. " मी त्यांना सांगितलं, की आकाश अभ्राच्छादित असल्याने पाकिस्तानच्या रडारना आपल्या विमानांचा पत्ता लागणार नाही, आपण आपले काम साधून बिनधोक परत येऊ शकू. " संरक्षणतज्ञांनी यावर मान डोलावली आणि बालाकोटवर हल्ला झाला. पुढला इतिहास आपल्याला माहीत आहेच (किंवा नाहीही).

दुसरा चमत्कार - लाडक्या मोदीजींकडे १९ ८७ की ८८ साली डिजिटल कॅमेरा होता. ते अगदी नम्रतेने सांगतात की बहुतेक तेव्हा भारतात आणखी कोणाहीकडे डिजिटल कॅमेरा नव्हता. तर "गुजरातेतल्या विरमगाम इथे एका सभेत आधुनिक लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी यांचा एक रंगीत फोटो काढला आणि
.
.
.
.
.
.
ईमेलने तो दिल्लीला ए का वृत्तपत्राला पाठविला. दुसर्‍या दिवशी तो फोटो पेपरात छापून आलेला पाहून अडवाणीजी आश्चर्यचकित झाले होते.

आता यात पहिला चमत्कार हा की तोवर डिजिटल कॅमेर्‍याचं व्यावसायिक उत्पादनही सुरू झालं नव्हतं. अभ्यासू लोक म्हणतात कोडॅकने असे कॅमेरे पहिल्यांदा १९९१ साली बाजारात आणले आणि ते भलतेच महाग होते.
दुसरा चमत्कार, भारतात vsnl ने सर्वसामान्यांसाठी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली ते वर्ष होते १९९५. १९८६ पासून शिक्षण आणि
संशोधनाच्या क्षेत्रातील काही मोजकेच लोक इंटरनेट वापरत होते.

पण मोदी है तो मुमकिन है|

पुढला चमत्कार. मोदी कविता करतात हे तुम्हांला माहीतच असेल. तर मुलाखतकाराने विचारले की पंतप्रधान झाल्यावर तुम्ही काही लिहिलंत की नाही?
योगायोग बघा. त्या मुलाखतीसाठी येत असतानाच मोदींनी एक कविता लिहिली होती ( असं त्यांनीच सांगितलं). ती कविता लिहिलेले कागद त्यांनी मागवले. मुला खतकाराने सांगितलं, प्रेक्षकांनाही दाखवा ना ते कागद, त्यावर मोदी उत्तरले ,की नाही. घाईगडबडीत लि हिल्याने अक्षर नीट आलेलं नाही. मग मोदी ती कविता वाचून दाखवू लागले.
पण त्या काही क्षणांत मोदींच्या हातातल्या कागदांवर कॅमेर्‍याची नजर पडली होती. (फलंदाजाला फील्डर्स कुठे उभे आहेत हे माहीत का असायला हवं, ते कळतंय ना?) तर त्या कागदांवरचं मोदींचं हस्ताक्षर चक्क छापल्यासारखं होतं आणि

चमत्कार! चमत्कार!! चमत्कार!!!

मोदींना विचारलेला प्रश्नही त्या कागदावर छापलेला होता.

आहेत की नाहीत हे चमत्कार ? या चमत्कारकथेचं पारायण नियमितपणे केल्याने आपल्याला राष्ट्रवादाचं पुण्य लाभतं.

तुम्हांलाही मोदींचे आणखी काही चमत्कार माहीत असतील, तर भाविक जनांसाठी ते इथे लिहा.

आएगा तो मोदीही!
भारतमाता की जय!!

टीप : या मुलाखती पाहून मी नरेंद्र मोदींचा भक्त झालोय. माझ्यासारखेच आणखी अनेक जण झाले असतील. पण त्यांच्या आधीपासूनच असलेल्या भक्तांना माझ्यासारखे नवे भक्त रुचत नाहीत. पण आपण नवभक्त, त्यांच्याकडे लक्ष न देता; आपल्या या देवाच्या चमत्कारांवरच आपलं सगळं ध्यान एकवटूया.

जुन्या भक्तांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. आपण प्रत्येक चमत्काराला भारतमाता की जय असं म्हणून वंदन करूया.

"आएगा तो मोदीही" आणि "भारत माता की जय" हे आप ल्या नव्या पंथाचे जयघोष असतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदींच्या विरोधात हरेन पंड्यांनी आवाज उठवला आणि काय चमत्कार... त्यांचा वध झाला. या वधाला कोणिही प्रत्यक्षदर्शी नव्हता हा दुसरा चमत्कार.
संजय जोशी हे मोदींच्या विरोधात आहेत असा त्त्यांना संशय आला आणि अचानक सण्जय जोशींच्या पापाचा पुरावा म्हणुन एक सीडी फिरु लागली.
नितीन गडकरी पक्षाध्याक्ष आहेत , ते कदाचित अपल्याला पंतप्रधन पदाचा उमेदवार घोशीत करणार नाहीत असे वाटल्याने अचानक पूर्ती घोटाळाअ चमत्कार झाल्यासरखा पुढे आला

Submitted by चिवट on 15 May, 2019 - 10:53
https://youtu.be/-q9wnH1YoRI
चमत्कार Proud

Submitted by Filmy on 15 May, 2019 - 12:19
चमत्कार.
https://www.youtube.com/watch?v=3mmdLc_Yk3w

Submitted by अनिरुध्द.. on 15 May, 2019 - 12:47
Rofl मज्जा आहे. मोदींनी रेग्युलर इंटरव्ह्यू दिले पाहिजेत. पाच वर्षे अगदीच वाया दवडली.

Submitted by अमितव on 15 May, 2019 - 12:50
हा धागा निव्वळ ट्रोलिंग करण्याच्या हेतूने काढला आहे, हे प्रथमदर्शनीच कळून येते. पंतप्रधान मोदींची अश्या तर्‍हेच्या वक्तव्याची काही मोजकीच उदाहरणे जालावर सापडलतील मात्र धागा लेखक ज्या राजकिय पक्षाच्या अध्यक्षाची गुलामी करतात, त्याच्यावर अश्या तर्‍हेचे धागे काढायचे म्हटल्यास मायबोलीची बॅंडविड्थ कमी पडेल.

तेंव्हा इथल्या प्रशासकांना विनंती की ह्या धाग्यावर राजकिय हाणामारी होण्यआधी त्यांनी हा धागा अप्रकाशित करावा. आणि सुज्ञ वाचकांना (अपवाद अड्डा गॅंगचे सदस्य) देखील विनंती आहे की त्यांनी ही ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे.

Submitted by समीर.. on 15 May, 2019 - 13:22
भरतराव, धागा सार्वजनिक करा तेवढा.

Submitted by Filmy on 15 May, 2019 - 14:02
https://youtu.be/2WkrNV050wI
https://youtu.be/Tm9UABNtb80
https://youtu.be/KNILy8EdJS0

रत्ने! Wink

Submitted by Filmy on 15 May, 2019 - 14:04
1987-88 साली हे इमेल , डिजीकॅम वापरत होते आणि मग विचारतात काँग्रेस ने काय केले Happy

Submitted by सिम्बा on 15 May, 2019 - 14:20
मोदींनी हे इंटरव्ह्यू द्यायला जरा उशीर केला,
महिना भर आधी दिले असते तर पहिल्या 4 फेज मध्ये काँग्रेस च्या 2 3 जागा तरी वाढल्या असत्या Wink

Submitted by सिम्बा on 15 May, 2019 - 14:21
हा वाहता धागा झालाय. त्यामुळे सार्वजनिकचा पर्याय निवडूनही ग्रुपपुरताच राहिलाय.
दुसरा धागा काढावा लागेल.

Submitted by भरत. on 15 May, 2019 - 14:24
मागे राहुल म्हणलेला MR मशीन कनेक्ट करायची (यात सर्व्हर हे अध्याहृत होते पण भक्तांनी त्याचा सोईस्कर अर्थ लावून) हंगामा केला होता,
आता प्र से नि खरे खरे तारे तोडल्यावर अचानक दुर्लक्ष करा वगैरे बुद्धी सुचायला लागली

Submitted by सिम्बा on 15 May, 2019 - 14:33
https://www.facebook.com/654750712/posts/10162340209730713/
मोदींची जीवनकहाणी - थोडक्यात

Submitted by भरत. on 15 May, 2019 - 14:38
दुसरा धागा काढावा लागेल.>>
होऊदे खर्च Wink

Submitted by Filmy on 15 May, 2019 - 14:39
थांबा। तोवर इथले प्रतिसाद वाहून घालवू नका.

Submitted by भरत. on 15 May, 2019 - 14:44
मिशन शक्ती मुळेच ब्लॅक होलचा फोटो निघाला ह्यावर विश्वास ठेव णारे आहेत भरपूर

भारत माता की जय.

Submitted by अमा on 15 May, 2019 - 15:01
दुर्लक्ष करा म्हणून भिक मागायला लागले भाजपसमर्थक... अर्थात सवयच आहे म्हणा.

Submitted by हेला on 15 May, 2019 - 16:33
दुर्लक्ष करा किंवा कितीही खुमखुमीने प्रतिसाद देत राहा. धाग्यावरील प्रतिसादांची संख्या मोजकीच राहणार कारण धागा वाहता झालाय. हा देखील मोदीजींचाच चमत्कार...

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 15 May, 2019 - 16:43

Wink Happy

मी त्यांना सांगितलं, की आकाश अभ्राच्छादित असल्याने पाकिस्तानच्या रडारना आपल्या विमानांचा पत्ता लागणार नाही, >>> हे पेपरमधे वाचल्यावर पंतप्रधानपदावर बसलेल्या माणसाची चीड/लाज वाटली होती.

मोदीजींचं अक्षरच इतकं वळणदार, देखणं आहे की ते छापल्यासारखं दिसतं. शिवाय, ते त्रिकालज्ञानी असल्यामुळे मुलाखतकार कोणता प्रश्न विचारणार आहेत हे त्यांना आधीच समजलं होतं.
असो, मोदीद्वेष्ट्यांना नाय कळणार!!

धागा वाहता करून ग्रूपसाठी मर्यादित केल्याबद्दल वेबमास्तरांचे अभिनंदनवन.
हुशारलोकांच्यानंदनवनातआपणासर्वांचेस्वागत

Submitted by देवकी on 15 May, 2019 - 20:24

या वर्षीच्या निवडनुक प्रचारामुळे माझा कुणावरच विश्वास राहीला नाही.
Submitted by शाली on 15 May, 2019 - 20:28

मोदीजींचं अक्षरच इतकं वळणदार, देखणं आहे की ते छापल्यासारखं दिसतं. शिवाय, ते त्रिकालज्ञानी असल्यामुळे मुलाखतकार कोणता प्रश्न विचारणार आहेत हे त्यांना आधीच समजलं होतं.
असो, मोदीद्वेष्ट्यांना नाय कळणार!!
Submitted by पुंबा on 15 May, 2019 - 21:24

धागा वाहता करून ग्रूपसाठी मर्यादित केल्याबद्दल वेबमास्तरांचे अभिनंदनवन.
हुशारलोकांच्यानंदनवनातआपणासर्वांचेस्वागत
नवीन Submitted by आ.रा.रा. on 15 May, 2019 - 21:54

<<

हे असे पुढे सुरू ठेवावे ही सर्व भक्तगणांना विनंती. आपल्या देवाचे कर्म वाहून जायला नको. नैका?

मलिशिअस काँप्लायन्स नामक एक प्रकार आहे. धागा वाहता करण्यात आलेला आहे हे नक्की. भरत यांना वाहता धागा अन लेखन यातला फरक नक्कीच ठाऊक आहे.

मी वर कॉ-पे केल्याप्रमाणे आपणही केले तर धागा वाहताही राहील अन बोळेही निघतील. तुंबणार नाही.

मोदींच इंटरनेट आणि डिजिटल कॅमेरा -

आपल्या नेहमीच्या स्वयंप्रायोजित मुलाखतीत मोदीजी सांगतायत की, त्यांच्याकडे 1987-88 ला भला मोठा डिजिटल कॅमेरा होता आणि त्या कॅमेऱ्याने त्यांनी अडवणींचा फोटो काढून इंटरनेटने दिल्लीला पाठवला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कलर फोटो छापून आला तेव्हा अडवणींना आश्चर्याचा धक्काच बसला. असे आपले मोदीजी तंत्रज्ञानाच्या बाबतीत काळाच्या पुढे आहेत!

चला आता थोडा इतिहास पाहूया -

१) इंटरनेट: भारतात इंटरनेट आले 1986 साली. त्याला Educational Research Network (ERNET) या नावाने ओळखत. ERNET हे फक्त IIT, IIM, IISc अशा सर्वोत्तम सरकारी शिक्षणसंस्थानाच जोडण्यासाठी निर्माण केले होते. मी स्वतः IIM Ahmedabad मध्ये शिकताना ernet.in चं ईमेल ( जे नंतर Gmail वर host केलं गेलं) वापरल आहे. 1988 साली National Informatics Centre (NIC) ने महत्वाच्या सरकारी संस्थांना इंटरनेटने जोडण्यासाठी NICNet सुरू केलं.

भारतात सर्वसामान्य लोकांना व खासगी संस्थांना 14 ऑगस्ट 1995 साली विदेश संचार निगम लिमिटेड (VSNL) या सरकारी संस्थेने सर्वात पहिल्यांदा इंटरनेट उपलब्ध करून दिले. त्याआधी इंटरनेट हे फक्त अत्यंत महत्वाच्या सरकारी संस्थांकडे होते आणि त्याचा वापर हा मल्टिमीडिया (ऑडिओ, व्हिडीओ) पाठवण्यासाठी नव्हता. मग मोदींनी 1987-88 ला इंटरनेट कसं वापरलं हा यक्षप्रश्न आहे!

२) ईमेल: 1996 साली साबीर भाटिया आणि जॅक स्मिथ यांनी पहिल्यांदा सामान्य लोकांना मोफत इमेल उपलब्ध करून दिले, Hotmail या नावाने. 1997 साली Microsoft ने Hotmail ला विकत घेतले. 1995 साली जेव्हा VSNL ने भारतात सामान्य लोकांना व संस्थांना इंटरनेट सेवा दिली तेव्हा ईमेल सुविधासुद्धा VSNLचं पुरवायच. तेव्हाही ईमेलवर फोटोची attachment पाठवणे शक्य नसायचे. जर 1995-96 साली ही सोय नव्हती तर 1987-88 ला मोदींनी हा चमत्कार कसा केला हे मोठं कोडं आहे!

३) कलर प्रिंट: मुलाखतीत मोदी म्हणतात की दुसऱ्या दिवशी तो रंगीत फोटो छापून आला तेव्हा अडवाणीजी चकित झाले. यात छापून येणे म्हणजे वर्तमानपत्रात छापून येणे हाच असणार, कारण स्वतःच्या फोटोला लॅबमधून प्रिंट करून आणून पाहायला अडवाणी मोदींच्याइतके उत्सुक नक्कीच नव्हते. भारतातले तांत्रिकदृष्ट्या सगळ्यात आघाडीचे वर्तमानपत्र आहे Times of India (TOI). थोडा इतिहास चाचपून पाहिला तर TOI ने पहिला रंगीत फोटो 4 जुलै 1997 ला मुंबई आवृत्तीत छापला होता. मग 1987-88 ला मोदींनी हा चमत्कार कुठल्या पेपरात केला?

थोडक्यात, ज्या काळात सामान्य लोकांना इंटरनेट मिळत नव्हते तेव्हा मोदींकडे ते होते. 1987-88 ला डिजिटल कॅमेरा कदाचित रघु राय कडेही नसेल पण मोदींकडे होता. DOS च्या सगळ्या command मोदींना तेव्हा येत होत्या आणि नसलेल्या ईमेल अकाउंटवर त्यांनी अडवाणींचा फोटो attach करून प्रेसला पाठवला होता. आणि सगळ्यात भारी म्हणजे दुसऱ्या दिवशी तो रंगीत फोटो छापून आला जेव्हा भारतातली प्रेस Black & White होती!

आचार्य अत्रे आज असते तर नक्की म्हणाले असते "गेल्या दहा हजार वर्षांत इतकं खोटं बोलणारा दुसरा माणूस झाला नाही!"

- डॉ. विनय काटे

130 कोटी लोकांची कष्टाने जमवलेली पुंजी, एक क्षणात मातीमोल केली.
यालाच ब्लॅक मॅजिक म्हणतात का?

GST लावून अनेक उद्योग देशोधडीला लावले.
यालाच ब्लॅक मॅजिक म्हणतात का?

औषधांवर २८ टक्के GST लावला, सगळ्यात मोठा स्लॅब.
यालाच ब्लॅक मॅजिक म्हणतात का?

औषधनिर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनांच्या किंमती दुपटीने वाढल्या.
यालाच ब्लॅक मॅजिक म्हणतात का?

जण धन खाते काढून त्यात नंतर १०००० रुपये ठेवण्याची सक्ती केली गेली.
यालाच ब्लॅक मॅजिक म्हणतात का?

तुटपुंजी कर्जमाफी देऊन ती पीककर्जाच्या व्याजापोटी वळवली गेली,
यालाच ब्लॅक मॅजिक म्हणतात का?

काँगेसमुक्त भारत म्हणता म्हणता, स्वतःचा पक्षच काँग्रेसयुक्त केला.
यालाच ब्लॅक मॅजिक म्हणतात का?

काँग्रेसच्या काळात असणारा ९.२ चा विकासदर यांनी कित्येक पद्धती बदलूनही ५.५ टक्के झाला,
यालाच ब्लॅक मॅजिक म्हणतात का?

बेरोजगारीने उच्चाअंक गाठला.
यालाच ब्लॅक मॅजिक म्हणतात का?

असं असेल तर रासपुतीनने देखील यांचे चरण धुवून पाणी पिलं पाहीजे!!!

त्याकाळी मोदीजी लहान असतील, शाळेत कागदी कॅमेरा बनवायचा शिकवल्यावर मोदींजींनी तो बनवला असेल आणि अगोदरच अडवणीजीचा रंगपेटीने रंगवलेला फोटो त्यात ठेऊन क्लिक केलं असेल.

आ.रा.रा, प्रशासकांनी धागा वाहता आणि ग्रुपपुरता मर्यादित केलेला नाही.
मीच वाहता धागा काढला होता आणि वाहता धागा अर्थात गप्पांचं पान ग्रुपपुरतं मर्यादित असतं. (हे विसरलो होतो)

तो वाहता धागा दुसरा आहे. हा नव्हे.

लोकांनी एक जुना इंटरव्यू खणून काढलाय. त्यात मोदी , मी काही फार शिकलो नाही, अशी अतिविनयशील सुरुवात करतात.
मग त्या ह्यांनी सांगितलं म्हणून बी ए केलं. मग त्यांनीच सांगितलं म्हणून एम ए केलं.
जाता जाता ते हेही सांगतात की मी विद्यापीठात पहिला आलो होतो.

भारतमाता की जय!

यावरून निष्कर्ष काय तर लोकांना सहज पडताळून पाहता येतील अशा थापा मारू नयेत. तोंडघशी पडावं लागतं.
मोदींनी ही विधाने निवडणूका संपायच्या आधी केली असती तर विरोधी पक्षांना एक चांगले हत्यार मिळाले असते आणि कदाचित त्यांच्या जागांमधे भर पडली असती. निदान त्यांनी तसे केले नाही म्हणून भाजपावाल्यांना हायसं वाटलं असेल. Happy

अरेरे,
हा धागा देखील वाहाता झाला. Lol

आता मला समजले की मोदी पाकिस्तानात का उतरले होते. खरं तर ते सर्जिकल स्ट्राइक करायला गेले होते पण अचानक आकाश निरभ्र झाले आणि मोदी शुभेच्छा देऊन परत आले.....

उगाच ट्रोलिंग सुरू आहे.
घनदाट ढगाळ वातावरण होते, पाऊस पडत होता.
अशा वेळेस मोर नाचणार नाहीत का?
मोरांचा तो मनमोहक नाच बघायला लोक जाणार नाहीत का?
रडार ऑपरेटर शेवटी माणूसच नव्हे का?
ती वेळ साधून विमानं बिनबोभाट रडार पार करणार नाहीत का?

कुठल्यातरी दक्षिण भारतातल्यावृत्तपत्रात मोदींबद्दल छापून आलेली जुनी बातमी आहे. त्यात मोदी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहेत असे म्हटले आहे..

भक्त जर देवाच्या उपासकांना म्हनतात तर मोदी बाबा देव आहे म्हणायचं
आपल्याकडे असे बरेच देव आहे क्रिकेटचा देव, संगीताचा देव, रजनीकांतला तर
इंद्रापेक्षा जास्त भाव आहे, आपल्याकडे काहीही होऊ शकत ..
मग आपल्या देशात देवाचे चमत्कार नविन नाही .. ते सूर्य झाकू शकतात
मग रडार काय चीज आहे Happy
कलियुगात पाप वाढेल तेव्हा देवाला अवतार घ्यावा लागेल अस ऐकलेलं आहेच
त्यामुळे मोदी बाबा एखादा अवतार तरी आहेच ..करत असतील असे चमत्कार तर करू द्या त्यांना
नास्तिक लोकांसाठी त्यांना असे चमत्कार करावे लागतात असे म्हणतात
आपल्यासारख्या सामान्य लोकांनी एवढ टेन्शन नाही घ्यायचं..
आपण फक्त भक्त व्हायच का चमचा होऊन हलवत बसायचं हे ठरवायचं, ती आपली चॉईस !
काय आहे आपल्याकडे लोकशाही आहे ना .. अभियक्ती स्वातंत्र्य आहेच
आणि करमणूक पण झाली पाहिजे मग काही तरी विषय हवाच..
अजून हजारेक असे धागे हवेच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने आता नवा डाव टाकला आहे. 'लोकसभा निकालानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास आम्ही पंतप्रधानपदही सोडायला तयार आहोत. आघाडी सरकारमध्ये आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळालं तरी काहीच अडचण नाही,' असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. रालोआ सरकारला सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं उद्दिष्टं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

त्यांना सर्व नोटा बदलून द्याव्याच लागतील.>>
कुठल्या जगात आहात? ह्या चांगल्या दिवसांत असलं आक्रित घडत नाही Wink

मायबोली के किस्से सुनाने वाले आशिक की पॉलिटिकल बातों से ऊबकर गर्लफ्रेंड ने झल्लाते हुये कहा --

दूल्हा बनकर तो तु ही आयेगा ना,
कि वहां भी कहेगा आयेगा तो मोदी ही

Pages