एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताचंही सगळं चांगल चालू आहे असं मी तरी म्हणत नाही. निवडणुका जिंकण्याचा फॉर्मुलाच भाजपाला सापडलेला आहे. Ed, CBI आहेतच जोडीला.
विरोधी पक्ष ही शिकायला तयार नाही. एवढ्या निवडणुका हारून पण अजून राहुल गांधीनाच कवटाळून बसलेत.

ईडी, सीबीआयसोबत निवडणू़क आयोगाचं नाव घ्यायचं राहिलं बघा.
हरदासाची कथा मूळपदावर, चुकला फकीर मशिदीत तसे उघड आणि छुपे भाजप समर्थक निवडणूक जिंकण्यावर.

बरं ते नसलेल्या ट्रेड डील साठी आणि न मागितलेल्या ३० दिवसांच्या सवलतीसाठी भाजपने मोदींचं कौतुक का केलं याचं उत्तर रात्री च्या चांदण्यात शोधायचं की ग्रीष्माच्या उन्हात?

ट्रंप आणि त्याचे मंत्री मूर्खासारखं बोलतात ते फक्त भारताच्याच बाबत का? कारण इराणच्या बाबत तर त्यांना भगव्यांचा अ-प्रच्छन्न पाठिंबा आहे. की तिथे मुस्लिमद्वेष वरचढ ठरतो ?

rare earth ला आज मोठी मागणी आहे/ असेल. चीन कडे rare earth आहे म्हणून bargain power आली असे नाही. त्यांनी अनेक क्षेत्रात investment केली आहे त्याची फळे त्यांना मिळत आहे. rare earth हे केवळ एक क्षेत्र आहे पण तिथेच चीनची सर्व bargain power आहे असे नाही. इतर देशांना ( भारताला , अमेरिकेला...) rare earth पासून कुणी थांबविले आहे ? पण नेतृत्वाकडे दीर्घकालीन दृष्टी ( longterm vision ) असायला हवी. जेव्हा चीनकडे ८० % कंट्रोल आहे तेव्हाच आपल्याला जाग येतो.

व्यापार आणि रिमीटन्सच्या तुकड्यांसाठी १४७ कोटी लोकसंख्येच्या प्रजासत्ताक राष्ट्राने किती काळ, कुणाकडून ( व्हेनेझुएला, रशिया का अजून कुठला देश ) काय विकत घ्यावे हे सांगण्याचा अधिकार आपण ट्रम्पला दिला असेल तर हे कच खाणारे धोरण आहे.

<< भारताचंही सगळं चांगल चालू आहे असं मी तरी म्हणत नाही. निवडणुका जिंकण्याचा फॉर्मुलाच भाजपाला सापडलेला आहे. Ed, CBI आहेतच जोडीला.
विरोधी पक्ष ही शिकायला तयार नाही. एवढ्या निवडणुका हारून पण अजून राहुल गांधीनाच कवटाळून बसलेत. >>

------ भाजपा, ED, CBI, निवडणूक आयोग जोडीला ( घटना धाब्यावर बसवून सत्तापालट करणारे कोश्यारी सारखे ) राज्यपाल या सर्वांच्या सहयोगामूळे राहुल गांधी निवडणूका हरत आहे. येथे राहुल गांधी पराभूत होत नाही. भारतीय लोकशाही पराभूत होत आहे.

Free and Fair ( मुक्त, निष्पक्ष आणि निर्भय ) निवडणूका झाल्यास चित्र फार वेगळे असेल.

ट्रंप व्हान्स दुकलीने युक्रेनच्या झेलेन्स्कीचा ठरवून आणि मीडियासमोर अपमान केला होता. तरीही त्याने ट्रंपच्या दरबारातच त्याला बाणेदार उत्तरं दिली तेव्हा तिकडच्या आणि इकडच्याही उजव्यांनी झेलेन्स्कीचीच टर उडवली होती. कॉमेडियनचा राजकारणी झाला म्हणून पप्पू म्हटलं. तेव्हाचं ट्रंपचं वागणं यांना आवडलं होतं. ट्रंप भारताच्या आणि मोदींच्याही बाबत तसाच वागल्यावर कसा रंग बदलला बघा.

म्हणून बाजू घेताना तत्त्व बित्त्व बघावी. मग कोलांट्या उड्या माराव्या लागत नाहीत आणि आपल्याच मनाची खोटी समजूत घालावी लागत नाही.

तत्त्व बित्त्व बघावी >> त्याची ह्यांनी केव्हाच लंगोटी करून कमरेला गुंडाळली आहे , म्हणून तर नाचायला जातात आणि पार्श्वभाग उघडा पडतो

<<उजव्यांनी झेलेन्स्कीचीच टर उडवली होती. कॉमेडियनचा राजकारणी झाला म्हणून पप्पू म्हटलं. तेव्हाचं ट्रंपचं वागणं यांना आवडलं होतं. ट्रंप भारताच्या आणि मोदींच्याही बाबत तसाच वागल्यावर कसा रंग बदलला बघा.>> अगदी बरोबर.
त्यात ट्रम्पच्या पहिल्या टर्ममध्ये त्याने आपण हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यातीवर बंदी घातली तेव्हा "We have good relationship , but if India doesn't supply us, there would be retaliation, why wouldn't there be." अशी धमकी दिली होती. ट्रम्पचे पाय तेव्हाच पाळण्यात स्पष्ट दिसले होते. 'सलामत रहे दोस्ताना हमारा' हा निव्वळ पोरकट खेळ आहे हे सुद्धा तेव्हाच स्पष्ट झाले होते.
(मग आपण त्या ड्रग वरील निर्यात बंदी अंशतः उठवली.
ते अँटीमलेरिया ड्रग कोव्हिडवर प्रभावी उपाय असु शकतो असा तेव्हा अंदाज होता, पुढे तो चूक असल्यासाचे निष्पन्न झाले होते.)

पण हे वळायाला टॅरिफ वार सुरू होऊन त्याची आपल्याला झळ पोचावी लागली. तो पर्यंत 'यारी है इमान मेरा' वगैरे सुरूच होते.

मोदींनी एका चहावाल्याला गटारीतून येणार्‍या गॅसवर विस्तव पेटवून त्यावर चहा करताना पाहिलं होतं. यावर आय आय टींमध्ये संशोधन करायला सांगितलंच असेल. पण त्याच वेळी मोदींनी स्वच्छ भारत अभियान इतक्या प्रमाणात आणि परिणामकारक रीत्या राबवलं की ज्यातून दुर्गंधीयुक्त गॅस येईल अशी गटारंच भारतात राहिली नाहीत. नाहीतर भारत आताच क्रमांक एकची अर्थव्यवस्था झाला असता.

छुपा भाजप समर्थक कांय, घुबड कांय. बरं ते जाऊ द्या.

ट्रम्प आणि त्यांचे काही मंत्री फक्त भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी मूर्खासारखे बोलत आहेत.थोडं गूगल केलं तर किती तरी उदाहरण सापडतील.

भाजप हा एक राजकीय पक्ष आहे. त्यामुळे ३० दिवसांच्या सवलतीसाठी त्यांनी मोदींना क्रेडिट दिलं असेल तर त्यात विशेष काही नाही. भारतात जवळपास सर्वच पक्षांची पद्धत अशीच आहे. थोडं काही चांगलं घडलं तर श्रेय आपल्या नेत्याला, आणि वाईट झालं तर जबाबदारी दुसऱ्यावर.

चीनने गेल्या काही दशकांत उत्पादन, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी या सर्वच क्षेत्रांत मोठी प्रगती केली आहे. अमेरिकेवर अवलंबून न राहता त्यांनी पर्यायी व्यवस्था उभी केली. एखाद अमेरेकी उत्पादन ban करायच्या आगोदर त्याला पर्याय तयार केला. मात्र अमेरिकेला अजूनही चीनमधील rare earth खनिजांची गरज आहे, विशेषतः संरक्षण क्षेत्रासाठी उच्च दर्जाच्या सामग्रीसाठी. आणि त्याचा योग्य फायदा चीन घेत आहे.

अमेरिकेच धोरण हेच आहे की आमची बाजारपेठ पाहिजे असेल तर आमच्या मागण्या मान्य करा. निर्णय आपल्याला घायचा आहे. बरं हे काही पहिल्यांदा घडतंय असं नाही. 2012-13 साली पण इराणी तेलावर अमेरिकेने sactions लावले होते. तत्कालीन केंद्र सरकारने इराणी तेल आयात कमी केलेली.
S-400 विकत घायच्या वेळीही अमेरिकेने आदळ आपट केलेली पण त्याचा भारतावर काही फरक पडला नाही. सध्याही आपण रशियन तेल विकत घेण्यावर अमेरिकेला कोणतही आश्वासन दिले नाही. उलट तेल आयात वाढवलेली आहे. पण जर अमेरिकन निर्बंधंमुळे जर आपलंच जास्त नुकसान होत असेल तर मात्र भारत रशियन तेल कमी घेऊन इतर पर्ययांचा विचार करू शकतो.

मला हा सिलेक्टिव्ह डिमेन्शिया आवडतो. भाजपने काहीही केलं तरी त्याचं समर्थन. मग त्यानंतर तोंडावर पडायची वेळ तुमच्यासारख्या भाजप समर्थकांवर वारंवार येते. दोन उदाहरणं गेल्या दोन दिवसांतलीच आहेत. भाजपने ट्रेड डीलबद्दल आणि रशियन तेल सवल तीबद्दल जे बोललंय तोही शुद्ध मूर्खपणाच आहे. डील झाली नसताना नाचले आणि मग अजून डील झालीच कुठे असं नाचताहेत. यात आणि सवलतीत भाजप वाल्यांनी मोदींचंच माकड केलं. असं करू नये याची अक्कल एकाही मंत्र्याला नाही. सांगायची हिंमत त्याहून नाही. तेच ते तुमचे गोयल आणि जयशंकर. नोकरशाही सुद्धा राजा बोलेल तेच करेल. हवाई दलाला सल्ला देणार्‍या पंतप्रधानाला कोण कशाला खरं मत सांगेल? आधीच तिथे मर्जीतले लोक बसवलेत. त्यांची कर्तबगारी काय ते बघायला दोभाल हे एक नाव पुरेसं आहे.

<,ट्रम्प आणि त्यांचे काही मंत्री फक्त भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी मूर्खासारखे बोलत आहेत.थोडं गूगल केलं तर किती तरी उदाहरण सापडतील > हो. पण तो इतरांबद्दल बोलत होता, तेव्हा तुम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचत होता. झेलेन्सकीचं उदाहरण दिलं आहे. तुम्ही नसेल लिहिलं, पण एकंदरित भाजप समर्थकांनी लिहिलंच आहे. इथले मागा कट्टर मोदीसमर्थकच आहेत.
ट्रंप भारताबद्दल असं बोलू लागला तेव्हाच तुम्हांला मूर्ख वाटला. आम्ही त्याला मूर्ख नाही, दुष्ट आणि क्रूर असं आधीपासून म्हणतोय.

बाकी तुम्ही जे लिहिताय त्याने तुमची स्वतःची तरी समजूत पटतेय का ते स्वतःलाच खरं खरं सांगा.

https://x.com/MichaelVaughan/status/2031277959529550291
Michael Vaughan
@MichaelVaughan
Just to let you all know that the West Indies got knocked out of the World Cup on March 1st .. it’s now March 9th .. they are still stranded in Kolkata .. SA are in the same position .. !!!!!!!!!!!! This isn’t right … England got on a charter 36 hrs after being knocked out .. as should be the case for all teams ..

यावर आपल्या लोकांनी दिलेली उत्तरं महान आहेत.

<< चीनने गेल्या काही दशकांत उत्पादन, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी या सर्वच क्षेत्रांत मोठी प्रगती केली आहे. अमेरिकेवर अवलंबून न राहता त्यांनी पर्यायी व्यवस्था उभी केली. एखाद अमेरेकी उत्पादन ban करायच्या आगोदर त्याला पर्याय तयार केला. मात्र अमेरिकेला अजूनही चीनमधील rare earth खनिजांची गरज आहे, विशेषतः संरक्षण क्षेत्रासाठी उच्च दर्जाच्या सामग्रीसाठी. आणि त्याचा योग्य फायदा चीन घेत आहे. >>

------ ट्रम्प / अमेरिकेसमोर उभे रहाण्याचे धाडस चीन कडे आहे आणि त्यांनी ते वेळो वेळी दाखवून दिले आहे. म्हणून शपथविधीचे मिळालेले आमंत्रण नाकारले होते ( मोदींचा विश्वासू परराष्ट्रमंत्री शपथविधी समारंभाचे आमंत्रण मिळण्याच्या अपेक्षेने चार दिवस ठिय्या देऊन होता - sign of a weak leader).

कोरोना काळांत, देशांतर्गत गरज भागविण्यासाठी, भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यातीवर बंदी आणली होती. ट्रम्पला हा निर्णय आवडला नाही . त्याने धमकाव ल्यावर बंदीचा निर्णय २४ तासांच्या आंत मोदी सरकारने मागे घेतला. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध कोरोना साठी किती उपयोगी / परिणामकारक होते हे महत्वाचे नाही. पण मोदी यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र नाही हे यातून अधोरेखित होते. sign of a weak leader.
https://www.bbc.com/news/world-asia-india-52196730

सरेंडर वृत्ती असेल तर रेअर अर्थ चे १०० % साठे पण उपयोगी नाहीत.

भारतीय नौदलाच्या आंत्रणावरुन भारतात आलेली इराणी युद्धनौका "IRIS देना " अमेरिकेने बुडविली. १८० लोक मारले गेले अगदी आपल्या मागच्या अंगणांत - हिंदमहासागरांत. अतिथि देवो भव: असे आपली संस्कृती मानते. भारताने आमंत्रण दिले नसते तर देना युद्धनौका हिंदमहासागरांत आली नसती. कुणाची सागरी हद्द ( आंतरराष्ट्रिय , भारतीय, श्रीलंका ) आहे यापेक्षा हिंदमहासागरावर भारताचे प्रभुत्व आहे या आपल्या समजूतीला तडा गेला आहे.

त्या नौकेवर कॅडेट्स होते. सैनिक नाही. दारुगोळा नव्हता. त्याबद्दल ट्रंप म्हणाला नौका बुडवताना मज्जा आली.

Pages