महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sunetra Pawar, wife of Ajit Pawar to be sworn in as Dy CM of Maharashtra at 5 PM tomorrow.

Sunetra Pawar also to be appointed as the Chief of NCP.
१३ दिवसांचा सल्ला यांच्यासाठी नसेल ना?

अजित पवार १९९१ मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. काकांना केंद्रात मंत्री होता यावं म्हणून ते खासदारकीचा राजीनामा देऊन ते विधानसभेवर आले.
सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक हरल्या. राज्यसभेवर गेल्या. आता विधानसभेवर येतील. एका मुलाला राज्यसभेत पाठवतील.

दादा गेले. एक पंचवीस-तीस वर्षांची कंटीन्यूटी होती ती अचानक कोलॅप्स झाली. वाटत होतं त्यापेक्षा बरंच जास्त राजकीय संचित, जनसंपर्क, गुडविल या माणसानं आयुष्यभराच्या कामातून कमावलेलं आहे, असं दिसून आलं. दादांच्या अकाली जाण्यानंतर आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया, तसेच त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळची दृश्यं कुठल्याही राजकारण्याला हेवा वाटावी अशी होती. अशा या अस्सल मराठी, पूर्णपणे देशी, लोकांत मिसळून राहिलेल्या नेत्यास, श्रद्धांजली.

आता पुढे काय? तर अवघड आहे.
दादांच्या गटापुढं सध्या एकच ऑप्शन दिसतो आहे. 'चाललंय ते चालू द्या. आमदारकीची टर्म अजून चार वर्षे बाकी आहे‌. पुढचं पुढं बघता येईल.' सत्तेची सुरक्षितता, सावली सोडण्याएवढं खुळं यातलं कुणी नाही. त्यामुळे विलीनीकरण वगैरे म्हणजे शरद पवारांनीच डायनॉसॉर पक्षासोबत जाणं. ते काही सरळ उठून डायनॉसॉरसोबत जातील असं वाटत नाही. (कमीजास्तीला मध्यस्थीला गौतमसेठसारखा महामानव हाताशी असल्यावर सरळ उठून जाण्याची काही गरजही भासत नसावी.)

आणि शरद पवार वयाच्या अशा टप्प्यावर आहेत की त्यांच्यासोबत जाऊन विरोधात बसण्यात इकडच्यांपैकी कुणालाही कसलंही राजकीय भवितव्य दिसत नसणार. ते ठिकच‌.

बहुदा पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हे निराधार (!) लोक खुल्या मार्केटमध्ये येतील. यांच्यापैकी कुणावर कुणाची पापी नजर कधी पडते ते फक्त बघावं लागेल. (न्यूज ॲंकरच्या भाषेत, 'हे बघणं यापुढे महत्त्वाचं ठरणार आहे.')
काही जण तर स्वतःवर पापी नजर पडायची वाटही बघणार नाहीत. त्याआधीच पहिली संधी मिळताच योग्य ती ऑफर स्वीकारून आपलं आणि पोराबाळांचं भविष्य उज्ज्वल करतील. म्हणजे ज्याची ऑफर कुणीच नाकारू शकत नाही, अशा जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षात जातील. दादा असताना ते स्वतः यांना आवरू शकत नव्हते तर आता कोण आवरणार ?

परवापासून सुनेत्रा पवारांबरोबरचा मुख्यमंत्र्यांचा फोटो यायला लागलेला बघून सुनेत्रा पवारांना अध्यक्ष केलं जाईल, असं एक होतंच. सिमेंटींग फॅक्टर म्हणून अध्यक्ष कुणीतरी 'पवार' असणं गरजेचं होतं. नाहीतर महिन्याभरातच यांच्या एकमेकांच्यातच हाणामाऱ्या चालू झाल्या असत्या. त्या टळतील. डायनॉसॉरचं त्याबाबतीतला बंदोबस्त एकदम चोख. यांच्या शास्त्रशुद्ध मॅनेजमेंटपुढं आवाज काढायला कुणाला आवडेल, असं वाटत नाही. बाकी मग ते डेप्युटी सीएमही योग्य. गुडविल जेस्चरपलीकडे असंही त्यानं काही होणं नाही.

सुनेत्रा पवारांना संघटना आणि सत्ता या दोन्हीचा अनुभव झिरो आहे. 'रझिया फंस गई गुंडों में' अशी एक म्हण आहे. (सुप्रिया सुळेंचीही गत काही वेगळी नाही, आणि त्यांना स्वीकारार्हताही नाही).

तर इथून पुढचा काही काळ हा पक्ष डायनॉसॉर पक्षाकडून चालवला जाईल, गरज असेपर्यंत. जसा आठवलेंचा पक्ष, रामविलास पासवानांचा, जयललितांचा, मायावती आणि नितीशकुमारांचा पक्ष चालवला जातो. इथं याकामी पॉलिटिकल मॅनेजर म्हणून प्रफुलभाई आपली एक्सपर्टीज प्रदान करू शकतील. तटकरेंना वगैरे अलिबाग रायगडचं संस्थान सुरक्षित राहिलं तर कशाचं काही देणं घेणं नसावं.

एकूण हा पक्ष आणि शरद पवारांनंतर तुतारी पक्ष नामशेष होत जाताना पहावा लागण्याची शक्यता खूप. दादा असते तर ही प्रक्रिया थोडी लांबली असती, एवढंच. अर्थात, म्हणून काही हा पक्ष एकदम डाका टाकून नष्ट केला जाणार नाही, कारण लोकभावना वगैरे असतात. सांभाळाव्या लागतात. नाहीतर मग घड्याळाची एक जी सेक्युलर व्होट स्पेस आहे ती बिथरून कॉंग्रेसकडं सरकून सलाईनवर पडलेल्या कॉंग्रेसला धुगधुगी यायची. रिस्क आहे.

डायनॉसॉर पक्षवाल्यांची एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. यांनी रातोरात जिकडं तिकडं लाखालाखांचे श्रद्धांजलीचे फ्लेक्स लावून टाकले. एवढे लक्षवेधी भव्य फ्लेक्स तर दादांच्या लोकांनी पण लावले नसतील.

परवापासून मोहोळ-लांडगे वगैरेंचा 'आमचे दादा, आमचे दादा' वगैरे गहिवर बघता, फक्त एका आठवड्यापूर्वी याच लोकांनी दादांचा पुणे-पिंपरी-चिंचवड मधला काटा पूर्णपणे ढिला केला, यावर विश्वास बसू नये. पुन्हा वर दिलदार मित्र वगैरे आहेच म्हणजे. हे बाकी यांना छान जमतं.

संप्रति१, अगदी मनातलं लिहिलंत. त्यापलीकडेही लिहिलंत, तेही पटलं. शब्दन् शब्द पटला.
फडणवीसना मुख्यमंत्री म्हणून आता कारभार हाकताना कठीण जाणार आहे. त्यांची अभ्यासू वगैरे कितीही प्रतिमा निर्माण केली तरी ते अजित पवारांसमोर फार लहान वाटू लागलेत. त्यांच्या पक्षात कोणी त्या वकुबाचा आहे का माहीत नाही. असला तरी यांनीच त्याचे पंख छाटले असतील.
त्यांना आता जयंत पाटलांची गरज पडेल.

अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचं खरंच नुकसान झालंय.

कोणताही नेता गेल्यावर असं म्हटलं जातं. पण अजित पवारांबद्दल हे प्रकर्षाने वाटलं.

भाजपसोबत जाऊनही आपण शिवशाहुफुलेआंबेडकरांच्या विचारावर कायम असल्याचं त्यांनी किमान म्हटलं तरी. बटेंगे तो कटेंगे आणि भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण विधानांवर टीका केली.

लोकसत्तेची आजची हेडलाइन आहे - राष्ट्रवादीची सूत्रे भाजपच्या हाती. सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व सोपवण्याची खेळी ; शरद पवारांना दूर ठेवण्याचे प्रयत्न.

मनपा निवडणुकांआधी भाजपचा त्याच्या दोन्ही मित्र पक्षांशी चांगलाच संघर्ष उडाला होता. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी भाजप विरोधात एकत्र आल्या. पक्ष एक करण्याची चर्चाही सुरू होती. अर्थात हे अजित पवार असतानाच शक्य होते. जर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी द्यायचा निर्णय घेतला असता (शक्यता फार कमी आहे. शरद पवारच तिकडे गेले असते आणि भाजपला उघड पाठिंबा दिला घेतला असता), तर त्यांचा अर्था पक्ष भाजपला सामील झाला असता. आताही हे सगळे सत्तेची ऊब आणि चौकशी यंत्रणांची तलवार नसण्याने सुखी आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी किंवा अन्य कोणी १३ दिवसांनंतर राजकारण सुरू करावे, असे मत वर srd यांनी मांडले आहे. आता सुनेत्रा पवार चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, याबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे?

यातून आणखी एक गोष्ट पुन्हा सिद्ध होते. मोदीशहांचा तथाकथित विकासाचा चेहरा किंवा हिंदुत्व या दोन्ही गोष्टींवर भाजपला एकहाती बहुमत मिळणे शक्य नाही. त्यांना इतर पक्षांची, त्यातल्या मनसबदारांची गरज नाही. आणि हे त्यांना चांगलेच माहीत आहे. भाजप समर्थक कधी मान्य करतील?

संप्रती पोस्ट पटली. दादा इतका होल्ड दुसऱ्या कोणाचा नाही. ह्या दोन्ही बायकांचा तर नाहीच नाही. सुप्रिया सुळे ने बुधवार गुरुवार स्वतःला सतत पुढे ठेवून प्रोजेक्ट केले. काय ते आचरट पणे वागत होती पूर्ण घटनेनंतर. शुक्रवारी तिला समजले असेल तटकरे आणि पटेल चे, मग एकदम गायब.
पद्मसिंह पाटील खटला अजून चालू आहे, आता 85 वर्षाचा झाला तो. त्यामुळे सुनेत्रा पवारला पण आता तरी भाजपा जास्त सोयीची आहे. तरीही इतर चाळीस लोकांवर तटकरे आणि पटेलचा खरेच वचक आहे का आणि असेल तर किती हे पण समजेलच. काका भाजपाशी घरोबा ह्या वयात करतील असे वाटत नाही. आणि शांत बसतील असे देखील वाटत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही तळागाळातल्या कार्यकर्त्याची इच्छा दिसते, जे की शिवसेने बाबत दिसत नाही. दादाच्या जाण्याने मामाची पण पंचाईत झाली आहे खरेतर. कारण शिंदे आणि दादा ची कुठेच तुलना होऊ शकत नाही. दादाचा दांडगा अनुभव नक्कीच miss करतील. अत्यंत वाईट घटना.

थोरल्या साहेबांनी गुगली टाकली. आपल्याला सुनेत्रा पवारांच्या शपथविधी बद्दल काही माहीत नाही , तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, कदाचित पटेल - तटकरे मिळून घेतला असेल वगैरे वगैरे ..!

बोलभिडूचा अगोदरचा विडिओ आणि हा नवीन
https://youtu.be/lDAJY9P5LDc?si=nkNKlGmx4fkEwfvO
सगळी उत्तरं देत आहे.
...............
१..विलीनीकरण हा शब्दच खोटा होता fake. कुणाला आणि का गरज होती? त्यांना( शप गटाला) अजित पवार गटात जायचे होते पण त्यास गोंडस विलीनीकरण हे रूप देण्यात आले. काकांनी अजितवर कौटुंबिक दबाव टाकला होता( मागील सभेचा विडिओ दाखवला जात आहे)पण प्रत्यक्ष कृती अजितदादांनी केलीच नाही. होहोहोहो म्हणत राहिले आणि वेळ काढला.
२. या अगोदरची चाल मविआ होती. पण दुर्देवाने शिवसेना फुटली, सत्ता गेली. त्यावेळी काका बोलले की "पक्षामध्ये विरुद्ध विचार चालले आहेत हे उद्धवला ओळखता आले नाही." पण आपलीच राष्ट्रवादी फुटणार हेसुद्धा काकांना ओळखता आले नाही. ( हातातल्या फायलींत नक्की काय असते?) अजित पवार सत्तेत सहभागी झाले.
३. अदाणींना मध्यस्थ करून केंद्रात दबाव टाकण्याचे तंत्रही यशस्वी झाले नाही.
४. अजितला भरीस घालून नगरपालिका निवडणुका एकत्र लढवल्या तिथेही मतदारांनी पाठींबा दिला नाही.
५. आता आम्ही एक होणार होतो याचे पालुपद लावून परत राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचा डाव यशस्वी होऊ नये म्हणून तटकरे, पटेल, भुजबळांनी घाई केली आणि सुनेत्रा यांना निवडून दिलं.
६. जे आमदार काकांपासून फुटून वेगळे होऊन सत्तेत बसले ते काय पुन्हा कोनाड्यात फेकले जाणार होते काय? आणि सूत्रधार अमित शहा मदतीला होतेच.
७. ही सर्व मते भाजपाची पाठराखण करणारेच चानेल्स मांडत होते असे नाही तर तटस्थ राहणारे पत्रकारही मांडताना दिसतात.

घाई का केली ते पहिल्या विडिओत आलंय ना. विलिनीकरण करण्याचं खेकटं दामटून घड्याळाची सत्ता हायजॅक केली जाऊ नये म्हणून. आज टिवीवरही जयंत पाटील आणि काका वारंवार हेच सांगताना दाखवत आहेत पाहा. (गोल्फ खेळातले stymie )

(म्हणजे त्यांनी हजार दहा हजार फटाक्यांच्या माळाही तयार ठेवल्या असणार.)

आणखी काय सांगू? नेते इतके दुधखुळे वाटले काय? आता काल रात्री हा. मुख्यमंत्र्यांनीही किती गांभिर्याने सांगितले ते ऐका- " राष्ट्रवादी त्यांचा निर्णय घेतीलच, (उगाच इतरांनी काळजी करू नये....)

मी व्हिडिओ पाहणार नाही. तुम्ही तुमचं मत लिहा.
"तेरा दिवस उलटून देत त्यानंतर राजकारण सुरू करावे."
हे तुमचेच शब्द‌ आहेत

हे मत जनसामान्यांचं आणि माझं झालं हो. अंजली दमानिया आणि इतरही हेच म्हणताहेत. तरीपण मी माझं चुकलं म्हणतो. कारण आतील काही गोष्टी आपल्याला कळत नाहीत.
जयंत पाटलांना अर्थखातं द्यायला लावून बजेट त्यांनी मांडण्याचा डाव होता. शिवाय सुप्रिया सुळेंना "पक्षामध्ये" काही विशेष जबाबदारीही.
बाकी अर्थखात्यातले सचीव, विशेष सरकारी अधिकारीच बजेटचे विविध पर्याय अभ्यास करून मंत्र्यांकडे देत असतात , मंत्री फक्त शेवटची सही करतात असा माझा समज आहे. आठ पंधरा रात्री दिव्यातले तेल जाळून मंत्रीच बजेट ..अर्थसंकल्प बनवतात यावर माझा तरी विश्वास नाही.
पटलं तर घ्या.

राज्याला पहिल्या महिला उप मुम मिळाल्या. आता राज्याचे खूपच भले होणार. पुण्याच्या पालकमंत्री पण झाल्यात म्हणे. अर्थ खाते काढून घेतले बहुदा. काका आणि सुसु हरिहरी करत बसले. सुसु ची तर जाम फजिती.

पटवून घेतलं हो.
आता होणार राज्याचं भलं. उगाच माझी मुक्ताफळं आड यायला नकोत.
________________________________________________
"मला आनंद झाला नाही "- जयंत पाटील. ( पण विलीनीकरणाची जबाबदारी माझ्यावर दिली होती!). म्हणजे काय तर घड्याळवाल्यांच्या खांद्यावर बसून वाकुल्या दाखवाणार?

त्यांच्या पक्षात काय हवे नको ते राजसाहेब ठरवणार हे आणखी एक.

>>राज्याला पहिल्या महिला उप मुम मिळाल्या. आता राज्याचे खूपच भले होणार. <<
हि बाब कोणालाच खटकली नाहि? आगदि मिडियालाहि? त्यांचं शिक्षण काय, प्रशासकिय अनुभव काय याचा काहि विचार न करता डायरेक्ट उपमुख्यमंत्री? सरंजामशाहि यालाच म्हणत असावेत...

प्रशासकीय अधिकारी, वैयक्तिक सचीव, शासकीय खाते दिमतीला असतेच. पंधरा दिवसांत शिकतील.
पण अशी काही उडी मारायला न मिळालेले खट्टू झालेत हे मात्र खरं. [ रामकृष्णहरी]

अरे वा.....१५ दिवसांत शिकतील का? बरं बरं ....मग उगीचच भक्तांनी फडणविसांच्या आणि चमच्यांनी अजित पवारांच्या प्रशासनावरील पकडीचे ईतके स्तोम माजवले आहे/होते, उगीचच चाय से किटली गरम यातली गत..... Biggrin

राज,

पक्ष त्वरीत थोरल्या पवारांच्या अखत्यारीत गेला असता जे काही नेत्यांना नको होते. याचे कारण फक्त हे नाही की थोरले पवार ८० - ८५ आहेत. सुप्रिया ताई विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात ते सुनेत्रा पवारांना 'बाहेरून आलेले व मग पवार झालेले' असे म्हंटले होते. थोरले पवार राष्ट्रवादीच्या इतर ज्येष्ठ नेत्यांना नकोसे होणे याची कारणे थोरल्या पवारांनी आयुष्यभर घेतलेले चक्रावणारे राजकीय निर्णय , सुप्रिया ताई यांना राजकीयदृष्ट्या स्थिरस्थावर करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाणे आणि स्वतःचे राजकीय भवितव्य अनेक वर्षांपूर्वीच निरर्थक झालेले असूनही हस्तक्षेप करून निष्ठावंतांना धोरणात्मक निर्णय घेऊ न देणे ही आहेत.

It's obvious, KARMA RETURNS.

बाहेरून आलेल्या (!) सुनेतराजी आज सर्वेसर्वा होण्याच्या मार्गावर आहेत. सुप्रिया ताई यापुढे ना दिल्लीत काही होणार ना महाराष्ट्रात भावजयीला रिपोर्ट केल्याशिवाय पुढे जाणार.

पटेल, तटकरे इत्यादींनी कर्म कसे परत येते हे दर्शवले आहे. फडणवीसांनी तथाकथित चाणक्य केव्हाच घरी बसवला होता, आता घरी तरी बसावे की नाही या अवस्थेत आणला आहे.

अत्यंत वाईट बाब ही आहे की हे सगळे होण्याचे कारण ती भयानक दुर्घटना, ज्यात रस्त्यावर टपरी टाकणाऱ्या आणि शेतात राबणाऱ्या जनतेचा सर्वात लाडका व हक्काचा माणूस निघून गेला.

पुलोद, परदेशी सोनियाजी, जनतेच्या लाडक्या पुतण्याकडे पक्ष न सोपवणे आणि इतर असंख्य (येथेच नव्हे तर कोठेही नोंदवू नयेत अश्या) बाबी 'पेराल ते उगवेल' ही म्हण खरी करत आहेत.

माबोच्या भाषेत, भो आ क फ!

२०१९ मध्ये सत्तेत जाण्याचा( सुप्रियासह) आलेला चांगला योग बिघडवला आणि आता किती ती धडपड?
.........
विलिनीकरण या गोंडस शब्दामागचं राजकारण --
https://youtu.be/II1IbnULFxg?si=4sRBbc2VD5l5LRO4

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल यांची नियु्क्ती केल्याचं वक्तव्य भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

सुनेत्रा पवार आता आपला पक्ष भाजपचा मांडलिक करून सोडतात की आपलं स्वतंत्र अस्तितव टिकवू शकवतात यावरून अजित पवारांची पत्नी म्हणून त्यांच्याकडे आलेल्या जबाबदारीचं त्या काय करतात हे ठरेल.

शरद पवार आता कुठल्याही आमदाराला माघारी फिरून विरोधात बस असे सांगणार नाहीत, कारण तसे केले तर ईडी चा त्रास मागे लागेल! सत्तेत राहून बरीच जमापुंजी एकत्र करून मग पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी एक होतील. दोन्ही राष्ट्रवादी + शिवसेना + काँग्रेस+ एंटी इनकंबनसी हा मोठा फौजफाटा भाजपा +ईडी+ शिंदेसेना+ निवडणूक आयोग ह्या युतीची दाणादाण उडवू शकतो! पण ह्या साठी निकराचे प्रयत्न करावे लागतील, ईडी ने कितीही त्रास दिला तरीही भाजप प्रवेश न करणे + जितेंद्र आव्हाड पॅटर्न म्हणजे ईव्हीएम मशीन्सवर बारकाईने लक्ष ठेवणे. असे केल्यास ईडी आणी निवडणूक आयोग ह्यांचा भाजपला होणारा रसद पुरवठा तोडता येईल, लक्ष्मीवाटप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याना जागेवर प्रसाद तसेच डुप्लिकेट वोटिंग करणाऱ्याना जागेवर ठेचले तर भाजप+ शिंदेसेना जास्तकाळ तग धरू शकणार नाहीत!

आणि संविधान वाचवा, मतचोरी, गुजरातचे कारखाने, गुजरातची इविएम मशिने, पडणारा रुपया हे मुद्दे भडिमार करण्यासाठी आहेत.

Pages