महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारेण्ड, भाजप काँग्रेसला मुस्लिमधार्जिणा पक्ष म्हणतो. राहुल खान म्हणतात. भाजपवाले ठाकरेंचा उल्लेख जनाब उद्धुदिन असा करतात. ममताबानो म्हणतात. पेराल ते उगवतं. तुम्ही धर्मावरून द्वेष पसरवा. आम्ही जातीवरून पसरवू. मनोहर जोशींना ब्राह्मण म्हणून हिणवलं का कोणी? तसंच भाजप जातीवरून भेदभाव करतं हे दिसतंय. उत्तर प्रदेशात ठाकुर गुन्हेगारांना संरक्षण, यादवांना फटके. इथेही दलित अ त्याचाराकडे कानाडोळा. भीमा कोरेगावनंतर पोलिसांनी किती छळलं ते मेन् स्ट्रीम मीडियात आलेलं नाही. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी फडणवीस खोटं बोललेत. काँग्रेस राकॉ मधले मराठा नेतेही प्रत्यक्षात जातीयवादीच आहेत. पण पक्ष म्हणून ते धोरण नाही, जे भाजपचं वाटतं. यात पोलिटिकल संधीसाधूप णा आहे की गांधी नेहरूं राहुलमुळे ते तसं आहे हे ज्याचं त्याने ठरवावं
. आणि महाराष्ट्रात याला थोरल्या शिवाजीराजांपासून ते शाहूमहाराज - टिळक , टिळक फुले चिपळूणकर आणि नथुरामापर्यंतचा इतिहास आहे. फडणवीस आणि भाजपने नथुराम नाकारलाय का? तो स्वीकारायच्या दिशेने पावलं टाकताहेत. मोदी फडणवीस उघडपणे पोलिटिकली करेक्ट बोलतात. पण हे असलं बोलायला दुसरे लोक ठेवतात. सोशल मीडियावरचे ट्रोल लिहितातच. इथेही आहेत .शाखेत काय सांगतात ते कधीकधी बाहेर येतं- अनंत हेगडेसारख्या लोकांच्या तोंडातून.

आपण ज्या जातीत , वर्गात जन्मतो, त्यानुसार आपल्याला कोणत्या गोष्टी अधिक टोचतात ते ठरतं. कंडिशनिंग. तुम्हांला हे खटकणं स्वाभाविक आहे. इथले काही भाजपवाले आयडी मला आरक्षणाच्या जिवावर लायकी नसताना नोकरी मिळवलेला , फुकट पगार घेणारा असं हिणवायचे. मी ओबीसी आहे आणि प्री मंडल काळत शिक्षण आणि नोकरी लागला आहे. प्रत्यक्ष आयुष्यात मी जात वापरलेली नाही. माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेटही नाही. त्याने त्यांना फरक पडत नाही. हे तुम्हांला माझ्याएवढं खटकणार नाही.

आता थांबतो. कामं करायचीत.

आता ती एकगठ्ठा एखाद्या माय्नॉरिटी पक्षाला जात असतील तर ते भाजपाचं यश आहे>>> जशी शिवसेना कॉग्रेसने वाढायला दिली तशीच भाजपाने एमाआयएम... हे ढळढळीत वास्तव कुणाला दिसत नसेल तर तो राजकारण समजण्यात अगदीच कच्चा लिंबू आहे अथवा निखालस खोटारडा फडणवीस आहे, असे खुशाल समजावे.

एम आय एम ला वाढवणं हे साम दाम दंड भेद यातल्या भेद नीतीत येतं. त्यांना हे माहीत आहे. त्यांच्यामते हा धूर्तपणा, चाणक्यनीती आहे. कपटीपणा नाही.

संघभाजपचं अंतिम आणि एकमेव उद्दिष्ट भारत हिंदूराष्ट्र करणं, सध्याचं संविधान मोडीत काढणं हे आहे. लोकशाहीवर भाजपचा कधीच विश्वास नव्हता. त्यासाठी निरंकुश बहुमत हवं. हे झालं की मुस्लिमांना ऑफिशियली दुय्यम नागरीक करता येईल. आताही केलं जात आहे. सार्वत्रिक मताधिकार या लोकांना मान्य नाही. त्यासाठी एस आय आर.
ही ऑपरेशन्स करताना विकसित भारत दाखवणं हा अ‍ॅनास्थेशिया आहे.

मुस्लिमांनी तातडीने पाच पाच पोरे जन्माला घालून मतदार संख्या वाढवली नाही >> षेंढे, तुम्ही ८ घालायला हवीत, हींदू खतरेमे है!

आपण ज्या जातीत , वर्गात जन्मतो, त्यानुसार आपल्याला कोणत्या गोष्टी अधिक टोचतात ते ठरतं >> वॉव! सिरीयसली? मुस्लिम किंवा दलितांबद्दल जेथे शेरे मारले गेलेत अशा धाग्यांवर माझ्या पोस्ट अजूनही सापडतील. शंका असेल तर शोधून देतो. इव्हन मराठा मोर्चाच्या वेळेला हे लोक सत्तेत इतकी वर्षे होते वगैरे शेरे लोकांनी मारले तेव्हा सर्वसाधारण मराठा हा गरीब आहे, त्याला शिक्षणाची पार्श्वभूमी नाही व केवळ त्याच्या जातीतील लोक सत्तेत होते याने त्याच्या स्थितीत काही फरक पडलेला नाही वगैरे लिहील्याचे लक्षात आहे.

भाजपचा व भक्तांचा मुस्लिम द्वेष ऑलरेडी इथे एस्टॅब्लिश झालेला आहे. पण स्वतःला पुरोगामी म्हणणार्‍यांचा नाही. त्याचे उदाहरण तो 'पेशवे' चा उल्लेख होता.

पक्षाचे उघड धोरण नसणे हा जर फ्री पास असेल तर भाजपचेही दलितविरोधी उघड धोरण नाही (निदान महाराष्ट्रात). फक्त मुस्लिम विरोधी आहे. आणि तुम्ही धर्मावरून कराल तर आम्ही जातीवरून करू हे एखाद्या पक्षाच्या कट्टर भक्तांना सांगायला ठीक आहे. सर्वसामान्य मतदारांच्या दृष्टीने दोन्ही सारखेच. कोरेगाव भीमा च्या बाबतीत एकाकडून पूर्ण उपेक्षा तर दुसर्‍याकडून केवळ राजकीय फायदा करायला आधी जाहीर बडबड पण प्रत्यक्षात स्वतः सत्तेत आल्यावर काहीही वेगळे न करणे. पक्षाच्या समर्थकांत लठ्ठालठ्ठी करायला या दोन्हीत फार मोठा फरक असेल, पण प्रत्यक्ष दलितांच्या दृष्टीने पाहिले तर काहीच नाही. उलट गेल्या ८-१० दिवसांपूर्वी तेथील समारंभाबद्दल फेसबुक पोस्ट आल्या तेव्हा आपल्या प्रोफाइलवर सरंजामी बिरूदे मिरवणार्‍या अनेकांनी त्यावर काय भाषेत प्रतिक्रिया दिल्यात हे पाहिले तर नक्की धोका कोणाकडून आहे ते ही लक्षात येईल.

तेव्हा भाजप जातीयवादी आहे हे मोजायचे कोणत्या नेत्याच्या तुलनेत? रागा म्हंटलात तर ठीक आहे. पण महाराष्ट्रात कोणी नाही.

विकु, तुमच्या feudal संदर्भाबद्दल - महाराष्ट्रात तो प्रवास उलट्या दिशेने चालला आहे. पब्लिकला सरंजामी स्वप्ने पडू लागली आहेत. सर्वसामान्य लोकांनाही त्याचे काहीतरी विचित्र आकर्षण आहे. गेल्या काही वर्षांत लोकांच्या नावापुढे 'राजे' वगैरे खूप दिसू लागले आहे. इव्हन मिडीयाने या निवडणुकीत निकालाची चर्चा करणार्‍या कार्यक्रमांना मुंबईचा राजा कोण, किंग ऑफ मुम्बई वगैरे असल्या स्लोगन्स वापरल्या.

एक अवांतर - आयपीएल टीम्सची नावे जर इतर देशातील प्रीमियर लीग्जच्या संघांच्या नावांच्या तुलनेत बघितली तर तेथेही हे जाणवेल Happy किंग्ज, सुपर किंग्ज, रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स नाईट रायडर्स ई.

'इथे" म्हणजे मायबोलीवर, या धाग्यावर. मागच्या काही पोस्टी वाचल्या तर दिसेल. एस्टॅब्लिश झालाय म्हणजे या धाग्यावर ते अनेक लोकांनी ऑलरेडी लिहीले आहे.

लोकसत्ताची फ्रंट पेजची बातमी आहे. मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव फडणवीस चर्चा ? ठाकरे गट भाजपच्या पाठीशी.

असं झालं तर फार मजा येईल, माझ्यासकट सगळे तोंडावर पडतील. मग सगळे मिळून रिंगा रिंगा रोझेस.... ऑल फॉल डाउन म्हणूया. Lol

पण हे बहुतेक शिंदेंना वठणीवर आणायचं टॅक्टिक असेल. त्यांनी आपले नगरसेवक हॉटेलात लपवून ठेवलेत ते भाजपपासून हे सिंधूताईंना उमगेल का? भाजप कशी पळवापळवी करतं याचा त्यांना व्हाया सूरत - गौहाटी - पणजी असा अनुभव आहे.
--
फारेण्ड , तुमच्या प्रतिसादावरून दुपारी लिहितो.

अजिबात नको.
शिंदे थोडे दिवस रुसतील. विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून रुसले तसे. त्यांचे ंगरसेवख सत्तेसाठी हपापलेले आहेत. ते दबाव आणतील

ठाकरेंना शिंदे जवळ करायचे असेल तर खुशाल करावे,पण काँग्रेसने अजिबात पाठिंबा देऊ नये. सत्तेपासून दूर रहावे.

ES.jpg
जगी जीवनाचे सार जाणुनी घेई रे सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतसे ईश्वर
क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट
कुणी त्यागी जीवन अपुले दु:ख जगी करण्या नष्ट
देह करी जे जे काही आत्मा भोगतो नंतर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतसे ईश्वर

भरत - काही घाई नाही आणि तशी गरजही नाही. मला फक्त कोणालाही जातीवरून काही म्हंटले तर ते खटकते इतकेच लिहायचे होते. ब्राह्मण, दलित, मराठा, मुस्लिम कोणालाही. आता लिहायला लागलो की एकावर एक पॅरा वाढत जातो Happy

बाकी तुमचे मुद्दे समजले. सगळे पटले असे म्हणू शकत नाही, पण समजले.

कॉन्ग्रेसचा { आणि राष्ट्रवादीचाही} मुस्लिम मतदार दुसरीकडे वळल्यावर ते काय निर्णय घेतात पाहू. त्यांच्यासाठी हे दोन पक्ष जिवाचे रान करत होते..( हे संयमित साहित्यिक भाषेत म्हणतो परंतू एक इरसाल वाक्य प्रयोगही प्रचलीत आहे .) " आम्ही विरोधी बाकांवर बसायला तयार आहोत { आणि विरोधी पक्षनेता होऊ } " हा विचारही पुढील दोन निवडणुकांत सोडावा लागेल.
महाराष्ट्रातील राजकारणाचा ( डेरिवेटिव ) एक धडाच ठरेल.

> सर्वसामान्य लोकांनाही त्याचे काहीतरी विचित्र आकर्षण आहे.
स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, राजेशाह्या तर त्याही आधी खालसा झालेल्या होत्या, आज २०२६ मध्येही राज्यात दोन 'छत्रपती' आहेत. महाराष्ट्रासारख्या तुलनेने सुधारीत राज्यात ही स्थिती तर उत्तरेत तर बघायलाच नको. नेत्यांना तलवारी भेट देणे व मग त्यांनी त्या उगारून दाखवणे हाही असलाच एक आचरट प्रकार. छपरी मुलांनी स्वतःच बर्थ डे केक तलवारीने कापला तर एफ आय आर होतो. तसेच करावे यांना.

CMO Maharashtra @CMOMaharashtra Maharashtra @ Davos 2026

MoU Signed between
Govt of Maharashtra & Lodha Developers Ltd.

Total investment: ₹1,00,000 crore
Employment: 1,50,000

Sector: IT/ITes - Data Centres

Region : Mumbai Metropolitan Region

CM Devendra Fadnavis & Abhishek Lodha, MD and CEO, Lodha Group witnessed the MoU signing.
lodha.jpg

लोढा म्हणजे मंगलप्रभात लोढा. भाजपचा सर्वात श्रीमंत आमदार. मंत्री. त्याच्या मुलाशी एम ओ यू करायला डाव्होस गाठलं.

यावर मला srd यांचं स्पष्टीकरण वाचायला आवडेल. विकास विकास म्हणणारे इतर कोणी भाजप समर्थक असतील, तर त्यांनीही सांगा.

त्यांना इतर ठिकाणी देखील डील मिळू शकतात म्हणून Davos येथे गेले आहेत.

शिवाय Davos ही एक सरकारी सहल झाली आहे आणि मुख्यत्वे MOU तेवढे sign करून आले की महाराष्ट्रामध्ये आकडे फेकायला काहीतरी बेस मिळतो की अमुक इतके लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आणली वगैरे. प्रत्यक्षात ते किती जमिनीवर येते हे आकाशातल्या बापालाच ठाऊक

जसे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दावोसला जातो, तसे कधी इतर राज्यांचे गेले आणि डील करून आले असे पाहण्यात/वाचण्यात आले नाही.

भरत, मला Davos किंवा त्याचा ट्रॅक रेकॉर्ड माहीत नाही. पण नेट सर्चमध्ये कळले की त्या ठिकाणी दरवर्षी राजकारणी( विविध देशांतील )आणि मोठे उद्योगपती भेटतात आणि व्यापारविषयक करार करतात. एक तो कट्टा असावा. त्यात एक आदित्य ठाकरे यांचाही विडिओ दिसला. लिंक https://youtu.be/8tR3xHqnARI?si=YFMcShxPA6oMJv-E
प्रत्येक वर्षी कोण कोण येणार किंवा नाही येणार आणि त्याची संभाव्य कारणांची चर्चाही दिसत आहे. सध्या ग्रीनलँड, ट्रंप, यूरोप राष्ट्रांवर लावलेला कर चर्चेत आहे. त्यामुळे काही जण येणार तर काही नाही.
तिकडेच जाऊन आपल्याच उद्योगांशी करार का करायचा हा मुद्दा असला तर मलाही समजले नाही. करार झाले की स्वागत आणि विरोधकांची टीका दोन्ही आहे. कोणत्याही मोठ्या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय/ जागतिक टेंडरस मागवले लागतात पण डावोसमध्ये थेट करारच करता येण्याची पळवाट असते का माहीत नाही. यावर उगाचच माझे अर्धवट मत देऊ शकणार नाही.
उद्योजकांना गुंतवणूक करून व्यवसाय वाढवायचाच असतो. अमुक एक सरकारशी करार करायचा किंवा नाहीच अशी भूमिका ठेवत नसावेत.

वेळ काढून फडणवीसांनी गेल्या वर्षी केलेल्या करारांची माहिती आणि त्यांचं पुढे काय झालं हे संकलन करेन. कोणाला वेळ असेल, तर त्यांनी करा.
सरकारी संकेतस्थळावर डिटेल्स आहेत.
https://maitri.maharashtra.gov.in/wef-2025-mou-updates/
बहुसंख्य करार इथल्याच उद्योगपतींसोबत झाले अशी टीका गेल्यावर्षीही झाली होती. पहिली तीनही नावं पुण्यामुंबईची आहेत. जर फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नसेल तर हे नक्की कशासाठी?

आवाज कहा तक जानी चाहिये
लाहोर तक…
कहा तक
लाहोर तक…

कहा तक
लाहोर तक…

कहा तक
लाहोर तक…

हिंदुस्तान हिंदुस्तान

लाहोरतक आवाज गेला तर ट्रंपकाका आणखी टॅरिफ लावतील. तेव्हा गप बसा. अमेरिकेतल्या भारतीयांना हाकलतील. तेव्हा गप बसा. ट्रंप विश्वगुरू, विश्वदादा, ब्रह्मांडनायक असं सगळं आहेत

महाराष्ट्रातील राजकारणाची आश्चर्ये काही संपत नाहीत. मनसे आणि शिंदे शिवसेना ह्यांची सत्तेसाठी आत्ता युती होऊ शकते हे माझ्या कल्पनेपलीकडले आहे. बहुतेक मी राजकारणात नाही कारण मला असले काही कळत नाही.

Pages