महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मनसे आणि शिंदे शिवसेना ह्यांची सत्तेसाठी आत्ता युती होऊ शकते हे माझ्या कल्पनेपलीकडले आहे<<
मुंबई महानगर पालिकेत उबाठा, राठा, शिंदे, काँग्रेस एकत्र आले तर आश्चर्य वाटुन घेउ नका...

काँग्रेसने अंबरनाथमध्ये पक्षधोरण मोडणाऱ्या नगरसेवकांना जसे निलंबित केले तेच सर्वठिकाणी करावे. पाठिंबा अजिबात देऊ नये. सत्तेसाठी वखवखलेले नाही हे दाखवून देणे. दीर्घकाळात फायद्याचे ठरेल.

आग्या +१.

BJP is going to get the taste of its own medicine. करावे तसे भरावे. गुरूची विद्या गुरूला.
भाजपने सत्तेसाठी सगळे विधिनिषेध सोडले. पक्ष फोडले. वाट्टेल तश्या युत्या केल्या. राकॉला कास्टवादी म्हणायचे. दोघांच्या समर्थकांत ब्राह्मण मराठा जुना द्वेष खदखदत असायचा. त्यांच्याशी युती केली. या पक्षांनी केली यात नवल नाही. पण भाजप स्वतःला तत्त्वनिष्ठ , पार्टी विथ द डिफरन्स , तथाकथित महान तत्त्वे शिकवणार्‍या संघाचे अपत्य म्हणवतो. त्याने हे केलं तिथेच त्यांचे मुखवटे फाटले. त्यांच्या जुन्या समर्थकांना हे पटले नाही. पण हे हिंदुराष्ट्रासाठी होतंय म्हणून मान्य करत गेले.
हिंदूराष्ट्र होऊन नक्की काय बदल होणार आहे तेही माहीत नाही. समान नागरी केला तरी त्याने हिंदूंचं काय भलं होणार? उलट १९५० मध्ये यांनीच हिंदू कोड बिलाला विरोध केला होता. समान नागरी कायदा, एस आय आर आणि मॉब लिंचिंग पोलिस पॉवर वापरून मुसलमानांचं नागरिकत्व, मताधिकार काढून घेतील. त्यांना छळातील.
. आता मिशनर्‍यांच्याही मागे लागलेत. भारतातल्या मुसलमानांना छळलं तरी आखाती मुस्लिम देशांना काही फरक पडत नाही. पण ख्रिश्चनांना छळलं की गोर्‍या जगात त्याचे प्रतिसाद उमटतात. इथे भारतीय स्थलांतरित मोठ्या प्रमाणात आहेत. स्थानिक लोकांपेक्षा यांची आर्थिक ,सामाजिक , शैक्षणिक स्थिती चांगली आहे. इंग्लंड , अमेरिका , आयर्लंडमध्ये सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोचलेत.
युरोप अमेरिका कॅनडात ऑस्ट्रेलिया , न्युझीलंडमध्ये आताच ब्राउन लोकांबद्दल द्वेषाच्या तुरळक घटना होताहेत. त्यात हे भारतीय इथल्यासारखे रस्त्यावर उत्सव साजरे करताहेत. देवळं बांधताहेत. इथली चर्चेस जशी इथल्या बजरंग दलाला खटकतात तसं तिथल्या मागा पब्लिकला आणि white supremacists ना हे सगळं खटकत असेल. तेव्हा भारतात जे होईल त्याचे परिणाम श्वेत जगात नक्की होतील.
इथल्या धर्मांधांना त्याची अक्कल नाही.

https://www.thecitizen.in/index.php/en/NewsDetail/index/2/14967/World-Hi... हे ओप इंडियासारखंच पार्टिझन पोर्टल असावं. ज्यांना ओप इंडिया आवडतं, त्यांना याबाबत आक्षेप घेता येणार नाही.

आता महाराष्ट्राकडे वळूया. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या कल्याण डोंबिवली या स्वतःच्या गावात आणि गृहजिल्हा ठाण्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
विधानसभा २०२४ च्या निवडणुकांनंतर शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी अडले होते, तेच मुंबईतही होतं आहे.
भाजपही नेहमीप्रमाणे इतर पक्षांमध्ये तोडफोड करू लागला आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, चौकशी यंत्रणा आहेत. आता तर गुंडगिरीही करू लागलेत. याचे परिणाम होणार नाहीत? १९८९ मध्ये ठाण्यात श्रीधर खोपकर या नगरसेवकाचा खून झाला तेव्हा मी ठाण्यातच नोकरीला जायचो. तेव्हा काँग्रेसने खेला केला होता. आता भाजप तो सगळीकडे करतो आहे.

काँग्रेसने या प्रकारापासून दूर राहावं. २०१९ मध्ये महाविकास आघाडीत येण्यासाठी त्यांनी भरपूर वेळ घेतला. सेक्युलरझिम ही कंडिशन ठेवली. मुख्यमंत्री ठाकरेच हवेत, हाही आग्रह धरला. हे सगळं योग्य केलं. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन घोळ घातला नसता तर महाविकास आघाडीचं सरकार २०२४ पर्यंत कदाचित राहिलं असतं . काँग्रेस मध्ये तत्त्वशून्य नेते भरपूर आहेत. ते जातीलच भाजपमध्ये पण पक्ष म्हणून त्याने तत्त्व पाळावीत. अंबरनाथमधली कृती अगदी योग्य होती. असं करताना काँग्रेस पक्ष संपला तरी मला चालेल. लढले म्हणून इतिहासात नोंद होईल.

निवडणूक आयोगाच्या गमतीजमती आणि भाजप नगरसेवकांची वाढलेली संपत्ती याबाबत srd यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. तिथे त्यांना सगळे अँगल जाणून घ्यायची गरज पडली नाही. दाव्होसबाबत मात्र याबद्दल फार माहीत नाही, असं सांगितलं. ही प्रगती आहे. अभिनंदन.

निकालानंतर एम आय एम च्या नवनिर्वाचित प्रतिनिधींनी आणि नेत्यांनी द्वेष पसरवणारी वक्तव्ये केली आहेत. सगळं कसं भाजपच्या सोयीचं.

भाजपा फारच खेळी करत आहे. धास्तीने पटावरच्या सोंगट्या सैरावैरा उड्या मारत आहेत, पळत आहेत. एमाइएमशी युती करून त्याचंही कॅसल करून टाकतील. कॅसल केल्याने राजा सुरक्षित होतो पण एक हत्ती डांबून ठेवला जातो.

एम आय एम ला भाजपच पोसतो.
असं करून इतर पक्षांना मिळणारी मुस्लिम मतं एम आय एम कडे वळवायची. त्यांना कमकुवत करायचं. शिवाय एमे आय एम ची भीती दाखवून हिंदूंचं आणखी ध्रुवीकरण करायचं
इतर पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात चौकशी यंत्रणा लागतात. नवाब मलिक, हसन मुश्रिफ ही मुस्लिम नेत्यांची उदाहरणं. एम आय एमच्या एखाद्या नेत्याला असं धरलंय का?

कल्याण डोंबिवलीत काय ठरतंय शेवटी? फडणवीस परतल्यावर शिंदे भाजप मांडवली होईलच. पण रवींद्र चव्हाणांनी युतीवर घातलेल्या घाल्यांच्या जखमा राहतीलच.
शिंदेंच्या दोन उमेदवारांनी भाजपने आम्हांला पाडलं असे फलक लावले आहेत.

हे स्थानिक पातळीवर आहे म्हणून डोळेझाक करा. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेच एकमेकांविरोधात बोलताहेत. अजित पवार आणि रवींद्र चव्हाणही.

फडणवीस नामानिराळे.

युती घडवून आणाण्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांचा वाटा होता. त्यांनी युतीत तरी कपटीपणा केला नव्हता. फडणवीस कपटीपणा शिवाय दुसरं काही करत नाहीत. वाजपेयी मोदींमध्येही हाच फरक आहे.

एमयायेम ला हवा देण्यामागे कॉंग्रेसचा उरलासुरला मुस्लिम जनाधार काढून घ्यायचा आहे. बहुसंख्य हिंदू कॉंग्रेस विरोधात आहेतच. कॉंग्रेस एकाच पक्ष आहे जो राष्ट्रीय स्तरावर ततग धरून आहे. मुस्लिमांनी एमयायेमला अगदी 100% मतदान केलं तरी तो कधीच सत्तेत येऊ शकणार नाहीये. पान त्यांचा बागुलबुवा उभा करून भाजपला ध्रुवीकरण करता येतं , जसं मुल्ला मुलायमचा बागुलबुवा उभा करून उप्र मधे केलं. त्यामुळे एम आय एम ल मांडीवर बसवून ठेवतील आणि वेळ आली की ढकळून देतील

भरत आणि भ्रमर यांच्याशी सहमत.
शिवाय आम्ही मुस्लिमविरोधी नाही ही बतावणी करायला मोकळे. चांगलीच पाचर मारली आहे. ओवैसींचे श्रेयही गायब होणार.

सध्या बीजेपी जे काही उद्योग करत ते एका दृष्टीने चांगलेच आहे. हिंदूंचे नव्हे तर देशातील सर्वसामान्य जनतेचे डोळे उघडले जाण्यास हेच उद्योग कारणीभूत ठरेल.

स्वातंत्र्य पूर्व काळात मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेची युती झाली होती. काँग्रेसला दूर ठेवणं हाच उद्देश.

मुस्लिम विरोधी नाही ही बतावणी कशाला करतील? मुंबईचा महापौर खान नको म्हणून अमित साटमने कल्ला केला. त्याच्याच विधानसभा क्षेत्रात दोन मुस्लिम नगरसेवक निवडून आलेत. त्यात ला एक ठाकरे गटाचा आहे.

भाजप समर्थकांनी भ्रष्टाचार्‍यांशी तडजोड मान्य केली. कास्टवादीला सहन केलं. आता एम आय एमलाही सहन करा.

दोन कट्टर भाजप समर्थकां च्या विरोधात केसेस दाखल झाल्या आहेत किंवा कारवाई झाली आहे. मनकर्णिका घाट आणि तपोवन वृक्षतोड.

भाजप कोणाचाही नाही, फक्त अडाणीचा आहे.

दावोस मधे जाऊन लोढांशी एम.ओ.यु.

एन्जॉय स्नो.

वरुन त्याचं निर्लज्ज समर्थन. "लोकांना समजत नाही"

यू क्नो नथिंग, जॉन स्नो....

महाड निवडणूक राडा प्रकरणात आज उच्च न्यायालयाने
फडणवीस सरकारची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. मंत्री गोगावले यांचा मुलगा व पुतण्या जामीन फेटाळूनही दीड महिन्यापासून फरार आहेत, तरीही पोलीस हातावर हात धरून का बसले आहेत?

'मुख्यमंत्री इतके हतबल आहेत का?' हा न्यायालयाचा सवाल

गृहमंत्र्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.

मी आज संध्याकाळी बॉर्डर पिक्चर बघायला जाणार आहे. जास्त जोश यावा म्हणून आता काऊंटर स्ट्राईक गेम खेळत आहे.

गृह्यखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री महोदयाविरोधात न्यायालयाने ताशेरे ओढल्यावर 24 तासात विकास गोगवले हजर होतो!

कसेही करून मुंबईत आपला महापौर बसवण्यासाठी कोण तो आटापिटा.. अनुसूचित जाती करता चिठ्ठी टाकली नाही असं ठाकरे गटाचा आक्षेप आहे, अर्थात त्याला केराची टोपली दाखवली जाईलच म्हणा.

किरीटने आरोप केलेले सगळे नेते निर्दोष सुटलेत. आता बहुतेक त्याला श्रीकांत शिंदेवर सोडतील. अंबरनाथचा बदला घ्यावा लागेल ना

काल बॉर्डर २ बघितला आणि काहीच कळेना मी कोण आहे कुठे आहे. काय सुरू आहे नक्की. मी कोमात तर नाही ना. सकाळपासून जुना बॉर्डर २ वेळा बघितला तेव्हा कुठे आता बरं वाटतय.

महाराष्ट्रात सत्ता आहे कमळ धनुष्यबाण आणि घड्याळाकडे . अजितदादांच्या गमनानंतर तुतारी गट उगाचच धावपळ करत आहे. मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे तरी विविध नेते मुख्यमंत्र्यांना भेटून श्रीमती सुनेत्रा पवारांना उप मुख्यमंत्री बनवून टाका सांगायला गेले. किती ती घाई!
तर पलिकडे राष्ट्रवादी एक झाल्याच्या वावड्या उडवल्या जात आहेत. कधी एकदा केंद्रात आणि राज्यात सत्तेच्या रथात बसतो असं होऊन गेलंय तुतारी गटाला.( Climb the bandwagon)

तुतारी गट म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार. त्यांचे रक्ताचे संबंध आहेत अजित पवारांशी. कुटुंबावर झालेल्या दु:खाच्या आघातानंतर त्यांनी आपला पक्ष आता वेगळा आहे म्हणून दूर राहायला हवं होतं? हे सगळं ते सत्तेसाठी आणि पक्ष एकत्र आणण्यासाठी करताहेत असा विचार तिन्ही त्रिकाळ सत्तेचा विचार करणारे भाजपायीच करू शकतात.

अनुभवशून्य सुनेत्रा पवार यांना केवळ पवार आहेत म्हणून थेट उपमुख्यमंत्री म्हणून बसवणे हा केवळ वेडेपणा आहे.
जयंतराव पाटील, सुनील तटकरे किंवा अन्य कोणी लायक माणूस नाही काय पक्षाकडे?
दोन पुरुष आणि एक स्त्री हा एक मोठा लॉजिस्टिक्स प्रोब्लेम होईल.
अगदी सर्व ठिकाणी त्यांची वेगळी सोय करावी लागेल.
प्राध्यापक किंवा डॉक्टरच्या बायकोला त्यांच्या पश्चात कुणी तेच काम करायला सांगेल काय?
बेचाळीस पैकी एकही सक्षम आमदार नाही पक्षाकडे?

Municipal Corporations final party wise position.pdf (177.74 KB)
मनपा पक्षनिहाय निकाल
२९ पैकी १३ मनपांमध्ये भाजपला एकट्याला स्पष्ट बहुमत आहे. काँग्रेसला फक्त लातूरमध्ये स्पष्ट बहुमत आहे. शिंदेसेनेला ठाण्यात बहुमत. कल्याण डोंबिवलीत भाजपपेक्षा ३ जागा जास्त. मुंबई आणि परभणी सोडली तर ठाकरे सेना अन्यत्र नसल्यात जमा. त्यांनी मुंबईत शिंदेनसेनेच्या दुप्पट + जागा घेतल्या. दोन्ही राकॉला कुठेही बहुमत नाही. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत.
कुठे कुठे कुणाकुणाच्या निवडणूक पूर्व आणि निकालानंतर युती आणि आघाड्या होत्या / आहेत त्याची बरीच भेळ आहे.
पण भाजप + शिंदेसेना + अजित पवार अशीच युती राहिली तर २९ पैकी २२ ठिकाणी महायुती बहुमतात आहे. (चुभूद्याघ्या)
२७ जिंकू असा भाजपला विश्वास होता.
बसप, आप, वंचित बहुजन , मनसे यांची नावे निकालपत्रात दिसतात. रिपब्लिकन आठवले गटाचे किती जण त्यांच्या चिन्हावर उभे होते? त्यातले किती निवडून आले? यांचा एकतरी आमदार आहे का? आठवलेंना मंत्रीपदाच्या बदल्यात यांनी आपला पक्ष भाजपला वाहून टाकला आहे का?

As the race for mayor heats up across the state’s local bodies, twelve masked men tried to storm a bus near a toll booth in Wardha district and tried to whisk away 20 newly elected Congress corporators f Chandrapur municipal corporation (CMC) early Thursday.

महाराष्ट्रात सत्तेचा सामंजस्य करार घड्याळ गट राष्ट्रवादीशी आहे. ते कुणाला सामावून घेणार का नाही हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवणार. भाजपा कशाला त्यात ढवळाढवळ करेल? आणि बाहेरच्या कुणाशी का बोलणी करेल? विलिनीकरण वगैरे गोष्टी म्हणजे तुतारी गट घड्याळ गटात विलीन होणे हे आहे. दोघे एकमेकांत नव्हे किंवा घड्याळ गट तुतारीत समाविष्ट नव्हे. त्यामुळे कौटुंबिक मोठेपण शरदरावांनी घेतलं तरी कारदेशिररित्या आता तरी घड्याळ चिन्ह पक्षात अधिकार नाही. तुतारी गटातल्या नेत्यांनी घड्याळ गटात प्रवेश घेतला पाहिजे. आणि त्यांनी त्यांचा नेता निवडायला हवा मग ते भाजपा आणि शिवसेनेला निवेदन देऊन शकतात. हा मुद्दा विचारत न घेता केवळ भावनिक हलकल्लोळ माजवणे बरोबर नाही. तेरा दिवस उलटून देत त्यानंतर राजकारण सुरू करावे.
जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायती निवडणुका दोन राष्ट्रवादी गट समजुतीने एकत्र लढवणार तो त्यांचा प्रश्न सम्झौता निर्णय आहे. म्हणजे भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी घड्याळ हे जागा वाटून निवडणूका लढवणार आणि घड्याळवाले त्यांच्या कोट्यातील जागांत तुतारी गटास वाटणी देणार. (किंवा जागावाटप सामंजस्य धुडकावून सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करतील हा त्यांचा निर्णय).
मागच्या महिन्यात अदाणींच्या घरी मा. मोदी आणि मा. शरद पवार बैठका घेत होते पण काय निष्पन्न झाले माहीत नाही.
बघू आता काय होते.
ताक. १.राष्ट्रवादी घड्याळ गटाने त्यांचा नेता म्हणून श्रीमती सुनेत्रा पवार यांना निवडले आहे.
ताक.२. "राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल"- मुख्यमंत्री फडणवीस. आडमार्गाने हेच सांगितले की दुसऱ्या कुणी बोलू नये.

Pages