Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
त्या ऐवजी या दोघांना बाहेर
त्या ऐवजी या दोघांना बाहेर करत रोहीत कोहली यांना घेतले तर. >> I think that boat has sailed now.
त्याला टीममधे बसवण्यासाठी टीमचा बॅलन्स आणि संजू, रिंकूचं करियर बिघडवण्याइतक्या महत्वाचा टी२० प्लेयर च वाटत नाही मला तरी गिल. >> हे पटतेय. गिलला संघात घेण्यापेक्षा त्याला घेऊन थेट उपकप्तान करून आपण चूक केली असे वाटते. त्यामूळे त्याला ड्रॉप करणे अशक्य झाले नि सेट झालेल्या संघात रि-जिग करावे लागले. रिंकु नि संजू दोघेही बाराच्या भावात गेले पार. संजूला खाली स्वतःला एस्टॅब्लिश करता आले नाही हेही तेव्हढेच खरे. त्यामूळे जितेश शर्माला लॉटरी लागली मात्र.
त्याला घेऊन थेट उपकप्तान करून
त्याला घेऊन थेट उपकप्तान करून आपण चूक केली असे वाटते. त्यामूळे त्याला ड्रॉप करणे अशक्य झाले
>>>>>
हे असे नाहीये,
त्याला ड्रॉप करायचेच नाही आणि तीन फॉरमॅट खेळवून विराट कोहलीनंतरचा एक ब्रँड खेळाडू बनवायचे असा प्लान असल्याने उपकर्णधार केले.
या वर्ल्डकप नंतर ऑल फॉरमॅट एक कर्णधार म्हणत तो ट्वेंटीचा कर्णधार सुद्धा होईल.
आणि आता तो एवरेज खेळत असला तरी त्याचा क्लास पाहता हे चित्र कायम राहणार नाही. तो मॉडर्न ट्वेंटी मध्ये फिट बसणारा प्लेअर नसला तरी एकदा धावा येऊ लागल्या की त्या धावांचा impact तसाच ताकदीचा आहे का हे नजरेआड करून धावा तर करतोय म्हणत त्याला पाठीशी घातले जाणार.
“ त्याला ड्रॉप करायचेच नाही”
“ त्याला ड्रॉप करायचेच नाही” +१
त्याला ड्रॉप करता येऊ नये ह्या उद्देशाने त्याला उपकप्तान केलं असं मलाही वाटतं. (ते ब्रँडिंग वगैरे माझ्या आकलनापलिकडे आहे). मुळात इंडियात खेळत असताना ऑफिशियली उपकर्णधार नसतो, बाहेरच्या दौर्यावर असतो. ते एक असो.
जितेशची लॉटरी लागली हे खरंय. पण रिंकू ने त्याची पोझिशन त्याच्या खेळाने गमावली नव्हती. संजूला सुद्धा २-३ मॅचेसच खालच्या नंबरवर मिळाल्या. असो. हे बदलणार नाही, त्यामुळे गिल च अचानक ह्या फॉर्मॅटमधे चमकेल ही आशा ठेवू या.
ब्रँडिंग वगैरे मधे न शिरता
ब्रँडिंग वगैरे मधे न शिरता - गिल टी २० मधे येण्याएव्हधा चांगला आयपील मधे खेळलाय. (टीमचा बॅलन्स आणि संजू, रिंकूचं करियर बिघडवण्याइतक्या महत्वाचा टी२० प्लेयर च वाटत नाही हे मान्य असूनही). त्यामूले तो संघात येणे मला समजतय. आता आत आला कि उपकर्णधार म्हणून तो किंवा संजू ह्यापेक्षा अजून कोणी अजून दावेदार नसणार हे उघड आहे. (ते दोघेही एका वर्षापेक्षा अधिक काळ आयपील मधे कप्तान आहेत) त्यात गिलचा रेकॉर्ड उजवा असल्यामूले त्याला पसंती मिळाली असे वाटले.
आज सुद्धा चेस
आज सुद्धा चेस
पण आज आपण आपला ट्रम्प कार्ड हर्षित राणा बाहेर काढला आहे.
दव आताच पडले आहे. वनडे मध्ये संध्याकाळी दुसऱ्या डावात पडते. ट्वेंटी सुरूच संध्याकाळी होते. त्यामुळे त्याचा फायदा कोणाला कमी जास्त होईल याची कल्पना नाही. पण त्याचा फटका कोणालाही बसू नये. तरच चांगली गोलंदाजी आणि चांगले क्रिकेट बघायला मिळेल.
१ रन दोन विकेट
१ रन दोन विकेट
बुमराह नसल्याने गोलंदाज पेटले पुन्हा
बुमराह नसल्याने गोलंदाज पेटले
बुमराह नसल्याने गोलंदाज पेटले >> हे खरच गौडबंगाल आहे. हे असे सातत्याने होत असेल तर कोचिंग स्टाफला ह्याची नोंद घेणे भाग आहे.
गिल नि सूर्या ईश्यू कंटिन्यूज........
अशियाई कप १९ वर्षाखाली मुले
अशियाई कप १९ वर्षाखाली मुले छान खेळत आहेत.
प्रदूषणामुळे सामना रद्द!
प्रदूषणामुळे सामना रद्द!
Air Quality Hazardous
डिकॉक आमचा परत मुंबईत आला. आज
डिकॉक आमचा परत मुंबईत आला. आज त्याची ब्याटिंग बघायला मजा आली असती. शतक मारणार होता आज.
ब्रेकिंग न्यूज - गिल वर्ल्डकप
ब्रेकिंग न्यूज - गिल वर्ल्डकप संघाबाहेर
ईशान किशन आत
*गिल वर्ल्डकप संघाबाहेर* -
*गिल वर्ल्डकप संघाबाहेर* - त्याला नको इतक्या लवकर कर्णधार बनवल्याने ( कदाचित, रोहितला लवकर बाहेर काढायची घाई असल्याने ), त्याच्या करिअरची वाट लागणार असं दिसतंय. ( ही शंका मी सुरवातीलाच - इंग्लंड दौऱ्याच्या वेळीं - व्यक्त केली होती )
त्याला नको इतक्या लवकर
त्याला नको इतक्या लवकर कर्णधार बनवल्याने >>> खरे आहे. तुम्ही कर्णधारपद हे स्वतःला सिद्ध करून मिळवावे लागते. hard earned captaincy जे रोहीत शर्माबाबत झाले ते गिलबाबत झाले नाही.
गिल ला बाहेर ठेवण्यासाठी जे
गिल ला बाहेर ठेवण्यासाठी जे कारण दिले आहे ते वाचून करमणूक झाली. सूर्याचा फॉर्म पण तेव्हढाच खराब असल्यामूळे फॉर्म हे कारण देता येत नाही म्हणून कोलांट्या उड्या माराव्या लागल्या आहेत. एकाही पत्रकाराला हे कारण गिलला आत आणताना कसे लागू पडले नाही हा प्रश्न विचारावा वाटू नये ?
एकूण चांगला संघ आहे. मधल्या मधे जितेशची विनाकारण कुर्बानी दिली गेली आहे. रिंकू नि जितेश ला चांगले वरदहस्त शोधण्याची गरज आहे.
सूर्याचा फॉर्म चांगला असता तर
सूर्याचा फॉर्म चांगला असता तर कदाचित गिल त्यात वाचला असता. आता आपल्याला दोन दोन फॉर्म नसलेले प्लेअर परवडणार नाहीत म्हणून गिल बाहेर गेला.
कारण सूर्याला काढायचा प्रश्न नव्हता. एकतर त्याचा या फॉरमॅटमधील रेकॉर्ड जगात भारी आहे. आणि कर्णधार म्हणून कामगिरी सुद्धा चांगली आहे. आयत्यावेळी कर्णधार बदल केल्याने टेम्प्लेटच बदलले असते. त्यामुळे तो कुठे जाणार नव्हता.
बाकी सूर्या सुद्धा काही वेगळे करत नाहीये म्हणा. रोहितचाच प्रभाव जाणवतो. त्यानेच सेट केलेले टेम्प्लेट फॉलो करतोय असे दिसते.
आता आपल्याला दोन दोन फॉर्म
आता आपल्याला दोन दोन फॉर्म नसलेले प्लेअर परवडणार नाहीत म्हणून गिल बाहेर गेला. > बरोबर आहे. तू म्हणतोस तसे सूर्या ला गिल च्या आधी पसंती देणार कारण तो प्रोव्हन प्लेयर आहे, कप्तान आहे, हे कारण सहज देता आले असते. जसे बाहेर जाणारे प्लेयर "इंजर्ड " होतात तसे इथे बनावट कारण देण्याची गरज नव्हती.
कर्णधार पदासाठी खेळाडूची टीम
कर्णधार पदासाठी खेळाडूची टीम मध्ये खात्री हवी. कामगिरी हा एक factor आहे. पण तो काही काळासाठी नजरेआड केला जाऊ शकतो. कारण form is temporary, class is permanent. परंतु तंदुरस्ती पुढे हात टेकावे लागतात. बुमराह, पंड्या, श्रेयस असे पर्याय बघितले पण ते fitness साठी सारखे बाहेर असतात - planned or forced.
श्रेयस अय्यर पाहिजे टीममध्ये.
श्रेयस अय्यर पाहिजे टीममध्ये.
अंडर १९ ची फायनल बघा. जाऊ
अंडर १९ ची फायनल बघा. जाऊ द्या नका बघू वाईट वाटेल आणि दुःखी व्हाल.
श्रेयस अय्यर पाहिजे टीममध्ये.
श्रेयस अय्यर पाहिजे टीममध्ये.
>>
मान्य
पण त्याला खेळवायचा कुठे?
३ वर तिलक / संजू / किशन
४ वर सूर्या
५ वर हार्दिक / अक्षर / किशन
इतके ऑप्शन आहेत. ज्यामुळे श्रेयस साठी जागाच बनत नाही.
*पण त्याला खेळवायचा कुठे?* -
*पण त्याला खेळवायचा कुठे?* - जर त्याची उपयुक्तता वादातीत असेल - व माझ्या मते ती तशी आहे - तर आधी त्याची जागा निश्चित करावी व मग बाकीच्या जागा भराव्या ; हे अधिक तर्कशुद्ध नाही वाटत ?
मी तर बोलतोय सूर्याला बाहेर
मी तर बोलतोय सूर्याला बाहेर काढा आणि अय्यर ला क्याप्टन करा अजूनही वेळ गेलेली नाही.
अय्यर सद्ध्या तरी
अय्यर सद्ध्या तरी इंज्युरीमुळे बाहेर आहे, त्यामुळे त्याचा प्रश्न येत नाही.
संजू-अभिषेक ओपनिंगला आणि रिंकू फिनिशर हा सेट-अप केवळ गिल ला टीममधे बसवण्याच्या अट्टहासापायी मोडला होता, तो परत जागेवर आला, ह्याचा आनंद आहे.
अक्षर ऐवजी हार्दिक किंवा बुमराह सारखा कुणीतरी व्हाईस-कॅप्टन व्हायला हरकत नव्हती. त्या दोघांचीही पोझिशन टीममधे अक्षरपेक्षा जास्त पक्की आहे. त्या तुलनेत क्वचित कधीतरी अक्षर-कुलदीप असा टॉस-अप होऊ शकतो. असो… ही शक्यता कदाचित इतकी प्रबळ नसावी. एकंदरीत ही टीम चांगली आहे आणि वर्ल्डकप जिंकण्यासाठी त्यांना भरघोस शुभेच्छा!
श्रेयस अय्यर कुठे खेळला असता?
श्रेयस अय्यर कुठे खेळला असता?
फॉर्म पाहता सूर्याच्या जागी थेट सुद्धा फिट झाला असता.
पण सूर्या असेलच तर,
1. अभिषेक
2. ईशान किशन / संजू
3. तिलक
4. सूर्या
5. श्रेयस
6. हार्दिक
7. अक्षर
8. सुंदर / दुबे
9. वरून चक्रवर्ती / कुलदीप
10. अर्शदीप
11. बुमराह
गिल आणि जितेश शर्मा एकत्र खेळत होते. जर गिल जागी येणारा ओपनर संजू किंवा ईशान विकेट कीपर असेल तर त्याच संघात जितेशच्या जागी अय्यर येऊ शकतो. अर्थात, आता तिथे रिंकू येईल. पण सूर्याचा फॉर्ममुळे मिडल ऑर्डर करा गडबड झाली आहे. लवकर विकेट पडल्या आणि हार्दिक पांड्याला पुढे यावे लागले तर तोही जरा गडबडतो. अशा वेळेस रिंकू पेक्षा अय्यर स्ट्रॉंग पर्याय झाला असता. अय्यरच इंजुरी कितपत आहे याची मात्र कल्पना नाही.
असो, आपला सूर्या दादा फॉर्मला आला तर सगळे प्रश्न सुटतील.. पांड्या आणि रिंकू आपल्या भूमिकेत खेळतील.
गंभीर डावे - उजवे ह्याबा, ऑल
गंभीर डावे - उजवे काँबो, ऑल राऊंडर्स ह्याबद्दल ऑब्सेसीव्ह आहे तेंव्हा .......
2. ईशान किशन / संजू >> किशन बॅकप आहे. संजू अगदीच फेल गेला किंवा इतरत्र इंजरी सब लागला तर किशन खेळणार.
9. वरून चक्रवर्ती / कुलदीप >> वरूण कुलदीपच्या आधी ईयर मार्क होणार. दुसरा किंवा तिसरा स्पिनर म्हणून कुलदीप येईल.
8. सुंदर / दुबे >> इथेही दुबे आधी ईयर मार्क केलेला असेल असे वाटते.
टीम 11 अशी राहील असे वाटते
टीम 11 अशी राहील असे वाटते
1 अभिषेक
2 संजू
3 तिलक
4 सूर्या
5 हार्दिक
6 दुबे
7 अक्षर
8 सुंदर
9 अर्शदीप
10 वरुण
11 बुमराह
असामी, बहुतेक असेच होईल. संजू
असामी, बहुतेक असेच होईल. संजू दुबे वरून यांनाच जास्त संधी देत तयार केलेले आहे. श्रेयस अय्यर नसल्याने त्या जागी रिंकू येत अकराचा संघ तयार होईल असे वाटते.
सूर्याचा फॉर्म असता आणि वरून प्लस कुलदीप एकत्र खेळवने शक्य असते (जे या दोघांना + वेगवान गोलंदाजांना फलंदाजी येत नसल्याने शक्य नाही) तर मी आताच फायनलच्या तयारीला लागलो असतो.
सुंदर कडे दुबेसारखी मोठी फटके मारायची क्षमता हवी होती. भारतात खेळताना भारतातर्फे तीन स्पिनर खेळताना बघायला आवडले असते पण तो या फॉरमॅटमध्ये तितका ताकदीचा अष्टपैलू वाटत नाही. कुलचा जोडीसारखे कुलचक्र फिरायला हवे होते. विकेट घेऊन सामना फिरवायची क्षमता असलेले गोलंदाज असतील तर गोलंदाजी बघायला वेगळीच मजा येते.
मला ही टीम आवडेल बघायला
मला ही टीम आवडेल बघायला
1 अभिषेक
2 संजू
3 तिलक
4 सूर्या
5 हार्दिक
6 दुबे
7 रिंकू
8 कुलदीप
9 अर्शदीप
10 वरुण
11 बुमराह
पण कुलदीप च्या जागी अक्षर्/सुंदर असे दिसेल असे वाटते.
तेच होणार
तेच होणार
आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी हवीच. तरच आधीच्यांना हात मोकळे सोडून मारता येते. तो फलंदाज फलंदाजीला उतरला नाही तरी त्याचे असणे कामाला येते.
सुंदर la खेळवतील , तो
सुंदर la खेळवतील , तो powerplay मध्ये गोलंदाजी करू शकतो, त्यामुळे बुमराह ला मुंबई इंडियन्स जसे वापरतात ( Powerplay मध्ये एक षटक, 10 किंवा 11 ve षटक aani 17 व 19 असे ) वापरू शकतात, 8 पर्यंत फलंदाजी आणि 6 गोलंदाज पण होतात, Rinku ला नाही खेळवणार
Pages