Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त दिसतोय उत्तप्पा. जुन्या
मस्त दिसतोय उत्तप्पा. जुन्या ज्वारीच्या पिठाचा जमेल का?
इथल्या प्रदूषणामुळे बारीक खोकला सुरू आहे. रात्रीच्या जेवणात सूप कम्पल्सरी झालेय सध्या. कालच्या जेवणातले गाजर - आलं सूप ( थोडी ओली हळद आणि लिंबाचा रस पण घातला होता आणि घट्टपणासाठी थोडी मसूर डाळ.) सोबत शिळ्या भाताचा पालक - कोथिंबीर घालून लेमन राईस ( आपल्या नेहेमीच्या साऊथ इंडियन लेमन राईस पेक्षा वेगळा) आणि चिकन विथ मशरूम सॉस.
वॉव!!!
वॉव!!!
आजचा डिनर मेन्यू...
आजचा डिनर मेन्यू...
चिकन मंचाव सूप ( यातले नूडल्स एअर फ्रायर मध्ये तळले/ भाजले आहेत), कच्च्या पपई चे थाई सलाड आणि उकडलेली अंडी.
अल्पना दोन्ही डिनर मस्त
अल्पना दोन्ही डिनर मस्त
सिमरन ताई - हा उत्तप्पा कमी
सिमरन ताई - हा उत्तप्पा कमी आणि पिझ्झाप्पा जास्त दिसत आहे
अल्पना ताई - सूप डिनर चवदार दिसत आहे !
सुप मस्तच दिसत आहे
सुप मस्तच दिसत आहे
पोहा सूजी बाईटस उचला एकेक
पोहा सूजी बाईटस
उचला एकेक
पिझाप्पा
पिझाप्पा

बाईट्स मस्त दिसतायत.
आजचा मेन्यू -बारीक मेथी जीला समुद्री मेथी पण म्हणतात तिची भाजी चपाती आणि शिरा.
अल्पना तुमचे सगळेच मेन्यू भारी असतात. थाई सॅलड मध्ये पपई बरोबर काय काय घातलंय?
फक्त पपई होती मेन. ड्रेसिंग
फक्त पपई होती मेन. ड्रेसिंग मध्ये ओली लाल तिखट मिरची, लसूण, २- ३ बीन्सच्या शेंगा, एक छोटासा टोमॅटो चिरून, चिंचेचा कोळ, पंजाबी शक्कर, सोया सॉस, मीठ आणि लिंबाचा रस ठेचून घेतलं होते. टोमॅटो खूप कमी ठेचला, शेवटी शेवटी आणि थोडी कोथिंबीर चिरून घातली होती.
समुद्री मेथीची भाजी वेगळ्या काही प्रकारे करतात का? मी कधीच खाल्ली नाहीये. मुंबईला राहत असताना भाजी बघितली होती.
हो ती सगळीकडे मिळत नाही
हो ती सगळीकडे मिळत नाही मुंबईत किंवा पालघर वगैरेंहून ज्या भाजीवाल्या येतात त्यांच्या कडे मिळते. समुद्राजवळवाळूत पिकवली जाते त्यामुळे जास्त टिकत नाही, छोट्या छोट्या पेंढ्या मिळतात २० रु ला 10,12. छान लागते .काही यूपी गुजरात ची लोकं खात नाहीत जास्तकरून व्हेज असणारे कदाचित समुद्राच्या पाण्यावर असते त्यामुळे .
रेसिपी पालेभाजी सारखीच ,पहिली मेथी चिरून धुवून पाण्यातून चाळणीवर काढून घ्या कारण यात बारीक वाळू असते.मग कढईत तेलावर राई ,हिंग घालून बटाटा चांगला भाजून त्यात चेचलेला लसूण ,हिरवी मिरची ,चिरलेली मेथी घालून मग टोमॅटो हळद आणि मीठ घालून फक्त भाजीच्या पाण्यात परतून घ्यायची बटाटा शिजेपर्यंत .जिरं ,कांदा घालत नाहीत या भाजीत म्हणजे आम्ही या पद्धतीने करतो. चविष्ट होते कुठे मिळाली तर करून बघा .
सर्व नवीन फोटोज् छान.
सर्व नवीन फोटोज् छान.
@ समुद्री मेथी
ही बघितली आहे मुंबईत भाजीविक्रेत्यांकडे, अगदी छोटी नाजुक पाने आणि शुभ्र पांढरे देठ. खाल्ली मात्र कधीच नाही.
याची चव नॉर्मल मेथीपेक्षा वेगळी असते का ?
समुद्री मेथी , साध्या
समुद्री मेथी , साध्या मेथीपेक्षा कडू असते . Sharp taste असते.
मला मुळातच मेथी आवडत असल्याने चालून जाते.
मला स्वतःला ही भाजी , ताक/कढी भातासोबत आवडते.
खूप दिवसात समुद्री मेथी आणली
खूप दिवसात समुद्री मेथी आणली नाही. फोटो बघून खावीशी वाटते आहे. एकदा या पद्धतीने करून पाहीन. एरवी आम्ही लसूण, टोमॅटो नाही घालत. कांदा, हिरवी मिरची फोडणीला आणि भिजवलेली मुगाची डाळ घालतो समुद्री मेथीसाठी.
समुद्र मेथी, दाण्याचा कूट,
समुद्र मेथी, दाण्याचा कूट, भरपूर कांदा, एकदम बारीक चिरलेला, हिरव्या मिरच्या घालून, तेलावर परतून घ्यायचे, खूप छान लागते
ड्रायफ्रूट + सीड्स + ओट्स
ड्रायफ्रूट + सीड्स + ओट्स +गूळ लाडू
स्वस्ति, थँक्यू.
स्वस्ति, थँक्यू.
आमच्या आजच्या रात्रीच्या
आमच्या आजच्या रात्रीच्या मेन्यूतला एक पदार्थ फिक्स झाला.काल रात्री सावर्डो ब्रेड बेक केला. आत्तापर्यंतचा सर्वात सुंदर लोफ आणि मस्त ओपन क्रम्ब मिळाला काल.


यासोबत आता एखादे सूप करणार आणि कदाचित सलाड / ओपन सँडविच, चिकन... सुचवा जरा या ब्रेडसोबत खायला काही.
सगळ्याच नवीन एन्ट्री भारी
सगळ्याच नवीन एन्ट्री भारी आहेत.
अल्पना,
घरी ब्रेड म्हणजे फारच भारी.
मस्त झालाय
… सुंदर लोफ आणि मस्त ओपन
… सुंदर लोफ आणि मस्त ओपन क्रम्ब …
Actually ! प्रो लेवल एकदम. 👌
… सुचवा जरा या ब्रेडसोबत खायला ….
Avocado Toast ? बेस्ट होईल या ब्रेडचे.
मृणाली, लाडू मस्त.. रेसिपी
मृणाली, लाडू मस्त.. रेसिपी टाक वेगळा धागा काढून, म्हणजे पुन्हा शोधायला सोपे होईल.
अल्पना, तुझे पदार्थ एकदम
अल्पना, तुझे पदार्थ एकदम सुंदर आणि हटके आहेत.
युरोप आणि अमेरिकेत पाहिले आहेत.
सहसा मी ते भारतात कोणी घरी केलेले पाहिले नाही. . त्यामुळे तुझे खास कौतुक वाटते.
आहाहा सूप व ब्रेड.
आहाहा सूप व ब्रेड.
अवाकाडो नाही मिळाला आज. मशरूम
अवाकाडो नाही मिळाला आज. मशरूम सूप, पालक, चिकन आणि थोडे चीज घालून ओपन सँडविच आणि रताळ्याचे एअरफ्रायर मधले चिप्स असे जेवण केलं. चिकन एअर फ्रायर मध्ये ग्रील करून मग त्याचे लहान तुकडे पालक - चीज
मिश्रणात घातले.
ओपन फेस सँडविच. छानच.
ओपन फेस सँडविच. छानच.
एकदम प्रो लेव्हल झालाय ब्रेड
एकदम प्रो लेव्हल झालाय ब्रेड अल्पना !
Pages