खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋ आणि ऋतुराज,
तुमच्या ताटातल्या शेव आणि चकली घेते मी. काय काटा आलाय( चकलीच्या). Happy

माझे मन करंज्या आणि चिरोटे मस्त दिसतायत. हिरवा ani पिवळा आणि गुलाबी आणि पांढरा हे माझे दोन्ही आवडते रंग आहेत ह्याचे.
अस्मिता चा फराळ ही छान दिसतोय.
रगडा पॅटीस मस्त सजवलं आहे.
ऋ, पिठलं भाकरी आणि फराळ मस्तच... इतके वर्ष जुने जावई असून ही येतो कौतुकाने...
ऋतुराज, काय दिसतोय फराळ, करंज्या, शेव, चिवडे ( तीन तीन ), शंकरपाळे सगळच छान झालाय फोटोतूनच कळतंय.

लोणच्याची पोळी.. हा प्रकार माहीत नव्हता पण नाव असे आहे की ऐकूनच आपसूक तोंडाला पाणी सुटावे. आणि दिसत सुद्धा भारी आहे.

फराळाची ताटे, सादरीकरण, रंगसंगती कौतुकास्पद आहे. ‌
लाडक्यांचे, दोडक्यांचे, सर्वांचेच फोटो आवडले. Lol
ऋतुराज चे फराळाचे ताट अप्रतिम!

सगळ्यांचा फराळ खूपच यम्मी. दीपावली च्या शुभेच्छा. अनिंद्यजी हे घ्या चिरोटे. दरवर्षी असेच बनवते मी. रंगीत आणि साधे पणIMG_20251005_171812.jpg

मी जेव्हा कधी हे पदार्थ बनवते मग ते चिरोटे असुदेत नाहीतर बेसन लाडू किंवा इतर काही, मायबोली उघडतेच , तिच्याशिवाय होतच नाही काही. अक्षरशः माये सारखीच मदतीला येते आपली ही मायबोली. अर्थात मायबोली म्हणजेच तुम्ही सगळे मायबोलीचे सभासद च .. आणि तुम्हा सर्वान शिवाय हे शक्यच नाही. खुप खुप धन्यवाद

मेघ , चिरोटे मस्त.
तुम्ही लाट्या कापल्यावर जास्त लाटत नाही का ?
आमच्या चिरोट्याच्या पाकळ्या फुलून येतात , सुट्या होतात.

तसं नाही ओ !
हे सुबक , ठेंगणे मला जास्त आवडले Happy
आमच्या चिरोट्याच्या पाकळ्या कधी कधी अस्ताव्यस्त वाढतात.
म्हणून मी तुमची पद्धत विचारली

मस्त दिसत आहे!
शेव चकली चिवडा शंकरपाळी कधी उशीरा होत नाहीत. अजून दहाबारा दिवस तरी दिवसातून दोन वेळा हे चहासोबत न कंटाळता पोटात जाते.. तर येऊ द्या बिनधास्त सर्वांचे उरलेसुरले फराळ Happy

खायला आवडत नाहीत एवढे पण असे रंगीत , फुलासारखे दिसणारे चिरोटे पहायला फार आवडतात. मेघ फारच सुंदर झालेत चिरोटे.
jui k ऋन्मेष म्हणतोय तसं चकल्या शेव चिवडा नेव्हर लेट. मस्त दिसतेय प्लेट. चिवड्यातले काजू परफेक्ट तळले गेले आहेत. फार ट्रिकी काजू तळणं, पटकन् जास्त होतात.

सगळे फोटो टेम्प्टिंग ! इथले फोटो पाहिले की पदार्थ लगेच खावासा वाटतो… रंगीत चिरोटे करून पाहायची इच्छा होतेय मलाही ममोप्रमाणे रंगीत खावेसे वाटत नाही. नैसर्गिक रंग वापरून करायला खायला आवडतील…. गुलाबी रंगासाठी डाळिंब रसाची आयडीया कशी वाटतेय… केले तर फोटो टाकीन..

सर्वांना धन्यवाद
तू काय काय केले यात ??>>>>>>>>
बेसन लाडू. हे नेहमी मीच करतो. मला ते पाकाचे लाडू नाही जमत.
तीन प्रकारचे चिवडे पण मीच केले.
मक्याच्या लाह्या आणि जाडे पोहे तळून आणि पातळ पोहे भाजून त्यात भडंगच्या लाह्या टाकल्या आहेत.
यंदा शेव ममो ताईंच्या पद्धतीने केली.
बाकी सगळे पदार्थ आई, पत्नी.
करंजी हे मी मुंबई पुण्यात ऐकलं आहे पण आमच्याकडे त्या करंजी सदृश्य पदार्थाला "खांडवा" म्हणतात.
त्याचे जितके पूड अधिक तितकी ती कुशल सुगरण. लग्नात, रुखवतात रंगीबेरंगी खांडवे करतात.
हा सगळा फराळ आमच्याकडे गौरी गणपतीत पण होतो.
तसेच यातील सर्व पदार्थ वर्षभर या ना त्या कारणाने होतच असतात.

लोणच्याची पोळी मस्तच.
लोणच्याचा खार टाकून केलीय का?
मेघ, चिरोटे मस्त दिसत आहेत.
जुई, खमण आणि ढोकळा मस्त, आवडता.
फराळ मस्त. मी चकली घेतो

सगळे फराळ मस्त.कस्टर्ड ढोकळा भारी ...कस्टर्ड चा बाउल ही सुंदर आहे.लोणच्याचा पोळ्या पहिल्यांदा पाहिल्या.कश्या लागत असतील इमॅजिन केल्या.चिरोटे सुंदर दिसतायत दोन्ही .चिरोटे कसे करतात ,रेसिपी माबोवर आहे का ?

फोटो काढलेला पण पोस्ट करायला उशीर झाला , हा आमचा फराळ
IMG_20251025_070452.jpg
भाऊबीज स्पेशल
IMG_20251025_070759.jpg

मंजुताई, गुलाबी रंगासाठी दाळिंबापेक्षा बीटाची पावडर/बीटाचा रस जास्त बरी/बरा असे वाटतेय. डाळिंबरस घातले तर कदाचित काळा होईल असे वाटतेय.

सगळे पदार्थ मस्त आहेत. चिरोटेही सुंदर दिसताहेत.

माझ्याही मनात बीटच आले होते पण बीटाचा गुलाबी रंग गडद असल्याने आवडत नाही. वर मेघने कैलेल्या चिरोट्यांचा फिकट गुलाबी छान वाटतोय.., डाळिंबाने फिकट रंग येईल असं वाटतंय...

@ प्राजक्ता, माझेमन, मेघ

चिरोट्याच्या फोटोंसाठी थँक्यू. फार पूर्वी जो पदार्थ “चिरोटे” म्हणून मला देण्यात आला तो यापेक्षा वेगळा होता.

@ कडबू

हा आयटम आता कुणी दिवाळीचा फराळ म्हणून करत नाहीत का? कडबू आणि कडबोळी हे एकाच पदार्थाचे नाव आहे का? - dense textured बिनकाट्याची चकली असा काहीसा स्वाद असलेला पदार्थ म्हणून मला आठवतोय. Tasted eons back, so unsure.

Pages