Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पिठलं-भाकरी, कांदा जबरी मेनू
पिठलं-भाकरी, कांदा जबरी मेनू
स्टर फ्राय, दडपे पोहेही मस्तच.
मी स्वीट बेंगॉलमधून आणलेला रस कदम. चव तर मस्तच पण मला याचा रंगही फार आवडतो.
रस कदम कसे लागते ? मी कधीच
रस कदम कसे लागते ? मी कधीच खाल्ले नाही. मुळात मला असा काही प्रकार असतो हे मायबोलीवरच कळाले
संदेशमध्ये गुलाबपाण्याच्या
संदेशमध्ये गुलाबपाण्याच्या चवीचा पाक घातला तर साधारण तशी चव येईल.
रसकदम !
रसकदम 😍
प्लेट/ बोलही सुंदर आहे.
आज तर खाऊगल्लीत रौनक झाली आहे एकदम.
रसकदम ला नाही पण खीरकदम ला माझी एक छोटी मैत्रिण “अंडे के अंदर अंडा वाली मिठाई” म्हणते !
जाई, Stir fry veg मस्त दिसते
जाई, Stir fry veg मस्त दिसते आहे.
दडपे पोहे भारीच.
गावरान बेत, अगदी आवडीचा बेत.
विशेष म्हणजे पिठल्यात लाल तिखट टाकलं म्हणून कौतुक.
मला हिरव्या मिरचीचे पिठले फार आवडत नाही.
कैरीचे लोणचे मस्त, कैऱ्या अजून करकरीत दिसत आहेत.
पण सगळ्यात कांदाच भारी आहे
पिठल्यात लाल तिखटच.
पिठल्यात लाल तिखटच. तरच रंग छान येतो.
हिरव्या मिरचीची रवानगी ठेच्यात.
सगळ्यात कांदाच भारी आहे हे पटले ना ? बेस्ट ! 😁
^^बाकी तो कांदा बघितला का ?
^^बाकी तो कांदा बघितला का ?
काय सुरेख कापलाय ! सुंदर दिसत आहेत ते कांद्याचे रेखिव काप^^
अगदी सहमत... इतका सुरेख कापलेला कांदा बघून डोळे पाणावले अगदी, स्वतः न चिरून सुद्धा...
असा कांदा चिरणे हे फारच कौशल्याचे काम आहे, भल्याभल्यांना जमत नाही...
पण सगळ्यात कांदाच भारी आहे >>
पण सगळ्यात कांदाच भारी आहे >>>>>हा हा हा
धनवन्ती
धनवन्ती 😂
अनिंद्य, छान बेत. अगदी आवडीचा
अनिंद्य, छान बेत. अगदी आवडीचा. रोज पिठले केले तरी चालेल मला.
कांदा किती नीटस चिरलाय! पाकळी पाकळी विलग तरी एकसंध! कलिनरी कुकिंग च्या विद्यार्थ्याने प्रॅक्टिकल परीक्षेत चिरल्यासारखी!!
प्लेट/ बोलही सुंदर आहे.
प्लेट/ बोलही सुंदर आहे.
>>> अनिंद्य ही साधी स्टीलची वाटी आहे. रसकदमचा रंग रिफ्लेक्ट होऊन गुलाबी कमळासारखी वाटतेय.
>>> अनिंद्य ही साधी स्टीलची
>>> अनिंद्य ही साधी स्टीलची वाटी आहे. >>> ऑ...
मी आपली उगाचच सांगणार होते , डार्क रंगापेक्षा पांढरी प्लेट वापरायला पाहिजे होती
होय स्टीलच दिसतय.
होय स्टीलच दिसतय.
रस कदम सुंदर दिसतोय ,रंग अगदी
रस कदम सुंदर दिसतोय ,रंग अगदी गोड आहे गुलाबी.
अनिंद्य हा तुमच्या पावभाजी ला झब्बू





राहिलेल्या इडली पिठाचे ढोकळे चटणी
पाऊस पडतोय तर भजी हवीच
बटाटा भजी
पिस्ता फालुदा विथ आईस्क्रीम
वाह... राडा!
वाह... राडा!
कुल्फी सर्वाधिक आवडली.
कुल्फी सर्वाधिक आवडली.
माझेमन , स्टीलची वाटी आहे ???
माझेमन , स्टीलची वाटी आहे ? 😲
Tough to believe, फोटो फार छान काढला.
@ छल्ला,
@ छल्ला,
.. पाकळी पाकळी विलग तरी एकसंध…
खऱ्या रत्नपारखी तुम्ही. जौहरी ही हीरे को पहचानता है 😀
@ सिमरन.
धडाकेबाज मेन्यूज्. 😋
पावभाजी झब्बू खासच.
तुमचे फालूद्याचे ग्लास ऋतुराजच्या धाग्यावर बघितले आहेत, पटकन ओळखले.
सगळे मेनु खासच!!
सगळे मेनु खासच!!
फालुदा काढुन घेवु का??
रसकदम नाव पहिल्यादाच एकल..बाकी त्याचा फोटो इफेक्ट फार भारी जमुन आलाय...
वा कसला जबरदस्त रसकदम!!
वा कसला जबरदस्त रसकदम!! मस्त लागतो एकदम. बण्गाली लोक मिठाया मस्तच बनवतात.
सिमरन राहिलेल्या इडली पिठाचे म्हणजे पिठात मिर्चे आले लसुण घातले व केले का?
@साधना नाही .ढोकळा सारखी फक्त
@साधना नाही .ढोकळा सारखी फक्त फोडणी घातली आहे मिरची राई कडीपत्ता. आणि ताटात वाफावलेत म्हणून ढोकळा .
बाहेर मिळते सँडविच इडली त्यात बहुतेक असते आलं मिरची पण कधी ट्राय नाही केलं.
@अनिंद्य,फालूद्याचे ग्लास फेमस झालेत खरे
,खरंतर इथे जवळजवळ सगळ्यांच्या ताटं वाट्या पाहूनच कोणी फोटो टाकलाय ते आधी समजते.इतक्या बाउल ताट वाट्या ओळखीच्या झाल्यात
.. ताटं वाट्या पाहूनच कोणी
.. ताटं वाट्या पाहूनच कोणी फोटो टाकलाय ते आधी समजते..
+ १
पिठलं भाकरी
पिठलं भाकरी

भाकऱ्या तोंपासू
भाकऱ्या तोंपासू
मस्त फोटो सगळेच.
मस्त फोटो सगळेच.

नवरात्रात एक दिवस केला होता. आटवलेला आंब्याचा रस घातला होता त्यामुळे रंग आणि स्वाद दोन्ही छान.
वाह.. वाचायच्या आधीच फोटो
वाह.. वाचायच्या आधीच फोटो बघूनच गोडवा पोहोचला.
Pages