बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समोसा, वेफर्स ,ढोकळा, फाफडा, अळुवडी, सुरळी वडी, बटाटेवडे
डॉलर जिलबी, बेसन बर्फी, बेसन लाडु, मलई बर्फी.

@पेरु >>> मुलांसाठी आलू जिरा, सर्वांसाठी काश्मिरी पुलाव किंवा खारा पोंगल, पोळ्या, मोदक नसतील तर जिलेबी (बाहेरून आणायची) /शेवयांची खीर/रबडी/ कोकणात गोड लापशीही करतात. काकडीचे धोंडसे/सांदण (आधीच करून ठेवता येईल)

@jui.k >>> बटाटा वडा/अळू वडी/पूरण पोळी/खव्याची पोळी/ओल्या नारळाच्या करंज्या/उकडीचे मोदक. सगळे पदार्थ तयार मिळतील.

शेवभाजीत घालायची शेव बिन तिखटाची असेल तर मुलांना चालते की! आहे तोच रस्सा माइल्ड होतो.
प्लस क्रीम घातले तर रस्सा जास्त छान लागतो. अन माइल्ड ही होतो.

जुई, गणपतीत दर्शनाला संध्याकाळी येतात त्यांच्यासाठी भावाकडे चिवडालाडू तयार पुड्या मागवतो हल्ली. डिशमध्ये द्यायचो पण सगळे घरीच नेतात. दुपारी बरेच जण जेवायला असतात त्यांच्यासाठी वेगवेगळा मेन्यू ऑर्डर करतो, उसळ आमटी घरी करतो, उकडीचे मोदक थोडेच घरी करतो नैवेद्य आणि घरच्यांना, बाकी मागवतो. तळलेले मोदकही मागवतो ते दुपारी, संध्याकाळी सगळ्यानाच देतो. संध्याकाळी ते द्रोणात आणि अजून एक प्रसाद हातावर देतो आणि चिवडा लाडू पुडी देतो.

.प्लस क्रीम घातले तर रस्सा जास्त छान लागतो. अन माइल्ड ही होतो.>>>> नो नो नो !!! शेवभाजीत क्रिम घालु नका प्लिजच!! किवा मग त्याला शेवभाजी तरी म्ह्नणु नका.

५५ मोठे आणि २० लहान मुलं करीत गणपती दर्शन चा मेनू सुचवा प्लिज .. बटाटावडा (१००) आणि पोळी (१००) बाहेरून मागवणार .. भाज्या, भात आणि गोड पदार्थ काय करावेत ते सुचवा..
मोदक ( उकडीचे किंवा तळणीचे करायला जमणार नाहीये)

नम्रता, मिसळ पाव केला तर पोळ्या कॅन्सल ! मटकीची उसळ कमी तिखट करायची कट झणझणीत करायचा मुलं खाऊ शकतील. ज्यंना पाहिजे ते वडापाव खातील . दही बुत्ती . सांजोरी, चिरोटे बाद तळण जमणार नाही तर. गोडात प्रसादाचा शिरा, गुजा, आदल्या दिवशी करता येईल.

गणपती दर्शन चा मेनू सुचवा प्लिज >> मृण्मयीच्या रेसिपीने भोपळ्याची बाकर भाजी, अंबाडीची भाजी / अळूचं फतफतं , फोडणीच वरण / चिंच गुळाची आमटी, भिजवलेली मूग डाळ + किसलेला मुळा कोशिंबीर , गोड - फिरनी, तांदळाच्या रव्याची खांडवी , मुगाच्या डाळीचा शिरा , कडाह प्रसाद

पोळी, कोबीची भिजवलेली हरबरा डाळ घालून भाजी, मिक्स उसळ रस्सा, गुलाबजाम, बटाटेवडे, पुलाव आणि रायते अथवा दहीभात.
किंवा खव्याच्या पोळ्या आणा विकत, सोबत बटाटेवडे, मसालेभात, लोणचे, टोमॅटो सार, काकडीची कोशिंबीर असाही मेनू ठेवता येईल

धन्यवाद प्राजक्ता आणि अन्जु
कचोरी आणि दगडी पोह्यांचा चिवडा नक्की केले आहे.. गोड म्हणून बहुतेक पेढा किंवा मोदक ठेवू...
दुपारी दर्शनाला येणाऱ्यांसाठी घरी बनवलेले जेवण असतेच.. फक्त स्नॅक्स बाहेरून आणावे लागते..

शक्यतो हातावर प्रसाद देवु नये व आजकाल तर देत नाहितच काही जणं. दिलाच तर एक टिश्यु ठेवावा. घरी येणार्‍यांचा विचार करावा व तसा आदर करावा.
पण काही नमुने लोकं द्यायचं आहे म्हणून सगळी गोड, तिखट पदार्थाची भेळच करतात. म्हणून लिहिते.
काहि नमुने लोकं तर खीर पासून, वाटली डाळ ते श्रीखंडही प्रसाद म्हणून देतात हातावर. आणि फॅशनच्या ग्प्पा मारतात. Wink

आम्ही अशी पाकिटं तयार ठेवतो: छान झिपलॉक पाकिटं त्यात जो आवडेल तो मोदक( तळणीचा/ उकडीचा/ काजू वगैरे), लाडु( तो एका लहनश्या झिप्लॉक मध्ये), मग काय चिवडा वा कचोरी , शीरा/ पंचखाद्य( एक लहान पाकिट). आजकाल काय इतकं कठिण तर नक्कीच नाही.

जेवणात काय सगळेच काही पालेभाज्या खात नाहीत. व खुपच चण्याचे वा बेसनाचे पदार्थ टाळावेत. आधीच पाउस मग तेच ते बेसन, चणा वा पालेभाजी नकोशी वाटते काही जणांना.
दोन दोन हिरव्या पालेभाजी किंवा आणखी एक घोटीव भाजी विचित्र जोडी आहे.
एक पिवळी भाजी, एक मसाल्याची, एखादी चटपटीत कोशींबीर, पुलाव साधासा, वरण-भात, तूप , भाकरी/ चपाती एखादी खीर/ मोदक. तसेही बरेच जणं पथ्य करतात आजकाल.
बाकी, ज्याची त्याची आवड असते शेवटी , पण घरी आलेला माणूस जेवून जाईल असे ऑप्शन ठेवावे. नाहितर आपल्या एककल्ली मेनुमुळे कोणी नीट जेवलच नाही असं होवु नये. ( अ. आ. म. आ. नि.)

शेवभाजीत क्रिम घालु नका प्लिजच!!
<<
मी पक्का खानदेशी आहे.
खानदेशात अनेक ढाब्यांवर नेहेमीच्या लाल शेवभाजीसोबतच हिरव्या वाटणातली, अन मलईची शेवभाजी देखिल मिळेल. "ऑथेंटिक" चवी बदलत असतात नेहेमी.
लहान मुलांसाठी करी माइल्ड करायला तो एक छान मार्गही आहे.

नवर्‍याने ही शेवभाजी पूर्वी कोण्या मित्राकडे खाल्ली होती. त्याला फार आवडलेली.
आम्ही स्वीट कॉर्न चिकन सूप करतो तेव्हा वरुन फ्राईड अनिअन (क्रिस्पी) - विकत मिळतो. तो घालतो. फार मस्त लागतो.
शेवभाजीवरुन ते आठवले.

क्लिअर सूप मध्ये तर फ्राईड अनिअन लागतोच.

गणपती दर्शना साठी भोपळा & अळू फतफतं... Sad नहिइइइइइइइ
हल्के घ्या.. मत आपले आपले.

शेव भाजीत क्रीम बिग नो. पण मुलांना माइल्ड चव म्हणुन असेल तर ठिक आहे.. करी राईस खातात मुलं आवडीने.

Pages