एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॉम्ब फुटलेच नाहीत, लोकं मेलीच नाहीत म्हणून घोषित करून टाकायच की. लोकल बॉम्बस्फोटाच तेच आणि इथेही तेच

इथेही अंधभक्त आहेतच . आणि यांची मेमरी शॉर्ट असते किंवा मॉडिफाय झालेली असते. त्यांच्यासाठी.

MAGA अशी घोषणा देऊन ट्रंप सत्तेत आलाय. टॅरिफचा त्याचा प्लान खूप जुना आहे. मोदींच्या फेब्रुवारीतल्या अमेरिका भेटीतही हा मुद्दा निघाला होता.
तो सगळ्याच देशांवर टॅरिफ लावतोय. अगदीच कोणे एके काळच्या मित्र कॅनडावरसुद्धा.
तेव्हा त्याला नोबेल मिळायला भारत मदत करत नाही किंवा राहुलने डिवचलं म्हणून तो असं करतोय असे गैरसमज पाळू नका,

पियुष गोयल केव्हापासून ट्रेड डीलसाठी वाटाघाटी करताहेत.

शिवाय त्याची भाषा कायम अशीच असते. त्याने झेलेन्स्की सोबत जे केलं ते तुम्हांला आवडलं होतं, तीच ही भाषा.

आणखी एक गंमत - ट्रंप स्वतःच्या हँडलवरून घोषणा करतो. आणि भारत सरकार पी आय बी च्या वेबसाइटवर निनावी, बिनसहीचा कागद अपलोड करून उत्तर देतं.

Tariffied, oil PSUs stop buying Russian crude in spot market

सरेंडर मोदी.

वाळूत मान खुपसलेल्या शहामृगाची उपमा चुकली. जे म्हणतात की हिंदू धर्म धर्मावरून इ. भेद करत नाही आणि हिंदू राष्ट्र येतंय म्हणून खुष होतात, ते मोदीशहांसारखं ढळढळीत खोटं बोलतात.
हिंदू राष्ट्र हवं असणार्‍यांची व्यवच्छेदक लक्षणं - मुस्लिमद्वेष , जात्याधारित आरक्षणाला विरोध आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना अमान्य.

तिकडे ११ वर्षे , बहुसंख्य असे शब्द आलेत. २०१४ -२८२ जागा , २०१९ -३०३ जागा ते २०२४ - २४०. २०१९ नंतर हिंदुत्वाचा मुद्दा जोरात रेटला. सी ए ए , एन आर सी , राममंदिर , ३७० , इ. तर अयोध्येतच हरले.
शिवाय हे कुबड्यावालं बहुमत आहे त्यात अजित पवार - शिंदे सारख्यांचाही ( इतर राज्यांतली नावे लिहीत नाही) हातभार आहे. त्यांच्या पक्षातल्या आणि दुसर्‍या पक्षांतून आयात केलेल्या आणि मूळच्याच यांच्या बाहुबलींशिवाय पर्याय नाही हे रवींद्र चव्हाण आणि इथल्या भाजप समर्थकांनीच सांगितलं आहे.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांची प्रकृती कशी आहे? घरीच उपचार घेत आहेत की इस्पितळात भरती आहेत? कोणी नेते त्यांच्या चौकशीसाठी गेले का?

राज्यसभेतून निवृत्त होणार्‍या खासदारांना समारंभपूर्वक निरोप दिला जातो. गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना आदर्णीय मोदीजींना अश्रू आवरले नव्हते. धनकरांना रीतसर निरोपही देणार नाहीत का?

देशाच्या विविध भागांत बांग्ला बोलणार्‍या मुस्लिमांना बेघर करायची किंवा थेट बांग्ला देशात ढकलायची मोहीम सुरू आहे.
दिल्ली पोलिसांच्या मते बांग्ला / बंगाली भाषा ही बांग्लादेशी भाषा आहे.

आधी भाजप प्रवक्त्या, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश; आरती साठेंच्या नेमणुकीनंतर वाद, पवारांचे सवाल | BJP Spokesperson Aarti Sathe Become Judge Mumbai Highcourt NCP MLA Rohit Pawar Questioned SC And CJI https://share.google/jwVyDAAGzfeJuxouj

At a time when the world is going through uncertainty, let us take a pledge to sell only Swadeshi goods from our shops and markets. Promoting Made-in-India goods will be the truest service to the country… Whatever we buy, we should ask ourselves — has an Indian toiled to make this? If it has been made by the sweat of our people, with their skills, that product is Swadeshi for us. We must adopt the mantra of ‘Vocal for Local’

साहेबांना हे सगळं आज पुन्हा आठवलं. किती काळाने? आणि किती दिवसांसाठी?

यहां तो हर चीज बिकती है
कहो जी तुम क्या क्या खरीदोगे
सुनोजी तुम क्या क्या खरीदोगे
लालाजी तुम क्या क्या
मियांजी तुम क्या क्या

Prabhakar Kumar Mishra
@PMishra_Journo
हंगामा क्यों है बरपा..!!
जज प्रवक्ता बन सकते हैं तो प्रवक्ता जज क्यों नहीं!

#justasking

# True Indian

आरती अरुण साठे असं पूर्ण नाव आहे. अरुण साठे हे वडील. तेही वकील आणि संघ भाजपशी संबंधित. भाजपकडून लोकसभेची निवडणूकही लढले. करविषयक कायदे ही त्यांची स्पेशलिटी. २०१५ मध्ये त्यांना सेबीच्या बोर्डावर नेमले. त्यांच्या बहिणीचं नाव सुमित्रा महाजन.

भरत
आपल्याकडे किनई लोकशाही नांदते आहे. ही लोकांची इच्छा आहे. तुम्ही त्यावर खुशाल अरण्य रुदन करा. काहीही उपयोग होणार नाही.
पण काही सांगता येत नाही. एकदा त्यांनी पदभार सांभाळला की त्या निष्पक्ष होतील. त्या कुठल्याशा राजेश खन्ना अमिताभ बच्चन सिनेमाचे कथांनक आहे ना तसे. किंवा बेकेट आठवा.

https://www.facebook.com/rajesh.pathak.39948
3 दिवसांपूर्वी युरोपियन युनियन च्या 27 देशांनी रशियावर अजून निर्बंध वाढवले..यात रशियाकडून येणारे तेल मग ते कोणत्याही देशामार्फत असेल ते तेल न घेण्याचा ठराव पास केला..
आता हा ठराव फक्त रशिया साठी नव्हता तर अप्रत्यक्षपणे भारताला यात टार्गेट केलं जात होत...
ट्रम्प तात्या यामागच छुपा सूत्रधार असणार हे सांगायला जोतिष्याची गरज नाही..
आज घडीला संपूर्ण युरोपला तेल पाठवणारा भारत हा सर्वात मोठा निर्यातदार आहे.रोज जवळपास 20 लाख बॅरेल तेल भारत रिफाईन करून पाठवतो..
2027 पर्यंत हा आकडा 30 लाख बॅरेल पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
म्हणजे हा व्यापार जवळपास 5 अब्ज डॉलर इतका भरमसाठ आहे.
भारत रशियाकडून कच्चे तेल भारतीय रुपयांमध्ये घेतो अन त्याला पेट्रोल,डिझेल,विमानाचं पेट्रोल तयार करून ते युरोपीय देशांना डॉलर मध्ये विकतो...
अन ट्रम्प तात्या यावर प्रचंड नाराज आहे.
मुद्दा हा आहे ज्या युरोपीय देशांनी रशियाच नाव घेऊन भारतावर दबाव टाकण्याचा डाव होता.
पण भारताने यावर काहीही प्रतिक्रिया न देता आफ्रिकन देशांना तेल विकण्यास सुरुवात केलीय.
अन इकडे युरोपीय देशांमध्ये पेट्रोल,डिझेलचा प्रचंड तुटवडा झालाय.कारण युक्रेन युद्धामुळे युरोपियन देशांनी रशियाकडून तेल घेण्यास नकार दिलाय.आता त्यांच्या देशात भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागतोय..
त्यामुळे हैराण झालेल्या अनेक युरोपियन देशांनी तेल पाठवण्याची विनंती भारताकडे केलीय...
हे गोरे विसरले की हा नवा भारत आहे.
अन भारताचा पंतप्रधान हा मुका,बहिरा अन रिमोटचा पंतप्रधान नाहीय तर एक कणखर देशभक्त आहे..
ज्याला कोणीही कोणत्याही दबावात घेऊ शकत नाही...

https://x.com/ANI/status/1039168999123107840
Our Petroleum Ministry is setting up 5 ethanol-making plants in country. Ethanol will be produced from wood products&segregated municipal waste. Diesel will be available at Rs.50 per litre & petrol alternative at Rs.55 per litre: Union Minister Nitin Gadkari

एकट्या गडकरींच्या अश्या स्वप्नांवर एक पुस्तक लिहिता येईल.. ही २०१८ मधली बातमी आहे.

Naturally.
दारू पिऊन गाडी झिन्गेल ना. Happy

गेले काही दिवस ट्विटरवर अनेक जण माइलेज कमी झाल्याचं लिहीत आहेत आणि त्याचा संबंध इथेनॉलशी जोडत आहेत.
यावर पेट्रो लियम मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं
https://x.com/PetroleumMin/status/1952296344724636009
मी ते https://www.maayboli.com/node/81311?page=1 धाग्यावर डकवलं होतं.
खरं तर वेगळा धागा काढावा असा हा विषय आहे. कारमालकांसाठी त्यातले अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत. मी कारमालक नाही, चालवतही नाही, त्यामुळे त्यातलं काही कळत नाही. अन्यथा धागा काढला असता.

In Assam, 63959 people declared foreigners—without ever being heard in court

अमेरिका आणि भारत - तुमचं आमचं सेम असतं.
त्यांनी बेड्या ठोकून मालवाहतुकीच्या विमानात बसवून पाठवलं. आता तिसर्‍याच देशात डिटेन्शन सेंटर्स उघडलीत. आपल्याकडेही त्याची पुढची पायरी आहे. हिंदू व्यक्तीकडे नागरिकत्वाचे पुरावे नसले तरी त्याला मात्र बेदखल करणार नाहीत. सी ए ए यासाठीच होता.

माझ्याकडे जन्मदाखला नसल्याने कायम भीती वाटते. उद्या फक्त तोच पुरावा मान्य केला गेला तर ? >>>>>
पासपोर्ट काढताना मला मागितलाय. नुसता जन्मदाखला नाहि. क्यूआर कोड असलेलाच जन्म दाखला लागतो. त्यात मात्यापित्याचा आधारकार्ड नंबर असतो.
मरता क्या न करता म्हणून ज्जन्मगावी गेलो. तिथल्या नगत नगरपलिकेत माझ्झा दहावीपर्यंतचाच क्लासमेट अधिकारी म्हणून बसलाय. त्याने सगळे जुने दफ्तर धुण्डाळून नोंद हुडकली. ती पण फक्त वडीलांच्या नावाने नोंद होती शिवाय त्या नोंदीत माझे नाव नाहीच कारण ते तर नंतर बारशाच्या वेळी ठेवले गेलेले. त्याच नोंदीवरुन अन सध्याच्या आधार कार्डावरची जन्मतारीख म्याच करुन, आई वडलांच्या आधारकार्डावरुन अ‍ॅफिअडेव्हीट करुन मला एकदाचा क्यू आर कोड असलेला जन्मदाखला मिळाला आहे.

https://www.etvbharat.com/mr/!state/making-a-birth-certificate-has-becom...

जन्म-मृत्यूची नोंद घेण्यास 1 वर्षापेक्षा जास्त उशीर झालेल्या प्रकरणांमध्ये ज्यांची नोंद घ्यायची आहे, त्यांच्याकडून रुग्णालयाचे प्रमाणपत्र, आरोग्य विषयक नोंदीचे पुरावे, आई-वडील, रक्ताच्या नातेवाईकांचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, अशा शासकीय ओळखपत्रांच्या पुराव्यांचा विचार करून तसेच अर्जदाराची वंशावळ आणि त्यांची ओळख पटवणारे शासकीय पुरावे आणि रहिवासाबाबतचे शासकीय दस्तऐवज यावरून सत्यता पटवूनच खात्री झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे, असे सक्त निर्देश देण्यात आलेत.

माझ्या आईकडे जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला यातलं काहीही नव्हतं. तिच्या पिढीतल्या कोणत्याही स्त्रियांकडे असेल असं वाटत नाही. हे सगळे कागद असले तरी त्या माहेरीच ठेवून येत.

Pages