एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कुठे आलेत? मी लोकसत्ता लोकरंगमधले गिरीश कुबेर यांचे इब्सेन बरोबरच होता (इराण) , ते मौन मनोहर असेल...? (पर्रिकरांवर) आणि आणिबाणीवरचे प्रदीप कोकरे आणि विजय दिवाण यांचे लेख वाचले.

लाडकी बहीण योजनेचा बाप
बिहार के 9400000 परिवारों के बैंक अकाउंट में आएंगे 2-2 लाख
बिहार सरकार की इस योजना के तहत आर्थिक रूप से कमजोर वर्ग के लोगों को स्वरोजगार शुरू करने के लिए राज्य सरकार उनके बैंक खातों में 2-2 लाख रुपये की आर्थिक सहायता प्रदान करेगी. यह सहायता पूरी तरह से अनुदान के रूप में दी जाएगी, यानी इसे वापस लौटाने की आवश्यकता नहीं होगी. जरूरत पड़ने पर यह राशि बढ़ाई भी जा सकती है.

अभिनंदन!

१५ जुलै पासून २चाकी वाहनांना राष्ट्र उभारणीत सहयोग देता येणार!!
२चाकीसाठी टोल योजना जाहीर!!!

Gadkari criticised the false reports and said, “Creating sensation by spreading misleading news without knowing the truth is not a sign of healthy journalism. I condemn it.”

Read - Creating unfavorable sensation.

दिल्ली सरकार ४ ते ११ जुलै दरम्यान कृत्रीम पाऊस पाडणार.
खर्च ४ कोटी.
भर पावसाळ्यात कृत्रीम पाऊस.

आता देशद्रोही लोक याला भ्रष्टाचार म्हणणार!

गुजरातचा माजी मुख्यमंत्री होता विमानात...

किती मेले त्याचा आकडा नाही.
ब्लॅक बॉक्स गायब. म्हणे वाचता येत नाहीये.
यू एन. च्या तपासणीस मनाई.

नक्की पाणी कुठे मुरतं आहे?

सेना को खुली छूट’ वगैरे विधानं मुख्यतः जनतेचा रोष कमी करण्यासाठी आणि राजकीय दबाव शमवण्यासाठी दिली जातात. प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या पातळीवरची कारवाई सरकारच्या स्पष्ट संमतीशिवाय शक्यच नाही. मात्र पाकिस्तानसारख्या देशात ही गोष्ट वेगळी असते.

सिंदूर ऑपरेशननंतर, निवृत्त का सेवेत असलेल्या एका जनरल ने एका मुलाखतीत पहिल्या दिवशी भारतीय लढाऊ विमान कोसळण्याचं हेच प्रमुख कारण असल्याचं स्पष्ट केलं होतं.

याचीच पुष्टी Shangri-La Dialogue मध्ये CDS जनरल अनिल चौहान यांनी दिलेली. त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं होत की ही एक tactical mistake होती.

पण नशीबाने ही चूक आपण तिसऱ्या दिवशी दुरुस्त केली आणि अचूकतेने पाकिस्तानच्या हवाई तळांवर व रडार यंत्रणांवर हल्ला केला.

पहिल्या दिवशी पाकिस्तानी विमानांवर हल्ला न करण्याचा निर्णय चुकीचाच होता — पण मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर न देणं किंवा कारगिल युद्धादरम्यान पाक सीमा न ओलांडण्याचे निर्णय, यापेक्षा कितीतरी अधिक चुकीचे वाटत आहेत.
नशीब आपलं आपले सर्व पायलट्स सुरक्षित परत आले.

< पण मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर न देणं > यावर अनंत वेळा लिहिलं आहे. याच धाग्यावरही लिहिलं आहे. उलट त्यावेळी हे हल्लेखोर पाकिस्तानी आहेत, हे जगाला पटवून दिलं होतं. आता काय? यांना अजून धड हल्लेखोर कोण होते, ते सांगता येत नाही .

पाकिस्तान मधल्या दहशतवादी तळांवर हल्ले करूनही फार काही साध्य होत नाही. तेही जनतेचा रोष कमी करण्यासाठीच असतं.

<सेना को खुली छूट’ वगैरे विधानं मुख्यतः जनतेचा रोष कमी करण्यासाठी > मोदींची प्रत्येक गोष्टच दिखाव्यापुरती असते. प्रत्यक्ष काय साध्य होते, हाच प्रश्न असतो.

यावर अनंत वेळा लिहिलं आहे. याच धाग्यावरही लिहिलं आहे.
तुमचं मत वेगळं असू शकत.
आपण कितीही शांत राहिलो, तरी पाकिस्तान सुधारण्याची शक्यता नाही. मुंबई हल्ल्यात एकूण १५ देशांचे नागरिक मारले गेले होते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवणं भारतासाठी फारसं कठीण नव्हतं. मात्र पाहलगाम हल्ल्यात, भारतीयांशिवाय फक्त एक नेपाळी नागरिक मारला गेला — त्यामुळे जगाला हे पटवून देण्यात फारसा उपयोग होण्याची शक्यता नव्हती.
तसं पाहिलं, आंतरराष्ट्रीय समुदायाला एखाद्या घटनेचं गांभीर्य तेव्हाच समजतं, जेव्हा त्यांच्या स्वतःच्या नागरिकांचा बळी जातो. फक्त भारतावर हल्ला झाला म्हणून जग पेटून उठेल, अशी अपेक्षा करणे म्हणजे स्वप्नरंजनच.
हल्लेखोर मात्र जो पर्यंत पकडले जातं नाहीत तो पर्यंत ऑपेरेशन सिंदूर संपलं म्हणता येणार नाही.

बरोबर. बालाकोटवर हल्ला केल्याने पाकिस्तान सुधारले. आणि आपल्या खासदारांची शिष्टमंडळं परदेशांत गाणी बिणी म्हणून आल्याने सगऴ्या देशांना पाकिस्तान किती वाईट आहे, तेही कळलं.

आणि मी माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी त्याबद्दल काय सांगितलं ते ऑपरेशन सिंदूर धाग्यावर लिहिलं.

आताचे आपले रा सु स अवघे ऐंशी वर्षांचे आहेत.

ऑपरेशन सिंदूर धाग्यावर काही नवे प्रतिसाद दिले आहेत.

परदेशात जाऊन आपले विश्वगुरू आजकाल तुम्ही ट्वीटरवर खूप बागडता ही ही ही.
तुमचा छत्री घेतलेला फोटो पाहिला हं मी अशा गप्पा मारतात. Wink

दिल्लीकरांचं अभिनंदन!
कुणाकुणाच्या गाड्या भंगारमधे गेल्या?
मज्जाय ब्वा!
गाडी स्क्रॅप केल्यावर कसे जास्त पैसे मिळतात हे सांगणारं फॉर्वर्ड आलं की नाही तुमच्यापर्यंत?

https://x.com/ANI/status/1939923614729740692
दिल्ली पोलिस वाहन पकडून भंगारात विकणार आणि आलेले पैसे वाहनमालकाला देणार.

मला नोटाबंदीची आठवण का होते आहे?

कोल्हापुरात 100 कोटी रस्त्यांची टीचभर पावसातच वाट लागली; अवघ्या काही दिवसांमध्येच पंचगंगेला पूर येण्यापूर्वी नव्या रस्त्यावर खड्ड्यांचाच महापूर आला >> डब्बल विंजन

आजच्या लोकसत्ता चा अग्रलेख. अजून काही कारण असतील ही पण लाडक्या बहिणी सारख्या योजनांचा बोजा राज्या वर पडलेला आहे.
सरकारने आर्थिक शिस्त आणि नियोजन जबादारी ने केले पाहिजे. दिखाऊ कामांपेक्षा राज्याच्या दीर्घावधी हिताचा विचार करून नियोजन केलं पाहिजे. दुर्दैवाने सध्यातरी हे होताना दिसत नाही.

लाडकी बहीण योजना ही धरलं तर चावतंय .. झालं आहे. इतर मंत्र्यांच्या विभागाचा निधि लाब साठी वळवला जातोय. त्यात पुन्हा शक्तिपीठ सारखे कोणीही मागणी केलेले नसतानाचे प्रकल्प राज्याच्या माथ्यावर मारून कंत्राटदारांचे भले करण्याचे उद्योग सुरू आहेत. ऋण काढून राज्य चालवण्याचे उद्योग राज्य रसातळाला नेऊन थांबतील

साहेब चालले पर्यटनाला
@narendramodi
Over the next few days, I will be attending various bilateral, multilateral and other programmes in Ghana, Trinidad & Tobago, Argentina, Brazil, and Namibia. Looking forward to interacting with world leaders and discussing ways to make our planet better.

इंटरअ‍ॅक्टिंग म्हणजे मिठ्या मारिंग.

आणी चित्रविचित्र वेषात ड्रम्स वाजवणे....... माहित नसलेल्या विषयांवर ---- उदा एआय, आय ओ टी वर अ क्कल पाजळणे

Over the next few days, I will be attending various bilateral, multilateral and other programmes in Ghana, Trinidad & Tobago, Argentina, Brazil, and Namibia. >> पुढचे काही दिवस या देशातील बातम्यांवर लक्ष ठेवले तर हा दौरा सफल झाला की नाही हे लक्षात येईल. लोकं काही म्हणो सबका साथ सबका विकास झालाच पाहिजे.

कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलाबाबत अनेक काँग्रेस आमदारांनी जाहीर विधाने केली होती. त्याबद्धल नाराजी व्यक्त करताना, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की राज्यातील सत्ताबदलाबाबत हायकमांड निर्णय घेईल.

Pages