Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
ओय होय. बटाटा भजी केली का
ओय होय. बटाटा भजी केली का झटपट ? हिरव्या मिरच्यांनी बहार आणली असेल
एन्जॉय !
मनीमोहोर, बोल नवीन दिसतोय, स्टीकर निघाले नाही अजून
भजी तोंपासू rmd
भजी तोंपासू rmd
नाचणी इडली छान दिसतेय किल्ली. समोसे मस्त पण माझ्यासाठी बिग नो आत्ता पर्यंत एकदा ही खाऊन बघू या असं वाटलेलं नाहीये. मुलांनी आणले कधी घरी तरी मी हात लावत नाही.
रसगुल्ल्यांसाठी पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना. साधना बघ करून एकदा.
अनिंद्य , बोल खूप म्हणजे खूप जुना आहे, आणि नित्य वापरातील आहे. पण त्याच लेबल पर्मनंट आहे,
काय सान्गता ममो? तुम्ही अजुन
काय सान्गता ममो? तुम्ही अजुन समोसाच खाल्लेला नाहि, वाचुन आश्चर्य वाटल.
रसगुल्ले मस्त दिसतायत, तुमच्या पाकक्रुती नेहमीच छान असतात.
समोसे आणी रमडची भजी क्लासच!
आमच्या घरीही आहे एक समोसा
आमच्या घरीही आहे एक समोसा हेटर. “मला फक्त समोस्याची सालं द्या”/ मैं सिर्फ समोसे का छिलका खाऊँगी” असं म्हणणारी आणि मसाला बाजूला काढून कुरकुरीत कव्हर तेव्हढं खाणारी
.. नाचणी हा प्रकार पौष्टिक गटात येत असल्याने माझा पास...
डिट्टो.
खूप हेल्दी असते नाचणी पण नाहीच आवडत. सगळे तळलेले / चमचमीत / वजन वाढवणारे पदार्थ बाय डिफॉल्ट आवडतात 😀
आमच्या घरीही आहे एक समोसा
आमच्या घरीही आहे एक समोसा हेटर. “मला फक्त समोस्याची सालं द्या”/ मैं सिर्फ समोसे का छिलका खाऊँगी” असं म्हणणारी आणि मसाला बाजूला काढून कुरकुरीत कव्हर तेव्हढं खाणारी>> ही माझी बहीण वाटतेय
Same करते मी
.
आलू नक्को होना मेरे कू
.
धन्यवाद.
नाचणी पौष्टिक असली तरी tasty असते. Give it a try
अनिंद्य >>> सगळ्या पोस्टला मम
अनिंद्य >>> सगळ्या पोस्टला मम
या बाफवरील ३०० पोस्टस वाचुन
या बाफवरील ३०० पोस्टस वाचुन काढल्या. वाचून काढल्या म्हणण्यापे़क्षा डोळ्यांनी पाहिल्या. लंच टाईमनंतर पाहिल्याने २० टक्के कमी त्रास झाला.

सगळेच पदार्थ तोंपासू दिसतायत.
सगळेच पदार्थ तोंपासू दिसतायत.
ती बटाटा भजी आणि भज्यांची पिल्लं द्या बरं ईकडे
उपवासाच्या भाजणी चे बीट घालून
समोसा आणि भजी मस्त आहेत.
समोसा आणि भजी मस्त आहेत. परवाच इथे थोडा पाऊस होवून गेल्यावर संध्याकाळी घराजवळच्या फेमस समोसेवाल्याकडून समोसे आणि जलेबी आणून खाल्ली. एका गल्लीत छोटं दुकान आहे, सकाळी चने -पुरी, दुपारी आलू - कचोरी आणि संध्याकाळी ४ ते ७ एवढ्याच वेळात समोसे - जलेबी मिळतात.

काल घरी आलेल्या लाडक्या पुतणी आणि पुतण्याला वेगळं काहीतरी हवं होतं खायला आणि त्यांच्या आई बाबांना हेल्दी काहीतरी. त्यामुळे व्हेजिटेबल लेंटिल - लेमनग्रास सूप, इंडियन चायनीज स्टाईल व्हेजिटबल ग्रेव्ही, थाई पीनट ड्रेसिंग घालून मोड आलेले मुग घालून सलाड आणि साधा भात.
आख्खा मसूर + गाजर , थोडे मशरूम घातलेलं सूप (ब्रॉथ मध्ये भरपूर लेमनग्रास घातलं होतं)
पूर्ण ताट..
त्याआधी त्यांना इथल्या प्रसिद्ध गाड्यावरची मटरा कचोरी आणि मटरा कुलचा खाऊ घातला होता. आमच्याकडे घरी आलेल्या पाहूण्यांचे हल्ली रिच्युअल झालं आहे, ही मटरा कचोरी आणि मटरा कुलचा खाणे. बर्याचदा पाहूणेच येता येता स्वतः घेवून येतात. काल मला कळलं कोणत्यातरी इंटर्व्यु मध्ये बी प्रॅक नावाच्या पंजाबी गायक - कंपोझरनी या मटरा कचोरीचे कौतूक केलं होतं आणि सासरी गेल्यावर मी नेहेमी खातो असं सांगितलं होतं. त्यामुळे आता अजूनच प्रसिद्ध झालं आहे ठिकाण.
अल्पना आता बी प्राक बरोबर
अल्पना आता बी प्राक बरोबर सेलिब्रिटी झाली की
( माझ्या माहितीत त्याने ते फायटर मधले हीर आसमानी गाणे गायले आहे. )
पूर्ण ताट मस्त दिसते आहे !!
मेघच्या बीट थालीपीठाला मस्त रंग आलाय.
अरे, थालपिठ मिस झालं
अरे, थालपिठ मिस झालं माझ्याकडून. छान रंग आलाय. मी करून बघेन. उपासाच्या भाजणीचे थालपिठ ऑल टाईम फेव्हरेट आहे.



कसली सेलेब्रेटी, तिथली गर्दी मात्र वाढलीये आता. बी प्राकनी गायलेलं गाणं नाही लक्षात पण बर्याच फेमस पंजाबी गाण्यांचे कंपोझिशन त्याने केलेलं आहे हे माहित होतं. आमची कॉलनी / बहूतेक शेजारची गल्ली सासुरवाडी आहे म्हणे त्याची.
कालचा लेमनग्रास ब्रॉथ / स्टॉक खूप उरला होता. तो वापरून आज जिंजर -लेमनग्रास व्हेज क्लिअर सूप बनवलं.
काल थोडासा राजमा शिजवून ठेवला होता. तो रात्री जेवण्याचा प्लान पाहूण्यांमुळे बदलल्याने तसाच उरला. आज सकाळी त्यात थोडा बटाटा, थोडं बेसन घालून राजमा टिक्क्या बनवून फ्रीजमध्ये ठेवल्या. त्या घालून रोल / रॅप बनवला आत्ता रात्रीच्या जेवणात. ताटात थोडा ढोकळा आहे, कारण संध्याकाळी खायला आणलेला ढोकळा थोडा उरला होता.
अल्पना, तुमचे सूप्स छान असतात
अल्पना, तुमचे सूप्स छान असतात. रेसिपी पण लिहा जमल्यास.
वाह ! अल्पना, सूप्स आणि
वाह ! अल्पना, सूप्स आणि टिक्क्या मस्त.
किट्टु , घे गं भजी
सूप कसे केले?
सूप कसे केले?
कोथिंबीरीचे भरपूर देठ,
कोथिंबीरीचे भरपूर देठ, मुळ्याची २-३ पानं, पालकाचे थोडे देठ, फरसबीचे देठ आणि ३-४ शेंगा, गाजराचा तुकडा, दोन गवती चहाचे कांदे आणि पात, आल्याचा एक तुकडा आणी एक लसणाची पाकळी + तमालपत्र, ३-४ मीरे आणि मीठ घालून कुकरमध्ये एक शिट्टी येईपर्यंत उकळून स्टॉक बनवून ठेवला.
पहिल्या लेंटिल सूपसाठी थोड्या तेलावर चिरलेलं आलं-लसूण आणि कांदा परतून टॉमॅटो, गाजर आणि मशरूमचे तुकडे घातले. त्यात स्टॉक घालून भाज्या शिजल्यावर शिजलेला आख्खा मसूर घातला. मीरे पुड+ चिली फ्लेक्स + किंचितसा सोया सॉस + राईस व्हिनेगर आणि नारळाचे दुध (एक टेट्रा पॅक) घातलं.
दुसर्या सूपसाठी तेलावर भरपूर आलं, एक लसणाची पाकळी परतून त्यात चिरलेल्या मिक्स भाज्या घातल्या (झुकिनी, मशरूम, गाजर आणि बेबीकॉर्न वापरले होते), २ बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि वरचा लेमनग्रासवाला स्टॉक घातला. भाज्या शिजल्या कि त्यात किंचित सोया सॉस, भरपूर कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ + लिंबू घातलं.
मटरा कचोरी वाल्यांचे थोडे
मटरा कचोरी वाल्यांचे थोडे तिरके ठेवलेले हंडे फार छान दिसतात. वैशिष्ट्यपूर्ण.
… अल्पना, तुमचे सूप्स छान असतात..
+१
👍
बीटरूट थालीपीठ नाविन्यपूर्ण आहे, गुलाबो धाग्यावर शोभेल फोटो 👍
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. बाकी इथल्याला सर्व डिशेस एकसे बधकर एक असतात. खुप काही शिकायला मिळते. मी जे थालिपिठ बनवले ते तुम्हा सर्वांचे कडून प्रेरणा घेऊनच.
हो अनिंद्य सर
हो अनिंद्य सर
माझ्या ही आले ते मनात. खुप खुप धन्यवाद
अहाहा
अहाहा
एकसो एक पदार्थ....
सगळेच पदार्थ अगदी तोंडाला पाणी सुटणारे आहेत.
रोज येतो इथे आणि डोळे भरून पाहतो पदार्थ.
इथून पदार्थ ऑर्डर करायची सोय मायबोलीने करायला हवी यार.....
😋
अल्पना ,सुप भारी दिसतय.
अल्पना ,सुप भारी दिसतय.
मटरा कचोरी म्हणजे मटार कचोरी का?
इथून पदार्थ ऑर्डर करायची सोय
इथून पदार्थ ऑर्डर करायची सोय मायबोलीने करायला हवी यार.....>> + १११११
मटरा कचोरी म्हणजे मटार कचोरी का? >> हेच विचारायचयं
मटरा कचोरी म्हणजे मटार कचोरी
मटरा कचोरी म्हणजे मटार कचोरी का?>> नाही मटरा म्हणजे अमृतसरी छोल्यांसारखा पांढरे मटार वापरून केलेला पदार्थ आहे. इथे दिल्लीत आणि युपी मध्ये मटरा कुलचा च्या गाड्या असतात.
पापडी सारख्या पुरी/ कचोरी वर मटरा घालून त्यावर चटणी, कांदा, हिरव्या मिरच्या घालून सर्व्ह करतात.
मटरा कचोरी सिंधी दाल पकवानचे
मटरा कचोरी सिंधी दाल पकवानचे व्हेरिएशन वाटते आहे, चना दाल ऐवजी पांढरे मटार. बाकी अलमोस्ट सेम दिसतेय.
पुढे केले/ आणले / खाल्ले तर फोटो दाखवा प्लीज.
स्वत: कुठलेही उपास-तापास करत
स्वत: कुठलेही उपास-तापास करत नाही. पण कुणी करत असेल तर त्याला/तिला मॉरल सपोर्ट म्हणून साबुदाणा खिचडी खातोच.
तेव्हढाच पुण्यसंचय 😀
एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी 👆
खातांना नेहेमीप्रमाणे वेचून वेचून खोबरे बाजूला काढले 😏
तेव्हढाच पुण्यसंचय>>>>>>
तेव्हढाच पुण्यसंचय>>>>>>
नाही पुण्याची मोजणी
फक्त खोबऱ्याची वेचणी....
नाही पुण्याची मोजणी
नाही पुण्याची मोजणी

फक्त खोबऱ्याची वेचणी
>>>>
फक्त खोबऱ्याची वेचणी ऋतुराज.
फक्त खोबऱ्याची वेचणी 😀
ऋतुराज. 😎
सध्या माबोवरचा सगळ्यात आवडता
सध्या माबोवरचा सगळ्यात आवडता धागा..

आमचं ताट ,चपाती,वालपापडी भाजी ,बीट कोशिंबीर , काकडी
बीटाचे आप्पे केलेले उरले होते,ते पण ताटात
Pages