.... आणि शाहरुख खानने मिळवला राष्ट्रीय पुरस्कार!

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 August, 2025 - 06:06

& The Award goes to....
King Khan Shahrukh kkkkkKhaan !!

... आणि शाहरुख खानने मिळवला राष्ट्रीय पुरस्कार!

चित्रपट जवान Happy

बॉलीवूड मधील एव्हरजवान सुपरस्टार ऑफ मिलेनियम जो किंग ऑफ रोमान्स आणि किंग खान ऑफ बॉलीवूड आणि बादशाह आणि डॉन अश्या न जाणे कैक नावाने ओळखला जातो. जे तो स्वतःबद्दलही म्हणतो, I am The last of the stars .. आणि ते पटते सुद्धा कारण असा सुपरस्टार पुन्हा होणे नाही...

पण या सगळ्या स्टारडममध्ये त्याच्यातील खराखुरा कलाकार आणि अभिनेता याचे म्हणावे तसे कौतुक होत नाही. कधी झाले नाही. कित्येक फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळून देखील, आणि ऑस्करला हजेरी लावून सुद्धा, राष्ट्रीय पुरस्कारापासून तो नेहमी वंचित राहिला आणि माझ्यासारख्या त्याच्या कट्टर चाहत्यांना देखील कुठेतरी याची खंत होतीच.. पण यापुढे नाही Happy

मला कल्पना आहे की जसे देशभरात त्याचे करोडो चाहते आहेत तसे मायबोलीवर सुद्धा शेकडो आहेत.
तर आपल्या लाडक्या शाहरुखला मिळालेल्या पुरस्काराचे कौतुक आणि अभिनंदन करायला हा धागा.

शाहरुख सोबत इतर दोन पुरस्कार मिळवणारे बॉलीवूड कलाकार

राणी मुखर्जी — Mrs Chatterjee vs Norway

आणि नवीन पिढीतील माझा अजून एक आवडता कलाकार,
विक्रांत मेस्सी (शाहरुखसोबत) — 12th Fail

लहान मुलांसाठीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट — नाळ २

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट — श्यामची आई

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट — कठल

यांचेही मनापासून कौतुक आणि अभिनंदन!

शाहरुखला ज्या जवान चित्रपटाबद्दल पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल इथे वाचू शकता.

परीक्षण ए जवान - फक्त आणि फक्त शाहरूख खान !
https://www.maayboli.com/node/84004

जियो शाहरुख !!! You made my Day..!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालाय तस्मै नमः __/\__

डोनाल्ड ट्रंप यांनाही या वर्षीचा नोबेल पुरस्कार मिळेल ही शक्यता वाटते .
जो जे वांछिल ..

केशवकूल, रानभुली .. +७८६

तो डिझर्व करत नाही तर कोण करतो...हा प्रश्न पडायचा.

जर शाहरुखला पूर्ण कारकीर्द एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नसता तर नक्कीच लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड म्हणून तरी दिले असते. भारतीय चित्रपटसृष्टीला जगभर लोकप्रिय करण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे.

रानभुली तुम्ही ट्रम्पचे उदाहरण घेत पोस्ट नंतर अपडेट केली वाटते.
तरी माझे +७८६ राहू देतो. कारण शाहरुख खरेच डीझर्व करत होता.
अर्थात त्याचे इतके खास चित्रपट आणि भूमिका सोडून तो जवानला मिळाला जे मजेशीर आहे.

शाहरुख चा जवान पहिला आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळावा अशी कांय acting मला तरी वाटली नाही. कांय नियम असतात ते माहिती नाही.

जाना है जिसे पत्थर, हीरा है वो तो हीरा
सदा तुमने एब देखा, हुनर को न देखा
वो तो है अलबेला,हजारों में अकेला
वो तो है अलबेला,हजारों में अकेला
बंशी को लकड़ी सदा समझा किए तुम
पर उसके नगमो की धुन कहाँ सुन सके तुम
दिए की बाती देखी, देखी न उसकी ज्योति

त्याला आधीच मिळायला पाहिजे होता. डर, अंजाम मध्ये पण चांगला अभिनय केला होता त्याने. डियर जिंदगी पण मस्त होता. पण त्याने इमेज चेंज करून भन्नाट दुहेरी भूमिका केल्याने त्याला दिला असणार.

पण सध्या बऱ्याच डिझर्व्हिंग लोकांना उशिरा का होईना पुरस्कार देत आहेत हे चांगले. अशोक सराफांना पण पद्मश्री खरे तर मागेच मिळायला पाहिजे होता. यावर्षी फायनली मिळाला.

पठाण ला देउ नाह, पाकिस्तानी आ स आइ मदत करत आहे असे दाखवल

डंकी नाही देउ शकत ,भारत देशा विरुध भरपुर आहे

आणि तोतर्याचा शेवट चा पुरस्कार आहे ,मग रा हीला काय , जवान

अरे व्वा. असे आहे का. आम्हाला वाटत होत की तो तोतरेपणाची नक्कल. वाटायचे की केव्हढा महान अभिनेता आहे.
आणि वर पाकिस्तानची बाजू पण घेतो.
आणि ती भगवी लंगोटी, ती विसरलात जणू.

केरला फाईल्स च्या दिग्दर्शकाला, नाळ 2ला, श्यामची आई ला देखिल पुरस्कार मिळालेत.

बिच्चारा अक्षय कुमार. Wink

अक्षय कुमारला २०१७ मध्येच मिळाला. म्हणूनच शारूखला मिळायला उशीर झाला असे म्हणालो. आधीच मिळायला पाहिजे होता.

हे राम.. शाहरुख खान चांगला अभिनेता होता याबद्दल वादच नाही पण जवान?????!!!!!!!!! की यापुढे शाहरुखला कसदार अभिनय करण्याची संधी असलेले चित्रपट मिळतील
की नाही माहित नाही, त्यामुळे जवान हाती लागलाय तर पुरस्कार देऊन त्याच्या नावापुढे टिक मारुया असा विचार केला गेला???

हे रहमानला स्लमडॉग… साठी ऑस्कर मिळाल्यासारखे झालेय.

बाजीगर, डर, कभी हा कभी ना, दिलवाले, अंजाम, चख दे, देवदास, अश्या व अजून काही (शाहरुख, माधुरी व अक्षय कुमारचा कोणता ते नाव आत्ता आठवत नाही) संस्मरणीय चित्रपटात संस्मरणीय अभिनय करणाऱ्या शाहरुखला किमान अडीच तीन दशके सर्व रसिकांचे प्रचंड मनोरंजन केल्याबद्दल एक रसिक म्हणून मनःपूर्वक धन्यवाद!

अनेकदा आवडला नाही, अनेकदा स्टाईलच्या आहारी गेला, अनेकदा तंत्रज्ञान त्याच्यावर हावी करण्यात आले, या सगळ्या गोष्टी लिहिण्याचा हक्कही रसिकाला आहेच की!

मात्र, डर मधला प्रेमीक (जो अख्खा पिक्चर एक नकारात्मक भूमिका करूनही खिशात घालतो, तसेच बाजीगरही) तो आयुष्यभर स्मरणात राहणारच. अर्थात, त्याला रसिकाश्रय आणि संपत्तीही भरघोस मिळाली, पण तरीही एक महत्वाचा पुरस्कार मिळणे हे वेगळेच असते.

शाहरुख खानला मिळालेल्या उदंड रसिक-प्रेमामुळे त्याच्यात गेल्या काही वर्षांत गर्व निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. पण ते तर गल्लीतल्या कवींचेही होते. त्याने स्वतःचा राजेश खन्ना होऊ दिला नाही हे महत्वाचे आणि राजेश खन्ना इतका मेगा स्टार तो बनू शकला नाही हे वेगळे, त्याची कारणे वेगळी आहेत

फौजी या मालिकेतच तो भयंकर आवडला होता. नंतर हळूहळू त्याच्यावरील खास प्रेम जरा आटत गेले.

तरीही, शाहरुख खानने मनोरंजन, रोमान्स, मारामारी, नृत्य, भावनिक व्यक्तिरेखा सगळे काही नक्कीच उंचीवर नेले. अर्थात, संपूर्ण टीमचा त्यात सहभाग असतो हे खरे, पण प्रतिभा जबरदस्त!

शाहरुख, आमीर, सलमान, सैफ या सगळ्यांनीच गाजवले. एक पिढी यांचेच चित्रपट बघत मोठी झाली असणार.

केरला फाईल्स च्या दिग्दर्शकाला, नाळ 2ला, श्यामची आई ला देखिल पुरस्कार मिळालेत.
>>>>
हो नाळ बद्दल नुकतेच समजले. सर्वोत्कृष्ट मुलांसाठीचा चित्रपट. एका मराठी चित्रपटाला मिळाला. हे सुद्धा घेतो हेडर पोस्ट मध्ये..
शामची आईला मराठी चित्रपटात मिळाला.

अक्षय कुमार... चेक केले आता.. रुस्तमसाठी मिळाला आहे.

आणि गेले तीन वर्षांचे पुरस्कार असे आहेत
पुष्पा — अललू अर्जुन
कांतारा — जो कोणी त्याचा हिरो असेल
तान्हाजी — अजय देवगण

शाहरुख जवानमध्ये या सर्वांपेक्षा सरस होता.
कारकिर्दीच्या किंबहुना वयाच्या या टप्प्यावर असा प्रयोग करून त्यात यशस्वी होणे हे कौतुकास्पद होते

आणि गेले तीन वर्षांचे पुरस्कार असे आहेत
पुष्पा — अललू अर्जुन
कांतारा — जो कोणी त्याचा हिरो असेल
तान्हाजी — अजय देवगण>>>>>

ओह्ह्ह्ह्ह… कोणे एके काळी राष्ट्रिय पुरस्कार मिळालेले चित्रपट दुरदर्शनवर दाखवत व त्यामुळे मी त्यातले काही पाहिलेत. ते मसाला चित्रपटच असत पण अभिनय, कथा, सादरीकरण या बाजु भक्कम असत. वरची यादी पाहता पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेलेय असे वाटते. पुष्पाचे नाव या यादीत येत असेल तर जवानानेच काय घोडे मारलेय…

शाहरुखला स्वदेश, चक दे किंवा लव यु जिंदगीसाठी पुरस्कार मिळाला असता तर मला आनंद झाला असता. असो.

राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले अभिनेते

अशोक कुमार - महल साठी. अशोककुमार नैसर्गिक तसेच अभिनयासाठी ओळखले जातात. आशिर्वाद किंवा अन्य अशाच पिक्चरसाठी मिळायला हवा होता. महल मधे असा काय तीर मारलाय ?

उत्पल दत्त - हा हरहुन्नरी अभिनेता आपल्याला व्यंगात्मक अभिनयासाठीच माहिती आहे. पण बंगालीत त्यांनी अनेक कसदार भूमिका केल्यात. त्यांना द स्ट्रेंजर साठी पुरस्कार मिळालाय. तो पाहिलेला नाही. पण त्यांच्या कुठल्याही भूमिकेसाठी मिळाला तरी आनंदच आहे.

संजीवकुमार यांना दस्तक आणि कोशिश साठी पुरस्कार मिळाला होता. दोन्ही लिस्ट मधे आहेत. कोशिश ची क्लिप पाहिली आहे. जीव ओतून काम केलंय पण तेव्हांच्या पद्धतीने. अर्थात संजीवकुमार यांची अफाट अभिनयक्षमता बघता आज ते असते तर हाच रोल वेगळ्या पद्धतीने केला असता. नैसर्गिक अभिनेता.

साधू मेहेर अभिलाषा साठी मिळालंय. त्यांचं अंकुर मधलं काम पाहिलं आहे. इन्कार मधे श्रीराम लागूंचा ड्रायव्हर ही त्यांची ओळख. ज्याचा मुलगा चुकून किडनॅप होतो. अफाट क्षमता.

मिथुन चक्रवर्ती - गुरू साठी मिळालंय. मृगया साठीही मिळालंय आणि रामकृष्ण परमहंसांच्या रोल साठीही मिळालंय. त्याचे इतर सिनेमे पाहिले तर कुणी म्हणणार नाही मृगया मधला मिथुन हाच.

नसिरूद्दीन शाह - वेन्सडे. पण बहुतेक स्पर्श आणि आणखी एका पिक्चर साठी मिळालंय. नासिरूद्दीन शहांचे सुरूवातीचे सिनेमे आणि अभिनय दोन्ही ग्रेट. वेन्सडे पिक्चर मसाला आणि मेन स्ट्रीमचा. सफाईदार आहे. पण स्पर्श साठी मिळालेला असेल तर मस्तच.

ओम पुरी - फक्त ईस्ट इज ईस्टचा उल्लेख आहे. पण ओम पुरीचे अर्धसत्य, पार असे अनेक सिनेमे आहेत. यातल्या कुठल्याही रोल साठी पुरस्कार मिळायला हवा.

शशी कपूर ला दीवार साठी मिळालाय. त्यात अमिताभचा अभिनय सरस होता. पण दोन्हीही राष्ट्रीय पुरस्कार साठी नको वाटते.
शशी कपूरला कलियुग, उत्सव साठी मिळायला हवा होता.

अमिताभचा ब्लॅकमधला अभिनय जेव्हढा हाईप केलाय तेव्हढा काही आवडला नाही. सफाईदार आहे. पण यात अनेकदा अमिताभ कभी खुशी कभी गम सारखा कृत्रिम होतो इमोशनल सीन मधे. शाहरूखचा संसर्ग.
सौदागर मधे त्या पेक्षा चांगला आहे. आनंद मधेही चांगला आहे. अमिताभने काही सिनेमे इमेजला बाजूला सारून केले असते तर बरं झालं असतं.

नाना पाटेकर ला क्रांतिवीर साठी मिळालाय. आक्रस्ताळेपणा आहे. त्या पेक्षा थोडासा रुमानी हो जाये ला मिळायला हवा होता.

सारांश साठी अनुपम खेरला मिळालाय ना ?

आता राष्ट्रीय पुरस्कार पण फिल्मफेअर वालेच देतात का ?

साधना
+७८६

हो खरे आहे. यापेक्षा चांगले काम त्याने केले आहे. चक दे, स्वदेश, डियर जिंदगी हेच नाही तर सुरुवातीचे निगेटीव्ह रोल डर, बाजीगर, तसेच कभी हा कभी ना सारख्या चित्रपटात सुद्धा फार नैसर्गिक अभिनय केला आहे. दिल से मधील अभिनय सुद्धा कमाल होता, येस बॉस मध्येही नेहमीचा रोमान्स खान नसून एका मध्यमवर्गीय माणसाच्या स्वभावातील बारीक कंगोरे टिपलेला म्हणून रिलेट होणारा रोल होता. बादशाह, चेन्नई एक्सप्रेस आणि कैक चित्रपटातून कॉमेडीची सुद्धा बरीच रेंज दाखवली आहे. तर त्याच्याच चित्रपटांच्या तुलनेत जवान फार मागे आहे.

पण धनि म्हणतात तसे, जर अक्षय आणि सैफला मिळू शकतो, अजय देवगण ज्याची रेंज मर्यादित असून तीन वेळा मिळू शकतो, तर शाहरुखला कारकिर्दीत एक तरी मिळणे तो डिझरव करत होता असे समजावे.

वरच्या लिंक्स साठी थँक्स. या लिस्ट मधले मामुट्टी आणि कमलचे पुरस्कार प्राप्त सिनेमे बघेन आता.

नासीर होता पार मधे. मी चुकून ओम पुरी म्हटलंय.
स्पर्श चं नाव आहे लिस्ट मधे. अर्ध सत्यचं सुद्धा आहे. हा अलिकडेच पाहिलाय.
शशी कपूरचा न्यू दिल्ली टाईम्स पाहिलाय. छान सिनेमा. पण अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याइतपत आहे ?

काळ जुना असो किंवा नवीन, प्रत्येक वेळी परीक्षकांचे पॅनल निःपक्ष असेलच याची काही खात्री नाही.

शाहरूखचे अभिनंदन. पुष्पा, जवान हे सिनेमे अवॉर्ड मिळण्याच्या लायकीचे नाहीत पण कदाचित आता नॅशनल अवॉर्ड ही फिल्मफेअर सारखे पॉप्युलर सिनेमांना बघून देत असतील. माझ्या मते डर किंवा चक दे साठी मिळणे जास्त योग्य होते . स्वदेस अजून मी पाहिला नाही. पण आता एकदा नक्की वेळ काढून पाहीन म्हणते.

अभिनंदन शाहरुख. बाजीगर किंवा चक दे साठी मिळायला हवा होता.

मला फौजीत सर्वात जास्त आवडला (त्यावेळी आम्हा कॉलेजीयन मुलींचा लाडका होता एकदम) . काजोल बरोबर सुरुवातीचे सर्व पिक्चर्स आणि चक दे मध्ये आवडला. स्वदेस मी बघितला नाहीये. हल्ली काही वर्षे आवडत नाही म्हणून बघितले नाहीयेत कुठलेही पिक्चर्स. वय खूप जाणवतं आणि यंग रोल करतो. त्यात ते विमल पानमसाला ऍड करणारे सर्वच आवडेनासे झालेत (हे अवांतर).

एनिवे पूर्वी खूप आवडायचा, एकेकाळी त्याच्या रोल्सनी आनंद दिलाय.

हो हो बघायचाय.

फौजीत आम्ही मैत्रिणी जाम फिदा होतो त्याच्यावर, अचानकपणे ते दिवस आठवले.

स्वदेश मी कित्येक वेळा पाहिला आहे. दरवेळी काहीतरी नव्याने गवसत जाते. अगदी स्वतःबद्दलचा शोध वाटतो तो.

पहिल्यांदा पाहिला तेव्हा आवडला होता पण संथ वाटला होता. पण नंतर जाणवले की चित्रपटाचा हाच पेस योग्य आहे. आपल्याला चित्रपट म्हणजे काही वेगवान घडामोडी लागतात अन्यथा पंचायत सारखी सिरीज आपण त्या वेगाची अपेक्षा न धरता एन्जॉय करतोच ना..
पुढच्यावेळी बघताना आपण ही चूक करत नाही म्हणून जास्त आवडतो.

जवानसाठी शाहरुखला अवार्ड देणे ह्यापेक्षा शहरुखमधल्या उमद्या कलाकाराचा उपमर्द नसावा. अक्षय कुमार, नि अजय देअगणला मिळालय तर शाहरुखला का नको एव्हढी वाईट वेळ आली नाहीये त्याच्यावर असे वाटते. हे अवॉर्ड नसते मिळाले तरी शाहरुख तो शाहरुखच राहिला असता.

Pages