.... आणि शाहरुख खानने मिळवला राष्ट्रीय पुरस्कार!

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 August, 2025 - 06:06

& The Award goes to....
King Khan Shahrukh kkkkkKhaan !!

... आणि शाहरुख खानने मिळवला राष्ट्रीय पुरस्कार!

चित्रपट जवान Happy

बॉलीवूड मधील एव्हरजवान सुपरस्टार ऑफ मिलेनियम जो किंग ऑफ रोमान्स आणि किंग खान ऑफ बॉलीवूड आणि बादशाह आणि डॉन अश्या न जाणे कैक नावाने ओळखला जातो. जे तो स्वतःबद्दलही म्हणतो, I am The last of the stars .. आणि ते पटते सुद्धा कारण असा सुपरस्टार पुन्हा होणे नाही...

पण या सगळ्या स्टारडममध्ये त्याच्यातील खराखुरा कलाकार आणि अभिनेता याचे म्हणावे तसे कौतुक होत नाही. कधी झाले नाही. कित्येक फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळून देखील, आणि ऑस्करला हजेरी लावून सुद्धा, राष्ट्रीय पुरस्कारापासून तो नेहमी वंचित राहिला आणि माझ्यासारख्या त्याच्या कट्टर चाहत्यांना देखील कुठेतरी याची खंत होतीच.. पण यापुढे नाही Happy

मला कल्पना आहे की जसे देशभरात त्याचे करोडो चाहते आहेत तसे मायबोलीवर सुद्धा शेकडो आहेत.
तर आपल्या लाडक्या शाहरुखला मिळालेल्या पुरस्काराचे कौतुक आणि अभिनंदन करायला हा धागा.

शाहरुख सोबत इतर दोन पुरस्कार मिळवणारे बॉलीवूड कलाकार

राणी मुखर्जी — Mrs Chatterjee vs Norway

आणि नवीन पिढीतील माझा अजून एक आवडता कलाकार,
विक्रांत मेस्सी (शाहरुखसोबत) — 12th Fail

लहान मुलांसाठीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट — नाळ २

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट — श्यामची आई

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट — कठल

यांचेही मनापासून कौतुक आणि अभिनंदन!

शाहरुखला ज्या जवान चित्रपटाबद्दल पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल इथे वाचू शकता.

परीक्षण ए जवान - फक्त आणि फक्त शाहरूख खान !
https://www.maayboli.com/node/84004

जियो शाहरुख !!! You made my Day..!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्ण सहमत.
खर तर शाखाला तेव्हाच राष्ट्रीय पुरस्कार मिळायला पाहिजे होता, पण त्या पिक्चर मध्ये सरकार वर अडून आडून टीका केली होती. मग त्याला पुरस्लार कसा देणार?
अरे सर मी दुपारी शाखा चा देवदास बघितला पण स्वदेशमध्ये जसा तो मोहन भागवत झाला आहे. तसा तो इथे देवदास नाही झाला. आता दिलीप कुमारचा देवदास बघेन आणि मग लिहीन .

मी दोन महिन्यापूर्वी स्वदेश पाहिला होता
कितव्यानदा ते मोजायचे सोडले आहे
पण गेल्या आठवड्यात माझ्या लेकीने तो बघितला नाही हे समजल्यावर पुन्हा एकदा बघितला..
एक वेगळा धागा यायला हवा त्यावर.. बघूया वीकेंडला जमतो का

स्वदेसचा ठहराव आणि संथ लय फारच आयकॉनिक आहे, लाँग लास्टिंग इंपॅक्टवाला आहे . शेवट नाही बघितला तरी चालेल (कारण तसाही काहीच फरक पडत नाही, शिवाय अनेक म्हणतात की शेवट सिनेम्याला गढूळ करतो आणि असं बरंच काही) अशा काही फिल्म्समधला एक स्वदेस. एसारके इजे टोटल लव्हच, पण इथं त्याला आणखी एक डायमेन्शन आहे.

सैफ ला हम तुम बद्धल नॅशनल अवॉर्ड मिळाले तेंव्हा कोणी काही बोलले नाही.. आता शाखा ला जवान बद्धल मिळाला तर किती ती चर्चा...

शाहरुखचे तीन मोठे चित्रपट होते त्या वर्षी..
स्वदेश, मे हू ना आणि वीर झारा
सैफचा हम तुम सुद्धा होता.

फिल्म फेअर मध्ये बेस्ट अँक्टरसाठी शाहरुखला या तिन्ही मध्ये नॉमिनी होती आणि पुरस्कार स्वदेशसाठी मिळाला होता.
जे फिल्म फेअरला जमले ते नॅशनल अवॉर्ड ला जमले नाही..

50th Filmfare Awards - Wikipedia https://share.google/InHW0Gslsiik03g9t

जे फिल्म फेअरला जमले ते नॅशनल अवॉर्ड ला जमले नाही..>>> फिल्मफेअर हे एका मॅगझिन ने दिलेले( पान मसालाने खुप वर्श स्पॉन्सर केलेले) अ‍ॅवॉर्ड आहेत..त्याची नॅशनल अ‍ॅवार्डशी काय तुलना करणार?? त्यावर्शी बच्चनला नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाल होत "ब्लॅक" साठी ...शाखा त्याच्या कॅलिबरच्या आसपास फिरकु सुद्धा शकत नाही..

प्राजक्ता
मी पुन्हा चेक केले.
ब्लॅकसाठी अमिताभला अवॉर्ड त्याच्या पुढच्या वर्षी होता. तो २००५ चा चित्रपट आहे.
स्वदेश २००४ चा चित्रपट आहे. त्यावेळचा अवॉर्ड सैफ अली खान याला दिला होता. आणि त्या वर्षी स्वदेशला इतर कॅटेगरी मध्ये पुरस्कार आहेत. पण शाहरुखला नव्हता.

आणि हो नॅशनल अवॉर्ड जर फिल्म फेअर तुलनेत भारी असेल तर आता जवान साठी शाहरुखला पुरस्कार दिला आहे हे सुद्धा आपण सर्वांनीच तितक्याच मोठ्या मनाने स्वीकारायला हवे.
अमिताभला दिला तेव्हा तो पुरस्कार भारी आणि शाहरुखला दिला तेव्हा त्याला नावे ठेवायचे हे शाहरुखवर अन्यायकारक आणि पक्षपाती झाले.

बाकी अमिताभ विरुद्ध शाहरुख हा वाद जगाच्या अंतापर्यंत चालू राहणार. मी हल्ली त्यात पडत नाही. कारण या दोघांमध्ये वाद घातला जातो याचाच अर्थ दोघे इतरांच्या तुलनेत किती तरी ग्रेट आहेत याची जाणीव मला झाली आहे. त्या दोघात पहिला दुसरा नंबर लावायची निकड तूर्तास मला भासत नाही Happy

काल कितीव्यांदा तरी "बादशहा" बघितला.
अवार्ड द्या किंवा नका देऊ, बादशहाला काय फरक पडतोय?
मी जी कॉपी बघत होतो ती चार महिन्यापूर्वी 65M लोकांनी बघितली आहे. अश्या तीन चार कॉप्या नेट वर आहेत, मग कशाला पाहिजे पुरस्कार?

शाहरुख ला दिला म्हणून पक्षपाती पणा झाला असं नाही तर शाहरुखला जवान साठी मिळाला म्हणून पटत नाही.
नॅशनल अवॉर्ड भारी आहेत म्हणून त्यांनी निवडलेले प्रत्येक पुरस्कारच योग्य असतील असं नाही.

बाकी अमिताभ विरुद्ध शाहरुख हा वाद जगाच्या अंतापर्यंत चालू राहणार.>>> हा वादच नाहिये कारण शाखा बच्चनच्या आसपास पण येत नाही, तुलना दोन समान कॅलिबरच्या लोकात होवु शकते.

JUST IMAGINE
स्वदेश, कभी हा कभी ना, बादशहा मध्ये शाखा च्या ऐवजी अमिताभ बच्चन असता तर? Lol

केशवकूल हो, तसेच्या तसे रिप्लेस केले तर जे शाहरुख करू शकतो ते अमिताभ नाही करू शकणार असेच वाटते.

पण मुळात त्यात अमिताभ असता तर ते चित्रपट वेगळ्या धाटणीचे आणि शैलीचे असते. अमिताभला डोळ्यासमोर ठेवून लिहिले गेले असते. त्यामुळे अशी तुलना होऊ शकत नाही.

मला खरे तर शाहरुखचे यासाठी कौतुक वाटते की त्याने डॉन जो अमिताभचा आयकॉनिक रोल आहे त्याचा रिमेक करायची हिंमत दाखवली. तुम्ही स्वतः एक सुपरस्टार असताना आधीच्या सुपरस्टार बाबत तुमची तुलना होत असताना आपली कम्फर्ट लेव्हल सोडून दुसऱ्याची ज्यात मास्टरी आहे तोच रोल करणे हे प्रचंड धाडसी आहे.
हृतिक ने सुद्धा अग्निपथ केला पण त्याच्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते.

असो, अमिताभ किंवा शाहरुख या दोघांपेक्षा चांगला अभिनय करणारे कलाकार या देशात आहेत. पण एखाद्याने केवळ तोच एक निकष लाऊन यांना हलके लेखायचा प्रयत्न केला तर त्यांचा मुद्दा खोडण्यात काही अर्थ नाही. शाहरुखचे स्टारडम काय चीज आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहेच.

शाहरुखचे स्टारडम काय चीज आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. >>> "की आणखी १०० प्रतिसाद पोष्टु?" असा गर्भित इशाराच मला या शेवटच्या वाक्यात जाणवला, नी मी अक्षरशः गर्भगळीत झालो. Biggrin

शाहरुखचे स्टारडम - हे शीर्षक आणि आत शून्य मजकूर इतका धागा काढला तरी १००० प्रतिसाद होतील.

शाहरुखला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून या आधी तो कोणा कोणाला मिळाला याची चर्चा होत आहे. सर्वांचे त्यानिमित्ताने कौतुक होत आहे. जे छानच होत आहे.

सर
मला कधी कधी संशय येतो की तुम्ही खरो खरच शाखाचे निस्सीम भक्त आहात की नाहीत.
तुमचे म्हणजे "ये भी है, वो भी है , किससे प्यार करू " अशी पॉलिसी आहे का?

म्हणजे?
वरच्या पोस्टमध्ये तर शाहरुखचे कौतुकच केले आहे.
थोडक्यात अर्थ असा की शाहरुखला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान आणि महत्त्व अचानक वाढले.

हृतिक ने सुद्धा अग्निपथ केला पण त्याच्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते. >> शाहरुख नि हृतिक दोघांनीही (त्यात हवे तर रागोव ची पण भर घाला शोलेबद्दल) अमिताभचे सिनेमे परत केले ह्यात त्या दोघा किंवा तिघांची काही थोरवी नसून हे अमिताभचे कौतुक आहे असा पुसटसा विचार माझ्या मनाला चाटून गेला एव्हढेच.

शाहरुख ला दिला म्हणून पक्षपाती पणा झाला असं नाही तर शाहरुखला जवान साठी मिळाला म्हणून पटत नाही. >> हे जवळजवळ दर दहा पोस्ट्सआड आलेले विधान आहे Happy

शाळेत टेबल्स आणि संस्कृत श्लोक पाठ करायचा खूप कंटाळा यायचा. रोज उठून तेच तेच काय असं वाटायचं.

शाळेत टेबल्स आणि संस्कृत श्लोक पाठ करायचा खूप कंटाळा यायचा.
>>>

खरे आहे. काही गोष्टींचे महत्त्व तेव्हा कळत नाही. पुढे जाऊन समजते.

तिघांची काही थोरवी नसून हे अमिताभचे कौतुक आहे असा पुसटसा विचार
>>
अर्थात अमिताभचे कौतुक आहेच. शाहरुखचे कौतुक केले म्हणजे अमिताभचे नाही असा निष्कर्ष कश्याला. उलट डॉन अमिताभचा आयकॉनिक रोल आहे, त्यात त्याची मास्तरी आहे, अमिताभ आधीच्या पिढीचा सुपरस्टार आहे वगैरे सारे अमिताभच्या कौतुकातच लिहिले आहे ना..

काही गोष्टींचे महत्त्व तेव्हा कळत नाही. पुढे जाऊन समजते. >> exactly, त्या वेळी मानसिक तयारी करून घेतल्याने पुढे जाऊन वर्षानुवर्षे रोजच्या रोज, तिन्ही त्रिकाळ माबोवरचं दळण शाखा दळण, फालतू धागे सहन करण्याची शक्ती आली. Happy

शाहरुखवरचे धागे म्हणजे संस्कृत श्लोक आणि सुभाषिते..
वाह, छान उपमा.. आवडली Happy

कोणाला या गोष्टी सांस्कृतिक ठेवा आणि वारसा वाटतो जे पिढ्यानपिढ्या टिकावे म्हणून सातत्याने प्रयत्न केले जातात तर कोणाला ते आवडत नाही, याची गरज भासत नाही. ज्याचे त्याचे विचार आणि ज्याची त्याची आवड.

अर्थात मतभिन्नता जरूर आहे. पण प्रत्येकाच्या आवडीचा आदर आहे.
कारण प्रत्येकाला त्याच्या आवडीची चर्चा करता यायला हवी इतके अभिव्यक्तीस्वातंत्र्य मायबोलीवर जपले जाण्याची अपेक्षा आपण धरू शकतो.

कारण प्रत्येकाला त्याच्या आवडीची चर्चा करता यायला हवी इतके अभिव्यक्तीस्वातंत्र्य मायबोलीवर जपले जाण्याची अपेक्षा आपण धरू शकतो. >> स्वतःला नोट : चर्चा ह्या शब्दाचा अर्थ आज जाऊन बघायला हवा.

शाहरुखवरचे धागे म्हणजे संस्कृत श्लोक आणि सुभाषिते..
>> दहावी मध्ये शाहरुख ने हिंदी संस्कृत घेतले होते ( 50 मार्क्स इच) - नॉट joking .. गूगल करून बघा...

Pages