& The Award goes to....
King Khan Shahrukh kkkkkKhaan !!
... आणि शाहरुख खानने मिळवला राष्ट्रीय पुरस्कार!
चित्रपट जवान 
बॉलीवूड मधील एव्हरजवान सुपरस्टार ऑफ मिलेनियम जो किंग ऑफ रोमान्स आणि किंग खान ऑफ बॉलीवूड आणि बादशाह आणि डॉन अश्या न जाणे कैक नावाने ओळखला जातो. जे तो स्वतःबद्दलही म्हणतो, I am The last of the stars .. आणि ते पटते सुद्धा कारण असा सुपरस्टार पुन्हा होणे नाही...
पण या सगळ्या स्टारडममध्ये त्याच्यातील खराखुरा कलाकार आणि अभिनेता याचे म्हणावे तसे कौतुक होत नाही. कधी झाले नाही. कित्येक फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळून देखील, आणि ऑस्करला हजेरी लावून सुद्धा, राष्ट्रीय पुरस्कारापासून तो नेहमी वंचित राहिला आणि माझ्यासारख्या त्याच्या कट्टर चाहत्यांना देखील कुठेतरी याची खंत होतीच.. पण यापुढे नाही 
मला कल्पना आहे की जसे देशभरात त्याचे करोडो चाहते आहेत तसे मायबोलीवर सुद्धा शेकडो आहेत.
तर आपल्या लाडक्या शाहरुखला मिळालेल्या पुरस्काराचे कौतुक आणि अभिनंदन करायला हा धागा.
शाहरुख सोबत इतर दोन पुरस्कार मिळवणारे बॉलीवूड कलाकार
राणी मुखर्जी — Mrs Chatterjee vs Norway
आणि नवीन पिढीतील माझा अजून एक आवडता कलाकार,
विक्रांत मेस्सी (शाहरुखसोबत) — 12th Fail
लहान मुलांसाठीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट — नाळ २
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट — श्यामची आई
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट — कठल
यांचेही मनापासून कौतुक आणि अभिनंदन!
शाहरुखला ज्या जवान चित्रपटाबद्दल पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल इथे वाचू शकता.
परीक्षण ए जवान - फक्त आणि फक्त शाहरूख खान !
https://www.maayboli.com/node/84004
जियो शाहरुख !!! You made my Day..!!
अरे शाहरुखला राष्ट्रीय
अरे शाहरुखला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून अभिनंदनाचा धागा आहे ना?
>>>
च्च. शारक्याचा डॉल्फिन कसा झाला असता नाही तर?
ऋन्म्याचा धागा आहे.
धागा कोणीही काढलेला असो मला
धागा कोणीही काढलेला असो मला काय फरक पडत नाही.
इथे पिक्चर न बघता लोक शाहरुखला नावे ठेवत होती म्हणून मी काही तरी लिहिले. बाकी प्रत्येकाची मते असतात त्याला कोण काय करणार
मला शारुकच्या मुलाखती, एकुण
मला शारुकच्या मुलाखती, एकुण प्रेझेन्स, सेन्स ऑफ ह्युमर, डिमिनर, स्टारडम कॅरी करणे, विचार प्रक्रिया, हजरजबाबीपण इ. एकदम आवडते. अगदी फॅन म्हणू शकाल इतके आवडते. पिक्चर तेवढे बहुतेकदा आवडत नाहीत. बघुच शकलो नाही असा जवान पहिलाच. नाहीतर बहुतेक सगळे अगदी अशोका पासून बघितले आहेत. आता नेमका यालाच पुरस्कार मिळाला.
हल्लीचे पठाण आणि ब्रह्मास्त्र तर फर्स्ट वीकेंड थेटरात जाऊन बघितले आहेत. पण नाहीच आवडत! माकाचु! 
शारक्या इजे लव्ह' हे खूप आहे,
शारक्या इजे लव्ह' हे खूप आहे, आणि खूप खरं आहे
>>>>
साजिरा मला अंदाज होताच म्हणूनच विचारले होते
शाहरुख गल्लाभरु अभिनय करतो.
शाहरुख गल्लाभरु अभिनय करतो. वासरात लंगडी गाय आहे Happy अर्थात त्याला चांगला दिग्दर्शक मिळालाही नसेल अजुन.
>>>>>
सामो, तुमच्या मताचा आदर आहे.
ते खोडायचा किंवा बदलायचा अट्टाहास नाही.
पण तुम्हाला चित्रपटांची आवड नाही फार असे म्हणाला होता म्हणून विचारतो, तुम्ही त्याचे कोणकोणते चित्रपट पाहिले आहे समजू शकेल का.. कदाचित तुम्ही मोजकेच आणि नेमके असलेच चित्रपट पाहिले असू शकते आणि कदाचित मी किंवा इथली लोकं तुम्हाला चांगले चित्रपट सुचवतील. शाहरुखबाबतचे मत बदलावे असा अट्टाहास नाही. पण त्याचे कैक चित्रपट अफाट आनंद देणारे आहेत. पुन्हा पुन्हा बघावे असे आहेत. जे ऋण माझ्या पिढीचे क्रिकेटप्रेमी सचिन तेंडुलकरचे मानतात की त्याच्या खेळीनी आम्हाला आनंद दिला आणि आमचे बालपण समृद्ध केले तसेच ऋण मी चित्रपटांबाबत शाहरुखचे मानतो. आणि ते उतरवायची अशी संधी शोधतो
इतक्या लवकर जेवतोस?
इतक्या लवकर जेवतोस?
शारूखचा नाश्ता व्हायलाही अजून ६-७ तास टाईम आहे.
बघुच शकलो नाही असा जवान
बघुच शकलो नाही असा जवान पहिलाच.
>>>>
अमितव, मग बहुधा तो तुमच्या टाईपचा जॉनरचा चित्रपट नसावा. कारण त्या पिक्चराला शिट्ट्या टाळ्या मी स्वतः थिएटरमध्ये अनुभवल्या आहेत. मुलगी नंतर दुसऱ्यांदा तिच्या मित्रमैत्रिणीसोबत गेली होती तेव्हा त्या नाचत होत्या. तसाच माहोल होता. आणि याचा पुरावा म्हणून तिने काढलेला व्हिडिओ सुद्धा आहे माझ्याकडे. कोणाला बघावासा वाटला तर मला व्हॉट्सॲप मेसेज करा.
तर सांगायचा मुद्दा हा की बॉक्स ऑफिसचे आकडे खोटे आहेत किंवा पीआर मार्केटिंग आहे असेही नाही. त्या चित्रपटाची क्रेझ खरी होती.
त्याचवेळी ज्यांना असे दाक्षिणात्य मसाला टाईप चित्रपट आवडत नाहीत त्यांना अगदीच बंडल वाटणे सुद्धा शक्य आहे.
पण अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देताना त्याने काम केलेला चित्रपट अमुक तमुक जॉनरचा, आशयाचाच हवा असा निकष नसेल कदाचित..
आणि तसेही कलात्मक चित्रपटातील अभिनेत्यांना पुरस्कार मिळतात तेव्हा ते चित्रपट तरी किती जणांनी पाहिले असतात. तेव्हा जवान बघावासा न वाटलेले देखील आपल्या जागी योग्य असतीलच आणि जवानाला मिळालेला पुरस्कार सुद्धा आपल्या जागी योग्य असेल. असे तूर्तास म्हणून झोपायला जातो. आणि उद्या सकाळी सोशल मीडिया वर वाचलेल्या काही रोचक कॉमेंट्स घेऊन येतो.
शुभरात्री शब्बाखैर खुदा हाफिज!
कलकत्ता टाईम्स -
कलकत्ता टाईम्स -

Shah Rukh Khan channels his inner Tharoor as he replies in peak ‘Tharoorian’ English!
साजिरा आज संध्याकाळी
साजिरा आज संध्याकाळी डोक्यावरून आंघोळ केल्याने जेवायला उशीर झाला. नाहीतर साधारण रात्री अकरा—साडेअकरा पर्यंत जेवतो.. माझ्या या आचरट दिन (आणि रात्र) क्रमाबद्दल पुन्हा कधीतरी स्वतंत्र धाग्यात....
शुभरात्री
थरूर यांची पोस्ट ... बदाम
थरूर यांची पोस्ट ... बदाम बदाम बदाम
फक्त आणि फक्त याचसाठी
शाहरुखचा रिप्लाय...
वुई लव्ह यू शाहरुख !
>>> कदाचित तुम्ही मोजकेच आणि
>>> कदाचित तुम्ही मोजकेच आणि नेमके असलेच चित्रपट पाहिले असू शकते
दोन्ही खूप एन्जॉय केले होते. हां देवदास.
फक्त डी डी एल जे व डुप्लिकेट
सामो >> डुप्लिकेट मध्ये
सामो >> डुप्लिकेट मध्ये त्याने दोन वेगवेगळे रोल्स एकदम ताकदीने केलेले होते. एक शामळू बबलू आणि दुसरा विकृत डॉन मन्नू. त्याने एकदम चपखलपणे दोन वेगवेगळी रूपे घेतली होती. आणि तसेही कमर्शियल पिक्चर असल्याने तसा over the top अभिनय करणे भाग असतेच.
>>>>दोन वेगवेगळे रोल्स एकदम
>>>>दोन वेगवेगळे रोल्स एकदम ताकदीने केलेले होते. एक शामळू बबलू आणि दुसरा विकृत डॉन मन्नू.
माझा फार आवडता सिनेमा आहे तो. एकदम बायपोलर अभिनय 
मान्य
अरे सामो.. हे अरे देवा असे
अरे सामो.. हे अरे देवा असे वाचा.. पण मला होताच अंदाज.
याला हिमनगाचे टोक काय त्याला पडलेले एक भोक सुद्धा म्हणू शकत नाही.
एवढा मोठा खड्डा मी आता रात्री बुझवू शकत नाही. जातो झोपायला. पण तुम्हाला सेपरेट मेल मेसेज टेलिग्राम व्हाट्सअप कॉल काहीतरी करेन आणि शाहरुखचे पिक्चर सुचवेन.... किंबहुना माझा आवडता शाहरुखपट म्हणून एक वेगळा धागाच काढुया उद्या म्हणजे मायबोलीवर अजून कोणी असे असेल त्यालाही उपयोगी पडेल.
हाहाहा
हाहाहा
अरे कुठे नेऊन ठेवला शाहरुखचा
अरे कुठे नेऊन ठेवला शाहरुखचा धागा माझा... दुसर्या पानावर जाता जाता वाचवला
बाई दवे,
काल जसे म्हटलेले की काही रोचक प्रतिक्रिया सोशल मिडीयावर बघायला मिळत आहेत त्यातली आवडलेली म्हणजे,
आता यात राजकारणाने शिरकाव करायला सुरुवात केली आहे.
एका राजकीय पक्षाची डोक्यावर कृपा झाल्याने त्याला पुरस्कार देण्यात आला. बदल्यात येत्या निवडणूकात तो त्यांच्यासाठी प्रचार करताना दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. थोडक्यात त्याची ब्रँड वॅल्यू वापरली जाणार. पण गंमत ईथेच संपत नाही. यात ज्या राजकीय पक्षाचे नाव घेतले जात होते हा तोच आहे जो (आणि ज्याचे समर्थक) त्याला देशद्रोही ठरवायची धडपड करत त्याच्या याच ब्रँड वॅल्यूच्या जीवावर उठलेले
हे खरे असो वा खोटे, तो ईथला मुद्दा नाही...
पण या निमित्ताने शाहरुखचे अभिनंदन यासाठी की तो त्याच्या कारकिर्दीत अश्या बरेच नकारात्मक प्रचारांना, अफवांना, त्याची इमेज बदनामीच्या कटांना पुरुन उरला, आणि आजही तितकाच तेजस्वीपणे चमकत आहे
पूर्ण चेहरा पट्ट्या बांधून
पूर्ण चेहरा पट्ट्या बांधून डोळे दिसतील असे ठेवले तरी शाहरुखला पुरेसे आहे. तो डोळ्यातून कमालीचा अभिनय करतो. <<
खरं तर आख्ख्या अंगावर कापड पसरुन झाकून टाकलं तरीही काही फरक पडणार नाही. जातिवंत आंगिक अभिनय त्यातूनही डोकावेलच..
अ'निरु'द्ध
अ'निरु'द्ध
+७८६
आणि गुड पॉईंट.. त्याच्यातील उत्स्फूर्त एनर्जी हा देखील त्याच्या अभिनयाचा एक पैलू आहे.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/r/193rYpB5F9/
स्वदेशचा हा पाणी विकणाऱ्या मुलाचा सीन वायरल होत आहे. या सीनसाठी आणि या चित्रपटासाठी अवॉर्ड हवा अशी मागणी जोर धरत आहे...
हे दिल से चे दोन्ही tribute
हे दिल से चे तीन वर्षांपूर्वीचे दोन्ही tribute ट्रेलर मस्त आहेत.
मला काल अचानक दोन्ही एकापाठोपाठ एक दिसले (बहुधा इथे चर्चा केल्याने असेल) आणि आता पुन्हा पिक्चर बघावा असे वाटू लागले
https://youtu.be/5K-JbMF1Oo4?si=e_xGOtO5FwFdCBvJ
https://youtu.be/m8sul_IoZeQ?si=t7tKG_CtWFwjfowD
राष्ट्रीय पुरस्कार सोहळा
राष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला
https://youtu.be/He7QxqAsBxc?si=0PeST23v-MpJ2xSq
शाहरुखखान साठी ४.३० पासून पुढे बघा
मी एक दोन मिनिटांची क्लिप
मी एक दोन मिनिटांची क्लिप पाहिली. शाखाचे वय झालेले क्लिअर दिसत असूनही त्याचा गेट अप व बॉडी लँग्वेज एकदम ग्रेसफुल होते. अशा समारंभात आनंद व गांभीर्य (किंवा गरिमा का काय म्हणतात ते) याचे चपखल मिश्रण त्याच्या वागण्यात दिसत होते. मला आवडले.
Superstar Shah Rukh Khan is
Superstar Shah Rukh Khan is set to return as a host for the Filmfare Awards after 17 years for its 70th edition, the organisers have announced. Shah Rukh will co-host the award show, to be held on October 11 in Ahmedabad, alongside Maniesh Paul and Karan Johar.
Days after winning his first
Days after winning his first-ever National Award in a career spanning over three decades, Bollywood superstar Shah Rukh Khan has now officially joined the billionaire club.
https://m.rediff.com/news/commentary/2025/oct/01/srk-richest-in-bollywoo...
दोन्ही बातम्या अगदी राडा
दोन्ही बातम्या अगदी राडा
शाहरुख खानला ज्या ज्यूरी च्या
शाहरुख खानला ज्या ज्यूरी च्या टीम ने हा पुरस्कार दिला त्याच्यातल्या एका ज्यूरी ची प्रतिक्रिया
"When I was selected to be a part of the central jury panel for National Film Awards, I didn’t know that I would be a part of the team of 11 who would be responsible for @iamsrk Sir to get his much-deserved and long-awaited first-ever national award. Being a part of this iconic moment makes me realise that ‘Agar kisi cheez ko dil se chaho toh puri kainaat usse tumse milane ki koshish mein lag jaati hai’. This victory feels personal because it gives every Indian artist the dream to hope, to strive and to win! Thank you @iamsrk saab for inspiring us with your humility, hard work and grace.
PS: I haven’t washed my hands since the most special ‘handshake’ of my life"
हे वाचून असं वाटतंय जवान ह्या वर्षी रिलीज झाला नसता तरी त्याच्या एखाद्या जुन्या चित्रपटल्या भूमिकेसाठी अवॉर्ड दिलाच असता.
असेच असते तर आधीच्या
असेच असते तर आधीच्या कुठल्यातरी वर्षीच दिलाच असता. याच वर्षी अचानक त्याची स्टार पॉवर वाढली नाही ना..
शाहरुख च्या स्टार पॉवर वर
शाहरुख च्या स्टार पॉवर वर संशय नाहीच. आहेच तो स्टार. हा पुरस्कार शाहरुख ला आदीच भेटायला पाहिजे होता.
नाळच्या सर्व बाल कलाकाराचा
नाळच्या सर्व बाल कलाकाराचा आणी विक्रान्र मेसीला १२ वि फेल साठी मिळालेला पुरस्कारच फक्त योग्य वाटतोय.
बाकी राणी, शाखा उत्तम कलाकार आहेत पण त्याना पुर्वी द्यायचे राहुन गेले म्हणून आता अगदी "ढ" दर्जाच्या कामासाठी असला तरी देतोय हे लॉजिक पुर्ण गन्डलय..त्यापेक्षा "ओव्हरऑल कॉन्ट्रिब्युशन टु सिनेमा" या टाइप काहितरी कॅटेगरी तयार करुन दिला असता तर पटल असत.
मित्रा,
मित्रा,
शा.खा. ह्या जवान चित्रपटासाठी हा पुरस्कार नक्कीच डिझर्व्ह करत नव्हता, मला वाटते त्याला एकाच चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळायला हवा होता आणि तो म्हणजे स्वदेस. त्या अख्ख्या चित्रपटात तो शा.खा. न वाटता केवळ आणि केवळ मोहन भार्गव वाटतो..आणि इतका संयत अभिनय त्या नंतर त्याने कधी केला होता का असा ही प्रश्न नक्कीच पडू शकतो. So definitely not for this Jawan.. he deserved this award long ago for SWADES only !!!
Pages