& The Award goes to....
King Khan Shahrukh kkkkkKhaan !!
... आणि शाहरुख खानने मिळवला राष्ट्रीय पुरस्कार!
चित्रपट जवान 
बॉलीवूड मधील एव्हरजवान सुपरस्टार ऑफ मिलेनियम जो किंग ऑफ रोमान्स आणि किंग खान ऑफ बॉलीवूड आणि बादशाह आणि डॉन अश्या न जाणे कैक नावाने ओळखला जातो. जे तो स्वतःबद्दलही म्हणतो, I am The last of the stars .. आणि ते पटते सुद्धा कारण असा सुपरस्टार पुन्हा होणे नाही...
पण या सगळ्या स्टारडममध्ये त्याच्यातील खराखुरा कलाकार आणि अभिनेता याचे म्हणावे तसे कौतुक होत नाही. कधी झाले नाही. कित्येक फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळून देखील, आणि ऑस्करला हजेरी लावून सुद्धा, राष्ट्रीय पुरस्कारापासून तो नेहमी वंचित राहिला आणि माझ्यासारख्या त्याच्या कट्टर चाहत्यांना देखील कुठेतरी याची खंत होतीच.. पण यापुढे नाही 
मला कल्पना आहे की जसे देशभरात त्याचे करोडो चाहते आहेत तसे मायबोलीवर सुद्धा शेकडो आहेत.
तर आपल्या लाडक्या शाहरुखला मिळालेल्या पुरस्काराचे कौतुक आणि अभिनंदन करायला हा धागा.
शाहरुख सोबत इतर दोन पुरस्कार मिळवणारे बॉलीवूड कलाकार
राणी मुखर्जी — Mrs Chatterjee vs Norway
आणि नवीन पिढीतील माझा अजून एक आवडता कलाकार,
विक्रांत मेस्सी (शाहरुखसोबत) — 12th Fail
लहान मुलांसाठीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट — नाळ २
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट — श्यामची आई
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट — कठल
यांचेही मनापासून कौतुक आणि अभिनंदन!
शाहरुखला ज्या जवान चित्रपटाबद्दल पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल इथे वाचू शकता.
परीक्षण ए जवान - फक्त आणि फक्त शाहरूख खान !
https://www.maayboli.com/node/84004
जियो शाहरुख !!! You made my Day..!!
“ जवानसाठी शाहरुखला अवार्ड
“ जवानसाठी शाहरुखला अवार्ड देणे ह्यापेक्षा शहरुखमधल्या उमद्या कलाकाराचा उपमर्द नसावा.” +१
कितीतरी चित्रपटात त्याचा सकस अभिनय आणि दमदार रोल्स आहे. जवान माझ्यापुरता तरी त्या लिस्टमधे फार वरच्या क्रमांकावर नाहीये.
जवानसाठी शाहरुखला अवार्ड देणे
जवानसाठी शाहरुखला अवार्ड देणे ह्यापेक्षा शहरुखमधल्या उमद्या कलाकाराचा उपमर्द नसावा.>>> +१
८० च्या दशकातले उरलेले काही नावाजलेले अभिनेते वगळता अभिनयाची ईतकी वाईड रेंज कव्हर करणारा आणि त्याचबरोबरीने चित्रपटांचे व्यावसायिक गणितही बिघडू न देण्याची खात्री देणारा शहारुख शिवाय दुसरा कोणताही अभिनेता गेल्या तीन दशकांत दृष्टीपथास येत नाही.
जसा मुळातच दुर्घटना कशा टळतील याच्या उपाययोजना करण्यापेक्षा, दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना भरपाई देऊन झाल्या चुकीची भरपाई करण्याचा कल अधिक दिसतो तसंच आधी केलेल्या चुकांची भरपाई म्हणून देऊश टाकूयात पुरस्कार असं झाल्याचा काहीसा फील या प्रकरणी येतोय.
विक्रान्त मेस्सीच खुप खुप
विक्रान्त मेस्सीच खुप खुप अभिनदन! अगदी वेल डिझर्व्ह अॅवॉर्ड.
नाळ बघितलेला नाही त्यामुळे मराठी मुव्हिला अॅवॉर्ड मिळाल म्हणुन कौतुक
जवान सारख्या फालतु, फ्लॉप मुव्हि साठी शाखा अॅवॉर्ड देण म्हणजे एखाद्या पॉप्युलर शेफला फोडणीच्या भातासाठी बेस्ट डीश अॅवॉर्ड मिळण्यासारख आहे.
जवानसाठी शाहरुखला अवार्ड देणे
जवानसाठी शाहरुखला अवार्ड देणे ह्यापेक्षा शहरुखमधल्या उमद्या कलाकाराचा उपमर्द नसावा
>>>>>
हेच मी असे म्हणेन की शाहरुख एवढा मोठा कलाकार एवढा मोठा सुपरस्टार आहे की त्याला एखादा पुरस्कार कुठल्या चित्रपटासाठी मिळाला याने त्याचा उपमर्द होणार नाही
आणि शाहरुखबाबत तर नेहमीच यू कॅन हेट हिम, यू कॅन लव्ह हिम, बट यू कॅन नॉट इग्नोर हिम इक्वेशन राहिले आहे. त्याला आणि त्याच्या चाहत्यांना कुठल्या उपमर्दाची पर्वा सुद्धा नसेल हे एक शाहरुखचा कट्टर चाहता म्हणून खात्रीने सांगू शकतो.
खुद्द शाहरुखला आणि त्याच्या एकूण एक चाहत्यांना या पुरस्काराच्या बातमीने आनंदच दिला असेल. उपमर्द वगैरे विचार सुद्धा डोक्यात नसेल. मग इतरांना काय वाटते हे मॅटर नाही करत. ज्यांना जे समजायचे ते समजू दे, तो विचार आपण का करावा
जवान सारख्या फालतु, फ्लॉप
जवान सारख्या फालतु, फ्लॉप मुव्हि साठी शाखा अॅवॉर्ड देण म्हणजे..
>>>>
अभिनयाबाबत जवान त्याचे नक्कीच बेस्ट काम नव्हते माझ्याही मते,
पण
जवान फ्लॉप नव्हता. किंबहुना बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडणारा होता.
Jawan, starring Shah Rukh Khan, has achieved a worldwide gross collection of ₹1,148.32 crore (approximately $138 million USD), according to Wikipedia.
This makes it the fifth highest-grossing Indian film of all time.
>>जवान सारख्या फालतु, फ्लॉप
>>जवान सारख्या फालतु, फ्लॉप मुव्हि साठी शाखा अॅवॉर्ड देण म्हणजे एखाद्या पॉप्युलर शेफला फोडणीच्या भातासाठी बेस्ट डीश अॅवॉर्ड मिळण्यासारख आहे.<<.
मला वाटतंय कि गोवारीकरने "स्वदेस" ला अॅवॉर्ड मिळालं नाहि याचा बदला घेतला असावा. पण या प्रयत्नात त्याने स्वतःचं हसु करुन घेतलंय. गोवारीकरच्या मते पृथ्विराजचा "द गोट लाइफ" मधला पर्फॉर्मंस इनॉथेंटिक होता.. साठीचा झाला काय गोवारीकर...
आधी केलेल्या चुकांची भरपाई
आधी केलेल्या चुकांची भरपाई म्हणून देऊश टाकूयात पुरस्कार असं झाल्याचा काहीसा फील या प्रकरणी येतोय. >> एकदम बरोबर ! पण तसेच करायचे असेल तर जवान सारख्या टुकार चित्रपटाबद्दल अवार्ड देण्यापेक्षा ह्या वर्षीचे दादासाहेब फाळके अवार्ड वगैरे देणे जास्त सयुक्तिक ठरले असते.
स्वदेस बद्दलच्या ऋ च्या पूर्ण
स्वदेस बद्दलच्या ऋ च्या पूर्ण पोस्टला अनुमोदन.
शाहरुख खान, विक्रम मेसीचे
शाहरुख खान, विक्रम मेसीचे अभिनंदन !
शाहरुखचा दिल से मधला अभिनय आवडला होता. त्यांची आणि मनीषा कोईरालाची जोडी सेन्सुअस होती.
शाहरुखखान चा "बादशह " हा
शाहरुखखान चा "बादशह " हा माझा सर्वात आवडता पिक्चर. हलक्या फुलक्या करमणुकी नंतर पिक्चार जो जीवघेणा turn घेतो त्याला तोड नाही. सगळ्या दृष्टीने अप्रतिम सिनेमा.
आणि हा "कभी हा कभी ना " अजून एक ग्रेट पिक्चर.
तसे शाखा चे अनेक पिक्चर आहेत पण हे दोन सदाबहार.
"झाले बहु होतील बहु परंतु ह्या सम हा" असा हा शाहरुखखान!
जवान सारख्या चित्रपटाला
जवान सारख्या चित्रपटाला मिळाला? काहीही.
परदेशला दिला असता तर एक वेळ ठिक. बाकी, त्या जवान मूवीत काय आहे?
शाहरुखचा दिल से मधला अभिनय
शाहरुखचा दिल से मधला अभिनय आवडला होता. त्यांची आणि मनीषा कोईरालाची जोडी सेन्सुअस होती.
>>>>>>>
+७८६
मी सुद्धा वर चक दे आणि स्वदेश जोडीने दिल से चे नाव घेतले आहे. शाहरुखची अभिनय क्षमता कमाल वापरली आहे त्यात. गाणी क्लासिक. पण कुठेतरी कमर्शिअल करावा की काहीतरी डीप यात कुठेतरी फसला आणि बॉक्स ऑफिसवर तितका चालला नाही वाटते. पण असे चित्रपट कधी डब्यात जात नाही. ते राहतात रसिकांच्या डोक्यात..
त्यातला एक सीन फार आवडता..
त्याबद्दल स्वतंत्र धाग्यात लिहितो.
केशवकूल तुम्ही बादशाहची आठवण
केशवकूल तुम्ही बादशाहची आठवण नेहमी काढतात. माझ्यासाठी सुद्धा तो शाहरुखचा बेस्ट कॉमेडी पिक्चर आहे. क्लायमॅक्स तर कितीही वेळा बघा, धमाल आहे नुसता. शाहरुख बिचारा नाईलाजाने फसला असतो तेव्हाचे त्याचे जेवढे जेवढे सीन आहेत त्यात कमाल अक्टिंग केली आहे.
कभी हा कभी ना तर काय नाव
कभी हा कभी ना तर काय नाव काढले आहे केशवकूल..
असे वाटते साला आपलीच भूमिका तो जगला आहे..
आणि असे आपल्या पिढीच्या हजारो लाखो मुलांना वाटले असेल..
वो तो है अलबेला..
सदा तुमने ऐब देखा,. हुनर तो ना देखा..
जर तो हा एक चित्रपट करून निवृत्त झाला असता तरी सगळे राज राहुल आर्यन विस्मरणात जाऊन त्यातील सुनिल कायम लक्षात राहिला असता.
शाहरुखखान चा "बादशह " हा माझा
शाहरुखखान चा "बादशह " हा माझा सर्वात आवडता पिक्चर. हलक्या फुलक्या करमणुकी नंतर पिक्चार जो जीवघेणा turn घेतो >>+++ हा शाखापेक्षा अब्बास-मस्तानचा सिनेमा आहे हेमावैम.
हो अब्बास मस्तान . आणि नीरज
हो अब्बास मस्तान . आणि नीरज व्होराला पण विसरू नका.
पण कल्पना करा की शाखाच्या ऐवजी दुसरा कोणी असता तर?
तसेच कभी हा कभी ना मध्ये देखील कुंदन शहाचा प्रेझेन्स जाणवतोच. तरी पण...
>>> वर्षीचे दादासाहेब फाळके
>>> वर्षीचे दादासाहेब फाळके अवार्ड वगैरे देणे जास्त सयुक्तिक ठरले असते.
अहो काय बोलताय असामी
>>> हेच मी असे म्हणेन की
>>> हेच मी असे म्हणेन की शाहरुख एवढा मोठा कलाकार एवढा मोठा सुपरस्टार आहे की त्याला एखादा पुरस्कार कुठल्या चित्रपटासाठी मिळाला याने त्याचा उपमर्द होणार नाही
असे कसे म्हणता येईल रुन्मेष?
एकूण भूमिका, कथानक, अभिनय, असंख्य घटक असतील ना?
आईनस्टाईनची बुद्धीमत्ता या
आईनस्टाईनची बुद्धीमत्ता या काळात सर्व श्रेष्ठ आहे असं समजा आपण मान्य केलं.
तो शाळेत असताना वर्गात पहिला येत असेल. कदाचित त्या इयत्तेत सर्व वर्गात पहिला येत असेल.
पण पुढच्या वर्षी त्या इयत्तेत कुणी तरी पहिला येणारच. दर वर्षी कुणाला तरी पुरस्कार द्यावा लागणार. प्रत्येक वर्षी पहिला आलेला विद्यार्थी आईनस्टाईन एव्हढा जीनियस असेल का?
रच्याकने, शाहरूख खान पिकल्यानंतरचा त्याचा अभिनय जास्त आवडतो (चेई मधला) आणि पिकण्याआधीचे त्याचे पिक्चर्स. राबगजं, कहाकना इ.
मधल्या फेज मधले दोन्ही आवडत नाहीत.
>>>>दिल से
>>>>दिल से
एक वेगळीच प्रेमकथा होती. इन्टेन्स आणि डार्क. गूळाची काकवी - स्वीट मोलॅसेस?
एखादा सिनेमा चांगला होतो
एखादा सिनेमा चांगला होतो तेव्हा त्यात सगळ्यांचा सहभाग असतो.
उदाहरणार्थ बादशाहा सिनेमात मै तो हू पागल गाण्यात ती लेडी इन्स्पेक्टर आणि तो अंगाला साबण लावून आलेला मुलगा तसेच ते स्पॉट बॉईज ह्यांचे अमोल योगदान आहे.
पण दुर्दैवाने हा पुरस्कार आर्वश्रेष्ठ अभिनेत्यासाठी होता. हे विसरायला नको.
बेफिकीर आधीच्या पोस्ट्स वाचा
बेफिकीर आधीच्या पोस्ट्स वाचा म्हणजे संदर्भ लागेल. मला त्यात काही आक्षेपार्ह वाटत नाहिये. त्याच्या कामगिरीला योग्य अॅक्नॉलेजमेंट होईल. तुमचे मत वेगळे असू शकते.
दिल से शाहरुख च्या आधी
दिल से शाहरुख च्या आधी मनिरत्नम, नि रेहमानचा सिनेमा आहे. शाहरुख (नि मनिषा) त्यात परफेक्ट कास्टींग आहेत.
पूर्वी दिलं नाही म्हणून आत्ता
पूर्वी दिलं नाही म्हणून आत्ता अवॉर्ड देणं हा मला आत्ता चांगलं काम करणाऱ्यांवर अन्याय वाटतो, अन् म्हणूनच अत्यंत चुकीचा पायंडा
विक्रांत मेसी ला ही विभागून दिल्यानी बोच थोडी कमी आहे इतकंच...
तसे पाहता जवान चित्रपट म्हणून
तसे पाहता जवान चित्रपट म्हणून खूप चांगला बांधलेला आहे. एखाद्या चित्रपटाकडून असलेली दोन घटका करमणूक ही अपेक्षा तो नक्कीच पूर्ण करतो.
आणि जवान मध्ये शाहरुखने दोन अगदी भिन्न स्वभावाचे रोल्स केलेले आहेत. एक मुलगा जो टीम बनवून आणि वेशांतर करून बदला घ्यायला लागतो आणि दुसरा बाप की जो एकदम स्टायलिश फायटर आहे. त्यांचे स्वभाव वेगळे दाखवले आहेत. आणि बापाची तर स्मृती पण गेलेली आहे तरीही त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या मुलाबद्दलचे प्रेम दिसते. तसे हे अभिनयाचे वेगवेगळे कंगोरे दाखवल्याने त्याला नक्कीच पारितोषिक मिळायला हवे.
असामी,
असामी,
आक्षेपार्ह म्हणायचे नव्हते
तो पुरस्कार फार सिनियर कलाकारांना दिला जातो असा माझा समज आहे
या व्यतिरिक्त एक भीषण समज असा आहे की तो पुरस्कार मिळाल्यावर लवकरच तो माणूस दिवंगत होतो - हे काहीही वाटेल याची जाणीव आहे
दादासाहेब फाळके पुरस्कार - या लायनीत शाहरुखच्या पुढे अनेकजण असावेत बहुधा
या व्यतिरिक्त एक भीषण समज असा
या व्यतिरिक्त एक भीषण समज असा आहे की तो पुरस्कार मिळाल्यावर लवकरच तो माणूस दिवंगत होतो >> नाहि हो. माझा गैर समज होत नसेल तर आशा पारेख, रजनी, रेखा, अमिताभा, गुलझार इत्यादी आहेत न हयात.
सिनियॉरिटीपेक्षा एकंडर काँत्रिब्युशन बघून दिला जावा असा अवॉर्ड अशी अपेक्षा होती म्हणून उल्लेख केला होता.
खुद्द दादासाहेब फाळके
खुद्द दादासाहेब फाळके ह्यांनाही DF Award दिला गेला नव्हता.
फाळके अवॉर्ड बद्दल लिहिले ते,
फाळके अवॉर्ड बद्दल लिहिले ते, दिवंगत वगैरे
फाळके अवॉर्ड या सर्वांना मिळाले आहे की काय हे माहीत नाही
तसे असेल तर, क्षमस्व
ए आर रहमान यांना जय हो
ए आर रहमान यांना जय हो गाण्यासाठी ऑस्कर मिळाला याने त्यांचा काय उपमर्द झाला? आणि कोण ए आर रहमान चाहते याने दुखावले गेले? मग शाहरुखचे चाहते का इतके कमजोर हृदयाचे असतील...
शाहरुख त्याच्या कारकिर्दीत राष्ट्रीय पुरस्कार डीझर्व करत होता तो त्याला अखेर मिळाला इतके सिम्पल बघतो मी हे..
त्याचवेळी १२ वी नापासला सुद्धा पुरस्कार मिळाला म्हणजे कोणाचा हक्क मारून मिळाला नाही.
बाकी शाहरुखबद्दल काय बोलावे.. त्याच्यातील अभिनयक्षमता नेहमी त्याच्या स्टारडम पुढे झाकोळली जाते.
पण मुळात अभिनयाच्या व्यतिरिक्त जे त्याच्यात इतर गुण आहेत, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, त्याच्यातील उत्स्फूर्त एनर्जी, त्याचा सेंस ऑफ ह्युमर जो त्याने साकारलेल्या कॅरेक्टर मध्ये सुद्धा डोकावतो, त्याचे बोलके डोळे, त्याची स्टाईल, त्याचा ड्रेसिंग सेन्स, त्याची पडदा व्यापून उरायची आणि स्टेज काबीज करायची क्षमता... आणि हे सगळे एकाच माणसात असणे..
या क्वालिटीचे मोजमाप कोण कधी करून पुरस्कार देते का? की फक्त अभिनय हा एकच पैलू बघायचा...
Pages