& The Award goes to....
King Khan Shahrukh kkkkkKhaan !!
... आणि शाहरुख खानने मिळवला राष्ट्रीय पुरस्कार!
चित्रपट जवान 
बॉलीवूड मधील एव्हरजवान सुपरस्टार ऑफ मिलेनियम जो किंग ऑफ रोमान्स आणि किंग खान ऑफ बॉलीवूड आणि बादशाह आणि डॉन अश्या न जाणे कैक नावाने ओळखला जातो. जे तो स्वतःबद्दलही म्हणतो, I am The last of the stars .. आणि ते पटते सुद्धा कारण असा सुपरस्टार पुन्हा होणे नाही...
पण या सगळ्या स्टारडममध्ये त्याच्यातील खराखुरा कलाकार आणि अभिनेता याचे म्हणावे तसे कौतुक होत नाही. कधी झाले नाही. कित्येक फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळून देखील, आणि ऑस्करला हजेरी लावून सुद्धा, राष्ट्रीय पुरस्कारापासून तो नेहमी वंचित राहिला आणि माझ्यासारख्या त्याच्या कट्टर चाहत्यांना देखील कुठेतरी याची खंत होतीच.. पण यापुढे नाही 
मला कल्पना आहे की जसे देशभरात त्याचे करोडो चाहते आहेत तसे मायबोलीवर सुद्धा शेकडो आहेत.
तर आपल्या लाडक्या शाहरुखला मिळालेल्या पुरस्काराचे कौतुक आणि अभिनंदन करायला हा धागा.
शाहरुख सोबत इतर दोन पुरस्कार मिळवणारे बॉलीवूड कलाकार
राणी मुखर्जी — Mrs Chatterjee vs Norway
आणि नवीन पिढीतील माझा अजून एक आवडता कलाकार,
विक्रांत मेस्सी (शाहरुखसोबत) — 12th Fail
लहान मुलांसाठीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट — नाळ २
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट — श्यामची आई
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट — कठल
यांचेही मनापासून कौतुक आणि अभिनंदन!
शाहरुखला ज्या जवान चित्रपटाबद्दल पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल इथे वाचू शकता.
परीक्षण ए जवान - फक्त आणि फक्त शाहरूख खान !
https://www.maayboli.com/node/84004
जियो शाहरुख !!! You made my Day..!!
KL राहुलला शेवटच्या कसोटीत
KL राहुलला शेवटच्या कसोटीत 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला असता, तर त्याचे काही चाहते तरी नक्कीच आनंदी झाले असते. पण म्हणून तो पुरस्कार तो diserve करत होता असं होत नाही.
फार तर असं म्हणू शकतो की अभिनय हा सापेक्ष असतो — कोणाला आवडतो, कोणाला नाही. ज्यांनी निर्णय घेतला, त्यांना तो परफॉर्मन्स भावला असावा म्हणून त्यांनी पुरस्कार दिला असेल. मात्र, 'जवान' चित्रपटासाठी शाहरुखने 'डिझर्व्ह' करत नव्हता, असं अनेकांचं मत आहे — आणि हे मत केवळ एकदाच नाही तर दोन-तीन वेळा 'जवान' पाहिलेल्यांचंही आहे.
चांदण्यांची रात्र >> अहो
चांदण्यांची रात्र >> अहो आमच्या सारखे हजारो लोक आहेत देशात की ज्यांना वाटले असेल शाहरुख ने जवान मध्ये चांगला अभिनय केलाय. तशीच लोकं कदाचित निवड समितीत पण असतील. त्यांना पण शाहरुख ने चांगला अभिनय केला असे वाटले असेल. तसेही सगळे सापेक्ष असते ना - मग उगीच आपली मते दुसऱ्यांवर लादायचा अट्टाहास का?
हा धागा सुरूवातीला स्कीप
हा धागा सुरूवातीला स्कीप करायचं ठरवलेलं , पण राष्ट्रीय पुरस्काराबद्दल या धाग्यावर लिहावंसं वाटलं याचा आता पश्चात्ताप होत आहे.
दुर्दैवाने माझ्या या धाग्यावरच्या पोस्ट्स तर आता संपादीत करता येणार नाहीत. राष्ट्रीय पुरस्काराचा दर्जा याबद्दल अन्यत्र कुठे तरी लिहीन.
तशीच लोकं कदाचित निवड समितीत
तशीच लोकं कदाचित निवड समितीत पण असतील>>>>
तेच झालेय ना.. फिल्मफेअर अवार्ड्स आणि राष्ट्रीय पुरस्कार यात काहीतरी फरक असावा असे आधी वाटायचे पण गेल्या २०-२५ वर्षातले विजेते पाहुन आता काळ बदललाय असे वाटतेय.
मुळात श्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार हा त्या वर्षी आलेल्या चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी असतो. नटाच्या कारकिर्दीवरचा हा पुरस्कार नसतो.
नट आधीच्या कारकिर्दीसाठी कितीही डिझर्विंग वगैरे असला तरी उत्तम अभिनेत्यासाठी जे नियम आहेत ते वाकवुन कोणाला पुरस्कार द्यावा लागला तर ते पुरस्कार देणार्या समितीचे व संबंधितांचे आधीचे व सध्याचे अपयश आहे. त्या अभिनेत्याचे आधीचे उत्तम काम समितीसमोर आले नाही आणि आज अचानक ‘अरे याला अजुन आपण पुरस्कार दिलेलाच नाही‘ ह्याची आठवण होऊन जो चित्रपट हाती लागला त्याच्या नावे पुरस्कार दिला गेला असे होणे योग्य नाही.
दादासाहेब फाळके पुरस्कार या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या लोकाना दिला जातो. उत्तुंग कामगिरी करेपर्यंत वयाची नव्वदी गाठली गेली पाहिजे असे अजिबात नाही. पण निवड समितीला आठवण होईपर्यंत, अशा डिझर्विंग लोकान्चे काम निवड समितीसमोर येईपर्यंत लोक आयुष्याच्या शेवटाला पोचतात. पुरस्कार घ्यायला व्हिल चेअरवरुन आणले जातात आणि नंतर काही दिवसात दिवंगत होतात.
शाहरुखला हा पुरस्कार दिला असता तरी चालले असते या मताशी सहमत. तो सुद्धा डिझर्विंग आहे आणि पुरस्कार मिळाल्याचा आनंद साजरा करु शकेल, मुलाखतींमधुन त्याचा प्रवास, प्रत्येक भुमिकेमागच्या त्याच्या तयारीचा आलेख मांडु शकेल या वयात आहे.
निवड समिती गाढवपणा करतेय त्यात पुरस्कार मिळालेल्या अभिनेत्यांचा दोष नाही. शाहरुखला ट्रोल करायचे काही कारण नाही. एखाद्या अभिनेत्याला उत्तम अभिनयासाठी बक्षिस मिळते तेव्हा त्या अभिनयासोबत त्या चित्रपटाची आठवणही त्या पुरस्काराला जोडली जाते. मिथुन व राष्ट्रिय पुरस्कार म्हटले की मृगया आठवतो, शबाना म्हटले की आधी अंकुर आठवतो. हे चित्रपट म्हणुनही उत्तम होते. जवानबाबत असे म्हणता येत नाही म्हणुन टिका होतेय. शाहरुख त्याचे काम चांगलेच करतो, त्याच्यावर का टिका करावी?
आपण कॅटेगरीची चुक करतोय हे निवड समितीलाही कळले असावे म्हणुन दोन अभिनेते निवडले गेले - एक ज्याला आजवर गौरवले नाही याबद्दल अपराधी वाटुन निवडले गेले आणि एक त्या वर्षीचा डिजर्विंग.
धनि, मत कुठं लादतोय. मी पण
धनि, मत कुठं लादतोय. मी पण तेच लिहिलंय की जज लोकांना जवान मधला शाहरुखचा अभिनय आवडला असेल आणि पुरस्कार दिला. तुमच्या सारखे हजारो कांय लाखो असतील.
पण नाही आवडलेलेही भरपूर आहेत. हिथं ही बऱ्याच लोकांनी लिहिलं आहेच की जवान साठी पुरस्कार diserve करत नव्हता.
जवान हा एक मनोरंजक चित्रपट
जवान हा एक मनोरंजक चित्रपट आहे. थिएटरमध्ये फुल शिट्ट्या आणि टाळ्या कित्येक वर्षांनी अनुभवल्या. आपल्याकडे असले चित्रपट माससाठी आणि पर्यायाने दर्जाहीन समजले जातात. उच्च अभिरुची मध्ये गणले जात नाहीत. त्यामुळे जवानसाठी कसे अवॉर्ड दिले हा प्रश्न लगेच मनात येतो. कारण वर्षानुवर्षे आपले हेच घट्ट झालेले समज आहेत.
बहुसंख्य लोकं आपल्या कुटुंबासोबत मूवी विकेंड साजरा करायला अश्याच जवान आणि बाहुबली मनोरंजक चित्रपटाची निवड करतात आणि आशयघन चित्रपट ओटीटीसाठी ठेवतात.
यात कोणाची चूक आहे असे नाही. कारण आपले विचारच तसे झाले आहेत की हा ट्रेंड ब्रेक होताच ते कोणाच्याही पचनी पडणे अवघड जात असावे का?
गंमत म्हणजे मी असेही लोकं पाहिले आहेत जे या निर्णयाला नावे ठेवत आहेत पण त्याचवेळी आम्ही जवान पाहिला नाही असेही म्हणत आहेत. म्हणजे जवान न बघता देखील त्यांनी हा पुरस्कार अयोग्य असे मत बनवले आहे ते बहुदा याच समजावर..
ऋ +१
ऋ +१
मला तेच वाटते की मासेस साठी असलेला पिक्चर असेल तर त्यात चांगली ॲक्टिंग केलेली नसेलच असेच काहीसे गृहितक असते बहुतेक.
साधना ची पोस्ट आवडली !
साधना ची पोस्ट आवडली !
नट आधीच्या कारकिर्दीसाठी कितीही डिझर्विंग वगैरे असला तरी उत्तम अभिनेत्यासाठी जे नियम आहेत ते वाकवुन कोणाला पुरस्कार द्यावा लागला तर ते पुरस्कार देणार्या समितीचे व संबंधितांचे आधीचे व सध्याचे अपयश आहे. त्या अभिनेत्याचे आधीचे उत्तम काम समितीसमोर आले नाही आणि आज अचानक ‘अरे याला अजुन आपण पुरस्कार दिलेलाच नाही‘ ह्याची आठवण होऊन जो चित्रपट हाती लागला त्याच्या नावे पुरस्कार दिला गेला असे होणे योग्य नाही.>>>अगदी हेच !!
आपल्याकडे असले चित्रपट
आपल्याकडे असले चित्रपट माससाठी आणि पर्यायाने दर्जाहीन समजले जातात. उच्च अभिरुची मध्ये गणले जात नाहीत. त्यामुळे जवानसाठी कसे अवॉर्ड दिले हा प्रश्न लगेच मनात येतो. कारण वर्षानुवर्षे आपले हेच घट्ट झालेले समज आहेत.>>>> दुर्दैवाने सध्या हे फक्त चित्रपट क्षेत्रापुरतेच मर्यादित राहिले नसल्याचे दिसते. किंबहुना चित्रपट हे तर समाज मनाचे आणि समाज स्वास्थ्याचे एकप्रकारे केवळ प्रतिबिंब दाखवते, परंतु आपणच त्याच्या उलट दिशेच्या मार्गक्रमणाची चुकीची कल्पना करुन ठराविक साच्यात निर्माण होणऱ्या चित्रपटांना दोष देतो.
तरी उत्तम अभिनेत्यासाठी जे
तरी उत्तम अभिनेत्यासाठी जे नियम आहेत ते वाकवुन कोणाला पुरस्कार द्यावा लागला तर ....
>>>>>
वर प्राजक्ता यांनी हे कोट केल्यामुळे पुन्हा वाचले गेले. आधी निसटलेले.
असे काही लिखित नियम असतील तर ते वाचायला आवडतील. चर्चेला योग्य दिशा मिळेल.
त्याच्यातील अभिनयक्षमता नेहमी
त्याच्यातील अभिनयक्षमता नेहमी त्याच्या स्टारडम पुढे झाकोळली जाते. >> नतमस्तक _/\_
कळले नाही भ्रमर?
कळले नाही भ्रमर?
शाहरुखमध्ये अभिनयक्षमता नाही असे म्हणायचे आहे का?
त्याच्यातील अभिनयक्षमता नेहमी
त्याच्यातील अभिनयक्षमता नेहमी त्याच्या स्टारडम पुढे झाकोळली जाते.>>>>>>
शब्द बापडे केवळ वारा । अर्थ वागतो मनांत सारा ॥
नीट-नेटका शब्द-पसारा । अर्थाविण पंगू
जवान मी १० मिनिटांच्या वर बघू
जवान मी १० मिनिटांच्या वर बघू शकलो न्हवतो. त्यामुळे त्यात काय अभिनय केलाय आणि काय स्टारडम जाणवला कल्पना नाही.
यंदांचे बाकी सगळे चित्रपट याहुन रद्दड असतील कदाचित. कोण जाणे. असो.
धागा वाचला पण कुठल्या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला काही बोध झाला नाही. जो काही असेल त्या पुरस्काराबद्दल अभिनंदन.
धागा वाचला पण कुठल्या
धागा वाचला पण कुठल्या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला काही बोध झाला नाही
>>>>
ऍक्शन, कॉमेडी, इमोशन, ॲक्टिंग, स्टाईल, swag, डान्स, ड्रेसिंग सेन्स, स्टारडम.... बरेच काही लिहिलेले..
ओके. इतक्या कॅटेगरीत असतो का?
ओके. इतक्या कॅटेगरीत असतो का? मला वाटलं बेस्ट अॅक्टर, लाईफटाईम असे फिल्मफेअर सारखे काही असेल. फार कल्पना नाही अर्थात. असेल.
या कॅटेगरी नाही.. हे सारे
या कॅटेगरी नाही.. हे सारे त्याने जवान मध्ये केले असे बातमीत लिहिलेले. या सगळ्या गुणांना मिळून कुठल्या कॅटेगरीत टाकतात कल्पना नाही
बाकी फिल्मफेअरचे तर नाव
बाकी फिल्मफेअरचे तर नाव सुद्धा काढू नका. माझा त्यावरचा विश्वास उडाला आहे. ते तर शाहरुख होस्ट करतो म्हणून त्याला असेच अध्येमध्ये देत राहतात.. गंमत म्हणजे हे तो आपल्या स्किटमध्ये गमतीने का होईना कबूल करतो
राष्ट्रीय पुरस्कारात मात्र असे काही चालत नाही...
ते आमिर खान सर्टिफाईड आहेत!
ते आमिर खान सर्टिफाईड आहेत >>
ते आमिर खान सर्टिफाईड आहेत >>

ए आर रहमान यांना जय हो
ए आर रहमान यांना जय हो गाण्यासाठी ऑस्कर मिळाला याने त्यांचा काय उपमर्द झाला? आणि कोण ए आर रहमान चाहते याने दुखावले गेले? मग शाहरुखचे चाहते का इतके कमजोर हृदयाचे असतील... > > एकूण तू इथे जे बोलतो आहेस त्यावरून शाहरुखचे काही चाहते तरी नक्कीच कमजोर हृदयाचे आहेत हे दिसतेय
रहमान नि जय हो वर ऑस्करच्या वेळी मायबोलीवर ह्याच प्रकारावर चर्चा झालेली आठवते.
साधनाच्या " त्या अभिनेत्याचे आधीचे उत्तम काम समितीसमोर आले नाही आणि आज अचानक ‘अरे याला अजुन आपण पुरस्कार दिलेलाच नाही‘ ह्याची आठवण होऊन जो चित्रपट हाती लागला त्याच्या नावे पुरस्कार दिला गेला असे होणे योग्य नाही." ह्या ओळींमधे बर्याच जणांची जवान वापरून शाहरुखला पुरस्कार देण्याबद्दल असलेल्या आक्षेपाची भूमिका स्पष्ट झाली असावी असे वाटते. ह्यापेक्षा स्पष्ट शब्दांमधे सांगणे अशक्य आहे.
जर अवॉर्ड स्पेसिफिक सिनेमातल्या कामासाठी (सिनेमासाठी नाही) असेल तर हे मान्य असेल तर "अभिनयाबाबत जवान त्याचे नक्कीच बेस्ट काम नव्हते माझ्याही मते," इथे थांबायला हवे होते.
शाहरुखमध्ये अभिनयक्षमता नाही
शाहरुखमध्ये अभिनयक्षमता नाही असे म्हणायचे आहे का? ## स्पष्टपणे होय.
शाहरुखमध्ये अभिनयक्षमता नाही
शाहरुखमध्ये अभिनयक्षमता नाही असे म्हणायचे आहे का? ## स्पष्टपणे होय. अरे देवा!
Then I am Mahatma Gandhi!
शाहरुखमध्ये अभिनयक्षमता नाही
शाहरुखमध्ये अभिनयक्षमता नाही असे म्हणायचे आहे का? ## स्पष्टपणे होय.
>>>
मग ठीक आहे
मला वाटले होते माझे त्या वाक्यात काही मराठी चुकले का?
तुमच्या वैयक्तिक मताचा मी आणि शाहरुख मिळून आदर ठेवतो.
ये अभी अभी क्या तुम बोल गये
ये अभी अभी क्या तुम बोल गये भ्रमर?
तुमच्या वैयक्तिक मताचा मी आणि
तुमच्या वैयक्तिक मताचा मी आणि शाहरुख मिळून आदर ठेवतो.
>>>
अरे हे नंतर बघिfunction at() { [native code] }लं मी. एवढ्यातच आवरलंस होय.
सर
सर
हा असा तुम्ही कूल शॉट मारता. म्हणूनच मला तुमच्या विषयी नितांत आदर आहे.
मला हे केव्हा जमेल?
जवान वापरून शाहरुखला पुरस्कार
जवान वापरून शाहरुखला पुरस्कार देण्याबद्दल असलेल्या आक्षेपाची भूमिका
>>>
माझी त्या आक्षेपावर काहीच हरकत नाही.
ती शक्यता असू सुद्धा शकते. मी नाकारत नाहीये.
पण तसे नसू सुद्धा शकते. शेवटी ती एक शक्यताच आहे. पण तुमच्या शक्यतेचा मी आणि शाहरुख मिळून आदर करतो.
मी आता माझ्या या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे...
पुन्हा कॉपी पेस्ट करतो.
>>>>>>>
तरी उत्तम अभिनेत्यासाठी जे नियम आहेत ते वाकवुन कोणाला पुरस्कार द्यावा लागला तर ....
>>>>>>>
असे काही लिखित नियम असतील तर ते वाचायला आवडतील. चर्चेला योग्य दिशा मिळेल.
कब कहेगा शारुक की , 'तुमच्या
कब कहेगा शारुक की , 'तुमच्या शक्यतेचा (हे कुठचं मराठी आहे? पण शारक्या म्हणत असेल तर चालवू) मी आणि ऋन्मेष मिळून आदर करतो'.
एवढ्यातच आवरलंस होय.
एवढ्यातच आवरलंस होय.
>>>>
साजिरा इथे सगळ्यांना माहीत आहे शाहरुख किती कमालीचा अभिनेता आहे. मला उकसवून मजा घेतात सारे. म्हणून मी आता शहाणा झालो आहे
तसेच आपल्या शाहरुखला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. बडे खुशी का मौका है. तर उत्सवाला गालबोट लागायला नको याची सुद्धा काळजी घ्यायची आहे.
अबे काळजी तू घे. शारक्या इजे
अबे काळजी तू घे. शारक्या इजे लव्ह. तू इथं त्याला गारुड्याच्या पातळीवर आणून गारुड्याच्या धंद्याला लावलंस.
Pages