Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लझानिया From glen गटग, पुणे
लझानिया
From
glen गटग, पुणे
किल्लीने एकदम बहार उडवून दिली
किल्लीने एकदम बहार उडवून दिली आहे
मस्त पदार्थ सगळेच.....
मस्त पदार्थ सगळेच.....
किल्ली, अग्लीओ पास्ता कसा बनवला..
माझ्या कडे पाकीट आहे त्याचं... बनवायचाय.. जरा सांग ना..
स्पेगेटी न तोडता पाण्यात जरा
स्पेगेटी न तोडता पाण्यात जरा मीठ आणि ऑ ऑ घालून शिजवायला ठेवायची.
भरपूर लसूण आपल्याला आवडेल तितका, maximum ला limit नाही, सोलून ठेचून किंवा बारीक चिरून घ्यायचा.
एका saute pan मध्ये ऑ ऑ मध्ये लसूण परतून घ्यायचा. त्यावर al dente limit ला शिजलेली स्पागेटी घालायची. ह्या पदार्थात ऑ ऑ घालताना कंजुषी नाही करायची. त्याचीच चव असते. मीठ चविप्रमाणे घालायचं एक वाफ काढली की झालं. गरमा गरम खायचं.
चीज किसून घालू शकतो optional आहे आवडीनुसार.
मी घातलं होते मस्त लागतं.
.
हे जाळावर वाचून आणि मैत्रिणीने सांगितलेलं ऐकून, माझ्या लक्षात राहिल तसं केलेलं version आहे. Authentic पाकृ साठी संजीव काकांना विचार.
आईने ह्यात कोथिंबीर घातली होती तिच्या बोल मध्ये
ग्लेन वाली डिश कशी होती चवीला
ग्लेन वाली डिश कशी होती चवीला ?
त्यांचे बंगलुरुवाले आउटलेट झकास आहे. स्पेशली तिथला Shepherd’s Pie
किल्ली सगळ्या डिशेस मस्त !
किल्ली सगळ्या डिशेस मस्त !
ग्लेन वाली डिश कशी होती चवीला
ग्लेन वाली डिश कशी होती चवीला>> मस्त होती
थँक्स किल्ली
थँक्स किल्ली
लोकं काय ऐकत नाही.. सर्वच छान
लोकं काय ऐकत नाही.. सर्वच छान.
किल्ली ने एकदम मस्त पदार्थ
किल्ली ने एकदम मस्त पदार्थ टाकून आतिषबाजी केलेली आहे. भारी आहेत सगळे.
किल्ले कुफेहेपा
किल्ले कुफेहेपा
(No subject)
क्वीक ग्रील्ड पनीर आणि मायबोली वरचाच पालक नटी पुलाव
साज ती सार भात भाकरी, बोंबील
साज ती सार भात भाकरी, बोंबील तुकडी ची प्लेट
पळवतेच आता 
छळ मांडालाय एक एक करून.
अल्पना मोमो, रोल, सुप अफलातून.
लेमन कोरियेंडर सुप कसे करतात?
किल्ली साज भारी दिसतायत सगळे
किल्ली साज भारी दिसतायत सगळे पदार्थ.
आज मी रसगुल्ले केलेत कबिताज किचन च्या रेसिपीने. एक कण ही कॉर्न फ्लोअर न घालता ही फुटले वगैरे नाहीत. चांगल्या रसगुल्ल्याच्यपाणी काढून टाकलं तर परत तोच आकार घेणे, आतून स्पॉन्जी, हलके, त्यामुळे पाण्यात तरंगणे अश्या चांगल्या रसगुल्याच्या कसोट्या पास झालेत. वाटलं नव्हतं एवढे बरे होतील असं.
ग्रील्ड पनीर काय, घरी केलेले
ग्रील्ड पनीर काय, घरी केलेले रसगुल्ले काय ! मजा मजा चाललीय खाऊगल्लीत
.. कॉर्न फ्लोअर न घालताही फुटले नाहीत…..
यासाठी 👏
applause !
ममो रसगुल्ले झकास दिसत आहेत.
ममो रसगुल्ले झकास दिसत आहेत. खायला पण मस्त झाले असतील
वरचे पनीर पण मस्त स्पायसी झालेले दिसते.
साज, पनीर जबराट दिसतंय.
साज, पनीर जबराट दिसतंय.
ममो, एकदम प्रो झाले आहेत रसगुल्ले. तात्काळ खावेसे वाटत आहेत.
किल्लींचे इडली दोशे आवडले.
किल्लींचे इडली दोशे आवडले. नागपूरला जोग हॉस्पिटॅलिटीकडे पेस्टो लज़ानिया एक नंबर मिळतो. तो खायला म्हणून मागच्या उन्हाळ्यात आम्ही सहकुटुंब हैद्राबादहून नागपूरला जाऊन आलो होतो! किल्लीचं लज़ानिया पाहून त्याची आठवण आली!
क्वीक ग्रील्ड पनीर खरपूस दिसतंय; करून पाहायला हवं या प्रकारचं.
>>> वाटलं नव्हतं (रसगुल्ले) एवढे बरे होतील असं.
एवढेच बरे नाही, बरेच बरे दिसताहेत! पटकन उचलून मटकावावे असे दिसताहेत! कोलकात्याला ताजा रोषागुल्ला खायचो त्याची आठवण झाली.
नाचणी डोसा
नाचणी डोसा
नाचणी डोसा छानच झालाय किल्ली,
नाचणी डोसा छानच झालाय किल्ली, जाळी छान पडली आहे. ... मी पण करते कधी तरी...
रसगुल्ले आवडले ... धन्यवाद अनिंद्य , rmd, धनि आणि वामनराव
Love
>>> नाचणी डोसा छानच झालाय...
+108
नाचणीची चव नाही आवडत पण डोसे
नाचणीची चव नाही आवडत पण डोसे छानच झाले असणार.
चटणीचा रंग भारी, सोबत सांबर आहे का ?
… नागपूरला जोग हॉस्पिटॅलिटीकडे पेस्टो लज़ानिया एक नंबर मिळतो…
योग्य व्यक्तिंना उपरोक्त माहिती सांगणेत येईल.
जीभ लई चहाडगी झाली हाय. पन
जीभ लई चहाडगी झाली हाय. पन पावसापान्यात भायरचं कायबी खाऊ नगा असा कारभारनीचा हुकुम हाय. तवा भाईर कायबी खात न्हाय, जे हाय ते गुमान घरला आनूनशानी खातो म्या.
# Love for spice
# Aaloo Samosa is 😍
>>>>घरला आनूनशानी खातो म्या.
>>>>घरला आनूनशानी खातो म्या.
हाहाहा
हो सांबार चटणी सोबत
हो सांबार चटणी सोबत

सकाळचं बॅटर उरलं
मग दुपारी केल्या इडल्या
नाचणी इडली डोसा दोन्ही छान…
नाचणी इडली डोसा दोन्ही छान… समोसा सोऽऽऽऽऽऽ गुड्डडडडडऽऽऽ.
किल्लीचे डोसे आणि इडल्या फारच
किल्लीचे डोसे आणि इडल्या फारच भारी दिसत आहेत. अगदी लगेच जेवायला जायला पाहिजे.
अनिंद्य>> समोसे आवडतात पण भजी आणि बटाटा वडे जास्ती आवडतात
ममो मला रसगुल्ले आवडतात. तुझे
ममो मला रसगुल्ले आवडतात. तुझे सुंदर दिसताहेत, मीही करुन पाहिन.
किल्ली डोसे व इडली मस्त. मी हल्ली तांदळाच्या जागी नाचणी किंवा नाचणी+ज्वारी वापरुनच इडली डोसे बनवते. चवीला पण छान लागतात.
समोसा ऑल टाईम फेवरिट
तो खायला म्हणून मागच्या
तो खायला म्हणून मागच्या उन्हाळ्यात आम्ही सहकुटुंब हैद्राबादहून नागपूरला जाऊन आलो होतो>>>>
वा!!! काय तो व्यासंग. मलाही खाऊगल्लींचे पत्ते वाचुन असे करावेसे वाटते.
मस्त! विकेंड इथे फिरकलो नाही.
मस्त! विकेंड इथे फिरकलो नाही...
सर्व खाऊगल्लीकरांना मैत्रीदिनाच्या आठवडाभर पुरतील इतक्या शुभेच्छा
नाचणी हा प्रकार पौष्टिक गटात येत असल्याने माझा पास... मी समोसे आणि रसगुल्ले उचलतो
Pages