मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचे हे आमची ही - ५० वा एपिसोड
दूरदर्शन सह्याद्री वर सोनाली खरे आणि विजय आनंद या जोडप्याची मुलाखत. मुलाखतकार - स्मिता गवाणकर
आत्ता लाईव्ह आहे.
https://www.youtube.com/watch?v=6fVMdZQIm9w

http://youtube.com/post/UgkxOhCUQL--izS7MIqifaKHZTB-Te2LkaEM?si=Bn88LjZh...

ही नंदू मुलमुले ह्यांची झोप, स्वप्ने, स्वप्नांचा अर्थ उलगडून दाखवणारी मुलाखत .. वेगळाच विषय आणि तेव्हढाच कुतूहलाचा.

ही मुलाखत नाहीये. पॉडकास्ट आहे. ह्यातून काही गोष्टी नक्कीच शिकता/लक्षात ठेवता येऊ शकतात. एकच खटकलेली गोष्ट. दोघंही बर्‍याचदा एकदमच बोलतायत आणि तो अजिबात गप्प न बसता एकसुरी चालूच ठेवतोय. आणि काही काही भाग रिपीट झाला आहे मुलाखतीत. सायली राजाध्यक्ष तिच्या घरी ब्रिटीश लोकं जेवायला आल्याचं दोनवेळा सांगतेय.
https://youtu.be/JRTWgrTqayU?si=nIJtgVNdoD6Kqnqi

मुग्धा गोडबोले ह्यांनी आरपार मध्ये वूमन की बात सेगमेंट मध्ये घेतलेली मेट्रो वूमन अश्विनी भिडे यांची मुलाखत जरूर बघा. मुलाखत तर खूप छान आहेच पण त्या जास्तीत जास्त मराठी बोलल्या आहेत हे ही एक विशेष.

वैभव मांगलेने आमच्या अनुभव अंकात दोन-तीन वर्षांपूर्वी लेख लिहिला होता.
चित्रकलेची आवड हाच फोकस होता. लॉकडाऊनमध्ये इतर कामं बंद पडली तेव्हा चित्रकलेने कसा हात दिला त्याबद्दल छान लिहिलं होतं.

https://youtu.be/jQFzjQq3ZNM?si=kGA90LQZvRiRPVfv

जपानमध्ये राहणाऱ्या आणि राजकारणासहित इतर बऱ्याच गोष्टीत सक्रिय असणाऱ्या योगेंद्र पुराणिक यांची छान मुलाखत.

गुलजार
खुसखुशीत, हास्यविनोदाने भरलेली, अर्थपूर्ण आणि राष्ट्रीयत्वाचे भान देणारी मोजक्या अर्ध्या तासाची सुंदर मुलाखत !

https://www.youtube.com/watch?v=PKU9pQC5fSE

दिलीप प्रभावळकरांची लोकमत ने घेतलेली मुलाखत बघा नक्की.
मस्त किस्से सांगितलेत. त्यातला बारा वर्षांच्या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचा त्यांनी घेतलेल्या व्हिडीओचा किस्सा आवडला.
हसवाफसवी बद्दल बोलताना ते म्हणाले कि नाटक कसं नसावं याचा उत्तम वस्तुपाठ. केव्हढे प्रांजळ मत.
यातल्या कृष्णराव या पात्राचा किस्सा पाहून गडाबडा लोळण घेतली. धमाल किस्सा आहे.
https://www.youtube.com/watch?v=74sGrx01ub4

स्टेजवर स्त्री वेषात ब्युटी कॉण्टेस्ट मधे भाग घेतल्याचा किस्सा एव्हढा काही आवडला नाही.

दिलीप प्रभावळकरांची लोकमत ने घेतलेली मुलाखत बघा नक्की.>> ही बघितली चांगली आहे. पण ती मुलाखतकार बाई एकदम डंबोदरी आहे. तिचे जुन्या मराठी सिनेमांचे द्न्यान शून्य आहे आणि नाटके तर नाहीच माहित. चंद्रकांत काळेंचा उल्लेख आल्यावर हे कोण आता असे झाले. अतुल परचुरेचा आणि नातीगोती नाटकचा उल्लेख आला, तर तिला ते सुद्धा माहीत नव्हते.

डंबोदरी हा शब्द बेहद्द आवडलेला आहे. Lol

दिलीप प्रभावळकर माझे आवडते अभिनेते. नक्की बघते मुलाखत.

ती बाई मला भरत नाट्य मंदीरच्या बाहेर भेटली होती तेव्हा सततच लाडीक बोलणं, आश्चर्यचकीत हावभाव डोक्यात गेले होते.
ते तसं चेहर्‍यावर न दाखवणं हेच आव्हान होतं. Proud

आमचे हे- आमची ही - (विठ्ठल आणि विद्या कामत)
खूपच मनमोकळी आणि मस्त होती ही मुलाखत. दिलखुलास गप्पा आणि जीवनविषयक तत्वज्ञान.

आमचे हे- आमची ही - (स्मिता आणि मोहन जयकर)
वाह! मस्त मुलाखत. सॉल्ट न पेपर केसातही, स्मिता काय ग्रेसफुल दिसते. जयकर कुटुंबास अध्यात्मिक बाजूही आहे असे दिसते.

मध्यंतरी असे ऐकण्यात आले की माबोवरही श्री-सौ जोड्या जमल्या आहेत, लगिन गाठी जुळल्या आहेत. खरं तर माहीतच नाहीत कोण आहेत हे आय डी Happy या आय डींचीही अशी मस्त मुलाखत घ्यायला हवी. एखाद्या गणपती कार्यक्रमात अश्या ठसकेबाज, प्रेमळ, विनोदाची किनार तर कुठे तत्वज्ञान सांगणार्‍या मुलाखती यायला हव्या Happy

मुलाखत घ्यावी ती सुधीर गाडगीळ यांनीच.
https://www.youtube.com/watch?v=aiwDkFPnNb0

२०११ साली (पहिल्यांदाच आणि एकदाच) ३ प्रतिभावान कवी, १ अप्रतिम गायक आणि एक तुफान लोकप्रिय निवेदक - मुलाखतकार एकाच व्यासपीठावर 'कवी आणि निसर्ग' या मराठी कवितांच्या मैफिलीसाठी एकत्र आले होते. संदीप खरे, गुरु ठाकूर, किशोर कदम (सौमित्र), गायक मिलिंद इंगळे आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करुन सोडले होते. संकल्पना अभिजीत टिळक यांची होती आणि 'अरण्यवाक्' या संस्थेसोबत हा कार्यक्रम सादर झाला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मैफिलीतील काही भाग.
( पाच सहा छोटे छोटे भाग आहेत. बाकीचे भाग सापडतीलच)

सुमित्रा भावे यांच्या चित्रपटांवर व संहितांवर- त्यांची त्या मागची विचारप्रक्रिया यावर चर्चा असलेला भाडिपाचा पॉडकास्ट पाहिला. सारंग साठ्ये, आलोक राजवाडे, मोहन आगाशे, अमृता सुभाष, सुनील सुकथनकर यांचा सहभाग होता. 'खोल गप्पा' नावाचा सखोल विषयांवर चर्चेसाठी नवा कार्यक्रम भाडिपावर सुरू झाला आहे, त्याचा हा पहिला भाग -

तुम्ही भावना कशा प्रोसेस करता त्यात grief (आप्तशोक) आणि depression (नैराश्य ) वेगवेगळ्या माणसात कसं उमटू शकतं. त्याला वाट करून देणारे 'टूल' प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत का, शिवाय अल्झायमर(अस्तु) किंवा व्हिटिलिगो (नितळ) हा कलंक नसून फक्त कंडिशन किंवा आजार आहे. ह्या सगळ्याकडे त्यांच्या घरातील लोक किंवा प्रेक्षक कसं बघतात, कसं समजून घेतात. मी हे सगळे सिनेमे पाहिलेले नाहीत पण संदर्भ समजले.

हे सगळं सुमित्रा भावेंनी त्यांच्या बाधा, देवराई, कासव, अस्तु, दिठी चित्रपटांतून कसं पुढे आणले. एखाद्या आजाराची अधिकृत माहिती त्यांच्या सिनेमात असायची. ती सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोचायची.

एकाच वेळी एखादी प्रोफाऊंड वागणारी व्यक्ती अचानक व्हल्नरेबल होऊन शकते. आयुष्यात अतिशय पॅशनेट व बहिर्मुख वाटणाऱ्या व्यक्तीलाही नैराश्य येऊ शकते. हे सगळे प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न त्या व्यक्तिरेखेच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना पडावीत व त्यातून संवादाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी प्रश्न पडावेत. अतिशय गंभीर गोष्टीसुद्धा आपण अचानक कॅज्युअली बोलून जातो, ते संवादातून अकृत्रिम कसं मांडलं यावर चर्चा आहे.

माणसाचे दोन मेंदू असतात, एक भावनिक आणि एक बौद्धिक. आपलं सगळं शिक्षण फक्त बौद्धिक मेंदूला चालना देणारे असून चित्रपट मात्र भावनिक मेंदू वापरायला शिकवणारा आहे. त्यातून प्रश्न पडायला हवेत, उत्तर नाही मिळाले तरी चालेल.

सुमित्रा भावेंनी निसर्गाचा उत्तम वापर करून मुख्य व्यक्तिरेखेची मानसिक स्थिती सांगितली आहे. कासव मधे लाटा, अस्तु मधे हत्ती, दिठी मधे पाऊस, बाधा मधे रखरखीत जमीन आणि देवराईत गर्द जंगल. सिनेमा नुसताच अस्वस्थ करून सोडणारा नसून त्या व्यक्तिरेखेच्या प्रवासात प्रेक्षकाला पुढे नेणारा असावा असे त्यांना वाटायचे. And even existential crisis - meaning of life. एखादा प्रसंग किंवा परिस्थिती तुमच्या आतून जो अर्थ बाहेर काढते तोच तुमच्या आयुष्याचा अर्थ - त्यामुळे प्रत्येकाचा वेगळा. नाहीतर सगळे तसे निरर्थकच आहे. एखाद्याला गवसेल, एखाद्याला गवसणारही नाही.

शिवाय सुमित्रा भावे यांच्या जाण्याने या सगळ्यांना नेमकं काय वाटलं तो grief आणि दिठी मधला grief याची तुलना किंवा पर्स्पेक्टिव्ह म्हणेन - तो यांना कसा मिळाला यावर चर्चा आहे.

चांगली चर्चा आहे. अगदीच गंभीर नाही, साधीसहज चर्चा - गप्पाही आहेत.

Pages