मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाईने नथ घातली आहे, ते टोपलं म्हणजे दिवाळीत चॉकलेट भेट देतात तसलं वाटतंय. त्याला बंद आहेत.
टोमॅटोची १५ फुटी रोपं >>> Lol
हे ही भारी निरीक्षण आहे.

राभू Lol

शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांनी क्षमा करावी. हे सांगायला आले.
(ता. क. :काही दिवस रूचा चढ्ढा, वाणी कपूर, सई माझे फेवरेट असणार आहेत)

सबला मिलेट्सची ही जाहिरात अगदीच फेक वाटली.
https://www.instagram.com/reel/DCcAnhCAC8V/

टेबल बघताना एवढं सगळं खाणार कोण असा प्रश्न पडतो. दक्षिण भारतीय कुटुंब दाखवलंय आणि आजीबाईंच्या भांगात सिंदूर आहे. त्या श्लोक पहिल्यांदाच म्हणताहेत असं त्यांच्याकडे आणि नातवाकडे बघून वाटतं. मुलाने प्रश्न विचारल्यावर आईच्या चेहर्‍यावर हसू उमटतं ते मोनालिसाच्या स्मितहास्याइतकं गूढ आहे. पुढे तांब्यापितळेची भांडी.

मला नेटवर हिंदीत डब केलेली ही जाहिरात दिसत राहते.

Pages